डोक्याला ताप (की शॉट)

Primary tabs

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
18 Apr 2021 - 9:57 pm
गाभा: 

करोनामुळे सध्या सगळे lockdown होऊन घरात आहेत.. अश्या परिस्थितीत खरेदी होणार कशी, बराच माल घरात भरायचा होता..

मग शेवटी उठलो आणि बाजारात निघालो. तेव्हढ्यात मला एका आठवडी बाजाराची माहिती कळली.. बरेच दिवड तो बाजार ऑनलाइन भरत होता. साधारण तिथे आठवड्याला दीडशे टन माल खपतो असे पण कळले.
मग म्हणले की आता या बाजारात जाऊयाच.

बाजारात प्रवेश केला आणि समोर बघतो तर काय, नुसत्या मालाच्या राशीच राशी. मला कळेना यात राशी कुठे आहेत आणि माल कुठे, म्हणून दुकानदाराला शोधायला गेलो तर दुकानदार ध्यानात मग्न होते.. सहाय्यकाला विचारले की बाबा ध्यानातून कधी उठतील, तर वेगळीच माहिती कळली.. 188बाबा म्हणे ध्यानातून कधीच उठत नाहीत. ते कायम ध्यानात असल्यामुळेच इतका माल तयार होतो.
हा पहिला धक्का पचवेपर्यंत पुढचा धक्का आला, हा माल म्हणे फुकट आहे, फक्त उचलून न्यायची तुमची क्षमता पाहिजे. सगळा माल एकसारखा, म्हणजे तुम्हाला चहा करायचा असेल, कॉफी करायची असेल किंवा पोळ्या, माल तोच असतो, फक्त आपण म्हणायचं की ही चहापावडर आहे आणि चहात घालायची , की झाला चहा तयार! पोळी हवी असेल तर फक्त पाणी घालून मळायचा, की झाला आटा तयार!

आणि त्यातून तुम्हाला नको असेल तर दुकानात पुढे जा, आमची एकूण 188 दुकाने आहेत.. जिथे जिथे तुम्हाला दुसऱ्या कोणाचा माल घ्यावासा वाटेल तिथे शेजारी आमचे दुकान असणारच, बघा तुम्ही.. कसा घेत नाही तेच आम्ही बघतो!!

आयला म्हणलं हे भारी आहे!!
थोडासा त्यातला माल मी उचलणार, तितक्यातच तिथे एक दुसरे बाबा महाराज आले. ते सगळ्या सगळ्या 188मालाला GI टॅग लावायचं काम करत होते. त्यांना विचारलं तुम्ही काय विकता, तर त्यांनी एका वाक्यात माझी सगळी हवाच काढुन टाकली.

"आम्ही घराणेशाही विकतो"

म्हणजे?

"सांप्रत घराणेशाही ला भरपूर मागणी आहे, त्यामुळे आम्ही ती विकायला काढली आहे.. फुकटच देतो, फक्त घेताना म्हणायचे, घराणेशाही मुरदाबाद!! मग जो हवा तो माल मिळेल. एका बाजूला पेंसे लावलेला माल आहे, एका बाजूला चुना लावलेला आहे, तर एका बाजूला सोनं लावलेला माल आहे. तुम्हाला हवे तसे आम्ही मिक्स करून पण देतो. पण एक मात्र आहे, घराणेशाहीचा GI टॅग लावल्याशिवाय काहीही मिळणार नाही. अजून एक आहे, तुम्हाला जर 188चा माल खाऊन अपचन झालं तर उत्तर म्हणून आमच्याकडे कायमचूर्ण पण मिळतं, ते 3 वाक्याचे चूर्ण गोल गोल फिरवून खाल्लं की काहीकाळ जुलाब थांबतात"

आम्ही पार चक्रावून गेलो हो, पण लगेच भानावर येऊन पुढचा रस्ता पकडला..

तेव्हढ्यात एका ठिकाणी गलका ऐकू आला, म्हणून बघायला गेलो, तर तिथे एक महान गुरुदेव बसले होते. जरा त्यांचे ज्ञान पण पाहूया म्हणून जवळ गेलो, तर त्यानी एकदम प्रश्नांचा भडिमारच केला..
"बंगाल की आयपीएल?"
मी म्हणालो महाराष्ट्र
"F20 की एम80"
मी म्हणालो दोन्ही. हे वाक्य ऐकले मात्र, आणि त्यांचा असला भडका उडाला, की शेजारचे दोन तीन दुकानदार धावत आले. एकाने त्यांच्यावर श्यामवर्णाचा धूर सोडला, त्याने काही होईना, मग एकाने सुकट टाकली, त्याने तर अजून भडका उडाला. मग आपणच काहीतरी करायला हवं, म्हणून मी त्यांना म्हणालो, असू दे मी तुम्हाला चाफ्याचे अत्तर देतो.

अरे देवा देवा देवा.. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी आज जिवंत आहे!!

तोपर्यंत श्यामवर्णीय धूर सोडणारे ते दुकानदार आलेच, ते म्हणाले सध्या हे असं चालू आहे बघा.. दोन वर्षांपूर्वी त्यांनी चाफ्याचे झाड खडसले, तेव्हापासून हे असे वागतात.. तुम्ही आपला माझा माल बघा. त्यांच्या दुकानात बघितलं तर ते तराजू टाकून बसले होते, त्यामध्ये सगळीकडे 20टक्के, 25 टक्के, 5 टक्के, 2टक्के वगैरे असे लिहिलेले ठोकळे होते..
बघा म्हणाले, हा खूप सोपा गेम आहे, हे सगळे ठोकळे गोळा करायचे आणि 40ची बेरीज करायची. फक्त आत एकच, की ठोकळे एकात एक बसणारे असले पाहिजेत.
मी बराच वेळ ते ठोकळे जुळवत बसलो, पण ते काही केल्या जुळेनात. तितक्यात अचानक तीव्र प्रकाशाचा एल झोत आला, आणि बघतो तर काय, चंद्र आणि सूर्य एकत्र उगवले होते.
हे बघून माझी बोबडीच वळली, आणि मी तिथून पळत सुटलो, तरी जी दोनचार वाक्य कानावर पडली, त्यात त्या श्यामवर्णी दुकानदाराचे कोडे चंद्रसूर्याच्या प्रकाशाने अचानक सुटले होते असे मला दिसले.

त्याने काय जादू केली म्हणून मी परत फिरणार, तर एकजण ट्युलिप ची फुले विकत होते. त्यांना विचारलं फुलं केव्हढ्याला? तर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून छातीच दडपून गेली.
ती फुलं दिल्लीच्या थंडीत अनेक दिवस ग्रीन house मध्ये थंडी वाऱ्याचा सामना करत होती, जवळ जवळ तीन महिने. तीन महिने ग्रीन हाऊस मध्ये काढणे म्हणजे सोपे काम आहे का? अहो म्हणालो किंमत काय? तर म्हणाले तुम्हाला परवडणार नाही.. भाकरी फिरली तरच ती किंमत वसूल होईल.. आम्ही पोळ्या खत असल्यामुळे हा भाकरी फिरण्याचा प्रकार काही आम्हाला पचला नाही, म्हणून परत निघालो, तर ते असले संतापले, म्हणाले त्या फुलांच्या चिकाटीचे काही कौतुक आहे की नाही? थंडी वारा, ऊन पावसात ती फुले ग्रीन हाऊस मध्ये राहिली, त्याला काही किंमत आहे की नाही?

मी घाबरलो, आणि बाहेर निघणार, तितक्यात एक जण एकटाच झब्बू खेळत बसलेला दिसला.
म्हटलो का रे बाबा एकटाच झब्बू खेळतोस? म्हणाला नाहीतर काय, सगळा नुसता डोक्याला शॉट आहे. पूर्वी झब्बूचा डाव काय रंगायचा म्हणून सांगू.. पण अकुनानांच दुकान अचानक बंद झालं, आणि आणि 1008 सर्वज्ञानी एका पो वरून घसरून पडले, तेव्हापासून कच्चा माल मिळणं बंद झालंय.
तरी मध्ये एकदा झब्बू लावला होता, पण सगळे नेहमीचे प्लेयर खेळ सोडून गेले, त्यामुळे आता एकटाच बसतो झालं.

आता मात्र कहर झाला, मलाच चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं, म्हणून डोळे मिटले, तर तोंडावर पाऊस पडायला लागला.. डोळे उघडले, तर बायको तोंडावर पाणी मारत होती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Apr 2021 - 6:09 am | कंजूस

प्रथम जागा पकडायची घाई. मग परतीची बस पकडायची घाई कुणाकडे त्याची बैलगाडी नसेल तर. चेंगट शेवटी जातात कारण बाजारच उठलेला असतो. कुणीच गिऱ्हाईक नसते. अगदी टपरीवरची शेवेची कडबोळीही संपलेली असतात आणि गार झालेला उरलेला चहा गरम करून देतात. "काय पावणं कसं काय?"

---------------
झकास
😀

आनन्दा's picture

19 Apr 2021 - 9:50 am | आनन्दा

:)

मुक्त विहारि's picture

19 Apr 2021 - 6:59 am | मुक्त विहारि

सांप्रत काळांत, रोज काही ना काही माल विकायला येतोच. मालच मूबलक प्रमाणात असेल तर, दुकानात ठेवायला काय हरकत?तांदूळा पासून ते लसी पर्यंत, औषधांपासून ते मृत्युच्या पास पर्यंत, इतका माल रोज येतो की काही विचारू नका .... आणि गर्दी तर इतकी की, सामान्य माणसा पासून ते निवृत्त नौसैनिकां पर्यंत रेंज आहे मग साधू तरी कसे मागे राहतील....

मुक्त विहारि's picture

19 Apr 2021 - 7:37 am | मुक्त विहारि

पाणी खूपच महाग आहे...

घराणेशाहीचे लेबल असल्याने, एका मिली साठी हजारो रूपये....

मुक्त विहारि's picture

19 Apr 2021 - 7:53 am | मुक्त विहारि

सध्या बाजार फुल्ल सुरू आहे....

आनन्दा's picture

19 Apr 2021 - 9:50 am | आनन्दा

हलके घेतल्याबद्दल आभार!

मुक्त विहारि's picture

19 Apr 2021 - 10:52 am | मुक्त विहारि

पुर्वी बाजारात जास्त माल मिळत न्हवता...

पण, हल्ली मात्र मनसोक्त माल उपलब्ध आहे...

ह्याच्या पेक्षा पण जास्त माल, आमच्या 3-13-1760 ग्रहावर उपलब्ध आहे

जमल्यास कधीतरी चक्कर मारा ...

https://misalpav.com/node/39968

आनन्दा's picture

19 Apr 2021 - 1:14 pm | आनन्दा

आहे, गेलेत तिथे 2-3 वेळेस

मुक्त विहारि's picture

19 Apr 2021 - 5:22 pm | मुक्त विहारि

आनंद घ्या ....

खेडूत's picture

19 Apr 2021 - 9:53 am | खेडूत

ही ही ही...
मस्त बाजार. :))

यावरून आमचं एक विम्बल्डन आठवलं!

मुक्त विहारि's picture

19 Apr 2021 - 11:15 am | मुक्त विहारि

जबरदस्त

डॅनी ओशन's picture

19 Apr 2021 - 10:25 am | डॅनी ओशन

188 प्रभूंविरुद्ध काही वाचले कि आमची तळपायाची आग मस्तकात जाते आजकाल.

पण आम्ही विरोधकांवर गोल गोल राणी, घराणेशाही, पुन्हा पुन्हा दहावेळा तेच तेच प्रश्न अस सगळं

बोल्ड

अक्षरात लिहून फेकतो, मग कुठे जीवाची तगमग कमी हुते.

मुक्त विहारि's picture

19 Apr 2021 - 10:54 am | मुक्त विहारि

आय पी सलामत तो आयडी पच्चास

वामन देशमुख's picture

19 Apr 2021 - 10:32 am | वामन देशमुख

तुमी तं पार बाजार उटंवला की आनंदराव!

साधारण तिथे आठवड्याला दीडशे टन माल खपतो असे पण कळले.

मागल्या वारी तं आडिश्शे टनावर माल खपला मनं!

आनन्दा's picture

19 Apr 2021 - 1:15 pm | आनन्दा

हो, विसरलोच!!

मुक्त विहारि's picture

19 Apr 2021 - 5:19 pm | मुक्त विहारि

तीन तीन ठिकाणाहून माल येत असल्याने, आणि शिवाय कधी कधी परदेशी माल पण येत असल्याने, बाजारात मालाची कमतरता नाही ...

मे महिन्यात 300-400 टन माल यायची शक्यता आहे..

नंबर लाऊन ठेवा

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2021 - 8:10 pm | श्रीगुरुजी

यातील काही संदर्भ समजले नाही.

वडाप's picture

19 Apr 2021 - 8:53 pm | वडाप

पण भाडं बंद केलंन ना सरकारनं. दुन चार पासिंजरच मासक लावलेल्ये पोहोचवता यितात. गर्दी किली की दंड लावत्यात. लाइसन बी जातं. नैतर चौदा शिटा भरुतो कुरडुच्या वाडिस्न.
बरं ऱ्हावा. लई घाई बरी नाय. भिटू लाकडावन सुटल्यावर.

गड्डा झब्बू's picture

26 Apr 2021 - 12:03 am | गड्डा झब्बू

मायला डोस्क्याला ताप झालाय नुस्ता हल्ली या ऑनलाईन बाजारात फिरकायचं म्हनजे!
बघावी तिकडे नुसत्या वांझोट्या चर्चेची दुकाने खोलून राहिलेत रिकामखोट लोक!
भेंडी कोणच्या नशा करुन येतात असला भंगार माल विकणारे रिकामखोट दुकानदार आणि त्यांचे फोकटखोदू गिऱ्हाईक तेच समजेना झालंय!
आमचे आद्य गुरुदेव कथेची पार वायझेड करायचे पण करमणूक व्हायची! त्यांची कमी आता प्रकर्षाने भासतेय!
नंतरचे आमचे सर्वज्ञानी गुरु अबीर, गुलाल, बुक्का आपल्याच हाताने स्वतःच्या थोबाडाला फासून आपलीच भजने करायचे!
त्यांच्या भजनात टाळ, मृदूंग, चिपळ्याच काय ड्रमसेट, गिटार, ऍकोर्डीअन, सॅकसोफोन पण ते स्वतःच वाजवायचे! तसें एक दोन झीलकरी साथीला होते, पण खरा दंगा त्यांचा एकट्याचा असायचा! सगळ्या नाठाळांना आपल्या अलौकिक तत्वज्ञानाने गप्प करायचे! अक्युमनची दैवी देणगी लाभली होती त्यांना! त्यांना पण मिस करतोय!
आता गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी!
फडतूस काथ्याकुटे वाचून डोक्याला शॉट लावून घेण्या परिस एकट्याने झब्बूचा डाव खेळणे बरे वाटून राहिले आहे!
अस काहीतरी लिहीत रहा डोक्याचा ताप थोडा कमी होतो आमच्या :)