रंजन आणि कल्पनाविस्तार (२)

कुमार१'s picture
कुमार१ in काथ्याकूट
24 May 2021 - 9:54 am
गाभा: 

भाग १ इथे
......
पहिल्या भागाला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद बघून आणि तिथल्या सूचना विचारात घेऊन हा भाग सादर करीत आहे.

कल्पना लढवा !
खाली एका मराठी वृत्तपत्रातील लेखाच्या संदर्भातील चित्र आहे. ते प्रातिनिधिक आहे.

ok

तुम्ही कल्पनेने या चित्राला अनुरूप असे शीर्षक सुचवा आणि संबंधित विषय थोडक्यात लिहा.
प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.
शक्यतो प्रश्न विचारू नका.

आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.

मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !

प्रतिक्रिया

मला फोटो दिसत नाहीये.

कुमार१'s picture

24 May 2021 - 11:27 am | कुमार१

ok

कुमार१'s picture

24 May 2021 - 8:44 pm | कुमार१

पुन्हा एकदा लक्षात घ्यावे :

यावेळेस ओळखायचे असे काहीच नाही.
तुमची कल्पना आहे तीच लिहायची आहे.

त्यामुळे कोणीही चूक असणार नाही.

गणेशा's picture

25 May 2021 - 1:17 am | गणेशा

समस्या
_____

अलीकडे कशाचा कशाला मागमोस उरला नाहीये...समस्या वेगळी आणि ते सोडवताना मात्र भलत्याच गोष्टी केल्या जात आहेत...
समस्या एक आणि त्याचे उत्तर म्हणुन पुन्हा नविन समस्याच पुढे येत आहे.. तरीही माणुस त्याच्यात धुंद आहे...

कंजूस's picture

25 May 2021 - 1:39 am | कंजूस

त्याचा कापीराइट असणार हो.

या चित्रांमधून दिसतो

आनन्दा's picture

25 May 2021 - 6:47 am | आनन्दा

WW - 3

अर्थात तिसरे महायुद्ध!

कुमार१'s picture

25 May 2021 - 7:46 am | कुमार१

अपेक्षेप्रमाणे उत्तरात विविधता आहे. छान !

पेप्रातली चित्रं

>>>

संबंधितांची परवानगी घेतलेली आहे

कुमार१'s picture

25 May 2021 - 9:51 am | कुमार१

मुदत चार तासांनी वाढवली आहे.

मला वाटते समाजात माजलेली अनागोंदी, अंदाधुंदी चित्रात दाखवली असावी. एक माणूस विजेच्या सॉकेट मध्ये प्लग घुसवतोय तर टी व्ही मधून पिचकारी येताना दाखवली आहे. कार हॉल्ट वर आहे म्हणजे देशाच्या प्रगतीला खीळ बसली आहे. सलाईनचा स्टँड घेऊन माणूस (डॉक्टर?) नाचतोय म्हणजे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. माणसं एकमेकांत भांडताहेत .
चित्र पाहून माझे कल्पनाचित्र रंगवले आहे.

गणेशा's picture

25 May 2021 - 11:13 am | गणेशा

Tv नाहीये, fish tank आहे तो

बबन ताम्बे's picture

25 May 2021 - 1:18 pm | बबन ताम्बे

मी बारकाईने पाहीले नाही .

कुमार१'s picture

25 May 2021 - 1:24 pm | कुमार१

४० मिनिटांनी समारोप

कुमार१'s picture

25 May 2021 - 2:04 pm | कुमार१

सर्वप्रथम सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार !
आपल्या सर्वांचीच कल्पनाचित्रे उत्तम आहेत.
मजा आली.

मूळ लेखाचे नाव
“आपण असेच आहोत” हे होते. त्या लेखात भारतीयांच्या वर्तनासंबंधी खालील मुद्यांना स्पर्श केलेला होता :

• सार्वजनिक अस्वच्छता
• वाहतुकीतील बेशिस्त
• बेपर्वाई, बेफिकिरी आणि
• गर्दी करण्याची प्रवृत्ती .

सिरुसेरि's picture

25 May 2021 - 3:02 pm | सिरुसेरि

समर्पक विषय आणी चित्रे . गंभीर विषय व्यंगचित्रांच्या स्वरुपात मांडल्यामुळे "फिरभी दिल है हिन्दुस्तानी" आठवले .

कुमार१'s picture

25 May 2021 - 4:17 pm | कुमार१

"फिरभी दिल है हिन्दुस्तानी"

>>
अगदी ! खूप सुंदर मालिका ...
लेखन, दिग्दर्शन , अभिनय या सर्व बाबतीत.

लई भारी's picture

26 May 2021 - 2:53 pm | लई भारी

चित्र बघितले होते पण खूप काही सुचेना त्यामुळे प्रतिसाद नव्हता दिला आणि नंतर कामाच्या घाईत बघायचे राहून गेले.
सगळ्याच चित्रांचा संदर्भ लागेना नीट. लेख वाचल्यावर कदाचित कल्पना येईल

सोत्रि's picture

26 May 2021 - 4:07 pm | सोत्रि

रोचक उपक्रम!

- (उपक्रम आवडलेला) सोकाजी

कुमार१'s picture

27 May 2021 - 7:40 am | कुमार१

ल भा +१

सोत्रि, धन्यवाद.
..
ज्यांना हा उपक्रम आवडला आहे त्यांनी पुढच्या भागात उकल होण्यापूर्वी सहभागी झाल्यास अधिक मजा येईल.
उत्तर देण्याची मुदत 24 ऐवजी 48 तास ठेवावी का, यावर जरूर मत द्यावे.
अन्य सूचनांचेही स्वागत आहे.

२४ ऐवजी ४८ तास मुदत नसावी असे मला वाटते.

हा आपण एक करू शकता.. नविन प्रश्न हा ठराविक वाराला विचारू शकता..
म्हणजे सोमवार, बुधवार शुक्रवार असा..

त्यामुळे आजकाल कधीतरी मिपा वर यायला जमत असल्याने, ह्या दिवशी तुमचा प्रश्न बघायचा म्हणुन येता येईल..

२४ तास ठीक आहेत, मला तर तेचजास्त वाटतात..

Bhakti's picture

27 May 2021 - 9:05 am | Bhakti

२४ तासच योग्य आहे.पण वार वगैरे नका ठरवू, अचानक कोडे बघायला छान वाटत.
अवांतर: चित्राबाबतीत लिहायचं होतं,पण विशेष सुचलच नाही.

गॉडजिला's picture

27 May 2021 - 10:38 am | गॉडजिला

खेळ रंगायला व लोकांना गोडी लागायला पुरेसा वेळ द्यावा. उत्तर देण्याची मुदत 24 ऐवजी 48 तास अवश्य ठेवावी

कुमार१'s picture

27 May 2021 - 11:14 am | कुमार१

विविध उपयुक्त सूचना केल्याबद्दल वरील सर्वांचे आभार !

नुकत्याच झालेल्या मिपाकट्यामुळे हे समजून आले की भारताबरोबरच जगाच्या पश्चिम आणि पूर्व टोकांनाही आपले बांधव राहत आहेत. या उपक्रमात वेळ किमान चोवीस तास ठेवण्याचा हेतू हाच आहे, की जगभर विखुरलेल्या मिपाकरांना त्यात भाग घेण्याची संधी मिळावी. 24 व 48 चा मध्य म्हणून 36 तास असा एक सुवर्णमध्य काढता येईल !
किंवा, मूळ मुदत २४ तास ठेवून लोकांच्या सहभागानुसार ती आयत्या वेळेस वाढवता येईल.

"रंजन आणि कल्पनाविस्तार" ही कल्पना आवडली.

२४ तासांची मुदत सध्या ठीक वाटते, गरजेनुसार त्यात case to case basis वर बदल करता येईल.

सुधीर कांदळकर's picture

28 May 2021 - 6:33 am | सुधीर कांदळकर

मजा आली. धन्यवाद.