योजना ब / क / ड ....
नैसगिक आपत्ती, अपघात, विसळभोळेपणा, कोणचा तरी मुद्दाम केलेला खोडसाळपणा, चोरी, अवक्तशीरपणा इत्यादी संकटातुन कोणी चुकलेली नाही.
हि संकटे एक - एक आली तर थोडे स्वता:ला संभाळण्यासाठी वेळ आणि संधी मिळते. पण जर ती एकत्र आली तर मग मात्र खरे नाही.
१. साधारणतः जुन २०१४ मध्ये मला मुलाखतीला जायचे होते. ज्या ठिकाणी मी राहयला होतो ते घर बंद होते आणि माझ्याकडे किल्ली नव्हती. त्यामुळे माझ्या मुलाखतीचा बोर्या उडला.
२. २०२१ मध्ये मी विंडोसमध्ये मायक्रोसॉफ्ट्चे खाते जोडले, पण मला परवलीचा शब्द ( पासवर्ड ) त्या खात्याचा आठवत नव्हता. संगणकने स्वतः मला न विचारता संकेताक्षर बदलले. जेव्हा मी संगणक बंद करुन पुन्हा चालु केला तेव्हा त्याने मला संकेताक्षर विचारले, जे मला आठवत नव्हते. मग मला संगणक पुन्हा पुनरोपन (रीइन्स्टाल) करावा लागला.
३. चुकीचे उपयोक्ता आणि संकेताक्षर टाकल्याने बँकेचे खाते काही दिवस बंद झाले. ते पुन्हा चालु होण्यासाठी पाच दिवस वाट पहावी लागली.
तेव्हापासुन नेहमी योजना ब / क / ड .... कशी तयार करता येईल याची विचार चालु आहे.
सध्यातरी संभावित अचानक संकटे आणि त्यावरील उपाय योजना यांची यादी करणे चालु आहे.
गट १: आर्थिक
#. बँकेचे कार्ड तात्पुरते किंवा कायमस्वरुपी बंद होणे.
#. पाकिट चोरीला जाणे.
#. घरात (रोख) पैसे नसणे.
गट २: संपर्कमाध्यमे
#. महत्वाच्या आंतरजालिय खाते तात्पुरते किंवा कायमस्वरुपी बंद होणे.
#. उदा. भ्रमनध्वनी (मोबाईल) हरवणे.
गट ३: राहणीमान
#. घरी वापरायोग्य नसणे. कारणे: चावी हरवणे, आग लागणे, पुर येणे इत्यादी.
#. वीज नसणे.
गट ४: परलोकवास
#. अचानक मृत्यु होणे.
तुम्हीसुद्दा तुमच्या मनात असलेल्या अचानक येउ शकणार्या संकटाबद्दल लिहा. उपायांवर चर्चा होउ शकते.
प्रतिक्रिया
10 Dec 2021 - 6:58 pm | मुक्त विहारि
3. वृद्धाश्रम
2. गर्दीची ठिकाणे टाळणे
1. जितक्या पैशांची आवश्यकता आहे, तितकेच पैसे खिशात ठेवणे, पाकिटात ATM असतेच
शक्यतो लोकलचा प्रवास टाळतोच.
शिवाय, फिरण्याचा परीघ कमी ठेवला आहे.
10 Dec 2021 - 7:37 pm | उपयोजक
धागा आहे.
10 Dec 2021 - 9:26 pm | Trump
लिखाणातील चुका लेख किंवा प्रतिक्रिया प्रकाशित झाल्या नंतर कश्या दुरुस्त कराव्यात?