दिवाळी अंक २०२१ : माझे लग्नपुराण

मित्रहो's picture
मित्रहो in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

लग्न हा काही फक्त मराठी मालिकांतला, चित्रपटातला किंवा नाटकातलाच महत्त्वाचा भाग आहे असे नाही, तर लग्न हा माझ्यासारख्यांच्या बालपणाचा एक फार मोठा घटक होता. ऐंशी-नव्वदच्या दशकात कुटुंब मिळून बाहेर जाणे म्हणजे कुणाच्या तरी लग्नाला जाणे हेच समीकरण होते. एके दिवशी पहाटे उठवले जायचे, पाण्यात बुचकळून अंघोळले जायचे, आईची लगीनघाई दिसायची.. म्हणजे दोनच शक्यता होत्या - एक नरकचतुर्दशीचे अभ्यंग स्नान किंवा कुणाच्या तरी लग्नाला जाण्याचा कंटाळवाणा प्रवास. पॅसेंजर ट्रेनमध्ये अख्खे कुटुंब मिळेल त्या जागेत कोंबले जायचे. ती पॅसेंजर अशा स्टेशनवर थांबायची, जिथे आसपास गावाचे नावनिशाणा नसे. पाच-दहा प्रवासी सोडले, तर बाकी सारे लघुशंका उरकायलाच खाली उतरायचे. अशा भकास स्टेशनावर पॅसेंजर हात-पाय पसरून मस्त ताणून द्यायची. एक -दोन एक्स्प्रेस गाड्या, एखादी मालगाडी पास झाल्याशिवाय तिचा पाय तिथून हलत नव्हता. लहान असताना एकच स्वप्न होते - आयुष्यात एकदा एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणार. असा प्रवास करत लग्नस्थळी पोहोचेपर्यंत लग्न केव्हाच आटपून आता जेवणाच्या पंगतीसुद्धा आटोपत आल्या असायच्या. नवरदेवाची वरात जर पॅसेंजर ट्रेनने येणार असेल, तर मुलीकडले बॅकअप नवऱ्याची सोय ठेवत असतील.. ठरलेला नवरा वेळेत पोहोचला नाही तर दुसरा हवा. तास-दोन तास होत नाहीत, तर लगेच परतीच्या पॅसेंजरचा प्रवास सुरू व्हायचा.

आपण अशा लग्नाला का जातो? हाच प्रश्न मला पडत होता. कुणाला तरी लग्नाच्या बेडीत अडकायचे होते, म्हणून आम्ही पोरे पॅसेंजरची कैद का भोगत होतो? त्या काळात मुलांना मत असते या गोष्टीला अजिबात मान्यता नव्हती, नाहीतर हल्ली 'आमच्या कुत्रीला लग्नात कंपनी नाही' म्हणून मंडळी लग्नाला जात नाहीत. आज तसे प्रवास करावे लागत नाहीत. लग्ने बदलली.. शास्त्रशुद्ध भाषेत 'लग्नात उत्क्रांती झाली'. डार्विनच्या उत्क्रांतीवादाप्रमाणे लग्नपद्धतींच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त मांडायचा झाला, तर मी उत्क्रातींचे चार टप्पे सांगीन. (या निमित्ताने स्वतःला डार्विनच्या जवळ नेता येते!) पहिला टप्पा ताट-पाट किंवा चिवडा-लाडू लग्न, दुसरा टप्पा टेबल-खुर्ची किंवा जिलेबी-मठ्ठा लग्न, तिसरा टप्पा कॅटरिंग लग्न आणि चौथा टप्पा करण जोहर जलसा लग्न. माझे बालपण विदर्भातील तीन जिल्ह्यांपुरते मर्यादित होते, त्यामुळे माझा अनुभव खूप व्यापक आहे असे मी छातीठोकपणे सांगू शकतो. तुम्ही कितीही ‘आमच्याकडे नाही बाई’ असे म्हणा, परंतु मला खातरी आहे की थोड्याबहुत फरकाने सर्वत्र याच स्वरूपाचे बदल झाले असतील.

ताट-पाट किंवा चिवडा-लाडू लग्न या टप्प्यात फक्त लग्न पाटावर लागत होते असे नाही, तर सुलग्न पाटावर, सारा लग्नविधी पाटावर आणि मुख्य म्हणजे जेवणाची पंगतसुद्धा पाटावर (किंवा चटईवर) बसायची. चिवडा-लाडू हे मानवाचे मुख्य खाद्य असल्यासारखे जिकडे तिकडे तेच असायचे. लग्न लागले की मुलीकडला कुणी मोठ्या परातीत चिवडा आणि वाटीभर बुंदीचे लाडू ‘चरा भुक्कडांनो’ असे म्हणून ठेवून द्यायचा. तोच बुंदीचा लाडू जेवणात असायचा, लग्न मांडवातून निघताना मिळणाऱ्या पाकिटातसुद्धा तोच चिवडा आणि तोच लाडू. हा टप्पा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते ऐंशीच्या दशकापर्यंत दीर्घकाळ चालला. लग्न हा पारतंत्र्यात जायचा विषय असल्याने त्याला भारताला स्वातंत्र्य मिळाले या घटनेने फरक पडण्याचे काही कारण नव्हते. या टप्प्यात लग्ने उरकण्यावर भर होता, त्यामुळे अशा लग्नाला इव्हेंट मॅनेजर नाही, तर इव्हेंट उरकणारे होते. कुण्या पंधरा वर्षाच्या मुलाने घाबरत घाबरत जाड मिशीवाल्या काकांना सांगावे, “काका, वांग्याची भाजी संपत आली.” कौरवसेनेने विराटवर आक्रमण केले हे उत्तराने सांगितल्यावर त्याला अर्जुनाने ज्या शांततेने उत्तर दिले असेल ना, तसेच ते काका उत्तर देणार - “बादलीभर पाणी ओत त्यात.”

त्या काळातील लग्ने फ्रेडरिक टेलरच्या असेंब्ली लाइन पद्धतीने उरकली जात होती. सर्वत्र लग्ने सारखीच असायची. लग्नच ते, त्यात काय Differentiation दाखवायचे? असा खोल विचार त्यामागे होता. साध्या कागदाची पत्रिका, ज्यावर एका बाजूने एक मुलगा मुलीला हार घालतोय असे चित्र, तर दुसऱ्या बाजूने गणपतीचे किंवा देवीचे चित्र, आत एकाच टायपातील लाल अक्षरं, त्यात मजकूर कमी आणि आपले विनीत किंवा कृपाभिलाषी लिहून वंशावळच जास्त छापलेली असायची. ही लग्ने साधारणतः कुठल्यातरी देवळात किंवा शाळेत व्हायची, लग्न हे मंगल कार्य आहे यावर विश्वास नसल्याने कुणी मंगल कार्यालय बुक करीत नव्हते. लग्नाच्या जेवणाचा मेनू - पोळी, वरण, भात, मसाले भात, पातळ भाजी, रस्सा भाजी, कोशिंबीर, कढी असा ठरलेला होता. मेनू कार्ड बघून ऑर्डर देणे हा प्रकार तेव्हा हॉटेलातसुद्धा आला नव्हता. माणसाला निवडस्वातंत्र्य असते, याचा त्या वेळी शोध लागायचा होता.

माझ्यासारख्या लहान मुलांना लग्नात एक त्रास हमखास व्हायचा. कुणी म्हातारी विचारणार,
“बंड्याचा ना तू? ओळखलं का मला?” हा बंड्या कोण हेच मला माहीत नाही, तर हिला कसे ओळखू?
“अरे, मी तुझ्या बाबांच्या आत्याची नणंद आहे.” माझ्या बाबांच्या आत्याची नणंद म्हणजे माझी कोण? असा स्कॉलरशीप परिक्षेतील बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न मला पडायचा.
“कोणत्या वर्गात आहे?”
“चौथी.”
“अभ्यास करतो का?”.
“बरा आहे. पंचाऐंशी टक्के होते.” (तेव्हा एवढे मिळाले तरी आभाळ ठेंगणे होते.) आईने दोन शब्द आपल्या पोराचे कौतुक केले, तर लगेच नाक मुरडणार.
“ते वर्धेच्या शाळेत मिळतात.” Calibration किंवा normalizationच्या नावाने एखाद्याच्या करीयरची कशी वाट लावतात, याचा अनुभव लहान असल्यापासून घेत आलो आहे. काही चक्क विचारायचे,
“अच्छा! सांग बर सतरा आठे किती?” जसे काही नागपूरबाहेरील शाळेत जास्त मार्कांनी पास होणे हा गुन्हा होता. मुळात नागपूरातील मंडळी अ-नागपुरी वैदर्भीयांना नाव का ठेवायचे, हे एक कोडे होते. साधारणतः एखाद्या विभागातील मोठ्या शहरातील लोकांमध्ये त्यांच्याकडे त्या विभागाचे सांस्कृतिक, शैक्षणिक नेतृत्व आहे अशी एक भावना असते, त्यातूनच असे संवाद होत असतात.
“तुम्ही चंद्रपूरच्या लग्नाला आल्या होत्या का? काय बाई ते लग्न. परातीने भात वाढत होते. येवढा भात खायला महालातील कुत्र्यांनासुद्धा दोन दिवस लागतील.”
“काय ते वरण, चिंचेचे पाणी नुसतं. अशी काय पद्धत असते.”
“तिखट तरी किती? माझी मूळव्याध उमळली.” या काकांची मूळव्याध खरे तर सावजीचे चिकन खाल्ल्यामुळे उमळली असेल, पण उगाच चंद्रपुरातील वरणाला नाव ठेवत होते.

फक्त पुरुष मंडळी असतील तर मात्र गप्पा वेगळ्या असायच्या.
“काय करतो मुलगा?”
“जिल्हा परिषदमध्ये आहे.”
“स्टेटचा”
“स्टेट म्हणून कमी लेखू नका.”
“तुम्हा स्टेटवाल्यांना वाहतूक भत्ता नाही. आम्हा सेंट्रलवाल्यांनाच आहे फक्त.”
“नवीन जीआरमधे सुरू होणार आहे.”
“शक्यच नाही ते.” ते दोघे जरी कोणत्यातरी फालतू विभागात कारकुंडे असले, तरी एक पंतप्रधानांचा पीए आहे आणि दुसरा मुख्यमंत्र्यांचा पीए आहे या थाटात भांडायचे. तेव्हापासून मी स्टेट आणि सेंटर यांची भांडणे बघत आलो, म्हणून मला आज त्यात नवल वाटत नाही. तिकडे बायकांच्या चर्चा रंगायच्या
“काय साडी दिली.. पोतेरं आहे. त्यापेक्षा न दिलेली बरी.” हिला जर खरेच साडी दिली नसती, तर हिने कांगावा केला असता.. "शंभराची तरी द्यायची, पाचशेची मागत होते का मी?"
“तरी बरं, चुलत नाही, सख्या काकाची सख्खी पोरगी आहे. त्या मावशीचा कारभार आहे.” लग्नाचा कारभार जर का मावशीच्या हातात असला, तर आत्याच्या पोटात पोटशूळ उठलाच म्हणून समजा. भारतातील पोटदुखीचे कारणांमध्ये हे एक महत्त्वाचे कारण आहे. अशा साऱ्या गुणदोषासहित पन्नास-साठ वर्षे लग्ने एकाच पद्धतीने होत होती.

जिलेबी-मठ्ठा किंवा टेबल-खुर्ची लग्न या टप्प्यात लग्नातील बदलांना सुरुवात झाली. पाटाएवजी टेबल-खुर्ची आली. पत्रिकेत पूर्वी छापली जाणारी वंशावळ आता छोटी झाली. पत्रिकेचा कागद जाड झाला. ज्या लग्नाला जायचे आहे तिथे बुंदीचा लाडू आहे की जिलेबी याचा अंदाज पत्रिकेची जाडी बघूनच करता येत होता. पंगत जरी टेबल-खुर्चीवर होत असली, तरी एखादी वरमाय अडून बसायची ‘विहिणीची पंगत तरी पाटावरच हवी’. वाकून वाकून विहिणीचे कंबरडे मोडल्याशिवाय वरमायेच्या कंबरड्याला आराम मिळत नव्हता. कालांतराने वरमायांचे कंबरडे मोडले आणि तिलाच पाटावर बसणे कठीण झाले. जेवणात मसालेभातासोबत मठ्ठा आला आणि नळराजाची जिलेबी आली. त्या काळात नागपुरातील बहुतेक लग्ने चिटणीसांच्या वाड्यात लागायची. एका वाड्यात चार मंगल कार्यालये होती. चिटणीसांनी जर वाड्यात लग्न कार्यालय काढले नसते, तर कितीतरी पोरे बिनालग्नाची राहिली असती. चिटणीसाच्या वाड्यात मी जिकडे खेळायला मुले मिळतील तिकडे जात होतो आणि जिथे जिलेबी असेल तिथे जेवत होतो. आपण कोणत्या लग्नाला आलो याच काही सोयरसुतक नव्हते. आई एकच प्रश्न विचारायची, “जेवला का रे तू?” त्याचे उत्तर ‘हो’ दिले की संपले. काय जेवला, कुठे जेवला याच्याशी तिला देणेघेणे नव्हते. हल्लीच्या आया काय जेवला, कुठे जेवला, किती जेवला, किती कॅलरी, किती विटामीन, किती प्रोटीन असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. गोष्टी फक्त जेवणावरच थांबत नाही. शी झाली का तुझी, कधी झाली, किती झाली, काय रंग होता.. ‘शी बाई, याला काळीच शी होत आहे बँडी प्लस द्यावे लागणार.’ गुगळेमहाराजांच्या कृपेने हल्लीच्या आया अर्ध्या पेडियाट्रिशियन झालेल्या आहेत.

सीमान्त पूजनात ज्याला ओळखपरेड म्हणता येईल असा कार्यक्रम असतो. चिवडा-लाडू लग्न टप्प्यात हा कार्यक्रम सारी रात्र चालतो की काय, इतका ताणला जायचा. पोटात कावळे ओरडत असायचे आणि इकडे यांचे ‘अहो, ते जावई राहिलेत ना’ हे संपत नव्हते. मग मुलाचा कुणी नातेवाईक त्या जावयांना उठवायचा.
“चला रामराव” रामराव मघापासून आपला नंबर कधी येतो याची वाट बघत होते. आता मात्र सौजन्य दाखविणार.
“मी कशाला?”
“जावई आहा तुम्ही. तुमचा मान ठेवलाच पाहिजे.” मुलाच्या बारा-पंधरा चुलत बहिणीपैकी हा कुण्या एकीचा नवरा असायचा. सुटे पैसे नाही म्हणून रिक्षेवाल्याने घालून पाडून अपमान केल्यावर स्वतःच्या सन्मानार्थ ज्याच्या तोंडून चार शब्द निघत नाही, तो जावई म्हणून त्याचा मान ठेवा. स्वतः कसलाही उद्योगधंदा न करता बायकोच्या कमाईवर आरामात लोळत राहतो, त्याचा जावई म्हणून मान ठेवा. परवा जो दारू पिऊन झिंगून नाल्यात पडला होता, त्याचासुद्धा जावई म्हणून मान ठेवा. जावई आणि मान या दोन गोष्टी फेव्हीक्विकने चिकटवाव्या अशा चिकटल्या होत्या. जिलेबी-मठ्ठा या टप्प्यात ओळखपरेडला लागणारा वेळ कमी झाला. रुसवेफुगवे नक्कीच असतील, परंतु त्या रुसव्याफुगव्यांकडे दुर्लक्ष करावे इतकी नाती आता दुरावली गेली होती.

नाष्ट्याला चिवडा-लाडू जाऊन उपमा मिळायला लागला, हळूहळू इडली, पोहे आले. कधीकधी तो उपमा असा चविष्ट असायचा की एकदा लग्नात उपमा खाल्ला की पुढले सहा महिने उपमा खायची इच्छा होत नव्हती. लग्न हे एक मंगल कार्य आहे यावर या टप्प्यात शिक्कामोर्तब झाले आणि लग्न मंगल कार्यालयात व्हायला लागले. लग्नाच्या बाह्य स्वरूपात बदल व्हायला सुरुवात झाली. नवरानवरीच्या खुर्च्या रंगीत झाल्या, हाराचा साईज मोठा झाला, सनई जाऊन बँड आले, बँडच्या तालावर नाचणे आले, भटजींएवजीं मंगलाष्टके म्हणणारे स्वयंघोषित गायक आप्तेष्ट आले, कपड्यांमधे फिटिंग आली. सरकारी नोकरीचे कौतुक कमी होऊन मूल आता एमआर, इंजीनियर, प्रोफेसर, डॉक्टर असे उद्योग करायला लागले.

कॅटरिंग लग्ने या टप्प्यात लग्नकार्यात कॅटरर आणि फोटोग्राफर या दोन व्यक्तींचा प्रवेश झाला. लग्नाचा कारभार मावशीकडून कॅटररकडे गेला त्यामुळे आत्याची पोटदुखी थोडी कमी झाली. बाकी आत्याचे पोट इतर कारणांनी दुखत असेलच. लग्नात आत्याचे पोट दुखले नाही तर लग्नाच्या वैधतेवर शंका निर्माण व्हायची. चार खांब ठोकून त्यावर लाल-पिवळे पट्टे असणारे कापड टाकून तयार होणारा मांडव जाऊन डेकोरेशन आले, लायटिंग आली. लग्नाला जाताना आपण वैष्णोदेवीचा देखावा बघण्यासाठी कुण्या गुहेत शिरतोय असे वाटत होते. घरघर आवाज करणारे पंखे गुलाबपाण्याचा शिडकावा करायला लागले. आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या हाताला अत्तर लागले. अत्तराचा सुगंध यायचा बरे, फक्त पाणी नव्हते. लहान मुले दोनतीन वेळा बाहेर जाऊन अत्तर लावून येत होते. चार ठप्पे मारून मेहंदी काढणे बंद होऊन तासन तास मेंहदी काढणाऱ्या पोरी आल्या.

या टप्प्यात लग्नात व्हिडिओ शूटिंग नावाचा एक भयंकर तापदायक प्रकार सुरू झाला. व्हिडिओ शूटिंग म्हणजे लग्न नको पण शूटिंग आवर असे प्रकरण आहे. आधीच उन्हाळ्यात भयंकर उकडत असते, होमाच्या धुराने नवरा-बायको दोघेही पिडलेले असतात. अशात त्यांच्या तोंडावर पडतो हॅलोजन दिव्याचा कातडी भाजून टाकणारा प्रकाश आणि फोटोग्राफर सांगतो हसा. कसे हसणार? सकाळपासून विधीला बसून कंबरडे मोडलेले असते, पोटात कावळ्यांची कावकाव चाललेली असते. अशात बायकांच्या घोळक्यातून फोटोग्राफर सांगतो - इकडे बघा. नक्की कुठे बघू? बायकांकडे की तुझ्याकडे? शंभर बायकांच्या घोळक्यात पुलंच्या नारायणनंतर बिनधास्त शिरू शकणारी दुसरी व्यक्ती कुणी असेल तर ती आहे फोटोग्राफर. हे फोटोग्राफर एवढी मेहनत करून फोटो कुणाचे काढतात, तर माझ्यासारख्या ठोकळ्यांचे. Commitment to Professionचे याहून उत्तम उदाहरण सापडणार नाही. माझा चेहरा म्हणजे तुषार कपूरलाही लाज वाटेल इतका मख्ख, एखाद्या काळ्या ओबडधोबड भिंतीसमोर उभे करून जर फोटो काढला ना, तर फेस रेकग्निशन सॉफ्टवेअरचा गोंधळ उडालाच म्हणून समजा. कितीही डीप लर्निंग करा, कळणार नाही कोणता चेहरा आहे आणि कोणती भिंत. माझ्या लग्नाच्या व्हिडिओत मी चिडलोय, रागावलोय, आनंदलोय, त्रासलोय की संभ्रमात पडलोय यापैकी कुठलीही भावना माझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. याला म्हणतात ठोकळा अभिनय. बऱ्याच चित्रपटात अशा ठोकळ्या अभिनेत्यांची गरज असते, तेव्हा ज्यांना ठोकळा अभिनयसुद्धा धड करता येत नाही, अशा नटांना घेण्यापेक्षा कास्टिंग डायरेक्टरने लग्नाचे व्हिडिओ शूट बघून माझ्यासारखे ठोकळे निवडावे. लग्नात घास खाऊ घालतानाच्या फोटोत बायकोने असा चेहरा केला आहे की जणू काही मी तिला एरंडेलात कारले बुडवून खाऊ घालत होतो. माझ्या लग्नाच्या फोटोत दिसते सुबक ठेंगणी प्रकारातली एका हाडाची मुलगी आणि तिच्या बाजूला आयटी कंपनीत फुकट मिळणारे जेवण खाऊन सुटलेला काळा भोपळा. असे फोटो बघून काय डोंबलाच्या स्मृती जाग्या होणार आहेत!

कॅटरिंग लग्ने टप्प्यात जेवणात क्रांती झाली. खाद्यपदार्थांचे खऱ्या अर्थाने Democratization झाले. आता नागपुरातील काकू चंद्रपुरातील लग्नाला नाव ठेवू शकत नव्हती, कारण चंद्रपूरचा कॅटररसुद्धा तेच बनवीत होता. साऱ्या भारतातील लग्नात जवळजवळ सारखेच पदार्थ मिळत होते. मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला तिरुपतीला गेलो होतो, त्या लग्नात दोन दिवसांत इतका भात खाल्ला की पुढे महिनाभर भात खायची इच्छा झाली नव्हती. आज तसे होणार नाही. या टप्प्यात पंगती गेल्या आणि बूफे आला. खाणाऱ्याकडे आता निवडस्वातंत्र्य आले. वाटेल तेव्हा वाटेल ते खा. ‘मसालेभात आणा’ असे म्हणून कुणी ओरडतो का, याची वाट बघायची गरज उरली नाही. स्टीलची ताटे गेली आणि प्लास्टिकच्या प्लेटी आल्या. पदार्थांची तर रांग लागली. गुलाब जाम, काला जाम, रव्याचा शिरा, मुगाचा शिरा, दुधीचा शिरा.. तुम्ही म्हणाल त्या रंगाचा जामुन आणि म्हणाल त्या पदार्थाचा शिरा मिळायला लागला. रसगुल्ल्याचा रस्सा बेधडक ढोकळ्यात शिरायला लागला, गुजरात आणि बंगाल यांची अशी घट्ट मैत्री निदान जेवणाच्या ताटात तरी दिसायला लागली. मुंबईचा वडापाव, दक्षिणेतला दोसा, विदर्भातला गोळा भात यांच्या बाजूला रशियातली सॅलाड, इटलीतला पिझ्झा आणि चीनचे नूडल्स दिसायला लागले. या साऱ्यावर अफगाणची नान थाटात लोळत असतात. जगातील विविध देशांना एकाच टेबलावर आणायचे महान कार्य या बूफेने केले. मधल्या काळात उगाच हिणवले गेलेल्या पिठलंभाकरी, पाणीपुरी, पान या पदार्थांना सन्मानाची वागणूक मिळायला लागली.

लग्नातल्या चर्चा बदलल्या.
“काय करतो मुलगा?”
“आयटीत आहे पुण्याला, वीस लाखाचं पॅकेज आहे म्हणे.”
“कोळसे गुरुजी जास्तच सांगतात, पंधरा लाख असेल.” अशात कोणी जरा ज्ञानी असेल तर तो विचारणार.
“पॅकेज असेल हो. हातात किती पडतात?” आंब्याच्या झाडाला सफरचंदाचे फळ लागल्यासारखे काका त्याच्या थोबाडाकडे बघणार. कंपन्यांनी जॉब मार्केटमध्ये आणि लग्नाळू मुलांनी लग्नाच्या मार्केटमध्ये पॅकेजच्या नावाने जो फुगा फुगवलाय, त्यात नक्की हवा किती हे पॅकेज ऑफर करणाऱ्या एचआरलासुद्धा माहीत नसते, तर ते काका काय सांगणार! अहेराच्या पद्धती बदलल्या. साड्या गेल्या, वस्तू आल्या. रुसवेफुगवे असले, तरी त्याचे भर मांडवात जाहीर प्रदर्शन होत नाही. कॅटरिंग लग्न टप्प्यात लग्ने देशव्यापी झाली. आता गडचिरोलीतली मुलगी आणि तळकोकणातला मुलगा अशी लग्ने व्हायला लागले. त्यामुळे लग्नानिमित्ताने होणाऱ्या प्रवासाच्या कक्षा रुंदावल्या. माझा एक मित्र विजयवाड्यावरून थेट लुधियानाला वरात घेऊन गेला होता. एकदा पुण्यातल्या लग्नासाठी ट्रेनने वरातीत जात होतो. बोगीमध्ये सारे वरातीच होते. सकाळी मनमाड येताच दर मिनिटांना चहा-कॉफी विकणाऱे येत होते. त्यांच्या आवाजानेच मला जाग आली. एका काकांनी मला विचारले,
“का रे, चहाची काय सोय आहे? सारे मघापासून चहाची वाट बघत आहे?” मिनिटामिनिटाला चहा विकणारे येत असताना हे काकालोक चहाची वाट का बघत आहेत, हे काही क्षण डोक्यात आले नाही. मग ट्यूब पेटली - ट्रेन झाली म्हणून काय झाले, वरातीत आलेला वऱ्हाडी यजमानाने खाऊ घातल्याशिवाय पाण्याच्या थेंबालासुद्धा शिवत नाही, हा वरातधर्म आहे. लांबच्या प्रवासाची वरात मॅनेज करणे हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

हम आपके है कोण या चित्रपटात लग्नाने मुख्य कलाकाराची भूमिका बजावली. असे असले, तरी लग्नाला अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्डचा दर्जा मिळवून द्यायचे महान कार्य केले ते करण जोहर यांनी. म्हणूनच अशा प्रकारे होणाऱ्या लग्नांना मी 'करण जोहर जलसा लग्न' म्हणतो. अशा लग्नात हे लग्न आहे की अ‍ॅवॉर्ड सोहळा हे कळत नाही. लग्न हा इव्हेंट नाही असे मानणऱ्या समाजात लग्नाच्या प्रत्येक विधीचा इव्हेंट करायचे काम या माणसाने केले. अशा लग्नात मुलीच्या सँडलपासून ते मुलाच्या पायजामाच्या नाडीपर्यंत प्रत्येक गोष्ट डिझायनर असते. इतकेच नाही, तर लग्नाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने निदान ‘मान्यवर’चे कपडे घालणे अपेक्षित असते. मी अशाच एका लग्नात जीन्स-टीशर्ट घालून पोहोचलो. तिथे ज्यूसचे ग्लास घेऊन फिरणाऱ्या वेटरचे कपडे माझ्यापेक्षा योग्य होते. सारे माझ्याकडे ही व्यक्ती इलेक्ट्रिशियन आहे की प्लंबर म्हणून बघत होते. मला जेव्हा त्या लग्नाला योग्य अशा कपड्यातल्या माझ्या मित्रांचा घोळका दिसला, तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. अशा लग्नाची पत्रिका ही सात दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेच्या पत्रिकेसारखी चार-पाच पानांची असते. आता तर डिजिटल व्हिडिओच्या स्वरूपातसुद्धा पत्रिका येत आहेत. त्यातही काही दिवसांनी थीम येतील - उदा., बाहुबली थीम.. मग मुलगी देवसेनसारखी तलवार फिरवत सांगणार "आमच्या लग्नाला या." तर मुलाचा मामा बाहुबलीला तलवार भोसकत सांगणार, "लग्नाला या."

ही लग्ने साधरणतः तीन ते चार दिवस चालतात. हळद, संगीत, लग्न, रिसेप्शन असे न ऐकलेले विधी असतात. पूर्वी लग्न म्हटले की घरातील स्त्रीवर्ग महिनाभर आधीपासून पापड, लोणचे अशा तयारीला लागायचा. आता महिनाभर आधीपासून संगीत कार्यक्रमासाठी नाचाच्या क्लासला जातात. प्रत्येकीला साईपल्लवीसारखे नाचायचे असते. असे करताना कायमचे कंबरडे न मोडले म्हणजे निभावले. लग्नात पोट दिसू नये म्हणून मुलाचा बाप धावायला सुरुवात करतो. ब्युटी पार्लरवाली बाई महिनाभर आधीपासून लग्नघऱीच दुकान टाकून बसते. अशा लग्नात हमखास असणारा प्रकार म्हणजे प्रीवेडिंग फोटो शूट. कुणी पतलू पायजामा छाप त्याच्या जाड्याभरड्या बायकोला तिच्याच वजनाच्या घागऱ्यासहित उचलून एखाद्या तलावाशेजारी फोटो काढीत असतो. अरे बाबा, सांभाळून.. पडशील. कधी कुणी मुलगी तिच्या पन्नास मीटर लांबीच्या ओढणीने मंदिर साफ करीत मंदिरात प्रवेश करीत असते.

जसे उत्क्रांती होऊनही काही गोष्टी अजिबात बदललेल्या नाहीत, तसे लग्नाच्या बाबतीतसुद्धा घडले आहे. काही गोष्टी अजिबात बदलल्या नाहीत. आजही कुणी भटजींच्या मंत्राचा अर्थ जाणून घेत नाही. आजही उखाणा घेतल्याशिवाय मराठी लग्न पूर्ण होत नाही. ट ला ट जोडणे वगळता त्या उखाण्याला फारसा अर्थ आजही नसतो. कुणी कवी झाला म्हणून तो उखाण्याचे काव्य करीत नाही किंवा कुणी गायिका आहे म्हणून काळी दोन लावून उखाणा म्हणत नाही. कितीही श्रीमंत घरातील लग्न असू द्या, लग्न हे पाटावरच लागते. लग्नाच्या वेळेला नवरा-बायको क्रेनवर उभे राहत नाहीत. लग्न आहे म्हणून आधीच हवेत असणाऱ्या नवरा-बायकोला त्यांच्या मित्रांनी कितीही वर उचलले, तरी नवरा-बायको हातानेच हार टाकतात, त्यासाठी ड्रोनचा सहारा घेत नाही. आजही खऱ्या फुलांचेच हार टाकले जातात. उगाच लग्न टिकावे म्हणून कुणी प्लास्टिकच्या फुलांचे हार वापरत नाहीत. अजूनही सप्तपदीच घातली जाते. आमचा मुलगा अमेरीकेत आहे म्हणून कुणी दोन फेरे जास्त घालत नाहीत. लग्नात अक्षताच टाकल्या जातात, त्यात सोने मिसळत नाही. इतकेच काय, कितीही थाटात लग्न लागू द्या, त्या लग्नात कुणीतरी रुसलेले असतेच. मोठ्या लोकांच्या गोष्टी बाहेर येत नाहीत म्हणून, नाहीतर अंबानींच्या लग्नातसुद्धा कुणीतरी रुसलेले असेल. आजही लग्नात मुलाचा कुणी दूरचा नातेवाईक मुलीच्या दूरच्या नातेवाइकाशी उगाच वाद घालत असतो.

लग्ने बदलली, पुढेही बदलत राहतील, हे बदल योग्य की अयोग्य हे सांगणे कठीण आहे. एक मात्र खरे - बदलणारी लग्ने हे बदलणाऱ्या समाजाचे थोडक्यात दर्शन घडवणाऱ्या स्लाइड शोसारखे आहे. स्वातंत्र्य मिळाले तरी भारतीयांच्या आर्थिक स्थितीत बरीच वर्षे फारसा फरक पडला नव्हता, हे लग्नातून दिसत होते. एकत्र कुटुंब जाऊन विभक्त कुटुंबे आली, त्याचेही प्रतिबिंब लग्नात दिसू लागले. मुलाची नोकरी, नंतर मुलीची नोकरी या साऱ्या गोष्टी बदलणाऱ्या समाजाच्या प्रतीक होत्या. आर्थिक सुधारणा झाल्यानंतर भारतात आर्थिक सुबत्ता आली, गंगाजळी आली तसे लगनात दिसले. जागतिकीकरणानंतर प्रत्येक बाबतीत पर्याय उपलब्ध झाले, ते लग्नात दिसायला लागले. पर्याय, निवडस्वातंत्र्य हा माझा हक्क आहे हा विचार दृढ होत गेला. पूर्वीच्च्य चित्रपटात, लग्न लागले की चित्रपट संपायचे, आता चित्रपटातून लग्नाचे भव्य सोहळे दिसायला लागले. समाजाचा एक घटक - मग तो शहरात असो की गावात, या सुधारणांच्या फायद्यांपासून वंचित राहिला, हे त्यांच्या लग्नाला गेले की प्रकर्षाने जाणवते. Have आणि Have not यांमधला फरक लग्नात गेले की ठळकपणे जाणवतो.

लग्न हा आजही भारतीयांच्या आयुष्यातील महत्त्वाचा सोहळा आहे. माहित असते मुलगी स्वतंत्र आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, कितीही दूर असली तरी अगदी वीस तासांत परत येऊ शकते.. तरी आजही मुलीला निरोप देताना बापाचे हृदय तसेच पिळवटून निघते. लपवायचा खूप प्रयत्न करुनही बाहेर आलेली आसवे आजही तितकीच खऱी असतात. या अशा काही गोष्टी कधीच बदलणाऱ्या नाहीत. कितीही उत्क्रांती झाली, तरी अशा गोष्टी कधीच बदलू नये असे वाटते.

~मित्रहो
http://mitraho.wordpress.com/

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

2 Nov 2021 - 5:32 pm | सोत्रि

मोठ्या लोकांच्या गोष्टी बाहेर येत नाहीत म्हणून, नाहीतर अंबानींच्या लग्नातसुद्धा कुणीतरी रुसलेले असेल

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ....

- (शादी का लड्डू खाऊन झालेला) सोकाजी

पाषाणभेद's picture

2 Nov 2021 - 5:51 pm | पाषाणभेद

लग्नपुराण चांगलेच मानवलेले आहे.

कुमार१'s picture

2 Nov 2021 - 5:57 pm | कुमार१

लग्नपुराण छान !

मित्रहो's picture

2 Nov 2021 - 8:04 pm | मित्रहो

धन्यवाद सोकाजी, पाषाणभेद, कुमार१
सोकाजी तुम्ही बऱ्याचदा पहिला नंबर लावता. छान वाटले तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचून.

सौंदाळा's picture

2 Nov 2021 - 9:04 pm | सौंदाळा

उत्तम लेख
वरील सगळ्या प्रकारच्या लग्नात हजेरी लाऊन झाली आहे मात्र अजुन डेस्टिनेशन वेडींगसाठी कधी गेलो नाही. नाही तेवढेच आपले फुकटात कुठल्यातरी डेस्टीनेशनवर अरबट चरबट खाऊन लोळत पडायची सोय.
संगीत हा प्रकार सुद्धा आता बर्‍याच मराठी लग्नात डोकवायला लागला आहे. इव्हेंट मॅनेजमेंट टीमला काम देणे, चित्रपटाचे शुटींग चालु असल्या सारख्या छत्र्या, वधूला मेण्यातुन आणणे, विधीसुध्दा स्टेजवर न करता हॉल मधे मध्यभागी चौकोनी मांडव घालुन चारही बाजूने खुर्च्या लावणे (जसे काही एखादी बॉक्सिंग मॅचच होणार आहे) अशा अनेक गोष्टी होत आहेत.

मित्रहो's picture

3 Nov 2021 - 9:26 am | मित्रहो

धन्यवाद सौदाळा. मी सुद्धा कधी डेस्टीनेशन वेडींगला गेलो नाही त्यामुळे ते लिहायचे राहून गेले असेल. तरी मला ते लग्न करण जोहर जलसा प्रकारतलेच वाटतात. फक्त लग्न वेगळ्या ठिकाणी लागते. बाकी सारा थाटबाट सारखाच.
एकदा मैत्रीणीच्या लग्नाला तिरुपतीला गेलो होतो ते वेगळे डेस्टिनेशन वेडींग होते. मुलगा, मुलगी दोघेही मुंबईतलेच होते पण लग्न मात्र तिरुपतीला होते. त्यातही मुलगी कानडी आणि मुलगा तेलुगु. आदल्या दिवशी दोन्ही कडच्या मंडळींनी मिळून चार तास चर्चा केली की दोन्ही कडच्या पद्धती वापरुन विधी कसा करायचा. त्याला काय लागणार आहे. जेणेकरुन सर्व तयार असतील. त्या लग्नात सकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा वाजेर्यंत तुम्ही जेवणाच्या हॉलमधे गेला की काहीतरी खायला मिळत होते. पूर्ण वेळ केळाची पानं ठेवलेली आणि किचन सुरु.

छान लिहिले आहे

टर्मीनेटर's picture

4 Nov 2021 - 10:48 am | टर्मीनेटर

लेख मस्त जमुन आला आला आहे 👍
लग्नसमारंभातले स्थित्यंतर छान टिपले आहे.

मदनबाण's picture

4 Nov 2021 - 11:21 am | मदनबाण

अतिशय सुरेख लेख ! लग्नात दोन्ही पक्षात लग्नाच्या जुळवा जुळवीचा जुगाड करणारी मंडळी असतात... यात थोड्या वयस्क स्त्रिया आणि वृद्ध पुरुष विशेष आवडीने भाग घेतात. [ यामुळेच काहींची पुढे लग्न देखील जुळतात. ] लग्नात धावणारी लहानमुले कधी कधी लयं डोक्यात जातात... उसेन बोल्ट चा अंगात संचार झाल्या सारखी ते कसेही कुठेही धावत असतात... अधुन मधुन अश्या कार्ट्यांना आया त्यांचा पदर खोचुन मस्त पैकी धपाटा घालताना कधी कधी दिसतात. स्त्रियांना डेटा ट्रान्सफर मध्ये [ याला गप्पा मारणं म्हणण फार चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. ] व्यत्यय आलेला चालत नाही, अश्या वेळी मग स्वतःचा मुलगा असो वा नवरा सगळ्यां समोर वस्सकन बोलणे त्यांना आवरत नाही. इतका मोठा डेटा ट्रान्सफरचा कुंभ लागलेला असतो त्यात मुलगा आणि नवरा यांचा व्यत्यय त्या अजिबात खपवुन घेत नाहीत.
हल्ली परदेशातील नातेवाईक देखील लग्नाला हजेरी लावतात, अश्याच एका लग्नात एका स्त्री दुसर्‍या स्त्रीला बघ गं दुबई आली असं काहीसं म्हणाली ! असं हे ऐकुन माझ्या तोंडातल्या ऑरेज ज्युसचा फवारा समोरच्या व्यक्तीवर उडणार नाही यासाठी मला काय कष्ट पडले असतील हे केवळ एक तपस्वीच जाणु शकेल ! :))) हल्ली हे ज्युस आणि स्टाटर्सचं लईच फॅड आल आहे, या स्टाटर्सच्या दर्जा वरुन लग्नात साधारण किती खर्च केला गेला आहे याचा ठोबळ अंदाज तुम्ही सहज लावु शकता.एका लग्नात तर मी छत्रपती शिबाजी महाराजांच्यावर आधारीत मिनी नाट्य देखील पाहिलं होत... क्षणभर मी लग्नाला आलो आहे कि नाटकाला याची टोटलंच मला लागत नव्हती.

असो... हल्ली लग्नात गाण्यावर एंट्री घेण्याची नविन प्रघात पडलेला आहे. माझ्या नजरेस पडलेली आणि त्यात वापरलेल्या गाण्यामुळेच अधिक आवडलेली अशीच एक एंट्री देऊन ठेवतो. [ @ चौको :- दक्षिणेतील फळफळावळ धागा काढा म्हणाला होतात ना ? धागा नसला तरी दक्षिणेतील फळं कशी भरीव असतात ते बघा ! :))) ]

मदनबाण.....

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2021 - 10:33 am | प्राची अश्विनी

:):)

चौथा कोनाडा's picture

17 Nov 2021 - 7:58 pm | चौथा कोनाडा

[ @ चौको :- दक्षिणेतील फळफळावळ धागा काढा म्हणाला होतात ना ? धागा नसला तरी दक्षिणेतील फळं कशी भरीव असतात ते बघा ! :))) ]

दक्षिणेतील भरीव फळं ..
😜
लई भारी ..

मित्रहो's picture

5 Nov 2021 - 10:13 am | मित्रहो

सर्वांचे सुंदर प्रितक्रियांसाठी मनापासून धन्यवाद
@मुवि हो ४० - ५० वर्षात मी पाहिलेली लग्ने हे नावसुद्धा लेखाला चालले असते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@टर्मीनेटर लेखाला आणि एकंदरीत दिवाळी अंकाला सुंदर सजविल्याबद्दल धन्यवाद. स्मरणरंजन न करता लग्नांकडे बघण्याचा प्रयत्न केला.
@मदनबाण डेटा ट्रांसफरचा कुंभ खिखिखि.... मला माझ्या एका लेखातले वाक्य आठवले. ही इकडली माहीती तिकडे करण्याच्या अंगभूत गुणकौशल्यामुळे पूर्वीच्या काळी टेलीकॉम ऑपरेटर म्हणून स्त्रीयांना घेत असावे. आताही त्या नेटवर्क मधे राउटरएवजी स्त्रीवर्गालाच उभे करायला हवे म्हणजे डाटा रेट दहा पटीने वाढेल. दुबई आली गं मस्त किस्सा. तो दक्षिणेतील लग्नाचा विडियो मस्त. मी शेजाऱ्याकडल्या लग्नाला गेलो होतो. तिथेही एंट्रीला असेच संगीत वाजविण्याचा प्रकार होता. फक्त नाच अगदी थोडा होता. डोक्यावर कासचे पठाराला लाजवील असा फुलांचा मळा, कोणत्याही अँगलने अजिबात नैसर्गिक वाटणार नाही असा तो लांब शेपटा, कितीतरी सोनाऱ्याच्या दुकानापेक्षा जास्त सोने तिच्या अंगावर होते. बाजूला राहते ती हिच मुलगी का असा संशय आला. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Nov 2021 - 10:48 am | ॲबसेंट माइंडेड ...

लेख आवडला. मजा आली वाचताना.

मित्रहो's picture

7 Nov 2021 - 12:17 pm | मित्रहो

धन्यवाद ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

तुषार काळभोर's picture

7 Nov 2021 - 7:09 pm | तुषार काळभोर

बदलत्या परंपरांचा मस्त आढावा घेतला आहे.
१९९१ नंतर भारतात जे आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण, आयटीकरण झालं त्याने लग्नातील बदल अधिक वेगवान झाले, हे नक्की.
शाळेतील लग्नात आमटी- भात, बुंदी, वांगे बटाट्याची सुकी भाजी असं जेवण शेवटचं २००६ मध्ये पाहिलं.
मागच्या रविवारी एका लग्नात जेवणात मोजण्याच्या पलीकडे खाद्य प्रकार होते. दोन ड्रोन पक्ष्यांच्या दृष्टीने समारंभ टिपत होते. नवरी हॉल मधून गेटपर्यंत गेली. तिथून नवरानवरी बॅटरी चलित रथावरून स्टेजकडे निघाले, तर डोक्याला फेटे (फेट्यांवर LED लाईटची सजावट!) असलेल्या आठ मूली नवराई माझी, आताच बया का बावरलं, अशा गाण्यावर नाचत होत्या.
माझा मेहुणा मला म्हणाला, लोकांकडे उडवायला एवढा पैसा येतो कुठून!

शेवट आवडला. काही गोष्टी बदलत नाहीत, हे खरेच! आणि त्या बदलूही नयेत..

जुइ's picture

8 Nov 2021 - 3:52 am | जुइ

लेख अगदी फर्मास झाला. भारतात आता लग्नाला उपस्थित राहून १० वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे फक्त घरातील मंडळींकडून बदल्या चालिरीतंंबद्द्ल समजत राहते. आता प्रत्यक्ष अनुभव कधी मिळतो त्याच्या प्रतीक्षेत.

फारएन्ड's picture

8 Nov 2021 - 4:28 am | फारएन्ड

मजा आली.

मित्रहो's picture

8 Nov 2021 - 10:06 am | मित्रहो

धन्यवाद तुषार काळभोर, जुइ, फारएन्ड
@तुषार काळभोर हो आर्थिक उदारीकरणानंतर लग्नात खूप बदल झाले. हल्ली खरच जेवणात पदार्थ मोजण्यपलीकडले असतात. पूर्वी संपूर्ण जेवणात जेवढे पदार्थ होते तेवढे आता फक्त स्वीट डिश असतात.
@जुइ आता तुम्ही ते मेण्यातून प्रवेश, गाण्याच्या तालावर नाचने या प्रकारातलेच लग्न अटेंड करा. म्हणजे खूप मोठा फरक जाणवेल.

मित्रहो's picture

8 Nov 2021 - 11:41 am | मित्रहो

@तुषार काळभोर अकं खूप छान झाले. संपादक म्हणून तुमचा अभिमान वाटावा असे सुंदर काम केले आहे. अभिनंदन

डेस्टीनेशन वेडींग ची पध्दत काही नवी नाही. पुण्याला आळंदी येथे गेली अनेक वर्षे अशी लग्ने होतात.

लेख अतिशय आवडला.

पैजारबुवा,

मित्रहो's picture

9 Nov 2021 - 10:38 am | मित्रहो

धन्यवाद पैंजारबुवा
डेस्टीनेशन वेडींग पूर्वी व्हायचे मग ते तिरुपती मधे असो किंवा शेगावला असो किंवा आळंदीला . देवस्थानात व्हायचे. तिरुपतीमधे देवीचे मंदीर खास अशा लग्नांसाठी प्रसिद्ध आहे. हल्लीचे डेस्टिनेशन वेडींग थोडे वेगळे आहे. कुठेतरी दूर रिसोर्टमधे, कमी नातेवाईक, फाइव्ह स्टार ट्रिटमेंट.

कंजूस's picture

9 Nov 2021 - 10:49 am | कंजूस

मजेदार.

अनिंद्य's picture

9 Nov 2021 - 11:24 am | अनिंद्य

@मित्रहो,

काय निरीक्षण काय निरीक्षण ! मानलं तुम्हाला :-) तीन पिढ्यांचा लग्नपट उत्तम उलगडला आहे.

मला लग्न समारंभ फार म्हणजे फारच बोर होतात, कुठे का असेनात. आता गेल्या दीड दोन वर्षात बदललेल्या परिस्थितीमुळे थोडी आटोपशीर आणि कमी पाहुणे बोलावून लग्ने होत आहेत, तो एक वेलकम चेंज . पण फार टिकायचा नाही हा ट्रेंड, लोकं परत मोठ्ठया भव्य लग्नसोहळ्यांकडेच परतणार - तुमच्या भाषेत 'करण जोहर जलसा लग्न' :-)

लेखन आवडलेच !

मित्रहो's picture

9 Nov 2021 - 2:50 pm | मित्रहो

धन्यवाद कंजूस आणि अनिंद्य
मला लहान असताना लग्नाचा प्रवास बोर व्हायचा. कारण लग्ने एकतर चंद्रपूर नाहीतर नागूपरला किंवा त्याच रोडवरील गावाला व्हायची म्हणजे पॅसेंजर आली. खूप तापदायक प्रकरण होतं ते. नंतर एका वयात लग्नाला जायचे कारण बदलले तेंव्हा जाण्यात तरी उत्साह असायचा. तिथे गेल्यावर बऱ्याचदा निराशाच पदरी पडत होती . आता मला लग्नापेक्षा लग्नात द्यायचया गिफ्टने अंगावर काटा येतो. या लग्नात कितीने कटणार?

बबन ताम्बे's picture

9 Nov 2021 - 3:20 pm | बबन ताम्बे

मस्त आणि खुसखुशीत लेख. छान स्थित्यंतरे टिपली आहेत.हल्लीच्या सोहळ्यांना करण जोहर जलसा लग्न ही उपमा चपखल आहे. आवडली.
मी लहानपणी खेड्यातली लग्ने पाहिली आहेत. तिथे सुद्धा आता पैसा आल्यामुळे लग्न सोहळे पूर्ण बदलले आहेत. पूर्वी दारात मांडव असायचा. भाऊबंद बैलगाड्यांना आंब्याचे डहाळे खोचून ढोल ताशा, पिपाणीच्या साथीने मिरवणुकीने येत आणि ते डहाळे मांडवावर टाकून तो मांडव सजवत. खूप तालेवार वधुपिता असेल तर या मांडवाच्या पुढे आख्ख्या रस्त्यावर सुशोभित, लायटिंग केलेला मंडप असायचा. आतां कार्यालये झालीत. बुंदी, शाकभाजी, वरण भात जाऊन पनीर, तवा भाजी, रोटी, पुलाव, गुलाबजाम असे मेनू खेडेगावी पण दिसू लागलेत.
पूर्वी गाडग्यात , त्यांनतर प्लॅस्टिकच्या ग्लासात पाणी देत. आता छोट्या बिस्लरीच्या बाटल्या तिकडे पण वाटतात.
काळ प्रचंड वेगाने बदलला हे खरं !

मित्रहो's picture

9 Nov 2021 - 4:50 pm | मित्रहो

धन्यवाद बबन ताम्बे
आमच्या गावात फक्त ३० घरे होती आणि शंभर माणसांची वस्ती. गटग्रामपंचायत मिळून सुद्धा १२० घरे होती. उन्हाळ्यात गावी गेलो की लग्नाचे आमंत्रण आले की लग्नाच्या ठिकाणी आपला ग्लास घेऊन जेवायला जावे लागायचे. कारण इतक्या ग्लासची सोय होऊ शकत नव्हती. आज गावातली लग्ने कशी होतात माहित नाही पण प्लास्टीकचे ग्लास तरी नक्की आले असतील.

चौथा कोनाडा's picture

9 Nov 2021 - 5:03 pm | चौथा कोनाडा

जब्री लिहिलंय लग्नपुराण !
एकेक किस्से आठवले, धमाल गंमतीजंमती आठवल्या.
माझी स्वत:च्या लग्नातली "बुट" फजीती आठवली !
😀
या सोहळ्यांच्या बदलाचा घेतलेला आढावा सुंदर आहे !

मित्रहो, लेखन बेहद्द आवडले !
💖

अभिजीत अवलिया's picture

9 Nov 2021 - 9:42 pm | अभिजीत अवलिया

छान लेख. डेस्टिनेशन वेडिंग सोडून अन्य सर्व प्रकारची लग्ने पाहिलीत.
गेल्या १०-१५ वर्षात आलेला अजून एक विधी म्हणजे लग्न लागायच्या थोडा वेळ आधी होणारा ‘लग्नाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन होणारा सत्कार’. अतिशय डोक्यात जाणारा प्रकार.
लग्नाची कॅसेट हा तर महाभयानक प्रकार आहे. लहानपणी आमच्या शेजार्यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या लग्नाची ६ तासाची कॅसेट पूर्ण बघायला लाऊन केलेले अत्याचार अजूनही इतके ताजे आहेत की माझ्या स्वत:च्या जवळपास ११ वर्षापूर्वी झालेल्या लग्नाची २ तासांची सीडी अजूनपर्यंत एकदाही पाहिलेली नाही.

असेच उत्तम लिखाण येत राहो.

मित्रहो's picture

10 Nov 2021 - 10:06 am | मित्रहो

धन्यवाद चौथा कोनाडा आणि अभिजीत अवलिया
@ चौथा कोनाडा कधी तुमच्या बुट फजितीबद्दल लिहा
@ अभिजीत अवलिया लग्नात शाल श्रीफळ देऊन सत्कार करताना बघण्याचा योग अजून आला नाही. फार विचित्र प्रकार वाटत आहे. मी सुद्धा माझ्या लग्नाची सीडी सलग बघितली नाही. भयंकर कंटाळवाणं प्रकरण आहे. असे असताना त्यात आता ड्रोन लावून शूटींग करतात.

सुप्रिया's picture

10 Nov 2021 - 12:15 pm | सुप्रिया

मस्त लेखाजोगा घेतला आहे लग्नसमारंभाचा. मजा आली वाचताना.

मित्रहो's picture

11 Nov 2021 - 10:40 am | मित्रहो

धन्यवाद सुप्रिया

सुबोध खरे's picture

11 Nov 2021 - 12:13 pm | सुबोध खरे

उत्तम लेख आहे

श्वेता व्यास's picture

11 Nov 2021 - 4:20 pm | श्वेता व्यास

लग्नपुराण आवडले, आपली निरीक्षणशक्ती अचूक आहे.

मित्रहो's picture

11 Nov 2021 - 5:53 pm | मित्रहो

धन्यवाद सुबोध खरे आणि श्वेता व्यास

@श्वेता व्यास निरीक्षण शक्ती वगैरे नाही हो. आता जे आठवलं ते लिहिले

नीलकंठ देशमुख's picture

12 Nov 2021 - 5:35 pm | नीलकंठ देशमुख

छान लिहिलंय.
लग्न एक संस्कार ते लग्न म्हणजे एक इव्हेंट...असा
कालानुरूप झालेल्या बदलांचा अचूक वेध घेतलाय.
'करण जोहरी लग्न.'..याने मात्र मोठा बदल घडवून आणलाय हेनक्की.
तुमचे बालपण नीमशहरी भागात गेले असावे, माझ्यासारखे..
म्हणून कदाचित ,मला का कोण जाणे तुमच्या व माझ्या विचार करण्याचे, व्यक्त होण्याचे प्रक्रियेत साम्य असावे असे वाटले!

मित्रहो's picture

12 Nov 2021 - 7:17 pm | मित्रहो

धन्यवाद नीलकंठ देशमुख प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
हो माझे बालपण निमशहरी भागात गेले आणि खेडेगावाशी नाळ जोडून होती. त्यामुळे विचार तसे झाले असावेत. आपल्या विचार करण्याच्या, व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत साम्य आहे हे वाचून आनंद वाटला. धन्यवाद !

नीलकंठ देशमुख's picture

14 Nov 2021 - 9:58 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. माझे अजून ही खेड्याशी, माझे गाव आडगावाशी, तेथील लोकांशी संबंध आहेत.

सुधीर कांदळकर's picture

13 Nov 2021 - 6:21 am | सुधीर कांदळकर

छान आकर्षक झाला आहे. आवडला. आंब्याच्या झाडाला लागलेली सफरचंदे छानच.

धन्यवाद.

पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा मजेशीर लेख आहे.

पाट किंवा चिवडा-लाडू लग्न, टेबल-खुर्ची किंवा जिलेबी-मठ्ठा लग्न, कॅटरिंग लग्न आणि करण जोहर जलसा लग्न.

लग्न हे एक मंगल कार्य आहे यावर या टप्प्यात शिक्कामोर्तब झाले आणि लग्न मंगल कार्यालयात व्हायला लागले.

अगदी चपखल नावे आणि वर्णन केले आहे. यापैकी पहिली तीन भरपूर बघितलेली आहेत. माझ्या लहानपणापासूनच आईला गुडघ्यांचा त्रास असल्याने तिला टांग्यातून जावे लागायचे, त्यामुळे लग्नाला जायचे म्हणजे टांग्यात बसायची मजा उपभोगायला मिळायची. त्यातून टांगावाला मला त्याच्या शेजारी बसवून घ्यायचा आणि कधीकधी कातडी लगाम पण धरायला द्यायचा. लग्नस्थळी पोचल्यावर पोरांच्या हुडदंगमधे सामील व्ह्यायचे.
पुढे जरा 'कळू' लागल्यावर - जमिनीवर पत्रावळी मांडून मोठमोठ्या पंगती बसायच्या त्या काळात - कोशिंबीर, चटणी किंवा असेच काहीतरी वाढायला येणार्‍या पोरींपैकी कुणी आवडली, की तिला वारंवार बोलवून तो जिन्नस घ्यायचा, हा सगळ्यात आवडता उद्योग. त्यापण लाजत मुरकत, तिरपे कटाक्ष टाकत वाढायच्या त्यावरून त्यांनाही ते आवडत असल्याचे कळायचे. बाकी मावश्या, आत्या, माम्या, काकवा, वहिन्या वगैरे कुणाच्या पानातले काय संपत आलेले आहे यावर बारीक लक्ष ठेऊन ते तत्परतेने वाढायला यायचा. जिलबी-मठ्ठा मला भयंकर आवडायचे, मठ्ठ्याचा द्रोण लगेच संपायचा त्यामुळे पाण्याचा ग्लास रिकामा करून त्यात दर वेळी भरून घ्यायचो. भोपळ्याच्या मोठमोठ्या तुकड्यांची भाजी असायची, तिला 'टेकूची भाजी' म्हणायचे. का, तर तिचा उपयोग फक्त द्रोण कलंडून मठ्ठा, कढी, पातळभाजी वगैरे ओघळून जाऊ नयेत म्हणून टेकण म्हणून लावायला केला जायचा. जेवणापूर्वी चांदीच्या साखळीने कपाळावर गंध का लावत, याविषयी एक तर्क म्हणजे कुणाकुणाची जेवणे झाली आहेत हे कळावे.
पुढे टेबल-खुर्चीवर बसून जेवणे आणि वाढायला येणारे निर्विकार चेहर्‍याचे, दाढीचे खुंट वाढलेले, नीरस चड्ड्याधारी वाढपी - हा प्रकार सुरू झाल्यावर लग्नातली मजाच संपली. (आम्हा इंदौरवाल्यांना लग्नांचा हा नवीन 'पुणेरी' प्रकार अजिबात मानवायचा नाही)
नंतरच्या काळात दिल्लीतली पंजाबी टाईपची लग्ने पण खूप अटेंडिली. विस्तीर्ण जागा, खाण्या-पिण्याचे अनंत प्रकार, झगझगीत कपडे आणि मेकपाळलेल्या लठ्ठ बाया, दाण-दाण मूजिक आणि त्यावर अचकट विचकट नाच ... सगळे नकोसे वाटायचे. या प्रकारचे सगळ्यात घाणेरडे लग्न एका परिचित मराठी कुटुंबातले होते हे विषेश आश्चर्य.
एक गंमतशीर आठवण म्हणजे एका मुस्लिम लग्नात जेवणाचे जनाना आणि मर्दाना असे वेगवेगळे तंबू होते, हे लक्षात न आल्याने बायकोपाठोपाठ मी 'जनाना' मधे शिरलो. काहीतरी वेगळेच वाटले, तरी लक्षात आले नाही. मग एका खातूनने "अरे रोटी खतम हो रही है, जल्दी से लगा" म्हटल्यावर डोक्यात प्रकाश पडून तिथून तात्काळ निघालो.
काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका सिंधी लग्नाला (माझी अजिबात इच्छा नसूनही) जावेच लागले, त्यांनी आम्हा दोघांना दिल्ली-मुंबई जाण्या-येण्याचा विमान प्रवास, चांगल्या हॉटेलाचे बुकिंग, वगैरे सगळे केले होते. लग्नाचा प्रत्येक विधी वेगवेगळ्या ठिकाणी झाला. मला प्री-वेडिंग फोटोशूट म्हणजे काय हे माहिती नव्हते. त्यासाठी प्रत्येकाच्या मापाचे विशिष्ट कपडे आणि आता असे उभे रहा वगैरे सांगायला एक जण, थर्मोकॉलचे कटाऊट होते त्यामागून अमूक दिशेने बघत आश्चर्य, आनंद वगैरे भाव चेहर्‍यावर आणायचे वगैरेत मी पार वैतागलो. नंतरच्या एक कार्यक्रमात म्हातार्‍यांपासून प्रत्येक जोडप्याने खास त्यांच्या साठी कोरियाग्राफलेला डान्स हा प्रकार सुरू झाल्यावर मी तिथून पळ काढून लांब फिरून आलो, आणि नंतरचे सगळे प्रकार चालले असताना मी गायब राहू लागलो. त्यापैकी एकात मी राणीच्या बागेतले 'भाऊ दाजी लाड संग्रहालय' हे सुंदर म्युझियम बघून आलो.

आजही मुलीला निरोप देताना बापाचे हृदय तसेच पिळवटून निघते. लपवायचा खूप प्रयत्न करुनही बाहेर आलेली आसवे आजही तितकीच खऱी असतात.

हा उल्लेख व्याकुळ करून गेला.
असो. या नितांत सुंदर, रमणीय आणि मजेदार-खुसखुशीत धाग्याबद्दल अनेक आभार. या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

मित्रहो's picture

13 Nov 2021 - 6:17 pm | मित्रहो

धन्यवाद सुधीर कांदळकर आणि चित्रगुप्त सर.
@चित्रगुप्त काय सुंदर प्रतिसाद आणि किती सुंदर आठवणी. त्या बसलेल्या पंगती, त्यात शेपटा सावरत कोशींबर वाढणारी कुणी, तिच्याकडे तिरक्या नजरेने बघणारा तो, तिचे ते लाजणे. सारं चित्र डोळयासमोर उभे राहिले. कुणीतरी असे चित्र काढायला हवे. आम्ही मुलीकडे तिरक्या कटाक्षाने बघायच्या वयात यायच्या आधीच नीरस चड्ड्याधारी वाढपी लग्नात वावरायला लागले होते. आमच्या काळात अंगावार मेकअपचे दुकान लावून उगाच नवरा नवरीच्या आजूबाजूला खीखी करत पटकन लुक देणाऱ्याच जास्त होत्या. मुस्लीम लग्नातला किस्सा मस्त होता. ते सिंधी लग्न नसते तर तुम्ही कदाचित भाऊ दाजी लाड संग्रहालय बघितले नसते.
तुमचे किस्से ऐकून किस्से सांगायचा मोह आवरत नाही आहे. एकदा एका मांडवात तीन लग्ने होती. पाट पंगत या प्रकारातले लग्न होते. त्या लग्नात जेवणात काय झुंबड उडाली होती. जेवायची जागा पकडणे म्हणजे संध्याकाळी दादर स्टेशनवरुन ट्रेन पकडण्यासारखाच प्रकार होता. पब्लीक धावताना समोरच्याचे शर्ट धरुन ओढायलाही कमी करीत नव्हते. एका लग्नात मुलाचा भाऊ खूप दारु पिऊन आला. तमाशा सुरु केला. शेवटी नवऱ्या मुलानेच भावाला टोकले, तो त्याच्यावर ओरडला, दोघही एकाच आईचे आणि बाबाचे असले तरी एकमेकाचे बाप काढीत होते. बा-चा-बा-ची झाली, थोडीबहुत मारामारी झाली. तो मुलाचा भाऊ त्या नवऱ्या मुलावरच चाकू घेऊन धावला. लग्नाच्या मांडवातच मुलगी विधवा होते की काय. बाकीचे वऱ्हाडी मग मधे पडले आणि मुलाच्या भावाला बाहेर घेऊन गेले.

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2021 - 10:57 am | प्राची अश्विनी

लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचनीय.

मित्रहो's picture

15 Nov 2021 - 6:11 pm | मित्रहो

धन्यवाद प्राची अश्विनी
सुंदर प्रतिसादांमुळे आणखीन मजा वाढली. एकेक अनुभव मस्त आहेत.

कर्नलतपस्वी's picture

1 Apr 2022 - 7:04 pm | कर्नलतपस्वी

तीन विसा आठ झालेत. लेख वाचताना संपुर्ण आयुष्यात बघितलेला लग्नपट डोळ्या समोर उलगडला.
तालेवारा पासून ते कुळा पर्यंत, शिंदेवाडीतल्या शेतातल्या ढेकळातली ते पंचतारांकित हॉटेल मधली,गंधर्व विवाह ते डेस्टीनेशन,दिवसाची,रात्रीची ,मराठी राजस्थानी,बंगाली सर्व प्रकारची लग्ने बघीतली.
खुपच छान बारकावे टिपले आहेत.
उत्तर भारतात गोरज मुहुर्तावर गाय दान देतात. विदाई पहाटे त्यावेळेस गायीचा हबंरडा आणी नवरीचा,आईबापाचा हुदंका मात्र आजुनही मनात घर करून आहे.
खुप आवडले लेखन आणी लेखनशैली.

चावटमेला's picture

1 Apr 2022 - 8:37 pm | चावटमेला

लेख आवडला. मध्यंतरी त्या बॉलीवूडी प्रभावामुळे नवर्‍या मुलाचे बूट लपवायचा एक प्रचंड डोक्यात जाणारा प्रकार मराठी लग्नांत सुरू झाला होता. मी लहान असताना माझ्या एका आत्येभावाच्या लग्नांत मुलीच्या मैत्रिणिंनी असं काही तरी केलं. भाऊ म्हणजे जमदग्निचा अवतार, थोडा वेळ वातवरण खूप गंभीर झाल्याचं पुसटसं आठवतंय

धन्यवाद कर्नल तपस्वी आणि चावटमेला
@कर्नलतपस्वी परवाच गप्पांमधे एक मैत्रीण सांगत होती की उत्तर भारताीयांची लग्ने रात्री लागतात. मुहुर्त वगैरे फारसे पाळत नाहीत. मुलकडल्यांची वरात ही सर्व विधींपेक्षा अधिक महत्वाची असते. तिच्या लग्नात सुद्धा ते वरातीत नाचने काही केल्या संपत नव्हते. तिला इतका राग आला की तिने सांगितले आता मला या माणसाशी लग्नच करायचे नाही. तरी लव्ह मॅरेज होते. तिच्या आईने, बहिणीने, नातेवाईकांनी मनधरणी केली पण ती ऐकत नव्हती. शेवटी तिच्या वडीलांनी समजावून सांगितले आणि ती आली. मुलाकडल्यांनी मुलीला ताटकळत ठेवले त्याचा तिने असा बदला घेतला होता. मी आजपर्यंत तरी गंधर्व विवाह बघितला नाही.

@चावटमेला हो कधी कधी जोडे लपविण्याचा प्रकार खूप ताणला जातो असे वाटते. त्यातही एक गंमत असते. बऱ्याचदा बूटांच्या बदल्यांत मागितलेली रक्कम बुटांच्या किंमतीेपेक्षाही जास्त असते. हा प्रकार सिनेमातून आला असे वाटत नाही फार पूर्वी पासून बघत आलो आहे.

diggi12's picture

30 Oct 2024 - 1:41 am | diggi12

मस्त लेख