चालू घडामोडी - भाद्रपद शके १९४३ (भाग २)

निनाद's picture
निनाद in राजकारण
10 Sep 2021 - 4:53 pm

चालू घडामोडी - भाद्रपद शके १९४३ (भाग २)
सप्टेंबर २०२१

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Sep 2021 - 9:44 pm | चंद्रसूर्यकुमार

गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेन्द्र पटेल उद्या आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करणार आहेत. नव्या मंत्रीमंडळात २७ सदस्य असतील आणि विजय रूपाणींच्या मंत्रीमंडळातील एकाही सदस्याचा नव्या मंत्रीमंडळात समावेश नसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे नितीन पटेल, सौरभ पटेल वगैरे ज्येष्ठ मंत्र्यांनाही वगळले जाईल असे दिसते. गुजरातमध्ये सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या १८ महिन्यांचा अपवाद वगळता भाजप मार्च १९९५ पासून सलग सत्तेत आहे. २५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर लोकांमध्ये 'भाजप फटीग' आला असेल तर त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांसकट सगळे मंत्रीमंडळ नव्या चेहर्‍यांनी भरलेले असेल तर जुन्यांविरोधातील प्रस्थापितविरोधी मतांचा तितका त्रास होणार नाही असे काहीसे गणित असावे असे वाटते.

गुजरात मध्ये मुख्यमंत्री सहित पूर्ण मंत्रिमंडळ पूर्णतः नवीन लोकांनी स्थापित करण्याचा अती धाडशी प्रयोग bjp नी केला आहे.
ह्या त्यांच्या धाडसाला त्रिवार सलाम.
मोदी ची गुजरात मध्ये प्रचंड लोकप्रियता असल्या मुळे बंड होण्याची शक्यता नगण्य आहे
वर्षांवर्ष जागा आडवून बसलेल्यांना हकले च पाहिजे.
हा प्रयोग आम्ही खूप वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायती मध्ये केला होता सर्व वरिष्ठ नेहमीचे सभासद बदलून फक्त तरुण लोकांना ग्रामपंचायती मध्ये निवडून दिले होते.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-terrorists-arrested-shoc...
दिल्ली मध्ये काही अतिरेक्यांना पोलिस नी पकडले आहे .त्यांची चौकशी चालू आहे .चोकशी मध्ये ते अतिरेकी जे माहिती देत आहेत ती मीडिया कडे पोचतेच कशी?
१४ बांगला भाषा बोलणारे अतिरेकी बंगाल मध्ये आहेत अशी त्यांनी माहिती दिली आणि बालिश भारतीय मीडिया नी प्रसिद्ध केली.
संबंधित लोक सावध झाली असतील.
तपास पूर्ण होई पर्यंत कोणतीच गुप्त माहिती जाहीर करू नये ते देशाच्या हिताचे नाही.हे बालिश भारतीय मीडिया ला कधी समजणार.
२६/११ पण लाईव्ह पोलिस कारवाई,कमांडो कारवाई भारतीय बालिश मीडिया नी दाखवली होती.
त्या मुळे कमांडो आणि पोलिस ह्यांचे जीव धोक्यात आले .
लपलेल्या अतिरेक्यांना पोलिस काय कारवाई करणार आहेत हे लाईव्ह दिसत होते.

श्रीगुरुजी's picture

16 Sep 2021 - 2:41 pm | श्रीगुरुजी

शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाला, मनसे बरोबर चाचपणी सुरू आहे. पुढचा साथीदार संभाजी ब्रिगेड असू शकते.

https://www.lokmat.com/maharashtra/chandrakant-patils-reaction-purushott...

Rajesh188's picture

16 Sep 2021 - 3:02 pm | Rajesh188

ह्या प्रश्न ची कोणी तरी व्याख्या ध्या
राजकीय पक्षाची व्याख्या.
१)पाकिस्तान ,चीन,बांगलादेश ह्यांना देशातील प्रतेक वाईट गोष्टी साठी दोषी ठरवणे.
..२) देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे कोणतेच कार्य करायचे नाही फक्त मुस्लिम कसे दुश्मन आहेत,ब्राह्मण कसे दलितांचे दुश्मन आहेत,दलित कसे फुकटे आहेत ह्या वर च चर्चा करायची.
३)देशातील भ्रष्ट व्यवस्था,न्याय कधी मिळणार च नाही अशी स्थिती असलेली अतिशय स्लो न्याय व्यवस्था अनागोंदी कारभार,चोर,गुंड, लबाड,ह्यांचे लाड.
ह्याला काहीच महत्व न देता मुस्लिम,दलित,पाकिस्तान,अफगाणिस्तान ,हिंदू ह्या वर च चर्चा करणे हा राष्ट्रवाद.
अशी राजकीय पक्षांची राष्ट्र वादाची व्याख्या आहे .त्या मध्ये सेना तरी बसत नाही.
पण देशाचे सत्ता धारी फिट बसत आहे.

श्रीगुरुजी's picture

16 Sep 2021 - 7:57 pm | श्रीगुरुजी

संभाजी ब्रिगेडच्या दबामामुळे पुण्याच्या जिजामाता उद्यानातील लालमहालातील शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा महापालिकेने तोडून कचऱ्याच्या गाडीत टाकून नेला. संभाजी ब्रिगेडनेच संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा तोडला. हा पुतळा तोडण्यास चिथावणी देणाऱ्या व नंतर पुतळा तोडणाऱ्यांना ५ लाखाचे बक्षीस देणाऱ्या नितेश राणेला भाजपने पक्षात आणून आमदार केले व त्याच्या तीर्थरूपांना खासदार करून केंद्रात मंत्रीपद दिले. ब्राह्मण महिलांविरूद्ध अत्यंत खालच्या दर्जाचे बीभत्स लिहिणारा पुरूषोत्तम खेडेकर हा तर संभाजी ब्रिगेडचा संंस्थापक. ही संघटना पराकोटीची ब्राह्मणद्वेषी आहे.

या संघटनेने भाजपशी युती करण्याबद्दल बोलल्यानंतर तातडीने नाही म्हणण्याऐवजी, त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही त्यावर विचार करू असे चंपाने सांगून एक दार उघडे ठेवले आहे.

प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून जनसंघ व भाजपला मतदान करणाऱ्या ब्राह्मण मतदारांना याने गृहीत धरले आहे. हा माणूस व त्याचा मालक यांच्याबद्दलची चीड दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सत्तेसाठी हे दोघे प्रत्येक दिवशी एक नवीन खालची पातळी गाठत आहेत.

ज्याप्रमाणे राहुल गांधी देशपातळीवर कॉंग्रेस संपवित आहे, तसेच सत्तेसाठी वखवखलेले हे दोघे महाराष्ट्रात भाजप संपवित आहेत.

नावातकायआहे's picture

16 Sep 2021 - 2:47 pm | नावातकायआहे

उठसुट रा.स.सं. आणि ब्राम्हंणांना शिव्या देणार्या १७व्या धर्मातील शिवश्री खेडेकर यांचे व्यक्तव्य...

https://www.youtube.com/watch?v=erpoyiSBjYs

श्रीगुरुजी's picture

16 Sep 2021 - 4:05 pm | श्रीगुरुजी

भाजपला सध्या दाऊद इब्राहिम किंवा हफीज सईद सुद्धा साथीदार म्हणून चालेल.

खरंय. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मत देतांना दहादा विचार केला जाईल. संघानेही यावेळेस मदत न करण्याचे धोरण ठेवावे. एकदा चांगले भोवले की मग हे माजोरडे ताळ्यावर येतील

Rajesh188's picture

16 Sep 2021 - 10:51 pm | Rajesh188

त्याचा अर्थ मला अजून पण समजला नाही.नुकतेच bjp सरकार सत्तेवर आले होत.
२०१४ चा काळ.
गावातील राजकारणात बदल दिसू लागला.एफबी,you tube सारख्या समाज माध्यमावर वेगळ्याच प्रकारचा प्रचार सुरू होता..
हिंदू वर टीका करणारे नेते तयार केले गेले.हे नेते हिंदू च, आणि हिंदू प्रेमी सुद्धा .पण टीका हिंदू वर.जाती वर..
नक्की हे काय चाललं आहे तेच समजत नव्हत.
त्या राजकारणाचा अर्थ तेव्हा मला समजत नव्हतं.
संभाजी ब्रिगेड ची स्थापना पण त्याच काळातील.
आणि अशा अजुन काही संघटना त्या वेळी निर्माण झाल्या.
ह्या संघटना निर्माण करण्यात कोणता तरी राजकीय पक्ष सहभागी आहे पण उघड ते सांगितले जात नाही.
पण राष्ट्रवादी वर सर्वांचा संशय आहे.
Bjp ल कमजोर करायचे असेल हिंदू मधील जाती जाती मध्ये द्वेष निर्माण करणे आणि bjp ची व्होट बँक तोडणे हा हेतू असावा असे आता वाटत आहे.
मराठा मोर्चा,धनगर मोर्चा,ओबीसी मोर्चा ह्याच काळात निघाले..

नावातकायआहे's picture

16 Sep 2021 - 11:56 pm | नावातकायआहे

गंदी नालीका किडा, नीच, हिटलर, भिकारी मोदी, सरकारचा, बीजेपी चा , संघोट्यांचा  त्वरित पाडाव होवो.  हे अभद्र सरकार लवकर पडो. 
२०२४ मधे सोनीया ,राहुल ,रॉबर्ट , प्रियांका, मीराया , रेहनजी यांचे सरकार कुणाचाही पाठिंबा न घेता (५४३/५४३) सत्तेवर येवो आणि त्यांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पं.प्र, उप पं.प्र पासून विरोधी पक्षनेते पर्यंत आणि त्या खाली / वर / मधे /समांतर असतील ती सर्व पदे मिळोत आणि टकाशेर भाजी टकाशेर खाजा ह्या न्यायानी सर्व स्वस्त होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना!

Rajesh188's picture

17 Sep 2021 - 2:20 pm | Rajesh188

पाहिले काँग्रेस नी काय केले ते बघा आणि शिका..
Bjp नी जातीत अडकलेल्या हिंदू ना एकत्र केले ह्या विषयी आम्ही विरोधी मत व्यक्त करत असलो तरी त्याची जाणीव आहे.

यूपी ,बिहार मधील यादव,मुस्लिम हे समीकरण तोडून यादव जाती ल हिंदू असल्याची जाणीव करून दिली.
समीकरण तुटले आणि लालू,मुलायम खरी बसले.
खूप मोठे अवघड काम होते bjp te पूर्ण केले..
दरवाढ हा सामान्य लोकांचा जिव्हाळा चा विषय असतो.
दोन वेळ पोट भरेल इतका रोजगार आणि जीवन आवशक्य वस्तू स्वस्त असाव्यात ही अपेक्षा .
बस हेच सामान्य लोकांना हवं असते आणि तेच मतदार आहेत.
Bjp नी तिकडे लस द्यावे बाकी हिंदू म्हणून bjp ला कोणताच हिंदू विरोध करत नाही.
जातीय राजकारण करणाऱ्या लोकांचे नांगे ठेचून काढा.
एवढे केले तरी खूप झालं

श्रीगुरुजी's picture

17 Sep 2021 - 7:55 pm | श्रीगुरुजी

काल एका समारंभात एका वक्त्याने चंपाचा उल्लेख माजी मंत्री असा केल्यानंतर, माजी म्हणू नका असे चंपाने सांगितले. त्यावर प्रश्न विचारल्यावर, २-३ दिवसात कळेल अशी चंपाने पुडी सोडल्याने गॉसिप सुरू झाले.

आज एका समारंभात काही भाजप नेत्यांच्या उपस्थितीत उठांनी, माझे आजी माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी, अशी सुरूवात केल्याने गॉसिप अजूनच वाढले.

भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार अशी अनेक वाहिन्यांवर जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप-शिवसेना एकत्र येणार, राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार असे अंदाज काही पत्रकार जूनपासून वर्तवित आहेत. उठा-मोदी भेट, पवार-मोदी भेट, पवार-शहा भेट, चंपा व उठाची वक्तव्ये यातून पत्रकारांना जोरदार खाद्य मिळाले आहे. परंतु अजून तरी पुढे काही झालेले दिसत नाही.

कोणत्याही परिस्थितीत उठा मुख्यमंत्रीपद सोडणार नाहीत असे मला वाटते. गरज असेल तर भाजपने सेनेला पाठिंबा द्यावा पण मुख्यमंत्रीपद सेनेकडेच राहील यावर उठा ठाम राहणार. भाजपला मुख्यमंत्रीपद हवे असेल तर ते फक्त राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानेच मिळू शकेल.

सेना किंवा राष्ट्रवादी यांच्यापैकी कोणाच्याही नादी लागले तर वर्तमानात व भविष्यात भाजपला खूप मोठी किंमत द्यावी लागेल व महाराष्ट्रात भाजप संपेल हे नक्की.

क्रूर आक्रमक हिंदु संस्कृतीचा विध्वंस करणारा बख्तियार खिलजी च्या नावावर असलेले बख्तियारपुर हे नाव बदलण्यास नितीश कुमारांनी नकार दिला आहे. यामुळे बहुदा त्यांच्या मुस्लिम मत पेटीला धक्का लागण्याची शक्यता असावी असे दिसते.
आमदार हरिभूषण ठाकूर यांनी बख्तियारपूरचे नितीश नगर असे नामकरण करण्याचे सुचवले होते . बिस्फी विधानसभेचे आमदार ठाकूर म्हणाले “जर अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज होऊ शकते तर बख्तियारपूर चे नितीश नगर का नाही? त्याचे नाव बदलून नितीश नगर करावे.

अंमलबजावणी संचालनालय, प्रमुख आर्थिक गुन्हे अन्वेषण संस्था, पूर्वीच्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे (एनएसी) माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या घरावर छापा टाकला आहे.
हर्ष मंदेर हे जॉर्ज सोरोस, ओपन सोसायटी फाउंडेशन्स यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय अनुदान निर्माण नेटवर्कचे सल्लागार मंडळ सदस्य आहेत. मँडर यांनी संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरूला फाशीतून वाचवण्यासाठी दया याचिकाही दाखल केली होती.
सध्या जॉर्ज सोरोस हे जगात देशभक्तीशी लढण्यासाठी १ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च करत आहेत. त्यांना राष्ट्रवाद पसंत नाही आणि जगात साम्यवादी सत्ता आणायची आहे. मात्र त्यासाठी लागणारे पैसे मात्र ते लोकशाही देशा असलेल्या व्यवसायातून मिळवतात.

श्रीगुरुजी's picture

18 Sep 2021 - 1:54 pm | श्रीगुरुजी

पंजाबात राजकीय भूकंप

https://www.loksatta.com/desh-videsh-news/punjab-captain-amarinder-singh...

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Sep 2021 - 2:40 pm | चंद्रसूर्यकुमार

काही महिन्यांपूर्वीपर्यंत पंजाबात अमरिंदर आरामात जिंकतील असे वातावरण होते. पण काँग्रेस हायकमांडने अमरिंदर आपल्यापेक्षा मोठे होतील असे वाटून त्यांच्या गळ्यात नवज्योत सिध्दू हे लोढणे अडकवले. त्यातून आज ही वेळ आली आहे. तथाकथित शेतकरी आंदोलनाचे अमरिंदरसिंग जन्मदाते आहेत. नंतर तो प्रकार आपल्या नियंत्रणाबाहेर गेला हे त्यांच्या लक्षात आले असले तरी असल्या प्रकाराला राजाश्रय द्यायचे पाप कायमचे त्यांच्या माथी लागणारच. त्यामुळे त्यांच्याविषयी फार सहानुभूती नाही. तसेच सी.ए.ए प्रकरणावरूनही कॉंग्रेसचे अट्टल पुरोगामी धर्मनिरपेक्ष नेते असतात तसेच अमरिंदरही वागले होते. फक्त ३७० व्या कलमावरून कॉंग्रेसच्या इतरांपेक्षा थोडी वेगळी भूमिका त्यांनी घेतली हे पुण्य त्यांच्याकडे आहे. तेव्हा अमरिंदरविषयी फार सहानुभूती आहे असे अजिबात नाही.

पण या प्रकारातून पंजाबात पोकळी निर्माण होत आहे. अकाली दल हा पक्ष पूर्वीपेक्षा बराच कमजोर झाला आहे. अकाली दलाचे ग्रामीण भागातील शीख मतदार आणि भाजपचे शहरी भागातील हिंदू मतदार एकत्र येऊन ती बर्‍यापैकी व्होटबँक बनत असे. आता अकालींनी भाजपची साथ सोडली आहे आणि पूर्वीइतका जोर त्यांच्यात राहिलेला नाही हे चित्र दिसते. २०१४ मध्ये आम आदमी पक्षाने पंजाबातील १३ पैकी ४ लोकसभेच्या जागा जिंकून मोठी मुसंडी मारली होती पण २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचे विमान जमिनीवर आले. तसेच पतियाळाचे डॉ. धर्मवीर गांधी हा चांगला नेता पक्ष सोडून गेला. हरविंदरसिंग फुलका हा दुसरा चांगला नेताही आता तितका सक्रीय दिसत नाही. सध्या भगवंत मान सारखे विदूषकच आघाडीवर दिसतात. पण या निर्माण झालेल्या पोकळीचा आम आदमी पक्षाला फायदा झाला तर ती वाईट गोष्ट असेल. पंजाबमधील आपला कॅनडातील शिखांचे मोठे समर्थन आहे असे मागे वाचले होते. कॅनडात मोठ्या प्रमाणावर खलिस्तान समर्थक आहेत. तसेच २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस प्रचार करायला पंजाबात आलेले केजरीवाल एका माजी खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी उतरले होते (त्यामुळेच काँग्रेसमागे हिंदू मते एकवटली आणि काँग्रेसला ११७ पैकी चांगल्या ८० जागा मिळाल्या). त्यामुळे आपची सहानुभूती खलिस्तानवाद्यांना (किंवा उलटे) असेल आणि या पोकळीचा फायदा आपला झाला तर ते देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाईट असेल.

अमरिंदरसिंग आता पुढे काय करतात हे बघायचे. त्यांचे वय ७९ असल्याने आपला नवा प्रादेशिक पक्ष काढणे वगैरे प्रकार ते करायला जातील ही शक्यता त्यामानाने कमी दिसते. तसेही मागच्या निवडणुकांच्या वेळेसच 'ही माझी शेवटची निवडणुक' असे ते म्हणत होते. पण समजा अमरिंदरसिंगांनी आपला पक्ष स्थापन केला तर भाजपने त्यांच्याशी उघड/छुपी युती करावी असे वाटते. पंजाबच्या शहरी भागात हिंदूंमध्ये भाजपला बर्‍याच प्रमाणात पाठिंबा आहे. नुसत्या तेवढ्या मतांच्या जोरावर भाजप फार जागा जिंकू शकत नाही पण बरोबर अमरिंदरसिंगांची मते आली आणि त्यातून पंजाब विधानसभा त्रिशंकू झाली तर निदान खलिस्तानवाद्यांचे समर्थन असलेले सरकार पंजाबमध्ये सत्तेत येण्यापासून रोखता येऊ शकेल. अमरिंदरसिंगांविषयी अजिबात सहानुभूती नाही. वर म्हटल्याप्रमाणे काँग्रेसी संस्कृतीचे अर्क ते आहेत. पण खलिस्तानवाद्यांना सहानुभूती असायची शक्यता असलेले सरकार सत्तेत येण्यापासून रोखणे हे अधिक महत्वाचे असेल म्हणून भाजपने तसे नक्कीच करावे असे वाटते.

श्रीगुरुजी's picture

18 Sep 2021 - 3:02 pm | श्रीगुरुजी

पंजाबात यावेळी आआपला २०१७ पेक्षा जास्त मते व जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. जर कॉंग्रेसने सिधूसारख्या आचरट विदूषकाच्या नादी लागून अमरिंदरसिंगांना राजीनामा द्यायला लावून उर्वरीत ४-५ महिन्यांसाठी वेगळा मुख्यमंत्री निवडला तर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव नक्की आहे व त्या परिस्थितीत पंजाबात आआपचे सरकार येईल.

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Sep 2021 - 3:24 pm | चंद्रसूर्यकुमार

दुसर्‍या बाजूला आपकडून भगवंत मान असेल तर तो पण विदूषकपणात कमी आहे असे अजिबात नाही. त्या परिस्थितीत भगवंत मान आणि सिध्दू यांच्यात माकडचाळ्यांची स्पर्धा चालेल. तसे झाल्यास पंजाबमधील निवडणुक कोणत्याही राज्यपातळीवरील मुद्द्यावरून न होता स्थानिक पातळीवर जे उमेदवार लोकप्रिय असतील ते निवडून येतील आणि कोणा एका पक्षाच्या बाजूने लाट वगैरे काही नसेल.

सुबोध खरे's picture

18 Sep 2021 - 6:43 pm | सुबोध खरे

श्री मोदींनी नव्हे तर श्री राहुल गांधी यांनीच काँग्रेस मुक्त भारत करण्याचा चंग बांधला आहे असे दिसते.

कॉंगफ्रेस मध्ये जी काही चांगलीमंडळी होती त्यांना एका मागोमाग मुखभंग करून एक तर पक्ष सोडण्यास भाग पडले जात आहे किंवा अडगळीत टाकले जात आहे.
ज्योतिरादित्य शिंदे नंतर सचिन पायलट आणि आता श्री अमरिंदर सिंह हे त्यातल्या त्यात चांगले असलेले नेते असून त्यांना राहुल गांधीपेक्षा डोईजड होऊ नयेत म्हणून बाजूला टाकले आहेत. बाकी बहुसंख्य नेते उदा कपिल सिब्बल, अभिषेक सिंघवी, रणदीप सुरजेवाला- हे अजिबात जनाधार नसलेले आहेत.
उद्या काँग्रेसच्या जागा २५-३० इतक्या कमी झाल्या तर या भंपक माणसांना राज्यसभेवर निवडून जाणे सुद्धा कठीण होईल.

पंजाब राज्य हरियाणा आणि हिमाचल प्रदेश वेगळा झाल्यावर तेथे शीख पंथ सोडून दुसरा मुख्य मंत्री होऊ दिला जात नाही असा इतिहास आहे. सद्य स्थितीत कोणत्याच पक्षाकडे मुख्यमंत्री बनण्या साठी चांगला शीख नेता मला तरी दिसत नाही. श्री नवज्योत सिद्धू याना मुख्यमंत्री केले तर काय स्थिती होईल हे सांगणे कठीण आहे परंतु त्यांची वैचारिक बैठक पाहता ते निदान खलिस्तानवाद्यांकडे जाणार नाहीत असे वाटते. अन्यथा श्री भगवंत मान आणि त्यांच्यात कोण जास्त वाईट हे ठरवणे कठीण आहे. श्री भगवंत मान हे कधी कधी शुद्धीत असतात असा त्यांच्या बद्दल प्रवाद आहे.

बाकी पुढची पाच वर्षे पंजाब मध्ये अधांतरी विधानसभा येईल असे वाटते. याचा भाजप ने पूर्ण फायदा करून घेतला पाहिजे.

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Sep 2021 - 3:15 pm | चंद्रसूर्यकुमार

अमेरिका-इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांदरम्यान AUKUS (ऑस्ट्रेलिया-युके-युएस) हा संरक्षणकरार झाला. त्यानंतर अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुडी विकायची घोषणा केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने फ्रान्सबरोबर पारंपारीक (आण्विक नाही) पाणबुड्या विकसित करायच्या २०१६ पासून चालू असलेल्या प्रकल्पातून माघार घ्यायची घोषणा केली. त्यामागचे कारण कळले नाही पण कदाचित आण्विक पाणबुडी मिळत असेल तर मग पारंपारीक पाणबुड्यांची तितक्या प्रमाणावर गरज राहणार नाही हे कारण असावे का? कल्पना नाही. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामधील हा करार अनेक बिलिअन डॉलर्सचा होता म्हणजे मोठ्या रकमेचा होता. हा करार गेल्यामुळे फ्रान्सचे बरेच व्यावसायिक नुकसान होणार आहे. आणि हे सगळे झाले अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुडी विकायच्या निर्णयामुळे. त्यामुळे फ्रान्स संतप्त झाला आहे आणि अमेरिकेने आपला विश्वासघात केला असे म्हटले आहे. तसेच फ्रान्सने अमेरिकेतील आणि ऑस्ट्रेलियातील आपला राजदूतही परत बोलावला आहे. दुसर्‍या देशातून राजदूत परत बोलावणे ही खूप टोकाची स्थिती निर्माण झाल्यावरच केले जाते. कारगील युध्द चालू असतानाही आपला राजदूत पाकिस्तानात होता. तो परत बोलावला नव्हता. २००१ मध्ये संसदभवनावर हल्ला झाल्यानंतर तो परत बोलावला गेला होता. सांगायचा उद्देश हा की इतक्या टोकाच्या परिस्थितीतच हे पाऊल उचलले जाते.

ट्रम्पतात्या अध्यक्ष असताना अमेरिकेचे मित्रदेशांशी संबंध बिघडतील म्हणून भिती व्यक्त केली गेली होती. जागतिक आरोग्य संघटना वगैरे चीनच्या गुलाम संघटनांना मदत थांबविणे, यु.एनचा मानवाधिकार आयोग वगैरे बेगडी लोकांची मदत थांबविणे हे चांगले निर्णय तात्यांनी घेतले होते. तसेच शीतयुध्द संपून इतकी वर्षे झाल्यानंतरही नाटोच्या माध्यमातून युरोपातील मित्रदेशांचे संरक्षण करायची जबाबदारी अमेरिकेने आपल्या अंगावर घ्यायची गरज नाही असे म्हटले होते. त्यातून हे संबंध बिघडतील अशी भिती व्यक्त केली जात होती. पण तसे काही झाले नाही. मात्र जगभरातील विचारवंतांच्या गळ्यातील ताईत जो बायडन अध्यक्ष झाल्यावर मात्र अमेरिकेचे मित्रदेशांशी संबंध बिघडताना दिसत आहेत.

निनाद's picture

18 Sep 2021 - 4:04 pm | निनाद

सद्य घटनांचा चांगला उहापोह केला आहे.

प्रत्यक्षात विक्षिप्त विधाने व ट्विट सोडले तर ट्रम्प यांनी राजकारण/ निर्णय अपेक्षेबाहेरील जबादारपणाने केले...

पण बायडन इज पथेटीक

फ्लोरिडामध्ये पुढील ऑक्टोबर महिना 'हिंदू वारसा महिना' म्हणून साजरा केला जाईल. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनी स्वतः लेखी घोषणा केली आहे.

श्रीगुरुजी's picture

18 Sep 2021 - 5:36 pm | श्रीगुरुजी

बाबुल सुप्रियोने तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Sep 2021 - 12:34 pm | चंद्रसूर्यकुमार

पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण असेल या प्रश्नाचे उत्तर शोधताना काँग्रेस चाचपडताना दिसत आहे. सोनिया गांधींनी अंबिका सोनींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण आपल्याला त्यात स्वारस्य नसल्याचे अंबिका सोनींनी सांगितले आहे. नवज्योतसिंग सिध्दू बरोबरच काँग्रेस नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष बलराम जाखड यांचे चिरंजीव सुनील जाखड यांचीही नावे चर्चेत आहेत. त्याप्रमाणेच माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवा, अमरिंदरसिंगांच्या मंत्रीमंडळातील मंत्री विजय इंदर सिंगला यांची नावेही चर्चेत आहेत.

१९६६ मध्ये पूर्वीच्या मोठ्या पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब आणि हरियाणा या राज्यांची स्थापना झाली. त्यापूर्वी गोपीचंद गुज्जर, भीमसेन सच्चर वगैरे हिंदू मुख्यमंत्री झाले होते. पण १९६६ नंतर पंजाबमध्ये एकही हिंदू मुख्यमंत्री झाला नाही. अशा परिस्थितीत जर अंबिका सोनी, सुनील जाखड ही नावे चर्चेत असली तरी ते बरेच मोठे स्थित्यंतर असेल.

पंजाबमध्ये काँग्रेससाठी इतके अनुकूल वातावरण काही महिन्यांपूर्वीच होते- जर कोणते राज्य काँग्रेस नक्कीच जिंकेल अशी खात्री देता येईल असे एक राज्य असेल तर ते पंजाब अशी परिस्थिती होती. असे असताना काँग्रेसने स्वत:च्या हाताने आपल्याच गळ्याला नख लावले आहे असे दिसते. गेल्या काही महिन्यात भाजपनेही उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलले. पण ती प्रक्रीया कोणताही त्रास न होता एकदम सरळ मार्गाने पार पडली. काँग्रेसच्या बाबतीत पंजाबात तसे होताना दिसत नाहीये.

श्रीगुरुजी's picture

19 Sep 2021 - 1:05 pm | श्रीगुरुजी

पंजाबात हिंदू मुख्यमंत्री केला तर खलिस्तानवादी, अकाली दल इ. ना एक शीख अस्मितेचा जोरदार मुद्दा हातात मिळेल. त्यामुळे कॉंग्रेस हिंदू मुख्यमंत्री निवडेल असे वाटत नाही.

श्रीगुरुजी's picture

19 Sep 2021 - 6:52 pm | श्रीगुरुजी

शेवटीकॉंग्रेसने पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी रामदासिया या दलित शीख जातीच्या चरणजीत सिंह चन्नी यांची निवड केली आहे. कॉंग्रेस शीख नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचे धाडस करणार नाही असा अंदाज होताच. असे धाडस कॉंग्रेसमध्ये पूर्वी फक्त इंदिरा गांधी करीत होत्या.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Sep 2021 - 2:39 pm | चंद्रसूर्यकुमार

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी महिला कल्याण मंत्रालय बंद करण्यात आले आहे आणि त्या इमारतीत सद्गुणांचा प्रसार करायला आणि दुर्गुणांना रोखायला स्थापन केलेल्या नव्या मंत्रालयाला जागा दिली आहे. आता सद्गुण आणि दुर्गुण म्हणजे काय हे कोण ठरवणार? तर अर्थातच शरीया कायद्यामध्ये जे अपेक्षित आहे तसे वर्तन म्हणजे सद्गुण आणि त्याविरोधातील वर्तन म्हणजे दुर्गुण. सौदी अरेबियातही रियाधमध्ये धार्मिक पोलिस असतात आणि धर्माविरोधात वर्तन झाल्यास ते जागच्या जागी फटके मारतात असे ऐकले आहे. खखोदेजा. तशाप्रकारे सद्गुणांचा प्रसार करायला हे नवे मंत्रालय असणार असे दिसते. आणि अफगाणिस्तानात महिला कल्याणमंत्रालय हवे कशाला? त्याची गरजच काय? नाहीतरी स्त्रियांना घरी कोंडूनच राहायचे असणार आहे आणि बाहेर पडताना नवरा, वडिल, भाऊ किंवा मुलगा यांच्याबरोबरच बाहेर पडायचे असेल तर मग वेगळ्या महिला कल्याणमंत्रालयाची काहीच गरज नाही!!

आता हे नवे तालिबान आहे- हे तालिबान २.० आहे असा घोषा लावणारे जगभरातले विद्वान लोक यावर काय म्हणणार हेच बघायचे.

Rajesh188's picture

19 Sep 2021 - 11:35 pm | Rajesh188

ह्यांची अशीच अधोगती होत राहवी,नवीन शोध,यंत्र,तंत्र ह्यांच्या इथे कधीच लागू नयेत .ह्यांना अर्वाचीन काळात च जगू ध्या.
जे काही नवीन शोध लागतील,नवीन यंत्र ,तंत्र,हत्यार निर्माण होतील ह्याची कोणतीच माहिती ह्यांच्या शी शेअर जगाने करू नसे.. नवं उपचार,औषध,लसी,ही माहिती पण ह्यांच्या शी शेअर करू नये..
अल्ला च्या भरवश्यावर ह्यांना राहू ध्या..
पण पाश्चिमात्य राष्ट्र नालायक आहेत.पैसे मिळावे म्हणून ह्यांना आधुनिक हत्यार,औषध पुरवत असतात...
दारूडा दुश्मन असेल तर त्याची दारू सोडवू नका स्वतःच्या पदरची पाजा ..
धोका पूर्ण टळेल.
मुस्लिम राष्ट्र अजुन धर्मांध आणि अर्वाचीन काळात जातील तेवढे जगाच्या फायद्याचे आहे.

रात्रीचे चांदणे's picture

20 Sep 2021 - 9:19 am | रात्रीचे चांदणे

पोलिसांनी किरीट सोमय्यांना कराड स्थानकातून ताब्यात घेतले. काल मुंबईत ही त्याना स्थानबद्ध केले होते. सोमय्यानी केलेले आरोप खरेच असण्याची शक्यता आहे नाहींतर सोमय्यांना एव्हढा त्रास दिला नसता.

पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजितसिंग चन्नी यांनी शपथ घेतली आहे. नवज्योत सिध्दू कधीपासून मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेऊन होता. कॅप्टननंतर आपणच मुख्यमंत्री होणार असे सिध्दूंना वाटत होते. आता सिध्दू हे कसे काय मान्य करणार हे बघायचे.

पंजाबमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदरसिंग (तसेच अजून पूर्वी बियंतसिंग) असे हायप्रोफाईल नेते होते. त्या तुलनेत चरणजितसिंग चन्नी हे तितके वरीष्ठ नाहीत.

channi

केंद्रात bjp सत्तेवर आहे विरोधही काँग्रेस सह बाकी पक्ष आहेत.
ह्या विरोधी पक्षांनी सामान्य लोकांना रोज च्या जीवनात येणाऱ्या अडचणी विषयी किती आंदोलन केली.
उत्तर
एक पण नाही.
ह्यांची आंदोलन कोणती CAA ला विरोध .
ह्या मध्ये सामान्य लोकांचे कोणते हित आहे .
राजकीय पक्षांची राजकीय आंदोलन सामान्य लोकांच्या प्रश्न पासून खूप लांब जात आहेत.
पण मूर्ख जनता राजकीय पक्षांच्या डावपेचात उगाचच सहभागी होत असते.
महाराष्ट्र मध्ये bjp विरोधी पक्षात आहे .
Bjp ची आंदोलन,विरोध
अर्णव साठी
सुशांत साठी.
कंगना साठी.
हे संपले की
.
राणे साहेबांचे माकड चाळे,फडणवीस,चंपा,किरीट ह्यांचे तमाशे.
सर्व च्या सर्व राजकीय पक्ष सामान्य लोकांच्या हिता साठी विरोध आंदोलन करणार नाहीत आणि करत ही नाहीत.
कारण सामान्य लोकांस राजकीय पक्षाचं राजकीय तमाशा चाच आवडत आहे.
त्यांना स्वतः लाच स्वहित समजत नाहीत.
शिक्षित देशातील अशिक्षित जनता इथे च एकवटली आहे.

सुबोध खरे's picture

20 Sep 2021 - 6:10 pm | सुबोध खरे

बरं मग ?

चंद्रसूर्यकुमार's picture

20 Sep 2021 - 4:18 pm | चंद्रसूर्यकुमार

शेतकर्‍यांसाठी आपला गळा चिरून ठेवेन असे विधान पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी केले आहे.

https://maharashtratimes.com/india-news/we-will-waive-water-and-electric...

आठ वर्षांच्या एका हिंदू मुलावर ईशनिंदा केल्याचा आरोप झाल्यानंतर, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका मशिदीतून पाणी आणण्यासाठी एका हिंदू कुटुंबाला मारहाण करून ओलीस ठेवण्यात आले.

गेल्या आठवड्यातील एका घटनेनुसार, आलम राम त्याची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह कच्चा कापूस काढत होता. जेव्हा हे कुटुंब जवळच्या मशिदीत नळाचे पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले तेव्हा त्यांना स्थानिक जमीनदार आणि त्यांच्या माणसांनी मारहाण केली. हिंदू कुटुंब कापूस उतरवून घरी परतत असताना त्यांना जमीनदारांनी उचलले आणि एका आऊट हाऊसमध्ये ओलिस ठेवले. मशिदीच्या पावित्र्याचे उल्लंघन केल्याबद्दल रामच्या कुटुंबावर पुन्हा अत्याचार करण्यात आले.
नंतर काही स्थानिक रहिवाशांनी कशीबशी या कुटुंबाची सुटका केली.
पीडीत हिंदु असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.

पाकिस्तानात हिंदु ३८% होते आता फक्त ०.२% उरले आहेत.
हे सर्व लोक कुठे गेले याचा काहीही तलास लागत नाही म्हणजे त्यांना वरील प्रमाणे त्रास देऊन धर्मांतरीत केले गेले आहे. किंवा मारून टाकले आहे.

पीडीत १४ वर्षीय सरकारी शाळेत विद्यार्थिनी आहे. इशाक अलीने आपली ओळख लपवून मुलीशी मैत्री करण्यासाठी स्वतःला राज म्हणून ओळख दिली होती. नंतर, जेव्हा तिला त्याची खरी ओळख कळली तेव्हा तिने त्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. मात्र, तो मागे हटला नाही आणि मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिला. त्याने तिला तिचे आयुष्य उध्वस्त करण्याची आणि तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली.

शुक्रवारी तो पीडितेचा पाठलाग करून जबरदस्तीने तिच्या घरात घुसला. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ती ओरडू लागली. पीडित मुलीचे कुटुंबीय आणि शेजारी तिच्या मदतीला धावले आणि इशाकला ताब्यात घेतले. पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली.

लव्ह जिहाद हे प्रथमतः केरळातील चर्च उघडकीस आणले होते. त्या नंतर शिक्षा म्हणून त्या फादरचे हात छाटले गेले होते असे म्हणतात. हे लव्ह जिहाद चे प्रकार देशभर पसरलेले आढळून येतात. यात एका पद्धतीने मुस्लिम नसलेल्या मुलींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न दिसून येतो.

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Sep 2021 - 6:57 pm | चंद्रसूर्यकुमार

कॅनडामध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाला ३३८ पैकी १५८ तर विरोधी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ११९ जागा मिळाल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकांमध्ये ट्रुडोंच्या पक्षाला १५५ जागा होत्या तर विरोधी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ११९ जागाच होत्या. लवकर निवडणुका घेण्यामागे बहुमत मिळवायचा ट्रुडोंचा हेतू साध्य झालेला दिसत नाही. ट्रुडो हरायलाच हवा होता. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीये.

श्रीगुरुजी's picture

27 Sep 2021 - 8:27 am | श्रीगुरुजी

आज भारत बंद आहे म्हणे.

चौथा कोनाडा's picture

27 Sep 2021 - 5:46 pm | चौथा कोनाडा

फक्त दिल्ली-गुरुग्राम इथंच परिणाम दिसतो आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/farmer-death-protest-singhu-border-...

चौथा कोनाडा's picture

27 Sep 2021 - 5:44 pm | चौथा कोनाडा

आज खा. रामदास आठवले म्हणाले " सोनिया मॅडम यांनी मनमोहन सिंह यांच्या ऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करायला हवे होते"

शरद पवार पंतप्रधान झाले असते तर काय असले असते आजचे चित्र ?

श्रीगुरुजी's picture

27 Sep 2021 - 6:12 pm | श्रीगुरुजी

२००४ मध्ये कॉंग्रेसचे १४५ खासदार होते. कॉंग्रेसबरोबर युती केलेल्या लालूच्या राजदचे २४ खासदार होते, द्रमुकचे १६ खासदार होते तर राष्ट्रवादीचे ९ खासदार होते.

कोणत्या आधारावर कॉंग्रेसने आपल्या पक्षाचा पंतप्रधान न करता, मोठ्या सहकारी पक्षांचा पंतप्रधान न करता, सोनिया गांधींच्या परकीय मुळाला आक्षेप घेणाऱ्या पवारांना पंतप्रधान करायला हवे होते?

श्रीगुरुजी's picture

27 Sep 2021 - 6:14 pm | श्रीगुरुजी

ममोऐवजी पवार पंतप्रधान असते तरी पवारांची राजवट ममोंएवढीच वाईट असती.

सुबोध खरे's picture

27 Sep 2021 - 6:18 pm | सुबोध खरे

दीड टक्का खासदार असलेल्या माणसाला कोणत्या आधारावर पंतप्रधान करायचे?

बाकी श्री रामदास आठवले याना तर संसदेत सुद्धा कुणी गंभीरतेने घेत नाही हे त्यांच्या असंख्य व्हिडिओमधून स्पष्ट होतं .

श्रीगुरुजी's picture

27 Sep 2021 - 6:28 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रातील फक्त काही जिल्ह्यांंच्या बाहेर प्रभाव नसलेल्या पवारांना सुद्धा राष्ट्रीय पातळीवर कोणीही गांभीर्याने घेत नाही. मोदी पवारांना बरोबर मॅनेज करतात. त्यामुळे ३७० कलम रद्द करणे, तोंडी घटस्फोटावर बंदी घालणे, कृषी विधेयके, नागरिकत्व सुधारणा कायदा अशा महत्त्वाच्या विधेयकांना संसदेच्या बाहेर पवार विरोध करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदेतील खासदार विधेयकांवर मत न देता अनुपस्थित राहतात व मोदींना मदत करतात.

श्रीगुरुजी's picture

29 Sep 2021 - 6:39 pm | श्रीगुरुजी

सिधूच्या चिथावणीला बळी पडून कॉंग्रेस श्रेष्ठींंनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून अमरिंदरसिंगांना हटविले. परंतु आपल्याला मुख्यमंत्री न केल्याने नाराज झालेल्या सिधूने राज्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ नवीन मुख्यमंत्री चन्नींच्या मंत्रीमंडळातील एक मंत्री रझिया सुलताना व अजून दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. आता काही वेळापूर्वी अमरिंदर सिंगांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. ते भाजपत येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री कालच आआपमध्ये सामील झाले. सुश्मिता देव तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाल्या. तर दुसरीकडे भारताचे तुकडे करण्यासाठी अल्लाची दुवा मागणारा कन्हैया कुमार कॉंग्रेसमध्ये सामील झाला. गाळातून अजून गाळात अशी कॉंग्रेसची अवस्था होत आहे.

सुबोध खरे's picture

29 Sep 2021 - 7:04 pm | सुबोध खरे

श्री मोदी याना जे हस्तांदोलन करतात त्यांचा सुपडा साफ होतो अशी वदंता आहे.

ट्रम्प झाले. आताच मर्केल बाई झाल्या

आपले काँग्रेसचे महायुवा नेते तर भर संसदेत स्वतः त्यांच्या गळ्यात पडले होते.

मग काँग्रेसचे अजून काय होणार?

श्रीगुरुजी's picture

29 Sep 2021 - 7:52 pm | श्रीगुरुजी

बळजबरीने मोदींच्या गळ्यात पडून पप्पूजी आपल्या आसनाकडे परत जाताना मोदींनी त्यांना थांबवून त्यांच्या बरोबर हस्तांदोलन केलं होतं.

Bjp ची उचलबांगडी दिल्ली आणि बाकी राज्या मधून होणे गरजेचे आहे.
आघाडी सरकार विरोधी पक्ष स्थापन करतील .असंख्य लोक आताच्या पंतप्रधान पेक्षा कर्तुत्व वान आहेत कोणी ही ते पद सांभाळेल.

सुबोध खरे's picture

29 Sep 2021 - 8:01 pm | सुबोध खरे

तुम्ही व्हा पंतप्रधान
आणि
कोरडे साहेबाना आरोग्य खाते द्या
हा का ना का