दिवाळी अंक २०२१ : एक वाद्य आणि तीन पिढ्या

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

एक वाद्य आणि तीन पिढ्या

यापूर्वी मैफलीत व्हायोलीन पाहिले होते कुणा प्रथितयश गायकाच्या साथीला. पण ते प्रमुख वादक म्हणून नाही. असामान्य म्हणून श्रीधर पार्सेकरांचे फक्त नाव ऐकून होतो. पण त्यांचे वादन कधी ऐकले नाही. प्रमुख वादक म्हणून व्हायोलीन पाहिले ते व्ही.जी. जोगांच्या हातातले साधेसुधे व्हायोलीन. लालसर रंगाच्या पॉलिशमधले. व्हायोलीनचे ते रूपडे फारसे आकर्षक नव्हते. मधूनच गजाची तक्रार करीत किरटा स्वर काढणारे. गजही छोटासाच. सुमार दर्जाच्या त्या व्हायोलीनमधून व्ही.जी. जोग दैवी स्वरातून अलौकिक वादन करीत. त्या काळी गजाला बांधलेले केस घोड्याच्या शेपटीचे असतात, असे कुठेसे ऐकलेले. कधीकधी गज व्हायोलीनच्या तारांवरून पुरेसा ध्वनी निर्माण न करतांच घसरूं लागे. मग गज धूपासारख्या कसल्याशा चिक्कट रेझीनवर घासला जाई आणि गज पूर्ववत ध्वनी निर्माण करूं लागे.
व्ही.जी. जोग बृंदावनी सारंग https://www.youtube.com/watch?v=bJvS8glmU2c
नंतरच्या काळात त्यांनी लांब गज वापरला, पण किरटे ध्वनी काही पूर्ण थांबले नाहीत.
राग जोग https://www.youtube.com/watch?v=0QXJiDFzpBs

डॉ. एन. राजम.
मी त्यांना कधी प्रत्यक्ष पाहिले नाही वा कधी भेटलोही नाही. चित्रवाणीच्या पडद्यावर त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले की जणू साक्षात सरस्वतीचेच दर्शन होते. माझ्यापुरते मी त्यांना विदुषीताई म्हणतो. त्यांच्या हातातल्या गजाने प्रथम माझे लक्ष वेधून घेतले होते.
फिलहार्मनिक ऑर्केस्ट्रातल्या वादकांच्या गजासारखा दिमाखदार, लांबसडक गज. फिलहार्मनिक ऑर्केस्ट्रातल्या व्हायोलीनवादकांचे गज खास शाही सोहळ्यात राष्ट्रप्रमुखांना मानवंदना देणार्‍या सैनिकांच्या एकलयीतल्या डौलदार पदलालित्यासारखे डौलदार, एका लयीत हलताना दिसतात. तस्साच लांबसडक गज. गजावर नाजूक, लांबसडक बोटांतली स्थिर, ठाम पकड. व्हायोलीनमधून निघणारा मंद्रस्वरांना ठळक करणारा भारदस्त टिंबर. स्वरमध्याचे ठाव घेणारी आलापी. ठरावीक स्वरांवर वजन देत विचारपूर्वक केलेले मॉड्युलेशन स्वरावलीला मोहक, रेखीव आकार देतें.

चेन्नईत १९३८ साली जन्मलेल्या विदुषीताईंनी आपले पिताश्री ए. नारायण अय्यर यांच्याकडून कर्नाटक संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. विदुषीताईंचे बंधू टी.एन. कृष्णन हेदेखील कर्नाटक संगीतातले सुप्रसिद्ध व्हायोलीनवादक होते. गायकी अंगाने व्हायोलीनवादन करणार्‍या विदुषीताईंनी नंतर मुसिरी सुब्रमण्यम अय्यर यांचे शिष्यत्व पत्करले. आपल्या प्रतिभेच्या जोरावर कर्नाटक संगीत विश्व त्या नक्कीच गाजवू शकल्या असत्या.

पण काही माणसे वेगळ्याच मातीची बनलेली असतात. ही माणसे एखाद्या ध्येयाने पछाडतात. सुख, समृद्धी, सुरक्षित, ऐशआरामाचे सुखासीन आयुष्य, प्रसिद्धीच्या झोताची झळाळी, कशाचीच भुरळ न पडता आपल्या ध्येयाच्या पूर्णतेचा अपूर्व ध्यास घेऊन आगळावेगळा मार्ग चोखाळतात. समोर दिसणारे अनेक राजमार्ग सोडून वहिवाट नसलेली एखादी अनवट, अवघड स्वीकारतात आणि ती वाट आपल्या चमकदार कर्तृत्वाच्या अपूर्व झळाळीने ती अनवट वाट उजळून ठेवतात.

दक्षिण भारतातील सुखाचे घर सोडून त्या गुजरातेत राहायला गेल्या. एक अपूर्व ध्यास घेऊन. पंडित ॐकारनाथ ठाकूर यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकण्याचा ध्यास घेऊन. 6B पेन्सिलीच्या वा व्हाईट बोर्ड मार्करच्या जाड रेषांनी छोट्या छोट्या नक्षीदार रेघोट्या निघाव्यात, काही रेषांच्या पुंजक्यातून एखादे छोटेसे नक्षीदार चित्र निर्माण व्हावे, तसे पाच-दहा छोट्या छोट्या स्वरमालिकांतून उमलणारे आकर्षक स्वरचित्र; अशा आकर्षक स्वरचित्रांतून मांडलेली आलापी, विलंबित आणि द्रुत ख्याल हे मला जाणवलेले ॐकारनाथांच्या ख्यालगायनातील वैशिष्ट्य. पुढील दुव्यावर याची झलक दिसून येते.
ॐकारनाथ ठाकूर - मालकंस - https://www.youtube.com/watch?v=Ia1X6S5rims

खाली दिलेल्या दुव्यावर विदुषीताईंचे मधुवंती रागातले कन्या आणि नातींसह केलेले वादन मी जेव्हा ऐकले, तेव्हा मला त्या स्वरांतून सतत ॐकारनाथांची गायकी ऐकू येत राहिली. ॐकारनाथांची आवाज लावण्याची पद्धत, सुरुवातीला संयत स्वर लावून आलाप घेताना मॉड्युलेशनचा मुक्त वापर विदुषीताई करतात. द्रुतकडे झुकलेल्या मध्यलयीतल्या एकीतून निघणारी दुसरी अशा छोट्या छोट्या नक्षीदार स्वरावली. काही आवर्तनानंतर या छोट्या स्वरावलींचे तुकडे जोडले जाऊन अचानक देखणे स्वरचित्र झाल्याची जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हा मिळणारा आनंद केवळ अवर्णनीय.

फक्त जाड ठळक रेषांची जागा आता त्याच वळणाच्या पण आकर्षक रंगातल्या स्केचपेनमधून निघणार्‍या नाजुक रंगीत रेषांनी घेतली होती. सुखद आश्चर्य म्हणजे अंगावर येणार्‍या थरारक ए ऽऽ एऽऽऽ एऽऽ एऽऽऽऽ अशा एकारी तानांचे स्वरचित्र मात्र स्वतःचा कायापालट करून येते. आपली मनोमन वाहवा घेऊन वेगळ्याच नाजूक स्वरूपात मनात रेंगाळू लागते. तू-नळीवर विदुषीताई, त्यांची कन्या संगीता शंकर आणि संगीता शंकर यांचे बहारदार वादन ऐकले आणि हरखून गेलो. एकतर मधुवंती हा माझ्या आवडत्या सुंदर रागांपैकी एक आणि निवडलेली लयही बर्‍यापकी वेगाची; शास्त्रीय संगीत ऐकण्याचा सराव नसलेल्यांसाठी कंटाळवाणी न वाटणारी. शक्यतो पुढील तू-नळी चित्रध्वनी होम थिएटर वा हेडफोनवर ऐकावी.

व्यवस्थित केलेले व्यावसायिक चित्रीकरण. छोट्या आकाराचे दीर्घवर्तुळाकृती सभागृह. त्यातला प्रकाशित केलेला मंच. समोरून मंचाकडे पाहताना डावीकडे दिसणारा लांब केसांचा स्निग्ध नजरेचा बाळसेदार तबलजी. त्याच्यानंतर रागिणी, मध्यभागी विदुषीताई, त्यांच्या बाजूला त्यांची कन्या संगीता तिच्या बाजूला तिची दुसरी कन्या नंदिता शंकर. मधुवंतीची पकड केव्हा मनाची पकड घेते कळत नाही. दीर्घ पल्ल्याच्या seamless आलापांतून व्यक्त होणारा ठोस, सौंदर्यपूर्ण स्वरविलास. नंदनवनातल्या एखाद्या सुंदर बागेत बसून स्वरानंद घेतो आहे असे वाटले.

विदुषीताईंच्या आलापीच्या एकदोन आवर्तनांनंतर त्यांची कन्या संगीता शंकर स्वर उचलते. तिच्या व्हायोलीनचा ध्वनी येतो. आश्चर्याचा गोड धक्का. तेच टिंबर, दोन्ही वाद्ये एकाच स्वरात मस्त लागलेली. तोच आकर्षक, बांधेसूद स्वरविचार आणखी रेखीव, स्पष्ट करणार्‍या छोटे तुकडे जोडून निर्माण केलेल्या तशाच स्वरावली.

दहाव्या मिनिटाला सवाल-जबाब सुरू होतात. रागिणी शंकर आणि तिच्यापाठोपाठ नंदिता शंकर. तबलजीच्या बाजूला बसलेल्या रागिणीच्या काहीशा कृश, कोमल शरीरावर खट्याळ शाळकरी मुलीसारखा चेहरा. देवीला वाहिलेल्या प्राजक्तासारख्या नाजूक फुलाचे व्यक्तिमत्त्व. पण व्हायोलीनमध्ये तेच टिंबर, तोच भारदस्त स्वर. वादनात वयाला न शोभणारा दिमाखदार ठेहराव. कधी गज अतिशय धीमेपणे व्हायोलीनच्या तारेवरून सरकतो आहे पण चपल, हरकती, मुरक्यांसारक्या स्वरावली निघताहेत. झोंकदार स्वरवळणावरून जाताना हिने मानेला दिलेला हलकासा हेलकावा. चेहर्‍यावर मनासारखी सुरावट जमल्याचा अपार आनंद. आपल्या आनंदाची गोष्ट म्हणजे ध्वनियोजनेतून डावीकडचे आवाज डावीकडून आणि उजवीकडचे आवाज उजवीकडून येतात. प्रतिध्वनी मात्र किंचित त्रासदायक; त्यामुळे तबल्याचे बोल स्पष्ट ऐकू येत नाहीत. पण रसभंग मात्र होत नाही.

बैठक भारदस्त घेतली असली, तरी नंदिताच्या चेहर्‍यावरचे कोवळेपण लपत नाही. नंदिताने स्वरावलीचा ताबा घेतला, तेव्हा मात्र धक्क्यांची नवलाई ओसरली होती. तरीही ठळकपणे जाणवले ते तेंच टिंबर, तस्सेच धीमे, स्थिर, शिस्तबद्ध गजकाम आणि स्वरांची तीच नजाकत. सुरांशी लपालपी आणि लयीशी शिवाशिवी खेळत केलेली दोघींचीही मांडणी आत्मविश्वासपूर्ण. कुठेही घाई नाही, गडबड नाही, मिजासही नाही.. केवळ स्वरमाध्यमातून नम्रतेने केलेली ईश्वराराधना. मी कणमात्र आहे आणि संगीतसागर अफाट, अपार आहे हे सांगणारे सादरीकरण. तरीही चेहर्‍यावर अधूनमधून विलसणारा भोज्जाला शिवल्याचा निखळ आनंद.

या दोघींचे सवाल-जबाब सुरू झाले आणि ध्यानात आले की छोट्या छोट्या, मधुर हरकतींनी युक्त असा स्वरमाला जोडून मोठे नक्षीदार स्वरचित्र उभे करणारी हीच ती ॐकारनाथांची शैली. पण अरेच्चा, स्केचपेनच्या नाजूक, रंगीत रेषांनी बनलेले हे रेखाचित्र सपाट कॅनव्हासवर नाही, तर झुळझुळत फडकणार्‍या तलम रेशमी वस्त्रावर आहे. दोघी जणी तालाला असे सुरेख झोके देऊ लागतात की हवेत लहरणार्‍या या सुंदर वस्त्राबरोबर आपणसुद्धा हवेत लहरतो.

ठोस, रेखीव स्वरविचारामुळे लयीच्या दोन ठोक्यांतले अंतर प्रशस्त वाटते. तालाशी झिम्मा खेळता खेळता समेवर येतानाच्या स्वरावली घेताना कुठेही घाईगडबड दिसत नाही. प्रत्येक सम समोर बसथांबा दिसावा तशी दिसत राहते अणि येऊन जाताना मस्त राजेशाही दिमाखात, तोर्‍यात मिरवून जाते. तबलजी जेव्हा स्वरांचा पाठलाग करतो, तेव्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करता मनोहर बोलाक्षरे काढताना घाटदार तालाची सृष्टी उभी करतो त्यामुळे स्वरसौंदर्य आणखी आणखी खुलून दिसते. मंद्रसप्तकातल्या गमकयुक्त ताना वजनदार असून रेखीव सौंदर्यामुळे बोजड वाटत नाहीत.

चित्रदिग्दर्शकाची मांडणी फारच कल्पक आहे. शेवटी एकेका वादकाचे एकल स्वरदर्शन सुरू असताना त्या त्या वादकाच्या चेहर्‍यावरील मनोहर विभ्रम आपल्याला पडद्यावर दिसतात आणि कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत जाते.

एकापेक्षा जास्त गायक-वादक जेव्हा समूहाने सादरीकरण करतात, तेव्हा स्वरविचाराच्या मांडणीच्या एकसंधतेला छेद जाण्याची शक्यता असते. वैयक्क्तिक महत्त्वाकांक्षेतून सहकार्‍यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्नही होतात्त. सादरीकरण उंचावण्यासाठी आव्हाने, प्रतिआव्हाने दिली जातात. इथे चार व्यक्ती, चार वाद्ये असली तरी मांडणी रेखीव, एकसंध, एकजिनसी. कुठेही शिवण दिसत नाही, ठिगळ लागल्याचा भास नाही. जणू मंचावर एकच व्यक्ती एकच वाद्य आहे. वाद्ये चार, वादक चार. पण फलरस, साखर इत्यादी पाण्यात विरघळून सुधारस बनावा, तसे इथे सारे वादन एकजिनसी. हा सुधारस रसनेने नव्हे, तर कानांनी चाखायचा आहे. विदुषीताईंच्या चेहर्‍यावर कौतुकाची निसटती छटा, पण करडी नजर धारदारच.

स्वरगंगेच्या प्रवाहातून प्रवास करतांना बावीस मिनिटे चाललेला हा स्वरानंद संपन्न होतो आणि एका स्वरानंदाची अनामिक पण विलोभनीय आठवण मागे ठेवून जातो.

तीन पिढ्या मधुवंती - https://www.youtube.com/watch?v=bD_HbiO4hC8

सुगम संगीताच्या रसिकांसाठी आणखी काही दुवे खाली देतो आहे.

करम की गती न्यारी - https://www.youtube.com/watch?v=ax6lSmn56_8

संगीता शंकर अणि महेश राघवन - Breezy Sunday: https://www.youtube.com/watch?v=1m6af3__IS8

रोजा जानेमन - नंदिनी शंकर आणि महेश राघवन - https://www.youtube.com/watch?v=2YHEnW0XT2M

तुम जो मिले हो - https://www.youtube.com/watch?v=GzQhmLhA5Kw&list=OLAK5uy_kWGI9-4wenKCaTA...

आज जाने की जिद ना करो - फरीदा खानुम - https://www.youtube.com/watch?v=_gNUQsj1O7g
आज जाने की जिद ना करो - नंदिनी शंकर - https://www.youtube.com/watch?v=r67XAdA3owY
वंदे मातरम - https://www.youtube.com/watch?v=958tIi0JSJo

रागदारी वाद्यसंगीतात जास्त स्वारस्य असलेल्यांसाठी आणखी दुवे -

एन राजम आणि रागिणी - राग बागेश्री - https://www.youtube.com/watch?v=csGk5oMvo_w
नंदिनी शंकर - बागेश्री - https://www.youtube.com/watch?v=HcdScgfNMWY
रागिणी शंकर - बिहाग - https://www.youtube.com/watch?v=Xpc_zNWS848

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

2 Nov 2021 - 1:38 pm | कुमार१

सुंदर लयबद्ध लेख !
दुवे सावकाश पाहणार.

अनेक राजमार्ग सोडून वहिवाट नसलेली एखादी अनवट, अवघड स्वीकारतात आणि ती वाट आपल्या चमकदार कर्तृत्वाच्या अपूर्व झळाळीने ती अनवट वाट उजळून ठेवतात.

>>
क्या बात है !

नीलकंठ देशमुख's picture

2 Nov 2021 - 7:38 pm | नीलकंठ देशमुख

छान लिहिलंय. खरं तर अनेकदा एन.राजम आणि त्यांच्या पुढील पिढीचे
व्हायोलिन वादन ऐकले आहे. आता वादनातील वेगळे पैलू उलगडून दाखवले आहेत

नीलकंठ देशमुख's picture

2 Nov 2021 - 7:38 pm | नीलकंठ देशमुख

छान लिहिलंय. खरं तर अनेकदा एन.राजम आणि त्यांच्या पुढील पिढीचे
व्हायोलिन वादन ऐकले आहे. आता वादनातील वेगळे पैलू उलगडून दाखवले आहेत

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Nov 2021 - 7:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

परीचय आवडला,

आधी लेख वाचला आणि मग चित्रफित बघितली त्यामुळे ऐकायला विशेष मजा आली,

आता सवडीने बाकीच्या ध्वनिफिती ऐकतो

पैजारबुवा,

सुधीर कांदळकर's picture

13 Nov 2021 - 6:09 am | सुधीर कांदळकर

@़कुमार१ आणि नीळकंठ देशमुखः धन्यवाद डॉ.साहेब. धन्यवाद देशमुखसाहेब.

शास्त्रीय संगीत ऐकणारे कुणीतरी आहेत हे पाहून बरे वाटते, समजणारे देखील आहेत हे पाहून छानच वाटते.

नीलकंठ देशमुख's picture

13 Nov 2021 - 7:42 pm | नीलकंठ देशमुख

शास्त्रीय संगीत हा माझा प्राधान्य क्रम आहे .
समविचारी कुणीतरी आहे हे कळल्यावर छान वाटते.

तुषार काळभोर's picture

13 Nov 2021 - 10:15 am | तुषार काळभोर

व्हायोलिन हे तुलनेने अवघड वाद्यांपैकी. पण काळजाला साद घालणारे. व्हायोलिन वादनाचा इतक्या दशकांचा अनुभव म्हणजे केवळ आदर व्यक्त करता येतो. प्रभाकर जोग हे व्हायोलिन वादनातील महाराष्ट्रातील अजून एक दिग्गज नाव.

आपल्याकडे (गायकांच्या तुलनेत) वादकांचा परिचय श्रोत्यांना फार कमी असतो. उस्ताद बिस्मिल्ला खाँसाहेब, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित रवी शंकर हे काही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्गज सुपरिचित आहेत, हे अपवादात्मक म्हणावे लागेल. त्यातही व्हायोलिन वाद्य देखील तुलनेने कमी परिचित.
केवळ वाद्याचे असे तीन कार्यक्रम पाहिले आहेत. तिन्ही बासरी वादक अमर ओक यांचे. एकदा यशवंत मध्ये, तर दोनदा गणेश कला क्रीडा मध्ये. 'गाणं' नसूनही दोन अडीच तासांचे कार्यक्रम मुग्ध करणारे होते.

चौथा कोनाडा's picture

13 Nov 2021 - 5:35 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख, या विषयातील फारकाही कळत नाही, पण लेख आवडला.

मित्रहो's picture

13 Nov 2021 - 7:37 pm | मित्रहो

वायलीन वाजवणाऱ्या तीन पिढ्या खरतर आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. बऱ्याचदा आवड टिकत नाही. तुम्ही सारे काही खूप छान उलगडून दाखविले आहे. काही चित्रफिती बघितल्या. मधुवंती राग तीन पिढ्या सादर करणारी चित्रफित निव्वळ अप्रतिम आहे. मस्त सुरेल धागा.

चित्रगुप्त's picture

13 Nov 2021 - 8:24 pm | चित्रगुप्त

मधुवंती रागातील वादनाचे रसग्रहण वाचून थक्क झालो. असे काही शब्दांत मांडता येईल अशी कल्पना पण केली नव्हती.
हा लेख नीट समजून घेत सगळे दुवे उघडत ऐकणे हे मोठेच काम आहे. पैकी जोग-झाकिर ऐकून रोमांचित झालो. तीन पिढ्यांचे वादन थोडे ऐकणे सुरू केले पण थांबणे भाग होते. आता सावकाशीने एकेक ऐकायचे आहे.
नितांत सुंदर लेख आणि मौल्यवान दुवे. खूप खूप आभार.

सुधीर कांदळकर's picture

14 Nov 2021 - 6:34 am | सुधीर कांदळकर

@ज्ञा पै :आपले प्रतिसाद नेहमीच उत्कृष्ट असतात तसाच हा देखील आहे.

तुषार काळभोर, चौको, मित्रहो अनेक अनेक धन्यवाद.

@चित्रगुप्तः आपल्या कुंचल्याप्रमाणे आपली शब्दांवर देखील हुकुमत आहे हे आपल्या सुंदर प्रतिसादातून जाणवते. अनेक अनेक धन्यवाद.

लेख वाचताना बरेचदा येणार्‍या टिंबर आअणि मॉड्युलेशन या शब्दांना मराठी, हिंदी वा संस्कृत प्रतिशब्द काय आहेत ? नसल्यास त्यांचा अर्थ मराठीत समजावून सांगता येईल का ?

तसेच 'जुगलबंदी' म्हणजे नेमके काय असते ? जोग-झाकिर यांच्या संयुक्त वादनाला जुगलबंदी म्हणता येईल का ? तबला किंवा कोणतेही तालवाद्य आणि बासरी, सतार इ. वाद्य यांचे कोणतेही संयुक्त वादन आणि 'जुगलबंदी' यात काय फरक असतो ?

मला संगिताबद्दल तांत्रिक ज्ञान अजिबात नाही. राग, ताल वगैरेंबद्दल काहीही ठाऊक नाही मात्र भारतीय, पाश्चात्य, अरबी वगैरे संगीत ऐकायला फार आवडते. लहानपणी इंदौरला आमचा शेजारी दिवसभर रेडियो वाजवायचा, त्यामुळे हिंदी सिनेमातली १९५०-६० च्या दशकतली गाणी म्युझिकसकट पाठ असायची. मला त्यातले ऊर्दू शब्द कळत नसले तरी प्रत्येक गाण्याची एकूणेक स्वरावली अजूनही लक्षात आहे. लहानपणी बासरी, माऊथॉर्गन, बेंजो यावर ती गाणी वाजवायचो मात्र पद्धतशीर शिक्षण घेता आले नाही. पुढे चित्रकलेत रमल्यावर ते तेवढ्यावरच थांबले. दिल्लीत कुमार गंधर्वांचे जेवढे कार्यक्रम झाले, त्या सगळ्यांना सहपरिवार हजेरी लावायचो त्यामुळे दोन्ही मुले अजूनही अधूनमधून आवडीने कुमारजी ऐकतात.
पॅरिसमधील इ.स. 1532 and 1632 या काळात बांधल्या गेलेल्या सुप्रसिद्ध Saint Eustache church मधे दर रविवारी संध्याकाळी पाच वाजता तेथील (८००० पाईप असलेला) ऑर्गन वाजवला जातो. आज संध्याकाळी मी तिथे जाणार आहे. त्या अनुभवाबद्दल नंतर लिहीन.या ऑर्गनचे वर्णन असे केले गेलेले आहे:
With 101 stops, representing 147 rows and 8000 pipes, the richness of sound of this instrument is exceptional and gives it a worldwide reputation.
It has the rare feature of being equipped with a second, mobile console, which allows the organist to play in the nave, close to the listeners.

.
.
.

सुधीर कांदळकर's picture

14 Nov 2021 - 6:38 am | सुधीर कांदळकर

आपल्याकडे (गायकांच्या तुलनेत) वादकांचा परिचय श्रोत्यांना फार कमी असतो.

हें अगदी खरें. पण वादक एका बाबती श्रेष्ठ ठरतात. ते तोंडे वेडीवाकडी करीत नाहींत. म्हणून मला जास्त आवडतात.

Nitin Palkar's picture

14 Nov 2021 - 3:37 pm | Nitin Palkar

अतिशय छान लेख. शास्त्रीय संगीतातील फारसे काही कळत नाही पण ऐकायला मात्र आवडते. व्होकल आणि instrumentle दोन्ही.
या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या श्रीधर पारसेकरांनी संगीत दिलेले 'वहिनी' या चित्रपटातील एक गीत जे गायले आहे पु. ल. देशपांडे यांनी.
https://www.parrikar.org/music/nand/pldeshpande.mp3

चौथा कोनाडा's picture

14 Nov 2021 - 5:20 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख !

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2021 - 6:25 am | सुधीर कांदळकर

१. टिंबरः
मोबाईलवर ढाल्या स्वरातले गाणे - उदा. जगजीत सिंग वा गुलाम अली - लावून एकदा धातूच्या डब्यावर ठेवा आण एकदा उघडलेल्या रिकाम्या लाकडी कपाटात खणात ठेवा. आवाजाचा बदललेला पोत ध्यानात येईल. ढाल्या स्वरांना लाकडी बांधणीत मिळालेला उठाव याला माझ्या मते ढोबळ मानाने टिंबर असे म्हणता येईल.

वाद्याच्या बांधणीच्या लाकडाचा दर्जा, बांधणीपूर्वी लाकडाचे केलेले कंडिशनिंग (पुन्हा इंग्रजी शब्द) आणि प्रक्रिया, बांधणीचा दर्जा वगैरे बाबीमुळे वाद्याचे टिंबर बदलते हे सांगायला नकोच.

२. मॉड्यूलेशनः
गातांना वा वादन करतांना आवाज लहान वा मोठा करून स्वरसौंदर्य वाढवण्याची खुबी वा कला याला मी मॉड्यूलेशन असे म्हणेन. नाजुक हरकती घेतांना आवाज बारीक करून आस्ते आस्ते वाढवीत त्याच स्वरमालिकेत आवाज वाढवीत तशाच हरकती कुठेही कुठलाही स्वर न हलू देता अचूक जोरकस आवाजात घेत वरील स्वरावरून जोरदार आवाजात मींड सुरू करून आवाज कमी करीत समेवर येणे हा प्रकार बहुतेक गायक वादक करतात आणि न चुकता दाद घेतात.

वरील दोन्ही शब्दांना मराठी हिंदी वा संकृत प्रतिशब्द असू शकतील पण माझ्या ऐकिवात वा वाचनात अद्याप आलेले नहीत वा मी कालौघात विसरलो असेन.


जुगलबंदी हा शब्द माझ्याजवलील शब्दकोषांत सापडला नाही. युग्म वा युगुल या अर्थाने जुगल हा अक्षरसमूह जुगलबंदी हा शब्द बनलेला असावा. माझ्याजवळील शब्दकोषात बंदी या शब्दाचा एक अर्थ अटकाव असा दिलेला आहे. तर दुसरा अर्थ राजाचा स्तुतीपाठक असा दिलेला आहे. नजरबंदी या शब्दात ‘बंदी’ चा अर्थ मोहिनी असा असावा. युगुलाने म्हणजे दोघानी मिळून (श्रोत्यांवर) टाकलेली मोहिनी असा अर्थ आपण काढूं शकतों. शास्त्रीय संगीतात जुगलबंदीचे असे खास नियम वगैरे असणे माझ्या वाचनांत ऐकिवात नाहींत. नसावेतच बहुधा. तरी अलीकडे अनेक गायकांनी शास्त्रीय संगीत किंबहुना संगीत या विषयावर बरेच संशोधन करून पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा अभ्यास करावा लागेल आता तुम्ही माझ्या मेंदूत किडा सोडला अहे हे छानच झाले. असो. तर जोडीने मोहिनी टाकणे आले म्हणजे रंजकता वाढवणे आले. स्पर्धा असेल तर रंजकता वाढेल. पारंपरिक शास्त्रीय संगीतात आपल्या गुरूंच्या संस्कृतीत शोभेल इतपत जोडीदार गायकाचा अधिक्षेप न करता मापक स्पर्धा करून रंजकता वाढवलेली आहे. उदा. बिस्मिल्ला खां – व्ही. जी. जोग, पं. रविशंकर – उस्ताद अलि अकबर खां.

जोडीतले दोन्ही कलावंत थोर, असामान्य असूनही न रंगलेले जुगलबंदी गायन ऐकायचे असेल तर पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद राशीदखां या मान्यवर गायकांचे संयुक्त गायन ऐका. खरे तर मी असे म्हणण्यास अपात्र आहे पण जे वाटते ते वाटतेच.

असो. आपल्या प्रश्नांमुळे थोडेसे चिंतन, मनन झालें. धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

15 Nov 2021 - 6:59 am | तुषार काळभोर

हा शब्द मराठी नसल्याने मराठी शब्दकोशात नसावं.
ऑनलाईन हिंदी शब्दकोशात असा अर्थ सापडला:
स्त्री० [हिं० जुगल+फा० बदी] संगीत में एख ही वर्ग के दो बाजों का साथ-साथ बजाया जाना। जैसे–तबले और पखावज की जुगलबंदी, बाँसुरी या सरोज अथवा सारंगी की जुगलबंदी।

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2021 - 6:28 am | सुधीर कांदळकर

वा! आपल्याला शास्त्रीय संगीताची आवड आहे हे छानच. गायन वादन दोन्ही ऐकतां हे सुरेखच.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

नीलकंठ देशमुख's picture

24 Nov 2021 - 12:23 pm | नीलकंठ देशमुख

सहवादन सहगायन हा शब्द प्रयोग
जुगल (युगल) बंदी साठी वापरला जातो.
उभयतांनी एकमेकाना समजणे, सांभाळणे ,योग्य प्रतिसाद देणे ,
दुस-यावर वरचढ न होता ,सोबत,संगत निभावणे जर असेल तर
जुगल बंदी रंगते. अर्थात दोघेही समसामर्थ्य असलेले तुल्यबळ हवे.

संसारात पण असेच आहे की!

सहवादन आणि जुगलबंदी यात फरक आहे.

१.समूहगायनात सहगायन तथा सहवादन होते. उदा. समूहाने राष्ट्रगीत म्हणणे, समूहाने स्वागतगीत म्हणणे. हे समूहगायन आहे.

२. मुख्य गायक शास्त्रीय संगीत गातांना मागे एकदोन शिष्य तंबोरे घेऊन री ओढायला बसतात. याला सहगायन म्हणता येणार नाही. कशाळकरांबरोबर तर पांच शिष्य बसतात.

३. अब्दुल हलीम जाफरखांसाहेब. पाच सतारींचे समूहवादन करीत. त्याला सहवादन म्हणता येईल.

४. मंदिरांत भजने गातात. ते सहगायन होऊं शकेल.

५ हुसेन ब्रदर्स जोडीने गझला गातात. तें सहगायन आहे. परंतु त्याला जुगलबंदी म्हणतां येणार नाही.

६. एकाने आवर्ताला सुरुवात करून दुसर्‍याने ते पूर्ण करून दुसर्‍या आवर्तनाला सुरुवात करून पहिल्याने ते पूर्ण करणे, एकमेकांबरोबर सवाल जबाब खेळणे, संवादिनीवादकाबरोबर वा तबलजीबरोबर वेगवेगळे सवालजबाब खेळणे इ. प्रकार जुगलबंदीत घालून स्वरचित्रांची एखाद्या सुंदर पैठणीवरील नक्षीसारखी सुंदर वीण निर्माण होते. त्या मानाने सहवादन हे आकर्षक रंगसंगतीतल्या सुंदर गोधडीसारखे म्हणता येईल. माझेच बरोबर असे मी म्हणत नाही परंतु अर्थात जुगलबंदी या शब्दाचा हा माझ्या मनावर उमटलेला ठसा आहे.

आपल्या प्रतिसादामुळे चिंतन, मनन झाले. धन्यवाद.