काय वाचताय ?

Primary tabs

कॉमी's picture
कॉमी in काथ्याकूट
19 May 2021 - 1:10 pm
गाभा: 

प्रेरणा- मदनबाण यांचा मी सध्या काय पाहतोय धागा.
मला वाटते, की सिनेमे, टिव्ही/ओटीटी सिरीज, युट्यूब व्हिडीओज सारखेच पुस्तकं, ब्लॉग्ज, पेपर/नियतकालिकांमधली विशिष्ठ विषयांवरची सदरे किंवा कोणतेही वाचायचे माध्यम यांच्या बद्द्ल देवाणघेवाण सुद्धा मनोरंजक राहील. वाचण्यासाठी नवनवीन गोष्टी समजतील.
मी सुरुवात करतो.

मी खालील दोन पुस्तके वाचत आहे:
१. फ्रॅन्क हर्बर्टची कादंबरी ‘ड्युन’ (Frank Herbert’s ‘Dune’)- १९६५
पृष्ठसंख्या- ४१२

-विज्ञानकादंबर्‍यांमध्ये खुप प्रसिद्ध कादंबरी आहे ही. सर्वोत्तम विज्ञानकथांच्या याद्यांमध्ये हटकून ड्युन दिसत होती. म्हणल ट्राय करुन बघुया.
आता जिथपर्यंत वाचून झाली आहे तिथपर्यंत ही कादंबरी फक्त विज्ञानकथा नसून सरळ सरळ एपिक फॅन्टसी सारखी वाटते आहे. पूर्ण नवीन विश्व लेखकाने उभारले आहे.
कथा- मानवजात एका इम्पेरियम/साम्राज्यामध्ये एकत्र आहे. साम्राज्याचा प्रमुख म्हणुन एक सम्राट आहे, आणि वेगवेगळ्या ग्रहांवर सम्राटाच्या नावे व्यवस्थापन करणारी घराणी आहेत, (अंतराळातले गेम ऑफ थ्रोन्स म्हणता येईल, फक्त हे GoT च्या आधी प्रकाशित झाले आहे.) तर, आर्टेड्स घराण्याचा, स्पेसिफिकली, पॉल आर्टेड्स या मुलाचा प्रवास आपण पाहातो. त्यांच्या होम-ग्रहावरुन आर्टेड्सना नवीन ग्रहाचे व्यवस्थापन दिले असते- आराकीस नावाच्या ग्रहाचे. ह्या ग्रहाचा ९०%+ वाळवंटी असतो. पाणी इतके दुर्मिळ असते की तेच चलन आणि संपत्ती असते. तिथे खोल वाळवंटामध्ये "मलेन" नावाचा पदार्थ सापडत असतो, जो जिवन वाढवणारा असतो, आणि त्यामुळे अत्यंत मौल्यवान. पण हा पदार्थ गोळा करणे सुद्धा तितकेच अवघड असते, कारण वाळूमधून झटकन प्रवास करु शकणार्‍या राक्षसी अळ्या नेहमी त्या पदार्थांच्या साठ्याच्या आसपास असतात.
त्यापुढे, हार्कोनेन घराणे, जे आर्टेड्सचे काही पिढ्यांपासूनचे शत्रू असतात, त्यांनी बरेच वर्ष आराकीस वर राज्य केले असते. त्यामुळे, त्यांनी आर्टेड्स साठी काहीना काही सापळा आराकीस वर रचून ठेवलाय हे नक्की असते.
आराकीस वरचे नेटिव्ह लोक म्हणजे फ्रेमेन. हे फ्रेमेन लोक पाण्याच्या दुर्भिक्षात राहाण्यासाठी अ‍ॅडॅप्ट असतात. वाळवंटात फिरताना शरीरातला ओलावा वातावरणात आजिबात निसटू नये म्हणून 'स्टिलसूट' नावाचे वस्त्र वापरत असतात.
आणखी मसाला असतो तो म्हणजे 'बेने गेशेरीत' नावाची संस्था असते, जी फ्रेमेन सारख्या "रानटी" किंवा मुख्य धारेतल्या बाहेरच्या लोकांचा पुढे मागे वापर करुन घेण्यासाठी त्यांच्यात, (खोट्या) प्रोफेसीज/भविष्यवाण्या पेरुन ठेवत असते. एकूण, पॉल ह्या भविष्यवाण्यांच्या आधारे स्वतःला मुआ'दीब नावाने फ्रेमेन्सच्या लढाऊ आणि आक्रमक धर्माचा प्रेषित कसा बनवतो, आणि हार्कोनेन घराण्याशी कसा लढतो अशी कथा आहे. ह्यात ईस्लामच्या उदयाशी पॅरॅलल स्पष्ट आहेत. बरेच फारसी शब्द वापरले आहेत.
कथेवर तीन वेळा सिनेमा येऊन गेला आहे आणि चौथ्यांदा यावर्षी येणार आहे. टिमोथी कॅल्मेट पॉलच्या भुमिकेत दिसेल.

२. द कमिंग ऑफ द थर्ड राईश- रिचर्ड एव्हन्स. (२००४)
पृष्ठसंख्या- ६५६

वाळींबेंचे नाझी भस्मासूराचा उदयास्त न वाचलेल्या दुर्मिळ लोकांपैकी मी एक आहे. तेव्हा हे अगदी क्लीन स्लेट घेऊन वाचत आहे.
नाझी जर्मनी वरच्या त्रिधारेतले हे पहीले पुस्तक आहे. त्रिधारा अशी आहे-
१. द कमिंग ऑफ द थर्ड राईश
२. थर्ड राईश अ‍ॅट पॉवर
३. थर्ड राईश अ‍ॅट वॉर.
पुस्तकाची दिर्घ प्रस्तावना खुप उत्तम आहे. नाझी जर्मनीवर इतकी पुस्तके येऊन गेली आहेत, मग आणखी एक लिहायचे प्रयोजन काय? ह्या प्रश्नाचे उत्तर लेखक एव्हन्स ह्यांनी दिले आहे. की नाझी जर्मनीचा संक्षिप्त, किंवा निवडक पैलूंवर प्रकाश टाकणारी बरीच चांगली आणि वाईट पुस्तकं असली तरी, नाझी जर्मनीतल्या नागरीकाला सभोवताली काय दिसत होते ? त्या वेळी काय चर्चा, काय राजकीय प्रश्न होते ? आणि एकूणच नाझी जर्मनीचे सखोल आणि सर्वांगीकचित्रणपाहाण्यास मिळत नाही. ते या त्रिधारे द्वारा देण्याचा प्रयत्न आहे.
पहीले पुस्तक जिथपर्यंत वाचून झाले त्यावरुन सखोल महीती मिळणार हे समजले आहे. आत्तापर्यंत बिस्मार्क, कैसर विल्यम दुसरा ह्यांचे शासन, आणि पहील्या महायुद्धानंतर धाधांत अराजकतेनंतर जर्मनी मध्ये पहीले लोकशाही शासन १९१८ मध्ये कसे आले, आणि व्हर्सेलीस करारातल्या अपमानकारक अटींचा राजकारण आणी नागरी जीवन यांच्यावर काय प्रभाव पडला हे सांगितले आहे. जर्मनीत धार्मिक दृष्टीतून ज्यूंचा द्वेष, ते वांशिक दृष्टीतून ज्यूंचा द्वेष हा प्रवास तपशीलवार दाखवला आहे.
यापुढे पुस्तक लोकशाही राज्य १९१८-१९३३ दरम्यान कसे चालले, लोकांचा वैचारीक कल कुठे होता आणि तो कसा हळूहळू बदलत गेला, असे जाईल आणि शेवटी १९३३ मध्ये नाझी जर्मनीचा उदय होऊन संपेल.
पुस्तक अत्यंत तपशीलवार आहे, आणि ह्या बद्दल रस असल्यास उत्तम पर्याय आहे.
तुम्ही काय वाचताय ?
(चित्रे आंतरजालावरुन साभार.)

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

19 May 2021 - 2:05 pm | कुमार१

छान परिचय.
मी काही दिवसांपूर्वी ही वाचली :

पुस्तकवेड्यांचं वेड

तेंडुलकर अजूनही अ-जून !

कॉमी's picture

19 May 2021 - 6:40 pm | कॉमी

दोनीही पुस्तकपरिचय भारी आहेत.
शांतता ! कोर्ट... आवडते नाटक आहे. 'अ-जून' वाचायच्या यादीत वाढवले आहे.

कुमार१'s picture

19 May 2021 - 6:50 pm | कुमार१

शांतता ! कोर्ट... आवडते नाटक आहे.

>> हवे तेवढे अनुमोदन !

श्रीगुरुजी's picture

19 May 2021 - 9:52 pm | श्रीगुरुजी

कालच तूनळीवर हे नाटक पाहिले. रेणुका शहाणे बेणारे बाईंंच्या भूमिकेत आहे. अप्रतिम नाटक आहे!

आंद्रे वडापाव's picture

19 May 2021 - 2:37 pm | आंद्रे वडापाव

चांदोबा चे जुने अंक ..

पुस्तके वाचण्याबद्दल धागा निघाला हे खूपच छान. बरेच लोक हल्ली पुस्तके फारशी वाचत नसले तरी वाचणारांनी इथे अवश्य लिहीले पाहिजे.
चांदोबाचे जुने ( विशेषतः १९५५-७०) म्हणजे अगदी मर्मबंधातली ठेव. मला मध्यंतरी हिंदी चंदामामाचे हे अंक कुठूनतरी डाऊनलोडायला मिळाले. परंतु एकतर ते स्पष्ट दिसत नाहीत आणि मराठीत नाहीत. तुम्हाला मराठीत कुठे मिळाले हे कृपया कळवावे.
चांदोबातली चित्रे पूर्वी Sankar आणि CHITRA यांची खूपच सुंदर असायची. नंतर मात्र कुणी Vapa नामक चित्रकाराची येऊ लागली ती मला अजिबात आवडत नसत. त्याने सगळी घाण करून ठेवली असे वाटायचे त्यामुळे नंतर चांदोबातील गोडी ओसरली.

कॉमी's picture

20 May 2021 - 8:34 am | कॉमी

खूप धन्यवाद !

मराठी चांदोबा मिळाला हे फार छान झाले. साधारणपणे 1970 नंतरचे चांदोबे मी बघितले नव्हते पण काल 1995 च्या चांदोब्यात माझ्या लहानपणीच्या भुवनसुंदरी वगैरे कथामाला पुन्हा येत असलेल्या बघून खूप आनंद झाला. आता सावकाशीने एकेक बघेन. अनेक आभार.

संग्रामशेठ, भरपूर दिवस पुरेल एवढा ऐवज मिळालाय. खूप खूप धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

24 May 2021 - 9:58 am | मुक्त विहारि

धन्यवाद

माझं हिच्या घरच्यांशी जमावं म्हणून काही टिप त्यात मिळते का ते हुडकतोय... पण जळ्ळ मेलं लिंगभेदी प्रकरणं निघालं, आजच्या काळातील पुरुषांनी बायकोच्या घरच्यांना कसे सहन करावे, कसे जुळवुन घ्यावे याबद्दल एक अवाक्षर नाय :(

फ्रॅन्क हर्बर्टची कादंबरी ‘ड्युन,
सिनेमांचा शोध घ्यावा लागेल.बाकी कथा वाचून प्रिंस ऑफ पर्शिया: द सैंड्स ऑफ टाइम आठवला :)

कॉमी's picture

19 May 2021 - 6:53 pm | कॉमी

प्रिन्स ऑफ पर्शिया+स्टार वॉर्स+गेम ऑफ थ्रोन्स= ड्यून

ड्यून २०२१ ची कॉल मी बाय युअर नेम मधला टिमोथी, स्पायडरमॅन मधली झेंडाया, ऍक्वामॅन जेसन मोमोआ, गार्डीयन्स मधला डेव्ह बतीस्ता, थॅनोसफेम जॉश ब्रोलीन अशी तगडी कास्ट आहे. तोच पहा सिनेमा.

किती दिवसांनी ही नावं ऐकली (Wow Aquaman ) . ट्रेलर पाहिला ठीक आहे.

आनन्दा's picture

19 May 2021 - 5:59 pm | आनन्दा

कमिंग ऑफ थर्ड राईश वरती लेखमाला लिहिता अली तर बघा असे सुचवतो.

नक्कीच प्रयत्न करीन.
_/\_

प्रचेतस's picture

19 May 2021 - 7:42 pm | प्रचेतस

गेल्या लॉकडाऊनपासून पुन्हा एकदा महाभारताला सुरुवात केली. आता शांतीपर्वाच्या मध्यात पोहोचलोय. अजून ५/६ महिने ते खाद्य पुरेल.

आमच्या सारख्या नूब्जनी कोणते महाभारत वाचावे ?
(पाडगावकरांनी अनुवाद केलेले वाचले आहे.)

पाडगावकरांनी अनुवाद केलेले कथारूप महाभारत आहे.
तुम्हास वाचावयाचे असेल तर विदर्भ मराठवाडा बुक कं आणि वरदा प्रकाशन ह्यांनी मराठीत अनुवाद केलेले महाभारताचे खंड उपलब्ध आहेत. विदर्भ मराठवाड्याचे खंड वाचण्याच्या दृष्टीने सुगम आहेत तर वरदा प्रकाशनाने एकाच पानावर दोन कॉलम केल्याने वाचताना डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

संस्कृत डॉक्युमेंट्स संस्थळावर भांडारकर संशोधित प्रत संस्कृतमध्ये उपलब्ध आहे किंवा किसारी मोहन गांगुली ह्यांनी इंग्रजीत केलेला अनुवाद sacred-texts.com वर वाचू शकता.

तुषार काळभोर's picture

21 May 2021 - 1:30 pm | तुषार काळभोर

माझ्याकडे हे आहे. पुर्ण वाचायला दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला होता.
खूप गोष्टी पहिल्यांदाच कळल्या. मूळ महाभारतात आहेत की प्रक्षिप्त आहेत कल्पना नाही.
उदा. पांडवांच्या जन्माआधीच्या सर्व गोष्टी अगदी शंतनू, मत्स्यगंधा, व्यास, अंबा-अंबिका-अंबालिका, देवव्रत, पंडू-युधिश्ठीर-विदूर या गोष्टी मी पहिल्यांदा वाचल्या.

मदनबाण's picture

2 Jul 2021 - 11:25 pm | मदनबाण

@ प्रचेतस आणि तुषार

महाभारत यावर आपले भास्य रचल्याने खाली देत असलेला व्हिडियो तुम्हास रोचक वाटु शकेल. [ मी आत्ता तेच ऐकतोय आणि त्यात पर्वाचा उल्लेख आल्यामुळे आणि तुमचे प्रतिसाद वाचल्याने इथे द्यावासा वाटला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master

भास्य रचल्याने हे भाष्य करत असल्याने असे वाचावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master

जेम्स वांड's picture

19 May 2021 - 8:12 pm | जेम्स वांड

विजय देवधरांचं डेझर्टर वाचून संपवलं आहे.

प्रचेतस's picture

19 May 2021 - 8:16 pm | प्रचेतस

क्या बात है वांडोबा, लै दिसांनी दिसलात.
डेझर्टर मला फारसे आवडले नाही, अनुवाद उत्कृष्टच आहे, पण कथाच फार अतिशयोक्त वाटते.

डेझर्टर त्यातल्यात्यात सत्यतेच्या जास्त जवळ आहे एस्केप स्टोरी असल्याने....

राघव's picture

21 May 2021 - 12:40 pm | राघव

एस्केप स्टोरी वरून मागे वाचलेला मला निसटलंच पाहिजे हा द लाँग वॉक या पुस्तकाचा अनुवाद आठवला. खूप आवडलेला.

जेम्स वांड's picture

8 Jul 2021 - 12:03 am | जेम्स वांड

सत्यार्थाने बघता दुसरे महायुद्धच अतिशयोक्त होते की हो

हिटलर अतिशयोक्त

अमेरिका अतिशयोक्त

स्टालिन नक्कीच अतिशयोक्त

मुसोलिनी पण अतिशयोक्त

सगळेच तसले मग एक सामान्य शिपाई कसला वाचतोय हो !

वामन देशमुख's picture

20 May 2021 - 3:45 pm | वामन देशमुख

प्रकाशनपूर्ण नोंदणी केलेलं, शरद पोंक्षेंचं मी आणि नथुराम हे पुस्तक आजच घरपोच आलं, शनिवारी वाचून काढीन.

मी आणि नथुराम

पुस्तक इथेही उपलब्ध आहे.

वामन देशमुख's picture

20 May 2021 - 3:51 pm | वामन देशमुख

वीसेक वर्षांपूर्वी वाचलेली, माजी पंतप्रधान श्री पी वी नरसिंह रावांची द इन्साइडर ही आत्मचरित्रात्मक कादंबरी पुन्हा एकदा वाचत आहे. राजकीय जीवनापलीकडे राव हे बरेच कलाप्रेमी, साहित्यप्रेमी, रसिक होते.

गॉडजिला's picture

20 May 2021 - 4:14 pm | गॉडजिला

याचा मराठी अनुवाद अंतःस्थ म्हणूनही उपलब्ध आहे, कळत्या वयात याचे वाचन न झाल्याने मला हे प्रकरण तितके नीट समजले न्हवते पण माझे वडील मात्र या पुस्तकावर जरा जास्तच फिदा होते...

या पुस्तकाबद्दल माहित नव्हते.

ब्लॅक क्लाउड वर सिनेमा आला नाही आहे असे दिसते, आणि कोरा वर का नाही ह्याची उत्तर दिसले-
https://www.quora.com/Why-isnt-The-Black-Cloud-by-Fred-Hoyle-a-movie-yet...

फ्रेड हॉईल हे जयंत नारळीकरांच्या आदरस्थानी होते असे किमयागार मध्ये वाचल्याचे आठवते. त्यांनी सायन्स फिक्शन लिहिली असल्यास त्यात खरोखरच सायन्स मिळेल असे वाटते!

वामन देशमुख's picture

20 May 2021 - 4:01 pm | वामन देशमुख

फ्रेड हॉइल यांची द ब्लॅक क्लाउड ही अनेक वर्षांपासून संग्रही असलेली पण काही न काही कारणांमुळे पूर्ण वाचायचा मुहूर्त न लागलेली अप्रतिम कादंबरी पुढच्या आठवड्यात वाचणार आहे. याच कादंबरीचे कृष्णमेघ हे मराठी भाषांतर दहाएक वर्षांपूर्वी वाचलं होतं. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एक प्रचंड मोठा सजीव वायुरूपी ढग येऊन विसावतो आणि मग त्या ग्रहणात मानवजात हवालदिल होते असे कथानक आहे.

द ब्लॅक क्लाउड या कादंबरीवर हॉलिवूडमध्ये सिनेमा निघाला आहे का? मला शोधून सापडला नाही म्हणून इथे विचारतोय.

वामन देशमुख's picture

20 May 2021 - 4:01 pm | वामन देशमुख

फ्रेड हॉइल यांची द ब्लॅक क्लाउड ही अनेक वर्षांपासून संग्रही असलेली पण काही न काही कारणांमुळे पूर्ण वाचायचा मुहूर्त न लागलेली अप्रतिम कादंबरी पुढच्या आठवड्यात वाचणार आहे. याच कादंबरीचे कृष्णमेघ हे मराठी भाषांतर दहाएक वर्षांपूर्वी वाचलं होतं. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एक प्रचंड मोठा सजीव वायुरूपी ढग येऊन विसावतो आणि मग त्या ग्रहणात मानवजात हवालदिल होते असे कथानक आहे.

द ब्लॅक क्लाउड या कादंबरीवर हॉलिवूडमध्ये सिनेमा निघाला आहे का? मला शोधून सापडला नाही म्हणून इथे विचारतोय.

कंजूस's picture

20 May 2021 - 8:06 pm | कंजूस

यावर दुमत असेल. कारण फार मोठे ग्रंथ असतात किंवा संस्कृतात. मग कोणी ते वाचून 'मला समजलेले महाभारत' त्याच्या पद्धतीने लिहितात.

पण महाभारतात आलेले शहरांचे उल्लेख आणि बुद्धकाळातील सापडलेले अवशेष यावर अधुनमधून प्रकाश टाकणारे लेख येत असतात. उदाहरणार्थ - अहिछत्र
https://www.livehistoryindia.com/story/history-daily/ahichhatra/

तर https://www.livehistoryindia.com ही साइट उघडून लेख वाचत असतो.

निपा's picture

21 May 2021 - 12:21 pm | निपा

A World Without Islam हे पुस्तक वाचतोय. Graham Fuller ह्या CIA च्या संचालका नि लिहिले आहे .

जर इस्लाम नसता तर जग कसे असते ह्या कल्पने वर आधारित आहे .

pipeline मध्ये अजून दोन आहेत .. सवड मिळताच सुरु करेन
- a clash of civilizations
- gun germs and steel

सध्या द सेवन्थ स्क्रोल हे अनुवादित पुस्तक वाचतोय. अनुवाद उत्तम आहे, पण मूळ इंग्रजी पुस्तकच वाचायला आणिक मजा येईल असे वाटते.

तसंच आपल्या जयंत कुलकर्णीं सरांनी केलेला द सायकोलॉजी ऑफ मनी चा अनुवाद वाचतोय. :-)

त्याच्या आधीचे द रिव्हर गॉड वाचलेले असणे गरजेचे आहे का?

मी सेवेन्थ स्क्रोल वाचले आहे (मराठी अनुवाद) रिव्हर गॉडचे काहीच रेफरन्सेस नाहीत.
पुस्तक जबरदस्त आहे.
बादवे रिव्हर गॉड मराठी अनुवाद उपलब्ध आहे का?

प्रचेतस's picture

21 May 2021 - 1:53 pm | प्रचेतस

धन्यवाद.
मेहता लवकरच द रिव्हर गॉडचा मराठी अनुवाद प्रकाशित करत आहेत.

सेवन्थ स्क्रोल रोचक वाटतेय.

कंजूस's picture

21 May 2021 - 9:36 pm | कंजूस

यावरचे पुस्तक 'The story of the horse ....by Yeshaswini chandra. ( लोकसत्ता समिक्षा - ब्याटमन ,खफवर आलेली.) ते पुस्तक वाचतो आहे. बरं आहे.

रामदास२९'s picture

22 May 2021 - 1:40 pm | रामदास२९

द मित्रोखिन अर्काएव्स - द केजीबी इन द वोर्ल्ड हे पुस्तक वाचत आहे

गुल्लू दादा's picture

24 May 2021 - 12:35 am | गुल्लू दादा

'अमिताभ शहेनशहा' हे बाबू मोशाय यांचं पुस्तक वाचायला चालू केलंय.

सध्या व्यंकटेश माडगूळकरांचे कथासंग्रह,ललित यांचा फडशा पाडत आहे.
नुकतीच गो नि दांडेकर यांची वाघरू आणि त्या तिथं रुखातळी वाचली.
कोण निसर्गप्रेमी असेल तर एखादे पुस्तक नक्की सुचवा.
चितमपल्ली जवळजवळ सगळे वाचून झालेत.

bafut beagles पुस्तके बघा.

Pratham's picture

24 May 2021 - 5:40 pm | Pratham

लगेच बघतो!!!

'बुडता मज आवरी'
१/४ राहिलय.

सध्या या पुस्तकाचे पुनर्वाचन चालू आहे :

एक शून्य मी

कॉमी's picture

27 May 2021 - 10:38 pm | कॉमी

ड्यून संपले. पुढचा भाग वाचण्याइतपत नक्की चांगले आहे. पुढे मागे वाचायचा प्लॅन आहे. पण ड्यून सायन्स फिक्शन आजिबात वाटले नाही. कथेच्या कोअरमध्ये कोणतीही वैज्ञानिक संकल्पना नाही आहे. फक्त स्पेस आणि परग्रहावर घडते म्हणून साय-फाय वर्गीकरण- पटले नाही. फॅण्टसीच म्हणावे लागेल. साय-फाय+फँटसी पण नाही म्हणता येणार कारण वैज्ञानिक संकल्पने वर आधारित कथा फारशी नाहीच. केवळ लाईटसेबर नावाची फंकी 'वैज्ञानिक' वस्तू सिनेमात असल्याने स्टार वॉर्स सायन्स फिक्शन होत नाही

थर्ड राईश हळूहळू पुढे चालले आहे पण मजेदार आहे. कंटाळा येत नाही. ग्रेट रीड !

'द डेंजर्स ऑफ स्मोकिंग इन बेड' हा मारियाना एनरीकेझ यांचा बुकर २०-२१ साठी शॉर्टलिस्ट झालेला अनुवादित कथासंग्रह वाचायला चालू केला. भयकथा आहेत, पण वेगळ्याच. कथा मनोरंजक आहेत.

त्यातल्या एका कथेत (अवर लेडी ऑफ द क्वेरी) मध्ये निवेदनाची पद्धत वेगळीच आहे. यात कथेत निवेदन आहे ते एका गटाचे. (म्हणजे We did this, We did that.) ह्या गटात नक्की किती मुली आहेत (गट शाळा/कॉलेजवयीन मुलींचा आहे.), त्या मुलींची नावे- काहीच उल्लेख नाही. 'नातालिया' या एका मुलीच्या नावाचा फक्त उल्लेख आहे, आणि तिच्या काही कृती तेव्हढ्या गटापासून वेगळ्या निवेदित केल्या आहेत. (म्हणजे Natalia did this, Natalia did that.) आणि नातालिया सुद्धा गटातली एक आहेच. (Out of all of us, Natalia was the most obsessed.)

या व्यतिरिक्त, एक्च्युअल निवेदक, किंवा गटातील दुसरा कोणत्याही व्यक्तीबद्दल चकार शब्द नाही. कुठेही I did this असे नाहीच.

ह्या असल्या वेगळेपणातून कथा जास्त रंगत नसेल तर त्याचा व्यक्तिष: काही फायदा दिसत नाही. वेगळेपण फॉर द सेक ऑफ वेगळेपण इरिटेट होते.पण, कथा सुद्धा, बाय देमसेल्फ, हटके आहेत. विचित्र, कधीकधी भीतिदायक, दुःखी, काही वेळेस किळसवाण्या कथा आवडत असतील तर वाचायला चांगल्या आहेत.

कुमार१'s picture

2 Jun 2021 - 10:43 am | कुमार१

नुकतेच मी सॉमरसेट मॉम यांच्या Rain चे पुनर्वाचन केले.

त्यावर स्वतंत्र लेख इथे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jun 2021 - 1:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही लढलो-आम्ही घडलो, हे एस एफ आय कार्यकर्त्यांचं अनुभव असलेलं पुस्तक वाचलं. चळवळी कार्यकर्त्यांच्या प्रेरणा अनुभव आणि संघर्षाचे अनुभव. दुसरं पुस्तक, 'मराठी संतांचे सामाजिक कार्य' हे डॉ. वि.भि.कोलते यांचं महात्मा चक्रधर, संत ज्ञानेश्वर नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास यांच्याबद्दल सुंदर विवेचन असलेलं पुस्तक आहे. सध्या 'स्वातंत्र्योत्तर मराठी कविता' वसंत पाटणकरांच्या पुस्तकातला कवितांचं वाचन सुरु आहे.

-दिलीप बिरुटे

धनावडे's picture

2 Jun 2021 - 1:26 pm | धनावडे

लव्हाळी - श्री ना पेंडसे

श्री संत एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण
अनुवाद-डॉ. म.वि.गोखले
सहा वर्षांपूर्वी गर्भसंस्कार भाग म्हणून वाचलं होते.आता स्वचैतन्यासाठी वाचतेय.

कुमार१'s picture

10 Jun 2021 - 10:51 am | कुमार१

गी द मोपासां ( Maupassant) यांची "Mother Sauvage" कथा वाचली.
त्यावर लेखok

कुमार१'s picture

10 Jun 2021 - 10:52 am | कुमार१

त्यावर लेख इथे

कॉमी's picture

21 Jun 2021 - 4:54 pm | कॉमी

ग्राफिक नॉव्हल म्हणजे कॉमिक कादंबरी. मी पूर्वी या प्रकारात काही वाचले नाही आहे. पण मार्जेन सेत्रापी यांच्या पर्सेपोलिस (persepolis) बद्दल वाचले आणि वाचावे (कि पाहावे ?) वाटले, सुरु केले.

ही मार्जेनची आत्मकथा आहे.
वर्ष- १९७८, इराण.
इराण मध्ये पहलवी घराण्याची सत्ता आहे, पण ती संपुष्टात त्याच वर्षी आली. मार्जिचे वय होते- १०. ती उच्चशिक्षित आणि धर्माच्या प्रभावातून मोकळे असणाऱ्या प्रेमळ घरात राहत होती. मार्जिचे आई वडील दोघेही मार्क्सिस्ट होते. ती स्वतः फ्रेंच प्रभाव असलेल्या युनिसेक्स शाळेत जात असे.

त्या वेळेस पहलवी घराण्याच्या शहाने आपल्या विरोधकांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न चालू केले होते. रेक्स नावाच्या थिएटरला आतील लोकांसकट जाळून टाकल्याने (पोलिसांनीच जाळले असे विरोधकांचे म्हणणे होते.) लोकांचा आक्रोश वाढला, आणि हुकूमशाही संपवण्याची चळवळ जोराने उभी राहिली. मार्जिचे आईवडील सुद्धा चळवळीत सहभागी होते.

पण, १९७९ मध्ये इराणीयन रिव्हॉल्युशन किंवा इस्लामिक रिव्हॉल्युशन मुळे आयातुल्ला खोमेनी सत्तेवर आला, आणि इराण आगीतून फुफाट्यात गेला, आणि इस्लामिक राष्ट्र म्हणून इराणची स्थापना झाली.
त्या नंतर झालेल्या सामाजिक बदलांचे चित्रण सेत्रापी यांनी पर्सेपोलिस मधून केली आहे.

पर्सेपोलिस म्हणजे पर्शियन साम्राज्याची राजधानी. पर्शियन साम्राज्याच्या वैभवाची आठवण म्हणून नाव पर्सेपोलिस ठेवले आहे. सेत्रापी म्हणतात-

Since then, this old and great civilization has been discussed mostly in connection with fundamentalism, fanaticism, and terrorism. As an Iranian who has lived more than half of my life in Iran, I know that this image is far from the truth. This is why writing Persepolis was so important to me. I believe that an entire nation should not be judged by the wrongdoings of a few extremists. I also don’t want those Iranians who lost their lives in prisons defending freedom, who died in the war against Iraq, who suffered under various repressive regimes, or who were forced to leave their families and flee their homeland to be forgotten.

One can forgive but one should never forget

गॉडजिला's picture

21 Jun 2021 - 5:17 pm | गॉडजिला

असा विषय कॉमीक बुकमधुन हाताळणे अजुन मस्त.

कुमार१'s picture

21 Jun 2021 - 5:21 pm | कुमार१

रोचक !

प्रचेतस's picture

30 Jun 2021 - 8:13 pm | प्रचेतस

पर्सिपोलिस नाव वाचून आपल्याकडील लेण्यात असलेले पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ डोळ्यांसमोर आले. स्तंभांवर असलेली प्राण्यांची जोडगोळी ही पर्शियाच्या पर्सिपोलिस येथील स्तंभांची शैली. त्याच धर्तीचे स्तंभ येथील बेडसे, कार्ले, नाशिक लेणीत आढळतात.

कॉमी's picture

30 Jun 2021 - 9:27 pm | कॉमी

अशोकस्थंब सुद्धा पर्सिपोलिटन शैलीत बांधला आहे असे विकी म्हणते.

प्रचेतस's picture

30 Jun 2021 - 10:30 pm | प्रचेतस

अशोकस्तंभ म्हणजे तुम्ही सारनाथचा स्तंभ म्हणताय की एकुणात अशोकाने बांधलेले स्तंभ.

शैली जरी काहीशी मिळतीजुळती असली तरी दोन्हीत काही फरक आहेत. अशोकस्तंभ हे मुख्यतः सिंहस्तंभ म्हणून ओळखले जातात.

दोनीही. विकित सारनाथचा स्तंभ आणि अशोकाचे इतर स्तंभ आणि मौर्यन बांधकामातल्या बर्याच वास्तू पर्सिपोलिटन शैलीवरून प्रेरित आहेत असे दिले आहे.

ह्या शैलीचा प्रभाव कसा पडला असेल ?

मौर्यन स्तंभ हे स्वतंत्र उभे असतात तर पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ हे छताला आधार देण्याच्या स्थितीत उभे असतात. अशोकस्तंभ उंचीकडे निमूळते होत गेलेले दिसतात तर पर्सिपोलिटन एकसमान असतात शिवाय इतरही अनेक फरक आहेत.
तत्कालीन काळात होणार्‍या व्यापारासोबत कलासंस्कृतीचे आदानप्रदानही होत गेले त्यामुळे तिकडील शैलीचा प्रभाव येथे व इकडील शैलीचा प्रभाव तेथे पडत गेला.

ऋषिकेश गुप्तेंचा अंधारवारी कथासंग्रह वाचला.
(त्यातली काळ्याकपारी हि कुप्रसिद्ध कथा काही पाने वाचून स्किप केली, कारण किंगची "N" वाचलीये.)
इतर कथा छान आहेत ! विशेषतः गानूआजींची अंगाई ही कथा फारच भीतीदायक वाटली, चांगलाच थरकाप उडाला.

तुषार काळभोर's picture

30 Jun 2021 - 9:42 pm | तुषार काळभोर

तुंबाड मध्ये गानू आजींची प्रेरणा घेतली होती, असे वाटले.

कॉमी's picture

30 Jun 2021 - 10:05 pm | कॉमी

हो, कारण-

धारपांची तळघर (बहुदा? नक्की नाव आठवत नाही.)
किंगची ग्रॅनी
आणि गानुआजी तिन्ही गोष्टी खूपच समान थीमवर आहेत.

धारपांची कथा ग्रॅनी वरच आधारित होती, आणि तुंबाड ऑफिशियली धारपांच्या कथेवर आहे. ग्रॅनी मध्ये थेट हस्तर नाव पण आहे !

धर्मराजमुटके's picture

30 Jun 2021 - 9:52 pm | धर्मराजमुटके

जगात अनेक क्रुरकर्मे झाले पण जग अजूनही ज्यात रस घेऊन ज्याच्याबद्द्ल वाचतेय, लिहितेय, चित्रपट बनवतेय, चर्चा करतेय तो म्हणजे हिटलर. हे हिटलर चे यश म्हणावे काय ? मी देखील हिटलर बद्द्लची बरीच पुस्तके (मराठी) वाचलीत, चित्रपट पाहिलेत पण हा विषय लोकांना (आणि मला) देखील नक्की का आकर्षित करतो हे कळाले नाही.

तुर्त इतके म्हणता येइल की हिटलर इतके समर्थ्यवान नसतीलही पण तशी प्रवृत्ती राखणारे लोक आजही आजुबाजुला आहेत तीच गोष्ट हिटलरचा बिमोड करणार्‍यांची... त्यांची प्रवृत्ती राखणारे लोकही आजुबाजुला आहेत आणी हा दोन प्रव्रुत्तींमधील संघर्ष जो वर्तमानातील लोकांमधे अस्तित्वात आहे त्यांच्या बाजुचे अथवा विरोधाचे प्रतीक म्हणुन जे उदाहरण ठळक आहे ते उदाहरण पुन्हा पुन्हा विवीध कारणांनी चर्चेत येते व त्यापेक्षा मोठे उदा तयार होइल पर्यंत पुन्हा पुन्हा चर्चेत येत राहील...

हेच कारण आहे महाभारत आजही अमर वाटते त्यातील कथानक अथवा विवीध पात्रे आजही विवीध कांगोरे धुंडाळुन चर्चीली जातात...

हेच कारण आहे महाभारत आजही अमर वाटते त्यातील कथानक अथवा विवीध पात्रे आजही विवीध कांगोरे धुंडाळुन चर्चीली जातात...

वस्तुतः हि चर्चा महाभारत वा त्यातील कथान अथवा पात्रांबाबत नसतेच मुळी, अंडर दी सरफेस ही चर्चा तुमची माझी व आपल्याबाबतच असते... फक्त आपण ठळक उदाहरण बनलेले नसल्याने अशा चर्चेत आपण आपली नावे घेण्या ऐवजी प्रमुख पात्रांची नावे त्यांची वर्तणुक व त्याचे विश्लेशण करतो...

अगदी संतांची उदाहरणे लिहणार्‍यांनाही संतांबाबत त्यांच्या ज्ञानाबाबत काडीची फिकीर नाही म्हणुन त्यांचे कर्तुत्वही दांभिक व फक्त आणि फक्त स्वांत आत्मकेंद्रीत सुखासाठी आहे पण त्यांची कसलीच योग्यता नसल्याने ते ठळक उदाहरणे प्रसिध्द असणार्‍या संताची नावे घेउन स्वताची बोलबच्चन मांडत असतात आणी त्याला ते संतांचा महीमा असा समज करुन पसरवत असतात... वस्तुतः ते तितकेच स्वार्थी, मतलबी आणि आत्मकेंद्रीत असतात जितके स्वार्थी, मतलबी आणि आत्मकेंद्रीत संतांना न मानणारे असतात

तीन हजार टाके
-सुधा मूर्ती

नुकतंच 'किशोर शांताबाई काळे' यांचं 'कोल्हाट्याचं पोर' वाचलं. सुरुवात केल्यावर पुस्तक खाली ठेवता आलं नाही, काही तासात सलग वाचलं. काळजाला चटका लावणारं पुस्तक आहे. Against all odds म्हणजे काय ते हे पुस्तक वाचून कळतं. किरकोळ अडचणीमुळे नाउमेद होणार्यांनी जरूर वाचावं. यासारखं एकही पुस्तक पुन्हा लिहिता येऊन नये अशी परिस्थिती निर्माण झाली, तेंव्हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सुधारला असं म्हणता येईल!

गुल्लू दादा's picture

3 Jul 2021 - 10:17 am | गुल्लू दादा

पुस्तक छान आहे. त्यांच्या अपघाती मृत्यू बद्दल बऱ्याच शंका उपस्थित झाल्या होत्या.

या सुधारण्याच्या प्रवासाला आपणच खोडा घालत असतो.
एक समाज म्हणून आपल्याला आहे तिथेच रेंगाळण्यात जास्त सुख वाटते का? जेव्हा जेव्हा आपल्यातीलच कोणीतरी आपल्याच एखाद्या उणीवेवर बोट ठेवले तेव्हा आपणच त्याविरुद्ध प्रतिकार करतो.

कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाला बंदी घालावी अशी मागणी त्याच समाजातून झाली होती. तेदेखील लेखकाच्या अकाली मृत्यूच्या सहा वर्षांनी. आता काय परिस्थिती आहे, माहिती नाही.
पण कोणत्याही पक्षाचे असो, उठसूठ संवेदनशील गळवांच्या उपचारासाठी दिसेल त्यावर बंदी घालणारे सरकार असतेच. तेव्हा अशा पुस्तकांवर आमच्या भावना दुखावल्या किंवा आमच्या समाजाची बदनामी झाली या सबबीखाली बंदी आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

लोकरंग पुरवणीतील २०१३ सालचा एक लेख.

गुल्लू दादा's picture

3 Jul 2021 - 2:07 pm | गुल्लू दादा

ज्यांना स्त्री ही भोग्यवस्तू म्हणून कायम रहावी असे वाटते तेच लोक याला विरोध करू शकतात. हा लेख इथे दिल्याबद्दल आपले आभार तुषार.

बापरे. वाचायलाच पाहिजे.

तुषार काळभोर's picture

17 Jul 2021 - 12:39 pm | तुषार काळभोर

काळजाला चटका लावणारं पुस्तक आहे.
हे अंडरस्टेटमेंट झालं. याच्यापेक्षा बरचसं काही जाणवतं. ते शब्दात मांडता येणार नाही. वाचताना जर असं वाटतं असेल तर तो मुलगा आयुष्य कसं जगला असेल. जन्मल्यापासून परवड सुरू झाली. आणि जेव्हा आयुष्याचा आनंद घेता येईल अशी परिस्थिती आली, तेव्हा ते निघून गेले.
दुर्दैवाने मरेपर्यंत त्यांचा पिच्छा सोडला नाही.
दोन चार अपवाद सोडले तर, प्रत्येक पात्र तिरस्करणीय आहे. कुणाचा स्वभाव वाईट असेल, कुणाची मजबुरी असेल, पण प्रत्येक जण स्पर्धा असल्यासारखं ज्या निष्ठूर आणि नीचपणे वागतो, त्याला तोड नाही. डॉक्टर होणं लांब, हा मुलगा तोपर्यंत जगलाच कसा याचं आश्चर्य वाटत राहतं.

भीडभाड न ठेवता त्यांनी ज्याप्रकारे खरी नावे वापरली आहेत, त्यांचा अपघात हा घातपात होता असं जर कधी सिद्ध झालं तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

तुषार काळभोर's picture

5 Jul 2021 - 9:53 pm | तुषार काळभोर

खिचडी

प्रचेतस's picture

5 Jul 2021 - 10:20 pm | प्रचेतस

हो, वाचलंय.
सुरुवातीला पकड घेणारे पुस्तक नंतर नंतर रटाळ होत जाते.

सौंदाळा's picture

6 Jul 2021 - 9:19 am | सौंदाळा

एकदा वाचायला चांगले आहे.
खूपवेळा अंडरवर्ल्डच्या दादाचे तत्वज्ञानाचे परिच्छेद अगम्य, रटाळ आहेत आणि रिपीट झाले आहेत. मधेच पुस्तक भरकटल्यासारखे वाटते.
तरी एकंदरीत चांगलेच आहे.

आज सकाळी मेडिटेशनवर असलेली पॉडकास्ट ऐकताना मुलाखत घेणार्‍या व्यक्तीने ज्या व्यक्तीची मुलाखत घेतली जात आहे त्या व्यक्तीला काही पुस्तके रेफरन्ससाठी विचारली होती... त्यात एका पुस्तकाचे नाव आणि ज्या व्यक्तीने हे पुस्तक लिहले आहे त्या बाबत उत्सुकता चाळवल्याने मी ते पीडीएफ डाउनलोड करुन वाचण्यास सुरवात केली असुन आज त्या पुस्तकाचा १ला धडा [चॅप्टर ] वाचुन पूर्ण केला... आता काही काळ मी हे पुस्तक वाचुन पूर्ण करण्यासाठी देण्याच्या विचारात आहे.
पुस्तकाचे नाव :- Many Lives, Many Masters
The True Story of a Prominent Psychiatrist, His Young Patient and the Past-life Therapy That Changed Both Their Lives
लेखक :- Dr. Brian Weiss
हा प्रतिसाद लिहताना मी या डॉक्टरांचा छोटासा व्हिडियो पाहिला. तो खाली देत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen Chawla

त्यात या पुस्तकाचा नंबर फार फार फार वरचा आहे

अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या या ३ कथा वाचल्या :

Cat in the Rain
The Killers
Hills Like White Elephants

त्यापैकी "Hills Like White Elephants" आवडल्याने त्यावर स्वतंत्र लेख लिहिलाय.