आपण पॉडकास्ट ऐकता का ?

साहना's picture
साहना in काथ्याकूट
27 Jan 2021 - 4:46 am
गाभा: 

इंग्रजी भाषा सोडून आपण देशी भाषांतील पॉडकास्ट ऐकता का ? पॉडकास्ट हा शब्द "श्राव्य मजकूर" अश्या अर्थी वापरला आहे. संगीत सोडून इतर कोणत्याही प्रकरज मजकूर तुम्ही ऐकता तर कसे ऐकता, कुठे ऐकता इत्यादी माहिती द्या. काही लोकांना पु ल देशपांडे सारख्या लेखकांचे विनोदी वाचन ऐकायला आवडते तर काही लोक अध्यात्मिक प्रवचने वगैरे ऐकतात.

इंग्रजी भाषेंत प्रत्येक विषयावर प्रचंड प्रमाणात पॉडकास्टस असले तरी मराठी हिंदी भाषेंत जास्त नाही आहेत आणि अनेक भारतीयांना वाचायला आवडत नसले तरी ऐकायला आवडते.

आणि समजा विषयाचे बंधन नसले तर कुठल्या प्रकारचा मजकूर तुम्हाला ऐकायला आवडेल हे सुद्धा सांगा. उदाहरण म्हणजे
- आर्थिंक नियोजन
- अध्यात्मिक प्रवचन
- विनोदी लेखन
- प्रसिद्ध लोकांबरोबर मुलाखती
- भयकथा
- मालिका स्वरूप कादंबऱ्यांचे वाचन
- नाटके
- जागतिक घडामोडी
- राजकारण इत्यादी

मला कशाला हि माहिती पाहिजे असा प्रश्न पडला तर मी स्वतः मराठी आणि हिंदी भाषेतून एक पॉडकास्ट निर्माण करण्याचा विचार करत आहे.

माझे आवडते पॉडकास्ट आहेत :
https://www.npr.org/sections/money/
https://www.npr.org/series/423302056/hidden-brain [ शंकर वेदांतां ह्यांचा मानवी मनावरचा हा पॉडकास्ट खरेच खूप छान आहे ]
https://reason.com/podcasts/
https://greatbong.net/

प्रतिक्रिया

या उपक्रमास प्रथम शुभेच्छा.
--------
पॉडकास्टचे तीन apps (android) घेऊन ठेवली आहेत. त्यात डाउनलोड्स सोय आहे.
हिस्ट्री, ग्रीक मिथॉलजी गोष्टी ऐकतो.
----
इंग्रजी पुस्तकं वाचतो. ती ऐकण्याची सोय देणारी apps आहेतच त्यामुळे त्याच विषयाचा पॉडकास्ट असण्याचा आग्रह नसतो.
-------
मराठी पॉडकास्ट कमीच आहेत मान्य. पण पुस्तकं/ लेखन ऐकवणारे app आहेच. म्हणजे तेही काम झाले.

मराठी पुस्तकं ऐकवणारी एप्स आहेत का ? कुठली एप्स आहेत ?

कंजूस's picture

27 Jan 2021 - 9:50 am | कंजूस

T2s app Text to Voice Rad Aloud ( HE SOFT)

https://play.google.com/store/apps/details?id=hesoft.T2S

काही मोठी पिडीएफ उघडत नाहीत बरोबर. फॉन्ट प्राब्लेम असतो.
इपब उघडतात.

उपयोजक's picture

27 Jan 2021 - 3:34 pm | उपयोजक

storytel या ऍपवर काही मराठी पुस्तके ऑडीओ स्वरुपात आहेत.

चौकस२१२'s picture

27 Jan 2021 - 6:35 am | चौकस२१२

- आर्थिंक नियोजन
- विनोदी लेखन
- प्रसिद्ध लोकांबरोबर मुलाखती ( द्रुक श्र्व्य जास्त , नुस्ते श्र्व्य नको )
- जागतिक घडामोडी
- राजकारण इत्यादी

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 7:34 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

उपयोजक's picture

27 Jan 2021 - 8:50 am | उपयोजक

सध्याचा काळ असा आहे की लोकांकडे ऑफिसच्या कामातून मोकळा मिळणारा वेळ कमी आहे.शिवाय समस्या दिवसेंदिवस वाढताहेत.अशाही काळात कोणी पॉडकास्ट ऐकत असेल किंवा पुस्तक वाचेल तर ते खालील विषयांवर.
१)आर्थिक नियोजन
२)मानसिक ताणाचे नियोजन
३)अधिक पैसे कसे मिळवावेत?
४)नातेसंबंध कसे सुधारावेत?
५)मेंदू शांत करणारे काहीही म्हणजे अध्यात्म,रिलॅक्सेशन ऑडीओ,विनोद इ.
६)करिअर गायडन्स.

वास्तविक जीवनातील, टेकाडे भावजी गेले आणि आभासी जगतातील, कुटुंबे आली.

कठीण आहे....

Bhakti's picture

27 Jan 2021 - 11:06 am | Bhakti

सध्या
Rockstar रबिंद्रनाथ ,रिया मुखर्जी यांच्या आवाजात जुन्या गोष्टी नवीन साज चढवून,खुपचं तरल गोष्टी आहेत.
'गाना' यावर आहे.
https://gaana.com/season/rockstar-robindronath

साहना's picture

27 Jan 2021 - 1:28 pm | साहना

धन्यवाद.

तूनळी वर beerbicep म्हणून एक चॅनल आहे. त्याचे काही पॉडकास्ट ऐकले . सर्व वेगवेगळ्या विषयांवर आहेत. मागे बराच वादंग झालेला कॉमेडियन तन्मय भट सोबत केलेला पॉडकास्ट सर्वात भारी आणि deep वाटला. दीड तासाचा आहे चांगला पण दीड तास सार्थकी लागले असं वाटलं. नक्की ऐका.

चौथा कोनाडा's picture

1 Feb 2021 - 12:51 pm | चौथा कोनाडा

मुलाखती ऐकतो, कलाविषयक कार्यक्रम ऐकतो, कथाकथन नाट्य ऐकतो, कादंबरी प्रकरणे ऐकतो.

मी स्वतः मराठी आणि हिंदी भाषेतून एक पॉडकास्ट निर्माण करण्याचा विचार करत आहे.

अतिशय स्वागतार्ह ! आपले पॉडकास्ट नक्की ऐकू.
हार्दिक शुभेच्छा !