गुढे पाचगणी पठार - सांगली जिल्यातील मिनी महाबळेश्वर

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
28 Oct 2021 - 10:36 am

गुढे पाचगणी पठार - सांगली जिल्यातील मिनी महाबळेश्वर

ठिकाण - गुढे पाचगणी पठार

जायचा रस्ता -

पुणे - कराड - मलकापूर - तळमावले - गुढे - १८५ किमी

सांगली - इस्लामपूर - पेठ नका - मलकापूर - तळमावले - गुढे - ९२ किमी

नवीन bike घेतल्यानंतर पहिल्या सफारी साठी कुठे जायचा प्लॅन सुरु होता . सुरुवात करायची तर आपल्या गावाकडूनच म्हणून Bike Riding साठी काही ठिकाणी शोधण्यास सुरवात केली. मग समोर आलं ते सांगली जिल्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेलं हे एक पर्यटन स्थळ - गुढे पाचगणी पठार.

सांगली जिल्यात सहयाद्रीची डोंगर रांग हि शिराळा तालुक्यातच आहे, त्यामुळे या भागात पर्यटनासाठी भरपूर ठिकाणे आहेत . जसे कि चांदोली अभयारण्य (चांदोली व्याघ्र प्रकल्प ), चांदोली धरण, बत्तीस शिराळा , सह्याद्रीच्या डोंगर रांगात असलेले पठार आणि त्यावर पसरलेल्या पवनचक्क्या या परिसराच्या सौन्दर्यात अजून भर टाकतात. अशीच unexplored ठिकाणे explore करण्यासाठी पोहचलो गुढे पाचगणीला. आमच्या गावाकडून किंवा सांगलीकडून जर असाल तर वाळवा इस्लामपूर कडून पेठ नाका - वाठार - NH ४ - मलकापूर गावाहून ढेबेवाडी रस्त्याने जावे लागेल आणि जर मुंबई पुणे कडून जात असाल तर पुणे - कराड - मलकापूर हा रास्ता आहे

मलकापूर हुन गुढे पठार पर्यंत उत्तम रस्ता आहे. एखाद्या ठिकाणाला जात असताना हे सगळ्यात महत्वाचं असत . जाताना आजू बाजूचा निसर्ग अनुभवत पोहचलो तळमावले गावाजवळ इथूनच मेन रोड वरून उजव्या बाजूने जावं लागत . पठाराकडे हॉटेल किंवा खाण्याची काय सोय नसल्याने याच गावातून खाऊन जाऊ शकता किंवा घेऊन जाऊ शकता .

सह्याद्रीच्या डोंगर रांगातून घाट माथ्यातून जाणारा नॊगमोडी वळणाचा रास्ता आजू बाजूला भात शेती चा अनुभव आपण पोहचतो पठारावर . तिथून दिसणारा परिसर , वरती असलेल्या पवनचक्क्या खूपच सुंदर दिसतात . पाहण्याची ठिकाणे असा ठराविक काही नसलं तरी इथलं वातावरण मस्त आहे . इथले रस्ते bike riding साठी भारी आहेत . सांगली , पुणे कोल्हापूर जिल्यातील भरपूर bikers इकडे आवर्जून येत असतात . इथे येण्यासाठी बेस्ट वेळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळ्याचे सुरुवातीचे २ महिने .

जागेच्या अधिक माहिती साठी आपला स्पॉटवर चा विडिओ नक्की पहा , आणि तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या . लेख तास जास्त मोठा नाही तुम्हाला कसा वाटलं हेही सांगा.

धन्यवाद

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

28 Oct 2021 - 9:11 pm | चौथा कोनाडा

सुंदर ठिकाण दिसतेय !
या बद्दल प्रथमच वाचण्यात आले !
भटकंती वर्णन आणि व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान !

तर्कवादी's picture

29 Oct 2021 - 4:50 pm | तर्कवादी

व्हिडिओ छान आहे.
हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हायला हवं म्हणजे थोडेफार हॉटेल्स वगैरे.. नाहीतर फक्त पठारावर चक्कर मारुन परत येणं होईल.

चौथा कोनाडा's picture

29 Oct 2021 - 5:09 pm | चौथा कोनाडा

आजकाल "विकसित व्हायला हवं" असं ऐकू आलं की भीती वाटायला सुरुवात होते !

तर्कवादी's picture

30 Oct 2021 - 6:00 pm | तर्कवादी

हो.. पण मिनी महाबळेश्वर म्हणायचं तर महाबळेश्वरच्या तुलनेत थोडी तरी चंगळ हवी ना.. राहता यायला हवं..
बाकी महाबळेश्वर किती विकसित झालंय पण त्यामुळे तिथल्या निसर्गाचा आनंद कमी झालेला नाही. बेसुमार गर्दीचे दिवस वगळता महाबळेश्वर अजूनही अतिशय रम्य आहे.

आपण दिलेले मार्ग चुकीचे आहेत. गुढे गाव हे कराड ढेबेवाडी रोड वर आहे पण ते सातारा जिल्ह्यातील आहे. गुढे पांचगणी हे गाव सांगली जिल्ह्यात आहे. तर मलकापूर हे एक गाव कराड जवळ आहे तर दुसरे कोल्हापूर जिल्ह्यात आहे, विशाळगड जवळ. कृपया योग्य माहिती घेऊन लेखात सुधारणा करावी.

त्यांनी दिलेल्या मार्गे हि जाता येते फक्त पुढे तळमावले-गुढे -कुठरे-भरेवाडी फाटा -भुर्भूशी-गुढे पाचगणी

Ranapratap's picture

31 Oct 2021 - 8:09 pm | Ranapratap

पुणे, सातारा, कराड, पाचवड फाटा, काले, ओंड, उंडाळे या रस्त्याने गेलात तर योग्य ठिकाणी पोहचाल.