दिवाळी अंक २०२१ : माथेरानची सहल

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

१९८०ची गोष्ट. आमचं कॉलेजचं शेवटचं वर्ष सरत आलं होतं. जानेवारी संपत आला तरीही हवेत बर्‍यापैकी गारवा होता. सुखाचे दिवस होते. आमच्या टोळक्यातील एका सुपीक टाळक्यात अचानक कल्पना आली - माथेरानला जाऊ!

इथे इतकं आल्हाददायक वातावरण तर माथेरानला जबरदस्त थंडी असेल. अशा कडाक्यच्या थंडीत माथेरानला जायलाच पाहिजे. सगळ्या सुट्ट्या संपून कामाचे, परिक्षांचे दिवस असल्याने तिकडे माथेरानला हॉटेलं ओस पडलेली असतील. विचार सगळ्यांना पटण्यासारखाच होता. डोकी कामाला लागली. दुसरा विचार नाही. मग चंद्याने सगळ्यांना एकदम जमिनीवर आणलं. "फुकट खुशीची गाजरं खाताय, एक लक्षात आलं का? परीक्षा समोर दिसत असताना कोणाकोणाला घरचे प्रेमाने परवानगी देणार आहेत?" गोष्ट खरी होती. पण इच्छा तिथे मार्ग! मला नामी शक्कल सुचली आणि मंडळींनी ती एकमताने संमत केली - 'शैक्षणिक सहल.'

ज्यांनी फिजिक्स घेतलं आहे त्यांची सहल - सॉरी. शैक्षणिक सहल लोणार सरोवरला. ज्यांनी बॉटनी घेतलं आहे त्यांची फणसाडला आणि ज्यांनी झूऑलॉजी घेतलय त्यांची अलिबागला. दोन दिवस दोन रात्री. अंदाजे खर्च रुपये १५० मात्र. दचकू नका, चाळीस वर्षांपूर्वी असेच आकडे ऐकायला मिळायचे. नेव्ही कट चार आणे, हेवर्ड्स साडेपाच आणि बॉम्बे बिअर साडेचार, मेन्स क्लबची चपटी पाच रुपये! ऑफ सिझनला १०० रुपयात चार पाच जणांना रूम मिळायची. असो. नियोजन सुरू झालं. एव्हाना आम्ही मनाने माथेरानला पोहोचलो होतो. दुसर्‍या दिवशी जतीन शुभवार्ता घेऊन आला, त्याच्या चुलत भावाच्या एका मित्राचं माथेरानला छोटं पण चांगलं हॉटेल होतं. मग अ‍ॅलेक्स कॉटेज नक्की झालं. आता फक्त घरी शैक्षणिक सहल घरच्यांच्या गळी उतरवायची होती. हे काम शक्यतो आज उद्याच करायचं ठरलं. जे ढिले होते त्यांना योग्य शब्दात समज दिली गेली.

अन्या आला तो चेहरा पाडूनच. आल्या आल्याच त्याने शरणगती पत्करली. "मला नाही जमणार रे, बाप नाही म्हणाला." अन्याचा बाप म्हणजे साक्षात औरंगजेब! उगाच पिळण्यात अर्थ नाही, हा आपल्या टोपण नावाला जागून घेट कॉलेजात चौकशीला यायचा आणि मग प्राचार्यांच्या हस्ते सगळ्यांची धुलाई. सगळ्यांचा विरस झाला. "अन्या लेका, बापाला पटव ना. आज आपण एकत्र आहोत, मजा मस्ती करतो खरे पण लवकरच कॉलेज संपणार मग अशा भेटी गाठी, सहली थोड्याच होणार आहेत?" पम्यानं सांगून पाहिलं. हिरमोड झाला पण नाइलाज होता. आम्हीतरी पुन्हा असे मस्ती करायला अधी भेटणार होतो? शो मस्ट गो ऑन. एकूण सात जण ठरल्याप्रमाणे निघाणार.

माथेरान म्हणजे ठरलेला कार्यक्रम. मुंबईहून सुटणारी १२.४०ची शेवटची लोकल. एक जण घाटकोपरहून, आम्ही १.४०ला ठाण्याला चढणार, अन्या डोंबिवलीला २.००ला, बेडक्या सगळ्यात शेवटी बदलापूरला आणि साधारण ३.१५-३.३०च्या आसपास नेरळला उतरायचं. दोन तास आराम करायचा, थोडा हलकटपणा करायचा - म्हणजे पब्लिक फोनवरून मनात येईल तो किंवा कुणा खत्रुडचा नंबर फिरवायचा आणि भंकस करायची. दुसर्‍याची झोपमोड केल्याचा असुरी आनंद. सहल म्हणताना हे चालायचंच. बरं, फोन करायला पैसे पडत नव्हते, बदकाला पब्लिक फोनच्या मोठ्या डब्याला असलेल्या बारीक छिद्रातून बॉलपेन रिफील आत घालून नाणं नं टाकता फोन जोडायची ट्रिक अवगत होती. आणि फसलं तरी समोरचा उचलायचा तर खरा. बघता बघता साडेपाच वाजायचे. चाकरमाने स्टेशनात यायला लागायचे आणि आम्ही रेल्वे स्टॉलचा चार आणेवाला चहा घेउन निघायचो. हळूहळू उजाडायला लागायचं. आजूबाजूला बघून गपचूप थैलीतला बुढा बाबा निघायचा. बाटलीतून बुचात आणि बुचातून घशात. बाबाच्या जळजळीत आशीर्वादाने बघता बघता थंडी गायब व्हायची, चढण चढायला हुरूप यायचा. एक नियम मात्र कसोशीने पाळला जायचा आणि तो म्हणजे बाटली रस्त्यात फोडायची नाही. आपापल्या थैल्यात ठेवायची आणि मुक्कामी पोहोचल्यावर विल्हेवाट लावायची.

तर अगदी असेच आम्ही याही वेळी माथेरानला पोहोचलो. बाजारपेठेपासून बरच दूर जरा एका बाजूला असलेलं अ‍ॅलेक्स कॉटेज सापडलं. हॉटेल सामान्य पण प्रशस्त होतं. एकूण आम्हाला हॉटेल आवडलं. तंगडतोड करुन दमलेल्या आम्ही जेवणावर ताव मारला. अ‍ॅलेक्स आमच्यापेक्षा पाच-सात वर्षांनी मोठा असेल. पण एकदम मनमोकळा आणि गप्पिष्ट. थोड्याच वेळात आम्ही आडवारलो, रात्रभराचं जागरण होतं आणि पोटात रसायन. आरामात चारला उठलो, चहा झाला. अ‍ॅलेक्स म्हणाला की "काय बाजारात फेरफटका मारायचा तर टाईमपास करून या. आपल्याला घाई नाही. इकडे लवकर सामसूम होते. आपण साडेआठ-नऊला निघू, म्हणजे निवांत शारलोटवर बसून पीता येईल. सहसा मी टुरिस्टबरोबर जत नाही, पण मला तुमची कंपनी आवडली, मी बरोबर येईन." आम्ही धन्य झालो, आम्ही आमचे काही अपरात्री शारलोटवर पीत बसू शकलो नसतो, बरोबर स्थानिक आहे म्हणताना चिंता नव्हती.

ठरल्याप्रमाणे आम्ही साडेआठला तयार झालो. त्या वेळी अ‍ॅलेक्स कॉटेजवर आम्हीच होतो, अन्य कुणी दिसलं नाही. तसाही ऑफ सिझन होता. अ‍ॅलेक्सनं त्याच्या मॅनेजरला हॉटेलवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि आम्ही निघालो. शारलोट लेकच्या काठी एका स्पॉटला आम्ही बसलो. सर्वत्र निरव शांतता. वर अगदी पौर्णिमेचा नसला तरी चंद्र होता. आम्ही मुख्य विषयाला हात घातला. आम्ही आपापले थैले काढताच अ‍ॅलेक्स म्हणाला, "थांबा, तुमच्यासाठी एक खास चीज आणली आहे." आम्ही जरा सावरून बसलो. अ‍ॅलेक्सनं त्याच्या थैल्यातून एक पारदर्शक खंबा काढला. म्हणाला "बच्चा कंपनी, याला मोहाची म्हणतात. इकडे बाजारात अनेक दुकानदार किंवा रस्त्यातले विक्रेते मोहाची म्हणून डुप्लिकेट माल विकतात. ही अस्सल आहे, बनवणारा माझ्या माहितीतला आहे, इथलाच आहे." आम्ही सावधपणे म्हणालो, "बाबा रे, थोडी ओत, आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतोय."

सगळ्यांचे पेले भरले गेले. पब्लिकने चाखणा काढला, सिगरेट्चं पाकिट काढलं. आधी जपून जपून म्हणणारे आम्ही सगळे पहिला संपवून दुसरा आणि दुसरा संपवून तिसरा.......समजलंच नाही. पाणी चवदार होतं, अगदी स्मूथ. जळजळ नाही, काही नाही. आम्ही अ‍ॅलेक्सचे आभार मानताच तो म्हणाला, "मी आधीच बोललो होतो, हा घरचा एकदम पिव्वर माल आहे. बाहेर सगळे मोहाच्या नावाखाली देशी खपवतात. असली मोहाला उग्र वास कधीच नसतो." 'आपण ओल्ड मंकशिवाय काही घेत नाही 'असं म्हणणारा पक्यादेखील मोहाच्या मोहात पडला होता. एकदम असं हलकं वाटत होतं. मंद चंद्रप्रकाश, सगळं शांत शांत, जलाशयावरुन येणारी शिरशिरी उठवणारी गार झुळुक. सर्वांची खात्री पटली की स्वर्ग म्हणतात तो हाच.

आणि इतक्यात एक बॅटरीचा झोत आला. समोरच्याने सिनेमात बघतो तसा टॉर्च आडवा हालवला. आमच्याकडे झोत असल्याने आम्ही त्याला बघू शकत नव्हतो. शप्पथ सांगतो, जाम फाटली. डोळ्यापुढे पोलीस आम्हाला घेउन आमच्या घरी निघाले आहेत अशी दृश्य डोळ्यापुढे उभी राहिली. पळायचं म्हणावं तर उठून उभं राहता येईल का याची शाश्वती नव्हती. अ‍ॅलेक्सने आमची अवस्था ओळखली, तो हसत म्हणाला "डरनेका नय रे, हा माझा मॅनेजर आहे. "हा साला इथे कशाला आला अणि बरोबर कोण आहे? आम्ही आ वासून बघत राहिलो. चक्क अन्या! आणि या इथे, या वेळी? पीटर, म्हणजे तो मॅनेजर अ‍ॅलेक्सला म्हणाला, "हा पोरगा या लोकांचा दोस्त आहे म्हणाला. खूप शोधाशोध करुन उशिरा आपल्या हॉटेलवर आला. त्याने दिलेली डिटेल पटली, मला माहीत होतं तुम्ही कुठे बसणार, आलो याला घेऊन." आम्ही कसेबसे उठत अन्याकडे निघालो, 'साल्या तू?'. अन्या आम्हाला चार शिव्या घालत बोलला, "वा रे दोस्त! मित्र म्हणवतात आणि मला सोडून इथे पीत बसलेत." कडकडून गळाभेटी झाल्या. अन्या म्हणाला, "काय नी कसं पण आलो ना? तुम्ही लोक सांगत होता की आपली शेवटची पिकनिक, ते जाम डोक्यातून जत नव्हतं. अखेर जुगाड लावला आणि पोहोचलो. नुसतं अ‍ॅलेक्स नावावरून शोधलं की नाही?" सगळ्यांनी अंगठे वर करून कबुली दिली, 'मानला तुला'. पेले भरत होते, बडबड चालू होती. किती वाजता निघालो, कसे पोहोचलो माहित नाही, पण सकाळी जाग आली तेव्हा आम्ही आमच्या हॉटेल रूममध्ये होतो. दहा वाजून गेले होतो. सगळे आळसावलेले. एकेक करत उठवत चहासाठी बोलावत एकदाचे चहाला टेबलवर जमलो. अचानक लक्षात आलं, अन्या दिसत नाही. हा सकाळी सकाळी कुठे गेल असेल? अशी चर्चा सुरू झाली.

"कोणाला शोधता?" पीटरने पुढे येत विचारलं. "सगळे तर इथे आहेत!" "अरे पीटर, अन्याविषयी बोलतोय. तो काल रात्री लेट आला होता, तूच त्याला घेऊन आला होतास ना?"
"मी?" पीटर क्षणभर थबकून मोठ्याने हसू लागला. एव्हाना अ‍ॅलेक्सही आला होता. सगळा प्रकार ऐकल्यावर त्याने समजूत घातली की सवय नसलेल्या नवख्याने मोहाची घेतली तर रॉकेट उडायला वेळ लागत नाही. तुम्ही लोक काल बोललात ना पहिल्यांदाच घेतोय म्हणून? आम्ही चक्रावलो. सगळ्यांना कसा भास होईल? अ‍ॅलेक्स म्हणाला, "काल रात्री दोन राउंडनंतर तुम्ही अन्या अन्या असं बडबडत होतात, मी ऐकलं. पण मला वाटलं असेल तुमचा एखादा मित्र. डोण्ट वरी, तुम्ही पहिले नाही. आधीही अनेकांना रात्री कुणाकुणाला पाहिल्याचं, भेटल्याचं आठवत होतं, एका हिरोला तर भर मध्यरात्री लेकच्या दुसर्‍या साईडला त्याची गर्लफ्रेंड दिसली होती" असं म्हणत पीटर आणि अ‍ॅलेक्सनी एकमेकाला टाळी दिली आणि खोखो हसले. आम्हाला पटत नव्हतं, पण अपराधी मन सांगायला लागलं की तू या हॉटेलवर कसा आणि कधी पोहोचलास, ते तुला सांगता येतय?

नाही म्हटलं तरी डोकी जड होती. अखेर आम्ही तो विषय सोडून दिला. अंघोळी, जेवण आटपून परतीच्या वाटेला लागायचं होतं. रात्र व्हायच्या आत घरी पोहोचून शैक्षणिक सहलीचा वृत्तान्त द्यायचा होता. जाताना चालत जायची तयारी नसल्यामुळे मिनी ट्रेननें नेरळ आणि पुढे मिळेल त्या गाडीने घरी. दुपारी जेवल्यावर अ‍ॅलेक्सचे पैसे देताना हॉटेलबरोबर मोहाचेही द्यायचे होते. सगळा हिशोब दाखवत अ‍ॅलेक्स म्हणाला, "तसे तीन खंबे संपले, पण तुमच्यासारखे मित्र भेटले, मजा आली, शिवाय मीही तुमच्या बरोबर घेतली, तेव्हा फक्त दोनचे पैसे द्या." बापरे! म्हणजे आम्ही इतकी ढोसली होती? आपण अन्याला भेटलो हा भास असावा. नाहीतर तो इथेच पडलेला असायचा. कदाचित आमच्या आठ जणांच्या ग्रुपमधला तो एकटाच नव्हता आणि आम्हाला खरोखरच त्याची आठवण येत होती. आता परत गेल्यावर उद्या कॉलेजवर भेटेलंच, तेव्हा त्याचा उद्धार करू, असं सर्वांचं म्हणणं पडलं. आम्ही संध्याकाळी आपापल्या घरी पोहोचलो.

"अरे, काल चिटणीस नावाचा एक मुलगा तुला शोधत आला होता, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणाला. तुझ्याकडुन हे नाव तर ऐकलं नव्हतं." सकाळी सकाळी मातोश्रींची पृच्छा. माझी हवा टाईट! मी सांगितलं की "चिटणीस आमच्याच बरोबरचा, पण ग्रूपमधला नाही. तो काय विचारत होता?" मी सावधपणे आईला विचारलं, आयला आमच्या शैक्षणिक सहलीचं बेंड फुटलं तर नाही ना? नेहेमीप्रमाणे कॉलेजला पोहोचलो. आत प्रवेश करताच समोर चिटणीस दिसला. मी जोरात हाक मारून त्याला बोलावलं. माझी हाक ऐकताच तो धावत आला आणि म्हणाला, "अरे, कुठे होतास गेले दोन दिवस? आणि ग्रुपमधले सगळे एकदम गायब?" "बाबा रे, कोड्यात बोलू नको. काय लोचा झाला ते सांग. प्रिंसिपलनी तुला घरी पाठवला होता का? काय झोल आहे?" तो विचित्र नजरेनं बघत म्हणाला, "म्हणजे तुला काहीच माहित नाही?" "काय माहीत नाही? कशाविषयी बोलतोस राजा?" मी वैतागून म्हणालो. डोक्यात पक्क झालं, आमची शैक्षणिक सहल अंगाशी येणार. तो हलक्या आवाजात म्हणाला, "अरे, परवा रात्री अन्या गेला. बिचारा काहीतरी आणायला आठ-साडेआठला सायकल घेऊन बाहेर पडला आणि त्याला बसने उडवला."

डोकं बधीर झालं. अंगातली शक्ती संपली. चिटणीस काय बोलतोय याकडे लक्ष नव्हतं. एकेक करत आम्ही सगळे एकत्र जमलो, स्गळ्यांची अवस्था भयंकर होती. इतर मुलांना वाटलं की ग्रूपमधला एक जण असा अचानक गेल्यावर धक्का बसण स्वाभाविक आहे. आम्ही एक्मेकांशी बोलू शकलो नाही, फक्त एकमेकांच्या तोंडाकडे पाहात राहिलो. तिथे थांबणं अशक्य होतं. सगळे आपापल्या घरी पांगले. घरी पोहोचताच मी बेडवर कोसळलो. अंग फणफणलं होतं. आई धास्तावली. मी काही सांगायच्या स्थितित नव्हतो. डॉक्टरांना बोलावलं. ते म्हणाले, "धक्का बसला असेल. मी औषध देतो. त्याला आराम करू द्या." आम्हा सातही जणांची साधारण हीच परिस्थिती होती. नंतर काही दिवसांनी सावरलो, पण डोक्याचा भुगा झाला तरी समजत नव्हतं की खरं काय.

या घटनेला चाळीस वर्षं होऊन गेली. आमच्यापैकी कुणीही चाळीस वर्षांत माथेरानला गेला नाही.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Nov 2021 - 3:46 pm | कंजूस

इतके दिवस कथा गुप्त ठेवली सगळ्यांनी? भारी आहे.

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2021 - 5:17 pm | चौथा कोनाडा

अस्सल मोहाची स्टोरी अस्सल जबराट, पण अन्याचा एंड वाचला आणि थरारून गेलो !

एक नंबर ओघवते लिहिलेय !

सर्वसाक्षी सर +१

सर्वसाक्षी's picture

3 Nov 2021 - 9:26 am | सर्वसाक्षी

पण सर म्हणू नका
लोक पूर्ण नावाने देखील हाक मारत नाहीत

चौथा कोनाडा's picture

17 Nov 2021 - 8:09 pm | चौथा कोनाडा

तुमच्या लेखनाची सर कुणाला येणार नाही म्हणून, म्हणून तुम्ही सर !
😀

कुमार१'s picture

2 Nov 2021 - 5:59 pm | कुमार१

छान लिहीले आहे.

सोत्रि's picture

2 Nov 2021 - 8:14 pm | सोत्रि

शेवट एकदम भन्नाट!

एक नंबर लेख.

-(माथेरान ट्रीपची वाईट आठवण असलेला) सोकाजी

Nitin Palkar's picture

2 Nov 2021 - 8:29 pm | Nitin Palkar

अतिशय ओघवती कथा. धक्कादायक शेवट. छान.

पाषाणभेद's picture

3 Nov 2021 - 3:38 am | पाषाणभेद

माथे रान उजाड झालं कथा वाचून!
भन्नाट लिहीलं आहे.

१९८० सालात एवढी स्वस्ताई होती?!

सर्वसाक्षी's picture

3 Nov 2021 - 9:33 am | सर्वसाक्षी

(१९८० सालात एवढी स्वस्ताई होती?)
मालक, होती हो स्वस्ताई. रात्री स्टेशनवर ₹१.२५ ला अमूल मस्क्याची पावभाजी मिळायची
सर्वात स्वस्त बिअर बॉम्बे बिअर ₹४.५०; तरीही आमच्या पैकी दोन जण वागळे इस्टेट मधील कारखान्यात गेटवर विचारून आले होते की स्टुडंट्स कन्सेशन मिळेल का

बापरे. कसली खतरनाक कथा आहे.. थरारक.

राघवेंद्र's picture

3 Nov 2021 - 7:28 am | राघवेंद्र

खतरनाक एकदम. शेवट भारीच.

एक नंबर जबरी वेगळ्याच कलाटणीने शेवट !! मस्त !!

सर्वसाक्षी's picture

3 Nov 2021 - 9:27 am | सर्वसाक्षी

सर्व मिपाकरांचे मन: पूर्वक आभार

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2021 - 9:40 am | श्रीरंग_जोशी

तुमच्या माथेरानच्या सहलीचे वर्णन अप्रतिम आहे. शेवट मात्र चटका लावणारा आहे. तुमच्या जागी मी देखील असतो तर पुन्हा कधीच माथेरानला जावेसे वाटले नसते. या लेखाच्या निमित्ताने १४ वर्षांपूर्वी हापिसच्या सहकार्‍यांबरोबर जून महिन्यात केलेल्या माथेरानच्या सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.

त्यावेळी नेरळहून माथेरानला जाताना टॅक्सीतून काढलेला फोटो.

जेम्स वांड's picture

3 Nov 2021 - 10:00 am | जेम्स वांड

ते कॉलेजचं वय, त्या वयात केलेली अन नंतर आपण हे कसं करून बसलो त्या काळी वाटावं असली धाडसं , मित्राचा शेवटचा गुगली शॉक, माझ्यासाठी ही एक परफेक्ट कथा होती सर्वसाक्षी सर.

सर्वसाक्षी's picture

3 Nov 2021 - 12:02 pm | सर्वसाक्षी

पण सर म्हणू नका. मी एक सुमार मनुष्य

सौंदाळा's picture

3 Nov 2021 - 10:08 am | सौंदाळा

सुरुवातीला सहलीचा काहीतरी धमाल किस्सा असेल असं वाटत होतं, नंतर दारु पिऊन काहीतरी मज्जा होणार असं वाटत होतं पण शेवट अगदीच अनपेक्षित झाला.
कथा चटका लावुन गेली.

ओघवती लेखनशैली! छान.

MipaPremiYogesh's picture

4 Nov 2021 - 10:34 pm | MipaPremiYogesh
स्मिताके's picture

5 Nov 2021 - 9:41 pm | स्मिताके

थरारक आणि अनपेक्षित शेवट चटका लावून गेला.

श्वेता व्यास's picture

11 Nov 2021 - 10:58 am | श्वेता व्यास

मस्त थरारक कथा. "पौर्णिमेचा नसला तरी चंद्र होता" वाचून काहीतरी गडबड असणार असं वाटलं खरं!

मुक्त विहारि's picture

11 Nov 2021 - 11:15 am | मुक्त विहारि

एक बियर पार्टी करू या

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Nov 2021 - 11:16 am | ज्ञानोबाचे पैजार

ही सत्यकथा असेल तर मात्र अवघड आहे बाकिच्यांचे.

कथेमधले एकेका वस्तुचे दर वाचून फारच जळजळ झाली नेव्हीकट २५ पैसे, हॅवर्ड्स ५ रुपये आणि बियर ४.५ रुपये. (त्यातही स्टूडंट कन्सेशन मागणे ही तर हाईट झाली) अर्थात त्या वेळी उपलब्ध पैशाच्या मानाने हे दरही फार जास्त असतील.

तुम्ही असेही लिहू शकता तर? मग सातत्याने लिहीत का नाही?

पैजारबुवा,

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Nov 2021 - 2:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि शेवटचा ट्विस्टही मस्तच, लिहित रहा!!

योगी९००'s picture

11 Nov 2021 - 4:56 pm | योगी९००

मस्त कथा पण धक्कादायक शेवट...

एक कळतं नाही. पीटरने जर अन्याला हे लोकं कुठे पार्टी करतात ते दाखवले नव्हते तर कोणी दाखवले मग? का ते पण एक भूतच..?

सर्वसाक्षी's picture

11 Nov 2021 - 6:40 pm | सर्वसाक्षी

तोच अन्याला घेऊन आला असं सगळ्यांनी पाहिलं होतं
मात्र पीटर सकाळी म्हणाला तो तो आलाच नव्हता, वर तो म्हणाला की अनेकांना उंच गेल्यावर होतात तसा भास तुम्हाला झाला. त्याने अशी उदाहरणेही दिली, अ‍ॅलेक्सने त्याला दुजोरा दिला.
डोक्याचा भुगा पडला पण नक्की काय झालं होतं समजलं नाही

टुकुल's picture

11 Nov 2021 - 7:05 pm | टुकुल

खुप मस्त लिहिल आहे, एकदम स्वःताचा अनुभव असल्या सारख वाटत असताना, एकदम जबरा टिव्स्ट.

--टुकुल

जुइ's picture

15 Nov 2021 - 8:30 am | जुइ

शेवट फारच थरारक आणि मनाला चटका लावणारा.

गुगली चांगलीच पडली, शेवट पर्यंत कुठे वळणार कळलंच नाही

कंजूस's picture

16 Nov 2021 - 8:07 pm | कंजूस

आणि तो मित्र!

सरिता बांदेकर's picture

16 Nov 2021 - 10:32 pm | सरिता बांदेकर

धक्का तंत्र मस्तच जमलंय.

मित्रहो's picture

17 Nov 2021 - 12:44 pm | मित्रहो

कथा छान रंगविली, शेवट तर एकदम भन्नाट

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

18 Nov 2021 - 6:03 pm | सौ मृदुला धनंजय...

कथा आवडली

अभिजीत अवलिया's picture

19 Nov 2021 - 6:18 am | अभिजीत अवलिया

फारच धक्कादायक शेवट

गोरगावलेकर's picture

20 Nov 2021 - 7:53 pm | गोरगावलेकर

शेवटची कलाटणी छानच

भारीच! कथा छान रंगवली आहे.