body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
निदा फ़ाज़ली - एका शायरचा मागोवा.
रेडिओवर गाणं लागलं होतं,
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं ज़मीं तो कहीं आसमाँ नहीं मिलता
मी विचार करत होतो, कुणी लिहिलंय हे गाणं? मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी की आनंद बक्षी?
पुन्हा कधीतरी ऐकलं,
तेरे जहान में ऐसा नहीं कि प्यार न हो
जहाँ उमीद हो इसकी वहाँ नहीं मिलता...
बायकोला विचारलं, "कुणी लिहिलं असेल हे गाणं? शायरने खूप गहरी चोट खाई है असं वाटतं, कारण त्याच्या एक एक लाइन्स एकाद्या सिद्धान्तासारख्या पक्क्या आहेत."
मुकम्मल = संपूर्ण, म्हणजे कुणालाही संपूर्ण जग मिळू शकत नाही, एक गोष्ट मिळाली तर कशाची तरी कमतरता राहतेच.
(मला हे फिजिक्समधल्या हायजेंबर्गचं 'अनिश्चिततेचे तत्त्व' (uncertainty principle)सारखं वाटतं!! ज्यात प्रकाश कणस्वरूपी की लहरस्वरूपी हे सांगता येत नाही. कण असेल तर लहर नाही, लहर (wave) असेल तर कणस्वरूप नाही.)
आता हेच बघा, दुग्धक्रांतीमुळे अमाप दूध उपलब्ध आहे, पण कुठेतरी एखाद्या आईवेगळ्या बाळाला दूध मिळत नाही.
आपल्यालाही हा अनुभव असेलच. नात्यांमधून ज्यांच्याकडून प्रेम मिळावं वाटतं, तिथून मिळत नाही. म्हणजे कुणावर प्रेम केलं तरी प्रेम मिळेल असं होत नाही.
तेरे जहान में ऐसा नहीं कि प्यार न हो,
जहाँ उमीद हो इसकी वहाँ नहीं मिलता...
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं ज़मीं तो कहीं आसमाँ नहीं मिलता
ह्या ओळी मला विटांचं पक्कं बांधकाम वाटू लागलं.
मग भिडलोच रिसर्चला.
पता चला है, निदा फ़ाज़ली यांनी लिहिलंय. मूळ नाव मुक़्तदा हसन. निदा फ़ाज़ली टोपण नाव. निदा म्हणजे ‘आवाज़’. फ़ाज़िला क़श्मीरच्या भागाचं नाव. त्यांचे पूर्वज तिथले, म्हणून फ़ाज़ली.
मग विकिपिडियामधून यांच्याविषयी वाचलं,
आणि मला आश्चर्याचे धक्के बसले...
-----------------------***---------------
पहिला धक्का..
परवरिश.. समजा, तुमचे व घरच्या सर्वांचे विचारांमध्ये मतभेद झाले.
बरं, हे संध्याकाळी भेंडीची भाजी करू दे की वांग्याची, अशा साध्या विषयावर नसून इथे हिंदुस्तानातच राहायचं की शेजारच्या देशात जायचं, यावर होतं, त्या वेळी निदा यांचं मत इथेच राहायचं असं ठाम होतं.
१९६५मध्ये - म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून १८ वर्षं झाल्यावर त्यांच्या कुटुंबाला धार्मिक उबळ आली आणि गेले ते शेजारच्या देशात. migrate झाले या तरुणाला एकटं सोडून...
-------------------****------------------
दुसरा धक्का...
निदा एकदा एका मंदिराजवळून जात असताना आतून ऐकू येणारं भजन ऐकून थांबले, ऐकत उभे राहिले.
सूरदासाचं गीत होतं, ज्यात राधा आर्जवून सखींना कृष्णाच्या विरहाबद्दल काही सांगत असते.
निदासुद्धा त्यांच्या घरच्यांना जाऊ नका असं सांगत होतेच ना. नात्यांमध्ये असं का होतं? एक व्यक्ती व्याकूळतेने सांगत असलेली गोष्ट दुसर्यापर्यंत का पोहोचत नाही?
मधुबन तुम क्यौं रहत हरे?
बिरह बियोग स्याम सुंदर के ठाढ़े क्यौं न जरे?
या भजनात भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेल्यानंतर त्यांच्या वियोगात बुडून गेलेल्या राधा आणि गोपिकांच्या विलापांचे प्रश्न आहेत.
हे पुष्पवेलींनो, तुम्ही अजून ताज्यातवान्या कशा आहात?
कृष्णाच्या वियोगात तुम्ही कोमेजून कशा गेल्या नाहीत?
भजन ऐकून पुढे गेलेले निदा फ़ाज़ली आधीचे राहिले नाहीत. भावभावनांचे विश्लेषण करणार्या त्यांच्या सुप्त प्रतिभेला धक्का लागून एका शायरचा जन्म झाला. कबीरदास, तुलसीदास या संतांचे साहित्य वाचून साध्या सुलभ आणि प्रवाही शैलीत लिहिण्याची कला मिळवून ते शायर झाले. लिहीत गेले. मीरा व कबीर यांचा निदावर प्रभाव होता. त्यांनी दोहेसुद्धा लिहिले.
पुढे फिल्मी गीतकार म्हणून संधी शोधण्यासाठी मुंबईला आले.
कमाल अमरोही ‘रज़िया सुल्तान’ फिल्म बनवत असताना गीतकार जांनिसार अख्तर यांचं अचानक निधन झालं आणि अपूर्ण दोन गीतं पूर्ण करण्याचं काम मिळालं. असा गीतकार म्हणून फिल्म लाइनमध्ये प्रवेश झाला.
होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज़ है
इश्क कीजिये फिर समझिये ज़िन्दगी क्या चीज़ है
हे त्यांंचच गाणं.
तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है
हेही त्यांचंच.
सूर या अतिशय वेगळ्या चित्रपटात कथा व संगीत खूपच प्रभावी आहे. खिळवून ठेवणारा आहे, क्लायमॅक्स जबरदस्त आहे, विशेष म्हणजे अशा वेळी जबरदस्त संगीत असलेल्या गाण्यात असे शब्द भरायचे, जे कथेत मिसळून जातील आणि अहंकारी गुरू व असामान्य प्रतिभावंत शिष्या यांच्या नात्याचं वर्णन करेल असं गीतकाव्य लिहिणं.. असं अद्वितीय काम केलंय.
कित्येक वर्षं मी कथा, संगीत व नाट्य याच्या प्रभावामुळे कवीकडे दुर्लक्षच केलं होतं.
मेरे, मेरे दिल के, पागलपन की और सीमा क्या है
यूँ तो तू है मेरी, छाया तुझमें और तेरा क्या है
मैं हूँ गगन, तू है ज़मीं, अधूरी सी मेरे बिना
रात को कर विदा...
देखूं चाहे जिसको, कुछ-कुछ तुझसा दिखता क्यूं है
जानूं, जानूं ना मैं, तेरा मेरा रिश्ता क्यूं है
कैसे कहूं, कितना बेचैन है दिल मेरा तेरे बिना
रात को कर विदा...
आ भी जा, आ भी जा
ऐ सुबह आ भी जा
रात को कर विदा
दिलरुबा आ भी जा
संगीत - एम.एम. कीरावानी, काव्य - निदा फाज़ली, स्वर - लकी अली, सुनिधी चौहान.
--------------------****-------------
तिसरा धक्का.....
पहिल्या पत्नीबरोबर न पटल्यामुळे वेगळे झाले व अनेक वर्षं एकटेच राहत होते.
एकदा ते खूप आजारी असताना, त्यांच्या चाहत्या मालती जोशी त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्या. पुढे परिचय व प्रेम वाढून त्यांनी दुसरा निकाह केला. त्या एक गायिका होत्या आणि शेवटपर्यंत सावलीसारख्या साथ होत्या.
म्हणजे एक समर्पित जीवनसाथी त्यांच्याकडे चालत आला, असं समजायचं का!
अनेक वेळा ऐकलेलं हे गीत काल रेडिओवर पुन्हा ऐकताना हरवलो.
गिटारचे आकर्षक काॅर्ड्स आणि लताचा मनभावन अंदाज...
तेरे लिए पलकों की झालर बुनूँ
कलियों सा गजरे में बाँधे फिरूँ
धूप लगे जहाँ तुझे छाया बनूँ
आजा साजना |
तेरे लिए पलकों की...||
महकी-महकी ये रात है
बहकी-बहकी हर बात है
लाजो मरूँ, झूमे जिया
कैसे ये मैं कहूँ, आजा साजना
तेरे लिए पलकों की... ||
नया-नया संसार है
तू ही मेरा घर-बार है
जैसा रखे खुशी-खुशी
वैसे ही मैं रहूँ, आजा साजना
तेरे लिए पलकों की...||
प्यार मेरा तेरी जीत है
सबसे अच्छा मेरा मीत है
तेरे लिए रोऊँ पिया
तेरे लिए हँसूँ, आजा साजना
तेरे लिए पलकों की...||
ऐकून बेहद्द खूश झालो. निदा फ़ाज़ली यांच्यावर लिहिण्याचा विचार सुरू होता. वाटलं, निदा फ़ाज़ली यांनी हे गीत ऐकायला पाहिजे होतं.
इतक्यात रेडिओवर ऐकलं - "आर.डी. बर्मनने संगीतबद्ध किये, लता मंगेशकर के गाये इस गीत को लिखा है निदा फ़ाज़लीने!"
'कायनात'ने हा इत्तेफाक घडवून आणला होता का?
एक वर्तुळ पूर्ण झालं होतं.
प्रतिक्रिया
4 Nov 2021 - 10:16 pm | MipaPremiYogesh
8 Nov 2021 - 6:23 pm | सागर
निदा फाजली यांची अनेक गाणी त्यांच्या रचनांमुळे लक्षात राहिली आहेत. सदर लेख अजुन मोठा होउ शकला असता.
https://www.hindigeetmala.net/lyricist/nida_fazli.php या दुव्यावर जवळपास ३०० पेक्शा जास्त गाणी उपलब्ध आहेत.
जसे
अ़जनबी कौन हो तुम
जुनुन चित्रपटातील गाणी
आपले लेखन कौशल्य आवडले
8 Nov 2021 - 6:59 pm | प्राची अश्विनी
छान झालाय लेख.
8 Nov 2021 - 8:26 pm | तुषार काळभोर
त्यांची गाणी अतिशय तरल, नितळ असतात, काळजात हळुवार जपून ठेवावी अशी.
9 Nov 2021 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडले.
-दिलीप बिरुटे
9 Nov 2021 - 11:09 am | अनिंद्य
छान लिहिलेत.
निदा फाजलींचे दोहे फार आवडीचे आहेत, सोप्या शब्दात जबरदस्त आशय असलेले उदा.:
मैं रोया परदेस में भीगा माँ का प्यार
दुख नें दुख से बात की बिन चिट्ठी बिन तार
किंवा
अच्छी संगत बैठ कर संगी बदले रूप
जैसे मिल के आम से मीठी हो गयी धूप
9 Nov 2021 - 4:44 pm | ज्ञानोबाचे पैजार
काही वर्षांपूर्वी फोटो बघे पर्यंत निदा फाजली ह्या कौसर मुनिर किंवा माया गोविंद यांच्या सारख्या कोणीतरी कवयित्री आहेत असे वाटायचे.
त्यांनी अनेक आवडती गाणी लिहिली आहे
पण हा त्यांचा परिचय फारच थोडक्यात वाटला, और आने दो
पैजारबुवा,
9 Nov 2021 - 5:07 pm | मित्रहो
बहोत खूब
और आने दो. सुंदर परिचय
9 Nov 2021 - 11:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
फार सुंदर, पण फारच लवकर संपला!
अजुन येऊ द्या, निदा फाजील अजुन खोल आहे.
9 Nov 2021 - 11:46 pm | सौन्दर्य
लेख खूपच छान, खोलात जाऊन शोध घेण्याची वृत्ती आवडली.
महाभारत सिरीयल मधले जे टायटल सॉंग आहे ते निदा फाजलीनी लिहिले आहे असे ऐकल्याचे आठवते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.