Terrorism and Indian Response - एक शिफारस

अभिजीत's picture
अभिजीत in काथ्याकूट
3 Dec 2008 - 8:46 pm
गाभा: 

दहशतवादावर चर्चा करताना त्या विषयातील तज्ञ (विशेषतः भारतीय) व्यक्तिंची मतं समजावून घेणं महत्वाचं वाटतं. जालावर शोधाशोध करता काही नविन सापडलंही.
-----------------------------------

"Institute of Defense Studies and Analysis" (http://www.idsa.in/) ही संस्था १९६५ साली स्थापन करण्यात आली. संरक्षण आणि प्रशासकीय सेवांचा प्रदिर्घ अनुभव असलेले लोक या संस्थेत काम करतात. भारत सरकारच्या संरक्षण विषयक धोरणांसाठी शोधकार्य करणे, संरक्षण आणि प्रशासकीय सेवेत असणार्‍या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणे यासाठी ही संस्था कार्यरत आहे.

२००५ साली या संस्थेच्या ४०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 'Emerging India - Security and Foreign Policy Perspectives' (http://books.google.com/books?id=ykZKWATQgcoC) या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यात त्यावेळचे नेव्ही चीफ ऍडमिरल अरुण प्रकाश, राष्ट्रिय सुरक्षा सल्लागार (उप) श्री. विजय नंबियार यासारख्या लोकांचे लेख संपादीत करण्यात आले आहेत.

Terrorism and Indian Response
यात एक लेख "Terrorism and Indian Response", अफसिर करिम यांचा आहे. अफसिर करिम १९८९ मधे भारतीय लष्करातील पॅराशुट रेजिमेंट मधून रिटायर झाले आणि ते अतिविशिष्ट सेवा (AVSM)मेडल विजेते आहेत.

लेख मुळातून वाचनीय आहे. माझ्या अल्पमतीनुसार यातले काही मुद्दे इंग्रजी मधे इथे देत आहे. यातली मराठीतली वटवट माझी आहे.

".. it is not possbile to find a universally acceptable definition of terrorism .. "

".. Pakistan has been supporting and encouraging multiple forms of conflicts with in India in which ethnic, communal and political issues are interwined .. "

" .. A visible Pakistan-sponsored terrorism is basically a neo-fundamentalist assult to destabilse and weaken India. .. "

".. Currently, Paskitan follows a dual policy of continuing the dialogue and supporting terrorists' activities. Pakistani policy-makers still seem to believe that unless pressure is maintained on India by terrorist attacks it would not be in a frame of mind to settle the Kashmir problem. "

" .. India has been facing several kinds of terrorist threats from:
- Pakistani-sponsored groups (यात टिपीकल पाकिस्तानी दहशतवादी संघटना येतात)
- Separatise groups (काश्मिर, पंजाब, आसाम, नागालँड, त्रिपुरा इथल्या संघटना)
- Naxalite groups (प. बंगाल मधे सुरु होउन, आंध्र मार्गे उत्तर महाराष्ट्रात शिरलेला दहशतवाद)
- Criminal syndicates and drug mafias .." (मुंबई बाँब स्फोट, बिहार - चंपारण्य वगैरे)

पुढे या चारी प्रकारांमधे असलेल्या 'प्रॉक्झी वॉर" चे विश्लेषण त्यांनी केले आहे.

तसेच खालिल मुद्यांचा परामर्ष ते घेतात -

- नागरीकांवरचे भ्याड हल्ले,
- जात, धर्म, पैशाचे आकर्षण दाखवून मिळवलेला काही स्थानिक लोकांचा सहभाग,
- मुंबई, लखनौ, काठमांडु इथल्या अंडरवर्ल्डचे दहशतवाद्यांशी संबंध ,
- 'स्वतंत्र चळवळी या राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त आहेत' यावर फुटीरतेसाठी दिला जाणारा भर

सगळ्यात शेवटी दहशतवाद रोखण्यासाठी भारताने कोणत्या उपाययोजना आखल्या पाहिजेत यावर ते चर्चा करतात.

लेख पुर्णपणे वाचुन आपण यावर चर्चा केली तर काही मुद्दे कळायला मदत होइल असे वाटते.

यात मला एक विचार जरा अस्वथ करुन गेला. ते म्हणतात -

".. In our environment, the adverse political impact of terrorist attacks has to be anticipated and defused and the possbile chaotic ethnic and religious reactions have to be foreseen and controlled. We require a suitable mechanism to cushion the political fallout of terrorist attacks on communally sensitive targets"

या साठी लागणारं राजकीय नेतृत्व आणि राजकीय परिपक्वता आपण कोठुन आणणार?

तसेच काही उपमुद्दे -
- दहशतवादाचा विचार करताना आपण आपल्या इतिहासातच जास्त रममाण होतो आहे का?
- भारतीय संघराज्यावर होणाहे हे हल्ले याला बदलणारे भू-राजकीय परिदृष्य (Geo Political Perspective) ही कारणीभूत आहे की नाही?
- केवळ राजकीय नेत्यांकडे बोट दाखवून आपण या प्रश्नाचे अति-सुलभीकरण तर करीत नाही ना?

'Emerging India - Security and Foreign Policy Perspectives' हे पुस्तक गुगलच्या इ-बुक प्रकल्पात उपलब्ध आहे.
भाजपचे नेते वेंकय्या नायडु यांच्या एका मताचा (Sep 29, 2008) इथे संदर्भ - http://www.expressindia.com/latest-news/Wrong-to-link-religion-with-terr...

Terrorism and Indian Response या लेखातले मुद्दे उधृत करताना काही चुका झाल्या असतील तर त्या सर्वस्वी माझ्या आहेत.

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

3 Dec 2008 - 8:54 pm | लिखाळ

चांगला लेख आणि चर्चा समोर मांडलीत. सवडीने ते पुस्तक वाचले पाहिजे.

प्रश्न जीतका जूना होत जाईल तेव्हडा तो बहुआयामी होत जातोच. भिजत पडलेले घोंगडे वेळेवर उन्हात टाकले नाही तर त्याला बुरशी धरेल, कुजेल आणि आपण बुरशीवर औषध शोधत बसू ...ते वाळत कधी टाकणार.
-- लिखाळ.