1

शांतीचा रस्ता –मेहेराबाद

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in भटकंती
5 Sep 2021 - 6:58 pm

मेहेराबादला आज पहिल्यांदा गेल्यावर अगदी असं वाटलं की “तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलाशी” किंवा ही वेळेची/काळाची परिपक्वता म्हणावी लागेल.सहसा आपण वयाची परिपक्वता म्हणतो ,पण मला वेळेची परिपक्वता हा शब्द जरा योग्य वाटतो.नाहीतर एव्हढी वर्ष मी का नाही गेले तिथे?असो....

मेहेरबाबा जन्म (२५ फेब्रुवारी १८९४; - ३१ जानेवारी १९६९) हे अध्यात्मिक अवतार होते. बाबांनी आजन्म वंचितांची सेवा केली.बाबांच्या साधनेतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे १९२५ पासून देहत्यागापर्यंत त्यांनी बाळगलेले मौन ! शांततेत धर्माची मुळे आहे आणि तिच्याशी शांततेने संवाद साधता येऊ शकतो अशी बाबांची धारणा होती. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत.अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे काम अनेक क्षेत्रात असून विविध कार्यक्रम राबविले जातात.वर्षातून तीन दिवशी येथे उत्सव असतो आणि जगभरातून त्यांचे अनुयायी येथे येतात.

प्रथम दर्शनी आपल्याला दिसतो मेहेर पिलीग्रीम रित्रिट उंच दगडी वास्तू!पुढे गेल्यावर आहे मेहेर बाबांची समाधी स्थळ.भक्कम अशी दगडी छोटीशी वास्तू जिच्या वरती घुमत असून त्यावर वेगवेगळ्या धर्मांच्या चिन्हाचे छोटे बुरुज आहेत.जी सध्या बंद आहे.बाहेरून दर्शन घेता येते.बाबांच्या आजूबाजूलाच त्यांच्या मंडळींची(विविध शिष्यगण )यांच्याही संगमरवरी दगडातील समाधी आहेत .नन्तर पुढे बाबांची रसोई,टीन शेड उजवीकडे आहे. तिथे आम्हांला योगायोगाने trusty भेटले.जे वयाने खूप वृद्ध होते आणि व्हीलचेअरवर होते.नुकत्याच त्यांच्या केअर टेकरने त्यांना औषधे दिली होती.माझ्या लहान मुलीला पाहताच त्यांनी आम्हाला थांबवले आणि मेहेर बाबांचा छोटा फोटो भेट म्हणून तिला दिला.

सगळीकडे हिरवाई आणि शांतता !हा तुकडा जणू बाहेरच्या गर्दीत हवेत तरंगतो आहे असे वाटलं.फेरफटका मारताना अनेक विदेशी अनुयायी दिसले.सध्या श्रावणात हा परिसर अतिशय मनमोहक झालाय .माझ्या डोळ्यांचे खरच पारणं फिटले.असच भटकत राहिलो तर पुढे संस्थेचीच रोपवाटिका पाहिली.विविध औषधी ,फुलांची रोपं तिथे बनवून या मोठ्या जागेत लावली जाते.सागाची मोठमोठाली झाडे बहराने फुलून गेली होती. नांगरलेल शेत,पाण्याने भरलेल्या विहिरी आणि निस्सीम शांतता !अमूर्त!मध्येच एका मोरपंखी , लांब चोच असणाऱ्या इवल्या पक्षाने दर्शन दिले !
जातांना मुख्य रोडला लागवाल्यावर मेहेरागड आहे जिथे बाबा राहायचे,त्यांची धुनी आहे.पण तो बंद होता.आता नेहमी जमेल तसं इथे डोकावणार आहेच तेव्हा पुढल्यावेळी तिथे गेल्यावर याबद्दल लिहीन.

१.मेहेराबाद आराखडा

ड
२.मेहेरबाबा समाधी
c
३.
fd
४.
f
५.
th
६.
tr

खाली दिलेलं संकेतस्थलावर मेहेराबादला कसे पोहचायचे ,राहण्याची सोय काय,संस्थेचे काम काय ,कसे चालते आणि शांतीदूत मेहेरबाबा यांचे कार्य आणि समाधीस्थळ बांधणी याविषयी संपूर्ण माहिती आहे.
1

प्रतिक्रिया

कंजूस's picture

5 Sep 2021 - 7:42 pm | कंजूस

साईटही पाहिली. एकूण छान.

आणि हो तुम्ही केलेल्या सुचनेप्रमाणे लहान मुलाना प्राणी निगडीत स्थळ दाखवावे..
येताना पान्जरपोळ होते मुलीला गायी दाखवल्या,त्यामुळे ती पण खुश :)

गॉडजिला's picture

5 Sep 2021 - 9:23 pm | गॉडजिला

त्याचे फोटो कुठे आहेत ?

Bhakti's picture

5 Sep 2021 - 9:56 pm | Bhakti

फलोहार :)

तुषार काळभोर's picture

5 Sep 2021 - 10:40 pm | तुषार काळभोर

सीमा प्रदेशात असे द्विभाषिक फलक असू शकतात. उदाहरणार्थ कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा सीमावर्ती भाग.
नगर जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्राच्या बर्‍यापैकी मध्यभागी, मराठी सोडून दाक्षिणात्य भाषेतील माहिती वाचून किंचित खटकले आणि बरेच विचित्र वाटले.

नंतर नगर, औरंगाबादला निझामी /निजामी होती. त्यामुळे कर्नाटक, तेलंगणाचे लोक पसरले .

हो नाही ,मलापण तसेच वाटले . कदाचित बाबांचे जास्त अनुयायी दक्षिणात्य असावेत.मला निरीक्षण करता एकजण फोनवर दक्षिणात्य भाषा बोलणारा दिसला.

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2021 - 2:25 pm | चौथा कोनाडा

विविध भारतीय भाषांमध्ये फलक असणे चांगलेच. या मुळे त्या त्या प्रदेशातील भाषिक पर्यटक भाविकांची उत्तम सोय होणार.
भारतातच पाहण्यासारखे खुप काही आहे !

विविध भारतीय भाषांमध्ये फलक असणे चांगलेच आहे ... पण ज्या महाराष्ट्रात ते आहे .. त्या महाराष्ट्राची "मराठी" भाषा त्यात नसावी हे जरा खटकतेय.

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2021 - 8:29 pm | चौथा कोनाडा

ज्या महाराष्ट्रात ते आहे .. त्या महाराष्ट्राची "मराठी" भाषा त्यात नसावी हे जरा खटकतेय.

हा तर घोर अन्याय !

सुरिया's picture

7 Sep 2021 - 8:39 pm | सुरिया

फक्त नावे असणारे नामफलकात खरेतर देवनागरी लिपि आहे ते पुरेसे असते मराठी भाषिकांसाठी. कारण हिंदी पण देवनागरीत लिहिली जाते. मात्र काही सूचना असल्यास मात्र मराठी असावी. हिंदी येते जवळपास मराठी भाषिकांना(कशी आणि किती तो वेगळा विषय) हाच आपण आपल्यावर करुन घेतलेला अन्याव आहे.
नाहीतर नेपाळ्यांसारखी गत होते. शब पडने आता, शमजता कुच नई.

सुक्या's picture

7 Sep 2021 - 11:34 pm | सुक्या

खरं आहे हे.
बाकी तेलगु लिपीतील नामफलक हे शिर्डी ला येणार्‍या तेलगु भावीकांना आकर्षीत करण्यासाठी आहे. मार्केटिंग व्हायला पाहिजे ट्राफिक वाढवायचे असेल तर . . . :)

बाकी मर्‍हाटी वर अन्याव आमी सन करनार न्हाय सांगुन ठीवतो. जै म्हाराष्ट्र ..

ती लिपी तेलगू नसून कन्नड आहे.
तेलुगू पब्लिक साईबाबा कडे जास्त येतात.

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2021 - 12:52 pm | चौथा कोनाडा

या तीन गोष्टींमुळे अन्याव :
१) मराठी लिपी आणि हिंदीची लिपी एकच (देवनागरी) आहे. ती बदलायला लागेल. पर्याय : मोडी लिपी स्विकारणे.
२) मराठी भाषिकांना हिंदी भाषा समजते.
३) मराठी माणुस भाषेच्या हक्कासाठी भांडत नाही.

हे करायलाच लागेल, नाही तर मराठीचा अंत ठरलेलाच आहे.

सुरिया's picture

8 Sep 2021 - 1:25 pm | सुरिया

१) मराठी लिपी आणि हिंदीची लिपी एकच (देवनागरी) आहे. ती बदलायला लागेल. पर्याय : मोडी लिपी स्विकारणे.
: उलट बरे आहे, निम्म्या भारतातले आपल्याला बोर्ड का होईना वाचता येतात. मोडी लिपी कोणी दुसरे स्वीकारणार नाहीत आणि देवनागरी तर हिंदीमुळे डोक्यावर आहेच सो नवीन कोणतीतरी लिपि वापरण्यापेक्षा (मोडी जुनी असली तरी शिकावी लागेलच नव्याने, शिवाय त्याचे प्रिन्टिंग, फॉन्टस, शिक्षण, सवय, सुलभिकरण सार्वत्रिक व्ह्यायला शेकडो वर्षे लागतील) देवनागरी वापरतो तेच बरे आहे.
२) मराठी भाषिकांना हिंदी भाषा समजते.
: समजू द्यावी, बोलू नये. हिंदी भाषिकांशी रेटून मराठी बोलले की झक मारत बोलतात लोक. त्यांना जमत नसल्यास ते बघतील नाहीतर शिकतील.
३) मराठी माणुस भाषेच्या हक्कासाठी भांडत नाही.
: वापर आणि अभिमान दोन्ही असले की भांडायची वेळ येत नाही जास्त.

प्रचेतस's picture

6 Sep 2021 - 8:59 am | प्रचेतस

एका वेगळ्याच ठिकाणाची माहिती समजली.

Bhakti's picture

6 Sep 2021 - 11:28 am | Bhakti

धन्यवाद ,
आणखिन काही दुर्लक्षित ऐतिहासिक महत्त्व असणारी ठिकाणे आहेत.पुढच्या महिन्यात जाईन.

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2021 - 2:32 pm | चौथा कोनाडा

आटोपशीर सुटसुटीत स्थान ओळख ! फोटो ही समर्पक !
कामानिमित्त काहीवेळा अ.नगरला जाणे झालेय, पण या स्थलदर्शनाचे योग आलेले नाहीत !

Bhakti's picture

7 Sep 2021 - 5:35 pm | Bhakti

धन्यवाद!
इतक्या वर्षात मीच पहिल्यांदा पाहिलंय! नक्कीच भेट द्या.

गोरगावलेकर's picture

8 Sep 2021 - 11:24 am | गोरगावलेकर

नवीन जागेची ओळख आवडली

Bhakti's picture

8 Sep 2021 - 12:32 pm | Bhakti

खुप खुप धन्यवाद !