1

गणपतीचे रहस्य

Primary tabs

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in काथ्याकूट
8 Sep 2021 - 9:02 pm
गाभा: 

गणेशोत्सव दोन दिवसा वर आला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या गणपतीचे रहस्य या शीर्षकाखाली प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने एक लेख प्रसिद्ध होत आहे. यावर कोणी प्रकाशझोत टाकू शकेल का ?

प्रतिक्रिया

परिंदा's picture

9 Sep 2021 - 6:15 am | परिंदा

या लेखाची लिंक आहे काय?
म्हणजे लेख वाचुन मत मांडता येईल

सुनिल पाटकर's picture

9 Sep 2021 - 9:47 am | सुनिल पाटकर
सुनिल पाटकर's picture

9 Sep 2021 - 9:47 am | सुनिल पाटकर
सुनिल पाटकर's picture

9 Sep 2021 - 9:48 am | सुनिल पाटकर
सुनिल पाटकर's picture

9 Sep 2021 - 9:50 am | सुनिल पाटकर
सुनिल पाटकर's picture

9 Sep 2021 - 9:51 am | सुनिल पाटकर
सुनिल पाटकर's picture

9 Sep 2021 - 9:53 am | सुनिल पाटकर

गणपतीचे रहस्य

*- मा.प्रबोधनकार सीताराम ठाकरे*
*सन: ७/२/१९५८*

*.... गणपतीचे रहस्य ....*

(शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री तसेच उद्धव व राज ठाकरे यांचे आजोबा यांच्या लेखणीतून सदर इतिहासत्मक खुलासा)

पोस्ट थोड़ी मोठी आहे.
पण, डोळे उघडे ठेऊन वाचा

_बुद्ध म्हणजेच अष्टविनायक...!!! आणि "गणपति बाप्पा मोरया " म्हणजे "चन्द्रगुप्त मोरया "._

_लोकशाही युगामधे देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे. तसेच, प्राचीन भारतात राजेशाही मधे गण संस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती म्हणत._

_या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला. तोच पुढे या गण संस्कृतीमध्ये शाक्य गणांचा राजा झाला. कालांतराने सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केले._

_आता... खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांमधील फरक समजुन घेउया..._

_काही चलाख ब्राम्हण मनुवाद्यांनी ख-या गणपतीलाच काल्पनिक गणपति बनविला._

_बुद्ध, हा शाक्य गणांचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत. त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणांचा प्रमुख झाला. गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे. गणपती असे म्हणत._

_पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला. बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा सन्देश द्यायचे, तेंव्हा त्यांच्या सन्देशामधून दोन शब्द निघायचे._

_चित्त आणि मल्ल._

_चित्त म्हणजे शरीर,_
_मल्ल म्हणजे मळ._

_तुमच्या शरीरातून मळ काढून टाका, म्हणजे तुम्ही दुखा पासुन मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे._

_पण ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावूनपार्वतिला शरीरातून मळ काढावयास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार करावयास सांगितला._

_तसेच, बुद्ध हा नागवंशीय होता. पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती. म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता. बुद्धांची आई महामाया निद्रस्थ अवस्थेत होती, तेंव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की, तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे._

_याचा अर्थ असा की, हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतिक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतिक आहे. आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे. म्हणून ब्राम्हण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली...!!!_

_उन्दराची किंवा बैलाची मान का नाही लावली..??_

*…अष्टविनायक…*

_जगामध्ये दुख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता, आणि दुख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले. प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुख नष्ट होते, हे बुद्धानेच सिद्ध करुन दाखविले. ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुखा पासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला._

_म्हणजे दुखाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता. म्हणून, लोक बुद्धाला सुखकर्ता आणि दुखहर्ता असे म्हणत._

_मग ब्राम्हण समाजाने स्वरचीत काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुखहर्ता असे म्हटले._

_बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे._

_मुक्या प्राण्याची मान गणपतीला लावली, अशा हिंसाचारातुन जन्मास आलेला गणपति सुखकर्ता दुखहर्ता होउ शकतो काय...???_

_काल्पनिक गणपतिने बुद्धत्व प्राप्त करुन दुक्खाला नष्ट करणाऱ्या, अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही._

_मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुखहर्ता कसा...???_

_बुद्धाने दुक्ख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा म्हणजे अष्टांग मार्गांचा अष्टशिलांचा शोध लावला. म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत._

_मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले. याचा अर्थ असा की, गणपति हा दूसरा तीसरा कोणी नसून बुद्धच आहे...!!!_

_पण, ब्राम्हण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपति बनवुन बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. आणि देवांची निर्मिती करुन स्वत्ताला देवासमान मानून स्वत्ताचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले. आणि बहुजन समाजाला गुलाम केले..._

*…मोरया…*

_पुढे चन्द्रगुप्त मोर्य हा मोर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्रह्मंनानी "गणपती बाप्पा मोर्या" अश्या घोषणा दिल्या._

_मोर्या शब्दाबद्दल आजही भारतीय समजामधे संभ्रम आहे....!!!_

_कर्नाटक मधे चन्द्रगुप्त मोर्य ने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वताच्या नावा पुढे मोर्या शब्द लावायचे._

_महाराष्ट्रामधील मोरे आडनाव सुद्धा मोर्य वंशाचे अपभ्रंश आहे. संत तुकाराम हे मोरे होते.....!!!_

_१४ व्या शतकात एक मोर्या गोसावी च्या नावावर मोरया शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली._

_ब्रह्मणांनी तुकाराम महाराजांची आणि पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या. नंतर_

_बौद्ध लेण्या आणि विहारांचे ठिकाण काबिज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसवीणे सुरु केले._

_कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामाये ला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरुप दिले._

_जुन्नर च्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपति बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले._

_शेलारवाडी, पुणे च्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले._

_कारण... खरा इतिहास असा आहे की, प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता._

_पण, ब्राह्मणांनी अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली. आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला._

_या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपति होउन गेले, त्याच गणपति शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करुण समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला._

_आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर सम्पूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करुण ब्राह्मण धन दौलत मिळवतात._

_प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो._

*- प्रबोधनकार ठाकरे*

....

साहना's picture

9 Sep 2021 - 12:21 pm | साहना

नाही. हा तो लेख नसावा. मी पाहिलेला लेख प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या पुस्तकाचा एक फोटो होता आणि त्यातील लेखन थोडे बीग्रेडी वाटले तरी इतके भडक आणि तद्दन मूर्खपणाचे नव्हते. वरील लेख फॉरवर्ड करणारी मंडळी मूर्ख असायला पाहिजे. कधी कधी ज्या गोष्टी वायरल होतात त्यावरून माणुसकी वरचा विश्वास उडत जातो.

मी पाहिलेला लेख सापडत नसला तरी त्याची समरी मला इथे मिळाली :

https://www.deshonnati.com/article/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%...

प्रबोधनकार ठाकरे ह्यांनी आदी शंकराचार्यांनी बौद्ध धर्माचा ऱ्हास केला, बुद्धांचे शिरकाण केले, त्यांचे विहार नष्ट केले असे लिहिले आहे. ह्याला पुरावा शून्य असून ठाकरे है कम्युनिस्ट इतिहास विकृती करणला कदाचित बळी पडले असावेत. बौद्ध धर्माचा ऱ्हास ह्या विषयावर साक्षात आंबेडकर ह्यांनी विपुल लेखन केले आहे आणि त्यांचा पूर्वग्रह इग्नोर करून वाचल्यास ते बरोबर आहेत असेच वाटते.

पण सत्य हे एकच असणार..विचारवंत पण ठराविक हेतू नी प्रेरित असतात त्या नुसार च व्यक्त होत असतात..

प्रबोधनकार चा विचार त्यांच्या मुलांनीच स्वीकारला नाही तर लोक काय स्वीकारणार.

सुनिल पाटकर's picture

10 Sep 2021 - 4:40 pm | सुनिल पाटकर

प्रतिसाद आवडला

जालावर शोध घेतल्यावर साधारण २ व्हिडियो आणि काही दुवे दिसले. लेख बोगस आहे आणि एकंदर वाचल्यावर हा बीग्रेडी आहे असे वाटते.
फुकाचा ब्राह्मण द्वेष करणे आणि पसरवणे एव्हढच काय तो उद्देश दिसतो.
असो...

जाता जाता :- गणपती बाप्पा मोरया [ यातील मोरया हा मोरया गोसावी यांच्या नावातुन आलेला असुन, मी चिंचवडला जाऊन 'मोरया गोसावी' गणपती मंदिरात दर्शन घेतलेले आहे. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ganpati Bappa Lavkar Ya | New Ganpati Song 2021| Pranjal Mandlik

प्रकाश घाटपांडे's picture

9 Sep 2021 - 11:38 am | प्रकाश घाटपांडे

गणपतीचा शोध घेण्याचा प्रयत्न प्राच्य संशोधकांनी आपापल्या परीने केला. मी गणपतीचा शोध हा एक चिकित्सक लेख ऐसी अक्षरेवर आलेला वाचला होता. वाचनीय लेख आहे.

शाम भागवत's picture

10 Sep 2021 - 5:14 pm | शाम भागवत

मला तरी लेखांपेक्षा, त्यावर आलेल्या अभ्यासू प्रतिक्रिया जास्त आवडल्या.
:)

शाम भागवत's picture

11 Sep 2021 - 10:58 am | शाम भागवत

पण "मन" यांच्या दोन्ही सविस्तर प्रतिक्रिया जास्त भावल्या कारण त्या वास्तवाशी भान राखणाऱ्या वाटल्या.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Sep 2021 - 4:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

विनोदी लेख आहे.

दिवसेंदिवस ठाकरे आडनावावरचा विश्वास उडत चाललाच आहे. त्यात हे असे सत्यापलाप करणारे कायप्पी ढकलसंदेश भरच घालत आहेत.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

9 Sep 2021 - 5:06 pm | रावसाहेब चिंगभूतकर

मोबाईल टेक्नॉलॉजी ही सामान्य माणसाच्या हाती देणे हे चुकीचे आहे या माझ्या मताला असल्या लेखांमुळे बळकटी मिळत नाही का? सर्वसामान्य लोकांना अक्कल नसते आणि कुठलीही revolutionary गोष्ट सामान्य लोकांच्या हातात देताना 10 वेळा विचार करायला हवा. नाही तर मग असले सगळीकडे पसरलेले लेखच खरे मानले जाऊ शकतात.

त्यांचे प्रगत वैज्ञानीक शोध जगापासुन लपवुन ठेवले होते… आजच्या घडीला जे सायंसला माहीत आहे त्याच्या १८८ पट जास्ट ज्ञान आपल्याकडे पुर्वीच शोधलेले आहे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

10 Sep 2021 - 5:06 pm | रावसाहेब चिंगभूतकर

गॉडजीला साहेब, टोमणा कळला. माझ्या मते sceptical सूर "सारे मानव समान" नावाच्या चुकीच्या समजुती मधून येतो. पण जगात काहीही फेअर नसतं, काहीही equal नसतं. साऱ्या मानवांना समान संपत्तीचे वाटप, समान ज्ञानाचे वाटप आणि समान संधीचे वापर या कवी कल्पना आहेत. ते झालं तर निदान विचार तरी करता येईल की सर्वांना समान अधिकार आणि समान असावे. पण ते नसल्यास सामान्य माणसाच्या हाती अणूशक्ती सोपवणे धोकादायक ठरू शकेल. म्हणून जर कोणी म्हणलं की सरकार कडेच फक्त अणुबॉम्ब का? सामान्य माणसाच्या हातात का नाही, तर आपण त्याला मूर्खात काढू. सोशल मीडिया हे तसेच मोठे शस्त्र आहे आणि अतिशय अज्ञानी जनतेच्या हातात ते दिलं गेलंय. माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर आग लागणारच. माझ्या मते इथे दुसरं आउटपुट अपेक्षित नाही. जर कोणाची देखरेख नसेल तर सज्जन माणूस सुद्धा गुन्हेगारासारखं वागू शकतो, आणि इथे या पोखरलेल्या लोकांवर कुणाचीच देखरेख नाही. मला शक्य असेल तर मी या साऱ्यांच्या हातातून मोबाईल्स काढून पुस्तके सोपवेन. मार्क माय वर्ड्स. आपण त्यांना अतिशय धोकादायक खेळणं सोपवलेलं आहे.

गॉडजिला's picture

10 Sep 2021 - 5:26 pm | गॉडजिला

आजच्या घडीला जे सायंसला माहीत आहे त्याच्या १८८ पट जास्ट ज्ञान आपल्याकडे पुर्वीच शोधलेले आहे.

माझा प्रतिसाद फक्त रावसाहेब ह्यांच्या कमेंट शी संबंधित आहे मूळ पोस्ट शी नाही.
सोशल मीडिया ही सर्वांसाठी उपलब्ध नसली पाहिजे कारण लोक तेवढी विचारी नसतात असे त्यांचे मत आहे.
सोशल मीडिया चा वापर करून धर्माची,बदनामी जाणून बुजून केली जाते चुकीचे दाखले दिले जातात .
आणि त्या पोस्ट वाचून अविचारी लोक ती खरे मानतात असे त्यांचे मत आहे .
आणि ते बिलकुल चुकीचे नाही.
पण विचारी लोक कोण अविचारी लोक कोण हे कसे ठरवणार.. .
शिक्षित व्यक्ती विचारी च असतो असे नाही किंवा अशिक्षित व्यक्ती अविचारी असतो असे पण नाही..
सोशल मीडिया वर पोस्ट चा हेतू ठरवून ती पोस्ट करण्यासाठी पैसे मोजावे लागले पाहिजेत.
हा एक उपाय आहे.
धार्मिक,जातीय,राजकीय ,पोस्ट टाकायची असेल तर शब्द नुसार प्रचंड चार्ज लावावा.
आणि ती पोस्ट किती दिवस राह्यली पाहिजे त्या साठी पण वेळे नुसार चार्ज लावावा.

आपोआप फुकट चंबू लोकांचे धंदे बंद होतील.

गॉडजिला's picture

10 Sep 2021 - 7:39 pm | गॉडजिला

...

तूम्ही अप्रत्यक्ष बंधनेच आणत आहात... आणि वरून खाजगी कंपन्यांचे खिसे देखील भरायाचे उद्योग सुचवत आहात तुमच्या निरासग प्रतिसादांना प्रतिवाद नाहीच

Rajesh188's picture

10 Sep 2021 - 6:23 pm | Rajesh188

ह्याच्या पुढे जावून तुम्ही हे पण बोलाल.
सर्वांना योग्य प्रतिनिधी निवडण्याची अक्कल कुठे आहे तेव्हा मतदान चा हक्क फक्त .
पोस्ट ग्रॅ्युएशन केलेल्या लोकांनाच हवा.
हे असे नसते.
सर्वच लोक ज्ञानी असतात फक्त क्षेत्र वेगळी असतात.
मानव हा प्राणी निसर्गाने निर्माण केलेल्या एकाच साच्यातून निर्माण होतो.

गॉडजिला's picture

10 Sep 2021 - 6:49 pm | गॉडजिला

लगे रहो राजेशभाई

अशा बुध्दी भेद करणाऱ्या लेखामुळे लोकांच्या श्रद्धा,समजुती ,विश्वास कधीच कमी होत नाही.
गणपती ची आता जी प्रतिमा आहे तीच लोकांच्या मनात आहे.इतिहास संशोधन च्या नावाखाली काय काय विचित्र दावे केले जातात ते हास्यास्पद च आहेत.
प्राचीन,अर्वाचीन,अशा अनेक गोष्टी चे संदर्भ देवून जो निष्कर्ष हे विचारवंत काढतात तो पण असत्य च असतात.

याबद्दल काय म्हणाल ?
ज्ञानेश्वर स्वतंत्र प्रतिभा असलेले होते,
खूप आधी (12 th शतकात) होऊन गेले,

ॐ नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या।।
जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।
देवा तूंचि गणेशु। सकलमती प्रकाशु।।
म्हणे निवृत्ती दासु। अवधारिजो जी।।
अकार चरण युगुल। उकार उदर विशाल।
मकर महामंडल। मस्तकाकारे।।
हे तिन्ही एकवटले। तेथे शब्दब्रम्ह कवळले।

या देशांचे हेच वैशीष्ठ्य आहे... ते मुस्लिम बहुल देश आहेत हे खरं पण त्यांचे मुळ व वारसा हिंदु संस्कृती आहे हे ते मोकळेपणाने मान्य करतात व जपतातही...

कपिलमुनी's picture

11 Sep 2021 - 1:46 pm | कपिलमुनी

त्यांनी टाकलेल्या पाट्यांना शून्य किंमत आहे.

कोणतेही रेफरन्स नसतात. ते स्वतः संशोधक नाहीत.

त्यांना फाट्यावर मारलेले आहे