भाजप शिवाय, इतर पक्षांकडे, राष्ट्रीय पातळीवर नेते आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
27 Jan 2021 - 4:15 pm
गाभा: 

आजच्या घडीला तरी, राष्ट्रीय पातळीवर, भाजपला पर्याय नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे.

राष्ट्रीय पातळीवर, भाजपमध्ये घराणेशाही नाही. हा एक महत्वाचा भाग आहे.

आज, भाजपची चौथी फळी पण तयार होत आहे. त्यामुळे, मोदींच्या नंतर कोण? हा प्रश्र्न, भाजपच्या पुढे नाही.

अमित शहा, योगी, तेजस्वी सुर्या, इथपर्यंत पंतप्रधान पदासाठी, भाजपचे उमेदवार तयार आहेत.

लोकसभेतील, ह्या वरील व्यक्तींची भाषणे ऐकलीत तर, प्रचिती नक्कीच येईल.

माझ्या मते, इतर पक्षांकडे इतके सक्षम उमेदवार नाहीत.

तुमच्या मते, पुढील निवडणूकीत, इतर पक्षांकडे पंतप्रधान पदासाठी, मोदींच्या इतका सक्षम नेता आहे का?

प्रतिक्रिया

सरकार मधिलच बाकी मंत्र्यांना पण प्रसिध्दी दिली जात नाही > खुद्द मोदींनी पण इतकी प्रसिद्धी मिळवली नाही की बापजाद्यांची नावे भारतातील रस्त्याला द्यावीत ,
बाकी मंत्र्यांना सुद्धा स्वतः च्या विचाराने निर्णय घेण्याचे स्वतंत्र नसावे अशी शंका येतेय. >> काँग्रेस पेक्षा बरे आहे आजून किमान नेता तरी निवडता येतो.

हा मंत्री लायकीचा नाही तो मंत्री लायकीचा नाही असे >>मोहनदास करमचंद नेहरूंची जी तीन माकडे आहेत ती राहुल गांधी कडे इशारा करतात हसू आलेले दाबण्यासाठी , पुढचा जोक ऐकूच येऊ नये म्हणून आणि एक्स्प्रेशन , अहाहा लाजवाब , ते पाहू नयेत म्हणून

एकाच वर्गात ४०वर्ष शिकणारा विद्यार्थी मोदींना काय शिकवणार?

"पंजाब ला पुन्हा अस्थिर करण्याचं पातक सरकारने करु नये"-शरद पवार.
पवारसाहेब आपला सल्ला सरकारने का मानावा?
कारण.....

पहिलं पातक आपल्याच काळात १९७६ ते १९८४ दरम्यान चाललं होतं ---
त्यावेळी आपण कोठे होता?
अतृप्त आत्मा जसा बेचैन होतो,तसं आपण १९७६-७८ ला बैचेन झाला होता.कोणालाही व्यवस्थितरीत्या राज्य करु दिले नाही.सरकार पाडले.तुम्ही तुमच्या कर्माने १९८० ला विरोधात बसलात.पक्ष फोडलात.सत्ता मिळवण्यासाठी सतत कुरापती काढत बसलात.सत्तेविना ६ वर्षाचा कालावधी तुम्हाला अनेक युगासारखा वाटला.नाईलाज झाला म्हणून समाजवादी कॉंग्रेस पक्ष १९८६ ला विसर्जित केलात व १९८८ला सत्ता मिळवलीत.

१९९४ च्या १३ नोव्हेंबरला १२५ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या गोवारी समाजाचा,इतर मागास जमाती मध्ये समावेश करण्यासाठी नागपूर विधानसभेवर निघालेल्या मोर्चात आंदोलन करणाऱ्या गोवारी समाजाच्या ११३ लोकांना पायदळी तुडवून तुडवून मारलेत.त्यामध्ये ७१महिला आणि २३ बालकांचा समावेश होता.हे कदाचित आपण विसरलात.

आज उलटे झाले आज येथे आंदोलकाकडूनच सरकारने मार खाल्ला.तुमच्या या कृतीचे फळ तुम्हाला मिळाले.महाराष्ट्रातील सत्ता तुम्ही घालवून बसलात.तुमचा अतृप्त आत्मा राष्ट्रीय कॉग्रेसकडे वळला.लोक म्हणतात आपणाला बदलत्या हवामानाचा अंदाज चांगला कळतो.वास्तव वेगळेच आहे.तुम्हाला चुकीच्या हवामानाचा अंदाज बरोबर कळतो.तुमची वृत्ती आत्मकेंद्रित आहे.हे तुम्ही तुमच्या कृतीतून सिद्ध केलेत.
पहिलीआत्मकेद्रित वृत्ती १९७८ ला केलीत.
स्वत:साठी संघटना(अर्स) कॉंग्रेसची स्थापना केलीत.आणि तुम्ही इयत्ता ४थी च्या वर्गात प्रवेश घेतलात.
शेरा: कॉपी करून पास झालेली पुलोद आघाडी.
दूसरी आत्मकेंद्रित वृत्ती - १९८०
स्वतः च्या वृत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी नापास झालात.पास विद्यार्थी फक्त ४७
शेरा-नापास झालेल्या वर्गात परत एकदा.

तिसरी आत्मकेंद्रित वृत्ती - १९८५
स्वतःच्या स्वार्थासाठी समाजवादी कॉग्रेस दावणीला बांधलीत.चौथीतील वरिष्ठ विद्यार्थी म्हणून तुमचा गौरव होत होता.खोट्या हवामानावर आरुढ होऊन जोमाने अभ्यास केलात तरीही एकूण पास विद्यार्थी फक्त ५४
शेरा:पुन्हा एकदा नापास.ई बी सी सवलत बंद करण्याची वेळ आली.
चौथी आत्मकेंद्रित वृत्ती-१९९०
समाजवादी पक्षाचं स्वतःचं घर गहाण ठेवलत.१४१ विद्यार्थ्यांच्या कुबड्या घेऊन
एटीकेटीत पास झालात.तरीही जनतेने
तुम्हाला इयत्ता ४थी मध्येच बसवले.
शेरा:ठरवून नापास होणारा हुशार विद्यार्थी

पाचवी आत्मकेंद्रित वृत्ती व कृती-१९९५
कॉपी करून पास होण्याच्या नादात गोवारी प्रकरण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रकरणामुळे तुम्हाला परत एकदा सपशेल नापास केले.राष्ट्रीय कॉग्रेस तुमच्या नादाला १९९५ लागली आणि फसली.
शेरा: वारंवार नापास विद्यार्थ्याला शाळेतून काढले.

सहावी आत्मकेंद्रित वृत्ती व कृती-१९९९
स्वतःची वृत्ती ला खतपाणी मिळण्यासाठी,अस्तित्वाच्या खोट्या लढाईत परदेशी नागरिकांचा मुद्दा उपस्थित करुन पुन्हा एकदा दुसऱ्या शाळेत इयत्ता ४ थी त आदरणीय महोदयांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नव्या नावाने प्रवेश मिळवला.व हवा बघून १९९९-२००४,२००५-२००९,याच कॉग्रेस कडे भीक मागून सत्ता मिळवलीत.
अलीकडचा महोदयांचा प्रवास सर्वानाच परिचयाचा झाला आहे.एवढे करूनही २०१९ पर्यंत एकाच वर्गात अभ्यास करणारा नेता फक्त ५४ विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षण घेत आहे.
शेरा:एकाच वर्गात राहणारा हा विद्यार्थी आत्मकेंद्रित वृत्ती मुळे पंतप्रधान होऊ शकला नाही.याला महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.मोदी सरकारने अजूनही शहाणपणाने वागावे,असा सल्ला देणाऱ्या या नेत्यांने स्वतः शहाणपणाने वागावे,असा त्यांच्या सल्लागारांनी त्यांना जरूर सल्ला द्यावा.

वरील इतिहास चुकीचा असेल तर, आनंदच होईल

राघव's picture

29 Jan 2021 - 12:23 pm | राघव

भारी.

शाम भागवत's picture

29 Jan 2021 - 4:29 pm | शाम भागवत

तुमचा अतृप्त आत्मा राष्ट्रीय कॉग्रेसकडे वळला.

अत्रुप्त आत्मा हाजीर यांनी ताबडतोब हाजीर व्हावे ही विनंती
😃

काळे मांजर's picture

10 Feb 2021 - 8:59 pm | काळे मांजर

कायच्या काय अपेक्षा ह्यांच्या

म्हणे 40 वर्ष एकाच वर्गात राहिले , पुढे नाही गेले , अडवाणी , मनेका गांधी , वरुण गांधी , महाजन , सुषमा स्वराज , जेटली सगळे पंतप्रधान झाले का ?

आता मलाही म्हणाल , तुम्ही कुठे पंतप्रधान झाले म्हणून .

सौंदाळा's picture

29 Jan 2021 - 1:24 pm | सौंदाळा

कोणत्याही पक्षाने ज्या नेत्याच्या नावावर मते मिळतील आणि ज्याला मजबूत जनाधार आहे या माणसालाच प्राधान्य दिले पाहिजे.
भाजपा ने ते २०१४ ला केले (सुषमा, अडवाणी यांच्या समर्थकांना शांत करून) त्याची फळे त्यांना मिळाली. मोदींचे काम बहुतांश लोकांच्या पसंतीस उतरले आणि २०१९ चा मोठा विजय भाजपाला मिळाला.
काँग्रेसने मात्र जयराम रमेश, पृथ्वीराज चव्हाण सारखे चांगले, वरीष्ठ नेते तसेच जोतिरादित्य शिंदे, राजेश पायलट सारखे तरुण तडफदार नेते स्वतंत्र विचार करू शकतात म्हणून दाबून ठेवले आणि सलमान खुर्शीद, सुरजेवला, कमलनाथ, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे यांचा उदोउदो केला त्याचे फळ त्यांना मिळाले.
आताही नवीन पटनाईक आहेत पण त्यांना ओरिसा पलीकडे सपोर्ट नाही. त्यांना अजूनही कोणी कॅम्पेनर भेटला आणि ब्रँड बिल्डिंग केलं तर ते मोदींना टक्कर देऊ शकतात. त्यांचीदेखील तेवढी इच्छाशक्ती पाहिजे. तीच गोष्ट केजरीवालची. त्यांना दिल्लीकरांचा मजबूत पाठींबा आहे पण पूर्वी केलेला वाचळवीरपणाने त्यांची इमेज खूपच खराब झाली आहे कदाचित त्यांना पण हे समजले असावे म्हणूनच हल्ली ते असली बाष्कळ विधाने, बेछूट आरोप करताना दिसत नाहीत.
काँग्रेसमध्ये गुलाम नबी, सिब्बल वगैरे तर आता मधेमधे उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांनी थोडी धमक दाखवून गांधींची घराणेशाही जुगारून नवीन नेतृत्व उभे केले तर काँग्रेससुध्दा चमकदार कामगिरी करू शकते. २०२४ ला अजून खूप वेळ आहे.
पण आता सारखेच चालू राहिले तर मोदी आणि भाजपाला मैदान मोकळे आहे.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 1:39 pm | मुक्त विहारि

आणि सुयोग्य प्रतिसाद

सुबोध खरे's picture

29 Jan 2021 - 2:26 pm | सुबोध खरे

ण पूर्वी केलेला वाचळवीरपणाने त्यांची इमेज खूपच खराब झाली आहे कदाचित त्यांना पण हे समजले असावे म्हणूनच हल्ली ते असली बाष्कळ विधाने, बेछूट आरोप करताना दिसत नाहीत.

नाही

श्री अरुण जेटली यांनी त्यांची पार ठासली होती आणि काही कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा जवळजवळ जिंकला होता. श्री. राम जेठमलानी यांनी त्यांना २१ लाख रुपयांचे बिल पाठवले होते तेंव्हा पण त्यांची तंतरली होती. .

यामुळे हवा टाईट होऊन त्यांनी बेताल बडबड बंद केली तरी त्यांचा मूळ स्वभाव काही जात नाही.

शेतकरी कायद्याच्या तीन पैकी एक विधेयक दिल्ली विधानसभेत पारित केले आणि आता तिन्ही विधेयके आम्हाला मान्य नाहीत आणि आम्ही आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देतो आहोत असली बाष्कळ आणि दुटप्पी भाषा त्यांनी चालू केली आहे.

अत्यंत बेभरवशाचा माणूस आहे

https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/delhi-government-notifies...

https://www.nationalheraldindia.com/national/kejriwal-terms-three-farmin...

"माणूस आहे" या शब्दांवर असहमत आहे.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 1:56 pm | मुक्त विहारि

पण, बेभरवशी पणा अंगात मुरलेला आहे, हा अवगूण आहे ...

काही बाळे गुणाची असतात, जसे राहुल गांधी

तर काही अवगुणी असतात, जसे केजरीवाल

राघव's picture

29 Jan 2021 - 3:01 pm | राघव

सध्याची काँग्रेस ही मुळात काँग्रेस आहेच कुठे?
इकॉ झाली तेव्हाच सगळी सूत्र गांधी घराण्याकडे गेली. सगळा पैसा आणि व्यवस्था ही त्यांच्याच ताब्यात आहे.
इकॉ मधून गांधीच बाहेर पडले असं होणं कसं शक्य आहे?
बाकीच्यांना बाहेर पडून नवीन पार्टी बनवावी लागेल, पण त्यासाठी लागणारा पैसा गांधींकडेच आहे.
आणि नवीन पार्टीला लोकाश्रय मिळून ती उभी होण्यासाठी केवढा वेळ लागतो ते आपण केजरीवालांच्या आप वरून समजू शकतो.
त्यामुळे ते अवघड जागेचे दुखणे आहे. न ईलाज सहन होतो न दुखणे सहन होते.

अर्थातच विषयाशी संबंधित नाही..
पण माननीय राहुल बाबा किती हुशार आणि अक्कलवान आहेत ते बरेच लोकं उघड उघड बोलून दाखवतात हे पाहून आश्चर्य वाटते. आणि कीव देखील येते की boot लिकिंन्ग करता करता ही मंडळी किती खालच्या थराला जातात.. एका बाळबोध, imature व्यक्तीला डोक्यावर बसवून नाचवतायेत..

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2021 - 3:38 pm | श्रीगुरुजी

ज्याप्रमाणे सध्या पंतप्रधानपदासाठी मोदींना पर्याय नाही, तद्वत कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी गांधी आडनावाच्या व्यक्तींना पर्याय नाही.

पर्याय म्हणून जी नावे सांगितली जातात (जयराम रमेश, पृथ्वीराज चव्हाण, मनमोहन, सचिन पायलट, अमरिंदर सिंह वगैरे) ते साधी ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणुक जिंकू शकत नाहीत किंवा आपल्या मतदारसंघाबाहेर त्यांना कोणी ओळखत नाही. कितीही अपरिपक्व, कॉमेडिअन, वाचाळ वगैरे असले तरी गांधी हेच भारतात कॉंग्रेसचे सर्वाधिक ओळखीचे नाव आहे.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 5:23 pm | मुक्त विहारि

काही माणसांना, गांधी हे आडनाव इतके प्रिय आहे की, प्रियांका वाड्रा पण, स्वतः "गांधी" हेच आडनाव वापरते...

Rajesh188's picture

29 Jan 2021 - 5:18 pm | Rajesh188

हे किती धोकादायक आहे ह्याची जाणीव तुम्हा लोकांना आहे का?
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सशक्त विरोधक असेलच पाहिजेत.
तर च सरकार डोकं जागेवर ठेवून काम करते .
नाही तर जनतेवर अन्याय ,अत्याचार करायला मागे पुढे पाहिले जात नाही.
मग परत लोकांना स्वतःच्या संसार वर निखारा ठेवून लढा द्यावा लागतो.
काँग्रेस असेल किंवा बाकी विरोधी पक्ष हे सशक्त च हवेत.
तसेच शेजारी राष्ट्र हे कधीच भुके,कंगाल गरीब असू नये.
तिथे बेबंदशाही maju नये.
नाही तर अशा कंगाल राष्ट्र च त्रास होतो. सुरक्षेला धोका निर्माण होतो.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2021 - 5:41 pm | मुक्त विहारि

पण, विरोधक बुद्धीवान हवा... विश्र्वासू हवा, घोटाळेबाज नको ...

विरोधक हवाच, म्हणून, अविश्वासू आणि घोटाळे करणारा, कसा काय चालेल?
........

शत्रू राष्ट्र, जितके अस्थिर तितके चांगले असते ...
......

विरोधी पक्ष, हे आपलेच असतात पण, शत्रू राष्ट्र हे शत्रूच असते ...
...

हे दोन परस्पर विरोधी आहेत

स्वलिखित's picture

30 Jan 2021 - 9:41 pm | स्वलिखित

गरिबांचे राहुल गांधी
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सशक्त विरोधक असेलच पाहिजेत.
तर च सरकार डोकं जागेवर ठेवून काम करते,

>>> एवढी मोठी सत्ता एकहाती दिली आहे म्हणल्यावर जनता तुम्ही म्हणता तसे भुके कंगाल मरेल असे कसे म्हणू शकता ,

निखारा वैगेरे शब्द हरीशचंद्र असल्यावर कि खिलजी आपणच ठरवा , अलबत हि दोन्ही नावे फक्त बाजू दाखवण्यासाठी घेतली आहेत , नावावरून राजकारणपण करू

भारताचा GDP 20 -21 ह्या आर्थिक वर्षात वजा 7 वर खाली गेला आहे.
आर्थिक सर्वे चा रिपोर्ट.
असा gdp minus मध्ये जाण्याचा भारताच्या इतिहासातील हा कितवा प्रसंग आहे ह्या वर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
की पहिल्यांदाच ही कामगिरी मोदी सरकार नी करून दाखवली आहे.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 9:55 am | मुक्त विहारि

ही आकडेवारी नक्कीच योग्य आहे ...

इतर काही देशांत भयावह परिस्थिति आहे ...

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 2:23 pm | आग्या१९९०

होना. कोरोनाच्या काळात बाकीचे उद्योग क्षेत्र मंदीत असताना फक्त कृषी क्षेत्रानेच जिडीपीला हातभार हातभार लावला आणि सरकारची लाज राखली. म्हणून तर आपण टाळ्या , थाळ्या आणि दिवे लावून आभार मानल्याचे पुसटसे आठवते. २६ जानेवारीला तर अश्रूधुराच्या तोफांनी त्यांना मानवंदना दिली.

सॅगी's picture

30 Jan 2021 - 2:39 pm | सॅगी

२६ जानेवारीला ट्रॅक्टरवाल्यांनी दिल्ली पोलीसांना मानवंदना तर दिलीच, शिवाय लाल किल्ल्यावर देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मानही केला असे पुसटसे आठवते. त्याची परतफेड सरकारने अश्रूधुराच्या तोफांनी केली...काय हे सरकार!!!

आग्या१९९०'s picture

30 Jan 2021 - 2:47 pm | आग्या१९९०

महिनाभरापासून आंदोलन खलिस्तानी करत आहेत हे माहीत होते तर मग लाल किल्ल्या पर्यंत जाईपर्यंत केंद्र सरकार झोपले होते का?

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 3:03 pm | मुक्त विहारि

बोलणी करायला तयार होते ...

तेव्हा किती वेळा ट्रॅक्टरबाजांनी पोलीसांच्या गाड्या फोडल्या? किती वेळा राष्ट्रध्वज खाली उतरवुन दुसरा झेंडा फडकवला?

शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर सरकारने काही अ‍ॅक्शन घेतली की लोकशाहीची हत्या झाली म्हणून बांगड्या फोडायला मोकळे...

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 3:15 pm | मुक्त विहारि

नेमकी 26 जानेवारी, हीच तारीख़ का निवडली असेल?

सॅगी's picture

30 Jan 2021 - 3:20 pm | सॅगी

शेतकरी आंदोलनाच्या आडून दुसराच अजेंडा राबवायला ही तारीख निवडली असेल.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 7:13 pm | मुक्त विहारि

पाकिस्तान जिंदाबाद आणि खलिस्तान जिंदाबाद, अशा घोषणा ज्या आंदोलनात होतात, ते आंदोलन शांतिपूर्ण वातावरण, कसे होऊ देणार?

सॅगी's picture

30 Jan 2021 - 8:12 pm | सॅगी

अशा आंदोलनांचा समाचार मग अश्रूधुराच्या तोफा डागुन आणि लाठीचार्ज करून घेतला जातो सरकारकडुन. आता काही विचारजंतांना त्यावरही आक्षेप असतो म्हणा...पण चालायचेच!!!

आंदोलकांनी सरकारी मालमत्तेचे (म्हणजेच पर्यायाने करदात्यांच्या/सार्वजनिक मालमत्तेचे) केलेले नुकसान दिसणार नाही. देशविरोधातल्या घोषणा दिलेल्या ऐकु येणार नाहीत..पण अशा आंदोलनांचा समाचार अश्रूधुराच्या तोफा डागुन आणि लाठीचार्ज करून घेतला की मग हे विचारजंत "लोकशाहीला काळीमा फासला" म्हणत बांगड्या फोडायला मोकळे...

सुबोध खरे's picture

30 Jan 2021 - 2:12 pm | सुबोध खरे

भारताच्या इतिहासात करोनाची महामारी किती वेळा आली याचं उत्तर आपण देणार का?

उत्तर मिळत नाही

आणि

मिळालेच तर, गोल गोल राणी ....

दिगोचि's picture

30 Jan 2021 - 5:29 am | दिगोचि

माझ्यामते कॉन्ग्रेसकडे पन्तप्रधानपदासाठी सक्षम पर्याय आहेत. उदा: जयराम रमेश, शशी थरूर, सचिन पायलट वगैरे. परन्तु राहुल गान्धी त्याना पुढे येऊ देत नाहीत. आपल्याशिवाय इतर कोणालाहि त्यान्चे राश्ट्रीय प्रोफाईल वाढवायला सन्धी द्यायची नाही असा डाव राहुल व सोनिया खेळतात त्यामुळे कॉन्ग्रेसमधून तरी मोदीना कोणी पर्याय असेल असे सध्या तरी दिसत नाही व पुढील अनेक वर्शे तरी येईल असे वाटत नाही. त्यामुळे निदान २०२९ पर्यन्त मोदीच पन्तप्रधान असतील असे मला वाटते.

दिगोचि's picture

31 Jan 2021 - 7:29 am | दिगोचि

भारताचा GDP 20 -21 ह्या आर्थिक वर्षात वजा 7 वर गेला आहे.>>>> कोरोनामुळे अनेक देशान्चे जीडीपी खाली गेले आहेत. परन्तु प्ढल्या वर्शी भारताचा जीडीपी ११.५ टक्क्यानी वाढेल असा अन्दाज आय एम एफ ने वर्तवला आहे. जगातल्या सर्व देशापेक्षा हे जास्त आहे.

काळे मांजर's picture

10 Feb 2021 - 8:19 pm | काळे मांजर

त्यांच्या जागी हे जाणार
मग ह्यांच्या जागी कोण ?

कुणी सापडले का ?

गम

मुक्त विहारि's picture

10 Feb 2021 - 8:27 pm | मुक्त विहारि

पण तुम्ही त्यांची चिंता करू नका ....

कारण, आज जरी तुम्हाला उत्तर मिळाले तरी, उद्या हाच प्रश्र्न घेऊन, तुम्ही दुसर्या अवतारात याल....

तुमचा तोच तोच मोदी द्वेष आणि भाजपद्वेष, परत परत वाचण्याइतपत मिपाकर सहनशील आहेत....

बाय द वे,

चंपाबाई सध्या काय करतात?

सचिन उद्दाम पोटे, यांच्या उचक्या थांबल्या का?

हितेशचा दमा कसा आहे?

जास्त दम लागला की, नथुगुगुळ वटी त्याला द्या ... कमळावर झोपवलेत तरी चालेल ... हाताचा काही भरवसा नाही ...

जागो मोहन प्यारे