चालू घडामोडी - मार्च २०२१

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
1 Mar 2021 - 11:41 am
गाभा: 

आज मार्च महिना सुरू झाल्याने या महिन्यातील घडामोडींसाठी नवा धागा काढत आहे.

आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. हे लिहिताक्षणी राज्यपालांचे अभिभाषण सुरू आहे.

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Mar 2021 - 11:36 am | चंद्रसूर्यकुमार

'शेतक-यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे'

बाकी काही नाही तरी रामदास आठवलेंना जोरदार कॉम्पिटिशन येणार.

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2021 - 3:21 pm | श्रीगुरुजी

शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि
चीन दिसला की पळे
बघून माझे चाळे
ती बघा छोटी बाळे

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Mar 2021 - 3:40 pm | चंद्रसूर्यकुमार

हहपुवा

सुक्या's picture

4 Mar 2021 - 11:53 am | सुक्या

खरंय . . .
असली टिनपाट वाक्ये गल्लीतल्या सभेत जास्त चालतात .. त्यात डोक्याचा भाग नसतो.
एखाद्या राज्याच्या मुख्यमंतत्र्यांकडुन असली अपेक्षा नसते ..

पण सांगणार कुणाला आनी ऐकणार कोण?

बाकी अजुन ते "साधे आणी कौटुंबीक बोलणे" आणी "कुटुंबवत्सल मुख्यमंत्री" हे काय आहे ते मला तरी अजुन समजले नाही ...
उगा आपले "काय ते तेज .. आहे चेहेर्‍यावर" टाइप ची मख्खनबाजी आहे ही.

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2021 - 12:18 pm | श्रीगुरुजी

महामुर्खासारखे बरळणे आणि फुसक्या बढाया मारून आपली लाल करीत राहणे यालाच जगप्रसिध्द ठाकरी भाषेत "साधे आणि कौटुंबिक बोलणे" म्हणतात.

त्यात डोक्याचा भाग नसतो.
एखाद्या राज्याच्या मुख्यमंतत्र्यांकडुन असली अपेक्षा नसते ..

शिवसेना व डोक्याचा भाग यांचा दुरूनही संबंध नाही. मुळात असल्यांकडून फक्त बरळवाक्यांचीच अपेक्षा आहे.

महामुर्खासारखे बरळणे आणि फुसक्या बढाया मारून आपली लाल करीत राहणे यालाच जगप्रसिध्द ठाकरी भाषेत "साधे आणि कौटुंबिक बोलणे" म्हणतात.
महाराष्ट्राच्या इतिहासात इतक अव्यवस्थित बोलणारे हे पहिलेच मुख्यमंत्री असावेत. सत्तेत आल्या पासुन जिलबी सारखे गोल गोल बोलणे,यमकांची जुळणी करत हास्यास्पद वाक्ये बोलणे, रोज नव नव्या चौकशी समित्या नेमत राहणे, मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी महत्वाच्या प्रकल्पांना खोडा घालणे हे उध्योग चाललेले आहेत. बीजेपी ने शिवसेना मुक्त मुंबई हे अभियान जोरात राबवण्याची गरज आहे.


४ ओळी :-

इथुन आला कावळा
तिथुन आला कावळा
मुंबईत टनल खोदतो
मेड इन चायना मावळा

जाता जाता :- मी मर्द आहे, मी मर्द आहे, मी मर्द आहे. हे खर्‍या मर्दाला टाहो फोडुन सांगावे लागत नाही, तुमच्या कृतीतुनच तुमची "खरी" मर्दांनगी दिसतेच !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aap Ki Nazron Ne Samjha | Sanam

सॅगी's picture

4 Mar 2021 - 11:54 am | सॅगी

शिवसेना आणि ज्ञान यांच्यात जरा तरी कनेक्शन असते तर रडत राऊतांसारखे कंपाऊंडर महाभाग सं"पादक" पदावर दिसले नसते.

सहमत आहे.

बियर बार आणि हाॅटेल्स चालू करून, शिवसेनेने आपला इंटरेस्ट व्यक्त केला आहेच...

शिवसेनेने बंगालमध्ये विधानसभा निवडणुक न लढवता ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा द्यायची घोषणा केली आहे. बाकी काही नाही तरी निवडणुक आयोगाचे डिपॉझिटद्वारे मिळणारे हक्काचे उत्पन्न बुडविण्यापलीकडे शिवसेनेच्या या तथाकथित खेळीला विशेष अर्थ नाही. तरीही महाराष्ट्र टाईम्सने बातमी कशी दिली आहे बघा. माध्यमे कशी विकली गेली आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे.

Sena

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-will-not-...

मुक्त विहारि's picture

4 Mar 2021 - 4:03 pm | मुक्त विहारि

मटा, लोकसत्ता, लोकमत, सकाळ, हे चहा बिस्किट खातांनाच वाचून होतात....

आनन्दा's picture

4 Mar 2021 - 5:23 pm | आनन्दा

अवांतर,

हे ममताने करून घेतलेले असू शकते.
बिहारमध्ये काय झाले ते विसरलात का? मांझीच्या पक्षाने नितीशकुमारचा मांजा जवळजवळ कापलाच होता...

शिवसेनेला माघार घ्यायला येऊन ममताने एक प्रकारे तिच्यावर आलेल्या दडपणाची कबुली दिली आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Mar 2021 - 5:44 pm | चंद्रसूर्यकुमार

मांझी स्वतः १९९० पासून आमदार म्हणून निवडून येत होते आणि थोडीशी का होईना मते फिरवायची ताकद त्यांच्यात होती. शिवसेनेने १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात एक आमदार निवडून आणला होता (अर्थात तो पवनकुमार पांडे हा आमदार हा स्वतःच्या ताकदीवर निवडून आला होता. त्याचे शिवसेनेशी तसे काही देणेघेणे नव्हते. नंतर तो सपा, बसपा वगैरे सगळ्या पक्षांत फिरून आला) त्याव्यतिरिक्त शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर एक आमदार कधी निवडून आणलेला नाही. आमदार तर सोडाच बेळगाव जिल्हा परिषदेवर किंवा बेळगाव जिल्ह्यातील पंचायत समितीवर किंवा गोव्यात मराठी भागातून तरी एखादा सदस्य त्यांनी निवडून आणला आहे का? मग थेट बंगालमध्ये शिवसेनेचा काडीमात्र फरक पडणार आहे का?

मला असे म्हणयाचेच नाही, पण शिवसेनेच्या 200/300 मताची किंमत कळायला लागलेय म्हणजे बंगालची निवडणूक खूप close चालली आहे असे दिसते.

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2021 - 1:07 pm | श्रीगुरुजी

शिवसेनेला सर्व २९४ मतदारसंघात एकत्रित २००-३०० मते तरी मिळतील का?

सांगता येत नाही. मध्यप्रदेशात त्यांनी हा प्रकार करून काही जागांवर नोटा च्या बरोबरीनं मतं खल्ली होतीत. [सेनेला बिहारमधील सहभागाबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत असे राऊत बोललेले आठवतात. अर्थात् त्यांना किती सिरियसली घ्यायचे ते वेगळे]
त्यामुळे या खेळीला थोडासा तरी अर्थ आहेच, नाकारता येत नाही. काही जागांवर थोडी जरी मतं खाल्लीत तरी त्यांचं काम होण्यासारखं आहे.
आणि डिपॉझीट जाणे हे त्यामानानं अतिशय क्षुल्लक आहे. ममता स्वतः देखील तेवढे फंडींग सेनेला देईल. सेनेला महाराष्ट्राबाहेर आणखी थोडंसं फूटेज मिळेल आणि भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याचा गवगवा होईल.
गमावण्यासारखे काहीच नसतांना हे करणे म्हणजे निव्वळ राजकारण आणि रणनीती आहे. त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. फायदा कोणाचा किती होईल तो भाग निराळा.

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2021 - 1:53 pm | श्रीगुरुजी

सेना भाजपची २००-३०० मते खाणार असेल तर ममता सेनेला माघार घ्यायला का सांगेल? उलट उमेदवार उभे करण्यासाठी सेनेला प्रोत्साहन देईल. सेना महाराष्ट्राबाहेर शून्य आहे व हे सर्व पक्ष ओळखून आहेत. त्यामुळे ममताने सेनेकडे संपूर्ण दुर्लक्ष केले असणार. ममतासाठी आपण स्वतः माघार घेतली असे सेनावाले स्वत:च सांगून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेताहेत. उद्या ते हे सुद्धा सांगतील की बायडेनची मते कमी होऊ नये यासाठी उद्धवने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.

सर्व तुमचे मनाचे खेळ आहेत.महाराष्ट्र बाहेर सेनेला जास्त लोकांचा पाठिंबा नाही हे सर्वांना माहीत आहे.पण नैतिक पाठिंबा महत्वाचा असतो.
केरळ किंवा बाकी अनेक राज्यात bjp ल तरि कुठे लोकांचा पाठिंबा आहे.

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 2:18 pm | मुक्त विहारि

आमच्या ओळखीत एक जण आहेत, ते मांसाहार करता करता, नैतिक उपवास करतात.... मनांतून उपवास असला म्हणजे झालं, मग काहीही खाल्ले तरी चालते....

आनन्दा's picture

5 Mar 2021 - 2:18 pm | आनन्दा

हा हा.. तीच तर गोची आहे..
सेनेने हिंदुत्व सोडलं हे एव्हाना बंगालात पण कळलेले असल्याची पावती आहे ही

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2021 - 2:22 pm | श्रीगुरुजी

हिंदुत्व सोडायला ते आधी सेनेने धरलं होतं कधी?

आता ते कातडे घरंगळून पडलेले आहे...

.... उद्धवने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली....

स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची....

चंद्रसूर्यकुमार's picture

5 Mar 2021 - 2:03 pm | चंद्रसूर्यकुमार

सांगता येत नाही. मध्यप्रदेशात त्यांनी हा प्रकार करून काही जागांवर नोटा च्या बरोबरीनं मतं खल्ली होतीत.

मतदारसंघात अशी थोडीफार मते घेणारे स्थानिक उमेदवार सगळीकडे असतात. असे उमेदवार निवडून येणार नाही याची खात्री असेल तरी निवडणुक लढवतात. अशा उमेदवारांचे कोणत्याही पक्षाशी घेणेदेणे नसते. असे उमेदवार मिळेल त्या पक्षाची उमेदवारी घेतात. त्याचे कारण समजा शिवसेनेची उमेदवारी मिळाली तर गावागावात फिरायला, घरोघर जाऊन प्रचार करायला किंवा इतर निवडणुकविषयक कामे करायला मुंबईहून थोडीफार कार्यकर्त्यांची मदत होऊ शकते. समजा शिवसेनेने निवडणुक लढवली नाही तर हे उमेदवार आप/बसपा/रिपब्लिकन पक्ष वगैरे कोणत्याही पक्षाकडून निवडणुक लढवतात. त्यांना जी काही थोडीथोडकी मते मिळतात ती स्वतःच्या नावावर असतात. शिवसेना किंवा इतर ज्या पक्षाचे उमेदवार ते असतात त्या पक्षाचा त्या मतांमध्ये फारसा वाटा नसतो. उध्दव ठाकरेंच्या नावावर बंगालमध्ये मते देणारे शंभर-दोनशे मतदार जरी मिळाले तरी खूप झाले. कलकत्त्यात राहणार्‍या काही मराठी लोकांपैकी थोडीफार मते मिळू शकतील पण अर्थातच ती निकालात कोणताही फरक घडवून आणण्याइतकी नसतील.

चंद्रसूर्यकुमार's picture

5 Mar 2021 - 2:45 pm | चंद्रसूर्यकुमार

सेनेला बिहारमधील सहभागाबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत असे राऊत बोललेले आठवतात. अर्थात् त्यांना किती सिरियसली घ्यायचे ते वेगळे

संजय राऊत.. बस नामही काफी है.

शिवसेनेला बिहारमध्ये जी काही थोडीफार मते २०१५ मध्ये मिळाली होती त्यात स्थानिक पातळीवर थोडीफार मते खाणार्‍या उमेदवारांना उभे करण्याबरोबरच आणखी एक घटक जबाबदार आहे असे वाटते. आणि तो घटक म्हणजे निवडणुक चिन्ह. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण तर नितीशकुमारांच्या जनता दल संयुक्तचे चिन्ह नुसता बाण. त्यामुळे अन्यथा जी मते जनता दल संयुक्तला गेली असती त्यातील निदान काही तरी २०१५ मध्ये शिवसेनेला गेली असणार याची शक्यता मोठी. किंबहुना म्हणूनच नितीशकुमारांनी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह देऊ नये असा आग्रह निवडणुक आयोगाकडे २०२० च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी धरला होता. त्यामुळे शिवसेनेला बिस्किट की कपबशी असे काहीतरी चिन्ह बिहारमध्ये दिले गेले होते.

फरक स्पष्ट आहे- २०१५ मध्ये शिवसेनेने बिहारमध्ये ७३ जागा लढवल्या. त्यापैकी १३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर होते. या ७३ उमेदवारांना मिळून २.११.१३१ मते मिळाली होती. तर २०२० मध्ये शिवसेनेने २२ जागा लढवून २०,१९५ मते घेतली. समजा २०१५ मध्ये १३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर असतील तर त्या जागांवर तरी टक्कर देण्याइतकी कामगिरी व्हायला हवी होती ना?ही मते शिवसेनेला आपल्या बळावर मिळाली असती तर निदान उमेदवारच नाही अशी परिस्थिती यायला नको होती. ते का झाले?

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2021 - 5:48 pm | श्रीगुरुजी

शिवसेनेच्या एकूण जनाधाराबद्दल दस्तुरखुद्द शिवसेनेच्या आणि भाजपच्याच अवास्तव कल्पना आहेत. शिवसेनेचा जनाधार प्रचंड मोठा आहे यावर फक्त शिवसेना व भाजपचाच ठाम विश्वास आहे. परंतु भारतातील इतर सर्व पक्षांना शिवसेना किती नगण्य आहे याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे ममता असलं काही करण्यात वेळ वाया घालविण्याची सुतराम शक्यता नाही.

रात्रीचे चांदणे's picture

4 Mar 2021 - 6:22 pm | रात्रीचे चांदणे

जेवढी MIM वाढत जाईल तेव्हढे नुकसान धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करणाऱ्या पक्षाचे होत जाईल. MIM वाढणे म्हणजे BJP चा एकप्रकारे फायदाच आहे.

मुक्त विहारि's picture

4 Mar 2021 - 7:47 pm | मुक्त विहारि

हिंदू कधीच एक होऊ शकत नाहीत ....

सिकंदराच्या वेळीस, पोरस एकटाच लढला ....

आणि

राणा प्रतापच्या वेळी पण असेच झाले....
--------------

ठाकरे, पवार, चव्हाण, फडणवीस भांडत बसले आहेत आणि MIM हातपाय पसरत आहे....

हीच परिस्थिति, हिटलरच्या काळांत ज्यू लोकांची होती... संदर्भ "विशेष पर्व" हे पुस्तक .....

हिंदू स्वतःचे रक्षण करू शकतात कोणत्याच राजकीय पक्षाची त्याला गरज नाही.

शाम भागवत's picture

4 Mar 2021 - 9:15 pm | शाम भागवत

एकदम बरोबर.
एमआयएमला मतं म्हणजे
राष्ट्रवादी, कॉंग्रेस, समाजवादी,ममता,बसप यांची मतदान टक्केवारी कमी होते.

शाम भागवत's picture

4 Mar 2021 - 9:16 pm | शाम भागवत

हा प्रतिसाद रात्रीचे चांदणे यांचेसाठी आहे. ध्रुविकरणाचा फायदा भाजपाला नेहमीच होतो.

https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-budget-session-bjp...

आज, छत्रपती शिवाजी महाराज हवे होते....

समजा मी सातारा जिल्ह्यात राहतो .त्या जिल्हा चे प्रतिनिधित्व विधानसभा मध्ये A आमदार करतो आहे लोकसभेत B खासदार करत आहेत.
जिल्ह्यातील सर्व समस्या.
मग त्या मध्ये.
शेती चा पाणी पुरवठा ,वीज ची समस्या,गावागावात रस्ते,लोकांना नसणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर नियंत्रण एकूणच जिल्ह्यातील सर्व समस्या त्यांना माहिती आहेत.
ते दोघे पण लोकांच्या नेहमी संपर्कात आहेत.
अगदी किरकोळ समस्या पण ते सोडवत आहेत .
तर ते कोणत्या ही पक्षात असू ध्या लोकांनी त्यांना निवडून दिलेच पाहिजे.
जेव्हा लोक पक्ष न बघता चांगली कर्तबगार लोक निवडून देतील तेव्हाच ह्या देशाचे भाग्य उजळेल जाईल.
एक कोण तरी मोदी,किंवा राहुल,किंवा ठाकरे साठी गाढव पण लोक निवडून देत आहेत तो पर्यंत भारताची लोकशाही अपरिपक्व आहे असेच म्हणावे लागेल.
देशात ना हिंदू धोक्यात आहेत ना मुस्लिम धोक्यात आहे सामान्य जनता.

राहण्यास उत्तम अशा देशातील पहिल्या दहा शहरात योगी च्या यूपी मधील एक पण शहर नाही(असे असते का राम राज्य)
उत्तम मुंसिपल कॉर्पोरेशन मध्ये योगी च्या यूपी मधील एक पण महानगर पालिका नाही.
(असे होते का रामराज्य मध्ये)
पण इथे विरोधी मता नुसार रावण राज्य असलेल्या महाराष्ट्र मधील पुणे नंबर २ वर आहे राहण्यास उत्तम शहर च्या क्रमवारीत.
मुंबई,पिंपरी चिंचवड पण आहे.
रावण राज्यात च लोक चांगले जीवन जगत आहेत.

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 12:31 pm | मुक्त विहारि

https://www.loksatta.com/maharashtra-news/income-tax-department-it-raid-...

आयकर चुकवला असेल तर शिक्षा व्हायलाच हवी.

सुक्या's picture

5 Mar 2021 - 12:38 pm | सुक्या

त्याचं काय आहे मुवि,
"नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे" असे ह्या लोकांचे आहे. गुन्हेगार कुणीही असो .. बोंब भाजप / मोदी यांच्या नावानेच झाली पाहिजे ..
चालायचेच ... नवीन नवीन बुरखा पांघरलेला आहे मोदीविरोधाचा. निवडणुकीत त्यांच्याच नावाने जोगवा मागीतला होता हे विसरले ते आता ...

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 1:28 pm | मुक्त विहारि

मते मागतांना भुमिका वेगळी होती आता बदलली

डोळ्या वरची पट्टी काढा.केंद्र सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे अनेक लोक बे रोजगार झाले आहेत. डाळी पासून ,खाद्य तेल,पेट्रोल ,डिझेल चे भाव गगनाला भिडले आहेत.
हॉटेल किंवा सर्वच व्यवसाय बंद केले तर लोक जगणार कशी.
Bjp चे पाठी राखेच अक्कलेचे तारे तोडून bjp ची वाट लावणार आहेत.
बाकी कोणालाच ते कष्ट घेण्याची गरज पडणार नाही.
हिंदू धोक्यात हे पण चालणार नाही.
कारण केंद्र सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे हिंदू कोणामुळे धोक्यात आला आहे हे स्पष्ट झाले आहे.

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 2:08 pm | मुक्त विहारि

थोडक्यात मुख्यमंत्री जे म्हणाले होते ते तुम्हाला पटलेले दिसत आहे ....

करोना आपल्या कडे यायच्या आत, आपण करोनाकडे पोहोचले पाहिजे.....

Rajesh188's picture

5 Mar 2021 - 2:19 pm | Rajesh188

पूर्णतः लॉक डाऊन न करता बेसिक काळजी घेवून corona पासून स्वतः चा बचाव करता येतो.संपूर्ण लॉक डाऊन corona पेक्षा जास्त धोकादायक आहे.
असे पण मृत्यू दर अतिशय कमी आहे .
पण मला शंका आहे
जसे लॉक down मध्ये महत्वाचे कायदे केंद्र सरकार नी गुपचूप पास करून घेतले तसा मोठा
आर्थिक घोटाळा ह्या काळात झाला असला पाहिजे.
बुडीत कर्ज ह्या काळात प्रचंड वाढली असणार.
देश सोडून पसार होणाऱ्या लोकांची संख्या भविष्यात वाढणार आहे.
निरव,मल्ल्या ह्यांना अनेक जोडीदार मिळतील.

मुक्त विहारि's picture

5 Mar 2021 - 2:48 pm | मुक्त विहारि

धुळे जिल्ह्यातील वाघ घोटाळा कधी झाला?

तेलगी घोटाळा कधी झाला?

निरव,मल्ल्या ह्यांना अनेक जोडीदार मिळतील.

हे मात्र नक्कीच होणार, इडीच्या धाडी पडायला लागल्या आहेतच...

आर्थिक घोटाळा ह्या काळात झाला असला पाहिजे.बुडीत कर्ज ह्या काळात प्रचंड वाढली असणार.

घाबरू नका, हे सरकार योग्य ती काळजी नक्कीच घेईल...आपण सर्वसामान्य माणसे, ही चिंता आपल्याला करायची गरज नाही... काठी पडली की चोर लोकं बोंबाबोंब करतीलच....

मला वेगळीच शंका येती आहे... खरं तर बऱ्याच शंका येताहेत.
पण आता पुढील भागाची वाट पाहूया..दोनशे व्हायला आले!
:))

https://maharashtratimes.com/entertainment/income-tax-raid-total-income-...

वर्षाला चार कोटी म्हणजे, महिन्याला 3 लाख, नविन गणित...

अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांचा मस्तवालपणा आता जरा कमी होइल वाटतं...

बाकी तापसीचं एक गाणं मात्र मला लयं आवडल व्हतं... :- Naughty Naughty Girl

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- Avatar

मुक्त विहारि's picture

8 Mar 2021 - 8:36 am | मुक्त विहारि

https://www.loksatta.com/mumbai-news/strict-restrictions-for-crowd-contr...

आणि कठोरपणे पाळायला हवेत...