चालू घडामोडी - श्रावण-भाद्रपद शके १९४३ (भाग १)

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
1 Sep 2021 - 8:52 am
गाभा: 

चालू घडामोडी - श्रावण-भाद्रपद शके १९४३ (भाग १)
चालू घडामोडी - सप्टे २०२१ (भाग १)
यावेळी मराठी महिने वापरले आहेत.

प्रतिक्रिया

जनता जागरूक असणे खूप महत्वाचे आहे.चांगले उमेदवार निवडणे आणि त्यांनी चांगलेच राहवे म्हणून त्यांच्या वर नियंत्रण ठेवणे हे काम जागरूक जनता च करू शकते.
राजकीय पक्षाच्या नावावर कोणत्या ही गाढवाला निवडून देणारी जनता असेल तर उत्तम सरकार कधीच मिळणार नाही.

वामन देशमुख's picture

8 Sep 2021 - 10:11 pm | वामन देशमुख

मिपावर गंभीर चर्चा सुरु असताना असे प्रतिसाद अधूनमधून कॉमिक रिलीफ नामक हलकाफुलका अनुभव देऊन जातात!

😉

ज्यांना दहा बारा वर्ष मीपा वर झाली आहेत आणि mipa ही त्यांची जहागिरी समजत आहेत त्यांची प्रशासन नी लगेच हक्कल पट्टी करावी.नवीन विचार,नवीन मत,नवीन सभासद चा आदर न करता.
वडलिर्जित मालमत्ता असल्या सारखे काही जुने सभासद वागत आहेत.

सुक्या's picture

9 Sep 2021 - 1:01 am | सुक्या

Mature सभासद ची मिपा वर कमी आहे

खरं आहे तुमचं. पुर्वीचं मिपा राहिलं नाही आता ....

श्रीगुरुजी's picture

9 Sep 2021 - 8:28 am | श्रीगुरुजी

निव्वळ कचरा व अज्ञानी प्रतिसाद लिहिणाऱ्यांचे प्रतिसाद अजिबात न वाचणे हेच मॅच्युरिटीचे लक्षण आहे आणि मिपावर मॅच्युअर सदस्यांची संख्या लक्षणीय आहे.

Rajesh188's picture

9 Sep 2021 - 8:37 am | Rajesh188

शाह,मोदी, BJP ह्यांची स्तुती करणे हे ज्ञानी असण्याचे लक्षण आहे हे आम्हाला माहितच नव्हत .
ते काय दोन तीन प्रतिसाद मध्ये आम्ही पण ज्ञानी ,हुशार लोकात गणले जावू.

सारकॅझम होतं हो श्रीगुरुजी. तसंही १८८ ला कुणी सीरियसली घेत नाही ...

श्रीगुरुजी's picture

8 Sep 2021 - 10:38 pm | श्रीगुरुजी

या सदस्याचे प्रतिसाद मी वाचत नसल्याने मला कॉमिक रिलीफ मिळत नाही.

त्या मुळे बाकी विचार तुम्ही वाचणार नाही.
राजकीय पक्ष वाईट किंवा चांगला नसतो.
त्या पक्षात असणारी लोक चांगली किंवा वाईट असतात .
इतके साधे समजत नसेल तर मुश्किल आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Sep 2021 - 9:27 am | माईसाहेब कुरसूंदीकर

राजेशा, राजकीय पक्षांमध्ये साधुसंत कोणीही नाही. मग तो पक्ष काँग्रेस असो वा भाजपा वा शिवसेना वा त्रूणमूल.
आपल्या नावडीचा पक्षावर सारखी आगपाखड करून काहीही साध्य होणार नाही. सध्या भाजपाची चलती आहे हे मान्य करावेच लागेल. आणि लोकानाही समर्थ पर्याय तसा दिसत नाही. 'साधी राहणी उच्च विचासरणी" आपल्या समाजातच आता नाही तर ती नेत्यांमध्ये कुठुन येणार ?
राजकीय डावपेच कधी चुकतात तर कधी यशस्वी होतात. राणे हे शिवसेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे नेते आहेत. शिवाय ते सिंधुदुर्गात लोकप्रिय आहेत. शिवसेनेला संपवण्यासाठी त्यांना भाजपात घेतले आहे. तीच गोष्ट मानकरांची.
मोदी/शहांवर बिनबुडाची टीका न करता विरोधी पक्षांनी आपल्या प़क्षाची कशी वाढ होईल ह्यावर चिंतन केले व कार्यक्रम राबवले तरच भाजपाला पर्याय लोकांना दिसू शकतो.

श्रीगुरुजी's picture

9 Sep 2021 - 3:14 pm | श्रीगुरुजी

आधी अजितदादांना क्लिन चिट आणि आता छगनबाप्पा निर्दोष मुक्त. एकदा अनिल देशमुख सुटले की भाजप-राष्ट्रवादी युतीचा मार्ग मोकळा होईल. अभिनंदन!

https://www.loksatta.com/mumbai-news/bhujbal-reaction-after-his-acquitta...

शाम भागवत's picture

9 Sep 2021 - 3:56 pm | शाम भागवत

लोकसत्तेची बातमी आहे होय.
;)

श्रीगुरुजी's picture

9 Sep 2021 - 4:29 pm | श्रीगुरुजी

कोणत्या वृत्तपत्राच्या बातमीवर विश्वास बसेल?

प्रदीप's picture

9 Sep 2021 - 4:50 pm | प्रदीप

बातमी खरी आहे, पण त्यावरून तुम्ही काढत आहात, त्या निष्कर्षाशी सहमत नाही.

हे अशासाठी म्हणतो की:

१. कुठयातरी 'विशेष न्यायालयाने'-- म्हणजे नक्की कुठल्या असले तपशील धड देण्याची प्रथा भारतीय मीडियांत नसल्याने, तेही मी सोडून देतो--, महाराष्ट्र सरकारच्या अँटी- करप्शन ब्युरोने दाखल केलेल्या अर्जाचा निकाल दिला आहे, व श्री. भुजबळ व इतर सर्व संबंधित आरोपींना, ठोस पुराव्याअभावी निर्दोष म्हणून सोडून दिलेले आहे.

ह्याचा अर्थ हे काही कुठल्याही सरकारने, अथवा पक्षाने दबाव आणून करून घेतले असावे, असा मी तरी लावत नाही.

२. ह्याच संदर्भांत ई. डी. ने सदर आरोपींवर दुसरी एक केस दाखल केली होती, तिची सुनावणी अद्याप संपली नाही, असे हीच बातमी म्हणते.

A case filed by the Enforcement Directorate, based on this ACB case, is still pending. Bhujbal was arrested by the ED in March 2016 and was granted bail in 2018 by the Bombay High Court.

श्रीगुरुजी's picture

9 Sep 2021 - 5:05 pm | श्रीगुरुजी

काही जणांना बातमी आणि त्यावरील मत/निष्कर्ष यातील फरक समजत नाही. घडलेल्या घटनेची बातमी कोणत्याही वृत्तपत्रात छापून आली तरी फरक पडत नाही. उदाहरणार्थ जागतिक व्यापार केंद्रावर विमान धडकले ही बातमी लोकसत्ता, सामना, मटा, द हिंदू अशा कोणत्याही वृत्तपत्रात छापून आली तरी ती खरी असते. परंतु हा हल्ला कोणी केला यावरील मत व निष्कर्ष हे पक्षपाती असू शकतात.

१) हे कोणतेही विशेष न्यायालय नसून सत्र न्यायालय आहे. यानंतर उच्च न्यायालय व शेवटी सर्वोच्च न्यायालय आहे.

असा निकाल येण्यासाठी एखाद्या पक्षाने किंवा सरकारने दबाव आणण्याची आवश्यकता नसते. काही कागदपत्रे दडवून ठेवली, गहाळ केली, न्यायालयात सरकारी वकिलाने दुर्बल युक्तिवाद केला की खटला आपोआप ठिसूळ होऊन आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. २-जी खटल्यातील आरोपी यामुळेच निर्दोष सुटले होते.

भुजबळ निर्दोष सुटण्यासाठी दोन्ही सरकारांनी आपल्या अधिकारात या पद्धतीने पूर्ण प्रयत्न केले असावे असं दिसतंय कारण दोन्ही सरकारांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज होती/आहे/असेल.

२) राष्ट्रवादीची किती गरज असेल यावर या दुसऱ्या प्रकरणाचा निकाल ठरेल.

कॉमी's picture

10 Sep 2021 - 10:10 am | कॉमी

घडलेल्या घटनेची बातमी कोणत्याही वृत्तपत्रात छापून आली तरी फरक पडत नाही.

:))))))))))

शाम भागवत's picture

9 Sep 2021 - 7:32 pm | शाम भागवत

मी वर्तमानपत्रे वाचत नाही. टीव्ही पण पहात नाही. निवडणूकीची मतदान टक्केवारी पुरेशी बोलकी असते. पण याला खूप पेशन्स लागतो. म्हणजे दोन निवडणूकींच्यामधे शांत बसायची तयारी लागते.

कॉमी's picture

10 Sep 2021 - 10:13 am | कॉमी

निवडणुकीच्या मतदान टक्केवारीवरून काय निष्कर्ष निघणार काय समजले नाही.

जेल मध्ये असतानां निघत होत्या कळा... आता झालोय एकदाचा मोकळा....!!!

Rajesh188's picture

9 Sep 2021 - 6:35 pm | Rajesh188

बुलेट ट्रेन साठी जमीन हस्तातर करण्याचा ठराव मंजूर केला.ठाणे महानगर पालिका ही सेनेच्या ताब्यात आहे..
बुलेट ट्रेन प्रोजेक्ट साठी सकरत्मक निर्णय ठाणे महानगर पालिकेने घेतला ह्याचा अर्थ bjp शी सेने नी जुळवून घेतले असा नाही काढता येणार.
राजकारण वेगळे आणि असे निर्णय वेगळे त्यांची भेसळ करायची नसते.
असे पण लालू सोडले तर राजकीय आरोपांच्या धुळवडी चा परिणाम कोणत्या ही पक्षाच्या भ्रष्ट नेत्यांच्या शिक्षेत रूपांतरित झाला आहे.
शिक्षा व्हावी म्हणून आरोप केले जात नाहीत फक्त राजकीय फायदा मिळविण्यासाठी च केले जातात.
शेवटी प्रयेकाच्या नाड्या प्रत्येकाच्या हातात असतात.हमाम मैं सब नंगे.

Rajesh188's picture

9 Sep 2021 - 8:24 pm | Rajesh188

https://www.loksatta.com/maharashtra-news/pune-police-issue-lookout-noti...
समजावून थकलो राजकारण सरळ सोपे आता नाही.
आणि निष्ठावान,प्रामाणिक नेते पण आता नाहीत. राणे जे उडत होते त्यांना पडद्या आडून bjp नी च जमीन दाखवली आहे.

पाकिस्तान, बांगला देश,आता अफगाणिस्तान हे जगातील सर्वात कट्टर मुस्लिम लोकांचे देश आहेत.
राजसत्ता त्याच विचाराच्या आहेत सत्तेवर आहेत.
जगात सर्वात जास्त हलाखी चे जीवन मुस्लिम लोक ह्याच देशात जगत आहेत.
भारताला पण धार्मिक आधारावर सरकार नको आहे.
कट्टर हिंदू वादी bjp च्या राज्यात च हिंदू कमजोर झाले आहेत.
आणि मराठी वादी सेनेच्या राज्यात ४० हजार झोपड पट्टी वासिय लोकांना पक्की घर देण्यात आली
ते जवळ जवळ सर्व परप्रांतीय आहेत.
हे धार्मिक कट्टर वादी,प्रांतीय कट्टर वादी फक्त लोकांस मूर्ख बनवायचे काम करत आहेत.

मदनबाण's picture

10 Sep 2021 - 2:19 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

धर्मराजमुटके's picture

10 Sep 2021 - 6:06 pm | धर्मराजमुटके

बाकी काहीही असो मात्र मला किरीट सोमैय्या या व्यक्तीचे एका बाबतीत खूप कौतूक वाटते ते म्हणजे हा माणूस गुजराती आहे पण मुंबईच्या राजकारणात आहे म्हणून आवर्जून मराठी बोलतो. इतर परप्रांतीय आणि मराठी राजकारण्यांनी देखील नक्की हा गुण घ्यावा.

श्रीगुरुजी's picture

10 Sep 2021 - 6:32 pm | श्रीगुरुजी

सोमय्या भरपूर खोदाखोदी करून पुरावे जमवून भ्रष्टाचाराची प्रकलणे बाहेर काढून पुढे नेतात. परंतु ही प्रकरणे एकदा केंद्रीय तपाससंस्थाकडे गेली राजकीय सोयीनुसार व समीकरणांनुसार पुढील पावले पडतात. त्यामुळे ही प्रकरणे प्रलंबित अवस्थेत लोंबकळत पडली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे असूनही आजवर कोणतेही प्रकरण तडीस जाऊन भ्रष्टांना शिक्षा झालेली नाही. राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस या पक्षांनी भाजपची दुखरी नस व आपली अपरिहार्यता ओळखली आहे व त्याचा ते अचूक वापर करून निर्धास्त आहेत.

अर्थात फक्त विद्यमान केंद्र सरकारच असे करते असे नाही. यापूर्वीची केंद्र सरकारे हेच करत होती (उदाहरणार्थ मुलायम, मायावती).

मदनबाण's picture

10 Sep 2021 - 7:13 pm | मदनबाण

बाकी काहीही असो मात्र मला किरीट सोमैय्या या व्यक्तीचे एका बाबतीत खूप कौतूक वाटते ते म्हणजे हा माणूस गुजराती आहे पण मुंबईच्या राजकारणात आहे म्हणून आवर्जून मराठी बोलतो. इतर परप्रांतीय आणि मराठी राजकारण्यांनी देखील नक्की हा गुण घ्यावा.
१००% सहमत. याच बरोबर ते नेहमी पुराव्यांच्या आधारावर बोलतात आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे नेटाने लावुन धरतात, या बाबतीत ते विशेष कौतुक पात्र आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

Rajesh188's picture

10 Sep 2021 - 7:34 pm | Rajesh188

बाकी सर्व प्रांतातील लोक जे मुंबई मध्ये राहतात ते मराठी थोडेफार तरी शिकतात.आणि बोलण्याचा पण प्रयत्न करतात.
अगदी दक्षिण भारतीय सुद्धा..
ही हिंदी भाषिक जमात च कोणत्या ही प्रांतात गेले तरी त्या प्रांताची स्थानिक भाषा ,आणि संस्कृती बिलकुल आत्मसात करत नाहीत.
गुजराती आणि मारवाडी समाज जो मुंबई मध्ये राहतो.ते मराठी बोलतात. उत

नागपूर ते तारापूर रस्ता होतोय.
कोस्टल रोडही होतोय.
तारापूर ते तेरेखोल नक्की कुठून जाणारे?
कोकणची इकॉनमी सुधारणारे म्हणतात.

योगिजिनि कुठ्ल्या जाहिरातीत कलक्त्याच्या पुलाचे फोटु आपले म्हणुन वापरले म्हणे

फ्रन्ट पेज कोटिचि जाहिरात असते म्हणे

https://www.youtube.com/watch?v=NRkt21s2zfc