सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


कुंदापूरा चिकन घी रोस्ट

Primary tabs

केडी's picture
केडी in पाककृती
4 Jun 2021 - 8:44 am

img1

ह्या रेसिपी चा ईजाद ५० वर्षांपूर्वी, कुंदापूरा मधल्या शेट्टी लंच होम मध्ये झाला असे म्हणतात). कुंदपुरा मंगळूर पासून साधारण ९० किमी वर आहे म्हणून बहुदा ह्याला मंगलोरी घी रोस्ट पण म्हणत असावे.

ह्यात खरी मज्जा आहेत ती अर्थात तुपाची आणि त्या लाल रंगाची. दिसायला एकदम जाळ पण चवीला मात्र अतिशय सुंदर!

साहित्य
चिकन मॅरीनेट
५०० ग्राम चिकन तुकडे करून
४ चमचे घट्ट दही
१ चमचा लिंबाचा रस
१/२ चमचा लाल तिखट (काश्मिरी)
१/२ चमचा हळद
१/२ चमचा मीठ

१०/१२ ब्याडगी लाल सुक्या मिरच्या
२ चमचे धने
१ चमचा जिरे
१ चमचा बडीशेप
१०-१२ काळीमिरी
४-५ लवंग
१०-१२ लसूण पाकळ्या
१ छोट्या लिंबाच्या आकाराची चिंच
१/४ वाटी तूप (घरचं असेल तर उत्तम)
१५-२० कढीपत्त्याची पानं
चवीनुसार मीठ

कृती
चिकनला तिखट, हळद, दही, मीठ लावून किमान १ तास मुरत ठेवावे.

मंद आचेवर तव्यावर आधी लाल मिरच्या, आणि मग इतर खडे मसाले जळणार नाहीत असे २/३ मिनिटे भाजून/शेकवून घ्यावे.
मिरच्या आणि खडे मसाले, लसूण आणि चिंचे सोबत मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे, लागेल तसे पाणी वापरून.
पॅन मध्ये तूप गरम करून, त्यात चिकन १०/१२ मिनिटे (५०% शिजेल इतपत) परतून घ्यावे.

चिकन चे तुकडे बाजूला काढून त्याच तुपात आता वाटलेला मसाला घालून तो परतून घ्यायचा. मसाल्याला तेल सुटत आलं की पॅन मध्ये चिकनचे तुकडे घालून पुन्हा परतून घ्यायचा आहे, चिकन शिजेपर्यंत. (लागलं तर थोडंस पाणी घालावं, पण ह्याला रस्सा नसतो त्यामुळे खूप पाणी नको). चवीनुसार मीठ घालून, मग एक चमचा तुप गरम करून त्यात कढीपत्त्याची पानं घालून ती फोडणी/पानं वरून घालावी..

गरम पोळी किंवा भातासोबत मस्त लागतं.

IMG2

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

4 Jun 2021 - 9:38 am | गॉडजिला

लप लप लप...

आमोद's picture

4 Jun 2021 - 9:11 pm | आमोद

कहर आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2021 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जबरा. लंबर एक.

-दिलीप बिरुटे

केडी's picture

5 Jun 2021 - 7:37 am | केडी

_/\_

सौंदाळा's picture

5 Jun 2021 - 8:08 pm | सौंदाळा

छान आणि सोपी रेसिपी

वामन देशमुख's picture

5 Jun 2021 - 8:41 pm | वामन देशमुख

पाकृ आणि सादरीकरण नेहमीप्रमाणे आवडलं. वाचून आणि पाहून तोंपासु.

आमच्या घरी केवळ शुद्ध शाकाहारी पदार्थ बनतात, म्हणून मिपावरचा "ही पाकृ अंडं घालून कशी करायची?" हा ऑल टाइम हिट प्रश्नही विचारण्याची सोय नाही.

पनीर, बटाटे वगैरे घालून एकदा ट्राइ करीन.

बाकी, अशात मिपावर पाकृचे धागे कमी झालेत का?

केडी's picture

5 Jun 2021 - 9:25 pm | केडी

धन्यवाद!
पनीर घालून छान लागेल किंवा मिक्स व्हेज म्हणजे बटाटे, घेवडा, गाजर, मश्रुम, फ्लॉवर घालून पण मस्तं लागेल

वामन देशमुख's picture

6 Jun 2021 - 4:24 am | वामन देशमुख

मिरच्या आणि खडे मसाले, लसूण आणि चिंचे सोबत मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे, लागेल तसे पाणी वापरून.

हे स्पष्ट करुन सांगाल का?

म्हणजे, चिंच कोरडीच घालायची की चिंच पाण्यात भिजवून कोळ काढून पाणी घालायचं?

चिंचेचा कोळ नाही चिंच घालायची आहे..पाणी घालून बारीक करताना ती छान एकजीव होईल

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

5 Jun 2021 - 9:30 pm | सौ मृदुला धनंजय...

खूपच छान

चांदणे संदीप's picture

7 Jun 2021 - 11:37 am | चांदणे संदीप

पाकृ आणि सादरीकरण क्लास!
पण, आता हे बघून दुपारच्या जेवणातली कोबी कशी ढकलायची पोटात?

सं - दी - प

लई भारी's picture

9 Jun 2021 - 7:03 pm | लई भारी

एक दोन वेळा बाहेर खाल्ले आहे आणि खूप आवडले होते.
रेसिपि मस्तच दिली आहे, करायला हवी :-)
ब्याडगी मिरची मस्ट असणार इथे, कलर साठी!

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Jun 2021 - 9:11 am | ज्ञानोबाचे पैजार

करुन बघण्यात येईल

पैजारबुवा,