प्रायव्हसी – भाग ४

उपाशी बोका's picture
उपाशी बोका in काथ्याकूट
2 Aug 2021 - 9:50 am
गाभा: 

तुम्ही आधीचे ३ भाग वाचले असतीलच. आता या भागात बघूया की मी काय उपाय करतो?

१. शक्य तितके सुरक्षित पासवर्ड (मुख्यतः लांबलचक आणि क्लिष्ट पासवर्ड) वापरतो.
२. वेगवेगळ्या साइटसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरतो.
३. बर्‍याच ठिकाणी मी पूर्वी लॉगइन साधारण सारखाच वापरत असे. आता ते मी बंद केले आहे. लॉगइन सुद्धा वेगवेगळे असते, त्यात कधी कधी फक्त नंबर्स पण असतात. माझे नाव मी कधीच लॉगइन किंवा अकाउंटसाठी वापरत नाही. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी 2 factor authentication वापरतो. शक्यतो Yubikey वापरतो कारण जर सर्व काही फोनवर अवलंबून असेल आणि फोन चोरीला गेला किंवा man in the middle attack किंवा Phone hijack/Account takeover चा प्रयत्न झाला तर मग कठीण आहे. (माझ्या बाबतीत असा प्रयत्न झाला होता.)
४. पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी KeePassXC हा पासवर्ड मॅनेजर वापरतो. याचे मुख्य कारण म्हणजे मुक्तस्रोत आहे. (free and open-source, encryption using industry standard 256-bit AES). दुसरे म्हणजे हे अ‍ॅप्लिकेशन विंडोज, मॅक ओएस, लिनक्स, अँड्रॉईडवर उपलब्ध आहे. सर्व पासवर्ड असलेला हा डेटाबेस मी क्लाउडमध्ये ठेवतो ज्यामुळे तो मला कुठूनही उघडता येतो. क्लाउड स्टोरेज साठी मी Mega.nz ची paid service वापरतो. माझे ऑटोमेटेड बॅकअप्स पण तिथे ठेवले जातात. ( बॅकअप्स साठी मी ३-२-१ स्ट्रॅटेजी वापरतो.) पूर्वी स्वतःच्या सर्व्हरवर Nextcloud वापरत असे, पण एकदा अपग्रेड करताना त्रास झाला होता आणि अपग्रेड होत न्हवते म्हणून आता Mega.nz चा पर्याय निवडला आहे.
५. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम असलेला लॅपटॉप वापरतो. System76 चा वापरतो जे लिनक्स प्री-इंस्टॉल्ड करून विकतात. लॅपटॉपची हार्ड डिस्क पूर्णपणे एन्क्रिप्टेड आहे.
६. VPN वापरतो. त्यासाठी mullvad.net वापरतो कारण अकाउंट बनवण्यासाठी त्यांना कुठलीही माहिती द्यावी लागत नाही. पैसे भरण्यासाठी बिटकॉइन किंवा रोख रक्कम देऊन खरेदी केलेले गिफ्ट कार्ड वापरता येते. mullvad.net हे विंडोज, मॅक ओ-एस, लिनक्स, आयफोन, अँड्रॉईड वर उपलब्ध आहे.
आपण VPN वापरतो हे लपून रहात नाही, ते तुमच्या इंटरनेट प्रोव्हायडरला कळून येते, पण तुम्ही आंतरजालावर कुठल्या साईटवर जाता, काय-काय करता ते कळत नाही. कारण आपले पहिले कनेक्शन फक्त VPN सर्व्हरशी होते, फक्त त्याचा पत्ता त्यांना कळतो, पुढे काय केले ते समजत नाही. त्यामुळे जाहिराती दाखवण्यासाठी ते तुमची अचूक प्रोफाइल करू शकत नाहीत. ज्या साइटवर आपण जातो (उदा: मिसळपाव किंवा मायबोली डॉट कॉम अश्या साईट) त्यांना पण फक्त VPN सर्व्हरचाच पत्ता कळतो जो मी वरचेवर बदलतो (कधी स्विटझर्लँड, स्वीडन, जपान, सिंगापूर, बल्गेरिया, ब्राझील, माल्डोवा वगैरे). त्यामुळे ते पण माझी प्रोफाईल तयार करू शकत नाहीत आणि त्याला अनुरूप जाहिराती दाखवू शकत नाहीत. जाहिरातदारांचा गोंधळ होतो. तरीही ते generic जाहिराती दाखवू शकतातच.
७. जाहिराती पूर्ण दाबून टाकण्यासाठी मी फायरफॉक्स ब्राउजर वापरतो. पण मुख्य म्हणजे uBlock Origin हे अ‍ॅड-ऑन वापरून ज्यामुळे जाहिराती दिसत नाहीत. याव्यतिरिक्त मी पुढील अ‍ॅड-ऑन वापरतो: DuckDuckGo Privacy Essentials, Privacy badger, Ghostery – Privacy Ad Blocker, Adblock plus, HTTPS everywhere
८. फोनवर मी DuckDuckGo Privacy Browser किंवा फायरफॉक्स फोकस हा ब्राउजर वापरतो.
९. मी फेसबूक, व्हॉटसअ‍ॅप, ट्वीटर, रेडिट, लिंक्डइन, स्नॅपचॅट, टिकटॉक वगैरे सोशल मिडीया वापरत नाही.
१०. क्रेडिट फाइल जाहिरातींसाठी ब्लॉक्ड आहे. त्यामुळे मला नवीन क्रेडिटसाठी कधीच कचरा जाहिराती येत नाहीत.
११. इमेल स्पॅम न येण्यासाठी मी स्वतःचे डोमेन घेतले आहे. त्यासाठी आधी डोमेनचा पत्ता उपलब्ध आहे का? ते बघावे लागते आणि जर तो पत्ता उपलब्ध असेल तर तो डोमेन रजिस्ट्रारकडून बुक करावा लागतो. मी डोमेन रजिस्ट्रार Gandi.net वापरतो, पण माझ्या रिसर्च नुसार namecheap किंवा porkbun सुद्धा चांगले आहे. मी GoDaddy वापरत नाही किंवा त्याची शिफारस करणार नाही. माझ्याकडे अनेक डोमेन्स आहेत जी मी वेगवेगळ्या कारणांसाठी घेतली आहेत. वेबसाईट होस्टिंग साठी मी रिसेलर अकाउंट घेतले आहे, ज्यामुळे मला अगणित वेबसाईट किंवा सब-डोमेन्सचे होस्टिंग करता येते.
पत्ता बुक झाला की मग प्रत्यक्षात घर बांधावे लागते, म्हणजे वेबसाईट तयार करून ती कुठेतरी होस्ट करावी लागते आणि डोमेन रजिस्ट्रारला सांगावे लागते की प्रत्यक्षात साईट कुठे आहे (हे Nameserver सेटिंग्ज मार्फत सांगावे लागते).
प्रत्येकासाठी मग मी वेगळा इमेल पत्ता तयार करतो. उदा: amazon@mydomain डॉट कॉम किंवा hdfc@mydomain डॉट कॉम etc. हे खरे इमेल्स माहीत, फक्त फॉरवर्डर आहेत जे खरी इमेल तुमच्या खर्‍या catch-all इमेलवर जातात. म्हणजे amazon@mydomain डॉट कॉम ची इमेल hello@mydomain वर मिळते, icicibank@mydomain डॉट कॉम ची इमेल पण hello@mydomain वर मिळते वगैरे.
जर मला कधीही स्पॅम इमेल आली तर मी बघतो की कुठल्या इमेलवर ती मला पाठवली होती? जर असे दिसले की icicibank@mydomain डॉट कॉम वर स्पॅम इमेल आली तर मी लगेच तो फॉरवर्डर बंद करून टाकतो किंवा त्या पत्त्यावरील इमेल आपोआप डिलीट होतील असा बदल करतो. याचा फायदा असा की मला जवळजवळ शून्य स्पॅम इमेल येतात. अगदी खर्‍याखुर्‍या इमेल साठी मी mailfence.com ची paid service वापरतो.
१२. मी घरचा फोन कधीच उचलत नाही. तो स्पॅमसाठी राखीव आहे.
१३. जे माझ्या काँटॅक्ट लिस्ट मध्ये नाहीत त्यांचे फोन थेट व्हॉइसमेलमध्ये जातात. जर निरोप ठेवला नसेल तर मी उलट कॉल करत नाही.
१४. पब्लिक रेकॉर्डमध्ये माझा P.O.Box वापरलेला आहे. मला नुकताच P.O.Box चा तोटा कळला आहे, त्यामुळे आता PMB चा विचार चालू आहे.
१५. सेलफोन प्रोव्हायडरकडून प्रायव्हसी मिळवायचा उपाय मला अजून सापडलेला नाही.
१६. क्रिप्टोकरन्सी अजून तरी वापरली नाही, पण किमान पैसे पाठवता येण्यासाठी तरी वापरायचा विचार चालू आहे.

लक्षात असू द्या की हे उपद्व्याप फक्त जाहिरातदारांपासून वाचण्यासाठी आणि हॅकर्सपासून संरक्षण मिळवण्यासाठी आहेत. म्हणजे बाहेर जाताना घराला चांगले कुलूप लावण्यासारखे आहे. अश्या वेळी चोर जास्त वेळ वाया घालवत नाही, तो दुसरीकडे सरकतो. ज्यांना आनंदाने जाहिराती बघायच्या आहेत, त्यांना स्वतःची खाजगी माहिती सुखाने देऊ दे आणि आपल्याला नेमके तेच करायचे आहे. सर्वात शेवटी, गव्हर्न्मेंटपासून तुम्ही लपून राहू शकत नाही कारण त्यांच्याकडे अफाट रिसोर्सेस आहेत.

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

2 Aug 2021 - 3:01 pm | गॉडजिला

मी काहीही सर्च करायचे असेल तर फायरफॉक्स इन्कॉग्निटो मोड वापरतो व फक्त तंत्रज्ञान विषयक सर्च नॉर्मल मोड मधे करतो... ज्याचा माझ्या माहितीच्या कक्षा विस्ताराला खूप पूरक उपयोग होतो.

पुराणकाळी मला बरेच उपद्व्याप करायला पेड व्हीपिएन ची अमूल्य मदत झाली पण आता मी एकूणच प्रायव्हसी बाबत पूर्ण बेफिकीर आहे कारण कर नाही त्याला डर कशाला :) मीच खंबीर आहे तर टार्गेट व्हायला भय वाटत नाही.

स्त्रियांना मात्र मी सर्व ऑनलाईन उपद्व्याप सावधगिरी बाळगून करा व फक्त ऑनलाईन ओळख असेल तर कितीही विश्वासू व्यक्ती वाटली तरी काळजी घ्याच हेच आवरजून सांगतो.

टवाळ कार्टा's picture

2 Aug 2021 - 4:49 pm | टवाळ कार्टा

उत्तम मालिका सुरु आहे

टवाळ कार्टा's picture

2 Aug 2021 - 4:51 pm | टवाळ कार्टा

एक सुचवणी....प्रत्येक लेखात आधीच्या सगळ्या लेखांची अनुक्रमणिका देत चला

उपाशी बोका's picture

5 Aug 2021 - 7:21 am | उपाशी बोका
कुमार१'s picture

2 Aug 2021 - 6:36 pm | कुमार१

छान उपाय.

तुषार काळभोर's picture

2 Aug 2021 - 6:38 pm | तुषार काळभोर

तुम्ही जरी उपाशी बोका नाव घेतलं असलं, तरी मला अंदाज आलाय तुम्ही कोण ते.
तुम्हीच चेल्लम सर ना ;) ?
तुमच्या टिप्स अतिशय उपयुक्त आहेत. जमेल तितक्या पाळल्याने फायदा होईल यात शंका नाही.

निनाद's picture

3 Aug 2021 - 12:26 pm | निनाद

हे सर्व मला ही करायला हवे आहे.
पण आळस आणि सुरू केल्यावर परत त्या सगळ्याला मेंटेंन कोण करत बसणार असा विचार करून गुगल आणि फेबुला मुक्तद्वार दिले गेले आहे.

भुजंग पाटील's picture

3 Aug 2021 - 12:41 pm | भुजंग पाटील

मी ब्रेव्ह ब्राउझर फोन आणी डेस्कटॉप वर वापरतो. हा क्रोमीयम वर आधारित असून ह्यात बिल्ट इन अ‍ॅडब्लॉक आहे,
त्यामुळे खूप मेमरी / सिपियू खाणारे uBlock / Adblock ई. टाकावे लागत नाही.

सर्च ईंजीन डकडकगो ओके आहे. साधारण सर्च बरे असले तरी शॉपींग, बुक्स, मॅप्स परिपक्व व्ह्यायला अजून काही काळ लागेल असे वाटते.

खाजगी पासवर्ड मॅनेजर म्हणून बिटवार्डन एक्स्टेन्शन सोपे वाटते, आपल्याला फाईल मॅनेज करावी लागत नाही.

इमेल स्पॅम साठी एक सोपी युक्ति आहे, स्वतःचे डोमेन वगैरे करावे लागत नाही. तुमचे जिमेल अकाउंटच असे वापरता येते:
समजा abcd साईट वर अकाउंट ओपन करायचे असेल तर इमेल असा द्या: your_email+abcd@gmail.com
त्यांचे इमेल्स तुम्हाला your_email@gmail.com वरच येतील, + च्या पुढील अक्षरे गुगल फिल्टर तयार करण्यासाठी वापरायची असतात.
उद्या your_email+abcd@gmail.com वर स्पॅम इमेल्स आल्याच तर लगेच जिमेल सेटींग्स मध्ये जाऊन To फिल्ड मध्ये +abcd असणार्या इमेल्स तत्काळ डिलिट करायचा फिल्टर क्रियेट करता येतो. मूळ अकाऊंटला धक्का न लावता.

सगळीकडे वापरण्यासाठी voice.google.com चा फ्री फोन नम्बर आहे. ओटीपी वगैरे त्यावर टेक्स्ट केले तर आपल्याल ईमेल येते. त्यावर येणारे कॉल्स कायमचे व्हॉइसमेल ला फॉरवर्ड करता येतात.

मदनबाण's picture

3 Aug 2021 - 9:44 pm | मदनबाण

चांगली माहिती देत आहात... अशीच अजुन माहिती देत रहा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Din mahine sal gujarte jayenge... :- Avtaar

डकडकगो याहू-बिंग सर्च अलायन्स नेटवर्क कडून जाहिराती देऊन आणि अ‍ॅमेझॉन आणि ईबे सह महसूल मिळवते. DuckDuckGo वर दिल्या जाणाऱ्या जाहिराती कीवर्ड आणि शोध-आधारित आहेत.

उपाशी बोका's picture

5 Aug 2021 - 7:43 am | उपाशी बोका

डकडकगो पैसे कसे कमवते त्याची माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे.
विकीपिडीयानुसारः
As a privacy-focused search engine, the ads served on DuckDuckGo are keyword and search-based unlike other search engines that track user behavior for search ads.

याचाच अर्थ असा आहे की सारख्या सर्च टर्मसाठी सर्व युजर्सना सारखेच रिझल्ट दाखवले जातात. गूगल किंवा फेसबुकप्रमाणे युजर डेटा गोळा करून प्रत्येक युजरला वेगवेगळ्या जाहिराती आणि वेगवेगळे रिझल्ट दाखवले जात नाहीत. अर्थात हे सर्व "डकडकगो"च्या म्हणण्यानुसार आहे. आपण स्वतः त्यांच्यावरही कमी विश्वास ठेऊन VPN किंवा Tor ब्राउजर वापरणे उत्तम. पण गूगल, फेसबुकच्या तुलनेत "दगडापेक्षा वीट मऊ" इतपत तरी नक्कीच म्हणता येईल.

निनाद's picture

5 Aug 2021 - 1:08 pm | निनाद

पैसे कमवणे वाईट नाही - जोवर ते पैसे माझ्याकडे येत आहेत तोवर मी याविषयी सहमत आहे :)

कंजूस's picture

5 Aug 2021 - 9:07 am | कंजूस

सगळे पासवर्ड एका इमेलला पाठवतो. पण ते त्यातील एक दोन अक्षरे ठेवून **^^N असे आहेत. जे मला वाचता येतात किंवा आठवतात. #@$%&*!? असे characters फक्त दोन घेतो. दोन capitals.

जाहिरातींबद्दल - क्रोम ब्राउजर सर्च वापरत नाही. Edge वापरतो. इमेलसाठी फायरफॉक्स. बातम्या,तंत्रज्ञान यासाठी क्रोम.

निनाद's picture

5 Aug 2021 - 1:07 pm | निनाद

जाहिरातींबद्दल - क्रोम ब्राउजर सर्च वापरत नाही. Edge वापरतो. इमेलसाठी फायरफॉक्स. बातम्या,तंत्रज्ञान यासाठी क्रोम.

ब्राउजर्स एक्मेकांचा डेटा पण वाचतच असणार - कबूल केले नसले तरी मला खात्रीच आहे तशी. त्यामुळे याचा कितपत उपयोग असेल याची कल्पना नाही.

कंजूस's picture

5 Aug 2021 - 1:55 pm | कंजूस

साइबरसिक्युरटीवाले म्हणतात की सर्व वाचन करता येते. फक्त त्यांना सामान्य युजरसचे इमेल उघडण्यात स्वारस्य नसते. बँक, सरकार, डिफेन्स, यांच्या कर्मचाऱ्यांचे अकाउंटस आणि डेटा हवा असतो.