एक कोडं (पाहा जमतंय का सोडवायला)!

एस.बी's picture
एस.बी in जनातलं, मनातलं
21 Jun 2021 - 1:46 pm

बघा सुटते का सोडवून!!!!!!!!!

कोर्टाची अडचण...

कोण्या एका काळी एका देशात एक खूप नावाजलेला प्रसिद्ध वकील होता...युक्तिवाद करण्यात त्याचा हातखंडा होता...त्याच्याकडे शिकायला म्हणून खूप लोक वाट्टेल तेवढा पैसा ओतायला तयार होते...पण त्याला एकच विद्यार्थी हवा होता जो त्याचा वारसा समर्थ पणे चालवू शकेल...

एक दिवशी एका गरीब विद्यार्थ्याने त्या वकिलाला विनंती केली की त्याने त्याला शिकवावे तो पुढे जाऊन त्याच्या हुन मोठा वकील बनेल आणि पहिली केस जिंकल्यास त्याचे मानधन गुरुदक्षिणा म्हणून देईल .

वकिलाला त्याचा आत्मविश्वास आवडला त्याने त्या मुलाला आपला शिष्य म्हणून स्वीकारून एकदम तरबेज केले. आणि साऱ्या देशात ही गुरु शिष्याची जोडी नावारूपास आली..

लवकरच हा वकील निवृत्त होऊन आपला सर्व कारभार या तरुणाच्या हातात द्यायचा विचार करत होता.

पण एक दिवशी या तरुणाने घोषणा केली...की या पुढे तो वकिली पेशा करणार नाही तर तो वकिली पेशाचे शिक्षण देणारे संस्थान उभे करून सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देईल ..

हा निर्णय त्या वकिलाला आपल्यासोबत झालेला धोका वाटला आणि त्याने त्या तरुणाला न्यायालयात खेचले..आणि तिथे वकिलाने युक्तिवाद केला की तरुणाने त्याला फसवले आणि सर्व वकिली शिक्षण घेऊन आता तो वकील न बनता शिक्षक बनत आहे..त्यामुळे त्याने आपली शिक्षण घेतल्याची फी द्यावी

यावर तरुणाने युक्तिवाद केला की मी गुरुजींना मी वकील बनेलच असे कोणते ही वचन दिले नव्हते मी फक्त माझ्या आयुष्यातील पहिली न्यायालयीन केस मी जिंकलो तर फी देईल असे म्हणलो होतो ...

पण मी आता वकील नाही शिक्षक आहे त्यामुळे मी केस लढणार नाही आणि त्यामुळे मी गुरुजींना पैसे देणार नाही..

या वर गुरु वकिलाने युक्तिवाद केला की त्याचं म्हणणे बरोबर आहे तो शिक्षक आहे पण सध्या तो स्वतः ची बाजू मांडायला न्यायालयात वकील म्हणून आला आहे आणि जर त्याचे म्हणणे आपणास मान्य असेल तर मी केस हरलो आहे आणि तो केस जिंकला आहे त्या मुळे वकील म्हणून तो पहिली केस जिंकला आहे त्यामुळे त्याने मला पैसे द्यावेत....

तरुण यावर असे म्हणतो की...गुरुजींचे म्हणणे एकदम योग्य आहे

परंतु मला न्यायालयात कोणत्या कारणास्तव खेचले आहे हे लक्षात घ्या! मी गुरुजींना पैसे देणं लागतो की नाही या मुद्द्यावर
माझे म्हणणे आहे की मी पैसे देणं लागत नाही ...मग जर मी केस जिंकलो तर मी पैसे देणं लागत नाही

आणि जर मी केस हरलो तर माझ्या आयुष्यातील पहिली केस मी हरल्यामुळे मी गुरुजींना पैसे देणे लागत नाही...

गुरुजी वकील यावर म्हणतात की ह्याच हिशोबाने जर केस पैसे देण्याच्या* *बंधनबद्दल असेल तर मी केस जिंकलो तर* *मला पैसे मिळायला हवेत

आणि मी केस हरलो म्हणजे तो केस जिंकला मग पहिली केस जिंकल्यामुळे मला पैसे मिळाले पाहिजेत.

काय करायचं काय ह्या निकालात .??????

शब्दक्रीडा

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

21 Jun 2021 - 3:37 pm | गॉडजिला

तो पैसे देणे लागू होत नाही.

तसेही केस पहिली केस जिंकल्याच्या गुरु दक्षिणेबाबत टाकली नसून घेतलेल्या शिक्षणाची फी देणे लागू होते की नाही याबाबत असल्याने गुरुजीला गुरुदक्षिणा वसूल करायची असेल तर दुसरी केस दाखल करावी लागेल ज्यात त्याच्या बाजूने निकाल लागेल

एस.बी's picture

21 Jun 2021 - 4:48 pm | एस.बी

पहिली केस शिक्षणाची फी देण्याबद्दल आहे असं म्हणता तर.मग
विद्यार्थी जिंकला तर त्याच्यात आणि गुरुत झालेल्या करारा नुसार पहिली केस जिंकला की त्याने गुरू ला पैसे द्यावेत
आणि त्याच कराराचा भंग विद्यार्थी वकिली पेशा सोडून शिक्षक पेशा पत्करून करत आहे असा गुरूचा दावा आहे..
ज्या क्षणी तो वकील बनून आपली बाजू मांडायला न्यायालय मध्ये उभा राहतो त्या वेळी तो त्या करारा मधला एक घटक बनतो ज्याच्या केस हरण्या जिंकण्यावर कराराचा उर्वरित भाग आधारित आहे असा गुरूचा दावा आहे!.

ज्या क्षणी तो वकील बनून आपली बाजू मांडायला न्यायालय मध्ये उभा राहतो त्या वेळी तो त्या करारा मधला एक घटक बनतो

नाही बनत हो. तो करारा मधला घटक पहिली केस वकील म्हणुन जिंकल्यावर बनतो.

म्हणुनच जर ही केस गुरु जिंकला तर विषय मिटला व हरला तर ठरलेल्या करारा प्रमाणे शिष्यशिष्यालाला दक्षिणा देणे भाग आहे पण तो या केसचा विषय होत नाही. बाकी शिष्य वकील का बनला हा मुद्दाही गौण आहे कारण त्याचा गुरुशी असलेल्या कराराचा काही संबंध नाही.

म्हणुनच जर ही केस गुरु जिंकला तर विषय मिटला व हरला तर ठरलेल्या करारा प्रमाणे शिष्याला दक्षिणा देणे भाग आहे पण तो या केसचा विषय होत नाही. बाकी शिष्य वकील का बनला हा मुद्दाही गौण आहे कारण त्याचा गुरुशी असलेल्या कराराचा काही संबंध नाही. हवं तर तो दुसरा वकील स्वतासाठी उभा करु शकतो पण स्वतः वकील म्हणुन उभा राहणे हा त्याचा वैयक्तीक चॉइस आहे गुरुचा फोर्स नाही की त्याने स्वतच स्वताचे वकील असावे यामुळे जर शिष्य ही केस जिंकला तर त्याला गुरुदक्षिणा देणे अनिवार्य आहे. व ती दिली नाही तर गुरु त्यासाठी दुसरी स्वतंत्र केस दाखल करुन न्याय मागु शकतो तो या केस्चा विषय नाही.

तुर्त शिष्य अजुन केस जिंकला नसल्याने चालु केस मधील निकषांनुसार तो गुरुला पैसा देणे नाकारु शकतो. पण त्यातुन तो दुसरी हरणारी केस तयार करेल.

कॉमी's picture

21 Jun 2021 - 3:58 pm | कॉमी

१. कोड्यामध्ये लॉजिकची अपेक्षा असते ती बाजूला करून फक्त घटना तपासून पाहिली असता- पहिली केस मुलाने जिंकली असली तरी त्याचे मानधन कसे मिळणार ? स्वतःची बाजू लढवल्यावर कसलेही मानधन मिळत नसते.

आता कोड्याला बहुतेक करून अपेक्षित असलेले उत्तर, मानधन लूपहोल इग्नोअर करून.

२. (असे मानून की करारात "मानाधानाचा काही भाग" असा उल्लेख नसून "पहिली केस जिंकल्यावर अमुक रक्कम द्यायची" असे लिहिले आहे.)
लॉजिकली- कोर्टाने जो निर्णय होणार आहे तो शिक्षण देण्याची फी गुरूला मिळावी कि नाही या गोष्टीवर आहे. त्यात त्यांच्या यापूर्वी झालेल्या कराराशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे, विद्यार्थी पहिली केस जिंकला आहे.
आणि, न्यायालयाचा निकाल हा फी देण्याशी संबंधित आहे. त्याचा मूळ कराराशी संबंध नाही. (म्हणूनच गुरूंनी मुद्दाम ते हारतील अशी केस ठोकली आहे.) त्यामुळे मुलाला ठरलेली रक्कम द्यावी लागेल.

गुरूंचे लॉजिक बरोबर आहे. त्यांना इन एनी केस पैसे मिळणार.

गॉड जिला यांच्या प्रतिसादाला उत्तरात सांगितल्या प्रमाणे हा एका प्राचीन ग्रीस च्या विरोधभासाचे एक अनुवादित कोडे आहे मूळ विरोधभासाचे अनुवाद करताना मानधन असा शब्द वापर करायला नको होता..म्हणजे आपल्या मुद्दा क्रमांक १ उपस्थित झाला नसता.

गॉडजिला's picture

21 Jun 2021 - 4:04 pm | गॉडजिला

एक कोडं (पाहा जमतंय का घालायला जे अवघड असेल सोडवायला)!

तुम्ही मिपावर आहात एस बी सेठ इथं बाप लोक आहेत त्यांना कोड्यात टाकणे सोपी गोष्ट नाही

सदर कोडं हे मला इंटरनेट वरती वाचायला मिळालेल्या
counterdilemma of Euathlus किंवा Protagoras' paradox या paradox ( विरोधाभास) चा अनुवाद आहे... वाचल्यानंतर स्वतःला सुटलं नाही मग इथे तुम्ही म्हणता तसे महारथी लोक आहेत म्हणूनच टाकले अनुवादित करून!!!

हे कोडं सुटल्यात जमा नाहीये गॉड जिला भाई

:) तो विषयच नाही, कोडं मिपाकरांसाठी अजिबात अवघड नाही... इतकेच.

चौथा कोनाडा's picture

21 Jun 2021 - 5:07 pm | चौथा कोनाडा


वकिलाला त्याचा आत्मविश्वास आवडला त्याने त्या मुलाला आपला शिष्य म्हणून स्वीकारून एकदम तरबेज केले. आणि साऱ्या देशात ही गुरु शिष्याची जोडी नावारूपास आली..


घोषणा करण्यापुर्वी शिष्याने स्वत:ची वेगळी काहीच कमाई केली नाही का ? की फक्त सहाय्यक म्हणून बरीच वर्षे वावरला ?
कारण "गुरु शिष्याची जोडी नावारूपास" येण्यासाठी बरेच खटले लढवले असतील ना ?

गॉडजिला's picture

21 Jun 2021 - 5:13 pm | गॉडजिला

paradox

याच्या काँप्लीकेशन मधे घुसुन मती गुंग करायची असेल तर त्यासाठी टाइम मशीनच्या संदर्भात कथानक जास्त परिणामकारक असते... न्यायालयात बहुतांश केसेस्मधे असा विरोधाभास उभा होत नाही.

हा पॅराडॉक्स कोर्टात उभे राहणे शक्य नाही, कारण इथे मुद्दाम गोष्टी काहीश्या व्हेग आहेत. जर घटना स्पष्ट करून प्रत्येक प्रॉमिस कायद्याच्या (आजच्या) चौकटीत बसवले तर काही पॅराडॉक्स नाही.

हा पॅराडॉक्स ग्रीक काळातल्या कायद्यात असू शकतो, आज नाही. आज फक्त एक लॉजिकल प्रश्न म्हणूनच किंमत.

हा पॅराडॉक्स ग्रीक काळातल्या कायद्यात असू शकतो, आज नाही.

तेंव्हाही नाही पण त्यासाठी ग्रीक कायदे स्पष्ट द्यायला हवेत. मुळ धाग्यात ग्रिकांचा उल्लेखच नसल्याने तसेही त्यात जास्त जायची गरज नाही. अन्यथा वकीली तेंव्हा चात असे की नाही इथुन सुरुवात होते. धागा लेखकाने जर मुळ कथानक जसे च्या तसे भाषांतरीत केले तर त्यावरही चर्चा करता येइल. पण तुर्त मला यात कस्लाच विरोधाभास दिसत नाही व घातलेले कोडे सुटलेले आहे हे मी ठामपणे प्रतिपादीत करु शक्तो.

>> एक दिवशी एका गरीब विद्यार्थ्याने त्या वकिलाला विनंती केली की त्याने त्याला शिकवावे तो पुढे जाऊन त्याच्या हुन मोठा वकील बनेल आणि पहिली केस जिंकल्यास त्याचे मानधन गुरुदक्षिणा म्हणून देईल .

तो वकील झाला किंवा नाही याचा प्रश्न नाही, खोटं बोलून आणि तसं वागून शिक्षण घेऊन आणि वर तोंड करुन आता मी वकील नाही म्हणून फी देणार नाही असं तो म्हणू शकत नाही. वकिलीचे शिक्षण घेतलेल्याची फी द्यायला पाहीजे ! पैशांचा विषय नसता तर कोर्टात जायची वेळ कशाला आली असती ? याला फसवणुक असे म्हणून आय विल रुल अगेन्स्ट द स्टुडंट.

उन्मेष दिक्षीत's picture

21 Jun 2021 - 9:18 pm | उन्मेष दिक्षीत

>> गरीब विद्यार्थ्याने त्या वकिलाला विनंती केली

ही विनंती केली होती, अ‍ॅग्रीमेंट नाही.

प्रश्नातला मुद्दा हुकतो आहे.
(अर्थात मी पण तेच केले असल्याने... =})

उन्मेष दिक्षीत's picture

22 Jun 2021 - 7:46 pm | उन्मेष दिक्षीत

मुद्दा ?

तो वकिल स्टुडंट स्वतःचाच क्लायंट बनून स्वतःसाठी केस लढणार. का लढणार ? तर वकिल गुरुचे पैसे बुडवले म्हणून. अ‍ॅग्रीमेंट होती का त्यांची अशी ? शिवाय तो वकील होऊ दे नाहीतर नाही, ट्युशन फी देणार नाही असं तो मूर्ख शिष्य म्हणतोय हा मुद्दा आहे.
पैसे दिलेले नाहीत त्याने शिकलेल्याचे काहीतरी फालतू कारण सांगून. पुढचं सगळं निल आहे. एखादी गोष्ट नंतर देतो असं सांगुन नंतर अतिहुशारी करून देणार नाही म्हणणे हा मुद्दा आहे. कोर्टातल्या पॅराडॉक्स शी याचा काही संबंध नाही.

नाही, कोड्याचा मुद्दा एका विशिष्ठ घटनांचा आणि कायद्यांचा सेट घेऊन पॅराडॉक्स मांडणे हा आहे. त्यात येणारे कथानक हे खरोखर होऊ शकते कि नाही , त्यात योग्य अयोग्य, सभ्यपणाची गोष्ट काय या बाबी दुय्यम आहेत.

बाकी, ट्युशन फी देण्याचा प्रश्न उदभवत नाही. त्यांच्यात करार झालेला की पहिली केस जिंकल्यावर मानधन देणार. मग गुरु आता ट्युशन फी मागूच शकत नाही. त्यांच्यात स्पेसिफिकली तसे ठरले होते असे कोड्यात लिहिले आहे की. तो विद्यार्थी थेट देणार नाही असे म्हणत नाही, तर तो वकिली करत नसल्याने "केस जिंकणे" ही अट आता पूर्ण होणारच नाही म्हणून पैसे देण्याचे नाकारत आहे.

उन्मेष दिक्षीत's picture

23 Jun 2021 - 12:51 pm | उन्मेष दिक्षीत

मग आता जजमेंट द्यायला लागणार , ते तुम्ही कुणाच्या बाजुने आणि का देणार ?

>> तर तो वकिली करत नसल्याने "केस जिंकणे" ही अट आता पूर्ण होणारच नाही म्हणून पैसे देण्याचे नाकारत आहे.

वकिलीच करत नसल्याने करार मोडला असे होत नाही का ?

कॉमी's picture

23 Jun 2021 - 1:24 pm | कॉमी

जजमेंट- शिष्यावर फी देण्याची कसलीही जबाबदारी नाही. त्यामुळे शिष्य केस जिंकेल, त्यामुळे अट पूर्ण होऊन शिष्याला पैसे द्यावे लागतील.
>>>वकिलीच करत नसल्याने करार मोडला असे होत नाही का ?
ह्याचे स्पष्टीकरण मूळ कोड्यात आहे की !

गुरुजींना मी वकील बनेलच असे कोणते ही वचन दिले नव्हते

या वर गुरु वकिलाने युक्तिवाद केला की त्याचं म्हणणे बरोबर आहे तो शिक्षक आहे

अवांतर.
हे कोडे/पॅराडॉक्स डिसेप्टीव्ह आहे. त्यासारखे आणखी एक सुचते-

तीन मित्र बाहेर गावी गेले असतात, तिथे एका हाटेलात थांबतात. निघायची वेळ होते तेव्हा बिल ३० रु. झाले असते. प्रत्येक मित्र होटेल पोऱ्याकडून १०-१० रु लगेच पाठवून देतात. हॉटेल म्यानेजर झटपट पेमेंट ने खुश होऊन पोऱ्याकडून ५ रु. परत पाठवतो.
पोऱ्याला प्रश्न पडतो, ५ रु तिघात कसे वाटणार ? म्हणून तो २ रु स्वतःच्या खिशात घालतो, आणि एक एक रुपया तिघा मित्राना परत देतो.

बरं. प्रत्येक मित्राने १० रु दिलेले, त्यातले १-१ परत आले. म्हणजे प्रत्येक मित्राने ९ रु दिले. आणि २ रुपये पोऱ्याने घेतले.
९*३=२७
+
२= २९ रुपयांचा हिशोब लागला. मग आधीच्या ३० मधला १ रुपया कुठे गेला ?????

(ह्यात फक्त आणि फक्त डिसेप्शन/मिसडायरेक्शन आहे.)

गॉडजिला's picture

23 Jun 2021 - 1:40 pm | गॉडजिला

९*३=२७
हे बरोबर.
+२ दोन कसे ? ते तर पोर्‍याने घेतले +३ हवे जे त्याने परत दिले

पोऱ्याने परत दिले ते का वाढवा ? ते आधीच कमी केलेत की, १०-१ मध्ये. खर्च २ झाला, ३ नाही.

(डेव्हील्स अड्वोकेट बरं का.)

पोऱ्याने परत दिले ते का वाढवा ?

मग काय खिशात ठेवलेले वाढवायचे होय :) मग लागला हिशोब...

की कळ्वा मला =))

कॉमी's picture

23 Jun 2021 - 1:53 pm | कॉमी

तुम्ही काय म्हणताय, कि
(१०-१)*३ करून त्यात +३ करायचं ?

अहो मग सरळ १०*३ करा की !
मी काय विचारतो ते सांगा.
प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये खर्च झाले. मुलाला २ रुपये मिळाले. एकूण २९ झाले. मग १ रुपया कुठाय ????????

(डेव्हील्स अड्वोकेट.)

गॉडजिला's picture

23 Jun 2021 - 1:58 pm | गॉडजिला

(१०-१)*३ करून त्यात +३ करायचं ?

अहो मग सरळ १०*३ करा की !
अन (१०-१) मध्ला -१ काय डेविल्च्या मढ्यावर ठुन याचा का

=)

- डेविल हिमसेल्फ ;)

कॉमी's picture

23 Jun 2021 - 2:11 pm | कॉमी

[(१०-१)*३]+३=[(१०*३)-(१*३)]+३
१०*३ ही गोष्ट (१०-१)*३+३ अशी अवघड का करता ऑ ?

१ रुपया कुठं गेला तेव्हढं सांगा,

(डेव्हील्स ऍडव्होकेट मोड ऑफ.)

गॉडजिला's picture

23 Jun 2021 - 2:16 pm | गॉडजिला

(१०-१)*३ करून त्यात +३ करायचं ?

अहो मग सरळ १०*३ करा की !

अन (१०-१) = ९ असताना १० का समजायचे .

प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये खर्च झाले. मुलाला २ रुपये मिळाले. एकूण २९ झाले. मग १ रुपया कुठाय ????????

प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये खर्च झाले. व प्रत्येकाला १ परत मिळाला असे एकूण ३० झाले. मग प्रश्न कुठाय ????????

इथे परत मिळालेली रक्क्म (एक रु प्रत्येकी) हिशोबात घेण्या ऐवजी मुलाने कीती खाल्ले हे का हिशोबात घेताय ?

प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये खर्च झाले. मुलाला २ रुपये मिळाले. एकूण २९ झाले. मग १ रुपया कुठाय ????????

प्रत्येकाच्या खिशातून ९ रुपये खर्च झाले. व प्रत्येकाला १ परत मिळाला असे एकूण ३० झाले. मग प्रश्न कुठाय ????????

इथे परत मिळालेली रक्क्म (एक रु प्रत्येकी) हिशोबात घेण्या ऐवजी मुलाने कीती खाल्ले हे का हिशोबात घेताय ?

आग्या१९९०'s picture

23 Jun 2021 - 2:33 pm | आग्या१९९०

मित्रांनी हिशोब केला तर ९x३= २७ प्रत्येकाचा १ रुपया मिळवला तर ३०.
मुलाने हिशोब केला तर ३०-२ =२८ व त्याच्याकडील २ मिळवले तर ३०.
मुलाने प्रत्येक मित्राला ०.३३ पैसे अधिक दिल्याने २७ आकडा येतो.

उन्मेष दिक्षीत's picture

23 Jun 2021 - 7:07 pm | उन्मेष दिक्षीत

>> या वर गुरु वकिलाने युक्तिवाद केला की त्याचं म्हणणे बरोबर आहे तो शिक्षक आहे.

मग हे का आहे ?

>> हा निर्णय त्या वकिलाला आपल्यासोबत झालेला धोका वाटला आणि त्याने त्या तरुणाला न्यायालयात खेचले..

जर त्याचं म्हणणे बरोबर आहे तो शिक्षक आहे असे गुरु म्हणतोय तर मग

गुरु ने न्यायालयात जायलाच नको होते! काहीतरी बरोबर नाहीये या कोड्यात, म्हणून हा सिमींग पॅराडॉक्स तयार झाला आहे.

शिक्षकाला आपल्यासोबत अन्याय्/धोका झाला असे वाटू शकते, पण तो अन्याय नेहमी कायद्याच्या दृष्टीने करारभंग होईलच असे नाही. या केस मध्ये तसेच आहे. गुरुंना आपल्यावर अन्याय झाला असे वाटले तरी तिथे करारभंग नाही. गुरुंनी केस केली हारायच्या तयारीने, कारण त्यांची हार- शिष्याचा विजय- करार अट पूर्ण- पैसा.

केस केल्यावर पैसे मिळू शकत असतील, ते पण केस हारलो तरी तर का करु नये केस ?

उन्मेष दिक्षीत's picture

23 Jun 2021 - 7:46 pm | उन्मेष दिक्षीत

प्रतीसाद खाली दिला गेला आहे.
23 Jun 2021 - 7:44 pm | उन्मेष दिक्षीत
म्हणणं मान्य करु आणि पुढे जाऊ.
आता हे बघा,

>> मी गुरुजींना पैसे देणं लागतो की नाही या मुद्द्यावर
माझे म्हणणे आहे की मी पैसे देणं लागत नाही ...मग जर मी केस जिंकलो तर मी पैसे देणं लागत नाही

आणि जर मी केस हरलो तर माझ्या आयुष्यातील पहिली केस मी हरल्यामुळे मी गुरुजींना पैसे देणे लागत नाही...

- -
इथं तो स्वतःच वकील आहे, आणि स्वतःच क्लायंट आहे. केस हरली तर तो वकिलाची भुमिका घेतोय आणि केस जिंकली तर क्लायंट ची.

हे म्हणजे अंदाज अपना अपना मधल्या चित मै जीता, पट तू हारा सारखं! सो इन एनी केस, शिष्यच फ्रॉड आहे.

एक कोडे म्हणून ठीक आहे पण एवढा अघळ पघळ करार आजकाल करणे शक्य नाही
माझे उत्तर असे आहे कि काह्ही होवो गुरु ला एकूण शून्य मिळणार फक्त मानसिक समाधान ( ते सुद्धा नक्की नाही )
हे कसे तर माझ्य मते असे

करार : "गुरु ने त्याला शिकवावे तो पुढे जाऊन त्याच्या हुन मोठा वकील बनेल आणि पहिली केस जिंकल्यास त्याचे मानधन गुरुदक्षिणा म्हणून देईल "
.
यात कोठेही हे नमूद नाही कि शिश्याने वकिली केलीच नाही तर काय? त्यामुळे ती त्याने वकिली केली नाही तर तो सहीसलामत सुटतो
पण म्हणूनच गुरु ने हि फिर्याद टाकली त्याला अडकवायला
तरी सुद्धा तो सुटू शकला असता जर त्याने स्वतः हि फिर्याद ना लढवता दुसरा वकील नेमला असता तर !

पण त्याने तसे केलं नाही तेव्हा पुढे चालू

तेव्हा प्रथम हि फिर्याद निर्णय आणि मूळ करारा ची अंमलबजावणी या वेगळ्या गोष्टी आहेत पुढे

शक्यता १) न्यायालयाने गुरु हरला असा निकाल दिला तर शिष्य पहिली केस जिकंला आणि मूळ कारारा प्रमाणे ( या फिर्यादी च्या बाहेर ) त्याला मिळालेले मानधन त्याने गुंतू ला देणे लागतो , पण शेवटी गुरु ला शून्य मिळणार कारण शिष्य म्हणणार माझे मानधन शून्य !

शक्यता २) न्यायालयाने गुरु जिकला असा निकाल दिला तर शिष्य पहिली केस हरला आणि मूळ कारारा प्रमाणे ( या फिर्यादी च्या बाहेर ) तो गुरु ला काह्ही दिन लागत नाही म्हणजे शेवटी गुरु ला शून्य मिळाले

गॉडजिला's picture

22 Jun 2021 - 8:00 pm | गॉडजिला

शक्यता २) न्यायालयाने गुरु जिकला असा निकाल दिला तर शिष्य पहिली केस हरला आणि मूळ कारारा प्रमाणे ( या फिर्यादी च्या बाहेर ) तो गुरु ला काह्ही दिन लागत नाही म्हणजे शेवटी गुरु ला शून्य मिळाले

गुरु जिंकला तर त्याचे पैसे मिळतील ना

आनन्दा's picture

22 Jun 2021 - 8:56 am | आनन्दा

सर्वज्ञानी काय म्हणतायत याच्यावर? त्यांचे मत वाचायला आवडेल मला

चौकस२१२'s picture

23 Jun 2021 - 6:27 am | चौकस२१२

गॉडजिला, बघुयात तुमच बरोबर का ते ...
गुरु जिंकला तर त्याचे पैसे मिळतील ना हो बरोबर आहे पण किती पैसे ?
पण शेवटी गुरूस पदरी शून्य पैसे हा माझा मुद्दा होता

गुरु जिंकला = शिष्य हरला ... = शिष्या ने गुरूला "पहिली केस जिंकल्यास त्याचे मानधन गुरुदक्षिणा म्हणून देईल " तर मिळालेले मानधन गुरूस देणे आहे बरोबर ?
तर शिष्याने "पहिली वकील म्हणून लढवलेली फिर्याद" हीच आहे आणि त्यातून त्याला काह्ही रक्कम मिळाली नाही त्यामुळे तो गुरूस शून्य देणे लागतो

त्यामुळे त्याने आपली शिक्षण घेतल्याची फी द्यावी

इथे गुरुने केस पेंडिंग गुरुदक्षणीने ची टाकलेली नाही तर फक्त शिक्षनाच्या फी संदर्भात आहे कारण त्याला माहित आहे गुरुदक्षिणे संदर्भातील अट मोडली जाण्यासाठीचा घटनाक्रम अजून घडायचा आहे... म्हणून जर गुरु केस जिंकला तर त्याला हवी असलेली फी तो आकारू शकतो कारण ही रक्कम केलेल्या विश्वासघाताची भरपाई आहे आणी भविष्यात जेंव्हा केंव्हाही चुकून शिष्य एखादी केस कोणाविरुद्धही लढला व जिंकलाच तर त्याचेही मानधन गुरुदक्षिणा म्हणून मिळावे यासाठीही गुरु केस दाखल करु शकतो...

कॉमी's picture

23 Jun 2021 - 7:38 am | कॉमी

काँट्रॅक्ट व्हॅलीड राहण्यासाठी क्विड प्रो क्वो लागते. म्हणजे समथिंग इन रिटर्न. जर शिष्याने केस हारून शिक्षणाची फी दिली तर आधीचा काँट्रॅक्ट रद्द होतो तो असा-

१. फी दिल्यामुळे शिक्षण घेणे ही गोष्ट आधीच्या करारापासून वेगळी झाली. आता शिक्षण घेणे एक नॉर्मल व्यवहार झाला.
२. यापूर्वी त्या करारात- शिक्षण दिल्याचा मोबदला- म्हणून भविष्यातल्या केसचे पैसे असे ठरले होते.
पण फी भरली तर शिक्षण हा शिष्याला मिळणारा क्विड प्रो क्वो मूळ करारातून संपला, कारण पुढे जाऊन शिष्याने फी भरली. आता शिक्षक शिष्यासाठी काही हि न करता त्याच्याकडे जिंकलेल्या केसचे पैसे मागत आहे. त्यामुळे हा करार कायद्यात चालणार नाही.

सारांश- गुरु केक खाऊ शकतो किंवा ठेऊ शकतो, दोन्ही नाही.

गुरु ती भविष्यातील केस जिंकेल असे प्रतिपादित केलेले नाही.

अर्थात शब्द खेळ करून गुरूला जिंकताही येईल पण मी स्वतः वास्तव पसंत करतो आणि शब्दखेळ म्हणजे फसवणूक असे मानतो व ती केसही वेगळा विषय असल्याने इथे त्याची चर्चा तूर्त नको.

देशपांडे विनायक's picture

23 Jun 2021 - 1:57 pm | देशपांडे विनायक

वकील देणे बंधनकारक नाही. स्वतःला खटला चालवता येतो. शिष्य त्याचा वकील म्हणून खटला चालवतो असे म्हणता येत नाही. त्यामुळे वकील म्हणून त्याची हि पहिली केस होत नाही . 

विजुभाऊ's picture

23 Jun 2021 - 3:27 pm | विजुभाऊ

आणखी एक कोडे विचारतो.
जहाज दुरूस्त करताना काही वेळा एखाद्या जुन्या जहाजाचा पार्ट वापरतात. आणि डागडुजी होते.
समजा जर एखादे जहाज असे करता करता त्यातले सगळेच पार्ट्स बदलले गेले तर
म्हणजे
एक जहाज आपण त्याचे नाव सागर सफर समजू या.
दुरुस्तीसाठी त्याला सागर कन्या या जुन्या जहाजातील काही भाग बदलून बसवले गेले.
असे करता करता एक दिवस सागर सफर या जहाजातील सर्व पार्ट्स हे सागर कन्या या जहाजातील आहेत असे समजले.
आता या जहाजाचे नाव सागर सफर असेल की सागर कन्या?

विजुभाऊ's picture

23 Jun 2021 - 3:32 pm | विजुभाऊ

सर्वप्रथम प्लुटार्क ने ही थेअरी मांडली होती. त्यावर अजुनही चर्चाचर्वणे होत असतात.
त्याने हा मुद्दा अथेन्सच्या लोकांसमोर मांडली म्हणून त्याला थेसियस च्या जहाजाचा वाद असे उल्लेखले जाते.
त्याच्या थेअरी नुसार.
एखादे जहाज दुरुस्त करताना त्याचे काही भाग बदलून त्याजागी नवे भाग टाकले जातात.
समजा हळूहळू त्या जहजातील सर्वच भाग काढून टाकावे लागले आणि त्याजागी नवे भाग बसवले. तर त्या जहाजाला जुने जहाज म्हणायचे का?
त्या जुन्या जहाजाचे काढून टाकलेले भाग वापरून एखादे नवे जहाज बनवले तर त्या जहाजाला नवे जहाज म्हणायचे का?

हे उदाहरण थोडे व्यापक करुया.
गृहीत धरुयात की श्री लेले हे एक काटकसरी गृहस्थ आहेत. त्याना व्यर्थ उधळपट्टी आवडत नाही.
समजा श्री लेलेंच्या स्लीपर चा बंद तुटला. म्हणून तुम्ही नवा बंद घातला.
काही दिवसानी त्या स्लीपरचा तळ झिजून गेला म्हणून श्री लेलेनी स्लीपर ला नवा तळ टाकला.
काटकसरी असलेल्या श्री लेलेंच्या डोक्यात एक आयडीया आली.त्यानी जुने बंद आणि जुने तळ एकत्र करून त्यातून घरात घालायला म्हणून एक स्लीपरचा जोड बनवला.
आता त्यांच्या कडे दोन स्लीपर जोड आहेत. त्यापैकी कोणत्या जोडाला नव्या स्लीपर म्हणायचे.
हा वाद खूप जुना आहे. सर्वप्रथ हे प्रमेय प्लुटार्क ने मांडले.
Plutarch thus questions whether the ship would remain the same if it were entirely replaced, piece by piece. Centuries later, the philosopher Thomas Hobbes introduced a further puzzle, wondering: what would happen if the original planks were gathered up after they were replaced, and used to build a second ship. Which ship, if either, is the original Ship of Theseus?
त्यानंतर सॉक्रेटीस , प्लेटो यानी त्यावर काही प्रमेये मांडली आहेत.
Another early variation involves a scenario in which Socrates and Plato exchange the parts of their carriages one by one until, finally, Socrates's carriage is made up of all the parts of Plato's original carriage and vice versa. The question is presented if or when they exchanged their carriages.

सध्याच्या काळचे याच्या विरोधी एक उदाहरण तयार करता येते मि आणि माझ्या मित्रानी एक एक ऑडी गाडी समान रंग, मेक वगैरेची घेतली आणी रोज एक एक पार्ट एकमेकात एक्स्चेंज करत गेलो आणी काही दिवसांनी सर्व पार्ट बदलले गेले तर आता माझी गाडी कोणती ? अर्थातच चासिस व रजिश्ट्रेशन नंबर इथे मोलाची भुमीका बजावतील...

पण पुर्वीच्या काळी असे काही होत नसल्याने त्याकाळी माझी गाडी कोणती हे सांगणे अवघड बनले असते पण सेकंड हँड पार्ट्स पासुन बनवलेले जहाज कधीच नवे ठरत नाही. रिफर्बीश्ड म्हणता येइल... जसे आजकाल सर्व कंपन्यांचे लॅप्टॉप मिळतात कंपनी वॉरंटी पण येते एकदम कोरे करकरीत असतात पण मुळ किमतीच्या निम्या भावात अधिक्रुतपणे मिळुन जातात

उन्मेष दिक्षीत's picture

23 Jun 2021 - 7:44 pm | उन्मेष दिक्षीत

म्हणणं मान्य करु आणि पुढे जाऊ.
आता हे बघा,

>> मी गुरुजींना पैसे देणं लागतो की नाही या मुद्द्यावर
माझे म्हणणे आहे की मी पैसे देणं लागत नाही ...मग जर मी केस जिंकलो तर मी पैसे देणं लागत नाही

आणि जर मी केस हरलो तर माझ्या आयुष्यातील पहिली केस मी हरल्यामुळे मी गुरुजींना पैसे देणे लागत नाही...

- -
इथं तो स्वतःच वकील आहे, आणि स्वतःच क्लायंट आहे. केस हरली तर तो वकिलाची भुमिका घेतोय आणि केस जिंकली तर क्लायंट ची.

हे म्हणजे अंदाज अपना अपना मधल्या चित मै जीता, पट तू हारा सारखं! सो इन एनी केस, शिष्यच फ्रॉड आहे.

बापू नारू's picture

5 Jul 2021 - 10:03 pm | बापू नारू

मला वाटत न्यायाधीश पळून गेले असतील :)