माझी शाळा, निसर्ग शाळा

Primary tabs

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in काथ्याकूट
15 Jul 2021 - 8:41 pm
गाभा: 

तोरणा विद्यालय वेल्हे

माझं माध्यमिक शिक्षण तोरणा विद्यालय, वेल्हे येथे झालं. टेकड्यांच्या कुशीत वसलेली.. माझी शाळा. दोन सुंदर इमारती, आंब्याची बाग, काजू-फणसाची झाडं, सर्वांनी मिळून तयार केलेले अंतर्गत रस्ते, पायऱ्या. पाठीशी खंबीरपणे उभा असलेला तोरणा किल्ला. सगळं स्वप्नवत. काळाच्या प्रवाहात निसर्गाशी अनुरूप असलेल्या त्या इमारती आणि टेकड्या जाऊन त्याची जागा तीन मजली इमारतीचे घेतली खरी, पण मन अजूनही रमते ते त्या जुन्या, निसर्ग-शाळेतच.

आम्हां विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया जिथे बांधला गेला, त्या विद्या मंदिराचे ऋण आजन्म राहील. तरीही फुलाची पाकळी म्हणून, आम्हां काही विद्यार्थ्यांनी मिळून शाळेसाठी गरज असेल त्या आणि जमेल त्या सुधारणा करण्याचं ठरवलं आहे. त्यातील एक गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठीची पुस्तके. जेणेकरून त्यांना वाचनाची गोडी लागेल व त्यांचं भावविश्व विस्तारण्यास मदत होईल. अर्थातच वाचन संस्कृती शाळेतूनच जोपासण्यासाठी शिक्षकांचं योग्य मार्गदर्शनही तेवढंच महत्त्वाचं आहे.

सध्या तिथे ५ वी ते १२ वी चे वर्ग आहेत. वयानुसार किती गट करावे लागतील? आणि प्रत्येक गटासाठी कोणती पुस्तके योग्य असतील? अर्थातच शाळेतील शिक्षकांचंही मार्गदर्शन घेऊन अगदी आवश्यक अशाच गरजा पूर्ण करण्याचा आम्हां वर्गमित्रांचा मानस आहे.

इतरही काही सल्ला असेल तर स्वागतच आहे.
मिपाकर योग्य ते मार्गदर्शन करतील यात शंका नाही.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

चांगला उपक्रम आहे. शुभेच्छा म्हणून तुम्हाला माझं पानिपत चित्रांचं पुस्तक विनामूल्य तुमच्या शाळेसाठी पाठवतो. मला व्यक्तिगत निरोपातून पत्ता आणि फोन नंबर कळवा.

गुल्लू दादा's picture

15 Jul 2021 - 9:24 pm | गुल्लू दादा

खूप छान. चांगल्या उपक्रमाला हातभार लावल्याबद्दल अभिनंदन.

श्रीगणेशा's picture

15 Jul 2021 - 11:10 pm | श्रीगणेशा

नमस्कार मनो जी /\
कार्याच्या सुरुवातीलाच आपला आशीर्वाद मिळाला. उत्साह द्विगुणित झाला. आपण संशोधन केलेला ऐतिहासिक ठेवा तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी स्थानिक विद्यार्थ्यांच्या वाचनात राहील, हा एक विलक्षण योगायोग. धन्यवाद.

नियोजनाची सुरुवात झाली आहे. साधारण ८ ऑगस्ट पर्यंत सर्व कामे संपन्न करून, १५ ऑगस्टला, आम्हां वर्ग मित्रांनी ऑनलाईन एकत्र येण्याचे नियोजन केले आहे. मी सर्व माहिती नियमितपणे इथे देत राहील.

यापुढेही शाळेसोबत, विद्यार्थ्यांसोबत नियमित संवाद कसा राखता येईल याचाही विचार चालू आहे.

गुल्लू दादा's picture

15 Jul 2021 - 9:23 pm | गुल्लू दादा

विषयांची मर्यादा नको असे माझे वैयक्तिक मत. विविध विषय वाचून तर ते सक्षम होतील. टोकाचे विषय नकोत. पण मर्यादा नको. शुभेच्छा.

कुमार१'s picture

15 Jul 2021 - 9:51 pm | कुमार१

खूप छान.

श्रीगणेशा's picture

15 Jul 2021 - 11:16 pm | श्रीगणेशा

धन्यवाद मनो जी, गुल्लू दादा, कुमार सर!
आपल्या प्रतिक्रिया वाचून हुरूप आला आहे.

कंजूस's picture

16 Jul 2021 - 12:21 am | कंजूस

पण सध्या पुस्तके घेऊच नका. शाळा सुरू होतील तेव्हा आणा.

सध्या मुले ओनलाईन शिकत आहेत आणि पूर्वी जसं पालक सांगत की तू दहावी/ बारावी झालास की तुला मोबाईल देईन तसं आता राहिलं नाही. मोबाईलकडे कुणी खेळणं म्हणून बघत नाही. गरजेची वस्तू आहे. त्यातून ई पुस्तके वाचतील.
सध्या अधिकृत नि:शुल्क मराठी ईपुस्तके/ कानगोष्टी ओडिओबुक्स मिळण्याची जागा म्हणजे http://www.esahity.com/
भरपूर विषय आहेत. अध्यात्म ते इतिहास. छायाचित्रण ते गडकिल्ले भटकंती. चरित्र आणि कथा कादंबरी. सर्व प्रकार आहेत.

श्रीगणेशा's picture

16 Jul 2021 - 12:43 am | श्रीगणेशा

धन्यवाद कंजूस जी/\
पुस्तकांबद्दल द्विधा मनस्थिती आहेच, सध्याच्या परिस्थितीमुळे.
पण ऑनलाईन पुस्तकाच्या साईट वरून नेमकं तेच वाचलं जाईल याची शक्यता कमीच आहे. आणि ग्रामीण भागात फोन आणि नेटवर्कची उपलब्धता हे प्रश्न तर आहेतच. उलट शाळेत शिक्षकांच्या देखरेखीखाली take-away म्हणून पुस्तकांचा चांगला विनियोग होऊ शकतो, असा विचार आहे.

मग सध्या तिकडे ओनलाईन अभ्यास होत नाही का?

श्रीगणेशा's picture

16 Jul 2021 - 11:44 am | श्रीगणेशा

बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोनची सुविधा नाही. हे चित्र ग्रामीण भागात सर्वत्र आहे. माध्यमिकचं माहिती नाही (येत्या काही दिवसांत अजून आणि नेमकी माहिती उपलब्ध होईल) पण प्राथमिक शाळांचे शिक्षक जमेल तेवढं ऑनलाईन आणि ज्या विद्यार्थ्यांकडे सुविधा नाही त्यांना घरी जाऊन शक्य होईल तितकं मार्गदर्शन करत आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा आधी शाळा सुरू होऊ शकतात. पण तरीही थोडी अनिश्चितता आहेच.

सरिता बांदेकर's picture

16 Jul 2021 - 2:01 pm | सरिता बांदेकर

तुमचा उपक्रम छान आहे. तुम्ही ‘अजब पुस्तकालयलय’ कोल्हापूर यांना विचारा. ते खूप वेळा ५०/-₹ला एक पुस्तक देतात. त्यात खूप प्रकारची पुस्तकं असतात.
मी पण तिकडून घेऊन गावातल्या शाळेत देते.म्हणजे कुठच्याही गांवात. माझी शाळा मुंबई, मालाड इथली आहे. त्यांच्याकडे खूप पुस्तकं आहेत त्यामुळे ज्या शाळेला गरज आहे असं मला वाटतं त्यांना देते.
मी ललित पुस्तकांबरोबर व्याकरण आणि शब्दकोश आवर्जून देते.
डिक्शनरी असली की मुलांना नवीन नवीन शब्दांचे अर्थ समजायला बरं पडतं.
व्याकरण पक्कं असलं की विषय समजायला आणि समजवायला सोप्पं पडतं.
बाकी तुमचे काय विचार आहेत मला माहित नाही.

व्याकरण आणि शब्दकोश आवर्जून देते. चांगली सुचेना आहे.

सनईचौघडा's picture

16 Jul 2021 - 3:12 pm | सनईचौघडा

गणेशा
तुला शाळेची पुस्तके पाहीजेत तर खाली दिलेल्या 24 मोबाईल पैकी कुठल्याही नंबरवर संपर्क कर.

1) 9460031554

2) 9001236414

3) 9549677770

4) 9314459474

5) 9828926151

6) 9328620003

7) 9826267649

8) 9888989746

9) 9653150004

10) 8889712233

11) 9926311234

12) 8889995733

13) 8889995731

14) 9826813756

15) 9752033255

16) 9826858785

17) 7489587851

18) 9175475384

19) 9098321420

20) 9879537809

21) 9825700070

22) 9727215130

23) 9879200245

24) 9328229214

सनईचौघडा's picture

16 Jul 2021 - 3:12 pm | सनईचौघडा

गणेशा
तुला शाळेची पुस्तके पाहीजेत तर खाली दिलेल्या 24 मोबाईल पैकी कुठल्याही नंबरवर संपर्क कर.

1) 9460031554

2) 9001236414

3) 9549677770

4) 9314459474

5) 9828926151

6) 9328620003

7) 9826267649

8) 9888989746

9) 9653150004

10) 8889712233

11) 9926311234

12) 8889995733

13) 8889995731

14) 9826813756

15) 9752033255

16) 9826858785

17) 7489587851

18) 9175475384

19) 9098321420

20) 9879537809

21) 9825700070

22) 9727215130

23) 9879200245

24) 9328229214

सनईचौघडा's picture

16 Jul 2021 - 3:12 pm | सनईचौघडा

गणेशा
तुला शाळेची पुस्तके पाहीजेत तर खाली दिलेल्या 24 मोबाईल पैकी कुठल्याही नंबरवर संपर्क कर.

1) 9460031554

2) 9001236414

3) 9549677770

4) 9314459474

5) 9828926151

6) 9328620003

7) 9826267649

8) 9888989746

9) 9653150004

10) 8889712233

11) 9926311234

12) 8889995733

13) 8889995731

14) 9826813756

15) 9752033255

16) 9826858785

17) 7489587851

18) 9175475384

19) 9098321420

20) 9879537809

21) 9825700070

22) 9727215130

23) 9879200245

24) 9328229214

श्रीगणेशा's picture

16 Jul 2021 - 10:40 pm | श्रीगणेशा

सरिता, भक्ती, सनईचौघडा
आपण केलेल्या सूचना आणि मदतीसाठी आभारी आहे.

श्रीगणेशा's picture

25 Jul 2021 - 11:47 pm | श्रीगणेशा

आमच्या वर्गमित्रांनी एकत्र येऊन यावर एक छोटीशी चर्चा केली. आमच्या मुख्याध्यापक म्हणून काम केलेल्या आणि सध्या निवृत्त असलेल्या सरांकडून मार्गदर्शनही घेतले. जमणाऱ्या वर्गणीचा आणि सध्याच्या परिस्थतीचा अंदाज घेऊन, आम्ही असं ठरवलं आहे की:
एकूण ३६ आर्थिकदृष्ट्या गरज असलेले विद्यार्थी निवडून (५ वी ते १० वी, प्रत्येक वर्गातून ६ विद्यार्थी -- ३ विद्यार्थिनी आणि ३ विद्यार्थी) त्यांना शैक्षणिक साहित्य संच घरपोच देता येईल, त्यात खालील गोष्टींचा आम्ही विचार करत आहोत:
१) एक प्रोत्साहनपर पुस्तक -- इयत्तेनुसार वेगवेगळं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळं. उदाहरणार्थ साने गुरुजींचं श्यामची आई, भारतरत्न डॉ. अब्दुल कलामांचं अग्निपंख, इत्यादी.
२) चित्रकला वही आणि रंग, ब्रश, इत्यादी (फक्त ५ वी ते ७ वी साठी)
३) वह्या, पेन, कंपास, इत्यादी

आता इयत्तेनुसार ३६ वेगवेगळी (६ वेगवेगळी एका इयत्तेसाठी, अशा ६ इयत्ता) अवांतर वाचनासाठी कोणती पुस्तके निवडावीत?
मिपाकर मार्गदर्शन करतीलच यात शंका नाही.

छोटीशी का असेना पण सुरुवात करतोय यात समाधान आहे.
धन्यवाद.

श्रीगणेशा's picture

26 Jul 2021 - 1:12 am | श्रीगणेशा

आम्ही काही भौतिक सुविधांसाठीही मदत करणार आहोत शाळेला पण जास्त भर प्रत्यक्ष गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी असेल.
तसेच भविष्यात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि इतर उपक्रम याचाही विचार आहे.

गॉडजिला's picture

26 Jul 2021 - 2:43 am | गॉडजिला

पण जास्त भर प्रत्यक्ष गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी असेल.

मी अनेकदा गरजू विद्यार्थी ही टर्म ऐकत असतो...

आपण काही चांगली कृती करत आहात तर विचारायचे धाडस करतो गरजू विद्यार्थ्याची आपली व्याख्या काय ?

गॉडजिला's picture

26 Jul 2021 - 6:01 pm | गॉडजिला

आपल्या उत्तराची प्रतीक्षा करत आहे

श्रीगणेशा's picture

26 Jul 2021 - 7:53 pm | श्रीगणेशा

चांगला प्रश्न आहे. सरकारी पातळीवर आर्थिक निकषाचे गणित अजूनतरी दिवास्वप्नच आहे. त्यामुळे काही दृश्य भौतिक स्वरूपातील माहितीचा वापर करून "गरजू" ची व्याख्या करता येईल. आणि ही सुद्धा सापेक्ष व्याख्या आहे:
१) कुटुंबातील मुख्य कमवीता माणूस हयात नसेल तर.
२) कुटुंबातील कोणालाही कायमस्वरूपी नोकरी नसेल तर.
३) अर्थातच दोन चाकी, चार चाकी वाहन स्वतः च्या मालकीचं नसेल तर.

तसेच निदान ग्रामीण भागात तरी एखाद्याची आर्थिक परिस्थिती समजून येण्यासाठी खूप कष्ट पडत नाहीत.

आणि आपल्या प्रश्नाचा रोख मला पूर्णपणे समजला नाही. तरीही आपला प्रश्न अनुत्तरित राहू नये म्हणून लिहीत आहे.
आणि आपलं मार्गदर्शन आणि अनुभव याचा उपयोग आम्हाला झाला तर आनंदच आहे. तेव्हा तुम्ही नक्की मार्गदर्शन करावे ही विनंती.

गॉडजिला's picture

26 Jul 2021 - 8:18 pm | गॉडजिला

आपल्या प्रश्नाचा रोख मला पूर्णपणे समजला नाही.

यासाठी सॉरी.

तसेच आपण वर दिलेले निकष मला तरी पटलेले आहेत. फार सुटसुटीत व प्रांजळ आहेत. आपल्या कार्यास माझ्या शुभेच्छा.

बरेचदा लोकं यात अजून एक निकष लावतात तो म्हणजे विद्यार्थी अतीहुषार असणे आवश्यक आहे. प्रायोरिटी अशांना द्यायला हवीच पण केवळ अतीहुशार नाही म्हणून तो पात्र ठरत नाही हे मला तितके पटत नाही. अगदी सेकंड क्लास मिळवणारा विद्यार्थी देखील तितकाच महत्वाचा आसा माझा होरा असतो.

श्रीगणेशा's picture

26 Jul 2021 - 9:30 pm | श्रीगणेशा

धन्यवाद. हुशारी हा नक्कीच "गरजू" विद्यार्थ्याचा निकष होऊ शकत नाही. आपली गुणपद्धती, अगदी पहिलीपासून तर व्यावसायिक अभ्यासक्रमापर्यंत, पाठांतरावर आधारित आहे.

पुरेशा प्रोत्साहन आणि योग्यवेळी शैक्षणिक मार्गदर्शना अभावी काही मित्रांचं कायमस्वरूपी नुकसान झालेलं मी स्वतः पाहिलं आहे.

तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात काठावर पास झालेले विद्यार्थी नोकरी आणि व्यवसायात मात्र बऱ्यापैकी यशस्वी, समाधानी आणि आनंदी असल्याची उदाहरणेही पाहण्यात आहेत.

श्रीगुरुजी's picture

26 Jul 2021 - 9:35 pm | श्रीगुरुजी

मी तुमच्या शाळेतील ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणताही मोबदला न घेता ऑनलाइन माध्यमातून Advanced Mathematics शिकवू शकतो.

श्रीगणेशा's picture

27 Jul 2021 - 7:22 am | श्रीगणेशा

धन्यवाद श्रीगुरुजी/सर.
आम्ही एवढ्यातच सुरुवात केली आहे शाळेशी संवाद साधायला. आणि हा उपक्रम फक्त एक वेळ मदती पुरता मर्यादित न राहता, नियमितपणे, ऑनलाईन, प्रत्यक्ष वेळ देऊन, जमेल त्या सर्वांना सहभागी करून घेऊन काय करता येईल, हा विचार नक्कीच आहे. मी व्यक्तिगत निरोपातून अधिक माहिती पाठवितो. आपल्या वेळेचा/मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद.

गॉडजिला's picture

26 Jul 2021 - 11:26 pm | गॉडजिला

श्रीगणेशाजी...

माझे एक निरीक्षण आहे शहरातील शाळांच्या फी अव्वाच्या स्वववा झाल्यात... अगदी अर्धा ते पाऊण लाख फी वर्षाला असते... मला हे फॅड वाटले होते पण

उत्कृष्ट आसन व्यवस्था, मर्यादित पटसंख्याा, मुलांना आपलेसे करणारे infrastructure, आणि शिक्षक, परीक्षेचे कमी झालेले ओझे यामुळे मुलांची ओढ घरापेक्षा शाळेकडे वळलेली दिसते आहे... मुलांना कधी शाळेत जातो आसे होते म्हटले तर अतशयोक्ती नाहीच.

केवळ याच कारणासाठी मी छोट्या गावात घर अन मोठया शहरात नोकरी करणाऱ्याना मुलांना शिकायला शहरात आणा हा सल्ला देतो

कारण गावात अजूनही ती प्रगती नाही, अनेक ठिकाणी बालपणी एकदा का काही कारणाने शाळेची नावड तयार झाली तर पुढे त्या बालकाला कधीही शाळेची आवड निर्माण होईल सुतराम शक्यता निर्माण होत नाही...

ही दरी मिटने फार आवश्यक आहे असे वाटते...

...

श्रीगणेशा's picture

27 Jul 2021 - 7:52 am | श्रीगणेशा

टेकडीच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात वसलेली टुमदार शाळा. एक वर्ग, हवेशीर पडवी, छोटंसं पण पुरेसं मैदान, मोकळी हवा, एकाग्रातेसाठी आवश्यक अशी शांतता, मधूनच पक्ष्यांची किलबिल, शिक्षक रस्त्याने येत असतानाच पळत जाऊन त्यांचं स्वागत करणारे, त्यांच्याशी गप्पा मारत येणारे विद्यार्थी, एकच खोली पण शैक्षणिक साहित्याने पुस्तकांनी परिपूर्ण, बरचंसं साहित्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून तयार केलेलं, प्रत्येक विद्यार्थी अगदी स्वतंत्रपणे, समूहातून, खेळातून आणि कृतीतून शिकण्यासाठी उत्सुक, वरच्या इयत्तेतील विद्यार्थी आधीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यास उत्सुक, आणि शिक्षक स्वतः विद्यार्थी झालेले.

हे चित्र आहे एका दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं! अगदी वास्तव!! आणि खूप जुनं नाही तर मागील दोन वर्षांपूर्वीचं.

अर्थातच सगळीकडेच असं स्वप्नवत वातावरण लगेच तयार होऊ शकत नाही, पण शिक्षक, पालक, ग्रामस्थ, आणि इतरही अनेक लोक मिळून त्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतात.

गॉडजिला's picture

27 Jul 2021 - 12:56 pm | गॉडजिला

_/\_

श्रीगणेशा's picture

24 Aug 2021 - 8:42 pm | श्रीगणेशा

काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही हाती घेतलेल्या मदत उपक्रमास उशीर झाला पण आता तयारी पूर्ण होत आली आहे.

आम्ही खालील पुस्तकांची निवड केली आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळं पुस्तक.
आणि पुण्यातील एका प्रकाशनाकडून खरेदीही केली आहे, अर्थातच सवलतीत.

अगदी पहिलाच उपक्रम असल्याने मुद्दामहून उपक्रम वेळ आणि पैसा या दोन्ही दृष्टीने छोटासा राहील असं नियोजन केलं आहे.

Marathi book list