म्हाडा पुणे अर्ज

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in काथ्याकूट
21 Nov 2021 - 3:24 am
गाभा: 

म्हाडा चे पुणे व बाकी काही जागां ची सोडत निघाली आहे ,काही जागांची लॉटरी आहे ,काहींची प्रथम येण्यारयास प्राधान्य आहे
माहिती पर धाग्यात मुद्दाम टाकत नाही कारण महत्व कमी होईल व विषयांतर होईल

https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/

बुकलेट https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ApplicantRegistratio...?
method=viewAnnouncementLink&viewFile=18
मुख्य मुद्दे
१) जागांची किंमत
२) स्थान माहात्म्य
३) उत्पन्न गट कसा मोजतात ? समजा आत्ता मला नोकरी नाही व लॉटरी वेळी मिळाली तर ?

प्रतिक्रिया

एकुलता एक डॉन's picture

28 Nov 2021 - 7:39 am | एकुलता एक डॉन

यासाठी आता पर्यंत १२६३३ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य अंतर्गत संकेत क्रमांक ५३२ परांजपे अभिरुची परिसर, धायरी ( १RK ) येथील ७५ सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्या सदनिकांसाठी ७२८ इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४०५ अर्जदारांनी अनामत भरली आहे. या ७५ सदनिका वितरित करून झाल्या आहेत. यावरून असे दिसून येत आहे की सोडतीसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. तरी नागरिकांनी त्वरीत आपले रजिस्टेशन करून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन माने-पाटील यांनी केले आहे.

एकुलता एक डॉन's picture

9 Mar 2023 - 3:20 pm | एकुलता एक डॉन

म्हाडा मधील रिकामी घरे
मि २०२१ नोवे ला म्हाडा वर धागा टाकला होता https://www.misalpav.com/node/49589 ,लोकसत्ता मधे नुकतेच बातमी आली आहे बरीच घरे रिकामि आहेत
लोक मधील लेख् मधिल मुख्य मुद्दा
https://www.loksatta.com/mumbai/mhada-pune-division-6058-houses-of-first...

चाकण-म्हाळुंगे येथील अल्प गटासाठी २८६ घरे असताना त्यासाठी केवळ ६९ अर्ज सादर झाले आहेत. तेथील अन्य टप्प्यातील अल्प गटातील ४९४ घरांसाठी केवळ १२५, मध्यम गटातील ४८३ घरांसाठी केवळ ५२ अर्ज सादर झाले आहेत. ताथवडे येथील मध्यम गटातील ६५४ घरांसाठी १७८, पिंपरे-वाघिरे येथील मध्यम गटातील २३० घरांसाठी १५५, उच्च गटातील १४४ घरांसाठी १०९, सांगलीतील अत्यल्प गटातील ५२ घरांसाठी ३६, सोलापूरमधील मध्यम गटातील ५६ घरांसाठी ३ अर्ज सादर झाले आहेत. यासह अन्यही काही घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता दीड हजारांहून अधिक घरांच्या विक्रीचा प्रश्न मंडळासमोर उभा ठाकला आहे.

हि घरे मिपा वरील कोणी बघीतली आहेत ?
घेउ शकतो?

कंजूस's picture

9 Mar 2023 - 7:50 pm | कंजूस

तो अगोदरच्या इमारतींचा पाहून लोक दूर राहिले असतील. शिवाय ताबा घेऊन संघ स्थापन केल्यावर दुरुस्ती इत्यादी कटकटी फार असतील. त्यामुळे प्रतिसाद नसावा.