आघाडी सरकारने, गेल्या वर्षभरांत किती कामे केली आहेत?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
10 Mar 2021 - 6:52 pm
गाभा: 

साधारण पणे, गेले एक वर्ष, आघाडी सरकार, महाराष्ट्र राज्यावर, राज्य करत आहे...

गेले एक वर्ष, हे सरकार नुसतीच, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, हे धोरण अवलंबत आहे, असे वाटते.

सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे सुखावह होईल, हे बघणे, हेच सरकारचे मुख्य काम असते..

आर्थिक, संरक्षण, दळणवळण आणि अन्नपुरवठा.... ह्या जीवनावश्यक गोष्टी, हे सरकार नीट पुरवू शकत नाही...

आर्थिक बाबतीत, रोजगार उपलब्ध केले नाहीत.

संरक्षण, सामान्य माणूस ते उद्योगपती, कुणीच सुरक्षित नाही

दळणवळण, मेट्रो कारशेडचे घोंगडे नुसतेच भिजवत ठेवले आहे

अन्नपुरवठा, महागाई वाढतच आहे.

अर्थात, हे माझे निरीक्षण आहे...इतर कुणाचे निरीक्षण वेगळे असूही शकते....

ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि वैयक्तिक शेरेबाजी करणे चालू असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत.

-- मिपा व्यवस्थापन

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

10 Mar 2021 - 7:34 pm | Rajesh188

महागाई फक्त महाराष्ट्रात वाढली आहे की देशभर महागाई वाढली आहे.
महागाई वाढण्यास केंद्र सरकारची धोरण जबाबदार असतात.
Fuel price, आयात निर्यात,ही धोरण केंद्र ठरवते राज्य नाही.
राज्यात मला तरी असुरक्षित वाटत नाही मूवी ना कसे काय आताच असुरक्षित वाटायला लागले?
एक चाचपणी म्हणून mipa वर अजुन
कोणाला असुरक्षित वाटत आहे का?
अशी दोन चार लोक निघाली तरी मूवी ची भीती योग्य आहे असे समजता येईल.
राज्यातील कोणत्याच बाजारात जीवन आवशक्य वस्तू भरपूर उपलब्ध आहेत.
येथील मिपाकरांना दुकानात डाळ उपलब्ध नाही,साखर उपलब्ध नाही,भाज्या उपलब्ध नाहीत असा अनुभव आला आहे का?
आला असेल तर राज्यात जीवन आवशकय वस्तू ची कमतरता आहे ह्याला आधार मिळेल.

मुक्त विहारि's picture

10 Mar 2021 - 7:40 pm | मुक्त विहारि

आपल्या ह्याच प्रतिसादाची अपेक्षा होती

आलं अंगावर, तर ढकल केंद्रावर...

हस्तर's picture

10 Mar 2021 - 8:41 pm | हस्तर

आहे ते आहे
राज्य सरकार कसे करणार त्यांच्या अख्त्यारी बाहरेच प्रश्न ?

मुक्त विहारि's picture

10 Mar 2021 - 8:33 pm | मुक्त विहारि

ह्या राज्य सरकारने केलेली जनहिताची कामे सांगीतलीत तर फारच उत्तम...

ह्या सरकारने दीड वर्षात काहीच काम केले नाहीत पण माझ्या मते मोदी सरकारने पण 5 वर्षात काहीच चांगले कामं केले नव्हते, दुसऱ्या फेरीत ते चांगले काम करताना दिसत आहेत, या सरकारला पण थोडा वेळ दयायला पाहिजे

मुक्त विहारि's picture

10 Mar 2021 - 8:48 pm | मुक्त विहारि

कॉंग्रेस तर आधी पण होतीच आणि शिवसेना पण होतीच...

त्यामुळे, समाजसेवा करायचा, ह्यांना चांगला अनुभव आहे..

कदाचित ते समाजसेवा करत पण असतील, पण, मला ते दिसत नाही.

कुणी सांगीतले तर फारच उत्तम ....

बापूसाहेब's picture

10 Mar 2021 - 9:18 pm | बापूसाहेब

खूप काही लिहिण्यासारखं आहे पण लिहिल्यावर कोणीतरी घरी नेऊन वळ उठेपर्यंत मारेल.. किंवा कोणीतरी येऊन घर तोडून जाईल..
जास्तच लिहिले तर चक्क पोलिसांमार्फतच माझा खून करवून आणला जाऊ शकतो..

त्यामुळे माफ करा मुवि.. मी इथे लिहिणार सरकारविरोधी काहीही लिहिणार नाही.. !!! लिहिले तर लगेच महाराष्ट्राचा, शिवाजी महाराजांचा, मराठी माणसाचा अपमान होईल.. आणि ते पातक माझ्या डोक्यावर नको..

सरकार एकदम मस्त चालले आहे.. महाभकास सॉरी सॉरी.. महाविकास आघाडी सरकार हे जनतेचे सरकार आहे. आणि उद्धव जी ठाकरे अत्यंत चांगलं काम करत आहेत.. इतका पसारा आहे कि काम घरूनच करतात. उगा तिकडे मंत्रालयात जाण्या येण्याचा वेळ कशाला वाया घालवायचा.. ( कोण रे तो... घरबश्या म्हणतोय.. जीव वर आलाय का??? गप्प... !!!! )

तर हा.. मी हेच सांगत होतो कि सरकार अत्यंत जबाबदारी ने काम करतेय.. फक्त मुवि सारखी लोकं आहेत कि जे खबरदारी घेत नाहीत.. म्हणून थोडेफार प्रॉब्लेम होतात.. विसरलात का.. आपले मामु ( माननीय मुख्यमंत्री ) काय म्हणले होते ते?? तुम्ही खबरदारी घ्या. मी जबाबदारी घेतो..

कालच मी आजान स्पर्धा पाहून आणि ऐकून आलो.. कान कसे एकदम तृप्त झालेत.. या निमित्ताने जनाब बाळासाहेब ठाकरेंना दिलेला तो सन्मान पाहून जीव दाटून आला.. ( कोण रे तो हिंदुत्व हिंदुत्व ओरडतोय.. गप्प बस झेमण्या.. तू आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?? )

कालच मी विजेचे बिल भरले.. वाढीव 7-8000 रुपये होते पण परवा मुख्यमंत्री म्हणले ना.. कि आता मी देखील तुमच्या घरातलाच एक आहे.. त्यामुळे मग जास्त विचार नाही केला.. म्हणलं आपले पैसे आपल्याच घरी राहतील.. त्यामुळे सगळं वाढीव बिल पूर्ण भरले.. उलट अजुन एक्सट्रा पैसे देणार होतो. पण बायकोने अडवले..!!

असो. ह्या सगळ्या गोष्टी मुवि आणि त्यांच्यासारख्या इतर लोकांना कश्या काय दिसत नाहीत देव जाणे.. जाऊदे. शेवटी अंधभक्त च ते.. त्यांना काय कळणार मराठी अस्मिता, ठाकरे पॅटर्न , हिंदुत्व, वगैरे वगैरे..

Rajesh188's picture

10 Mar 2021 - 9:43 pm | Rajesh188

कोणतेच क्लेश मनात न ठेवता मनापासून हे सांगा महाराष्ट्र सरकार नी त्यांची जबाबदारी पूर्ण नसेल पण काही प्रमाणात तरी नक्कीच योग्य पद्धती नी पूर्ण केली की नाही.
पक्षीय विचार सोडून ध्यं.
Corona मुळे जी स्थिती निर्माण झाली आणि लोकांचे जे हाल झाले ही स्थिती केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार च्या आवक्या बाहेर होती
हे आम्ही पण मान्य करतो.
पण अचानक lockdown करणे हा निर्णय महामूर्ख पणाच होता हे कोणी पण सांगेल.
लोकांना दहा दिवसाचं अवधी खरी पोचण्यासाठी देणे गरजेचे होते.
अचानक lockdown केल्या मुळे पर्यटक,जे कामानिमित्त घरा बाहेर होते त्यांची अवस्था घराब झाली आणि सरकार चा खर्च पण वाढला त्या लोकांना सुविधा देण्यासाठी.
लोकांचे हाल पण झाले.
चूक ती चूक च.
कधीच अचानक लॉक डाऊन करू नका लोकांना सूचना ध्या आणि सात दिवसांची तरी मुदत ध्या.

सुक्या's picture

10 Mar 2021 - 11:34 pm | सुक्या

खरंय. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महारष्ट्राला एक "कुटुंबवत्सल आणि कोटुंबीक बोलणारे" मुख्यमंत्री लाभले आहेत. त्यांना विरोध करणारे पापाचे धनी आहेत. नाहीतर आमचे शिवसैनीक आहेतच पाठीवर वळ काढायला ....

आग्या१९९०'s picture

10 Mar 2021 - 9:22 pm | आग्या१९९०

कोविडच्या काळात सगळ्यांचीच आर्थिक स्थिती नाजूक झाली होती, केंद्राची आणि सर्व राज्यांची. महाराष्ट्रात सरकार स्थापून स्थिरस्थावर होण्यापूर्वीच कोविड संकट आले. केंद्र सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती वाईट होती. पैशाचे सोंग करता येत नाही. विकासाचे सोंग करणाऱ्या सोंगाड्याचे अनुकरण करण्यात महाराष्ट्राचे सरकार कमी पडले हे मान्य करतो.

बापूसाहेब's picture

10 Mar 2021 - 9:35 pm | बापूसाहेब

आग्या 1990 जी सहमत आहे. कोरोनामुळे आर्थिक स्थिती अवघड होती / आहे हे मला मान्य आहे..

विकास बाजूला ठेवुयात. पण काही गोष्टी आणि विशेषतः गृह मंत्रालय अत्यंत बेजबाबदार पद्धतीने काम करतेय..
कंगना आणि नंतरची तोडफोड प्रकरण तर कळस होता..
हिंदुत्व सोडून खांग्रेसी सेक्युलॅरिज्म आचरणात आणणे, राहुल जी यांच्यावर स्तुतीसुमने उधळणे, शेतकरी कायद्याला केलेला विरोधासाठीचा विरोध, वाढीव वीजबील आणि त्यातला गोंधळ, सरकारविरोधी बोलल्यास घरी बोलावून वळ उठेपर्यन्त मारहाण करणे, मुंडे प्रकरण, राठोड प्रकरण होऊनसुद्धा दिले जाणारे समर्थन आणि पाठराखण हे सर्व डोक्यात जातं..

आणि मी वर लिहिलेल्या मुद्यावर कोरोना, अर्थकारण, टॅक्स , विकास या सर्वांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही.

संकट काळात सुशांत केस चे राजकारण,ते करणारे अर्णव,कंगना हा प्रकार म्हणजे मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोनी खाण्या सारखेच होते.
केंद्र सरकार नीच ह्या नीच माणसांना डांबून ठेवले पाहिजे होते.
पण जबाबदार bjp नी तसे केले नाही राम कदम सारख्या शुल्लक व्यक्ती ल तमाशा उभा करण्यास प्रतिबंध केला नाही.
बाकी सुशांत ला न्याय मिळालाच पाहिजे .
तो अजुन सुद्धा मिळाला नाही.
राजकारण न करता राज्य आणि केंद्र सरकार नी गुप्त बैठक घेवून योग्य निर्णय घेणे अपेक्षित होते.

संकट काळात सुशांत केस चे राजकारण,ते करणारे अर्णव,कंगना हा प्रकार म्हणजे मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोनी खाण्या सारखेच होते.
केंद्र सरकार नीच ह्या नीच माणसांना डांबून ठेवले पाहिजे होते.
पण जबाबदार bjp नी तसे केले नाही राम कदम सारख्या शुल्लक व्यक्ती ल तमाशा उभा करण्यास प्रतिबंध केला नाही.
बाकी सुशांत ला न्याय मिळालाच पाहिजे .
तो अजुन सुद्धा मिळाला नाही.
राजकारण न करता राज्य आणि केंद्र सरकार नी गुप्त बैठक घेवून योग्य निर्णय घेणे अपेक्षित होते.

बापूसाहेब's picture

10 Mar 2021 - 10:25 pm | बापूसाहेब

म्हणजे एखादे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले कि ते प्रकरणच फालतू होते.. आणि BTW मी कुठेही सुशांत सिंग चा उल्लेख केलेला नाही..

सुक्या's picture

10 Mar 2021 - 11:37 pm | सुक्या

प्रतिसाद संपादित.
सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल.
-मिपा व्यवस्थापन

Ujjwal's picture

11 Mar 2021 - 10:59 am | Ujjwal

प्रतिसाद संपादित.
सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल.
-मिपा व्यवस्थापन

आग्या१९९०'s picture

10 Mar 2021 - 9:50 pm | आग्या१९९०

मान्य आहे. खिशात पैसे नसेल तर होते चिडचिड. महाराष्ट्र सरकार कुठेतरी कारण नसताना तसे वागत असेल तर दुर्लक्ष करणे हेच योग्य. किती दिवस असे चाळे करतील? काम करून दाखवावेच लागेल त्यांना,नाहीतर कपाळमोक्ष अटळ आहे. मी तरी फार अपेक्षा करत नाही ह्या सरकारकडून. मीही शेती पंप बिल पाठपुरावा करून सरकारी सवलतीपेक्षा कमी करून घेतले. परंतू अजूनही माझे पूर्ण समाधान झालेले नाही. पूर्ण समाधान झाल्याशिवाय बिल भरणार नाही. वर्षभर शेती बंद असताना बिल येतेच कसे?

सॅगी's picture

10 Mar 2021 - 9:38 pm | सॅगी

काही दिवसांपुर्वी सामनाचे मा.कं. देखील असेच काहीसे बोलले होते बहुदा....बाकी सोंगे आणता येतात पण पैशाचे नाही असे काहीतरी...

पण काही का असेना "राज्य सरकार सोंग करते" हे मान्य केले हेही नसे थोडके...

व्यक्तिपूजा, खंडणीखोर वृत्ती आणि रस्त्यावरील गुंडगिरी ह्या पायावर निर्माण झालेल्या पक्षाकडून जास्त अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. शिवसेनेचा उदय शक्य झाला तो काँग्रेस च्या भ्रष्ट आणि सरंजामशाही वृत्तीमुळे. तोंडाने महाराजांचा जाप करायचा आणि गरीब आणि निशस्त्र लोकांवर हिंसा वापरून आपले पौरुष सिद्ध करायचे हेच शिवसेना आधीपासून करत आली आहे.

शिक्षण, कायदा सुव्यवस्था, अर्थ व्यवस्था, संस्कृती, व्यापार पर्यटन कुठल्याच विषयावर ह्यांच्या नेत्यांना चार शब्द बोलता येत नाहीत, काही दूरगामी धोरण निर्माण करायचे दूरच ठेवा मुंबई जगाची आर्थिक राजधानी, पण अजून ह्यांना एक रस्ता धड मेंटेन करता येत नाही. पण कुणा नटीला घाबरावयाचे तर ह्यांच्या मिशीला पीळ चढतो.

शिवसेनेची प्रगती ज्या काली झाली त्या काली शिवसेनेची गरज होती. सुदैवाने मराठी समाज प्रगत झाला आहे. आता रस्त्यावर मारामारी, संप, बंद असली थेरे भूतकाळ झाला आहे. हिंदी मुस्लिम कार्ड विशेष चालत नाही. परप्रांतीय-स्थानिक हा भेदभाव लोक जास्त करायला जात नाहीत. सुमित राघवन सारखा तामिळ माणूस अस्सलखीत मराठीतून चित्रपट काढतो आणि मराठी भाषेच्या नावाने मतांची भीक मागणारे आपल्या पोरांना "बोंबे स्कॉटिश" मध्ये पाठवतात आणि कुणा गरिबाने "बोंबे" म्हटले तर त्याला धमकावतात. महाराजांचे नाव घेणाऱ्या मंडळींनी हि असली भाकडकृत्ये करायची ह्या पेक्षा मोठे पाप नाही.

शिवसेनेची एक्सपायरी डेट कधीच होऊन गेली होती. भाजपाला सुद्धा हे लक्षात आले असावे. शिवसेनेचा वाघ आता काँग्रेसचे मांजर आहे. जो पर्यंत गरज आहे तो पर्यंत वापरले जाईल नंतर उकिरड्यावर फेकले जाईल.

आता कुणी म्हणेल कि राग फक्त शिवसेनेवर का ? काँग्रेस सुद्धा आहे ना सत्तेत. तर काँग्रेस हा कॅन्सर आहे. ह्यांना लोकांचे, देशाचे सोयरसुतक नाही. हि मंडळी उद्या राहुल ला थंडी वाजली म्हणून अक्खा महाराष्ट्र जाळून गरमी निर्माण करतील. ह्यांच्याकडून फक्त निलाजऱ्या लोकांनी अपेक्षा ठेवाव्यात.

सुक्या's picture

11 Mar 2021 - 3:05 am | सुक्या

गेल्या २५ वर्षात मुंबईत एकहाती सत्ता असताना ह्या लोकांना रस्ते / नद्या शुध्धता / मलनिस्सारण ह्यात एकही गोष्ट पुर्ण करता आली नाही ह्यातुनच हे किती निकम्मे आहेत हे दिसते. फक्त फुकाच्या वल्गना आनी इकडे तिकडे बोट दाखवणे याशिवाय काहीही नाही.

"मुंबईत खुप पाउस पडतो म्हणुन रस्ते खराब होतात" अशी मुक्ताफळे पालिकेतील एका वरीष्ठ व्यक्ती ने उधळल्याचे माहीती आहे. जणु काय पाउस जगात फक्त मुंबई मधेच पडतो.

मुंबई ची प्रचंड लोकसंख्या असून सुद्धा मुंबई हे देशातील सर्व सुविधा असलेले शहर आहे.
शुद्ध पाणी पुरविण्यात मुंबई चा नंबर देशात पाहिले आहे.
मुंबई सारखे शुध्द पाणी देशातील एका पण मोठ्या शहरात पुरवले जात नाही.
शहर रोज स्वच्छ केले जाते .मुंबई मध्ये कचऱ्याचे ठीक दिसत नाहीत .
पण देशातील सर्व मोठ्या शहरात कचऱ्याचे ठीग पडलेले असतात.
२४ तास वीज पुरवठा योग्य दाबाने देणारे मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे.
मुंबई मध्ये रात्री दोन वाजता पण मिनी स्कर्ट वर मुली फिरू शकतात.
ते महाराष्ट्र सोडून देशातील कोणत्याच शहरात शक्य नाही.
सेने चा विरोध करता करता हे bjp चे असंतुष्ट थापडे महाराष्ट्र चाच् द्वेष करायला लागले.
मुंबईमध्ये जेवढे देशातील अनेक राज्यातून लोक उज्वल भविष्याची स्वप्न घेवून येतात तेवढी देशातील कोणत्याच शहरात येत नाहीत.
आकडेवारी गूगल वर शोधा

मराठी_माणूस's picture

11 Mar 2021 - 2:06 pm | मराठी_माणूस

त्याचे कारण म्हणजे हे लाडावलेले बाळ आहे , जास्तीत जास्त पैसा इथेच खर्च केला जातो . बाकीचे प्रदेश बसलेत वर्षानुवर्ष वाट बघत.

भारताचे केंद्र सरकार मुंबई मधून घेते किती आणि मुंबई ल परत देते किती.
ह्याची आकडेवारी तुम्हीच द्याच.
फक्त परंपरेनुसार थापा मारू नका.

मराठी_माणूस's picture

11 Mar 2021 - 6:43 pm | मराठी_माणूस

कॉर्पोरेट ऑफिस मुंबईला आणि प्लांट इतरत्र , आता तुम्हीच ठरवा . सगळे जर व्यवस्थित आहे तर वैधानीक विकास मंडळांची गरज काय.

मुक्त विहारि's picture

11 Mar 2021 - 9:00 pm | मुक्त विहारि

इतर राज्ये पण सांभाळायची असतात...

अनन्त अवधुत's picture

11 Mar 2021 - 2:17 pm | अनन्त अवधुत

ईतर प्रदेश म्हणजे इतर आज्ये नव्हेत , आपल्या महाराष्ट्रातीलच बाकी भाग बहा, विदर्भ आहे, मराठवाडा आहे त्याचे काही सोयर्सुतक नाही.
यंदा तर चंगळ झाली मुंबईची, २-२ अर्थसंकल्प. देशाच्या कोणत्याच शहरासाठी २ अर्थसंकल्प नाहीत, पण यंदा मुंबईला आहेत.

अनन्त अवधुत's picture

11 Mar 2021 - 2:19 pm | अनन्त अवधुत

इतर प्रदेश म्हणजे इतर राज्ये नव्हेत , आपल्या महाराष्ट्रातीलच बाकी भाग पहा, विदर्भ आहे, मराठवाडा आहे त्याचे काही सोयरसुतक नाही.
यंदा तर चंगळ झाली मुंबईची, २-२ अर्थसंकल्प. देशाच्या कोणत्याच शहरासाठी २ अर्थसंकल्प नाहीत, पण यंदा मुंबईला आहेत.

अनन्त अवधुत's picture

11 Mar 2021 - 2:13 pm | अनन्त अवधुत

२४ तास वीज पुरवठा योग्य दाबाने देणारे मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे.

खाजगीकरण आहे विजेचे तिथे. अडानी, टाटा, आणि अंबानी वीज पुरवठा करतात मुंबईला.

बाबो, आणि श्रीश्रीश्री 188 ना तर अंबानी आणि अडानी ना हाकलून लावायचंय. कसं व्हायचं मग.. बाकी मोबाईल जसा ते प्रायव्हेट कंपनीचा वापरतात, तशीच वीज पण रिलायन्स चिंच वापरतात बरं का

उत्खनक's picture

11 Mar 2021 - 9:27 pm | उत्खनक

विदर्भातील वीज पश्चिम महाराष्ट्रात वळवली जाते. मग होणारच ना २४ तास वीज पुरवठा.
विदर्भ वेगळा केला तर केवळ वीजेचा बोजा इतका होईल यांचा की *** धुवायला सुद्धा कर्ज काढावे लागेल.

सुबोध खरे's picture

13 Mar 2021 - 12:20 pm | सुबोध खरे

विदर्भातील वीज पश्चिम महाराष्ट्रात वळवली जाते.

नीट माहिती घेऊन टंकत जा.

स्वतंत्र विदर्भ यावर मिपा वर या विषयावर भरपूर चर्वित चर्वण झालेलं आहे.

विदर्भातील वीज पश्चिम महाराष्ट्रात वळवली जाते ती महावितरणचा नफा व्हावा म्हणून

मुंबईला गुजरात कडून स्वस्त दराने (४ रुपये दराने) वीज सहज मिळेल आणि ती चंद्रपुरवरून ७५२ किमी चंद्रपूर पडघा HVDC लाईन ने आणण्यापेक्षा जवळून आणण्यामुळे स्वस्तही पडेल.

https://www.deshgujarat.com/2020/03/12/gujarat-sold-surplus-power-to-10-...

पण मग शेतकऱ्यांना फुकट वीज कशी देता येईल?

मुंबईतील उद्योगधंदे ११ रुपये दराने वीज बिल भरतात . त्यांना महावितरणची मुळीच गरज नाही.

आग्या१९९०'s picture

13 Mar 2021 - 1:29 pm | आग्या१९९०

https://m.timesofindia.com/city/nagpur/iit-powai-exposes-excess-billing-...

IIT पवईने केलेल्या सर्व्हेनुसार गेल्या १५-२० वर्षात महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना विजमंडळ आणि सरकारने किती फसवले हे समजते. कृषीविजवापरचे आकडे किती फसवे आहे तेही कळले. मी जेव्हा प्रत्यक्ष शेती करू लागलो तेव्हा खऱ्या अर्थाने ही लूट अनुभवली.

Rajesh188's picture

13 Mar 2021 - 3:51 pm | Rajesh188

शेतकऱ्यांना फुकट वीज मिळते हा जुमला काय आहे.
शेतीसाठी सुद्धा मीटर नीच वीज पुरवठा होतो.
गुजरात आणि मुंबई चा काय संबंध .
कोणत्याही महानगर पालिकेला दुसऱ्या राज्यातून वीज घेण्याचा हक्क नाही.राज्याच्या परवानगी वीणा हे तुम्हाला माहीत नाही का.
Gulf मध्ये पेट्रोल खूप स्वस्त आहे महाराष्ट्र किंवा बाकी राज्य सरळ gulf देशांशी व्यवहार करून मुंबई मध्ये पेट्रोल आयात करतील.
केंद्राला त्या वर कर लावण्याचा हक्क का असावा?
महाराष्ट्राला तीस रुपये ltr ni पेट्रोल मिळेल.
राज्य अजुन पुढे जाईल.
देश नियमांनी चालतो मनमानी पद्धतीने नाही.
जेवढे अधिकार केंद्राला घटनेने दिले आहे तेवढेच अधिकार राज्यांना पण दिले आहेत.
हे भारतीय संघराज्य आहे.
संघराज्याची व्याख्या खाली देत आहे.
देशातील केंद्रीय सरकार आणि देशातील प्रादेशिक सरकार ह्यांच्या मध्ये अधिकार विभागणी संविधानाने केलेली असते त्या पद्धतीला संघराज्य म्हणतात.

प्रसाद_१९८२'s picture

13 Mar 2021 - 3:59 pm | प्रसाद_१९८२

चरण किधर है, भाईसाहब. जरा हमें भी दर्शन करवाईये.

सुबोध खरे's picture

13 Mar 2021 - 7:00 pm | सुबोध खरे

हायला

कोणत्याही महानगर पालिकेला दुसऱ्या राज्यातून वीज घेण्याचा हक्क नाही.राज्याच्या परवानगी वीणा हे तुम्हाला माहीत नाही का.

वर दिलेला दुवा वाचण्याचे निदान कष्ट तरी करा कि त्यात लिहिलंय कि गुजरातने महाराष्ट्राला ४ रुपये दराने वीज विकली.

देश आणि परदेश यातील फरक समजत नाही का तुम्हाला?

मग काश्मिरातील स्वातंत्र्यसैनिकानी पाकिस्तानातून शस्त्रास्त्रे आणि अफू मागवली तर चालतील का?

Officials in the energy department said the conservative estimate of the subsidy for farmers and allied sectors is Rs 10,000 to Rs 12,000 crore per year. During peak summer, when power demand goes up, the cost for procuring power also came at a higher price, they added.

Officials also said the subsidy to farmers, however, remained constant resulting in higher expenditure that had to be cross subsidised to recover money through power supplied to industries and domestic consumers.

https://indianexpress.com/article/cities/mumbai/govt-promises-eight-hour...

प्रतिसाद संपादित.
सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल.
-मिपा व्यवस्थापन

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2021 - 7:18 pm | श्रीगुरुजी

माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना वीजशुल्कासाठी दोन पर्याय आहेत.

प्रतियुनिट अल्प दराने किंवा कृषीपंपाच्या अश्वशक्तीनुसार एका ठराविक अल्प दराने (या योजनेत किती वीज वापरली जाते याचा संबंध नाही). चूभूदेघे.

Rajesh188's picture

13 Mar 2021 - 11:51 pm | Rajesh188

मला वाटतं अंदाजे 2005 पर्यंत अश्व शक्ती नुसार शेत पंपाला वीज आकारणी केली जायची.
मग तुम्ही पंप बंद ठेवा किंवा 24 तास चालू ठेवा .
ठराविक बिल च यायचं.
पण त्या मुळे लोक वीज,आणि पाणी दोन्ही ची नासाडी करायचे.
अत्यंत मौल्यवान पाणी वाया जायचं,वीज वाया जायची.
उसाच्या शेतात रात्री पाणी सोडून सरळ सकाळी जावून च पंप बंद करणारे महाभाग होते.
रात्र भर पाणी वाहत असायचे .
नंतर मीटर प्रमाणे वीज आकारणी चालू झाली.
पण शेती साठी दरात सवलत दिली जाते.
शेती असू नाही तर घरगुती वापर पाणी आणि वीज मीटर प्रमाणेच दर आकारून दिले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.
1998 ते 2000 च्या आसपास विजेची कमतरता नव्हती वीज 24 तास उपलब्ध असायची .
शेती साठी सुद्धा 24 तास वीज होती .
नंतर तुटवडा निर्माण होवून वीज कपात सुरू झाली.
आता शेती साठी 24 तास वीज उपलब्ध करून दिली जात नाही.
रात्री च दहा ते बारा तास वीज उपलब्ध असते.
देवेंद्र साहेब नी तर शेती साठी वीज देणेच बंद केले .
सौर ऊर्जा वापरून गरज भागवां वीज मिळणार नाही असा दंडक च होता त्यांचा.
सौर उर्जेवर पाण्याचा पंप चालवायचा तर चार ते पाच लाख खर्च.
परत सुरक्षेची काहीच खात्री नाही.
आता परत वीज जोडणी देणे चालू झाले.
जाणता राजा सत्तेवर आला ना.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 6:27 am | मुक्त विहारि

काय सांगता?

तांदूळ घोटाळा अजिबात झाला नाही

साधू हत्याकांड झाले नाही

सामान्य माणसाला मारहाण झाली नाही

करोना सेंटर मध्ये बलात्कार झाला नाही

जळगांव मध्ये स्त्रीयांचे शोषण झाले नाही

सोलापुर मध्ये, सामुहिक बलात्कार झाला नाही

इतकेच कशाला?

आता फक्त स्त्रीने केस दाखल केली की 21 दिवसांत निकाल लावतात...

करोना तर गर्दीत चेंगरून मरणारच आहे...
-----------
देवेंद्र साहेब नी तर शेती साठी वीज देणेच बंद केले .

हे नक्की का? कारण आमच्या गावात, अर्ज केला की महिन्याभरात, 3 फेजची लाईन टाकली. आणि ती पण फडणवीस सरकारच्या काळांत, आता कोकण महाराष्ट्र राज्यात, येत नसेल तर गोष्ट वेगळी आहे.
---------
सौर उर्जेवर पाण्याचा पंप चालवायचा तर चार ते पाच लाख खर्च.

आपल्याला ही माहिती कुणी दिली? दोन लाख रूपये खर्च येतो आणि त्याला पण सबसिडी आहे....

कदाचित कोकणांत, सबसिडी देत असावेत आणि कोकणांत सौर पंप स्वस्त असावेत. माझा एक मित्र हाच धंदा करतो.
------------

परत सुरक्षेची काहीच खात्री नाही.....

हे मात्र एकदम बरोबर बोललात.... ज्या राज्यात, सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण होते, त्या राज्यांत, अशा गोष्टी वारंवार होण्याची शक्यता जास्तच.

देवेंद्र साहेब नी तर शेती साठी वीज देणेच बंद केले .

थापाडे महाराज

याचा कुठे काही दुवा कि असंच संध्याकाळी चांदणी बार मध्ये बसून कुणी तरी सोडलेली पुडी आहे?

उत्खनक's picture

15 Mar 2021 - 10:01 pm | उत्खनक

विदर्भातील वीज पश्चिम महाराष्ट्रात वळवली जाते ती महावितरणचा नफा व्हावा म्हणून

इथे विदर्भातून वीज वळवली जाते याला केवळ नफा हे एकमेव कारण देऊन थांबता येत नाही.

विदर्भात थर्मल पॉवर प्लांट्स आहेत. आधीच विदर्भ मुळात उष्ण. त्यात हे.
५० ला टेकणारा पारा. त्यात भर उन्हाळ्यात सरासरी १२ तास लोडशेडींग खेडेगावांत. नागपूर सारख्या शहरात ४ तास होते ते आता कमी झालेय. बाकी शहरांचे हाल वेगळेच. या सर्वांचा काही विचार? की केवळ नफा हा एकमेव दृष्टीकोन बरोबर? घ्या की गुजरातेतून वीज, कोणी नाही म्हटले?
इथे अकोल्या सारख्या शहरात भर उन्हाळ्यात ८-८ तास वीज नसते, पाणी आठवड्यातून एकदा येतं प्यायचं. गावांत काय असेल याची कल्पनाही करवत नाही. लोकं वैतागणार नाहीत? महावितरण फायद्यात नसण्याची अनेक कारणं आहेत. सगळ्यांवर कार्यवाही केलेली दिसते काय?

माणसांचं ३-४ महिने जगणं हराम करून नफ्याचं कारण देणारं कोणतंही सरकार हे चूकच.

सुबोध खरे's picture

16 Mar 2021 - 10:16 am | सुबोध खरे

क्रॉस सबसिडी याबद्दल ऐकलं आहे का?

५-६ रुपये दराने उत्पादित वीज ( चोरी आणि सवलतीच्या दराने वीज दिल्याने) घरगुती ग्राहकाला ३-४ रुपये दराने वीज विकण्यासाठी उद्योगधंद्याला ११ रुपये दराने विकावी लागते. हे उद्योग धंदे मुंबईत असल्याने वीज मुंबईपर्यंत आणावी लागते.

त्यातून विदर्भ आणि मराठवाडा येथील मागास भागात उद्योगधंदे सुरु व्हावे यासाठी तेथील उद्योगधंद्याला सुद्धा सवलतीच्या दराने वीज पुरवावी लागते.

https://www.nagpurtoday.in/concession-in-power-tariff-to-industries-in-v...

विदर्भात घरगुती वीज बिलांची थकबाकी वाढतेच आहे. तेथील उच्च दाबाचे (औद्योगिक) ग्राहक आपली बिले प्रामाणिकपणे भरतात. (म्हण्जेच घरगुति ग्राहक भरत नाहीत).

महा वितरणाचा संचित तोटा ३५००० कोटी रुपये आहे. म्हणजेच ११ कोटी महाराष्ट्राच्या जनतेवर हा भार १००० रुपये दर डोई आहे. हे पैसे कुठून येणार?

१०० युनिट पर्यंत फुकट वीज पुरवण्याची घोषणा करणारे सरकार या तोट्यात ७१०० कोटी रुपयांची भर घालू इच्छिते. म्हणजे दरडोई अधिक ६६० रुपये.

https://www.freepressjournal.in/mumbai/mumbai-working-group-formed-to-cu...

सरकार कडे स्वतःचे काहीही नसते ते एकाच्या खिशातून काढून दुसऱ्याच्या खिशात टाकतात. ( जसे ग्राहकाला स्वस्त माल पुरवायचा असेल तर शेतकऱ्याला कमी भाव द्यावा लागतो).

मुंबईला २४ तास खंडित न होणार वीज पुरवठा पाहून पोटात दुखणाऱ्या माणसांनी वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे.

विदर्भ हा महारष्ट्र ची शान आहे त्याला महाराष्ट्र परका समजत नाही.पण काही राज्य द्रोही लोक राज्याशी द्रोह करून विष कालवत असतात लोकांच्या मनात.

મહારાષ્ટ્ર એ મુંબઈ વિસ્તારનું ગૌરવ છે. તે મુંબઇ વિસ્તારને અજાણી વ્યક્તિ માનતો નથી.પરંતુ કેટલાક રાજ્ય વિરોધી લોકો રાજ્યના દગો કરીને લોકોના મનને ઝેર આપી રહ્યા છે.
સો સો એંસી ભગવાન, ક્રોધ ના કરો, આનંદ કરો. :)

Rajesh188's picture

13 Mar 2021 - 10:37 pm | Rajesh188

मुंबई ल काही ही झाले तरी 24 तास वीज पुरवठा करण्याचा करार mseb बरोबर झाला आहे.
आणीबाणी निर्माण झाली तरी बाकी महाराष्ट्र चा वीज पुरवठा खंडित करून मुंबई ला वीज पुरवली जाते.
Maharashtra मुंबई साठी नेहमीच kurbani देत आला आहे.
महाराष्ट्र स्वतः अंधारात राहतो पण मुंबई ला वीज पुरवठा केला जातो.
तुमच्या ह्या pvt कंपन्या मुळे 24 तास वीज मिळत नाही.
देशातील सर्वात जास्त वीज निर्मिती महाराष्ट्र पहिल्या पासून आता पर्यंत करत आला आहे.
बाकी कोणतीच राज्य जवळपास पण फिरकू शकत नाहीत.
आज महाराष्ट्र 42491 mw वीज निर्मिती करतो तर दोन नंबर ला असलेला गुजरात 38039mw वीज निर्मिती करतो.
देशातील पाच राज्य महाराष्ट्र, गुजरात,तमिळ nadu, Andhra, आणि उत्तर प्रदेश ही सर्वात जास्त वीज निर्मिती करतात.
त्या मध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी असून उत्तर प्रदेश शेवटच्या स्थानी आहे.
महाराष्ट्र उत्तर प्रदेश पेक्षा दुप्पट पेक्षा जास्त वीज निर्मिती करतो.
नाद करायचा च नाही महाराष्ट्र चा

मराठी_माणूस's picture

14 Mar 2021 - 12:34 pm | मराठी_माणूस

मुंबई ल काही ही झाले तरी 24 तास वीज पुरवठा करण्याचा करार mseb बरोबर झाला आहे.
आणीबाणी निर्माण झाली तरी बाकी महाराष्ट्र चा वीज पुरवठा खंडित करून मुंबई ला वीज पुरवली जाते.

असे का ? इतर राज्यातल्या राजधान्यासाठी सुध्दा अशीच व्यवस्था असते का ?

तसेच विजेची गरज manufacturing plant ला जास्त असते का खर्डेघाशी करणार्‍या ऑफिसला ?

राज्याला द्यावी लागते फक्त त्याचे कौतुक कोणी करत नाही.
हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल एवढे पाणी महाराष्ट्र मुंबई ला पुरवतो.
स्वतःच्या राज्यातील पर्यावरण धोक्यात आणून.
हजारो टन कचरा महाराष्ट्र ची भूमी प्रदूषित करते.
पांढरा हत्ती चा सांभाळ केल्या सारखे आहे हे.पण जास्तीत जास्त कर मात्र केंद्र सरकार वसूल करून देशभर त्याचे वाटप करते .
आपल्याला भीक मागावी लागते हक्क च्या पैश्यासाठी.

Rajesh188's picture

14 Mar 2021 - 12:52 pm | Rajesh188

मोदी साहेब गुजरात चे मुख्य मंत्री होते तेव्हा त्यांनी पण प्रश्न केला होता.
गुजरात नी केंद्राला कर का द्यावा?
असा

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 1:20 pm | मुक्त विहारि

काही लिंक?

Rajesh188's picture

14 Mar 2021 - 1:56 pm | Rajesh188

मला लिंक देता येत नाही अडचण येतेय तुम्ही गूगल वर बघा.
प्रतिक्रिया म्हणून मोदी वर देशद्रोह चा आरोप काँग्रेस नी केला होता

अर्थात, बहुतेक तुम्हाला, बटाट्या पासून सोने बनवणारे मशीन हवे असेल.....

२००८ मध्ये मोदी नी असे जाहीर वक्तव्य केले होते.
की गुजरात नी केंद्राला कर का द्यावा.
तो विषय चालू आहे.
कर देण्यास त्यांनी विरोध केला होता.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 2:46 pm | मुक्त विहारि

हवेत गोळीबार करू नका

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 3:52 pm | मुक्त विहारि

मग त्याला काही अर्थ नाही...

सुबोध खरे's picture

15 Mar 2021 - 8:04 pm | सुबोध खरे

आपल्याला भीक मागावी लागते हक्क च्या पैश्यासाठी.

थापाडे महाराज

गेल्या ६० वर्षापैकी ४९ वर्षे काँग्रेसचे राज्य होते गेले एक वर्ष महा भिकार आघाडीचे आहे आणि १० वर्षे भाजप आणि शिवसेनेचे.

मग तुमच्या हक्कासाठी भीक मागायला कुणी लावलं तुम्हाला याचा उत्तर द्या बरं

बापूसाहेब's picture

11 Mar 2021 - 10:38 am | बापूसाहेब

सहना यांच्याशी सहमत.. तुमच्या भूमिका एकदम स्पष्ट आणि प्रतिसाद एकदम सडेतोड असतात..

राज२००९'s picture

11 Mar 2021 - 3:16 am | राज२००९

हल्ली मिपावर काहितरी नविन वाचायला मिळेल या आशेवर आलो कि नेहेमीचे खेळाडु "चूगलखोर चाची" ची भूमिका इमानेइतबारे वटवुन आपलंच रडगाणं गाताना दिसतात. शिवाय, भाजपाच्या काळात सर्वकाहि कुशल-मंगल होतं असंहि नाहि. बहुतेक त्या काळात मिळणारा "कडक माल", जो मारल्यावर ट्रांस स्टेट मधे जाता येत असे, तो हल्ली मिळत नसावा... ;)

सुक्या's picture

11 Mar 2021 - 7:17 am | सुक्या

थोडासा तर-तम-भाव असला की उद्वेग येतो. यात कुणीही पुर्वी सगळे आलबेल होते आणि आता सगळीकडे सावळागोंधळ आहे असे कुणीही म्हणत नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे / त्यातल्या भ्रष्टाचारामुळे राज्याचे, परीणामी देशाचे किती नुकसान होते हे पाहिले आहे. त्याच नाकर्तेपणाचे कुणी समर्थन करत असेल तर त्याला वेळीच पायबंद घालावाच लागतो.

मागे एक वरिष्ट पोलिस अधिकारी "भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा एक भाग आहे, तो कधीच संपणार नाही" असे बोलतो तेव्हा तो भ्रष्टाचाराचे समर्थन करतो आणी असे ओपनली जेव्हा कुणी बोलते तेव्हा त्याला परीणामाची भीती नसते. राज्याच्या प्रमुखाने ती भिती दाखवली नाही किंवा तशी जरब त्यात नसेल तर लवकरच अनागोंदीला प्रारंभ होतो.

ह्यात तुम्हाला रडगाणे दिसत असेल तर असो बापडे.

Rajesh188's picture

14 Mar 2021 - 3:09 am | Rajesh188

आता पण भ्रष्ट शासन प्रशासन आहे तसेच आहे
BJP आली म्हणजे खूप बदल झाला आहे असे काही नाही
काहीच बदल bjp सरकार च्या काळात पण झालेला नाही.

शिवसेना पहिलेपासून असाच आहे, त्याला भाजपनेच मोठा केला, बाळासाहेब असताना पण असाच होता पण त्यांचे बोलणे भाजपने ठाकरी भाषा म्हणून कौतुक केले, आता शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने अति अप्रिय झाला त्यांना आणि काही लोकांना

शिवसेनेने गेल्या वर्षभरात केलेले भरीव काम सांगीतलेत तर उत्तम...

> शिवसेना पहिलेपासून असाच आहे

हीच तर समस्या आहे. कुत्रा गाडीच्या मागे धावतो तो पर्यंत मजा आहे. पण तुम्ही उतरून त्याच्या हाती दिलं स्टेरिंग तर मग काय ?

इथल्या काही आयडी ना आणि bjp ला सुद्धा सेना ही कशी महाराष्ट्र च्या हिताची आहे अशी पोपट पांच्छी करावी लागली असती.
सत्तेत अशा नालायक पक्षाला bjp नी इतकी वर्ष कसे काय सामावून घेतले.
बाळासाहेबांना भेटायला झाडून सर्व bjp चे वरिष्ठ नेते येत होते.
तेव्हाची सेना वेगळी होती का.

Rajesh188's picture

11 Mar 2021 - 9:37 pm | Rajesh188

त्यांची योग्य जागा दाखवून दिली म्हणून सर्व चिडचिड आहे बाकी काही नाही.
कोणत्याच पक्षाला ठराविक अशी कोणतीच वैचारिक बैठक नाही त्या मध्ये bjp सुद्धा आहे.
फक्त थापा मारून सत्ता मिळवणे एवढेच सामायिक हित राजकीय पक्ष बघत असतात.
त्या मुळे हा पक्ष चांगला तो वाईट असे काही नाही.
फक्त मनाचे खेळ आहेत ते.
मी पुढे जावून असे म्हणेन अमेरिकेत जसे अमेरिकेचे राष्ट्रीयत्व मिळालेला कोणताही परकीय नागरिक निवडणूक लढवू शकतो तसे भारतात सुद्धा असावे.
जरा हुशार लोक तरी चुकून सत्तेच्या ठिकाणी येतील.
भारतीय सत्ता योग्य रित्या सांभाळू शकत नाहीत.राज्य करणे हे त्यांचे काम नाही हे ब्रिटिश लोकांचे म्हणणे एकदम चुकीचे पण नाही.

बापूसाहेब's picture

11 Mar 2021 - 9:55 pm | बापूसाहेब

मी पुढे जावून असे म्हणेन अमेरिकेत जसे अमेरिकेचे राष्ट्रीयत्व मिळालेला कोणताही परकीय नागरिक निवडणूक लढवू शकतो तसे भारतात सुद्धा असावे.

तुमचा रोख कुणाकडे आहे ते समजले..

Rajesh188's picture

11 Mar 2021 - 10:12 pm | Rajesh188

तसा अर्थ घेतला तरी चालेल.
सोनिया गांधी ना त्या फक्त परदेशात जन्मल्या आहेत म्हणून विरोध करणे मला तरी बिलकुल पटलेलं नाही.
त्यांनी सत्ता व्यवस्थित सांभाळली असती ह्या विषयी पुर्ण खात्री होती.

बापूसाहेब's picture

11 Mar 2021 - 10:36 pm | बापूसाहेब

आपले मनातले मांडे समजले..!!
धन्यवाद..

तुमच्या मताचा आदर आहे. परंतु ज्या अमेरिकेचे उदाहरण दिलेत त्या देशाचे नियम काय आहेत हे समजाउन घेतले असते तर असले समर्थन केले नसते (म्हणजे निदान अमेरिकेचे उदाहरण तरी दिले नसते).

तुमच्या माहीतीकरता: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हा त्या देशाचा जन्माने नागरीक असावा ही मुळ अट आहे. बाकी जौ द्या. तुमच्या मताचा प्रतीवाद करण्याचे मी कटाक्षाने टाळतो. त्यामुळे तुमच्या मतावर माझे काहीही मत नाही.

मुक्त विहारि's picture

12 Mar 2021 - 7:19 am | मुक्त विहारि

इदी अमीन, परवेझ मुशर्रफ आदी व्यक्तींनी पण भारताचे पंतप्रधान व्हायला, तुमची हरकत नसावी.....

बाय द वे,

उत्तर कोरियाचा, राष्ट्राध्यक्ष जर ह्याच न्यायाने, उद्या भारताचा पंतप्रधान झाला तर?

दुसऱ्या देशाचा नागरिक जर निवडणूक लढवून पंतप्रधान झाला स्वातंत्र्य सुद्धा धोक्यात आणेल , असं चुकूनही ह्यांच्या ध्यानी मनी नसेल ,
ह्यांच्या आपलेच खपत नाहीत बाहेरच कशाला पाहिजेत , छातीवर (उरावर) बसवायला !!

बापूसाहेब's picture

13 Mar 2021 - 12:04 pm | बापूसाहेब

त्यांच असं आहे.. कि गाढव पण चालेल. कुत्रा पण चालेल.. भले आपल्या देशातले नसले तर परदेशातून आणू.. पण पंतप्रधानपदी मोदी नको. bjp नको..

फक्त एवढा एकच अजेंडा घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद खरडत बसायचे..

नावातकायआहे's picture

13 Mar 2021 - 4:19 pm | नावातकायआहे

मोदीळ झाली आहे बापूसाहेब. ह्या रोगाला औषध नाही!

सुक्या's picture

13 Mar 2021 - 10:04 pm | सुक्या

"मोदीळ होणे" हा वाक्प्रचार मराठी भाषेला बहाल केल्याबद्दल "नावातकायआहे" यांचे जाहीर अभिनंदन.

सुबोध खरे's picture

13 Mar 2021 - 12:35 pm | सुबोध खरे

As per citizenship law in India, Any foreigner becoming a citizen of India will be subject to conditions, which conditions are Indian becoming a citizen in their country. Which means the conditions an Indian has to face in becoming a citizen of Italy will be applied to an Italian person in becoming a citizen of India. ( This is amended now but this is unconstitutional I guess again Swamy is working on it)

In Italy, You cannot be PM if you are not born in Italy. The same condition will apply to Italy person in India and hence Sonia Gandhi can’t become PM in India.

आणि

२००४ मध्ये श्रीमती सोनिया गांधी यांनी भारतीय नागरिकत्व घेतलं असलं तर ईटालियन नागरिकत्व सोडलेलं नव्हतं. हे बेकायदेशीर आहे ( कारण तेंव्हाच्या भारतीय कायद्याप्रमाणे तुम्हाला दुसऱ्या देशाचे नागरिकत्व सोडावे लागत असे)

या कारणास्तव श्री स्वामी यांच्या पत्राप्रमाणे श्रीमती सोनिया गांधी याना पंतप्रधान होणे अशक्य होते.

बाकी तुम्ही वाटेल त्या थापा मारता हे मी अनेक वेळेस दाखवलेले आहेच.

तो पर्यंत कोणत्या ही पक्षाचे सरकार येवू ध्या ते जनतेचे भले कधीच करणार नाहीत.
सेने नी सत्तेत न येता संघटना म्हणून जरी काम केले असते तरी त्यांची किंमत खूप वाढली असती.
तेच अरविंद केजरीवाल विषयी पण म्हणता येईल.
लोक संघटित होवून स्वतःच्या हक्क विषयी जागरूक होत नाहीत तो पर्यंत कोणत्याच पक्षाचे सरकार आले तरी परिस्थिती बदलणार नाही..
अगदी रहिवासी सोसायटी लेव्हल तरी संघटना करून बघा.
एक पण काम अडणार नाही.

सुबोध खरे's picture

13 Mar 2021 - 7:02 pm | सुबोध खरे

अगदी रहिवासी सोसायटी लेव्हल तरी संघटना करून बघा.

तुम्ही केली आहे का?

सध्या हौसिंग सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर येण्यासाठी चार लोक तयार नसतात

आणि तुम्ही इथे नसलेल्या गाजराचा हलवा विकताय?

आमच्या पहाण्यात एकच सक्षम समाज संघटना आहे. दुसरी कुठलीच नाही!
एकवार स्वतः, प्रत्यक्ष अनुभव घ्या असे सुचवेन.

श्रीगुरुजी's picture

13 Mar 2021 - 11:15 pm | श्रीगुरुजी

+ ९९९९९९९९९९९९ . . .

कपिलमुनी's picture

14 Mar 2021 - 5:19 am | कपिलमुनी

सदर संघटनेचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचा वाटा आहे.

सरसंचालकांनी हातात दांडी घेऊन काढलेल्या यात्रेला 75 वर्षे झाली म्हणून चड्डी घालून हातात दांडी घेऊन दांडी यात्रा काढणार आहेत

आपला दावा एखाद्या फुटकळ पक्ष प्रवक्त्यासारखा वाटतो.

स्वातंत्र्य लढा हा इथे मुद्दा नसून सामाजिक, सेवाकार्य करण्याबाबत आहे. त्या बाबतील संघा इतकी चांगली संघटना माझ्या माहितीत दुसरी नाही. शेकडो संस्था उगाच उभ्या राहत नाहीत. अनेक लोक तिसऱ्या पिढीत निःस्वार्थ पणे काम करत आहेत. मी स्वतः किमान तीन संस्थांच्या सेवा कार्यात काम केले आहे. मला काही हजार रुपयांची मदत करावीशी वाटली तर ती परिवारातील संस्थेला देऊन टाकू शकतो कारण ती तिथे पोहोचणार, योग्य वापर होणार याची खात्री असते.

आपला काही संघ कार्यकर्त्यावर राग असू शकतो. माझाही आहे. म्हणून संघटनेचे महत्त्व कमी होत नाही. आजही द्वेष करण्या ऐवजी एक क्षेत्र निवडून अल्पकाळ तिथे सहभाग द्याल तर वेगळेपणा सहज जाणवेल. संघ म्हणजे समर्पण. आपल्याला काही मिळावे म्हणून कुणी काम करत नाही. देशासाठी काहीं करावेसे वाटले तर ही कामे चालतात आणि आपल्याला पटतात त्यात मदत करावी. तर असो.

आपली एकदा प्रत्यक्ष भेट झाली असल्याने हे सगळं लिहीत आहे. बाकी वाद वगैरे घालण्यात मला रस नाही! :))

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2021 - 8:17 am | श्रीगुरुजी

प्रतिसाद संपादित.
सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल.
-मिपा व्यवस्थापन

कपिलमुनी's picture

14 Mar 2021 - 5:32 pm | कपिलमुनी

प्रतिसाद संपादित.
सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल.
-मिपा व्यवस्थापन

श्रीगुरुजी's picture

14 Mar 2021 - 6:58 pm | श्रीगुरुजी

प्रतिसाद संपादित.
सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल.
-मिपा व्यवस्थापन

कपिलमुनी,

इथे स्वातंत्र्यलढा कुठनं मध्येच उपटला? बरं, आलाय तर येऊ द्या. त्यांत रास्वसंघाचं योगदान काय असं तुम्ही विचारताय. पण मग भारताच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचं तरी कुठे काही योगदान होतं? इंग्रज गेले ते आझाद हिंद सेनेच्या उठावामुळे.

आ.न.,
-गा.पै.

बापूसाहेब's picture

16 Mar 2021 - 12:43 am | बापूसाहेब

गा पै.
सहमत. पण स्वातंत्र्य हे चरखा फिरवून आणि एका कुटुंबातील व्यक्तींमुळे मिळाले हे धांदात खोटे आयुष्यभर खरं समजणाऱ्या भारतातील सुशिक्षित अडाणी लोकांना कधी समजणार देव जाणे..

त्या लेंग्यांचा साहेबाच्या पॅन्टवर काहीही परिणाम झाला नाही...

हिटलरने साहेबाच्या तीन पिढ्यांची हानी केली, साहेबाला आपले घर सांभाळायचे होते, म्हणून साहेबाने फाळणी करून, तडजोड केली...

आझाद हिंद सेनेमुळे, नेहरूंचा पंतप्रधान होण्याची शक्यता दिसायला लागली आणि सरदार पटेल यांना, महात्मा गांधी यांनी सांभाळले आणि नेहरू घराणे पंतप्रधान पद उपभोगू लागले...

आता अडाणी जनतेला, घराणेशाही नको आहे...

रंगीला रतन's picture

16 Mar 2021 - 9:53 am | रंगीला रतन

त्या लेंग्यांचा साहेबाच्या पॅन्टवर काहीही परिणाम झाला नाही...
असहमत. इथे राहिलो तर पॅन्ट शर्ट उतरवून खादीचा सदरा लेंगा घालावा लागणार. मग मड्डम जवळ नाय घेणार. या भीतीने साहेब गेला. हिटलरनी सायबाला चड्डी पण घालायची औकात ठेवली नस्ती ही अंधश्रद्धा आहे :-)

आता सामान्य माणसे देखील खादी वापरत नाहीत...खादीचा उपयोग फक्त मते मागण्यासाठी...

अमेरिका आणि रशियाने मदत केली नसती तर, साहेबाला कधीच पळावे लागले असते....

रंगीला रतन's picture

16 Mar 2021 - 11:01 am | रंगीला रतन

अमेरिका आणि रशियाने मदत केली नसती तर, साहेबाला कधीच पळावे लागले असते....
बरोबर. पण मला वाटते जपाननी काशी घातली नसती तर साहेबाला अजून लवकर पळावे लागले असते.

सुरिया's picture

16 Mar 2021 - 11:18 am | सुरिया

सिराजौद्दौल्या आणि साहेबाबाबत असेच काहीतरी मत होते म्हणे. असे असते तर किंवा तसे नसते तर टाईप.

Rajesh188's picture

16 Mar 2021 - 11:10 am | Rajesh188

फक्त ह्याच कारणांमुळे भारताला स्वतंत्र मिळाले.
मग तात्या टोपे
भगतसिंग.
राजगुरू
लोकमान्य
मौलाना आझाद.
सुभाषचंद्र बोस
क्रांतिसिंह नाना पाटील आणि अशी अनंत लोक ज्यांनी प्राणाचे दान दिले ते कशासाठी .
असेच त्यांना जास्त मस्ती होती म्हणून की काय