चंद्र-शुक्र-गुरू युती विरोधी चित्रे

विकास's picture
विकास in काथ्याकूट
2 Dec 2008 - 11:44 pm
गाभा: 

काल सकाळ मधे चंद्र-शुक्र-गुरू युतीचे सुंदर छायचित्र पाहीले. नंतर संध्याकाळी बॉस्टनच्या आकाशात तीच युती पहाताना चंद्र उलटा दिसला! छायाचित्र काढायचे राहून गेले पण आज ते सीएनएन वर दिसले. पृथ्वीच्या कुठल्या भागात आपण आहोत या वरून ग्रहतारे कसे उलट-सुलट दिसू शकतात हे यातून सहज समजते...

वरील चित्र सकाळमधील आहे

खालील चित्र सीएनएन वरील आय-रीपोर्ट मधून घेतले आहे: (Taken about 7pm in Bellevue, Nebraska 1 December )

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

3 Dec 2008 - 1:02 am | विसोबा खेचर

दोन्ही चित्र मस्त! :)

लिखाळ's picture

3 Dec 2008 - 2:20 am | लिखाळ

सूर्यस्तानंतर ठराविक वेळ शूक्र दिसतो आणि तो मावळतो चंद्र त्याच्या खाली होता तेव्हा हास्यमुद्र दिसली. यामध्ये पृथिच्या उत्तरगोलार्धातून सर्व देशातून हे चित्र सारखेच दिसेल असे मला वाटते. (चित्र पहिले)
दुसर्‍या दिवशी तो ५० मिनिटे उशीरा शुक्रापाशी आला त्यामुळे चंद्र वर आणि शुक्र खाली असे दिसले आणि शुक्र चंद्राच्या आधी मावळला. (चित्र दुसरे)

माझे मत बरोबर आहे का?
-- लिखाळ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Dec 2008 - 10:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसर्‍या दिवशी तो ५० मिनिटे उशीरा शुक्रापाशी आला त्यामुळे चंद्र वर आणि शुक्र खाली असे दिसले आणि शुक्र चंद्राच्या आधी मावळला. (चित्र दुसरे)

१ मार्क लिखाळकाकांना! ;-) (१ पैकी)

(खगोलअभ्यासक शिक्षिका) अदिती

विकास's picture

3 Dec 2008 - 10:09 am | विकास

असं होय! मला माहीत नव्हते. माहीतीबद्दल धन्यवाद!

अदितीने १ पैकी १ देऊन झालाच आहे!

पाषाणभेद's picture

3 Dec 2008 - 2:22 am | पाषाणभेद

-( सणकी आकाशनिरीक्षक )पाषाणभेद

कशिद's picture

3 Dec 2008 - 9:52 am | कशिद

दोन्ही चित्र मस्त!