1

आमची माणसे, आमचा गौरव

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
12 Sep 2021 - 2:41 pm
गाभा: 

गणेशोत्सवानिमित्त एक कल्पना मनात आली म्हणून हा संकलन धागा उघडत आहे. मराठी माणसे अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. अशी काही माणसे आपापल्या क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळवतात. हे यश सर्वांसमोर यावे या उद्देशाने सामाजिक पातळीवर त्यापैकी काहींचे गौरव होतात, तर काहींना पुरस्कारही मिळतात. अशाप्रकारे गौरव झालेल्या सर्व मराठी माणसांच्या बातम्यांचे संकलन येथे व्हावे अशी कल्पना आहे.

संबंधित व्यक्ती ही मराठी भाषिक असावी. तिचे कार्य कुठल्याही क्षेत्रातले चालेल - उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, इत्यादी. जर एखाद्या मराठी माणसाने बिगर मराठी भाषेत किंवा परप्रांतात जरी कार्य केले असले तरी चालेल. अशा कर्तृत्ववान व्यक्ती सर्वांना माहीत व्हाव्यात या उद्देशाने हा प्रपंच.
धाग्याची सुरुवात खालील एका वाचलेल्या बातमीने करतो :

‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या विशेष कार्यक्रमात वाहिनीवर कार्यरत असलेल्या २५ लेखकांना गणेशमूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.

साधारणपणे टीव्ही असो वा अन्य मनोरंजन, पडद्यावरील कलाकारांच्या वाट्याला खूप प्रसिद्धी, गौरव वा पुरस्कार येतात. परंतु बरेचदा या कलांच्या मुळाशी असलेले पडद्यामागचे कलाकार मात्र तितके प्रकाशात येत नाहीत. या उपक्रमातून लेखकांचा झालेला गौरव हा मला कौतुकास्पद आणि दखलपात्र वाटतो.
….

तर येऊद्यात अशाच तुमच्या माहितीतील मराठी माणसांचा संबंधीच्या गौरव बातम्या. समजा, तुमच्या परिसरात देखील कोणी चांगले कार्य केले असेल, परंतु त्याला माध्यमातून प्रसिद्धी मिळाली नसेल तर अशा व्यक्तींसंबंधीही जरूर लिहा.

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

12 Sep 2021 - 7:17 pm | उपयोजक

मातृभाषा मराठी हवी की मराठी बोलणारा अमराठी चालेल?

कुमार१'s picture

12 Sep 2021 - 7:20 pm | कुमार१

चांगले कार्य केले असल्यास जरूर चालेल.
महाराष्ट्रात रुळलेला असा त्याचा साधारण अर्थ

Ujjwal's picture

12 Sep 2021 - 8:38 pm | Ujjwal
कुमार१'s picture

12 Sep 2021 - 8:52 pm | कुमार१

हा कार्यक्रम मी पूर्वी टीव्हीवर पाहिला होता.
सुंदर !

कुमार१'s picture

19 Sep 2021 - 3:31 pm | कुमार१

सोनाली नवांगुळ, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार

अभिनंदन !

कुमार१'s picture

22 Sep 2021 - 10:21 am | कुमार१

केंद्रीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या ‘माती पंख आणि आकाश’ या पुस्तकाला गुजरात साहित्य अकादमीचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.
(संदर्भ : छापील सकाळ 22 सप्टेंबर 2021)

फुटूवाला's picture

27 Sep 2021 - 8:22 pm | फुटूवाला

समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. गणेशोत्सव निमित्य अश्याच काही हटके व्यक्तीमत्वांची दखल घेवून, या सुखवार्ता शेअर कराव्या असं ठरवलंय
नाशकातले मिलिंदकाका पगारे बहुराष्ट्रीय कंपनीतुन केमिकल इंजिनिअर पदाहुन रिटायर झाल्यावर केवळ हौशेपोटी प्लास्टिक प्रदुषणावर जनजागृती करतायेत. स्वत:च्या खर्चाने प्रोजेक्टर, लॅपटॉप, माईक, स्पिकर घेवुन बोलावतील तिथे जावुन प्लास्टिकचा विधायक वापर, विल्हेवाट पद्घती, घन कचरा व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करतात. शाळा, कॉलेजेस, शासकीय/गैरशासकीय आस्थापनात स्वत: पुढाकार घेवुन हा विषय लोकांच्या पचनी पाडतात. .
गेल्या महिन्याभरापासुन यमराजाचा वेष धारण करुन वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळण्याचा आग्रह धरतायेत.नुकताच त्याना किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार प्राप्त झाला. झी २४ तासने बातमीही केलीय त्यांच्यावर. तंत्रस्नेही शिक्षक समूह या माध्यमातून काका , राज्यभरातील शिक्षकांसोबत जोडले गेले आहेत. सोप्या सोप्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून शिक्षकांना ते साहित्य पुरविणे असाही एक उपक्रम ते राबवितात . . .
काकांची अन माझी ओळख झाली ती गोदा परिक्रमेत, त्यानंतर आम्ही सोबत कचरा व्यवस्थापनावर भरपूर कार्यक्रम केले. २४ ऑगस्ट ला खोडाळ्याजवळ वाकडपाडा गावात ' रानभाजी महोत्सवाला ' आम्ही सोबत होतो. तिथे मिलिंद काका उपस्थित महिला बचत गटासोबत पाणी शुद्धीकरण , आणि पाणी व्यवस्थापनावर संवाद साधत होते....
लेखक - डॉ. वैभव दातरंगे, नाशिक.....

श्री.उमाकांत श्रीराम निखारे, माजी मुख्य अभियंता, नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे..
समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. गणेशोत्सव निमित्य अश्याच काही हटके व्यक्तीमत्वांची दखल घेवून, या सुखवार्ता शेअर कराव्या असं ठरवलंय. . .
जानेवारी 2017 पासून श्री. उमाकांत निखारे NTPC, एकलहरे, नाशिक येथे रुजु झाले. अवघ्या 3 महिन्याच्या काळात युनिट भोवतीच्या मोकळ्या जागेचं रुपडे पालटुन 'श‍ांती वन' उभारले.
एकलहरा नाशिक येथे स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्त केंद्र व वसाहत, शून्य कचरा प्रकल्प, वनीकरण, मियावाकी घनवन, रेन वॉटर हार्वेस्टिंग असे एक ना अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले.
सुका कचरा व ओला कचरा वेगळा करुन योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सुका कचरा संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. ओला कचर्‍याची उद्गमस्थळीच विल्हेवाट लावण्यासाठी घरच्या घरी खत बनविणारे मॅजिक बॉक्स वापरण्यासाठी प्रोत्साहीत केले. तर प्लास्टीक मुक्त अभियानासाठी प्लास्टीकला पर्याय म्हणून कापडी पिशवी बनविण्यासाठी जुने कपडे संकलन केंद्र उभारले आहे.
श्री निखारे यांनी इ-वेस्ट संकलन केंद्र सुध्दा उभारले आहे. हे सर्व करत असतांनाचा हे केंद्र ''शुन्य गळती केंद्र“ म्हणून उपाययोजना सुरु आहेत पाणी, कोळसा, ऑईल, वाफ, हवा, सांडपाणी याची गळती शून्य करण्याचे ध्येय आहे.
आपल्या कार्यकाळात प्रकल्प परिसरात ४० हजारहुन अधिक वृक्षारोपण, तसेच प्रकल्पांतर्गत रोपवाटिका, सीड बॉल बनविण्याचे वर्कशॉप आयोजित केले.
"घन कचरा व्यवस्थापन" संदर्भाने एकलहर‍ा कॉलनी अन् प्लांटच्या भेटीदरम्यान प्रत्येक ठिकाणी निसर्गाशी जुळवुन घेण्याची ही आग्रही मांडणी मला विशेष भावली. कार्यकक्षेबाहेर जावुन आपली आग्रही भुमिका इतरांना पटेपर्यंत सातत्याने प्रयत्न करत राहणे ही यांची खुबी. .
आणखी एक विशेष मांडायचं ते म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी या प्लांटवर महिनाभराची प्लेसमेंट सुरु करुन Hands on Practical experience देण्याचा निखारेंचा प्रयत्न तर सार्‍याच शासकिय आस्थापनांनी अनुकरण करण्यासारखा आहे. ३० ऑगस्ट १९ ला ते निवृत्त झालेत. अधिकाराचं जोखड दूर झालं तरी निसर्गावर प्रेम मात्र कायम राहील.
© डॉ. वैभव दातरंगे, नाशिक....

फुटूवाला's picture

27 Sep 2021 - 8:26 pm | फुटूवाला

शकुंतला मंकड - नाशिक
गेल्या ४० वर्षापासुन सामाजिक कार्य हेच कार्यक्षेत्र असणार्‍या शकुंतला मंकड 'शकुअक्का' नावानेच जास्त प्रसिद्ध आहेत.
विविध समाजसेवी संस्थांसोबत अमरावती, निपाणी कर्नाटक आणि वैतरणा, इगतपुरी परिसरात महिला आरोग्य हा जिव्हाळ्याचा विषय घेवुन अक्कांच काम सुरु आहे.
आरोग्य शिक्षण, महिला व बाल आरोग्य, कुपोषण या बाबत सतत मिळेल त्या व्यासपीठाचा आधार घेवुन अगदी शेवटच्या घटकाच्या चुलीपर्यंत पोहोचण्याची आक्कांची हातोटी. एक मिनिट अगोदर परिचय झालेल्याही जन्मांतरीचा परिचय असावा अश्या आपुलकीनं आक्का बोलतं करतात.
सध्या आदिवासी आश्रमशाळातील मुलग्या मुलींना जीवनकौशल्य प्रशिक्षण देण्यात आक्का बिझी आहेत. लिंगभाव, लैंगिकता या तसं म्हटलं तर भुवया उंचावणार्‍या विषयावर आक्का समोरच्याला लिलया बोलतं करतात.
आदिवासी चालिरिती, भाषा, सवयी वेळप्रसंगी पेहराव आत्मसात करुन आपला मुद्दा पटवुन देणार्‍या आक्कांशी संवादाला खर तर भाषेचही बंधन नाहीय. पांढरपेशा डॉक्टरी व्यवसायातुन सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा अक्कांकडुन मी 'उत्साह' शिकलो. . .
©डॉ. वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे
नाशिक.

फुटूवाला's picture

27 Sep 2021 - 8:27 pm | फुटूवाला

सतिश शिर्के - माणगाव, रायगड...
सतिशचं परफेक्ट वर्णन करणारा शब्द म्हणजे अवलिया. दक्षिण रायगडसारख्या पोटार्थी परिसरात हा माणुस घरपोच वाचनालय चालवायचा. पुस्तकमित्र म्हणुनच ओळख आहे सतिशची.
भटक्या सतिश डोंगरदर्‍यात, सागरकिनारी सतत भटकत असतो. रायगडावर तर असंख्य आवर्तन झाली असतील.
आताशा जरा स्थिरावलाय ते वडघरच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची दैनंदिन जबाबदारी सांभाळतोय म्हणुन. इथेही समविचारी मित्रपरिवाचारा भला थोरला गोतावळा जमवलाय. स्मारकातल्या युवा छावणी, अभिव्यक्ती शिबिर, वर्षारंग असे एक ना अनेक उपक्रम जणु या प्राण्याला किक मिळवण्यासाठीच आखले जातात.
समुद्रकिनार्‍यावरचं कासव संवर्धन असो की महाडमधलं गिधाड संवर्धन, सतिशचे इनपुटस् असतातच.
या अनवट वाटेवर सतिश आपल्या लेकीलाही चालायला शिकवतोय. आमची ओळखही इथेच झाली. आमचं गुळपीठ अन् सतिशची स्वरा गोरेगावच्या ना.म. जोशी प्राथमिक शाळेत एकत्र होत्या. ओलं न होता तीरावर बसुन मजा घ्यायच्या स्वभावानं या प्राण्यापासुन चार हात लांबच राहिलो कायम. समानाने समानाची वाढ होते या तत्वाने न जाणो याची लागण आपल्यालाही व्हायची, या भीतीने. . .
©डॉ. वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे
नाशिक.

कुमार१'s picture

27 Sep 2021 - 9:04 pm | कुमार१

४ ही उत्तम माहिती
छान !

सतिश गावडे's picture

27 Sep 2021 - 11:14 pm | सतिश गावडे

काही वेळा आपल्या आजूबाजूला खूप काही घडत असते आणि बरीच माणसं खूप काही करत असतात, मात्र याबद्दल आपल्याला त्याची कल्पना नसते.

सतिश शिर्के चक्क माझ्या गावाच्या वेशीवर कार्यरत आहेत. वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक माझ्या गावापासून दोन किमी आणि शेतापासून चालत दहा मिनिटांवर आहे.

गावी गेल्यावर शक्य झाल्यास हा संदर्भ देऊन त्यांची भेट घेईन :)

कुमार१'s picture

27 Sep 2021 - 9:10 pm | कुमार१

कोविड १९ च्या भारतातील संशोधनात मिळालेला एक महत्त्वाचा पुरस्कार :
श्री. शैलेंद्र कवाडे
अध्यक्ष व कार्यकारी संचालक,
मायलॅब diagnostics यांना

ET Startup Award मिळाले होते.
..............................

मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सम्मान पुरस्कार . त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला.

कुमार१'s picture

28 Sep 2021 - 8:41 am | कुमार१

Analytics इंडिया या नियतकालिकाच्या वतीने दरवर्षी AI क्षेत्रातल्या 50 नामवंतांची यादी जाहीर होते. यंदा या यादीत दीनानाथ खोलकर, उपाध्यक्ष, टीसीएस यांचा समावेश झालेला आहे.

श्रीरंग_जोशी's picture

28 Sep 2021 - 9:13 am | श्रीरंग_जोशी

परसिस्टंट कंपनीचे संस्थापक आनंद देशपांडे यांच्याबाबत ही गौरवास्पद बातमी.

Indian Tech Founder’s Persistence Pays Off And Makes Him A Billionaire.

या धाग्यासाठी धन्यवाद.