1

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)

Primary tabs

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
27 Apr 2021 - 5:24 pm
गाभा: 

अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता.

रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

1 May 2021 - 6:07 pm | आग्या१९९०

२०२१ च्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी कोविड लसिकरणासाठी रू. ३५,००० कोटींची तरतूद केली होती. ३०० रू. ( दोन डोस ) प्रमाणे १०० कोटी जनतेचे लसीकरण केले ३०००० कोटी खर्च होऊन ५००० कोटी शिल्लक रहातात. आता तर केंद्र फक्त ५०% लसी खरेदी करणार असल्याने २०००० रू. शिल्लक राहतील. केंद्राची नक्की काय अडचण आहे हेच कळत नाही.

केंद्र सध्या १५० ला लसी घेऊन राज्यांना पुरवठा करत आहे, राज्यांना केंद्राकडून विनामूल्य पुरवठा होत आहे. त्यात काही निधी खर्च झाला असणार आहे. आत्तापर्यंत (१६.३७*१५०=२४५५) २४६० करोड रुपयांपर्यंत खर्च केंद्राने मोफत लसींवर केला आहे. ह्यात वाहतूक खर्च नाही आला, तरीसुद्धा बराच मोठा भाग अजून शिल्लक आहे असे म्हणता यावे. यात अर्थातच बाकीचे खर्च असतील तर विचारात घेतले नाही आहेत. उर्वरित पैसे राज्यांसाठी लसी मिळवण्यात वापरण्यात यावी हि अपेक्षा रास्त वाटते.

ही तरतूद लसीकरणासाठीच केली आहे. लसीचा किमतीचे इनिशियल एस्टीमेट ७०० प्रति डोस होते, सर्व खर्चांसकट. तेव्हा किंमत आणि कॉस्टिंग पक्के झाले नव्हते. या किमतींवर ५० करोड लोकांसाठी मोफत लसीकरण (दोन्ही डोस) म्हणून ३५००० कोटींची तरतूद केली गेली. आता किंमत त्यामानाने कमी आहे (अगदी राज्यांची ३०० धरली तरी दोन्ही डोस मिळून ६०० होते.) त्यामुळे किमान ५० आणि कमाल (१५०*२= ३००, ३५०००/३००=) ११६ करोड लोकांचे लसीकरण केंद्र या तरतुदीतून करू शकते.

संदर्भ-
१) आत्तापर्यंतचा खर्च- https://www.google.com/amp/s/www.livemint.com/news/india/over-79-lakh-co...

२)सुरुवातीचे एस्टीमेट- https://www.google.com/amp/s/theprint.in/economy/rs-35000-cr-covid-vacci...