असं का होतंय?

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
1 Dec 2021 - 7:03 pm

LED

हा फ्लडलाईट सेरिज कनेक्शनवर लावला आहे. बल्ब आणि फ्लड आलटून पालटून लागायचं कारण काय? बल्ब ४० वॅटचा आहे. सप्लाय २३० व्होल्ट. फ्लड १५० वॅटचा आहे.

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

1 Dec 2021 - 10:57 pm | श्रीरंग_जोशी

एक सुचवणी: लेखाचे शीर्षक अधिक नेमके हवे. "असं का होतंय?" हे शीर्षक क्लिकबेटसारखं वाटतं.
प्रश्नाचे उत्तर कुणा मिपाकराकडून लौकरच मिळेल अशी आशा व्यक्त करतो.

१. फ्लडलाईट LED panel आहे का? (वाटतेय)
२. AC सर्किट आहे असे फोटोवरुन दिसते. हे बरोबर आहे का? LED floodlight panelमधे एसी टू डीसी रेक्टिफायर अंतर्भूत आहे का? की थेट जोडले आहेत?
३. आलटून पालटून पेटत आहेत म्हणजे डोळ्यांना तसे दिसते आहे का? अंदाजे किती वेळात आलट पालट होत आहे?

वरील गृहीतके योग्य असल्यास, म्हणजे LED series panel एसी सर्किटात सीरिजमधे त्या बल्बसोबत जोडले असल्यास, एसी सायकलमधील एका अर्धसायकलीत जेव्हा विद्युत्प्रवाह योग्य दिशेत असेल त्या क्षणापुरता पेटेल आणि उर्वरित अर्ध्या सायकलमधे विझेल (कारण पूर्ण सर्किट ब्रेक होईल).

बल्बचे wattage कमी असल्याने (रेझिस्टंस जास्त असल्याने) सीरीज सर्किटमधे तो बल्ब जेव्हा करंट वाहील तेव्हा फ्लडलाईट panel पेक्षा तुलनेत प्रखर पेटेल. आणि LED panel हे बल्बच्या तुलनेत सौम्य पेटेल. LED च्या दिशेच्या विरुद्ध सायकलमधे दोन्ही पेटणार नाहीत (सीरिज सर्किट ब्रेक झाल्याने).

तेव्हा उपरोक्त चित्रातील सीन पाहता बल्ब पेटतो विझतो असे चित्र दिसेल. आणि त्याच वेळी panel हलके पेटलेले विझलेले दिसेल.

बल्ब पेटतो तेव्हा panel पूर्ण विझलेले (100%) आणि panel पेटते तेव्हा बल्ब पूर्ण विझलेला असे दिसणे तर्कात बसत नाही. तस्मात अन्य कोणी हे सांगू शकल्यास वाचण्यात रस आहे.

उपयोजक's picture

2 Dec 2021 - 7:55 am | उपयोजक

LED panel आहे.
हो पॅनलला ५० वॅटचे तीन ड्रायव्हर्स आत बसवलेले आहेत.
सलगपणे आलटापलट सुरु राहते.

व्हिडिओ टाकता येईल का?
आलटा पालट म्हणजे खालीलपैकी नेमके काय?

अ. दोन्ही दिवे (बल्ब आणि panel) एकदा पेटतात एकदा विझतात.
ब. फक्त बल्ब पेटतो त्या वेळी panel पूर्ण बंद (हलका डीम लाईटही नाही).. मग क्षणभराने बल्ब पूर्ण विझून त्याच वेळी आधी बंद असलेले panel पेटते ?

पेटण्या विझण्याची फ्रीक्वेंसी अंदाजे काय आहे?

उपयोजक's picture

2 Dec 2021 - 10:49 am | उपयोजक

मिपावर व्हिडिओ टाकता येत नाही

मला व्यक्तिगत बघायला नको आहे. इथे सर्वांनाच अधिक स्पष्टता यावी (शक्य असल्यास) म्हणून म्हटले. हे एक सर्वांसाठी कोडे / सायन्स पार्श्वभूमीच्या लोकांना मेंदूला खुराक म्हणून वैज्ञानिक प्रश्न विचारला आहे असे समजून.

व्हिडिओ पोस्ट होत नसेल तर आवश्यकता नाही. खालील वर्णन पुरेसे आहे.

उपयोजक's picture

2 Dec 2021 - 10:51 am | उपयोजक

बल्ब आणि फ्लड प्रकाशित होण्यादरम्यान अर्ध्या सेकंदाचे कालांतर आहे. 'फकाफक' हा शब्द योग्य ठरावा ;)

आग्या१९९०'s picture

2 Dec 2021 - 12:58 pm | आग्या१९९०

फ्लड मधील एखाद्या डायोडमुळे होत असावे.

कर्नलतपस्वी's picture

2 Dec 2021 - 9:25 am | कर्नलतपस्वी

कदाचित " Poverty ", शेअर करत असतील.
कृपया हलके घ्या

आनंद's picture

4 Dec 2021 - 5:30 pm | आनंद

LED ड्रायव्हर मध्ये लो वोल्टेज कट ऑफ असावा . सुरवातिला LED ड्रायव्हर ऑन व्हायला काही मिलि सेकंद वेळ लागेल , तेव्हढ्या वेळात बल्ब ऑन होइल
पण लो वोल्टेज कट ऑफ मुळे LED ड्रायव्हर ऑफ होइल आणि बल्ब ही बंद होइल आणि आता LED ड्रायव्हर मधला केप्यासिटर चार्ज झल्या मुळे LED ऑन होवुन
लगेच बंद होइल व हि क्रिया वारंवार होत रहिल असे वाटते. ( सिरिज मध्ये बल्ब असल्यामुळे LED ड्रायव्हर ला वोल्टेज कमी मिळेल)

गवि's picture

4 Dec 2021 - 5:58 pm | गवि

सहमत.

पण ते अर्धा अर्धा सेकंद अंतर आहे असे म्हणत आहेत.

शक्य आहे LED ड्रायव्हर चा केप्यसिटर चार्जिंग टाइम वर अवलंबुन आहे . तुम्ही कधी LED ड्रायव्हर काळ्जी पुर्वक बघितला असेल तर एक लक्षात आल असेल कि LED ऑन व्हयाला थोडा वेळ लागतो. व सप्लाय बंद केल्यावर काही वेळाने LED बंद होतो.

उपयोजक's picture

6 Dec 2021 - 12:08 pm | उपयोजक

नेमके हेच होत असावे. छान विश्लेषण

रेक्टिफायर नंतर लगेचच एक केपसिटर ( C1 म्हणूया )असतो तो चार्ज झाल्यावरच ते सर्किट चालू होऊन एलइडी स्ट्रिप अरेंजमेटमध्ये इनपुट वोल्टेज पोहोचते. पण . . . सिअरिजमधला बल्ब फक्त 0.160 ampere प्रवाह जाऊ देतो. वर गविंनी सांगितल्याप्रमाणे एलईडी पेटायला आणि वीज खर्च करायला वेळ घेतो तेवढ्या वेळापुरता बल्ब जळत नाही. पुढचे काम SMPS प्रमाणे होते. आउटपुटची वीज वापरली गेली की ओप्टोकपलरच्या फीडब्याकमुळे आणखी वीज मागितली जाते व पुन्हा C1 charging सुरू होते. बल्ब चांगला पेटतो.

कंजूस's picture

6 Dec 2021 - 1:12 pm | कंजूस

हे युनिट बऱ्याच उपकरणांचे प्राण असते. त्यातही बरेच फ्लेवर, क्वालटी, सुरक्षा उपाय असतात. Constant current/voltage देणारी युनिट्सही असतात.

उपयोजक's picture

6 Dec 2021 - 1:22 pm | उपयोजक

धन्स. चांगली माहिती दिलीत

आमी सर्किट डाय ग्राम बघतल्या शिवाय कामाला हात लावत. नाय! जल्ला डीसक्रिपसन वाचून कायच नाय कल्ला!
कोण कुणाच्या सेरीस मधे आहे..अन काय करायचं आहे शेवटी?

विषय आले आहेत.