भंडारा ते पुणे कारण काय

Primary tabs

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
22 Jan 2021 - 1:58 am
गाभा: 

महाराष्ट्र भंडारा जिला दवाखाना येथे बारा बालगोपाल आगीत मृत्युमुखी पडले ते केवळ निष्पाप जीव आणि ज्यांनी अजून डोळे उघडले नाहीत तोच कायमचे मिटले
हा एक विचार येतो कि आग यंत्रणा येथे का असू नये किंवा जर असली तर कर्मचारी झोपी गेले होते का आणि यांची चौकशी कधी होणार
हि आग शमते नाही तोवर गेल्या काही दिवसांपूर्वीची हि घटना आहे तर पुणे येथे सिरम मध्ये आगीत भर दुपारी सहा कामगार आगीने मेले
सिरम सारख्या अतिशय महत्वाच्या जागी पुण्यात हि आग लागते याला मिपा वाचकांचे उत्तर काय असावे ----

प्रतिक्रिया

असणार कशी ? रेगुलेशन हजार आहेत पण अत्याधिक रेग्युलेशन असल्याने त्याचे काहीही पालन करून धंदा चालवणे शक्य नाही त्यामुळे लाँच खाऊन ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कुठल्याच रेग्युलेशन ला कुणीच गांभीर्याने घेत नाही. औकात इथिओपियाची पण सरकारी धंदे आपण जणू काही डेन्मार्क आहोत ह्या पद्धतीने रेग्युलेटेड आहेत. (पर्सिस्टंट च्या पुण्यातील बिल्डिंग विषयी ह्याच प्रकारचे लेखन झाले आहे) .

अग्निशमन व्यवस्था कोण निर्माण करतो, कश्यासाठी करतो, त्यातील कर्मचारी कसे निवडले जातात, त्यांचे नक्की काम काय आणि त्यांनी चुकारपणा दाखवला तर जबाबदार कोण ह्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मला तरी ठाऊक नाहीत.

साहना तुमचे बरोबर आहे मला माफ करा
मला भंडारा घटना १० जानेवारी २०२१ व पुणे २० जानेवारी २०२१ ला
असे लिहायचे होते व दोन्ही मध्ये १० दिवस अंतर आहे,चुकून भंडारा २०२० असे लिहिले

शकु गोवेकर's picture

22 Jan 2021 - 2:43 am | शकु गोवेकर

भंडारा घटना १० जानेवारी २०२० ला झाली आणि पुणे घटना २० जानेवारी २०२१ ला
महाराष्ट्र मध्ये वारंवार लगेच आग घटना का होत आहेत

रहिवासी हे घरातले, ब्लॉकमधले किंवा कार्यालयीन इमारती असल्या तर तिथे सुरक्षितता खातं असायला पाहिजे. त्यांनी तपासण्या करायला हव्यात. किंवा बाहेरून निरिक्षक बोलावून कुठे आणि कशाने आग लागू शकते हे नोंदवायला हवे, बदल सांगायला हवेत.

मंत्रालयातही मागे एकदा आग लागून फायली जळाल्या होत्या. राज्याच्या मुख्यालयाचीच ही अवस्था असेल तर इतरांचे काय सांगणार?

मुंबईत एका उंच इमारतीत एका ब्लॉकमध्ये समारंभ झाल्यावर दुसऱ्या दिवशी सोफ्यावरच्या इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळेने पेट घेतला आणि सोफ्यातला स्पंज धुमसू लागला. लाईट स्विच बंद करून त्यावर पाणी टाकून म्हातारा म्हातारी बाहेर पडली असती तर आग आणि धूर वाढला नसता. धूर फार वाईट. तो कुणाला पुढे येऊ देत नाही. यात अर्धा तास जाऊन मग कर्मचारीही धुराने काही करू शकले नाहीत.

म्हणजे आगविरोधी व्यवस्थापन आणि आग लागली तर काय करायचे याचा सराव करून घ्यायला हवा.

आग लागल्यावर कर्मचारी हजर होतात आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दिले पाहिजे. उगाचच इतर लोकांनी त्यात लक्ष घालून त्यांना ओर्डरी सोडल्या नाही पाहिजेत.

चौथा कोनाडा's picture

22 Jan 2021 - 6:06 pm | चौथा कोनाडा

कारण काय ?

कारणे दोनच :

१) पराकोटीचा भ्रष्टाचार
आणि
२) जबाबदारीतील गलथानपणा

सिरम मधल्या आगीत कॉर्पोरेट पॉलिटिक्स तर नसेल?

आग लागू नये म्हणून करायच्या उपाय योजना विषयी भारतीय समाज गंभीर नाही.
त्या आग लागू नये म्हणून काळजी पण घेण्यात आपण मागे पडतो.
1) आग प्रतिबंधक उपकरणे किती रहिवासी किंवा व्यापारी बिल्डिंग मध्ये सू स्थिती मध्ये असतात.
प्रत्यक्षात आग लागल्या नंतर आज विझविण्याचे प्रशिक्षण घेतलेला स्टाफ उपलब्ध असतो का.
स्वतःच्या बिल्डिंग च निरीक्षण करून ह्या प्रश्नांचे उत्तर शोधू न बघा.
2) इमारती च्या चारी बाजूला अग्निशामक दलाची गाडी फिरू शकेल अशी मोकळी जागा असते का?
ह्याचे उत्तर पण नाहीच असे आहे.
रहिवासी अतिक्रमण करून अशा जागा ठेवत च नाहीत.
3) building ची शिडी असते त्या शिडी वर गॅस सिलिंडर,भंगार, newspaper ची रद्धी सर्रास ठेवली जाते.
4) विजेचे वायरिंग,मीटर room, विजेची उपकरण ह्याची काळजी वेळेवर घेतली जाते का?
5) इमारती समोर चे रस्ते दोन्ही बाजू नी गाड्या पार्क करून अरुंद केले जातात त्याचा परिणाम म्हणून संकट येते तेव्हा मदत वेळेवर पोचू शकत नाही.
स्वतःला प्रश्न विचारा आपण निर्दोष आहोत का हे बघा नंतर दुसऱ्यांना दोषी ठरवा.

उपयोजक's picture

23 Jan 2021 - 2:15 am | उपयोजक
उपयोजक's picture

23 Jan 2021 - 2:16 am | उपयोजक
उपयोजक's picture

23 Jan 2021 - 2:16 am | उपयोजक

हि युती काय महाराष्ट्राच्या वरच झाली आहे ?