दिवाळी अंक २०२१ : शब्द

विनायक पाटील's picture
विनायक पाटील in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

• शब्द •

आज आपल्याला वाटतं की आपण हे चलन वापरतो, ते चलन वापरतो. या चलनाचं अवमूल्यन झालं किंवा त्याचा भाव वधारला. खिशात किंवा खात्यात चलन कमी झालं की आपण अस्वस्थ होतो. इतकं की चलन नसेल तर चलनवलन थांबेल, जग ठप्प होईल अशी आपल्याला भीती वाटत राहते. या धास्तीनेच कोरोना काळात बंद पडलेल्या व्यवहारांनी अनेक दुर्दैवी जिवांचं जीवन कायमचं थांबवून टाकलं. पण हे सगळं तात्कालिक आहे. मानवी व्यवहारांचं खरं चलन आहे 'शब्द'.

शब्द आणि संवाद या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्व सजीव संवाद साधत असतात. जन्म झाल्यावर जीवन जगण्यासाठी आणि त्या जीवनाचं सातत्य टिकावं म्हणून सजीवाला सतत स्वतःशी आणि आपल्या भवतालाशी संवाद करावा लागतो. यातले बहुतेक संवाद रासायनिक असतात. जीवनाचं मूळ असलेली जनुकं ही स्वतः रसायनं असून ती इतर रसायनं बनवण्याच्या कामी पटाईत आहेत. ज्याप्रमाणे करोडो वर्षांपासून या पृथ्वीवर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड किंवा डायहायड्रोजन मोनॉक्साइड (पाणी) यासारखी रसायनं टिकून आहेत, त्याचप्रमाणे डीऑक्सीरायबो न्यूक्लिइक ॲसिड हे रसायन टिकून आहे. फरक इतकाच की इतर रसायनं आपलं मूळ रूप टिकवून ठेवतात; बदल झालाच तर ती पूर्णपणे बदलून जातात. डीएनए मात्र स्वतःचं मूळ रूप न बदलता कायम स्वतःला बदलत राहतो. मूळ रूप राखण्यासाठी त्याने जन्माची सोय केलेली आहे, तर बदल करण्यासाठी मरणाची. जन्म-मरण आणि त्यांच्या मधलं, सजीवाला जाणीव होणारं जीवन हे सगळं संवादाचं फलित असतं. त्यामुळे अर्थातच संवादाला विशेष महत्त्व आहे.

(कधी कधी वाटतं की पेशीपेशीत विखुरलेला डीएनए हाच एकसंध अविनाशी परमात्मा असावा, आणि आपण सर्व सजीव त्या परमात्म्याचे नाशिवंत अंशात्मे आहोत.)

बहुपेशीय सजीव आपल्या पद्धतीने संवाद साधत असतानाच, त्याच्यातील प्रत्येक पेशी तिच्या पद्धतीने संवाद करत असते. खरं तर प्रत्येक कृती हा एक संवादच असतो. आणि कृती वेगवेगळ्या असल्याने संवादाची साधनं वेगवेगळी असतात. उत्क्रांतीच्या ओघात कधीतरी संवादाचम साधन म्हणून आवाजाचा वापर सुरू झाला आणि मग रासायनिक साधनांची मक्तेदारी कमी होऊन भौतिक साधनं वापरात यायला लागली. वनस्पती मानवी कानाला ऐकू येईल असा आवाज काढू शकत नाहीत. पण प्राण्यांच्या लाखो प्रजातींनी तसा आवाज हे आपलं संवादाचं प्रमुख साधन मानलं आहे. निरनिराळे अवयव वापरून हे आवाज काढले जातात. त्यातच एक प्रकार म्हणजे तोंडाने आवाज काढणं. मानवामध्ये या प्रकाराचा चरमबिंदू आपल्याला पाहायला मिळतो. मानवाच्या स्वरयंत्राची विशिष्ट अशी घडण झालेली आहे.

पण सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वीपर्यंत मानव केवळ हुंकार, हाकारे काढत असे. त्या सुमारास काही तरी घडलं, जनुकांनी काही तरी आविष्कार केला आणि आपल्या पूर्वजांनी निरनिराळे हुंकार एकामागोमाग एक काढून त्याला ठरावीक अर्थ जोडण्याचा प्रयत्न केला. हेच ते शब्द. माहिती एकमेकांना देण्यासाठी इतर गोष्टींऐवजी शब्दांचा वापर वाढतच गेला.

आज या शब्दांचा इतका विकास झाला आहे की त्यांच्याशिवाय आपलं पान हलत नाही. हवेत विरून जाणाऱ्या शब्दांना आपण आकार द्यायला लागलो आणि उच्चारलेले शब्द लिखित रूपात आले. निरनिराळ्या ठिकाणी हे हुंकार आणि आकार निरनिराळ्या पद्धतीने जोडले गेले आणि तयार झाल्या असंख्य भाषा. सुरुवातीला केवळ भोवतालच्या मूर्त वस्तूंची किंवा इतर मानवांची माहिती देण्याघेण्यासाठी मानव शब्दांचा वापर करत असे. पण नंतर नंतर, तो अस्तित्वात नसलेल्या गोष्टी सांगण्यासाठी शब्द वापरू लागला. माणूस गोष्टी रचू आणि सांगू लागला. नाहीतर बत्तीस हजार वर्षांपूर्वी माणसाचं शरीर आणि सिंहाचं डोकं असलेली मूर्ती का तयार केली गेली असती?

म्हणजेच मानवाच्या विचारशक्तीला कल्पनेची जोड मिळाली होती. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात याला 'जाणीव क्रांती' म्हणतात. या क्रांतीमुळे मानवाची विचार करण्याची आणि तो इतरांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत आमूलाग्र बदलून गेली आणि या बदललेल्या पद्धतीचे वाहक होते 'शब्द'.

आज शब्द हे मानवी भावभावनांचं चलन बनलेले आहेत - मग ते उच्चारलेले किंवा लिहिलेले असोत. शब्दांनी सुरुवातीला माणसाचं आयुष्य जितकं सुखकर केलं असेल, तितकंच आज जटिल करून टाकलं आहे. सुरुवातीला शब्दांची उत्पत्ती विचारातून झाली. पण आज आपल्या मनात चालणाऱ्या विचारांचा कब्जा शब्दांनी घेऊन टाकलाय. आपण विचार करतो ते आपल्या ओळखीच्या असंख्य शब्दांनीच. त्याच वेळी माहीत नसलेले शब्द आपल्या विचारात येतच नाहीत. कोणत्याही भाषेत नवीन शब्द घडवण्याची प्रक्रिया अतिशय संथ झालेली आहे. इंग्लिश भाषेत वर्षाला साधारण २०० शब्दांची भर पडते. पण त्या भाषेत असलेल्या एकूण सुमारे सहा लाख शब्दांच्या तुलनेत हा आकडा नगण्य आहे. मराठी शाब्दबंध गृहीत धरल्यास मराठीत सुमारे पंचेचाळीस हजार शब्द असावेत. पण तरीही नवीन शब्द घडताना दिसत नाहीत किंवा त्याची नियमित नोंद घेतली जाते असंही दिसत नाही. मग नवनवीन भावना व्यक्त करण्यासाठी तेच तेच जुने शब्द वापरावे लागतात.

आपण शब्द उच्चारतो, म्हणून आपल्याला ते आपले दास आहेत असं वाटतं. काही लोकांना आपण 'शब्दप्रभू'सुद्धा म्हणतो. पण प्रत्यक्षात आपण शब्दांचे गुलाम आहोत. खुद्द शब्दप्रभू वॉल्टेयरने तर 'पुस्तकं जगावर राज्य करतात' असं म्हणूनच ठेवलं आहे. पुढे तो म्हणतो की 'ज्या राष्ट्रांत लिखित भाषा नाही, ती राष्ट्रं गणलीच नाहीत तरी चालेल.' नेपोलियनसुद्धा म्हणाला होता की 'तोफा आल्या आणि सरंजामशाही बुडाली, आता शाई आलेली आहे, तर सद्य समाजरचनेचा अंत निश्चित आहे.'

जे शब्दांनी व्यक्त केलं जातं, तेच आपल्याला बहुतेकदा कळतं. नशब्द भावना दुर्लक्षित राहून त्यांची अभिव्यक्ती संकोचून जाते. शब्दांच्या या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी मग मुकेपणाचं सोंग पांघरावंसं वाटतं. पण मुकेपणातही शब्द आपला पिच्छा सोडत नाहीत. शाब्दिक विचारांची गर्दी दाटून आलेल्या मनाला अखेर शब्दांचाच आधार घेऊन परत गर्दीत यावं लागतं. शब्द उच्चारावे, लिहावे लागतात. आणि म्हणूनच कदाचित संत तुकाराम काहीशा आदराने आणि काहीशा अगतिकतेने म्हणतात -

तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव। शब्देंचि गौरव पूजा करू।।

~विनायक पाटील

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

3 Nov 2021 - 3:51 am | पाषाणभेद

छान विवेचन केले आहे.

विनायक पाटील's picture

3 Nov 2021 - 7:56 pm | विनायक पाटील

धन्यवाद

विनायक पाटील's picture

3 Nov 2021 - 7:57 pm | विनायक पाटील

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 10:05 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे

विनायक पाटील's picture

4 Nov 2021 - 8:53 am | विनायक पाटील

धन्यवाद!

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Nov 2021 - 10:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

शब्दचिंतन आवडले
फारच छान लिहिले आहे
पैजारबुवा,

विनायक पाटील's picture

4 Nov 2021 - 8:53 am | विनायक पाटील

धन्यवाद!

कुमार१'s picture

4 Nov 2021 - 10:11 am | कुमार१

छान लिहिले आहे.

विनायक पाटील's picture

4 Nov 2021 - 11:45 am | विनायक पाटील

धन्यवाद

कधी कधी वाटतं की पेशीपेशीत विखुरलेला डीएनए हाच एकसंध अविनाशी परमात्मा असावा, आणि आपण सर्व सजीव त्या परमात्म्याचे नाशिवंत अंशात्मे आहोत.

झक्कास, दंडवत स्विकारा!

-(अंशात्मा) सोकाजी

विनायक पाटील's picture

4 Nov 2021 - 11:47 am | विनायक पाटील

हा... हा...
शब्दांचाच खेळ आहे हो सगळा
खरं कुठे कुणाला माहीत आहे?

धन्यवाद