रंजन आणि कल्पनाविस्तार (६)

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
30 Jun 2021 - 11:56 am
गाभा: 

भाग ५ इथे
....................................................
मागील दोन भागांमध्ये चित्रावरून कल्पनाविस्तार झालेला आहे.
आता यावेळेस शब्दांवरून करूया...

कल्पना लढवा !
खाली एका मराठी लेखामधले काही निवडक शब्द देत आहे. ते नीट वाचल्यानंतर काही प्रश्न विचारतो. त्यांची कल्पनेने उत्तरे द्यावीत.

शब्द :
तडफडणारे, स्त्री, परेशान,

भकास, जीवनात,

वाट, चव, अभागी

प्रश्न :
१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा.
२. त्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा
३. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (१० वर्षांचा टप्पा) काय असावा ?
…………………..

प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.
शक्यतो प्रश्न विचारू नका.
आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.

मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !
……………………………

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

1 Jul 2021 - 7:39 am | कुमार१

मुदत 24 तासांनी वाढवली आहे...

तुषार काळभोर's picture

1 Jul 2021 - 10:50 am | तुषार काळभोर

१. लेखाच्या विषयाबद्दल अंदाज सांगा. >> ग्रामीण भागातील स्त्रीचे खडतर आयुष्य.
२. त्या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधा >> शहरी लेखक. पुरुष. मुंबई किंवा विदर्भ
३. लेख लिहिण्याचा अंदाजे काळ (१० वर्षांचा टप्पा) काय असावा ? >> २००५-२०१५

लेखकाने परेशान हा शब्द वापरला आहे म्हणजे लेखक विदर्भ मराठवाडा भागातला आहे.
तडफडणारे म्हणजे दुष्काळाशी काहीतरी संबंध आहे.

माझ्यामते दुष्काळ, विशेषतः विदर्भातल्या दुष्काळावर हा लेख असावा. आता इतका तीव्र दुष्काळ कधी होता, तर साधारण 2010 ते 2017 या काळात हे दुष्काळ तीव्र होते.., त्यामुळे हा या लेखाचा कालावधी असावा.
एखाद्या NGO च्या कार्याबद्दल पण लेख असू शकेल. लेखाचा सहानुभूती मिळवण्याचा हेतू तर दिसतोच आहे मला.

अजून एक गोष्ट, ज्याअर्थी लेखक शब्द *ओततोय* त्याअर्थी वय 40च्या आसपास. पुरुष लेखक.

"मर्दा तुझी ही कहाणी :- अर्थात जागा हो रे ढाण्या वाघा तू काही जन्मजात उंदीर नाहियेस " हे आमचे आगामी पुस्तक कुमार सरांच्या हाती लागलेले दिसते आहे.
पाने ८९,६७,८९,३६७ किम्मत :- पुरुषोध्दारक समितीस कमीत कमी देणगी रु १००

त्यातल्याच एका पानावरच्या एका उतार्‍यातले शब्द सरांनी निवडलेले आहेत. सरांच्या या धाडसाचे मनमोकळेपणाने कौतुक करत तो उतारा इथे समस्त पुरुष मित्रांसाठी देत आहे :-

लग्नानंतरच्या आयुष्यात कधीतरी एकदा क्षणभर सुख मिळावे म्हणून आयुष्यभर तडफडणारे पुरुष पाहिले की मनाची नुसती तगमग होते. क्षणीक मोहा पायी एखाद्या स्त्री च्या हाती आपले सर्व आयुष्य सोपवून देणारे पुरुष नंतर आयुष्यभर आपल्या निर्णयावर परेशान असतात. त्यांची ती केविलवाणी अवस्था बघवत नाही आणि मग अशा अभागी, पतीत, दुर्दैवी जीवांकरता काहितरी करण्याची इच्छा प्रबळ होउ लागते.

स्त्रीयांचा उध्दार करण्यासाठी अनेक पुरुष समाजसेवक पुढे झाल्याचा इतिहास तर सर्वज्ञात आहे. ती परंपरा आजही अखंडीत आहे. पण पुरुषांच्या भकास जीवनात सुखाचा थोडातरी शिडकावा करण्यासाठी समोर आलेली एकतरी स्त्री आपल्याला ज्ञात आहे का? स्त्रीया सोडा पण पतीत पुरुषांचाही उध्दार करावा असे कोणत्याही समाजसेवकाला आजपर्यंत का बरे वाटले नसेल? घरकी मुर्गी दाल बराबर असे म्हणतात ते काही खोटे नाही.

लग्न होण्या आधि उत्साही, खेळकर, हौशी आणि सदैव हसतमुख असलेल्या पुरुषांची लग्ना नंतर अशी का बरे वाट लागते? आयुष्याची चवच हरवलेले हे अभागी जीव उर्वरीत आयुष्य बायकोच्या ताटाखालचे मांजर बनून मान खाली घालून लाचारीने का बरे जगत असतील? यांना यांच्या स्वत्वाची जाणीव कोण बरे करुन देणार?

कुमार सरांना नम्र सुचना :- पुस्तक जर घरी नेउन वाचत असाल तर तुम्हाला अतिशय सावध रहावे लागेल. न जाणो तुमच्यावर हे पुस्तक बाळगले म्हणून एखादा दूर्धर प्रसंग ओढवलाच तर पुस्तकाच्या पान क्र. ७३,५६,२७,२३४ वर जो भ्रमणध्वनी क्र दिला आहे तेथे नि:संकोच पणे संपर्क करा. प्रथमोपचाराचे साहित्य घेऊन स्वयंसेवक ताबडतोब हजर होतील. इश्र्वर तुमचे कल्याण करो.

पैजारबुवा,

अनन्त्_यात्री's picture

4 Jul 2021 - 3:59 pm | अनन्त्_यात्री

शालेय अभ्यासक्रमात "दिलेल्या मुद्द्यांवरून गोष्ट लिहा" असा एक प्रश्न असायचा. आपण तो कसा सोडवत असाल व त्या "सोडवणुकीचा" तपासणार्‍या गुरुजनांवर किती खोल परिणाम होत असावा ....

पैजारबुवा, साष्टांग दंडवत स्वीकारा...
कुमार साहेब, हा खेळ बराच रंजक आहे आधीचेही सर्व भाग वाचतो आता... 😀

कुमार१'s picture

6 Jul 2021 - 8:13 pm | कुमार१

टर्मि भाऊ,

फारा दिसांनी आलात राव
तुमचे आगमन चैतन्यदायी असते
धन्यवाद !

का कोण जाणे, पण पुस्तकाचे नाव वाचून उगाचच मर्चीडिज आठवली..

कुमार१'s picture

1 Jul 2021 - 2:25 pm | कुमार१

तु का, आनंदा, ज्ञा पै ,
वरील तिन्ही प्रतिसादांनी सुरेख हॅट्रिक केलेली आहे !

कल्पनाविस्तारातील अशा विविधतेमुळेच खेळाचा हेतू साध्य होत आहे.
बुवांच्या सूचनेची दखल घेत आहे !

कुमार१'s picture

2 Jul 2021 - 9:17 am | कुमार१

३ तासांनी समारोप...

कुमार१'s picture

2 Jul 2021 - 12:03 pm | कुमार१

सर्व सहभागी मंडळींचे मनापासून आभार !

मूळ लेख 1967 मधला असून त्याचे शीर्षक ‘एक हजार अन्याय’ असे आहे. त्यात फ्रान्सजवळील एका पर्वतीय भागांमध्ये एक हजार पुरुष, स्त्रिया न मिळाल्यामुळे बिनलग्नाचे राहिलेले आहेत, असा विषय आहे.
मोठा खुमासदार लेख आहे.
तो विजय तेंडुलकरांनी त्यांच्या चाळिशीत लिहिलेला आहे.

खेळ रोचक कसे बनवायचे याचे एक शास्त्र आहे म्हणुन लोक तासंतास खेळतात अन्यथा खेळ निरस होइल व फ्लोप होइल....

त्या शास्त्रामधे एक नियम असतो ते म्हणजे खेळाडुला टारगेट द्या व तिथे पोहोचण्याच्या मधे अडथळे निर्माण करा... तरच खेळाडुच्या कृतीला अर्थ प्राप्त येइल.

आपणही हा कल्पनाविस्ताराचा जो खेळ मांडला आहे तो गेम थिअरीच्या अनेक पातळ्यांवर विसंगत आहे... पण सुरुवात वरील नियमाने करता येइल.

आपण खेळाडुला अडथळा देत आहात पण त्याचे कोणतेच डेस्टिनेशन / टारगेट व्यवस्थित स्पश्ट नाही परीणामी पर्टिसिपंटला नेमके करायचे का व काय हे दोन प्रश्न सतत गोंधळात टाकत आहेत...

आपण डेस्टिनेशन म्हणुन वरील शब्द वापरुन एखादे विनोदी लिखाण करा जो जास्त विनोदी लिहिल तो विजेता वगैरेवगैरे टारगेट देणे आवश्यक अर्थात बर्‍याच गोश्टी टारगेट मधे कंवर्ट होउ शकतात मी फक्त एक उदा दिले.... पण टार्गेट नसेल तर खेळायचे काही प्रयोजनच उरत नाही...अजुन बरेच मुद्दे आहेत पण सुरुवात इथुन होउ शकते

कुमार१'s picture

2 Jul 2021 - 4:35 pm | कुमार१

सूचनेबद्दल धन्यवाद !

गॉडजिला's picture

2 Jul 2021 - 4:44 pm | गॉडजिला

प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे !

मजा हे कृतीचे बाय प्रॉडक्ट आहे ते कृतीचे टारगेट असु शकत नाही... कृतीचे टार्गेट सेट करावे लागेल ते अ‍ॅचिव कराय्च्या प्रयत्नातुन मजा निर्माण होइल...

प्रकाश घाटपांडे's picture

5 Jul 2021 - 12:58 pm | प्रकाश घाटपांडे

आपण अस करु. मजा हेच टार्गेट ठेवू. विधायक झाले तर बायप्रॉडक्ट.

गॉडजिला's picture

5 Jul 2021 - 1:54 pm | गॉडजिला

मजा हेच टार्गेट ठेवू.

मग टार्गेट एचिव करायच्या प्रयत्नात मजा असेलच असे नाही एचिव न होणे ही बाबही मजेशीर असेलच असे नाही...

त्यापेक्षा टार्गेट चुकताना त्यातून मजा निर्माण होईल असं नियमन हवं...