कोकोनट अप्पम

Primary tabs

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
20 Oct 2021 - 4:13 pm

Appam

णमस्कार णमस्कार णमस्कार!!!

कसं चाललय मंडळी?? सगळे स्वस्थ आहात ना? चला आता चर्चेत वेळ न दवडता झटपट नारळ अप्पम करा आणि मस्त आस्वाद घ्या.

साहित्य:
ईडली/साधे तांदूळ - २ कप
मेथी दाणा - १ छोटा चमचा
पातळ किंवा जाड पोहे - १ कप
खोवलेला ओला नारळ - १ कप
चवीनुसार मीठ/साखर

कॄती:
१. तांदूळ स्वच्छ धुवुन ४-५ तास भीजत घालावे
२. वाटण्याआधी एक ५ मि. पोहे भीजवुन ठेवावे (खरा एवढाहि वेळ लागत नाहि)
३. मिक्सर मधे थोडं थोडं पाणी घालुन तांदूळ मुलायम वाटुन घ्या व एका मोठ्या भांड्यात / डब्यात काढुन घ्या
४. आता त्याच मिक्सर च्या भांड्यात भीजवलेले पोहे आणि ओला नारळ घालून मुलायम वाटुन घ्या व तांदूळाच्या मिश्रणात घाला
५. मिश्रण फार पातळ किंवा खूप घट्ट नको (डोश्याच्या पीठाच्या घनतेप्रमाणे)
६. चवीप्रमाणे मीठ्/साखर घालून मिश्रण उबदार जागी आंबवण्यास ठेवुन द्या

amblela peeth

७. नॉनस्टीक पॅन/तवा चांगला तापला की तेलाचा हलका हात लावून (पॅन ला) जाडसर डोसा घालून घ्या. वरुन झाकण ठेवून एकाच बाजूनी भाजून घ्या.

Appam

Tayar appam

८. आवडत्या चटणी सोबत सर्व करा

ता.क.: हे अप्पम थोडे जाडसरच ठेवावे. पीठ जेवढं चांगल आंबेल तेवढि अप्पम ला सुरेख जाळी पडते. खाताना ओल्या खोबर्‍याची चव मस्त लागते. ओल्या नारळाची अजून चव हवी असल्यास अप्पम घालण्याआधी मिश्रणात बारीक खवलेल्या ओल्या नारळाचा चव घाला. अधीक फ्लेवर साठि पाण्या एवजी नारळाचं पाणी देखील वापरु शकता.

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

20 Oct 2021 - 4:19 pm | दिपक.कुवेत

फोटो दिसत नाहियेत. संम जरा मदत कराल का?

कंजूस's picture

20 Oct 2021 - 4:26 pm | कंजूस

झटपट!

केल्यावर पुन्हा लिंक काढणे. View in new tab करून वर अड्रेस बार मध्ये lh3googgleusercontent. . . . पासून सुरू होणारी/दिसणारी लिंक हवी.

दावणगिरी लोणी स्पंज डोसा हा धागा आठवला.

तर्कवादी's picture

20 Oct 2021 - 5:14 pm | तर्कवादी

मी पण आप्पम बनवतो. पण ही रेसिपी थोडी वेगळी आहे. ही पण एकदा करुन बघावी म्हणतो.
माझ्या रेसिपीत शिजवलेला भात आणि भिजवलेला भात असे दोन्ही असतात तसेच आंबवण्याकरिता यीस्ट असते.

सौंदाळा's picture

22 Oct 2021 - 11:16 am | सौंदाळा

दिपक कुवेतकर साहेब खूप दिवसांनी लिहिलेत.
ते पण पाकृ मधे पनीर न घालता ;)
ओल्या खोबर्‍यामुळे मस्तच लागत असतील.
फोटो मात्र काही दिसत नाहीत पण ते एका अर्थी बरंच आहे, अप्पमची जाळी बघून माझ्या काळजाला घरं पडली असती.