१० मे १८५७ - भारतीय स्वातंत्र्ययुद्धाची तुतारी ह्याच दिवशी फुंकली होती

साहना's picture
साहना in काथ्याकूट
11 May 2021 - 10:27 am
गाभा: 

फेडून नवस माहोरास
गेले लाहोरास
जिंकीत झेंडे !
अरे त्यांनी अटकेत
पाव घटकेत लाविले झेंडे...

एप्रिल २० १७५८ मध्ये मराठ्यांनी लाहोर जिंकले आणि आणि अवघ्या ८ दिवसांत अफगाणिस्तान मधील अटक. "अटकेपार झेंडे" हा वाक्प्रचार त्यावरूनच सुरु झाला.

त्यानंतर १० दिवसांनी म्हणजे मे ८ ला त्यांनी अब्दालीच्या सेनेचा पेशावर मध्ये मोठा पराभव केला.

(अवांतर : ह्याच वर्षी प्रिन्स्टन विद्यापीठांत कुलगुरूंनी लोकांची भीती घालविण्यासाठी पहिले स्मॉलपॉक्स वॅक्सीन घेतले. दुर्दैवाने ह्यांत खर्चारीचा रोग असल्याने काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला)

१०० वर्षांनी इंग्रजांनी भारतांत बऱ्यापकी बस्तान बसवले होते आणि मराठा सैन्याने इंग्रजांविरुद्ध तथाकथित बंड पुकारले. आधुनिक भारतीय इतिहासांत ह्या युद्धाला बंड म्हणून संबोधिले जातेच पण त्याशिवाय हे युद्ध काही तरी शुल्लक कारणावरून झाले होते अशी बतावणी केली जाते. हे युद्ध प्रत्यक्षांत अत्यंत चाणाक्ष पणे प्लॅन केले गेले होते आणि नशिबाची थोडी जरी साथ असती तर ब्रिटिशाना पूर्ण पणे हाकलून लावणे शक्य होते.

ह्या युद्धांत ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांनी अत्यंत भ्याडपणे आपल्या बायको मुलांना मानवी ढाल बनवून पळण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी भारतीय सैनिकांनी नाईलाजाने त्यांच्यावर सुद्धा गोळ्या चालविल्या. हे युद्ध जिंकण्याच्या नादात ब्रिटिशांनी मात्र हजारो निरपराध मुले आणि स्त्रियांना धाक घालण्यासाठी ठार मारले. हा इतिहास ब्रिटिश सरकारने लपवून ठेवला असला तरी ब्रिटिश जनतेला सुद्धा ज्या प्रकारची किळस आल्याने ब्रिटिश राणीने त्याकाळांतील सर्वांत मोठी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी बंद केली आणि भारताचा ताबा स्वतः घेतला.

अर्थशास्त्राचे जनक आणि मुक्त आर्थिक व्यवस्था आणि भांडवलवादाचे पुरस्कर्ते ऍडम स्मिथ ह्यांनी १७७६ मध्येच भाकीत केले होते कि ईस्ट इंडिया कंपनीला ज्या प्रकारची मोनोपॉली ब्रिटिश सरकारने दिली आहे त्याचे पर्यावसन शेवटी भारतीय आणि ब्रिटिश लोकांच्या नुकसानीत होईल.

1857

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 May 2021 - 10:33 am | प्रचेतस

ह्या विषयावर शेषराव मोरे यांचे १८५७ चा जिहाद हे पुस्तक उपलब्ध आहे.
मुळात हे स्वातंत्र्यासाठीचे युद्ध नसून ब्रिटिशांना घालवण्यासाठी मुस्लिमांनी केलेला जिहाद होता असा काहीसा निष्कर्ष त्यांनी सहस्रावधी कागदपत्रे अभ्यासून काढला होता.

प्रचेतस's picture

11 May 2021 - 10:38 am | प्रचेतस

स्वातंत्र्यवीर सावरकर हे मोरेंचे श्रद्धास्थान, कट्टर सावरकरवादी मात्र ह्या पुस्तकात त्यांनी सावरकरांच्याच १८५७चे स्वातंत्र्यसमर ह्या पुस्तकातील विचारांचेही खंडन पुराव्यानिशी केले आहे.

जिज्ञासूंनी दोन्ही पुस्तकं अवश्य वाचावीत.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 May 2021 - 10:56 am | चंद्रसूर्यकुमार

हेच लिहायला आलो होतो.

या विषयावर डॉ.अभिराम दिक्षित यांच्या ब्लॉगवर जबरदस्त लेख आहे. http://drabhiram.blogspot.com/2012/09/blog-post_8496.html

या लेखात सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकात काही लिहिले आहे असा उल्लेख वाचल्यावर ते सावरकरांनीच लिहिले आहे यावर विश्वास बसणे कठीण जाते. ते पुस्तक मी शाळेत असताना वाचले होते. पण त्यावेळी सावरकर म्हटले की काही प्रश्न विचारायचे नाहीत अशा प्रकारची अंधभक्ती असायचे वय होते. त्यावेळी हे पुस्तकात वाचले असेलही पण आता लक्षात नाही. सध्या परत ते पुस्तक वाचणे झालेले नाही. जर कोणाकडे ते पुस्तक असेल तर सावरकरांनी खरोखरच असे काही त्यात म्हटले आहे का हे तपासून सांगितले तर चांगले होईल. हे डॉ. अभिराम दिक्षित यांच्या वर दिलेल्या लेखातून जसेच्या तसे पेस्ट करत आहे--

सावरकरांच्या १८५७ वरील ग्रंथातील काही वाक्ये आपण पाहू . ज्याला तात्याराव सावरकर स्वातंत्र्य युद्ध मानतात त्या १८५७ च्या पुस्तकात तात्यांनिच जिहाद हा शब्द अनेकदा वापरला आहे . १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहितेवेळी सावरकर २५ वर्षांचे होते. त्यांनी त्यावेळी इस्लाम धर्माचा अभ्यास केला न्हवता. जिहादचा नीट अर्थही त्यांना त्यावेळी उमगला न्हवता. सावरकर लिहितात : -

जानेवारी १८५७ : बातमी पसरली - गायीच्या आणी डुकराच्या चरबीची नवी काडतुसे येत आहेत. ती दातानी तोडावी लागणार आहेत.

जानेवारी ते मार्च १८५७: बातमीबरोबरच क्रांतीचा गुप्त संदेश देणार्‍या चपात्या फिरवल्या जातात. १८५७ चे स्वातंत्र्यसमर मधे या चपात्यांना उद्देशून सावरकरांनी म्हटले आहे " जा ,हे क्रांतीच्या देवदूता, तसाच पुढे जा ! आपली प्रियतमा तिच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करण्यास तयार झालेली आहे....ही शुभवार्ता तिच्या लेकरांना कळवण्यासाठी दहादिशांना धावत जा ! तीरासारखा पुढे जा ! ... हे मायावी देवदूता .... (१८५७ - ७५)

१६ मार्च १८५७ : सादिक अल अखबार या दिल्लीच्या व्रुत्तपत्राची हेडलाईन : पर्शियातील दरबारी लोकांनी आपल्या सम्राटाला सल्ला दिला की आपण ब्रिटीशांविरुद्ध जिहाद करून हिंदुस्थान जींकून घ्यावा. याविषयी सावरकर लिहितात - " १८५७ चे आरंभी दिल्लीच्या मशिदींवरून याच अर्थी सार्वजनिक जाहिरनामे फडकू लागले ! ' फिरंग्यांचे ताब्यातून हिंदुस्थानची मुक्तता करण्यासाठी इराणी सैन्य लवकरच येत आहे. तेंव्हा या काफिर लोकांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी समरांगणात उडी घ्यावी" (१८५७ - ६५). हेच सावरकर उत्तरायुष्यात हिंदुत्ववादी झाले. पुढे उत्तरायुश्यात गांधींनी अफगाणिस्तानच्या अमिराला आवताण धाडले होते तेंव्हा सावरकरांनी पायताण उगारले होते.

२९ मार्च १८५७ : मंगल पांडे गोळी झाडतो. (मंगल पांडेचे मार्गदर्शक मित्र म्हणून नक्कीखान आणी वहाबी नेता पीर अली याचा सावरकरांकडून गौरवपूर्ण उल्लेख. ) (१८५७ -६७, २८५)

१० मे १८५७ : मीरत चा उठाव (घोडदळाकडून प्रारंभ). बंडखोर कैदी मुक्त. अनेक ब्रिटिशांना कायमची मुक्ती. याविषयीचे सावरकरांचे भाष्य मुळातुनच वाचण्यासारखे आहे !.

११ मे १८५७ : बंडखोर सैन्य दिल्लीत दाखल. बहादुरशहा जफर ला बादशहा घोषित केले. आज्ञापत्रांवर बहादुरशहाची राजमुद्रा झळकू लागली. " विजयाचा अधिपती ! धर्माची ज्योत ! इस्लामचा संरक्षक - सम्राट मुहंमद बाहदुरशहा." याविषयी सावरकर लिहितात " बादशहाचे राज्याहरोहण म्हणजे जुन्या मोगल सत्तेची पुनःस्थापना न्हवती. ते हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक होते." (१८५७ -२२८)

१९ मे १८५७ : दिल्लीतील सर्व ख्रिश्चनांचे शिरकाण त्यानंतर दिल्लीत हिंदूंविरुद्ध जिहादची घोषणा. सावरकर लिहितात - काही माथेफिरू मुस्लिमांनी हिंदूविरुद्ध जिहादची घोषणा केली. (१८५७ - २३०)

जून १८५७ : उत्तर भारतात बंडाचा वणवा पेटतो. सावरकर लिहितात - लखनौला तर मशिदी मशिदीतून मौलवींनी जिहाद सुरू करण्यासाठी उघड व्याख्याने देत असावे. पाटणा व हैद्राबाद येथे रात्रीरात्रीतून सभा भरत व निरनिराळ्या मौलवींकडून लोकांस स्वातंत्र्ययुद्धाचे व स्वधर्मयुद्धाचे शिक्षण देण्यात येई. (१८५७ - ६६)
१ नोव्हेंबर १८५८ : शिखांच्या मदतीने ब्रिटीश बंड चिरडतात राणीचा जाहिरनामा प्रकाशित. सावरकर - शिखांनी देशद्रोह केला असे म्हणतात. (१८५७ - १२४)

(१८५७ -१२४ हा संदर्भ समग्र सावरकर वाङमय खंड चार १८५७ चे स्वातंत्र्यसमर पृष्ठ १२४ असा वाचावा. वीर सावरकर प्रकाशन, मुंबई. १९६३)

माझ्यामते सावरकर त्यांच्या पूर्वायुष्यात इतके कर्मठ नव्हते.
अंदमानात त्यांना मिळालेल्या अनुभवांनी त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यापेक्षा सुद्धा हिंदू ऐक्य हा अधिक महत्वाचा विषय वाटला असण्याची शक्यता आहे.

त्यासाठी माझी जन्मठेप वाचावे लागेल, त्यात हा बदल सविस्तरपणे आलेला आहे.

गॉडजिला's picture

11 May 2021 - 10:59 am | गॉडजिला

तो जिहाद होता की स्वातंत्र्य युध्द ?

हिंदूंसाठी आणि धर्माचे सोयर सुतक नसलेल्यांसाठी दोघांसाठी ते स्वातंत्र्य युध्द होते ...

काही "प्रेमळ" धर्म्यांसाठी मात्र जिहाद होता कोणताही संघर्ष... तो या प्रेमळ लोकांना जिहादच असतो असे वारंवार दिसून आलाय पण लोकांचे डोळे उघडत नाहीत

हा आणि हाच कळीचा मुद्दा आहे ..उद्या जर समजा महाराष्ट्रातील एस टी कामगारांचाच लढा असेल तर त्यातील केवळ संख्येच्या जोर्रावर मोजले तर हिंदूच असतील (साधे गणित) .. पण त्यांच्यासाठी हे काही "हिंदू धर्मरुद्ध" होत नाही... तो एक कामगार संघर्ष एवढेच असते... हि झाली हिंदुकनही साहिशुनता आणि धर्म आणि काम वेगवेगळे ठेवले पाहिजे हे समजण्याची अक्कल
बाकी काही प्रेमळ धर्मांचे तसे असते का? जगभर तपासून बघावे उदार मतवाद्यांनि...

गॉडजिला's picture

11 May 2021 - 11:18 am | गॉडजिला

यावर उपाय काय जर का मी व्यक्ती म्हणून नास्तीक असेन देव धर्म वगैरे काही मानत नसेन तर ?

चौथा कोनाडा's picture

11 May 2021 - 11:23 am | चौथा कोनाडा


हिंदूंसाठी आणि धर्माचे सोयर सुतक नसलेल्यांसाठी दोघांसाठी ते स्वातंत्र्य युध्द होते ...


+१,१११

साहना's picture

11 May 2021 - 1:30 pm | साहना

मुद्द्दा पटतो !

शांतीप्रिय समाजासाठी सर्व काही जिहाद असते तर हिंदू साठी तो लढा होता.

चौकस२१२'s picture

11 May 2021 - 5:56 pm | चौकस२१२

शांतताप्रिय समाजशी दोन हात तरी करता येतात घरातच राहून घरातच घाण करणाऱ्या अति उदारमतवादी हिंदूंचाच जास्त ताप
गेली काही वर्षातील उदाहरण
- "शिवाजी महाराज हे हिंदवि स्वराज्यासाठी झगडले " असे म्हणायचं अवकाश .. ह्यांना लागेचच बोचते ( पण धर्मावर आधारित ओवेसींच्या पक्षाचे अस्तित्त्व चालते ) हे लगेच म्हणणार शिवाजी महाराज काय हिंदुत्ववादी होते का?
हो बाबानो ते काही रूढार्थानं तोगडिया सारखे "हिंदुत्ववादी" नवहते ... पण त्यांना बहुसंख्यांकांचा श्रद्धेचे रक्षण आणि अल्पसंख्यक्यांना त्याच वेळेस संरक्षण असे "हिंदवी स्वराज्य " अभिप्रेत होते ... उद्या हीच उदारमतवादी, शिवरायांनी रायरेश्वराच्या शंकराच्या पिंडी सामोरे स्वराज्याची शपथ घेतली असे म्हणण्याला पण आक्षेप घेतील ..

सध्या अरुण साधूंचे चीन वरील २००५ साली लिहिलेलं एक पुस्तक वाचतोय... हे हि त्याच मालेतील मणी .. प्रस्तआ वाने तच काय कि ६७ साली याच विषयवार त्यांनी जे लिहिले होते तेव्हाचाच ध्येयवादी चीन आत राहिला नाही ( भांडवशीतील काही गोष्टी घेतल्या म्हणून यांना दुख्ख )

उपयोजक's picture

12 May 2021 - 11:28 am | उपयोजक

एक छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडही अस्तित्वात आली असून प्रत्येक जिल्ह्याचे त्याचे स्वतंत्र पानही फेबुवर चालवले जाते आहे. हे लोक स्वत:ला छत्रपती शिवाजींचा मुस्लिम मावळा असेही म्हणवून घेतात. शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्वच धर्माचे लोक कसे होते. विशेषत: मुस्लिम सैनिक किती होते याचा एक्झॅट आकडा(ऐतिहासिक पुराव्यासहित)यांच्याकडेच असतो.
एक गोष्ट कळत नाहीये की जर इतके सारे मुस्लिम जर शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते तर मग औरंगजेब त्याच्या सैन्यातल्या ज्या सैनिकांच्या जीवावर इतक्या उड्या मारायचा ते लोक कोणत्या धर्माचे होते? बहुतेक ते मुस्लिम नसावेत. कारण मुस्लिम तर मोठ्या संख्येने शिवाजीराजेंच्या सैन्यात होते.
पण मग परत प्रश्न उपटतो की जो मुस्लिम नाही तो काफिर. काफिरांना मुस्लिम बनवा किंवा नष्ट करा हा संदेश असेल तर मग एका काफिराच्या सैन्यात इतके मुस्लिम कसे असतील? ते सुद्धा १७ शतकाच्या सुरुवातीला? जेव्हा औरंगजेब सारा भारत गिळायला बघत होता तेव्हा? आपल्या धर्माचा माणूस म्हणून औरंगजेबाच्या सैन्यात त्यावेळी मुस्लिम जाण्याची शक्यता जास्त असेल ना? शिवाय शिवाजीमहाराजांवर इतकं प्रेम असेल तर औरंगाबादचं नाव बदलून शिवाजीमहाराजांच्या सुपुत्राचे नाव शहराला देण्यात आडकाठी कोण आणतंय?

साहना's picture

11 May 2021 - 1:29 pm | साहना

सावरकर आणि मोरे दोन्ही लोकांविषयी मला प्रचंड आदर आहे.

समग्र सावरकर वाचला असल्याने त्यांची भूमिका मला ठाऊक आहे. सावरकरांचे वय त्या काळी कमी होते आणि अभ्यासपूर्ण लेखनापेक्षा त्यांचा भर भारतीय इतिहासाचा गौरव दाखवून देणे हा होता असे वाटते. कदाचित त्यांनी "टॅक्टिकल" दृष्टिकोनातून ते लिहिले असावे. दुर्दैवाने शेषराव मोरे यांचे १८५७ चा जिहाद हे वाचणे झाले नाही तरी त्यांची भूमिका ऐकून ठाऊक आहे. तरीसुद्धा मूळ स्रोत अभ्यासल्याशिवाय काहीही बोलणे चुकिचे ठरेल.

पराग टोपे ह्यांचे ऑपरेशन रेड लोटस हल्लीच वाचनात आले. पराग हे तात्या टोपे ह्यांचे वंशज असल्याने त्यांना अनेक जुने दस्तयेवज आणि माहिती उपलब्ध आहे जी सहज सहजी इतरांना उपलब्ध आहे.

सावरकर आणि टोपे ह्यांचे एका विषयावर एकमत आहे. १९५७ चे समर हि एक महत्वाची घटना होती. ह्याने ब्रिटिशांच्या उरांत धडकी भरवली होतीच पण काही तरी शुल्लक कारणाने झालेला तो उठाव नव्हता. त्याच्यामागे भरपूर प्लॅनिंग होते. त्याचमुळे ब्रिटिश घाबरले. त्यानंतर त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ह्या समरातील प्लॅनिंग हा भाग इतिहासातून पूर्णपणे गाळून टाकण्याचा प्रयत्न केला.

टोपे ह्यांचा लेखना प्रमाणे

- ईस्ट इंडिया कंपनीनें भारतीयांना ख्रिस्ती बनवण्याचे धोरण निर्माण केले होते. युद्धाचा प्रमुख उद्धेश हे रोखणे हा होता. ह्या विषयावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंचे एकमत होते.

- ह्या युद्धाने ब्रिटिश सत्ता नष्ट नाही झाली तरी ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे नष्ट झालीच पण ब्रिटिश राणीने भारतातील धार्मिक गोष्टींत ढवळाढवळ करून नये असे स्पष्ट आदेश दिले. (अरुण शॉरी ह्यांचे ख्रिस्ती मिशनरी लोकांवरचे पुस्तक सुद्धा ह्याची पुष्टी देते).

१८५७ च्या समरांत मुस्लिम भारतीयांनी मोठी भूमिका (म्हणजे त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत) बजावली आहे. ह्यांत गैर काहीच नाही आणि उलट त्याला जिहाद म्हणून संबोधने मला बरोबर वाटत नाही. हिंदू समाजांत जी पराभूत मानसिकता निर्माण झाली आहे त्याचे ते द्योतक वाटते. मुस्लिम सैनिकांनी हिंदू सैनिकांची मदत केली ह्याचा अर्थ सर्वच युद्ध मुस्लिम जिहाद म्हणणे म्हणजे हिंदू सैनिकांचा अपमान आहे. असे मला वाटते. (सध्या हिरवा रंग म्हणजे इस्लाम असे समीकरण बनवणं हिंदूंनी एक अक्खा रंग दुसऱ्या धर्माच्या ताब्यांत दिल्यासारखे आहे)

युद्धाची रणनीती नानासाहेब आणि टोपे ह्यांनी निर्माण केली होती. तरी सुद्धा काही गोष्टी चुकल्या. झाशी मध्ये इंग्रज अत्यंत संतापले होते. एक महिलेने त्यांना झुंजवले असल्याने त्यांनी विजयानंतर सामान्य निर्दोष लोकांचे शिरकाण केले. लहान मुले आणि महिला, वृद्ध आणि अपंग मिळेल त्याला नाना विविध तऱ्हांनी ठार मारले. त्यांच्या ह्या पाशवी हिंसाचाराने संपूर्ण मध्य भारत हादरला आणि त्यामुळे भारतीय सैनिकांचे मनोबल खचले. ईस्ट इंडिया कंपनीने १०,००,००० लोकांना ठार मारण्याचे लक्ष ठेवले होते आणि सुमारे ७ लाख लोकांना मारले सुद्धा.

मुस्लिम सैनिक कदाचित जिहाद च्या भावनेने लढले सुद्धा असतील पण इतका मोठा लढा उभारण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता त्या काळाच्या इस्लामिक सेनेकडे अजिबात नव्हती. तुम्हाला तात्या टोपे आणि लक्ष्मी बाई ऐकून ठाऊक आहे पण इस्लामिक बाजूने कोण ठाऊक आहे ? (बहादूर शाह जाफर सोडून ? )

१८५७ चे स्वातंत्र्यसमर ह्या पुस्तकात अनेक मौलवी आणि फकिरांनी क्रान्तीचा संदेश पसरवला असा उल्लेख आहे. ग्राउंड लेव्हल वर साधू, संन्याशी आणि मुल्ला मौलवीनी खूप काम केले, त्यातल्या बऱ्याच लोकांना फिरंग्यांनी ठार केले असे वाचल्याचे आठवत आहे.

(फार पूर्वी वाचले आहे, तपशील आठवत नाहीत.)

शेषराव मोरेंनी हा जिहाद होता हा निष्कर्ष काढण्यासाठी भरपूर संदर्भ दिलेले आहेत जे मुळातून वाचण्यासारखे आहेत. मोरे यांचे मत अगदी सहजी खोडून काढता येत नाही हे निश्चित.

सावरकर म्हणजे महान, अजोड व्यक्तिमत्व, अफाट माणूस, सदैव नमन करावेत असे. सर्वार्थाने भारतरत्नाचे मानकरी, मात्र ते इतिहास संशोधक नसल्याने त्यांच्या उपरोल्लेखित आणि सहा सोनेरी पाने ह्या दोन्ही पुस्तकांत काही फॅक्च्युअल चुका राहिल्या आहेत.

कंजूस's picture

11 May 2021 - 7:01 pm | कंजूस

- William Darlymple याचेही वाचा. सगळी कागदपत्रे दिल्ली येथे पुरातत्व विभागाच्या कार्यालयात 'Mutiny papers' या खात्यात आहेत. त्यावरून जफरचा आणि एकूण १८५७ चा इतिहास पुढे येतो.

ब्रिटीश लोकं भारतात धर्मांतर करत आहेत या मतप्रवाहास जोरदार पुष्टी ही बंदुकीची चरबी प्रकरणातून मिळाली आणि उठाव झाला. मग सगळ्यांनीच हात धुऊन घेतले.

उपयोजक's picture

12 May 2021 - 11:05 am | उपयोजक

संजय सोनवणी यांनी किस्त्रीम च्या २०१० अंकात लिहिले आहे की अब्दालीने आधीच अटक आणि भोवतीचा भाग लुटून नेला होता. अशा आधीच लुटलेल्या भागावर विजय मिळवणे यात विशेष असे काय होते? अशा बेचिराख झालेल्या भागावर विजय मिळवून राघोबादादांच्या हातात काहीच लागले नाही.म्हणून तर अटकेपार जाऊनही पेशवाईची कर्जे उतरली नव्हती.

वामन देशमुख's picture

12 May 2021 - 11:38 am | वामन देशमुख

इतिहासातील घटना त्याच असतात; त्यांचे विश्लेषण कोणत्या दृष्टिकोनातून करायचे ही निवड आपली असते.

१८५७ चे बंड
१८५७ चा जिहाद
१८५७ चे स्वातंत्र्य समर

हे, एकाच गतकालीन घटनाक्रमाचे तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेले विश्लेषण आहे. सद्यकालीन भारतीय परिप्रेक्ष्यात त्यांपैकी कोणते विश्लेषण लागू पडावे हे ठरवणे अवघड आहे का?

अहिरावण's picture

6 Sep 2023 - 3:01 pm | अहिरावण

इथे म्हणतात -

१०० वर्षांनी इंग्रजांनी भारतांत बऱ्यापकी बस्तान बसवले होते आणि मराठा सैन्याने इंग्रजांविरुद्ध तथाकथित बंड पुकारले. आधुनिक भारतीय इतिहासांत ह्या युद्धाला बंड म्हणून संबोधिले जातेच पण त्याशिवाय हे युद्ध काही तरी शुल्लक कारणावरून झाले होते अशी बतावणी केली जाते. हे युद्ध प्रत्यक्षांत अत्यंत चाणाक्ष पणे प्लॅन केले गेले होते आणि नशिबाची थोडी जरी साथ असती तर ब्रिटिशाना पूर्ण पणे हाकलून लावणे शक्य होते.

आणि इथे म्हणतात -

भारतीयांचे स्वातंत्र्य हे लढा वगैरे देऊन मिळाले नव्हते तर ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने प्लॅन केले त्याच पद्धतीने झाले.

दोन वर्षांमधे इतके मत परीवर्तन ?? की थेट ब्रिटीशांची चाटु गिरी?

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2023 - 5:58 pm | चौथा कोनाडा

दोन वर्षांमधे इतके मत परीवर्तन ?? की थेट ब्रिटीशांची चाटु गिरी?

मुळ वाक्य असे आहे:

भारतीयांचे स्वातंत्र्य हे लढा वगैरे देऊन मिळाले नव्हते तर ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने प्लॅन केले त्याच पद्धतीने झाले. ब्रिटिश लोकांनी सत्ता भारतीयांना नाही दिली तर आपल्या चट्ट्याबॅट्या लोकांना दिली.

यातिल दुसरे वाक्य मात्र आपण चतुराईने लपवलेत ! लै भारी झ्याक !

माझा आकलनानुसार :
ब्रिटिश सत्ता जर्जर झाली होती ....... त्यांना भारत सोडायचा होताच ... हे सर्व त्यांनी त्यांच्या नियोजनाने केले ! इथे लढा म्हणजे सशस्त्र क्रांतीचा लढा असे म्हणायचे आहे. त्यांनी चट्ट्याबॅट्या लोकांना हाताशी धरुन अहिंसक स्वातंत्र्य लढ्याचे नुसते चित्र उभे केले होते.

तुमच्या आकलनाबद्दल आदर आहे.

चट्ट्याबॅट्या लोकांना हाताशी धरुन अहिंसक स्वातंत्र्य लढ्याचे नुसते चित्र उभे केले होते.

-- हो हो आत्ता आठवले. पन्नासच्या दशकातील आमच्या लहानपणी 'पंध्रागष्ट' वगैरेला दिवसभर लाऊडस्पीकरांवर नुसता हैदोस चालायचा. " देदी हमे आजादी बिनाखड्ग बिनाढाल - साबर्मती के संत तुने कर्दिया कमाल" (आणि त्यानंतर "रघुपती राघव राजा राम" हे कशाला टाकले होते कुणास ठाऊक).
--- अहिंसक स्वातंत्र्य लढ्याचे नुसते चित्र हे लई भारी.

जिज्ञासूंसाठी पूर्ण गाणे इथे देत आहे: (मी पण पहिल्यांदाच वाचत आहे)

दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
आँधी में भी जलती रही गाँधी तेरी मशाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल

धरती पे लड़ी तूने अजब ढंग की लड़ाई
दागी न कहीं तोप न बंदूक चलाई
दुश्मन के किले पर भी न की तूने चढ़ाई
वाह रे फ़कीर खूब करामात दिखाई
चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
रघुपति राघव राजा राम

शतरंज बिछा कर यहाँ बैठा था ज़माना
लगता था मुश्किल है फ़िरंगी को हराना
टक्कर थी बड़े ज़ोर की दुश्मन भी था ताना
पर तू भी था बापू बड़ा उस्ताद पुराना
मारा वो कस के दांव के उलटी सभी की चाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
रघुपति राघव राजा राम

जब जब तेरा बिगुल बजा जवान चल पड़े
मज़दूर चल पड़ी थी और किसान चल पड़ी
हिंदू वो मुसलमान, सिख पठान चल पड़े
कदमों में तेरी कोटि कोटि प्राण चल पड़े
फूलों की सेज छोड़ के दौड़े जवाहरलाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
रघुपति राघव राजा राम

मन में थी अहिंसा की लगन तन पे लंगोटी
लाखों में घूमता था लिये सत्य की सोंटी
वैसे तो देखने में थी हस्ती तेरी छोटी
लेकिन तुझे झुकती थी हिमालय की भी चोटी
दुनिया में तू बेजोड़ था इन्सान बेमिसाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
रघुपति राघव राजा राम

जग में जिया है कोई तो बापू तू ही जिया
तूने वतन की राह में सब कुछ लुटा दिया
माँगा न कोई तख्त न कोई ताज भी लिया
अमृत दिया तो ठीक मगर खुद ज़हर पिया
जिस दिन तेरी चिता जली, रोया था महाकाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल
रघुपति राघव राजा राम

-- हे राम. कित्ती गं बाई ते कौतुक करायचं एका माणसाचं. हाच तो एक वीर. बाकी सगळे माफीवीर.

सर टोबी's picture

9 Sep 2023 - 9:00 am | सर टोबी

अतिशयोक्तीपूर्ण आहे असं कुणाला वाटू शकतं; विशेषतः स्वातंत्र्य लढ्यातील इतरांवर अन्याय करणारं वाटू शकेल. पण अतिशयोक्तीमध्ये देखील सत्याचा अंश असतो थोडा फार. सध्या टीव्ही वर चीन को लाल आंख दिखा दी वगैरे चालतं त्याच्या बद्दल काय म्हणाल? आणि शेर की दहाड, विरोधी सुअर! ही तर चापलुसी झाली ना?

हल्ली यूट्यूबवरील विडियोंचे भडक, आचरट मथळे कैच्याकै असतात यात काही शंकाच नाही. असले भडक मथळे असलेले विडियो मी बघतच नाही.
'जागृती' या १९५४ च्या सिनेमात "हम लाये है तूफान से किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों सम्हाल के" तसेच "आओ बच्चों तुम्हे दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी मे तिलक करो ये धरती है बलिदान की" वगैरे गाणी होती. चार -पाच वर्षे वयात त्यांचा अर्थ कळत नसला तरी दिवसभर तीच तीच गाणी कर्कश्य लाऊडस्पीकरवर ठणाणा वाजत रहायची, ते नकोसे व्हायचे.
निर्माते - शशधर मुकर्जी, संगीत - हेमंतकुमार, गीतकार - प्रदीप ही त्या काळची सगळे दिग्गज मंडळी होती.

साबरमती के संत तेरा , कितना ये कमाल ,
पि.एम. बनने थे वल्लभभाई
बन गये जवाहरलाल

स्वप्निल रेडकर's picture

9 Sep 2023 - 10:22 am | स्वप्निल रेडकर

१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी मीरत इथे पडली आणि त्याला कारणीभूत ठरलेली काडतुसांना लावायची गायीची चरबी वगैरे प्रकार वाचला तर शंका येते कि जर त्या काडतुसांना गायीची चरबी नसती तर हिंदू सैनिकांना आपल्याच हिंदू बांधवांवर गोळ्या झाडायला काही प्रॉब्लेम नव्हता का?हे असं झालं गायीचं चरबी आहे म्हणून हिंदू आणि डुकराची चरबी लावलीय काडतुसांना म्ह्णून मुस्लिम शिपाई बंड करून उठले पण चरबी नसतीच तर मस्त दणादण गोळीबार करणारच होते आपल्या देशातल्या नागरिकांवर .
अगदी तशीच शंका बऱ्यचाह संस्थानिकांबद्दल पण आहे कि दत्तक विधान रद्दबातल करून जेव्हा ब्रिटिश संस्थानं खालसा करत होते त्याऐवजी जर ब्रिटिशांनी परवानगी देऊन संस्थानाचा कारभार चालू ठेऊ दिला असता तर हे संस्थानिक उतरले असते का स्वातंत्र्य लढ्यात. ?

अहिरावण's picture

9 Sep 2023 - 2:19 pm | अहिरावण

तुम्ही लहानपणापासुन इतके हुशार की हल्लीच झालात?

गायीचं चरबी आहे म्हणून हिंदू आणि डुकराची चरबी लावलीय काडतुसांना म्ह्णून मुस्लिम शिपाई बंड करून उठले पण चरबी नसतीच तर मस्त दणादण गोळीबार करणारच होते आपल्या देशातल्या नागरिकांवर .

-- विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरा.
-- आणि ते दत्तक विधानाबद्दल सुद्धा.
भारतात त्याकाळी एकूण किती संस्थाने होती आणि त्यापैकी किती इंग्रजांना अनुकूल होती, याची माहिती उपलब्ध आहे का कुठे ?

ब्रिटीशांनी १८५७ च्या लढ्याला केवळ शिपायांचे बंड असे संबोधले होते.
या संदर्भात माझी काही भटकंती
१८५ ७ अ हेरीटेज वॉक http://misalpav.com/node/18261
१८५७ अ हेरीटेज वॉक ५ https://www.misalpav.com/node/18704

अहिरावण's picture

9 Sep 2023 - 2:18 pm | अहिरावण

अहो ते काहीही संबोधतील... तसे तर ते आपल्याला तुच्छच मानत होते, मानत आहेत आणि मानत राहतील. तीच बाब त्यांच्या मानसिक गुलामीत असलेले लोक भारताला आणि भारतीयांना तुच्छच मानत होते, मानत आहेत आणि मानत राहतील.

प्रश्न आपण आपल्याला काय मानतो ते महत्वाचे आहे. आत्मसन्मान जागृत असलेल्या भारतीयांची जगाला चुणूक दा़खवणे सुरु झाल्यापासुन बहुतांश परकीयदास्यवृत्तीप्रेमीअभिजनांचा पोटशुळ उठला आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी दिसत आहे.

त्यांनी इनो घ्यावा ही नम्र सुचना.... :)

Bhakti's picture

9 Sep 2023 - 3:33 pm | Bhakti

चांगली लेखमालिका.
खरंय ब्रिटीश गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी देऊन गेले,सत्व घेऊन गेले.

कर्नलतपस्वी's picture

9 Sep 2023 - 4:01 pm | कर्नलतपस्वी

इतके हल्के घेऊ नका.

इतीहास नेहमीच जेते, म्हणजे जे विजयी झाले तेच लिहीतात. त्यांना जे सोईस्कर वाटेल तेच छापतात. लखनऊ रेजिडेन्सी मधे इंग्रजांची काय गत केली होती ते समजून घेण्यासाठी लाॅर्ड टेनिसन यांचा द डिफेन्स ऑफ लखनऊ हा पोवाडा वाचा.

Better to fall by the hands that they love, than to fall into theirs!’

एक वेळ अशी परिस्थिती आली होती की ला मार्टिन शाळेतून मुलांना लढाई करता आणले. जनरल हॅवलाॅक वेळेवर पोहचू शकत नाही म्हणून शत्रूच्या हातून मर्यादित पेक्षा स्वताच एकमेकांवर गोळ्या झाडून मरण पत्करू. शाळेतील एक विद्यार्थ्यां ज्याने या लढाईत भाग घेतला त्याने स्वताचा अनुभव लिहीला आहे. .आर्या लक्ष्मणपुर या मालिकेत याचा संदर्भ दिला आहे.

मेजर हडसन याच्या आत्मकथी मधे मंगल पांडे यांच्या बद्दल काय लिहीतो ते वाचा म्हणजे कळेल सत्य.

लढा का यशस्वी झाला नाही याची अनेक कारणे आहेत.