गाभा:
पानिपत आणि शेरलॉक होम्स अंतिम भाग ३
शेरलॉक होम्स विचारात पडून एक सारख्या येरझाऱ्या घालत होते. डोअर बेल वाजली.
‘वॉटी! व्हेरी वेअर यू, माय ग्रेट फ्रेंड?’
‘इतकी काय अर्जन्सी होती?’ डॉ वॉटसननी विचारले.
‘यू नो वॉटी, विंग कमांडर ओक रिक्वेस्टेड् की मी त्या गाजलेल्या चित्रातील लोकांना शोधावे? सैन्य हालचालीतून काय कळते? ती वेळ काय असेल? पहाटे सुरवात झाली तेव्हा कि संध्याकाळी संपत आली तेंव्हा? अँड स्पेशली डाव्या बाजूला खाली हिरवट रंगाने वेगळेपण दाखवले आहे त्यातून ते चित्र काय सांगते?’
‘विंग कमांडर शशिकांत शेयर्ड हिज इंटर प्रिटेशन’.
‘आय मस्ट से, आय टेंड टू अॅग्री विथ हिम नॉट कंप्लीटली, बट टू ए ग्रेट एक्सटेंट!’
‘दॅट इज ग्रेट!’
‘लेट मी सी दी फोटोज्’.
‘फॉर इझी अंडरस्टँडिंग. त्यानी दहा पार्ट्स केले. त्या कोण व्यक्ती आणि घटना असतील यावर माहिती घेतली’.
‘शेरलॉक होस्म, सीम्स द बॉय हॅज डन वंडरफुल वर्क’ डॉ वॉटसन पुढची चित्रे बघयला ते उत्सुक होते.
हिरव्या रंगाच्या भागाला वेगळे केले.
प्रतिक्रिया
23 Jan 2021 - 12:35 am | गामा पैलवान
नमस्कार शशिकांत ओक,
तोतयावरनं नुकताच प्रकाशित झालेला हा लेख आठवला : पानिपतोत्तर भाऊसाहेब पेशवे – खरे की तोतया? खरे ते तोतया नि खोटे ते खरे!
आ.न.,
-गा.पै.
23 Jan 2021 - 8:47 am | शशिकांत ओक
आपण संदर्भात दिलेल्या तोतया लेखामुळे ज्ञानात भर पडली...
लेख पुन्हा वाचून काढला की मग तो नीट समजावून घेता येईल.
आपल्या सारख्या विचक्षण सदस्यांकडून पानिपत फोटोतील तपशिलाचे विश्लेषण केले गेले की लेखनाची सार्थकता वाढेल.
23 Jan 2021 - 8:48 am | शशिकांत ओक
आपण संदर्भात दिलेल्या तोतया लेखामुळे ज्ञानात भर पडली...
लेख पुन्हा वाचून काढला की मग तो नीट समजावून घेता येईल.
आपल्या सारख्या विचक्षण सदस्यांकडून पानिपत फोटोतील तपशिलाचे विश्लेषण केले गेले की लेखनाची सार्थकता वाढेल.
25 Jan 2021 - 4:06 pm | गामा पैलवान
शशिकांत ओक,
आपल्या सूचनेबद्दल आभार. पण मी काही विचक्षण वगैरे नाही हो. शिवाय चित्रातलं मला फारसं कळंतही नाही. श्री मनोज दाणींच्या अभ्यासावर मत प्रदर्शित करायला तितकाच तोलामोलाचा व्यासंग हवा.
आ.न.,
-गा.पै.
1 Feb 2021 - 3:17 pm | शशिकांत ओक
त्यातील वेचक भाग
सदाशिवराव भाऊंवरून आठवण झाली. त्यांचा तोतया राज्य हडपायला आला होता... म्हणून इथे सादर
23 Jan 2021 - 6:11 pm | दुर्गविहारी
केसची भारी उकल झाली.
24 Jan 2021 - 12:19 am | शशिकांत ओक
हिन्दी मधे केस म्हणजे बाल. बाल की खात उतारना म्हणजे अतिशय सूक्ष्मपणे निरीक्षण करून आपला निष्कर्ष सादर करणे...
या मागे मिसळपाव.कॉम वरील सदस्याचे सहकार्य लाभले म्हणून धन्यवाद.
इंग्रजी मराठी मिसळून शेरलॉक होम्स ना बोलायला लावले हे ही नसे थोडके!
मूळ लेखक श्री, मनोज दाणी यांनी पानिपत वर चित्रमय प्रकाश टाकला आहे त्यात त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले आहे, आपल्याला तसे नाही वाटतं?
24 Jan 2021 - 9:44 pm | चित्रगुप्त
मनोरंजक आणि माहितीपूर्ण लेख.
या चित्रातील कोपर्यात दर्शवलेला राजवाडा पानिपत परिसरात अजून आहे का ? त्याचे सध्याचे नाव काय आहे ? याविषयी काही माहिती उपलब्ध आहे का ? मुलींना पळवून राजवाड्यात आणून वासनाकांड करणारे नेमके कोण असावेत ?
24 Jan 2021 - 10:48 pm | शशिकांत ओक
अशा महापुरुषांच्या नावांची यादी इतक्या काळा नंतर समजावून घेऊन काय फरक पडतो? चित्रात एकेक विकृत मानसिकता दाखवून भीषण विषण्णता निर्माण करणारी दृश्ये दाखवली जावीत? अशी चित्रे शुजा उदौलाने मुद्दाम काढून घेतली असावीत असे म्हटले तर वावगे ठरू नये. या शिवाय काही चित्रे इंग्रजांनी, फ्रेंच लष्करी लोकांनी भारतीय चित्रकारांना पैसे देऊन विकत घेऊन कधी कधी त्यांची पुन्हा कॉपी करून आपापल्या देशात नेऊन प्रकाशित केली असल्याच्या घटना घडल्या होत्या. काळाच्या ओघात वेगवेगळ्या म्युझियम मधे, काहींच्या खाजगी संग्रहात काळजीपूर्वक टिकून आहेत. (भाग २ मध्ये याचा मुद्दाम उल्लेख केला आहे.)
मनोज दाणी, संकेत कुलकर्णी असे महाभाग भारतीय इतिहासातील घटना, नकाशे, पेंटींग्ज श्रमपूर्वक गोळा करून आपल्या समोर पुस्तक रूपाने सादर करतात.
त्यांच्या कष्टांना मानाचा मुजरा...
26 Jan 2021 - 7:29 am | चित्रगुप्त
@ शशिकांत - तुम्ही जे लिहीले आहे, त्याचेशी सहमत आहे.
'मुद्दाम कढून घेतलेली चित्रे' हाच प्रकार पूर्वी जगभर सर्वत्र असायचा. अपवाद फक्त सराव म्हणून जी लहानशी रेखाटने /रंगीत चित्रे चित्रकार बनवत त्यांचा. हल्ली अगदी काल घडलेल्या घटनेबद्दल आजच्या विविध 'मिडिया' मधून परस्पर-विरोधी भूमिका 'आमचेच खरे' म्हणून रेटून मांडल्या जातात. त्याकाळी तर कुठेतरी-केंव्हातरी घडलेल्या घटनेच्या ऐकीव माहितीवरून चित्रे बनवली जात, तीही कुणाच्या तरी मर्जीप्रमाणे.
26 Jan 2021 - 1:23 pm | शशिकांत ओक
या पार्श्वभूमीवर काही चित्रे एकदम वेगळी वाटतात.
अशी काही चित्रे पानिपतवरील मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पुस्तकात आहेत. त्यावर सवडीने प्रकाश टाकावा असे वाटत आहे. आपले प्रतिसाद जरूर यावेत.
28 Jan 2021 - 11:37 am | शशिकांत ओक
ज्यांनी हे पुस्तक लिहिले त्या लेखक महाशयांनी या 'पुस्तकाचे हृदय' अशा चित्रातील बारकाईने शोधून काढलेल्या, घटनांचा आढावा आपला शैलीत घेऊन त्यावर प्रकाश टाकला तर वाचकांना अधिक माहिती मिळाल्याचा आनंद होईल.
1 Feb 2021 - 3:41 pm | Bhakti
उत्तम !केस चांगली चालली.
1 Feb 2021 - 6:47 pm | शशिकांत ओक
त्यांना उद्देशून...
बऱ्याच जणांनी प्रयत्न केला असेल...
शेरलॉक होम्स यांच्या लोकप्रिय प्रतिमेचा संदर्भ घेऊन त्यांच्या सारखेच शोध कार्य हातात भिंग धरून निदान १० जणांनी केले असेल अशी माझी धारणा आहे...
होम्स यांच्या विनंतीला मान देऊन ओकांनी सादर केलेले स्पष्टीकरण मान्य करता येत नाही अथवा मला याबाबत जरा वेगळे वाटते किंवा त्यांचे निष्कर्ष एकंदरीत बरोबर आहेत. अशा तऱ्हेचे प्रतिसाद अपेक्षित होते. मनोज दाणीनी युट्यूबवर बोलताना म्हटले तसे 'बऱ्याच जणांना धागा कळला नाही' हे मत बरोबर आहे कि काय असे वाटून हे लेखन केले आहे.