दिवाळी अंक २०२१ : कथा माझ्या ड्रायव्हिंग टेस्टची

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

२००४ साली अमेरिकेत, ह्युस्टनला पाय ठेवला. ह्युस्टनला पत्नीचे आई-वडील आणि एक मामा राहत होते, त्यांच्याकडे राहायला लागलो. ह्युस्टन भौगोलिकदृष्ट्या फार मोठे आणि पसरलेले शहर. त्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट अत्यंत कमी किंवा ‘न के बराबर’. स्वतःच्या गाडीशिवाय येथे पर्यायच नाही, ड्रायव्हिंग येणे कम्पल्सरी, त्यामुळे ह्युस्टनमध्ये पाय ठेवल्यापासून, ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी सासरेबुवांनी लकडा लावला. नुसता लकडाच लावला असे नाही, तर ते त्यांनी ती जबाबदारी आपल्या मेहुण्यांवर, म्हणजेच माझ्या पत्नीच्या मामांवर टाकली. मामांचे वय पासष्टच्या वर होते, तरीदेखील एखाद्या तरुणाच्या उत्साहाने ते मला ‘इथले’ ड्रायव्हिंग शिकवायच्या मागे लागले.

‘इथले’ अशासाठी म्हटले की येथे लेफ्ट-हँड ड्रायव्हिंग, भारताच्या अगदी उलटे, त्यामुळे पहिले कित्येक दिवस येणारी प्रत्येक गाडी आपल्याच अंगावर येते आहे किंवा आपणच उलट्या बाजूने चालवतोय असे वाटायचे. लेफ्ट-हँड ड्रायव्हिंगमुळे गाडीतील सर्व कंट्रोल्स उलटे, डाव्या-उजव्या बाजूला वळण्याचा सिग्नल द्यावा तर वायपर्स चालू होत आणि वायपर्स चालू करायला गेलो, तर चुकून वळण्याचे सिग्नल दिले जात. बहुतेक गाड्या ऑटोमॅटिक असल्याने गिअर शाफ्ट आणि क्लच पॅडल नसतेच, फक्त ब्रेक्स आणि अ‍ॅक्सिलरेटर, त्यामुळे हात सारखा नसलेल्या गिअरकडे आणि पाय सारखा नसलेला क्लच दाबायला पुढे होई. आपल्याकडे खूपशा चौकांत डावीकडे ‘स्टॉप एंड गो’ असतो, तर इथे तो उजवीकडे. ह्याच्याशिवाय टू-वे स्टॉप साइन्स, फोर-वे स्टॉप साइन्स, यील्ड वगैरे आपल्याकडे बघायला न मिळणाऱ्या वेगवेगळ्या ट्राफिक साइन्स दिसत. भारतात गाडी चालवताना पूर्णपणे ‘रिअर व्ह्यू मिरर’ आणि ‘साईड मिरर’वर भिस्त, तर येथे ‘लूक ओव्हर द शोल्डर’ची आणखी नवीन भानगड. जर वळताना किंवा ओव्हर टेक करताना 'ओव्हर द शोल्डर’ बघितले नाही, तर परीक्षेत सरळ नापास. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘हॉर्न न वाजवणे’, कारण एखाद्या कारचालकाने काही चूक केली, तर ती त्याच्या निदर्शनास आणून देणे एवढाचा त्या हॉर्नचा उपयोग. ह्या सर्व गोष्टींमुळे अगदी भांबावून जायला होत असे. त्यामुळे पहिले काही दिवस हे कंट्रोल आणि कायदे समजण्यातच गेले.

अमेरिकेतील इतर राज्यांतील ड्रायव्हिंग टेस्टची कल्पना नाही, पण टेक्ससमध्ये तीन स्टेजेसमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते. सर्वप्रथम, एक शंभर मार्काची लेखी परीक्षा ज्यात उत्तीर्ण होण्यासाठी कमीतकमी ७५ मार्क्स मिळवावे लागतात. ही लेखी परीक्षा पास झाल्यावर एक टेम्पररी लायसन्स मिळते, जे फक्त तीन महिन्यांसाठी व्हॅलिड असते. त्यानंतर फॉर्मल ड्रायव्हिंग शिकायचे आणि टेस्ट देण्याचा कॉन्फिडन्स आला की टेस्ट द्यायला येथील ‘डी.पी.एस.’ (डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टी) - म्हणजेच आपले ‘आर.टी.ओ’मध्ये जायचे. येथे सर्वप्रथम, इन्स्पेक्टर (बाई किंवा बुवा कोणीही असू शकतो) गाडीपासून दूर उभे राहून, टेस्ट देणार्‍या ड्रायव्हरला गाडीचे कंट्रोल्स ऑपरेट करायला सांगतो, उदा., उजवा टर्न सिग्नल दे, आता डावा दे, ब्रेक्स मारून दाखव वगैरे, हेड लाइट ऑन कर वगैरे.

हे सर्व सुरळीत पार पडल्यावर, पुढची स्टेज असते ‘पॅरलल पार्किंग’ म्हणजेच फुटपाथला (त्याला अमेरिकेत कर्ब म्हणतात) समांतर गाडी पार्क करणे. ह्यात दोन काल्पनिक गाड्यांच्या मध्ये आपली गाडी, कमीत कमी वेळा पुढे-मागे करून, योग्य ते डावी-उजवीकडचे सिग्नल्स दाखवून, कर्बला समांतर पार्क करायची असते. ह्यात कोणतीही चूक झाली तर तुम्हाला पुढची टेस्ट देऊ देत नाहीत. हे ‘पॅरलल पार्किंग’ नीट झाल्यावरच, तो किंवा ती इन्स्पेक्टर आपल्या गाडीत बसते आणि पाचएक मैलाचा फेरफटका मारायला लावते. हे सर्व सुरळीत पार पडल्यावरच ‘ड्रायव्हर्स लायसन्स’ मिळते. पण ह्या ‘पॅरलल पार्किंग’मध्येच बहुतेक लोक फेल होतात आणि मग त्यांना जास्त नीट प्रॅक्टिस करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला जातो. मी भारतात जवळजवळ दोन लाख किलोमीटर गाडी चालवली असली, तरी इथल्या वेगळेपणामुळे, मामांनी माझ्याकडून हे ‘पॅरलल पार्किंग’ चांगलेच घोटवून घेतले होते. असे असले, तरीदेखील दहापैकी दोन वेळा तरी ते चुकायचेच, त्यामुळे त्यांना व थोडीफार मलादेखील मनातून धाकधूक होतीच.

शेवटी माझ्या टेस्टचा दिवस उजाडला. मामा मला घेऊन ‘डी.पी.एस.’मध्ये पोहोचले. माझा नंबर आल्यावर आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या एका इन्स्पेक्टरबाईंनी माझी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. आधी सर्व लाइट्स उघड-बंद करायला लावले, ब्रेक्स मारायला लावले आणि शेवटी तेथून ज्या ठिकाणी ‘पॅरेलल पार्किंग’ची टेस्ट घेतली जायची तेथे आणले. हा भाग म्हणजे ‘डी.पी.एस.’ ऑफिसच्या मागचा शंभर-सव्वाशे मीटर्सचा रुंद असा एक रस्ता होता. कोणतीही व्यक्ती चुकून अशा नवशिक्या ड्रायव्हरसमोर येऊन अपघात होऊ नये, म्हणून ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जाळीचे कुंपण लावले होते. टेस्ट देणाऱ्या व्यक्तीचे नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक, जर एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलमधून तुम्ही ड्रायव्हिंग शिकला असाल तर ते शिक्षक, अशी मंडळी ह्या कुंपणापलीकडे उभी राहतात. एखाद्याने ‘पॅरलल पार्किंग’ नीट केले की टाळ्या वाजवून त्याला शाबासकी द्यायची आणि जर एखादा चुकला की, “ओह, आय एम सॉरी, ट्राय अगेन, यू कॅन डू इट” असे ओरडून त्याला उत्तेजन द्यायचे, असा सगळा प्रकार तेथून होत असे. मामादेखील जाळीच्या पलीकडे उभे राहून हा त्यांचा विद्यार्थी काय दिवे लावतोय हे पाहत होते. जाळीच्या पलीकडे वेगवेगळ्या रंगाचे, वयाचे, जातिधर्माचे स्त्री-पुरुष टेस्ट देणार्‍याकडे उत्सुकतेने पाहत उभे होते. आता माझ्या छातीतदेखील धडधडू लागले होते. प्रॅक्टिस सेशनमध्ये माझा वीस टक्के ‘फेल्युअर रेट’ होताच, त्यामुळे माझा नंबर आल्याबरोबर देवाचे नाव घेऊन गाडी सुरू केली. इन्स्पेक्टरबाई गाडीपासून लांब उभ्या राहून माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे गाडी चालवायची असल्याने, ड्रायव्हरकडील खिडकीची काच उघडीच होती. गाडी ज्या ठिकाणी ‘पॅरलल पार्क’ करायची होती, त्याच्या थोडी पुढे मी ती नेली आणि पॅरलल पार्क करण्यासाठी रिव्हर्स घेऊ लागलो, त्याबरोबर मामांनी जाळीच्या पलीकडून ओरडून रनिंग कॉमेंट्री सुरू केली.

“हो, बरोबर आहे, बरोबर आहे,... घे, अजून थोडी मागे घे, बास्स, आता डावीकडचा सिग्नल दे. अरे माझ्या देवा.. मी डावीकडचा म्हंटलं. गध्ध्या, तो उजवीकडचा झाला रे, आणि वायपर का रे चालू केलास? आँ? पाऊस पडतोय का?.. जाऊ दे.. जाऊ दे, जाऊ दे... अजून थोडी मागे. आता वळव, लगेच आत वळव रे माकडा.. अरे, त्या खांबाकडे बघ ना शुंभा, ठोकशील ना रे गाढवा...” माझं पूर्ण लक्ष गाडी पॅरलल पार्क करण्याकडे होते, तरीदेखील मामांचा आवाज कानी पडतच होता आणि त्यामुळे आणखीनच गोंधळायला झाले. आणखी थोडा वेळ गेला असता, तर जगातील सर्व प्राण्यांच्या नावाने लाखोली वाहून झाली असती. इतक्यात ती इन्स्पेक्टरबाई पुढे आली आणि मला थांबायला सांगितले.
“हू इज दॅट गाय बिहाइंड दि फेन्स?” - इन्स्पेक्टरबाई.
“ही इज माय मामा.” - मी.
“बट ही इज अ गाय, हाऊ कॅन ही बी युअर मम्मा?” - ‘एलजीबीटीक्यू’ची भानगड त्या काळी एवढी चालू झाली नव्हती, त्यामुळे इन्स्पेक्टरबाई कन्फ्यूज्ड.
“ओह, नॉट मम्मा, ही इज माय अंकल.” – इन्स्पेक्टरबाईंना ‘मामा’ माझी ‘मम्मा’ वाटली होती, पण मी लगेच ते कन्फ्यूजन दूर केले.
“गेट डाउन, कम विथ मी.” मला घेऊन ती मामा जिथे उभा होता त्या कुंपणाजवळ गेली. खूण करून तिने मामाला बोलावले, त्याबरोबर कावराबावरा होत मामा जवळ आला.
“डोन्च्यू नो दॅट यू आर नॉट सपोज टु गिव्ह एनी इन्स्ट्रक्शन्स टु द स्टुडंट ड्रायव्हर व्हाइल गिव्हिंग टेस्ट?” – इन्स्पेक्टरबाई.
“येस, येस मॅम..” – मामा चाचरत उत्तरला.
“अँड व्हॉट डू यू थिंक यू वेअर डुइंग? यू थिंक युअरसेल्फ टु बी स्मार्ट, इन्स्ट्रक्टिंग इन नेटिव्ह लँग्वेज?”
“नो, नो, मॅम, इट वॉज......” - मामा
“कम टुमॉरो.” माझे सर्व पेपर्स माझ्या हातात देऊन आणि मामाकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून ती म्हणाली.
“बट मॅम” – मी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला.
“कम टुमॉरो.” परत असे बोलून ती ताडताड चालत निघूनही गेली.
“अहो मामा, तुम्ही कशाला उगाचच मला इन्स्ट्रक्शन्स देत होतात? मी पार्क करत होतो ना नीट?” मी थोडेसे चिडूनच विचारले.
“अरे, पण मला वाटले तिला मराठी कळणार नाही, म्हणून मुद्दाम मराठीतूनच तुला इन्स्ट्रक्शन्स देत होतो.” – मामा
मी कपाळावर हात मारला.
“मामा, येथे उभ्या असलेल्या, जगातील कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही काय सांगत होता ते बरोबर कळले आहे, मग मराठी येवो किंवा न येवो, आणि इन्स्ट्रक्शन्स द्यायची गरजच काय होती? मी पार्क करत होतो ना नीट?”
“वा, वा, असं कसं जावईबापू? तुम्ही नापास झाला असतात तर तुमचे एक जाऊ द्या, मला घरी तोंड दाखवायला जागा तरी उरली असती का? तुमच्या सासर्‍यांनी माझी जगभर नाचक्की केली असती ना!”
ह्यावर हसावे की रडावे तेच मला कळेना. मी टेक्निकली टेस्ट नापास न झाल्यामुळे मामा घरी त्याचे तोंड दाखवू शकला असावा बहुतेक.

दुसऱ्याच दिवशी मी ड्रायव्हर टेस्ट पास झालो व जगभरातून मला अभिनंदनपर फोन येऊ लागले. आजही पत्नीचे मामा “माझ्यामुळेच संजयला ड्रायव्हर्स लायसन्स मिळाले” असे मिशीला तूप लावून सगळ्यांना सांगत फिरत असतात.

संजय

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Nov 2021 - 10:31 am | मुक्त विहारि

अजिबात सुचना द्यायच्या नाहीत, ह्या एकाच अटीवर, आम्ही आमच्या एका मावशीला गाडीत घेतो ....

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:12 am | सौन्दर्य

घरोघरी मातीच्या चुली

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:13 am | सौन्दर्य

घरोघरी मातीच्या चुली

कुमार१'s picture

6 Nov 2021 - 6:11 pm | कुमार१

छान किस्सा

जुइ's picture

7 Nov 2021 - 6:48 am | जुइ

भारी किस्सा आहे! आमच्या इथे इन्स्पेक्टर गाडीत बाजूच्या सिटवर येऊन बसतात. शिवाय इथे ३ प्रकारचे कार पार्किंग करावे लागते. ज्यात समांतर, ९० अंश कोन पार्किंग आणि अपहिल/ डाऊन हिल पार्किंग करावे लागते. मी परीक्षा दिली तेव्हा लवकरच्या अपाँटमेन्ट मिळत नसल्यामुळे डी एम व्ही समोर पहाटे २:३० पासून रांगेत लागल्याचे आठवत आहे! ९० अंश कोनातून पार्किंग करते वेळी बर्फ पडत असल्यामुळे परीक्षा देते वेळी गाडीतून उतरून मागची काच साफ केली होती ;-)

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:21 am | सौन्दर्य

किस्सा आवडल्याबद्दल धन्यवाद. आमच्या येथे म्हणजे कोणत्या स्टेट मध्ये ? ९० अंशातले पार्किंग किंवा अपहिल/डाऊन हिल पार्किंग अवघड असते का?

जुइ's picture

11 Dec 2021 - 12:31 am | जुइ

मी मिनेसोटा राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवले. रिव्हर्स घेऊन ९० अंशात पार्कींग करणे या व्हिडीओत पाहता येईल.
लायसन्स मिळवण्यासाठी विविध पार्कींग्जचा एवाढा सराव करुनही पुढच्या अनेक वर्षांत तसे करून कार पार्क करण्याची फारशी वेळ आली नाही.
आजकाल कारमधे असणार्‍या बॅक-अप व टर्न कॅमेर्‍यांमुळे हे काम अधिकच सोपे झाले आहे.

अर्धे ड्रायव्हर लोकांना लायसेन्स च मिळणार नाही.नजर कमजोर असणारे,जास्त वयस्कर लोकांना पण भारतात ड्रायव्हिंग लायसेन्स मिळते.
आता मानसिक दृष्ट्या व्यक्ती गाडी चालविण्यास योग्य आहे का ह्याची पण टेस्ट घेतली पाहिजे.
ट्रॅफिक मध्ये जास्त उतावीळ होवून गुण उधळणारी लोक सर्वात जास्त धोकादायक असतात.

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:22 am | सौन्दर्य

मी ड्रायव्हिंग बडोद्यात शिकलो. तेथेही असाच एक अनुभव आला होता. लिहीन लवकरच.

तुषार काळभोर's picture

7 Nov 2021 - 8:02 pm | तुषार काळभोर

आजही पत्नीचे मामा “माझ्यामुळेच संजयला ड्रायव्हर्स लायसन्स मिळाले” असे मिशीला तूप लावून सगळ्यांना सांगत फिरत असतात.
>>
त्यामुळे तर prompting चालू होते :)

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:24 am | सौन्दर्य

मला लायसन्स न मिळाल्यास त्यांचं नाव बुद्दू झालं असतं ना ? म्हणून हा सर्व खटाटोप.

सौंदाळा's picture

9 Nov 2021 - 3:05 pm | सौंदाळा

भारी किस्सा,
मस्त रंगवून सांगितलेत.

मित्रहो's picture

13 Nov 2021 - 9:00 pm | मित्रहो

मस्त किस्सा छान रंगवला. मजा आली वाचताना.
मला अमेरीकेत गाडी चालवायची म्हटली की धडकी भरते. मी चालवत नाही कुणीतरी सोबती बघतो . धडकीचे मुख्य कारण नियम आणि हॉर्न हेच असते. तुम्ही सांगितलेली भिती सर्वांना असते.
एक प्रश्न जी मंडळी काही कालावधीसाठी अमेरिकेत येतात ती मंडळी फक्त भारतातल्या लायसेन्स वर गाडी भाड्याने घेतात आणि फिरतात. त्यांना कसे काय परवानगी मिळते.

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:26 am | सौन्दर्य

मला वाटते भारतातल्या लायसन्सवर अमेरिकेत गाडी चालवता येत नाही. माझ्याकडे भारतातले लायसन्स होते, त्याच बरोबर मी इंटरनॅशनल ड्रॉयव्हर्स लायसन्स देखील घेतले होते तरी ह्युस्टनमध्ये (टेक्सस स्टेट) लायसन्स घ्यावेच लागले.

श्रीरंग_जोशी's picture

11 Dec 2021 - 12:01 am | श्रीरंग_जोशी

भारतातले (किंवा इतर देशांतले) चारचाकी वाहनांचे लायसन्स वापरुन अमेरिकेत कार चालवण्याबद्दल अमेरिकेच्या विविध राज्यांत वेगवेगळे नियम आहेत. कुठे तुम्ही अमेरिकेत आल्यापासून एक वर्षांपर्यंत कार चालवता येते तर कुठे एक किंवा तीन महिने कार चालवता येते.

चौथा कोनाडा's picture

14 Nov 2021 - 10:17 pm | चौथा कोनाडा

झकास किस्सा !
खुसखुशीत !

“ही इज माय मामा.” - मी.
“बट ही इज अ गाय, हाऊ कॅन ही बी युअर मम्मा?” - ‘एलजीबीटीक्यू’ची भानगड त्या काळी एवढी चालू झाली नव्हती, त्यामुळे इन्स्पेक्टरबाई कन्फ्यूज्ड.

हा ... हा .... हा ...... !

मामांनी बाजी मारून तुम्हाला मामा बनवले म्हणायचे !

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:27 am | सौन्दर्य

येथे कृष्णवर्णीय लोकं आईला 'मामा' म्हणतात, म्हणून तिचा गोंधळ उडाला होता.

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2021 - 5:37 am | सुधीर कांदळकर

चार चाकावरच्या अराजकावर अखेर आपण मात केलीच तर. मामांच्या कृपेने कां होईना! मस्त लेख. आवडला. धन्यवाद.

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:28 am | सौन्दर्य

अगदी तसेच म्हणावे लागेल.

चौकस२१२'s picture

15 Nov 2021 - 6:21 am | चौकस२१२

गध्ध्या, ते सुद्धा जावयाला ( अगदी मामेसासरे असले म्हणून काय झाल! ) ह्या .... आपण नास्त बुवा ऐकून घेतलं ! हाहाहाहाहाहा

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:31 am | सौन्दर्य

'वखत पडे बाका तो गधे को बोलो काका'. आमचा वखत बाका होता म्हणून आम्ही ते ऐकून घेतले, आता बोलून तर बघा म्हणावं ?

अनन्त अवधुत's picture

15 Nov 2021 - 8:58 am | अनन्त अवधुत

खुसखुशीत झालाय लेख. माझी वाहनचालक परवाना मिळवण्याचा प्रवास आठवला. तो पण असलाच दिव्य होता.

श्वेता व्यास's picture

15 Nov 2021 - 10:16 am | श्वेता व्यास

ड्रायव्हिंग टेस्टची कथा आवडली, मामांचे अभिनंदन :)

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:34 am | सौन्दर्य

माझ्या आधी सर्वानी मामांचेच अभिनंदन केले. भारतात जरी मी २ लाख किलोमीटर गाडी चालवली असली तरी बायकोचे मत 'तुला लायसन्स मिळणे अवघडच दिसतंय' असेच होते. लायसन्स मिळाल्यावर "माझा मामा होता म्हणून................."हे आजही ऐकतोच आहे. चालायचंच.

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 12:18 am | सौन्दर्य

८२६ वाचनकर्त्यांचे तसेच प्रतिसाद देणार्यांचे मन:पूर्वक आभार. ज्या प्रमाणे रंगमंचावरच्या कलाकाराला टाळ्या प्रोत्साहन देतात तसेच लेखाला मिळालेले प्रतिसाद लेखकाचा उत्साह वाढवतात. पुन्हा एकदा खूप खूप आभार.

श्रीरंग_जोशी's picture

10 Dec 2021 - 11:57 pm | श्रीरंग_जोशी

अमेरिकेत ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याचे तुमच्या खुसखुशीत लेखनशैलीतले अनुभवकथन खूप आवडले.

आईला ममा (जवळजवळ मामा) म्हणण्यावरून कॉलेजच्या स्नेहसंमेलनातला किस्सा आठवला. व्यक्तिमत्त्व स्पर्धेत एक आंग्लाळलेल्या तरुणीने परिधान केलेल्या साडीचे कौतुक करताना, 'ही माझ्या आईची साडी आहे', असे इंग्रजीतून सांगताना आईचा ममा (जवळपास मामा असे ऐकू येईल) असा उल्लेख केला. प्रेक्षकांत बसलेल्या माझ्या एका वर्गमित्राने हळू आवाजात लगेच एक कमेंट मारली, "हिचा मामा साडी नेसतो". ज्यांना ऐकू गेले त्यांची हसून हसून वाईट अवस्था झाली.

मी अमेरिकेत आल्यावर जवळपास सव्वा वर्षाने कार ड्रायव्हिंग शिकणे सुरू केले व दोन महिन्यांत लायसन्स मिळवले. भारतात चारचाकी चालवणे शिकलो नसल्याने तुम्हाला झाला तसा त्रास (उलट बाजूचा) मला अजिबात झाला नाही. तेव्हा मिसुरी राज्यात राहत होतो. लेखी (प्रत्यक्षात संगणकावर) परीक्षा मी २५ पैकी २२ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन (पास होण्यासाठी २० उत्तरे बरोबर येणे आवश्यक होते) पास झालो. आकडेवारीवाले प्रश्न मी चुकवले उदा. रक्तात अल्कोहोलचे प्रमाण किमान किती असताना कार चालवणे गुन्हा आहे).

एक भारतीय वंशाच्या फिजी देशातून आलेल्या बाई तासाच्या दराने स्वतःच्या कारने ड्रायव्हिंग शिकवत असत. त्या कारला भारतातल्या ड्रायव्हिंग स्कूल्सच्या कार्ससारखे इन्स्ट्रक्टरचे कंट्रोल्स नव्हते. म्हणजे नवशिक्या विद्यार्थ्याने अपघात करवल्यास इन्स्ट्रक्टर काहीच करू शकणार नाही. पहिल्या एक तासाच्या सेशनमधे त्यांनी मला बरेच काही शिकवले.

त्यानंतर त्यांच्याकडून पुढचा क्लास घेण्याऐवजी मी हापिसच्या सहकार्‍यांकडून रेंटल कारद्वारे पुढचा सराव केला.काही आठवड्यांनी पहिल्यांदा ड्रायव्हिंग टेस्ट दिली. परीक्षक बाईंच्या प्राथमिक प्रश्नांना उत्तरे दिल्यावर त्यांच्या सूचनेनुसार पार्किंगमधून बाहेर काढली. त्यांनी पुढे जाऊन डावीकडे वळायला सांगितले. परीक्षेचा दडपणामुळे मी चुकून उजवा सिग्नल दिला. त्यावर त्यांनी थोडे दरडावून म्हंटले, 'आय सेड, टर्न लेफ्ट'. उर्वरित टेस्टदरम्यान माझे अति-सावध चालवणे अन ग्रीन सिग्नलवर उजवीकडे वळताना डावीकडे वळून कुणी सिग्नल तोडून येत नाही ना याची खात्री करून वळणे या चुका बघून त्यांनी मला पुन्हा पार्किंगमध्ये पोचल्यावर पॅरलल पार्किंग करायलाही न लावता नापास केले.

माझे काही सहकारी त्या दरम्यान फिजीच्या बाईंकडून क्लासेस घेत होते. त्यांच्याकडून बाईंना मी नापास झाल्याचे कळले त्यावर त्या उद्गारल्या, "मला वाटलेच होते तो नापास होईल म्हणून, कारण त्याने माझ्याकडून फक्त पहिलाच क्लास घेतला". नंतर मी फोन करून त्यांचा ३० मिनिटांचा क्लास बूक केला व शास्त्रोक्त पद्धतीने पॅरलल व ९० अंशाचे पार्किंग शिकलो. दुसर्‍या प्रयत्नात सहजपणे परीक्षा पास झालो.

सौन्दर्य's picture

11 Dec 2021 - 12:10 am | सौन्दर्य

श्रीरंग, तुमचाही अनुभव आवडला. मामा साडी नसतो ? हे कमेंट तर अगदी लाजवाब. माझ्या अनुभवाप्रमाणे बहुतेक कृष्णवर्णीय मंडळी ममाचा उच्चार काहीसा 'मामा' असा करतात. पण आता त्याची सवय झाली आहे.

तुम्ही म्हंटल्याप्रमाणे मी आजही मला ग्रीन सिग्नल असतानाही दुसर्याबाजूने कोणी त्याचा सिग्नल तोडून तर येत नाही ना हे हळूच बघून घेतो, शेवटी मूळ संस्कार भारतीयच आहेत. मी त्यालाच इथल्या भाषेप्रमाणे 'डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग' म्हणतो.

दुसरं म्हणजे इथे (निदान टेक्सस राज्यात तरी) तुम्ही ड्रायव्हिंगचे लायसन्स मिळवले म्हणजे कौतुकाचा वर्षाव होतो, का ते मला माहीत नाही. पण मला अमेरिकेतील चार-पाच नातेवाईकांचे अभिनंदपर फोन आल्याचे आठवते.

मी कार चालवायला बडोद्यात शिकलो तेथेही मला असाच एक मजेशीर अनुभव आला होता, तो ही लवकरच टंकीन म्हणतो.

तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार.