भोजन मंत्र अर्थ आणि व्याकरण

श्रीनिवास टिळक's picture
श्रीनिवास टिळक in काथ्याकूट
15 Mar 2021 - 8:33 pm
गाभा: 

वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे /
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म //
वरील भोजन मंत्रातील दोन ठिकाणी--(१) नाम घेता फुकाचे (२) जीवन करी जीवित्वा यांचा अर्थ नीट लागत नाही. कोणास माहित असेल तर कृपया तो स्पष्ट करावा. तसेच या मंत्रात असलेल्या क्रियापदांची--(घ्या, होते, घेता, करी, जाणिजे) व्याकरण दृष्ट्या फोड करून पाहिजे आहे. धन्यवाद

प्रतिक्रिया

हा समर्थ रामदास स्वामी यांचा श्लोक आहे.
पूर्वी कधीतरी यावर चर्चा झाली होती, त्याचा सारांश मीे साठवून ठेवला होता.
(हे माझे विश्लेषण नसून त्या चर्चेत मिळालेले ज्ञानकण आहेत, त्यामुळे चू भू द्या घ्या.)

वदनिं = वदनीं = तोंडात
कवळ = घास
घेतां = घेताना
नाम घ्या श्रीहरीचें = नाम घ्या श्रीहरीचे
अन्वय : वदनीं कवळ घेतां श्रीहरीचें नाम घ्या = तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्या

सहज हवन होतें नाम घेतां फुकाचें = फुकटचे नाम घेता सहज हवन होते.

जिवन करि जिवित्वा (जिवन करी जिवित्वा .... जिवन जिवित्वा करी. जिवन = जल, पाणी. जिवित्व = प्राण, आयुष्य. जल प्राणाला, आयुष्याला निर्माण करते.)
अन्न हें पूर्णब्रह्म = अन्न हे पूर्णब्रह्म (आहे)

उदरभरण = पोट भरणे
नोहें = नव्हे
जाणिजें = जाणले जाते, कळून येते (कर्मणिप्रयोग)
यज्ञकर्म = यज्ञकर्म
अन्व्यय : उदरभरण नोहें जाणिजें यज्ञकर्म = (हे) पोट भरणे नव्हे, यज्ञकर्म (म्हणून) जाणले जाते.

साधारण अर्थ:
तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्या. फुकटचे नाम घेता सहज (यज्ञा प्रमाणे) हवन होते. शरीराला पोषण देणारे अन्न हे पूर्णब्रह्म आहे. हे पोट भरणे नव्हे, तर हे यज्ञकर्म समजून ग्रहण करा.

श्रीनिवास टिळक's picture

16 Mar 2021 - 8:45 pm | श्रीनिवास टिळक

धन्यवाद, खेडूतजी.

हे सापडले, पुरेसे विवेचन आहे ह्यात, http://mr.upakram.org/node/3369

श्रीनिवास टिळक's picture

25 Mar 2021 - 4:36 am | श्रीनिवास टिळक

नमस्कार

शोध यंत्र वापरून भोजन मंत्रावर मागे झालेली बरीच साधक बाधक चर्चा आपण काढून दिलीत त्याबद्दल "वाचक" जी आपले आभार.