1

भटकंती बंद काळातली - माथेरान

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
14 Mar 2021 - 8:10 pm

भटकंती बंद काळातली

मार्च २०२० पासून मुंबईतील लोकल ट्रेनस , बाहेरगावच्या गाड्या आणि पसेंजर ट्रेन्स बंद झाल्याने भटकंती इमारतीच्या गच्चीपुरतीच राहिली होती. फेब्रुवारी १ पासून मुंबईतील लोकल ट्रेनस सर्वसामान्यांसाठी दोन ठराविक वेळांत सुरू झाल्या. मग जवळपासची भटकायची हुकमी जागा माथेरान नक्की केली. दिलेल्या लोकल ट्रेन्सच्या वेळांत जाऊन येणे शक्य झाले. इतर ठिकाणे म्हणजे राजमाची, भिमाशंकर येथेही जाता येईल पण तिथले गाववाले पर्यटकांसाठी तयार आहेत का माहिती नाही. कारने जाणारे कोकणात जाऊ लागले दिवाळीपासूनच. पण कुरबुर सुरू झाली. हे मुंबईतील पाहुणे आले आणि आमच्या गावात करोनाची धाड आली. मात्र माथेरानला तसं नाही कारण हे धार्मिक नसलेले पर्यटन स्थळ आणि इथल्या गावकऱ्यांचा, हॉटेल व्यावसायिकांचा चरितार्थ पर्यटनावरच अवलंबून. ते या म्हणतात.

तर गेल्या दोन महिन्यांत तीन फेऱ्या झाल्या. फक्त अर्धा दिवस. सकाळी सातच्या आतची कर्जत लोकल पकडायची, नेरळला उतरून वर जायचे. ( Taxi rs.100/ seat or rs400 full taxi four passengers. St mini bus rs25/ ticket.) थोडे फिरून एक वाजता निघायचे. चारच्या अगोदरची लोकल ट्रेन पकडून परत.

नेरळ - माथेरान जाणाऱ्या मिनि टॉइ ट्रेनस सर्विस बंद आहे. पण माथेरान ते अमन लॉज ( दस्तुरी taxi stand जवळचे अडीच किमीवरचे स्टेशन या toy train च्या फेऱ्या दर तासाला आहेत. ( rs.45/-)

कारने येणाऱ्यांना आणि वर राहणाऱ्यांना काहीच अडचण नाही.

माझे ट्रेकिंग असल्याने एवढी भटकंती पुरते.

एकूण माथेरानचा टुरिझम धंदा दिवाळीपासून जोरात आहे. हॉटेलवाले, घोडेवाले, माकडे सर्व
खुश आहेत.

एक दमात, एकाच ट्रिपमध्ये सर्व माथेरान पाहायचेच असं ठरवलं नाही तर सुट्टी मजेत नक्की जाते.

माथेरानमध्ये वीसेक व्ह्यु पॉइंट्स आणि दोन बागा आहेत. ते तीन विभागात करता येतील. उत्तर, मध्य आणि दक्षिण भागातले. त्या त्या भागातल्या हॉटेलात राहिल्यास ते सहज पाहून होतात. सर्व प्रवास चालत/घोड्यावर/माणसांनी ओढायची रिक्षाने करावा लागतो. त्यामुळे अती दूरचे व्ह्यु पॉइंट्स पाहायला न जाण्याचे ठरवणे उत्तम. उत्तरेच्या पनोरमा पॉईंटपासून दक्षिणेच्या चौक पॉईंटसचे अंतर नऊ किमी आहे.

तीन विडिओ इथे देत आहे.

१) पनोरमा पॉईंट.

https://youtu.be/3G26irh1EB8
( हा विडिओ एका मिपा दिवाळी अंकात दिला होता.पण ओडियो नंतर चिकटवला होता.)

२)हार्ट पॉईंट

https://youtu.be/g21isqeKQjI

३) मिनी ट्रेन आणि माकडांचे फोटो/ विडिओ काढल्याशिवाय माथेरान ट्रिप उणी.

https://youtu.be/s2Y6ZY6VQhg

-------------
सूचनांचे स्वागत.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

14 Mar 2021 - 8:43 pm | चौथा कोनाडा

व्वा, झकासच कंजूस साहेब !
तिन्ही व्हिडो मस्तच, व्हाईसओव्हर देखील छानच !
(पनोरमा पॉईंटच्या व्हाईसओव्हर आवाजची पातळी आणखी जास्त हवी)

माथेरान बोले तो झकासईच !

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 9:45 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

प्रचेतस's picture

15 Mar 2021 - 9:13 am | प्रचेतस

मस्त छोटेखानी भटकंती.
तीन्ही व्हिडिओ आवडले, उन्हाळ्यातला रखरखाट चांगलाच जाणवतोय. चंदेरी आणि पेब एकदम जबरदस्त दिसताहेत.

व्हिडिओही आवडले
माथेरानबद्दलची एक जुनी आठवण
जवळपास ३५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा माथेरानला गेले होते. एक-दीड वर्षांपूर्वीच लग्न होऊन मुंबईला आले होते. तेव्हा नवरा पाणीपुरवठा विभागात नोकरीला होता आणि माथेरानला पाणी पुरवठा विभागाचे विश्रामगृह आहे असे कळले होते. तेव्हा मोबाईल फोन वगैरे प्रकार नव्हता. त्यामुळे माथेरानला पोहचुनच पुढचा कार्यक्रम ठरणार होता. ऑफिसची साधारण एकाच वयाची व लग्नही थोडयाफार फरकाने पुढेमागे झालेली तीन जोडपी मिळून एक दिवसाच्या मुक्कामाच्या हिशोबाने सहलीकरिता निघालो. माथेरानला पोहचल्यावर पाणीपुरवठा विभागात चौकशी केली असता तेथे असे काही विश्रामगृहच नाही असे समजले. हॉटेलमध्ये रूम घेणे परवडणारे नव्हते. उत्साह दांडगा होता. दिवसभर मस्त भटकलो आणि संध्याकाळी पाणी पुरवठा विभागाच्या ज्यू. इंजिनिअरला भेटलो. तुम्हाला चालत असेल तर तुम्ही ऑफिसच्या गोडाऊनमध्ये झोपू शकता असे सांगून त्यांनी गोडाऊन उघडून दिले. आम्ही एका कोपऱ्यातील धुळीचा थर झाडून जागा साफ केली.इंजिनिअरने स्वतःच्या घरातून तीन सतरंज्या व चादरी काढून दिल्या. रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात घरून आणलेले जेवण केले. संपूर्ण रात्र विना पंखा ,लाईट त्या गोडाऊनमध्ये घालवली होती.
त्यानंतरही माथेरानला जाणे झाले पण पहिली सहल मात्र अविस्मरणीय.

चौथा कोनाडा's picture

20 Mar 2021 - 8:06 am | चौथा कोनाडा

भारी किस्सा आहे. त्याकाळी किती तडजोडी करत फिरायला लागायचे !
माझ्या ही मित्राचा किस्सा भारी आहे. त्याचे जून मध्ये लग्न झाले. सुट्ट्या कमी म्हणून माथेरानला हनिमूनला जायचे ठरवले. माथेरानला टाटांचे विश्रामगृह आहे, तिथे बुक करून हे जोडपे संध्याकाळी तिथे पोहोचले. आजूबाजूचा परिसर जवळजवळ निर्मनुष्य. रेस्ट हाऊसचे दोनतीन कर्मचारी दुसऱ्या कॉटेज मध्ये राहायला. तिला भीतीच वाटायला लागली. अन् त्यात रात्री धो धो पाऊस, विजांचे आवाज, झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचे आवाज, वारा, छतावर वानरांचा उड्यांचे आवाज. बिचारी ती घाबरून कुडकुडयला लागली. ताप ही भरला. कधी एकदा सकाळ होते आणि इथून मुंबईस परत जातोय असे झाले. सकाळच्या पहिल्या गाडीने जोडी परत गेली.
न झालेल्या हनिमूनची गोष्ट सांगताना आज ही ते दोघेजण थरारून उठतात !

प्रचेतस's picture

20 Mar 2021 - 9:50 am | प्रचेतस

एक नंबर भारी किस्सा.
बाकी अशा ठिकाणी राहायला खरोखरच भारी वाटतं.

गणेशा's picture

20 Mar 2021 - 12:04 pm | गणेशा

हा हा हा..

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2021 - 1:27 pm | चौथा कोनाडा

या वरुन हे वाचलेले आठवले:

माझ्या प्रदर्शनासाठी मी अनेक कॅन्व्हासेस आणि रंगांचा टेम्पो घेऊन खंडाळ्याला आलो. मला तिथे महिनाभर काम करायचे होते. कामाला सुरुवात केली तसा पाऊस सुरू झाला. मजाच मजा. मी दररोज दहा तास काम करीत असे. पण पाऊस वाढत गेला. वादळ आले. माझ्या बागेतली झाडे, कुंडय़ा अक्षरश: कोलमडल्या. डेकवर हातात व्हिस्कीचा ग्लास धरत पाऊस एन्जॉय करण्यातली रोमँटिक सिच्युएशन आता हळूहळू विरघळत गेली. कोठेतरी मुख्य ट्रान्सफॉर्मर कोसळला आणि खंडाळा, लोणावळा अंधारात बुडालं. जनरेटर्स सुरू झाले. खंडित झालेला वीजप्रवाह पाऊस आणि ढगांमुळे सुरू करता येत नव्हता. शेवटी गावातले डिझेल संपले आणि आठएक दिवस मी मेणबत्त्यांमध्ये एकटय़ाने दिवसरात्र स्टुडिओत काढले. प्रचंड डिप्रेशन. दिवसाही घरभर अंधार! पावसाचे रौद्ररूप किती भयानक असते हे मी प्रथमच पाहिले. पावसाच्या कविता, चित्रे, रोमान्स याच्या लाल चिखलासारखी माझी अवस्था झाली. शेवटी मी वेडा होईन असे वाटायला लागले आणि मी गाडी काढून पुण्याकडे निघालो. वडगावच्या येथे रेघ मारून थांबवावा असा ओला रस्ता, त्यापलीकडे छान मनमोकळे ऊन पडले होते. त्या स्वच्छ प्रकाशात मी उभा राहून न्हाऊन घेतले. खंडाळ्याच्या दिशेने पाहिले- ढगांचे डोंगर उभे होते. माणसाला सर्व हवे असते. थोडा पाऊस, कोवळा प्रकाश.. सर्व बेताचे! त्यात रोमान्सही आला

- रफ स्केचेस् : काजव्यांचे घर: सुभाष अवचट

गणेशा's picture

31 Mar 2021 - 1:31 pm | गणेशा

वाह..

आठवलं

लग्नानंतर ST ने MTDC माळशेज ला जोडीने गेलो होतो, आळेफाटा पासून ST ने निघालो आणि घाटामध्ये कंडक्टर साहेब म्हणाले MTDC उतरा
खिडकीतून डावीकडे पहिले तर डोंगर मागे- समोर घाट. बायको घाबरली, ST तील लोक पण बघू लागली कि असे काय घाटात उतरत आहेत. नंतर उजवीकडे पहिले मग MTDC चे मोठे आणि प्रशस्त रिसॉर्ट दिसले

चौथा कोनाडा's picture

30 Mar 2021 - 5:14 pm | चौथा कोनाडा

डावीकडे पहिले तर डोंगर मागे- समोर घाट. बायको घाबरली, ST तील लोक पण बघू लागली कि असे काय घाटात उतरत आहेत.

हा .... हा .... हा .... !

माळशेजचे MTDC चे रिसॉर्ट सुंदर आहे ! एकदाच जाणे झालेय. रहायलाच जायचेय तिथे !

गणेशा's picture

20 Mar 2021 - 12:03 pm | गणेशा

अप्रतिम...

कंजूस's picture

20 Mar 2021 - 2:04 pm | कंजूस

पावसाळ्यातले माथेरान हे 'end of the world's असे.
भिजत भिजत वर जायला आम्हाला पाच वाजले. एमटीडिसीत रुम मिळाली. कपडे बदलून बाजाराकडे गेलो. केतकर रेस्टॉरंटमध्ये चहा पीत बसलेलो. एक चारपाच मुलांचा ग्रुप भिजत आला होता. हॉटेलचा फोन कसाबसा त्यांच्या घरी लागला आणि निरोप दिल्यावर त्यांनी कल्लाच केला. दुसरे एक उघडे असणारे हॉटेल - खान हॉटेल. आम्हाला खाली जुमापट्टिला एकाने सांगितलेले की ही दोनच पावसाळ्यात चालतात. तिथे रुम घेऊन टाका.
दुसरे दिवशी धुक्यात चाचपडत लाल मातीचा चिखल तुडवत भटकत होतो आणि बोलत होतो.एकदम धुक्यातून आवाज आला " पुढे जाऊ नका रे, माती कोसळतेय पॉईंवर."
नक्की कुठे गेलेलो माहिती नाही.

गणेशा's picture

20 Mar 2021 - 2:11 pm | गणेशा

जुने दिवस भारीच असतात.. कितीही आठवावे तेव्हडे भारी वाटते..

माझे हे जुने दिवस लिहावे.. गेला बाजार शब्द मोती पुन्हा सुरु करावे असे तुमच्या मुळे वाटते, पण एक माणुस काय काय करणार असे वाटतेय सध्या..

वाहं! भटकंतीची हि स्टाईल आवडली.
प्रतिसादातील किस्सेही भारीच 👍

छान आणि उपयुक्त माहिती, VIDEO पाहतोय