तांडव

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
27 Jan 2021 - 6:20 am

तांडव

तांडव या वेब्सिरीज बद्दल धार्मिक भावना दुखावलंय वैगरे चर्चा चालू आहे ती जर बाजूल ठेवून त्या कलाकृतीचे एक परीक्षण...

भारतीय राजकारण मग ते गावची पअन्चयत असो किंवा देशाचे पंतप्रधानपद हा विषय घेतला तर जागतिक दर्जाच्या अनेक कलाकृती निर्माण होऊ शकतील एवढे नाट्य यात भरलेलं आहे .. मराठीत बोलायचे झाले तर सामना आणि सिहासन हे दोन चित्रपट आठवतात आणि थोड्या प्रमाणात सरकारनामा ( यशवंत दत्त , दिलीप प्रभावळकर )
हिंदी मध्ये एक नु दिली टाइम्स ( शशि कपूर , जणू अरुण शॊरी..) हा आठवतो , थोडासा आंधी पण तो राजकीय चित्रपट नाही ..इतर असतील पण आता आठवत नाहीत

ओंन डिमांडण प्लॅटफॉर्म आल्यावर पूर्वीची सेंसर ची बंधने काहीशी गळून पडल्यावर असे नाट्य जास्त वास्तविकपणे आणि प्रखरतेने मानण्याची संधी उपलब्ध झाली ...त्यामुळे तांडव ची जाहिरात पहिली आणि अपेक्षा उंचावल्या...दुर्दवाने असे म्हणावे लागेल कि कथेत खूप काही दम नसल्यमुळे निराशाच झाली... डिम्पल कपाडिया, तिमांशू धुलीय यांनी मिळालेली व्यक्तिरेखा चांगल्या साकारलेल्या आहेत पण मुळात संधी चा फायदा करून घेण्यासारखेच कथानक नाही .. हि कथा देशाचं पंतप्रधानचं स्तरावर घडते पण ती एखाद्या राज्य पातळीवर घडावी अशी पण वास्तवता वाटत नाही ( यात ना राहवून "अमेरिकन अध्यक्ष आणि त्यावर बेतलेले चित्रपट या विषयवार जे अनेक जबरदस्त नाट्यमय चित्रपट किंवा सिरीज झाल्या तयांच्याशी तुलना केल्यशिव्या राहवत नाही मध्यन्तरीचं काळातील House of कार्ड्स आठवा )
असो तर तांडव कडे...लेखनातील अगदी थोडे चांगले संवाद सोडले तर "सद्य पर्सिस्थिती "म्हणजे उजवे स्थापित सरकार आणि सामन्तर रित्या एक विद्यर्थी नेत्याचा उदय / कि अस्त! हे दाखवणे हा या अंगाचा विचार असला तरी ते इतक्या पारंपरिक पपद्धतीने केले आहे कि हे तर अनेक भडक हिंदी चित्रपटातून आधी पाहिलंय त्यात काय असं प्रश्न अडतो ..यावर वाचलेली एक मस्त प्रतिक्रिया म्हणजे ...The trouble with cobbling plotlines from headlines is that it can slide into seen-it-been-here territory.
"मिर्झापूर २" किंवा "पाताळ लोक " जी पातळी गाठू शकले त्याचं जवळ पस पण तांडव जात नाही ...
बरं यातील "उजवा पक्ष" म्हणजे भाजप चे स्वरूप असे म्हणावे तर तसेही धड काही नाही .. बाप लेकांचा उत्तर प्रदेशातील स्थानिक पक्ष असेल असे वाटते पण त्यात पण फार नाटय नाही ...
यावर एक केली टीका ती म्हणजे अति ध्येयवादी वैग्रे असले जव्हारलाल नेहरू विश्वविद्यालयातील "छात्र " आणि त्याचे विचार हेच कसे बरोबर ..असे दाखवले आहे
हि टीका काही अगदीच चुकीची वाटत नाही... पण ते करताना सुद्धा दिगदर्शकाने हा तरुण इतकं ध्येयवादी वैगरे दाखवलाय कि फारच हास्यस्पद वाटते ..
चित्रपटात मुख्य भूमिका आहे सैफ अली खान ची.... तान्हाजी काय आणि यात काय मला तर त्याचा हाव भाव ( काहीसा रागीट काहीसा चिंतेतला ) तोच तोच वाटला
एकूण संधी घालवली ...
आता त्या मूल टीकेवर.. ध्येयवादी "छात्र " काही पथनाट्य वैगरे करीत आहे आणि त्यात म्हणे तो शंकराचं वेशात ( चेहरा रंगवलेला , हातात त्रिशूल वैगरे पण खाली सूट ) आहे आणि बरीच शिव्या गाळ करतो ... आता हे दृश्य कमी केलेलं असल्यामुळे मूळ काय होते ते कळणे कठीण, तो शंकराचं वेशात आहे हे ठेवलाय .. परत येथे पण हि जी टीका आहे कि polis अत्याचारात मारलेले बरोबर मुस्लिमच कसे ???, इत्यादी.. हि अगदीच अनाठायी वाटत नाही...
कलाकृती मागे काही तरी अंधुक "अजेंडा" असावा ते वाटले तर त्यात नवल नाही.. पण कलाकृतीचं इतकी मध्यम दर्जाची झाल्या कि त्या टीकेकडे पण लक्ष देण्यात काही फारसा अर्थ नाही ....मिर्झापूर ३ ची वाट पाहत आहे ...

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

1 Feb 2021 - 10:19 am | योगी९००

चांगला रिव्हू लिहीला आहे..

तांडव पाहीली. कथानकात काहीच नाविन्य नाही. पण विद्यार्थी युनियनला राजकारणी कसे उल्लू बनवतात व त्यांचा वापर कसा करून घेतात हे बर्‍यापैकी मांडले आहे.

सैफ सोडून सगळ्यांचा अभिनय चांगला आहे. म्हणजे सैफ वाईट नाही पण कायम रागावलेले तोंड बघवत नाही. सैफच्या बायकोचा नक्की काय रोल तो कळला नाही. कदाचित दुसर्‍या सिझन मध्ये काहीतरी पोल खोल असेल. सुनिल ग्रोवरला बर्‍यापैकी सिरीयस रोल मिळाला आहे. त्याचे ते कॉमेडी शो बघवत नसायचे. पण इथे चांगले फुटेज मिळाले आहे. पुढे काय ह्याची उत्स्मुकता नक्कीच ठेवली आहे. आता दुसरा सिझन आला की बघणे आलेच.