टूलकिट (शतशब्दकथा)

खेडूत's picture
खेडूत in राजकारण
16 Feb 2021 - 1:38 pm

अगं.. माझं टूलकिट दिसत नाही, पाहिलंस कुठे?

अग्गोबई..तुम्ही पण तसल्या भानगडीत आहात का काय?
तरी सांगत असते राजकारण आणि कसले कसले ग्रूप तुमचे द्या सोडून..उद्या काही झालं तर आपल्या अंगाशी येईल. आणि मित्र कसले तुमचे? सगळ्यांना अॅडमिन ठेवतात मेले.

अगं पण ऐकून तर..!

काही बोलूच नका.
मी म्हणते कसलं पर्यावरण.. काय धाड भरली आहे पर्यावरणाला? इथे स्टेटस अन् फेसबुक पोस्ट करण्याने चीन थांबवणार प्रदूषण करायचा? उगा आपलं..

आपण बरे, आपले काम बरे.
काय सांगतेय? काय बघताय आ वासून!

झालं तुझ बोलून? आता ऐक.
मागच्या आठवड्यापासून बेल वाजत नाही दारावरची, ती दुरुस्त करण्यासाठी टूल्स पाहिजेत.

देवा.. नीट सांगायचं ना!

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Feb 2021 - 2:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

भारी गोष्ट आहे, आमच्या पण एका कायप्पा समुहात सगळेच लोक्स अ‍ॅडमिन आहेत
पैजारबुवा,

Nitin Palkar's picture

16 Feb 2021 - 7:29 pm | Nitin Palkar

'अ‍ॅडमिनवर कारवाई करण्यात येईल' हा एक बागुलबुवा कोणीतरी सुरु केला.... आणि नंतर मग हे होऊ लागले. ज्या समूहांमध्ये अवचीन, वात्रट आणि खोड्याळ लोक्स आहेत तिथे ही खबरदारी (?) घेतली जात असावी.

मुक्त विहारि's picture

16 Feb 2021 - 10:26 pm | मुक्त विहारि

आवडले

चौथा कोनाडा's picture

17 Feb 2021 - 1:20 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी !
टुलकिट वापरून चकवा दिला राव खेडूत तुम्ही !