body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
सारथीच्या स्व-मदत गट बैठकीत तंबाखू व्यसनमुक्तीसाठी निश्चय
महात्मा गांधीजींनी देशवासीयांना शांततेच्या संदेशाबरोबरच व्यसनमुक्तीचा संदेशही दिला. समाजातील व्यसन कमी झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. सोलापूर जिल्ह्यात तंबाखू व्यसनमुक्तीसाठी कार्य करीत असलेल्या सारथी यूथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
सोमनाथ (नावात बदल केला आहे) लहान वयातच गावकडून मुंबई शहरामध्ये कामानिमित्त आला. कामावर असलेल्या कामगारांच्या संगतीने त्याने पहिल्यांदाच तंबाखू खाल्ली. कामावर आले की पंढरपूरी तंबाखू खाल्ल्याशिवाय कामात मन रमत नव्हते. साधारण १६ वर्षांचा असताना त्याने तंबाखू खायला सुरुवात केली. कधी गावाकडे आले की पुन्हा मुंबईला जाईपर्यंत पुरतील एवढ्या पंढरपुरी तंबाखूच्या पुड्या आणि चुन्याच्या डब्या तो सोबत आणीत असे. गावाकडे आले की गावच्या मित्रांबरोबर मावा खाल्ला जाई. आता तो ४१ वर्षांचा आहे. लहान वयात लागलेली ही तंबाखूची सवय काही केल्या सुटत नव्हती. हळूहळू सवयीचे प्रमाण वाढतच होते. एकदा आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी सल्लादेखील दिला होता सवय बंद करण्याचा, परंतु हे शक्य होत नव्हते.
मागील वर्षी कोरोना आजाराने जगभर थैमान घातले. लॉकडाउनमुळे सर्व जण घरामध्ये बसून होते. तंबाखूजन्य पदार्थ मिळणे अशक्य झाले. सोमनाथला सारथीच्या कामविषयी माहिती होती. तंबाखू कशी सोडवायची ही माहिती सुरुवातीला त्यांनी हेल्पलाइन समुपदेशकाकडून घेतली. तंबाखू मिळतच नसल्याने पुन्हा व्यसन करण्याची इच्छा झाली, तरी काही पर्याय नव्हता. समुपदेशकाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मनावर ताबा ठेवला, तंबाखू खाण्याची इच्छा झाली, तर घरगुती पर्यायाचा वापर सुरू केला. सोमनाथने सारथीच्या ऑनलाईन TA Meetingमध्ये सहभाग घेतला. मीटिंगमध्ये व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींचे अनुभव ऐकून तंबाखू व्यसनमुक्तीचा ठाम निर्णय घेतला. अस्वस्थ वाटत होते, तंबाखू वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करावी अशी इच्छा निर्माण होत होती, त्यावर त्यांनी कुटुंबीयांच्या आणि सारथीच्या मदतीने तंबाखू व्यसनावर विजय मिळविला. "तंबाखूशिवाय आयुष्य खूप छान वाटत आहे. आता कोणी समोर तंबाखू जरी खाल्ली किवा खा म्हटले, तर तंबाखू खाण्याची इच्छा होत नाही" असे सोमनाथ म्हणतो. सोमनाथसारखे अनेक युवक सध्या सारथीच्या कार्याचा लाभ घेत आहेत.
सारथी यूथ फाउंडेशन ही सामाजिक संस्था २०१०पासून समाजातील युवकांच्या विविध विषयांवर कार्य करीत आहे. मानवी लैंगिकता, एचआयव्ही/एड्स व गुप्तरोग जनजागृतीसाठी प्रेरणा प्रकल्प, तंबाखू व्यसनमुक्ती जनजागृती व संबधित सेवांसाठी व्यसनमुक्ती प्रकल्प, युवकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास, उद्योजकता विकास, उपजीविका शाश्वत विकासाकरिता कौशल्य विकास प्रकल्प असे प्रकल्प राबविले जातात. आपत्कालीन परिस्थितीत मदत, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, वंचितांसोबत दिवाळी, गरजूंसाठी कपडे व धान्यवाटप आदी समाजोपयोगी उपक्रमदेखील राबविले जातात. आजतागायत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून १,८४,०००हून जास्त लाभार्थींना या कार्याचा लाभ मिळाला आहे.
२०१३पासून सारथीमार्फत तंबाखू व्यसनमुक्ती या विषयावर प्रकल्प राबविला जातो. आजतागायत ३०,०००हून अधिक लाभार्थींना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे. शाळा, महाविद्यालय व समुदाय स्तरावरील गणेशोत्सव मंडळ, नवरात्र मंडळ, तरुण मंडळ, बचत गट, संस्था-संघटना, कंपनी कर्मचारी, कारखाने कामगार यांच्यामध्ये मार्गदशन सत्र, पोस्टर प्रदर्शन अशा विविध माध्यमांतून जनजागृती केली जाते. ३१ मे तंबाखू सेवन विरोधी दिन, युवा दिन, व्यसनमुक्ती दिन यानिमित्ताने जिल्हा व राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तंबाखू व्यसनमुक्तिदूत कार्यशाळेच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत समाजामध्ये तंबाखू व्यसनमुक्ती जागृती व प्रसार केला जातो. या जनजागृती कार्यक्रमातून तंबाखू व्यसनाचे दुष्परिणाम सांगून नव्याने व्यसनाकडे वळणार्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
जनजागृती कार्यक्रमाबरोबरच तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट, विडी, मशेरी अथवा हुक्का यासारख्या व्यसनाचा वापर करण्यार्या युवकांना प्रत्यक्ष समुपदेशन, टेलिफोनिक समुपदेशन, मुख तपासणी शिबिर आणि टीए मीटिंग असे उपक्रम राबविले जातात. जनजागृती कार्यक्रमामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारी व्यक्ती सारथीच्या प्रत्यक्ष समुपदेशनाचा लाभ घेऊ शकते. प्रत्यक्ष भेटणे शक्य नसल्यास ७२७६६७७२७७ या हेल्पलाइन क्रमांकावर व्यसनमुक्तीबाबत माहिती जाणून घेता येऊ शकते. समुदायस्तरावर मुख तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते, ज्यामधून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे त्रास होत असलेली व्यक्ती मुख तपासणी करून पुढील उपचार घेऊ शकेल.
टीए मीटिंग म्हणजे तंबाखू व्यसनमुक्ती अनामिक स्व-मदत गट बैठक. २६ फेब्रुवारी २०२० रोजी या टीए मीटिंगला सुरुवात करण्यात आली. यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असणारी व्यक्ती किंवा त्याच्या जवळची व्यक्ती या बैठकीत सहभागी होतात. या बैठकीत व्यसन करणारी व्यक्ती आपले अनुभव कथन करते. तंबाखू व्यसन कसे जडले, त्यापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास याबाबत अनुभव सांगितला जातो. पूर्वी तंबाखूचे व्यसन होते परंतु आता सोडले आहे अशा यशोगाथा सांगितल्या जातात, तर कधी तंबाखू सोडायची आहे परंतु ती सोडताना येणार्या अडचणी सांगितल्या जातात. व्यसन करणारी व्यक्ती व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीचे अनुभव एकूण, प्रभावित होऊन स्वत: तंबाखू व्यसनमुक्त होण्याचा निच्छय करतात. व्यसनमुक्तीच्या प्रवासात आपण एकटे नाही, आपल्यासारखे अनेक जण आहेत. एखाद्याची तंबाखूची सवय सुटू शकेत तर माझी का नाही.. अशी भावना त्यांच्यामध्ये तयार होते.
५ व्यक्तींपासून सुरू झालेली ही बैठक ५१५हून अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचली आहे. आजपर्यंत ४३ बैठका पार पडल्या. कोरोना महामारीच्या काळातदेखील या बैठका चालू होत्या. प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन पद्धतीने या बैठका पार पडल्या. पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद अशा सोलापूरबाहेरच्या जिल्ह्यातील काही व्यक्तींनाही ऑनलाइनमुळे याचा लाभ घेता आला. स्वत: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन केले होते हे स्वीकारलेल्या व्यक्तींपैकी १२ व्यक्तींनी पूर्वी व्यसन केले होते आणि आज पूर्णपणे व्यसन बंद केले आहे, तर ७ व्यक्ती प्रयत्नशील आहेत. व्यसन करतात परंतु व्यसन आहे हे स्वीकारलेले नाही, इतरांसाठी माहिती घेण्यासाठी किंवा विषय समजून घेऊन इतरांना माहिती देण्यासाठीसुद्धा इतर व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
सारथी यूथ फाउंडेशनमार्फत चालणारा हा तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्प वैयक्तिक देणगीदारांच्या मदतीतून राबविला जातो. आपल्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीस तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट, विडी, मशेरी किंवा हुक्का यासारखे व्यसन असल्यास आपण सारथी यूथ फाउंडेशनमार्फत चालणार्या तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पातील उपक्रमांचा मोफत लाभ घेऊ शकता.
सारथी तंबाखू व्यसनमुक्ती हेल्पलाईन - ७२७६६७७२७७
रामचंद्र वाघमारे
सचिव व समुपदेशक
सारथी यूथ फाउंडेशन, सोलापूर
प्रतिक्रिया
2 Nov 2021 - 11:37 pm | ज्ञानोबाचे पैजार
एका वेगळ्या विषयावरचा वृत्तांत आवडला
तुमचे कार्य वंदनिय आहे
पैजारबुवा,
3 Nov 2021 - 1:47 am | पाषाणभेद
+१
पुढील कार्यास शुभेच्छा!
3 Nov 2021 - 8:38 am | राघवेंद्र
चांगला उपक्रम !!!
4 Nov 2021 - 10:41 pm | नीलकंठ देशमुख
महत्वाचे काम आहे.
स्तुत्य उपक्रम.
17 Nov 2021 - 7:59 am | गुल्लू दादा
उपक्रमास शुभेच्छा.