नमस्कार मिपाकरांनो,
सोमवारी (१७-०१-२२) रात्री थोडी अंगदुखी जाणवू लागली होती.
दुसऱ्या दिवशी (१८-०१-२२) सकाळी अंगदुखी आणि डोकेदुखीच्या जोडीला सर्दीमुळे नाक चोंदणे, कोरडा खोकला, घशात खवखव आणि अंगात थोडी कणकणही जाणवू लागली.
धुळ, धुर आणि प्रदुषित हवेमुळे मला वर्षातून एकदा किंवा अपवादाने दोनदा ‘थ्रोट इंफेक्शन’ होते, त्यावेळी असे त्रास होत असल्याने अशावेळी हमखास उपयोगी पडणाऱ्या ‘ॲझीथ्रोमायसीन’ + ‘क्रोसीन’ ह्या गोळ्या घेतल्या पण रात्री जुलाब झाले आणि तापाचा पारा तीन पर्यंत चढल्यावर मात्र बुधवारी सकाळी दवाखाना गाठला.
डॅाक्टर चांगले अनुभवी असल्याने त्यांनी लक्षणे पाहुनच ओमायक्रॅानचे निदान करून औषधोपचार सुरू केले आणि खात्री करण्यासाठी टेस्ट करण्याचा सल्ला दिला. (रिपोर्ट अर्थातच पॅाझीटीव्ह आला)
त्या दिवशी (बुधवार १९-०१-२२) दिवसभर थोडा ताप असला तरी रात्री पारा दोन पर्यंत चढला होता.
काल गुरूवार (२०-०१-२२) दिवसभरात आणि रात्रीत ताप एक पर्यंत मर्यादीत राहीला आणि नाक व्यवस्थीत मोकळे होऊन छातीत साठलेला कफ बाहेर पडु लागला.
गेले तीन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ आणि रात्री कमी-अधिक प्रमाणात ताप होता पण आज शुक्रवार (२१-०१-२२) सकाळपासून ताप आला नाहीये. सर्दी नसल्यात जमा झाली आहे आणि खोकल्याद्वारे कफ बाहेर पडत आहे.
आता किंचीत अंगदुखी-डोकेदुखी आणि बऱ्यापैकी अशक्तपणा तेवढा जाणवत आहे.
आमच्या कुटुंबातील मी सोडुन बाकी सर्वांचे लसीकरण झालेले आहे. (आई-बाबांचे नुकतेच बुस्टर डोस देखील घेउन झाले आहेत)
लसीचे दोन डोस घेऊन झालेल्यापैकी माझी बहीण, तीचे मिस्टर आणि मुलगा असे तिघेही जानेवारीच्या पहील्या आठवड्यात ह्या आजाराने बाधीत झाले होते. त्या तिघांना दोन दिवस अंगदुखी आणि एक दिवस कमाल दोन पर्यंत ताप असा त्रास झाला होता. सात दिवस होम क्वारंटाईन रहावे लागले, कोणालाही हॅास्पिटलमध्ये दाखल व्हायची वेळ आली नाही. हा आजार पहिल्या आणि दुसऱ्या करोना लाटेएवढा गंभीर (निदान भारताततरी) नक्कीच नाही.
आता तिसऱ्या आठवड्यात लसीचा एकही डोस न घेतलेल्या मला हा आजार झाल्यावर चार दिवसांत काय त्रास झाला तो अनुभव मी मांडला आहे आणि पुर्ण रिकव्हर होईपर्यंत अधिक काही सांगण्यासारखे असल्यास त्याचीही भर घालीनच.
आपल्यापैकी (लस घेतलेल्या अथवा न घेतलेल्या) कोणाला किंवा कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळींना हा आजार झाला असल्यास त्यांचे अनुभव शेअर करावेत ही विनंती.
वैयक्तिक पातळीवर मी लसीकरणाच्या विरोधात असलो तरी ह्या धाग्यावरील चर्चेचा रोख त्याविषयी न रहाता शक्यतो स्वत:च्या किंवा आपल्या आप्तस्वकियांच्या ह्या आजारात आलेल्या अनुभवकथनावर आधारीत राहील्यास चांगली माहिती गोळा होऊ शकेल.
अपडेट (शनिवार - २२-०१-२२)
आजही सकाळपासून ताप आलेला नाही आणि खोकलाही कमी झाला आहे.
पण काल संध्याकाळ पासुन एक नविन त्रास सुरू झाला.
आधी डावा खांदा आणि मानेचा डावा भाग दुखायला सुरूवात झाली मग दोन-अडीच तासांनी उजवा खांदा आणि मानेचा तो भागही चांगलाच दुखायला लागला.
ह्या मान आणि खांदेदुखीमुळे पहाटेपर्यंत झोप लागु शकली नाही.
आता डावीबाजु पुर्णपणे दुखायची थांबली आहे… उजवी बाजूही लवकरच दुखायची थांबेल अशी आशा आहे.
बाकी अशक्तपणा अजूनही बऱ्यापैकी जाणवतो आहे आणि तो बरेच दिवस राहू शकेल असे अनुभवी लोकांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अपडेट (सोमवार - २४-०१-२२)
काल (रवीवार) पहाटे इथे चांगलाच पाऊस पडल्याने हवामान अचानक बदलले. दिवसभर ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या थंडीमुळे बऱ्या झालेल्या सर्दीने पुन्हा डोके वर काढले!
मानेचा उजवा भाग आणि खांदा अजुन पुर्णपणे थांबायचे नाव घेत नाहीये.
आज डॅाक्टरांनी दिलेला पाच दिवसांच्या औषधांचा कोर्स संपत आहे.
गेले पाच दिवस घेत असलेली औषधे.
Zolzica (Capsules)
Cefzica-O
Zykacet-M
Anmol-650
Amrox (Cough Syrup)
Trudine (Germicide Gargle)
(ह्या व्यतिरिक्त त्यांच्या कडच्याही २ प्रकारच्या सुट्ट्या गोळ्या डॅाक्टरांनी दिल्या होत्या त्यांची नावं माहित नाहीत.)
उद्या फॅालोअपला जायचे आहे तेव्हा खांदेदुखी थांबण्यासाठी आणि पुढे घेण्यासाठी काही नवीन औषधे देतात का ते पहायचे.
प्रतिक्रिया
21 Jan 2022 - 4:16 pm | कुमार१
सर्वप्रथम तुम्हाला लवकर तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा
..........................................
'नेचर’ मधील एक ताजा लेख आशा पल्लवित करणारा आहे.
(https://www.nature.com/articles/s41577-022-00678-4/figures/1)
त्यामध्ये ऑक्टोबर 2020 ते आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आजाराचा शास्त्रशुद्ध अभ्यास दिलेला आहे. त्यातून दोन थिअरीज पुढे येतात :
१. ओमायक्रोन हा प्रकार मुळातच डेल्टापेक्षा सौम्य हानिकारक आहे.
२. एव्हाना लोकांमध्ये नैसर्गिक आजार आणि लसीकरण या दोन्हींच्या संयोगाने चांगली समूह प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. तिच्यामुळे ओमि. विरुद्ध शरीराचा लढाही चांगला होतोय. या दोन्ही थिअरीजसाठी पुरावे मिळालेले आहेत.
एकत्रितपणे या दोन्ही मुद्द्यांमुळे समाजातील सर्वसाधारण आजार सौम्य स्वरूपाचा राहिला आहे.
यापुढेही विषाणूची उत्परिवर्तने होत राहतील. त्यातून निर्माण होणारे नवे प्रकार आपल्याशी सौम्यपणे वागण्याची शक्यता आहे.
पण सावधानता आवश्यक.
21 Jan 2022 - 4:29 pm | तुषार काळभोर
कुमार डॉक्टरांचं पटतंय. मागील दोन वर्षात कदाचित निर्माण झालेली नैसर्गिक प्रतिकार शक्ती या नव्या व्हेरियंट ला जास्त चांगल्या प्रकारे तोंड देत असेल.
तुम्ही अनुभव शेअर केला, हे खूप चांगलं झालं. म्हणजे काय झाल्यावर ' असं' आहे समजायचं, ते कळलं :)
नवा प्रकार मुळात सौम्य असणे, लोकांची जास्त चांगली शारीरिक आणि मानसिक तयारी असणे, यामुळे आता (तपासण्या कमी झाल्याने) संख्याही कमी होतेय. पटपट बंधने कमी होऊ लागली आहेत. शाळाही बहुधा सुरू होताहेत. लवकरच आपण सगळे या टांगत्या तलवारीपासून मुक्त होऊ, अशी आशा वाटायला लागली आहे.
21 Jan 2022 - 5:28 pm | ॲबसेंट माइंडेड ...
लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.
21 Jan 2022 - 6:24 pm | कंजूस
माझ्या मुलीला ( एक डोस घेतलेला आहे.)दोन आडवड्यापूर्वी झाला आणि तुम्ही सांगता तीच लक्षणे आणि तीच औषधे ( एरिथ
रोमाइसिन आणि विटामिन+मेटलस ) घेतली होती. डॉक्टरही बोलले घाबरू नका. त्यांच्याकडे सतत रुग्ण येत असल्याने आणि इतर डॉक्टरांचे आपसापात माहिती देवाणघेवाण यामुळे खात्री असते.
१.
दोन दिवस घसा लाल आणि ताप यामुळे antigen test करवली. त्यात पाझटीव आल्यावर अर्ध्या तासात नगरपालिकेच्या खात्यातून फोन आला की आमचे लोक इमारतीत येत आहेत माहिती घ्यायला. तसे आले आणि विचारले घरात ठेवायचे असेल तर तुमच्या त्या डॉक्टरचे सर्टिफिकेट डिपार्टमेंटला पाठवा. मग डॉक्टरना सर्टिफिकेट मागितल्यावर म्हणाले की सकाळ संध्याकाळ ओक्सीजन लेवल आणि तापमान मला पाठवणार तरच देतो. तसे हो सांगून घरी राहिली. त्यांना विचारले की आम्ही बाहेर पडू शकतो का? तर "एवढे गंभीर नाही , तुम्ही बाहेर जा. पण रोग्यापासून दूर राहा. टॉइलेट एकच असल्यास तिथे सानिटाईज करत राहा."
२. ते सर्टिफिकेट आणि antigen report नोकरीच्या ठिकाणी पाठवले रजेसाठी तर ते RTPCR report हवाच म्हणाले. मग टेस्टिंग lab कडे गेल्यावर ते बोलले की antigen positive आल्यास RTPCR लगेच नाही करणार. (इथे या केंद्रात फ्री आहे. ) पण मग बाहेरून आठशे रुपये देऊन टेस्ट करवली. त्यात १९% कोविड _१९ बाधितआले.
३. चार दिवसांनी ताप नाही पण अंगदुखी होती व दररोज सुधार होत गेल्याने निश्चिंत झालो. अन्यथा छातीचा scan करावा लागतो. म्हणजे रोग बरा होत नसेल तर तो घशापासून खाली पसरतो आहे का पाहतात.
----------
या सर्वातून मुक्त होऊन व्यवहार लवकर सुरळीत होवो.
22 Jan 2022 - 9:41 am | धर्मराजमुटके
थोडक्यात काय तर लस घेतलेले आणि न घेतलेले दोन्ही रोगास बळी पडतात. त्यामुळे लस घेतली त्याचा खरोखर फायदा होता काय हे समजण्यास वाव नाही.
22 Jan 2022 - 9:54 am | रात्रीचे चांदणे
मुंबई महापौराच्या म्हणण्यानुसार मुंबईतील ICU मध्ये असणाऱ्या रुग्णापैकी 94% लस न घेतलेले आहेत. लस घेतलीतर करोना होणारच नाही हे तर लस बनवणाऱ्या कंपण्यापन म्हणत नाहीत फक्त करोना होण्याची शक्यता कमी होते आणि समजा झालाच तर त्रास कमी होतो.
22 Jan 2022 - 10:05 am | ज्ञानोबाचे पैजार
भरपुर विश्रांती घेण्याची ऐती संधी चालून आली आहे तिचा पुरेपुर उपयोग करुन घ्या... न चूकता औषधे घ्या आणि संतुलीत आहार घ्या ...लवकर बरे व्हा वेळोवेळी प्रगती इथे कळवत रहा...
आणि हो इथे माहिती शेअर केल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
रच्याकने:-
या निमित्ताने एक प्रष्ण आहे सध्या म्युकरमायकोसिस चा एकही पेशंट दिसत नाही याचे कारण इथला कोणी वैद्यकिय तज्ञ देऊ शकेल का?
मधे या आजाराने धुमाकुळ घातला होता, कोरोना झाला की आता लगेच म्युकरमायकोसिस होणार असे काहीसे वातावरण होते.
पण सध्या त्याच्या बद्दल काहिही ऐकायला येत नाही असे का?
पैजारबुवा,
22 Jan 2022 - 9:57 pm | नागनिका
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा खूप जाणवत होता आणि त्यामुळे अस्वच्छ, गंजलेल्या नळ्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला आणि बुरशीजन्य आजार वाढले.
22 Jan 2022 - 10:11 am | प्रचेतस
छानपैकी आराम करा आणि काळजी घ्या.
22 Jan 2022 - 11:15 am | सर टोबी
पावसाळ्याच्या सुरवातीला जेव्हा हवा गरम असते आणि हवेत आर्द्रता जास्त असते तेंव्हा सहसा फ्लूची साथ असते. तसेच हिवाळ्याच्या मध्याला, विशेषतः पानगळ सुरू झाल्यावर फ्लू अधिक अलर्जिक सर्दीचा त्रास असतो. असे तर होत नाहीं ना की असे पेशंट देखील ओमायक्रोन चे पेशंट म्हणून गणले जातात.
22 Jan 2022 - 11:33 am | माईसाहेब कुरसूंदीकर
ठरलेलेच सल्ले देते- काळजी घ्या, संतुलित आहार घ्या, पथ्ये पाळा.. आता बूस्टर की फूस्टर आलाय तोही घ्यायचा आहे. बाकी औषधी कंपन्या आपली तुंबडी भरत आहेत.
22 Jan 2022 - 11:40 am | मदनबाण
आमच्या घरचे सगळे या साथीतुन गेले, मला ताप येउन हुडहुडी भरल्याचा अनुभव देखील यावेळी मिळाला ! :))) पहिले ३ दिवस ताप बर्या पैकी होता.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Siva Jag Mein... :- Tadap
22 Jan 2022 - 12:21 pm | मित्रहो
सर्वप्रथम तुम्हाला लवकरात लवकर बरे व्हा या शुभेच्छा. तसा ओमायक्रॉन लवकर बरा होतो आहे. माझ्या घरी मुलाला ताप होता त्याचे मित्र पॉझिटिव्ह आले होते म्हणून टेस्ट केली. पॉझिटिव्ह आली. लस नाही. चार दिवस ९९ च्यावर ताप होता. आता आठवडा झाला व्यवस्थित आहे.
तुम्ही लवकरच बरे व्हाल मस्त आराम करा. पुस्तके वाचा.
22 Jan 2022 - 2:28 pm | कर्नलतपस्वी
लवकरच बरे व्हाल, अशक्तपणा जाणवेल विश्रांती आणी योग्य पचनाला हलका आहार घ्या.
22 Jan 2022 - 2:42 pm | sunil kachure
Omicron नी मीडिया ची खूप फसवणूक केली.इशारे देणाऱ्या लोकांची पण फसवणूक केली.
खरोखर हा व्हायरस लबाड आहे
अमक्या तारखेला लाट येईल तमक्या तारखे नंतर मृत्यू वाढतील
आरोग्य सेवा तणावात येईल काय काय अपेक्षा ठेवल्या होत्या.
पण लबाड ओमायक्रोन फसवले सर्वांना.
22 Jan 2022 - 3:31 pm | ॲबसेंट माइंडेड ...
>>पण लबाड ओमायक्रोन फसवले सर्वांना.>>>
भरपुर लोकं ओमायक्रोनने आजारी पडुन पटापट मरावीत अस वाटतय का तुम्हाला?
22 Jan 2022 - 3:51 pm | sunil kachure
पूर्ण para च एकत्रित अर्थ घेतला जातो.
गरजेच्या दोन च ओळी घेवून अर्थाचा अनर्थ करण्याचे कॉन्ट्रॅक्ट राजकारणी ,आणि मीडिया मधील लोकाकडे असते.
आपण सामान्य लोक आहोत.
22 Jan 2022 - 2:54 pm | Bhakti
लवकर बरे होताल, विश्रांती घ्या.
22 Jan 2022 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या तर घरोघरी थंडी, ताप, सर्दीचे रुग्ण दिसत आहेत. पूर्वी जी दहशत करोनाची होती ती आता तितकी राहीलेली नाही. सगळेच लोक लवकर बरे होत आहेत. आपणही लवकरच बरे व्हाल. सर्वांनी काळजी घेत राहावी. मास्क, दो गज की दुरी, सॅनिटायझर साबण पाण्याचा वापर, स्वच्छता वगैरे सर्व. कै होत नै असे म्हणना-यापासून दूर राह्यचं. बाकी, लस वगैरे. असो.
-दिलीप बिरुटे
22 Jan 2022 - 6:35 pm | टर्मीनेटर
शुभेच्छांसाठी आपल्या सर्वांचे मन:पुर्वक आभार 🙏
22 Jan 2022 - 6:42 pm | टर्मीनेटर
अपडेट (शनिवार - २२-०१-२२)
आजही सकाळपासून ताप आलेला नाही आणि खोकलाही कमी झाला आहे.
पण काल संध्याकाळ पासुन एक नविन त्रास सुरू झाला.
आधी डावा खांदा आणि मानेचा डावा भाग दुखायला सुरूवात झाली मग दोन-अडीच तासांनी उजवा खांदा आणि मानेचा तो भागही चांगलाच दुखायला लागला.
ह्या मान आणि खांदेदुखीमुळे पहाटेपर्यंत झोप लागु शकली नाही.
आता डावीबाजु पुर्णपणे दुखायची थांबली आहे… उजवीही लवकरच थांबेल अशी आशा आहे.
बाकी अशक्तपणा अजूनही बऱ्यापैकी जाणवतो आहे आणि तो बरेच दिवस राहू शकेल असे अनुभवी लोकांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे.
23 Jan 2022 - 1:45 am | अक्षय देपोलकर
अशक्तपणासाठी जमल्यास काळे खजूर खाऊन बघा....
मला काळ्या खजुराच चांगला उपयोग झाला ह्याच अशक्तपणासाठी ..
22 Jan 2022 - 10:48 pm | MipaPremiYogesh
Lavkare bare honya sathi shubhecha..
22 Jan 2022 - 11:06 pm | सरिता बांदेकर
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.
आणि अपडेट देताय तसेच देत रहा.
23 Jan 2022 - 7:47 pm | चांदणे संदीप
पहिली लाट आली, गेली. दुसरी लाट आली, गेली. सर्व काही सुरळीत चालू होते. कामाच्या ठिकाणी दोन्ही लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करण्याची बर्याच कंपन्यांची पॉलिसी असल्यामुळेच मला लस घ्यावी लागली. १७ जानेवारी रोजी दुसरा डोस घेतला आणि मी पॉझिटिव्ह झालो. आता एकांतवास. दोन-चारशे कविता लिहून काढाव्या म्हटलं पण कसलं काय! एक सुचेल तर शपथ! ;) रक्तातच "बी पॉझीटीव्ह" लिहून ठेवलंय म्हणून ओके आहे अजूनतरी. :)
ह्या ओमायक्रॉनच्या लाईनवर टर्मिनेटर एक स्टेशन आधी सुखरूप उतरून जातील आणि मी पुढच्या स्टेशनला उतरेन.
सं - दी - प
23 Jan 2022 - 10:19 pm | अनिरुद्ध.वैद्य
हे जो पर्यन्त टेस्ट करत नाहीत, तो पर्यंत कळत नाही. प्राय्व्हेट सेन्टर्स फक्त कोव्हिड आहे की नाही, इत्कच सांगु शकतात, त्यामुळे आपल्याला डेलटा झालाय कि ओमिक्रॉन हे सरकारी केंद्रावर टेस्ट केली तरच कळेल.
तसेही, सध्याच्या घडीला, आकडेवारीनुसार, ओमिक्रॉन पसरत नाहिये, ज्या प्रमाणात इतरत्र पसरला. त्यामुळे, हा डेलटाच असावा अस वाटतय. लसीकरणामुळे डेल्टाला प्रचंड आळा बसलाय, अन्यथा ह्याच डेल्टाने हाहाकार उडवला होता वर्षभरापुर्वी.
बाकि, काळजी घ्या. नुकताच मीही पॉझिटिव्ह होउन गेलो. निव्वळ १ दिवसाच्या तापावर निभावले . तुरळक शिंका अन खोकला झालेला. पण शिंकल्यावर छाती अन फुफ्फुसे कोणतरी उपटुन काढतंय की काय अश्या कळा यायच्या. बाकी दिवसातुन २ ३ वेळाच आल्या शिंका अन नंतर थांबल्या. ७ दिवस विलगीकरण अन सुट्टी!
पण विकनेस अन सडन फटिग अजुनही जाणवत राहते.
24 Jan 2022 - 10:53 am | नचिकेत जवखेडकर
काळजी घ्या! लवकर बरे व्हा आणि कोकण लेखमाला पूर्ण करा :)
24 Jan 2022 - 3:27 pm | टर्मीनेटर
अपडेट (सोमवार - २४-०१-२२)
काल (रवीवार) पहाटे इथे चांगलाच पाऊस पडल्याने हवामान अचानक बदलले. दिवसभर ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या थंडीमुळे बऱ्या झालेल्या सर्दीने पुन्हा डोके वर काढले!
मानेचा उजवा भाग आणि खांदा अजुन पुर्णपणे थांबायचे नाव घेत नाहीये.
आज डॅाक्टरांनी दिलेला पाच दिवसांच्या औषधांचा कोर्स संपत आहे.
गेले पाच दिवस घेत असलेली औषधे.
Zolzica (Capsules)
Cefzica-O
Zykacet-M
Anmol-650
Amrox (Cough Syrup)
Trudine (Germicide Gargle)
(ह्या व्यतिरिक्त त्यांच्या कडच्याही २ प्रकारच्या सुट्ट्या गोळ्या डॅाक्टरांनी दिल्या होत्या त्यांची नावं माहित नाहीत.)
उद्या फॅालोअपला जायचे आहे तेव्हा खांदेदुखी थांबण्यासाठी आणि पुढे घेण्यासाठी काही नवीन औषधे देतात का ते पहायचे.
24 Jan 2022 - 5:40 pm | सौंदाळा
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.
24 Jan 2022 - 6:07 pm | कुमार१
शुभेच्छा आहेतच.
खांदेदुखी हे लक्षण जरा वेगळेच आहे. थंडीमुळे विविध समस्यांची सरमिसळ शरीरात झालेले दिसते
तुमचे डॉक्टर योग्य सल्ला देतीलच
अधुन-मधुन एखाद दुसरे वर्डल खेळा. तेवढाच विरंगुळा होईल . :)
25 Jan 2022 - 4:48 am | चौकस२१२
एवढी औषधे ?
नुकत्याच इथे ओळखीच्यांत ( वय ४०-४५) ओमिक्रोन होऊन गेला ... व्हायरस असल्यामुळे आणि आणि माफक लक्षणे असल्यामुळे , पॅरासिटोमोल + विश्रन्ती / पाणी यापेक्षा फारसे काही सांगितले नवहते ज्याप्रमाणे नेहमीचा फ्लू व्हायरस असल्यावर जो सल्ला देतात तसेच
असे का असावे ? दोन देशात एवढा फरक ?
24 Jan 2022 - 5:52 pm | वामन देशमुख
टर्मिनेटर,
काळजी घ्या, डॉक्टरांचा सल्ला पाळा आणि लवकर बरे व्हा!
मुख्य धाग्यात अपडेट्स जोडत आहात हे चांगले आहे; हा धागा भविष्यात एक संदर्भ म्हणून उपयोगी पडेल.
---
BTW, उत्साह वाटत नसेल तर टर्मिनेटर २ आणि ३ पहा, फरक पडेल!
;)
27 Jan 2022 - 9:49 am | सुरसंगम
तुम्हाला लवकरात लवकर बरे व्हा या शुभेच्छा!
पूर्ण बरं झाल्यावर महिन्याभरानंतर एक छोटी सहल करा आणि बैजवर लेख येऊ द्या.
तुमचे भटकंतीचे लेख खूप छान असतात.
27 Jan 2022 - 1:35 pm | sunil kachure
इतके स्पष्ट कोणी बोलणार नाही.
अनेक मर्यादा असतात
तुम्ही तुमच्या धाग्याचे नाव omeycron है ठेवायला नको होते.
Omeycron वर लोकांची मत वेगळी आहेत.
तुमच्या प्रेमा खातर आणि सभ्यता म्हणून .
ठराविक प्रतिसाद देणं ही majburi झाली
तुम्ही बाधित झालात sars 2 नी .
आणि त्या नंतर तुमचे अनुभव .
हे योग्य ठरले असतें.
27 Jan 2022 - 5:18 pm | चौथा कोनाडा
बरे झाला असाल आता पर्यंत, अशी आशा करतो.
सध्या थंडीची लाट आली असल्यामुळे घरचे सर्दीच्या आजारातून जात आहेत.
आयु, डॉक्टरांनी "काऴजीचे कारण नाही" असे सांगून चैतन्य काढा घेण्यास सांगितले आहे.
28 Jan 2022 - 12:54 pm | लई भारी
मागच्या रविवारी(२३ जाने.) सकाळ पर्यंत काहीच नव्हते आणि दुपारी अंगावर घेऊन झोपावंसं वाटलं. ४ वाजे पर्यंत ताप चढू लागला होता.
संध्याकाळी/रात्री Paracetamol घेऊन सुद्धा १०१ च्या वर ताप. त्यात हुडहुडी आणि अंगदुखी तर अशी कि आजपर्यंत अनुभवली नाही. ३-४ वेळा अंग पुसून काढले.
डॉ. मित्राशी फोनवर संपर्कात होतो, तो म्हणाला १००% कोविड आहे. फक्त Paracetamol घ्यायची, गरजेनुसार. जास्तीत जास्त ४ वेळा(६ तासाच्या अंतराने). टेस्ट करायची गरज नाहीच, लक्षणा नुसार औषधे देऊ. तरीपण अँटीजेन केली, पॉजिटीव्ह आली.
मला ताप आणि अंगदुखी सहन होईना म्हणून खूप गयावया केल्यावर Tramadol मिळते का बघ म्हणाला. रात्री ११ च्या दरम्यान झाली उपलब्ध. मी थोड्या वेळाने बघू म्हणून थांबलो पण मध्यरात्री घाम आला आणि ताप ओसरू लागला. Tramadol घेतली नाही नंतर.
सर्दी साठी Sinarest किंवा Levocet घ्यायला सांगितली.
पुढचे ३ दिवस Paracetamol घेतल्यावर ६-८ तासांनी ताप १०० च्या पुढे जात होता मग गरजेनुसार घेत होतोच. पण पहिल्या दिवशी इतका वाढला नाही.
दरम्यान कोरडा खोकला झाला म्हणून Ascoril-D Plus दिले. लोकल डॉक्टर म्हणत होते कि Azithromycin घ्यावी पण मित्र म्हणे अजिबात घ्यायची नाही, काहीच role नाहीय. विनाकारण antibiotic नको घेऊ. मग म्हटले की घसा खवखवतो आहे, तर मग Lidocam नावाचा एक माऊथ वॉश आहे त्याने गुळण्या करायला सांगितल्या. (त्याने माझ्या सोबत खुन्नस काढली हे वेगळे सांगणे ना लगे. खूप बेकार चव राहते याची :-D पण साला गुण आला! )
त्याने (गमतीने) मला सांगितले होते कि ५ दिवस होईपर्यंत ताप आहे म्हणून मला सांगायचे सुद्धा नाही. तो राहणार आहेच, पिळवटून सुद्धा काढेल. सहन करणे. काही होत नाही :-)
शेवटच्या २ दिवसात चव गेली. त्यामुळे एकंदरीत स्थिती बघून डॉ च्या मते हा ओमिक्रॉन नसून डेल्टा असावा.
यादरम्यान सर्दी, शिंका यांनी इतका त्रास नाही दिला. इतर वेळी मला आधी allergic सर्दी पासून सुरुवात होते आणि बाकी सगळी लक्षणे येतात.
आता थोडा खोकला आहे अजून आणि अंगदुखी. बाकी पहिल्या दिवशी पेक्षा खूप फरक आहे.
दोन्ही डोस झाले होते माझे.
28 Jan 2022 - 2:05 pm | टर्मीनेटर
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि डॉक्टरी ईलाजांनी मी ह्या आजारातून आता बरा झाल्याचे कळवण्यास आनंद होत आहे.
आपल्या पैकी अनेकांनी त्यांचे अनुभव इथे मांडून माहितीत मोलाची भर घातली त्याबद्दल त्यांचे आणि सर्व शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार 🙏
28 Jan 2022 - 3:09 pm | वामन देशमुख
आजारातून बरे झाल्याबद्धल अभिनंदन.
---
post -illness लक्षणे आढळून आल्यास त्याबद्धल इथे लिहिलात तर बरे होईल.
29 Jan 2022 - 5:09 pm | कासव
माझ्या १ bhk घरी मी (३३) पत्नी (३०) मुलगी (१० महिने) आई ( ७०) आणि बाबा (८०) एवढे जण राहतो. मुलगी वगळता सर्वांचे २ डोस झालेत.
बाबा ना विस्मृती चा त्रास आहे २६ तारखेला रात्री बाबा खूपच असंबद्ध बडबड करू लागले आणि लहान पणीच्या गोष्टी आठवून रडू लागले. काही ऐकेचना. शरारिक स्थिती उत्तम होती. थोडा हात थरथरत होता पण तो थंडी मुळे असावा. मी घाबरून रात्री २ ला लोकल हॉस्पिटल मध्ये नेले. त्यांनी covid टेस्ट घेतली तर ती पॉझिटिव्ह आली. संपले सगळे अस वाटून घेतले. त्यांनी आमच्याकडे covid ची सोय नाही म्हणून सह्याद्री (कराड) ल हलवायला सांगितले.
सह्याद्री ने मूळ कारण आणि covid साठी कमीत कमी १५ टेस्ट केल्या. सीटी स्कोर ० होता. पण वयाचे कारण देऊन भरती होण्याचा सल्ला दिला. वय पाहता एका माणसाला थांबायची अनुमती पण दिली ( पण स्पेशल रूम घ्यावी लागली) २७ तारखेचे सकाळ चे ११ वाजले होते तेव्हा आम्हाला रूम मिळाली आणि १ सलाईन आणि ७-८ tab potat गेल्या. थोडी काळजी होती पण आता आम्ही रिलॅक्स झालो होतो.
गोळ्या घेऊन १ ते दीड तास बाबा घरी चला म्हणत होते. नंतर ते मलूल पडले. आणि सलग संध्याकाळी ७ पर्यंत झोपूनच राहिले. हॉस्पिटल स्टाफ गोळ्या मुळे होत असे म्हणू लागले. पण मी घाबरून आमच्या family doctor na फोन केला. त्यांनी ती priscription कोणाला तरी दाखवली आणि आम्हाला सांगितले की ह्या गोळ्या खूपच स्ट्राँग आहेत बाबांच्या वयाला त्या झेपणार नाहीत. तरी त्वरित त्यांना घरी आणून त्यांच्या मित्राच्या सल्याने पुढची औषधे घ्यावीत. आमचा डॉक्टर वर पूर्ण विश्वास आहे. तसेच एक मन म्हणत होते की जे होईल ते सुखात घरीच होऊ दे. आम्ही घरी जातो म्हणून हॉस्पिटल ला सांगितले. त्यांनी खूप सांगून पण आम्ही रात्री ९ ला डिस्चार्ज घेतला. आम्ही स्व खुशीने जात आहोत आणि होणाऱ्या परिणाम ची पूर्ण कल्पना घेऊन जात आहोत तसेच काहीही झाले तरी त्याला हॉस्पिटल जबाबदार नाही असे पण लिहून घेतलं
रात्री कुठलीच औषधे घेतली नाहीत तरी बाबांची शक्ती पूर्ण गेलेली. २८ ला सकाळीच आमच्या डॉक्टर ना भेटलो त्यांनी नीट समजावून सांगितले की हॉस्पिटल च्य गोळ्या चुकीच्या नाहीत पण त्या बाबांच्या वयाला योग्य नाहीत. खूप शक्ती जाईल नी त्यात वेगळे काहीही होऊ शकेल. त्यांनी गोळ्या बदलून दिला तसेच दर तासाला ताप आणि ऑक्सिजन पाहायला सांगितलं. आत्ता २९ चे ५ वाजले आहेत. हॉस्पिटल सोडून ४० तास होऊन गेले आहेत. बाबा एकदम ठीक आहेत. परत पहिल्यासारखे वागू लागले आहेत. ताप आणि ऑक्सिजन अगदी नॉर्मल आहे पण covid टेस्ट negative येत नाही तो पर्यंत मूळ मुद्या चे उपचार सुरू करता येत नाहीत.
हा रोग आता सगळी कडे पसरला आहे तसेच ह्याची तीव्रता कमी झाली आहे. घाबरून न जाता योग्य उपचार घेत राहू. आमच्या घरात आम्ही टेस्ट नाही केली पण सगळेच पॉझिटिव्ह असणार आहोत. पैसे खूप गेले सर्व टेस्ट आणि १ दिवसाचा हॉस्पिटल चा खर्च २०००० चा वर गेला. पैसे होते म्हणून ठीक आहे पण नसते तर? बहुदा आम्ही खर्च करू शकतो म्हणूनच एवढ्या टेस्ट करायला सांगितलं का? सीटी fact kela asta tar चाललं नसतं का? २ d ECO ka Keli te pan nahi kalal ani पोटाची सोनोग्राफी का केली ते पण नाही माहित. असो. माझ्या सारख्या नास्तिक कडून काही दान धर्मा झाला म्हणायचं. मी सुद्धा लाखात खर्च असता तर मागे सरकलो असतो. हा खर्च सुधा हळू हळू एक एक टेस्ट संगित्यामुळे कळला च नाही एवढं कसा झाला.
29 Jan 2022 - 5:43 pm | चौथा कोनाडा
तुमच्या धाडसी निर्णयाला दाद द्यायला हवी.
बाबा एकदम ठीक होत आहेत ही दिलासा देणारी गोष्ट आहे.
परमेश्वराच्या कृपेने सगळे बरे व्हाल.
सर्वांची काळजी घ्या. वेळ पडली तर रुग्णालयात भरती व्हायला मागेपुढे पाहू नका.
29 Jan 2022 - 6:07 pm | कासव
नाहीतर आधीच भरती झालो नसतो.
वाईट वाटलं की हॉस्पिटल रुग्णांना अशी ट्रीटमेंट कशी देऊ शकतात. उगाचच टेस्ट करणे ( जर गरजेच्या असतील तर आधी पूर्ण कल्पना द्यावी की आपण ही टेस्ट का करत आहे त्याचा आपल्या आजाराशी कसा संबंध आहे) रोगी चे वय आणि बाकीच्या गोष्टी पाहून औषधे देणे. हे सगळ झालं असतं तर बाहेर पडण्याचं कारणच न्हवत
29 Jan 2022 - 9:46 pm | चौथा कोनाडा
रुग्णालयांच्या बाजारूपणा बद्दल काय बोलणार !
तुमच्यावर भरती व्ह्यायची वेळ न येवो !
29 Jan 2022 - 6:47 pm | पक्षी
बहीण आणि भाऊजी यांना दुसऱ्या लाटेत कोरोना झाला, त्याचा नंतर त्यांनी दोन लस (covaxin) पण घेतल्या. पण तिसऱ्या लाटेत परत कोरोना झाला (म्हणजेच, दोनदा कोरोणा आणि दोन लस). भाऊजीला दोन दिवस १०२ ताप होता. डॉक्टरांनी सांगितलं की टेस्ट करू नका, मग त्यांनी घरीच इलाज केला. बहिणीला फक्त एक दिवस कणकण होती अंगात. ह्या दरम्यान मी, आई, बायको आणि मुलगी बहिणीच्या घरी होतो, भाचीच्या वाढदिवसासाठी. घरी आल्या वर आईला सुद्धा ताप आला, दिवस भर १०२ ताप होता. आईला मधुमेह असल्यामुळे आणि तिचं वय जास्त असल्यामुळे तिला हॉस्पटलमध्ये दाखल करावे लागले. दोन दिवस तिला ताप होता. तिसऱ्या दिवसापासून डॉक्टरांनी रेमेडीसिविर सुरू केली पाच दिवसासाठी. तिची शुगर पण जास्त होती, सलाईनमुळे कदाचित. डॉक्टरांनी इन्सुलिन सुरू केले, शुगर नियंत्रणात आणण्यासाठी. वेळेवर उपचार सुरु केल्यामुळे ती एका आठवड्यात घरी आली. आता अगदी ठीक आहे पण थोडा थकवा जाणवतो.
मला सुद्धा दोन दिवस ताप होता. माझ्यासाठी डॉक्टरांनी azee, multivitamin, cough syrup, आणि व्हिटॅमिन C दिले. पण इन्फेक्शन काही कमी होत नसल्यामुळे त्यांनी फाबिफ्लू सुरू केली पाच दिवसांसाठी (पहिल्या दिवशी 18 गोळ्या, सकाळी 9 आणि संध्याकाळी 9. दुसऱ्या दिवसापासून, 8 गोळ्या, पुढच्या 4 दिवसापर्यंत). खोकल्याच्या औषधामुळे मस्त झोप यायची.
बायकोला वेळेवर औषधं सुरू केल्यामुळे कुठलेच लक्षणं नव्हते.
आमचे सगळ्यांचे दोन डोस झाले आहेत तरीसुद्धा सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात त्रास झालाच.
29 Jan 2022 - 8:56 pm | मुक्त विहारि
आवळा का आणि बिंधास्त रहा ...
विषाणू आणि आवळा, शत्रू आहेत
30 Jan 2022 - 1:20 am | sunil kachure
काही लोकांना गाव भर फिरून covid झालाच नाही किंवा झाला असेल तर लक्षात आला नाही
अशी अनंत लोक आहेत
काही लोक टेस्ट मध्ये positive आली पण काहीच लक्षण नाहीत
तर काही गंभीर
काही तर rtpcr निगेटिव्ह येवून पण लक्षण covid चीच.
प्रचंड विरोध भास.
काहीच घरीच बरी झाली तर काही हॉस्पिटल मध्ये गेल्यावर देवाला प्रिय झाली
असा जगाचा चाले हा खेळ ,नाही कोणाचा कोणाला मेळ.
हे गाणे च आठवत covid चे रुग्ण आणि त्यांचे अनुभव वाचले की