हिंदुत्व निळकंठी तत्त्वज्ञान

श्रीनिवास टिळक's picture
श्रीनिवास टिळक in काथ्याकूट
25 Aug 2021 - 1:55 am
गाभा: 

"हिंदुत्व निळकंठी तत्त्वज्ञान" या छोट्या पुस्तकात नवाकाळचे माजी संपादक श्री. नीलकंठ खाडिलकर यांचे हिंदुत्वावर ३३ मुद्द्यात विवेचन आहे. या प्रत्येक मुद्द्याचा एक ओळीत सारांश येथे कोणी करून दिल्यास माझे आभार मिळतील. माझ्याकडे हे पुस्तक होते पण कोणीतरी वाचायला नेले ते परत आले नाही. चौकशी करता पुस्तकाची नवीन प्रत सध्या उपलब्ध नाही. वास्तव्य परदेशात असल्यामुळे कोणाकडून आणायची शक्यता पण नाही म्हणून हि विनंती. धन्यवाद.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

27 Aug 2021 - 9:00 pm | चौथा कोनाडा

रोचक माहिती. या पुस्तकासंबधी प्रथमच वाचण्यात आले.
धाग्यावर लक्ष ठेऊन आहे. जाणकारांच्या प्रतिक्षेत !

शानबा५१२'s picture

27 Aug 2021 - 9:22 pm | शानबा५१२

नवाकाळची वेबसाईट जी HTTPS नव्हती ती काल परवा चालत नव्हती, आज चालत आहे, आजचा पेपर : http://navakal.org/images/epaper.pdf
मला नवा़काळ तेव्हाही नको होता वाचण्यासाठी. नको त्या गोष्टी वाचकावर लादणे म्हणजे व्यवसाय करणे नसते. खरा आहे त्याला तु खरा "हाय्स" व "आहेस" ह्यातला फरक समजतो.

श्रीनिवास टिळक's picture

31 Aug 2021 - 3:48 am | श्रीनिवास टिळक

नमस्ते
(१) सौ. जयश्री खाडिलकर-पांडे या नवाकाळच्या सध्या संपादक आहेत. twitter वर नवाकाळचे खाते आहे. हिंदुत्व हिऱ्याचे ३३ पैलू श्री. नीळकंठ रावांनी पाडले ते त्यांच्या हिंदुत्व पुस्तकात आहेत. ३३ ट्विट मध्ये ते जयश्री ताईंनी twitter वर प्रसिद्ध करावे असं मी त्यांना मागील आठवड्यात सुचविले होते. पण ते अजून आले नाहीत. कदाचित त्यांचा या विषयाकडे कल नसावा. असो.

(२) "Hindutva is Hinduism that resists" अशी एक नवीन व्याख्या twitter वर रूढ होत आहे. मला वाटते कि ती संस्कृत मध्ये पण असावी. म्हणून मी ती खालील प्रमाणे सुचवीत आहे "हिन्दुत्वं यत् अभिसंभवति प्रतिकरोति च तत्" [= Hinduism is that which rises above hatred and resists it] तज्ज्ञांनी त्यांचे अभिप्राय द्यावे आणि काही सूचना असतील तर कराव्या. धन्यवाद.

गॉडजिला's picture

31 Aug 2021 - 3:55 am | गॉडजिला

Hinduism is that which rises above hatred and resists it

रोचक व्याख्या आहे. अजून जाणून घ्यायला आवडेल...

रास्वसं च्या सरसंघचालकांचं "हिंदुत्व" या शब्दाबद्दल काय म्हणणं आहे तेही जाणून घेण्यास रोचक असेल.

चौथा कोनाडा's picture

31 Aug 2021 - 5:07 pm | चौथा कोनाडा

"हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत"
- डॉ बाबासाहेब आंबेडकर

श्रीनिवास टिळक's picture

1 Sep 2021 - 10:42 pm | श्रीनिवास टिळक

13-11-1927 रोजी अमरावती येथे मन्दिरे सर्वाना खुली व्हावीत या विषयावर एक सभा झाली. तिच्या अध्यक्ष पदावरून बोलताना डॉक्टर आंबेडकरांनी हे उद्गार काढले होते. धनंजय कीर यांच्या डॉक्टर आंबेडकर चरित्र या पुस्तकात ते पहायला मिळतील

समीर वैद्य's picture

1 Sep 2021 - 4:30 pm | समीर वैद्य

धर्मातील लोकांकडून हिंदुत्वाची व्याख्या ..... चालू द्या.

कपिलमुनी's picture

1 Sep 2021 - 9:20 pm | कपिलमुनी

बौद्ध धर्म कधी झाला??
बौद्ध हा हिंदू धर्माचा भाग आहे.
आणि हे वाक्य लिहिले तेव्हा आंबेडकर हिंदू होते

समीर वैद्य's picture

1 Sep 2021 - 9:48 pm | समीर वैद्य

बौद्ध हा धर्म नाहीये का? Buddhism आणि बौद्ध वेगळे आहेत असं म्हणायचं आहे का आपल्याला?

आणि हां, इथे टिचकी मारून बघा एकदा...

https://censusindia.gov.in/census_and_you/religion.aspx

प्रसाद गोडबोले's picture

1 Sep 2021 - 10:11 pm | प्रसाद गोडबोले

हिंदुत्व म्हणजे हिंदुंची विचारधारा ! पण आधी हिंदु म्हणजे काय ?
आमची हिंदु धर्माची व्याख्या :

जो, ज्यु , ख्रिश्चन आणि मुस्लिम , अर्थात एकेश्वरवादी अन "माझेच एकट्याचे खरे अन बाकीचे काफीर" असा अट्टहास बाळगत नाही तो भारतवर्षात रहाणारा प्रत्येक जण हिंदु !

ह्या व्याख्येनुसार शीख , पारशी , अहमदिया , लिंगायत , जैन आणि बहुसंख्य बौध्द , निरिश्वरवादी ज्यांना इतरांच्या श्रध्दा भंजन करण्यात रस नाहीये ते , अ‍ॅग्नोस्टिक अर्थात देव आहे की नाही वगैरे काहीच न मानणारे , वगैरे वगैरे सर्वच हिंदु आहेत !

मग हिंदु कोण नाही - कम्युनिस्ट लोकं ज्यांच्यासाठी कार्ल मार्क्स की माओ हाच एकमेव देव आहे , अन त्याच्या नावाने त्यांना हिंसा करयला काहीही वाटत नाही, निरीश्वरवादी लोकं ज्यांना इतरांचे श्रध्दाभंजन करायचे आहे , बौध्द धर्मातील काही मोजके लोकं ज्यांना "बुध्द हा विष्णुचा अवतार होता ही बहुसंख्य हिंदुंची श्रध्दा आहे" असे म्हणलेले सहन होत नाही हे सर्व अहिंदु !

अजुन सोप्पे करुन सांगायचे तर - "जगा आणि जगु द्या " हे ज्याला मान्य आहे तो हिंदु , ज्याला मान्य नाही तो अहिंदु !

ईत्यलम

आग्या१९९०'s picture

1 Sep 2021 - 10:38 pm | आग्या१९९०

गांधीजी हे हिंदू आणि त्यांची हत्या करणारा अहिंदू.

प्रसाद गोडबोले's picture

1 Sep 2021 - 10:57 pm | प्रसाद गोडबोले

एक्झॅक्टली !

अगदी १००% बरोबर !

आग्या१९९०'s picture

2 Sep 2021 - 1:14 pm | आग्या१९९०

म्हणजे गांधीजींच्या हत्याऱ्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन करणारे सगळे अहिंदू. बाब्बो!

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2021 - 2:10 pm | प्रसाद गोडबोले

तुम्हाला मॅथेमॅटिकल लॉजिक नावाची गोष्ट ऐकुन माहित आहे का ? किंवा इन जनरल लॉजिक नावाची गोष्ट माहीत आहे का ?
p=> q, q=>r , <=> p=>r हे तुम्हाला कळते का ? p=> z ह्याची ट्रुथ व्यॅल्यु ० / १ अशी अँबिग्युअस असेल हे तुम्हाला कळते का ?

किंवा तुम्ही फिलॉसॉफी मधील " मॉरल साईड ऑफ मर्डर " ह्या विषयी काही ऐकले आहे का ?

कसं झालंय की सोशल मिडीया मुळे अभ्यास न करता काहीही बोलणार्‍या लोकांची संख्या फार वाढली आहे . सगळं अवघड आहे !

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2021 - 2:25 pm | प्रसाद गोडबोले

वरील प्रतिसाद कृपया गांभीयाने घ्यावा .

हिंदु कोण ? अहिंदु कोण ? हिंदुत्व म्हणजे काय ? गांधीवध करणारा आतातायी नथुराम हिंदु की अहिंदु ? अहिंसेच्या पडद्याआड दुबळेपणा लपवुन लाखोलोकांच्या मृत्युला कारणीभुत ठरलेले गांधी हिंदु की अहिंदु ? डायरेक्ट अ‍ॅक्शन डे ला बळी पडलेले दुबळे लोकं हिंदु की अहिंदु ? डायरेक्ट अ‍ॅक्शन ला सडेतोड उत्तर देणारे हिंदु की अहिंदु ?

हे सगळे गंभीर प्रश्न आहेत . शेकडो वर्ष लोकांनी ह्या प्रश्नांवर चिंतन केलेले आहे . सोशल मीडीया फ्री आहे म्हणुन तुम्ही सहज येता जाता मताची पिंक टाकुन जायला स्वतंत्र आहात . पण ज्यांना खरेच ह्या प्रशांमागील मॉरॅलिटी , फिलॉसॉफी , लॉजिक , त्यातुन निर्माण होणारे तत्वज्ञान आणि त्याचे फ्युचर ईंप्लिकेशन्स असा जरातरी गंभीर विचार करायची इच्छा आहे त्यांच्याशी चर्चा करण्यात अर्थ आहे ! नाहीतर काहीच पॉईंट नाही !

इत्यलम .

श्रीनिवास टिळक's picture

2 Sep 2021 - 8:43 pm | श्रीनिवास टिळक

“आर्य संस्कृती” लेखक--श्रीधर स्वामी (ढवळे प्रकाशन मुंबई १९९१: १२-१४) या पुस्तकात हिंदु/हिंदू म्हणजे कोण याच्या खालील सहा व्याख्या दिल्या आहेत पण पृष्ठ क्रमांक, प्रकाशन वर्ष वगैरे इतर काही माहिती त्यात नाही, मला स्वतःला माधव दिग्विजय (# ६) ची व्याख्या आवडली-- ओंकार आणि पुनर्जन्म यांवर विश्वास, गोभक्ती, भारत देशाला गुरु समान मानणे, आणि हिंसेपासून दूर राहणे हि हिंदूंची मुख्य लक्षणे आहेत.
(टीप--मी परदेशात रहात असल्यामुळे ज्या संदर्भ ग्रंथात या व्याख्या येतात त्याबद्दल काही ज्यास्त माहिती मिळाली नाही. अभ्यासूंना यात काही भर घालता आली तर ती अवश्य करावी हि विनंती).
(१) शब्दकल्पद्रुम:-- हीनम् दुष्यतीति हिन्दुः
(२) अद्भुतकोशः-- हिन्दुर्हिन्दूश्च पुंसि द्वौ दुष्टानाम् च विघर्षणे रूपशालिनि दैत्यारौ
(३) रामकोशः-- हिन्दुर्दुष्टो न भवति नानार्यो न विदूषकः सद्धर्मपालको विद्वान् श्रौतधर्म परायणः
(४) कविकोशः-- हिन्दुर्हि नारायणादिदेवता भक्तः
(५) पारिजातहरण नाटकम्-- हिनस्ति तपसा पापान् दैहिकान् दुष्टमानसान् हेतिभिः शत्रुवर्गम् च स हिन्दुरभिधीयते
(६) माधवदिग्विजयः-- ओंकारः मूलमन्त्राध्यः पुनर्जन्म दृढाशयः गोभक्तो भारतगुरुर्हिन्दुर्हिंसानदूषकः

प्रसाद गोडबोले's picture

2 Sep 2021 - 9:28 pm | प्रसाद गोडबोले

“आर्य संस्कृती”
हे पुस्तक लहानपणी वाचल्याचे स्मरते !

बाकी आपण दिलेल्या व्यख्या रोचक आहेत

पण

ह्या सर्वच व्याख्या हजार वर्षे जुन्या आहेत , किमान पाचशे वर्षे तरी नक्कीच ! येवढ्या काळात गंगेयमुनेतुन चिक्कार पाणी वाहुन गेले आहे . त्यामुळे ह्या व्याख्यांना हट्टाग्रहाने धरुन रहाणे आपल्याला तरी जमणार नाही बुवा ! उदाहरणार्थ , माझा पुनर्जन्म वगैरे प्रकारावर मुळीच विश्वास नाही ( मुळात जन्मच नाही तर मग मृत्यु कसला अन पुनर्जन्म कसला ?) गोभक्ती वगैरे काही आपल्याला जमणार नाही , भारतीय वंशाच्या गायी दुर्मिळ होत चालल्या आहेत म्हणुन गोहत्या बंदी असावी पण तीही फक्त भारतीय गायीं बैलांना लागु असावी , होस्टेन फ्रीझेन , जर्सी , फुले त्रिवेणी , वगैरे प्राण्यांना गाय मानतच नसल्याने त्यांच्या हत्येवर बंदी कशाला असा माझा साधासा प्रश्न आहे !

असो बरंच आहे लिहिण्यासारखं पण तात्पर्य इतकेच की आपल्या व्याख्या आपल्यालाच तयार काराव्या लागतील. काळानुसार प्रवाही रहाणे , बदलत रहाणे जुळवुन घेत रहाणे हे हिंदु धर्माचे प्रमुख लक्षण आहे, म्हणुन तर अशोकाचा आतातायीपणा , शक हुण कनिष्कांचे राज्य , नंतर शांततेच्या धर्मांची आक्रमणे इतके सगळे आघात सहन करुनही हिंदु धर्म टिकुन राहिला आहे ! आपल्या व्याख्या जर अन्य धर्मांसारख्या रिजिड असत्या तर हे शक्यच झाले नसते !

शांततेच्या धर्मांची आक्रमणे इतके सगळे आघात सहन करुनही हिंदु धर्म टिकुन राहिला आहे ! आपल्या व्याख्या जर अन्य धर्मांसारख्या रिजिड असत्या तर हे शक्यच झाले नसते !
दंडवत मार्कस भाऊ.

हिंदुत्वा इतकी धार्मिक लवचिकता इतरत्र खरचं दुर्लभ आहे दुर्दैवाने ही लवचिकता हिंदूंचे धार्मिक अध्यात्मिक नुकसान जरी करत नसली तरी राजकीय/सामाजिक नुकसान होण्यास कारणीभुत ठरली आहे म्हणूनचं हिंदुत्व ही एक महत्वाची सामाजिक/राजकीय बाब आहे यांची हिंदूंना जाणीव होणेफार गरजेची गोष्ट वाटते.

उदा. लिंगायत समाज आम्हांला अल्पसंख्याक घोषित करा म्हणत आहे आता कुठल्याही धार्मिक ग्रंथात त्यांनी हे करावे असे म्हंटलेले नाही उद्या ते घडले तर ती एक राजकीय व सामाजिक बाब असेल धार्मिक नाही अगदी तसेच हिंदूं धार्मिकदृष्ट्या सहिष्णू आहेत ही बाब त्यांच्या राजकीय व सामाजिक मुळावर येऊ नये म्हणून जागरूक असले पाहिजे व तूर्त त्याचीच गरज हिंदुत्वाच्या व्याखेला आवश्यक आहे.

बाकी गांधिवध वगैरे बाबत आपला पास कारण त्यांच्या मारेकर्याचे स्वातंत्र्य लढयात अथवा भारताच्या समाज सुधारणेमधे मूलभूत (राजकियअथवासामाजिक) योगदान काय याची मला माहिती नाही म्हणून त्या व्यक्तीची विचारसरणीचा ही त्या व्यक्तीची पूर्णपणे वैयक्तिक मानसीकता यापलीकडे कसलाही निष्कर्ष देण्यास मला तरी अपुरी आहे.

चौथा कोनाडा's picture

3 Sep 2021 - 1:01 pm | चौथा कोनाडा

स्वा. सावरकर यांच्या दृष्टीकोनातुन # ६ च्या व्याख्या कुठे मेळ खातात ?
अ) गोभक्ती : गाय हा उपयुक्त पशू आहे
ब) हिंसेपासून दूर राहणे : धर्मरक्षणासाठी हिंसेला उत्तर म्हणून हिंसा समर्थनीय आहे

दिवसेंदिवस "हिंदुत्वा"ची व्याख्या करणे अवघड होत चालले आहे काय ?

लिबरलिझम साठी हिंदुत्व सबस्टिट्यूट केले आवडल्या गेले आहे :)

प्रसाद गोडबोले's picture

1 Sep 2021 - 11:39 pm | प्रसाद गोडबोले

लिबरलिझम साठी हिंदुत्व सबस्टिट्यूट केले आवडल्या गेले आहे :)

आपण ह्याचे श्रेय मला देत आहात का ? तसे असेल तर मनःपुर्वक धन्यवाद ! वाह मजा आली ! यु मेड माय डे !

आता २००० वर्षांपुर्वी बौध्द जैन धर्मांना फंडिंग करणार्‍या सनातन वैदिक ब्राह्मण गौतमीपुत्र सातकर्णीला मी टफ फाईट देईन !!

Trump's picture

5 Feb 2022 - 7:39 pm | Trump

मस्त चर्चा.

http://navakal.org/images/epaper.pdf

चालत नाही,