बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ....

Primary tabs

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
19 Jan 2021 - 7:05 pm
गाभा: 

हे सरकार म्हणजे नुसते, पोकळ आश्र्वासने आणि खापर दुसर्यावर फोडण्यातच मश्गूल आहे.

1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही.

2. औरंगाबादचे, संभाजीनगर असे नामांतर करू, असे आश्र्वासन दिले, अद्याप तरी काहीही केले नाही.

3. बलात्काराची केस असेल तर, 21 दिवसांत निकाल लाऊ, असे सांगतात पण,

A. राष्ट्रवादी युवा नेत्यावर, बलात्काराचा आरोप झाला आणि 21 दिवसाच्या आत, आरोप करणारी युवतीच गायब झाली

B. धनंजय मुंडे यांच्यावर, बलात्काराचा आरोप झाला आहे आणि अद्याप तरी ते आहे त्याच पदावर आहेत.

4. आधी पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून, झाडे तोडायला विरोध करायचा आणि नंतर झाडे तोडायची.

5. आधी शेतकरी वर्गाला हेक्टरी 25,000 ₹ देऊ म्हणून सांगायचे आणि नंतर तोंडाला पाने पुसायची.

इथे सगळेच सुशिक्षित असल्याने, फक्त मुद्देच मांडले आहेत.

प्रतिक्रिया

पण जबाबदारी काही पेलवेना,

मग म्हणाले....

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

(मारली पलटी)

चौथा कोनाडा's picture

19 Jan 2021 - 10:30 pm | चौथा कोनाडा

😀

चौथा कोनाडा's picture

19 Jan 2021 - 10:28 pm | चौथा कोनाडा

खरंय !
मुद्दा क्र ३ ए आणि बी तर प्रकरणे हळुहळू कशी मिटवून टाकायची याची उदाहरणे आहेत.
पडद्यामागून काय काय मांडवली होत असतील देवच जाणे !

दिगोचि's picture

20 Jan 2021 - 5:18 am | दिगोचि

आधी शेतकरी वर्गाला हेक्टरी 25,000 ₹ देऊ म्हणून सांगायचे आणि नंतर तोंडाला पाने पुसायची.>>> आता राश्ट्रवादीचे अध्यक्ष शेतकरी आन्दोलनात सहभाग घेणार आहेत. याना लाज कशी वाटत नाही आपण शेतकर्यान्च्या बाजुचे आहोत हे सान्गायला.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 11:25 am | मुक्त विहारि

आणि मग त्याच शेतकरी वर्गाला, APMC मध्ये, भीक मागायला बसवायचे.

कंजूस's picture

20 Jan 2021 - 6:07 am | कंजूस

मग बघू.
मग वर काढू.

असे, शरद पवार यांनी स्वतःच पुस्तकात लिहीले.

आणि आता मात्र विरोध करत आहेत.

पलटी मारली....

आणि आता मात्र विरोध करत आहेत. पलटी मारली >>> पलटी मारणे ही त्यान्ची खासियत आहे. अनेक वर्शान्चा सराव आहे.

Rajesh188's picture

21 Jan 2021 - 8:55 am | Rajesh188

वीज निर्मिती आणि विजेचे वितरण ह्याचा प्रती युनिट खर्च काढला तर आजचे दर योग्य च आहेत .
ते अजुन कमी करून महाराष्ट्र ल अंधारात लोटायचे आहे का?
वीज बिल कमी करू असली आश्वासन सरकारं नी दिलीच नाही पाहिजेत.
हा जे खूपच गरीब आहेत त्यांचे बिल सरकार नी भरावे पण चालू दरा नीच.

राजेश भाऊ.. तुमच्या गुळमुळीत उत्तरावरून तुमची वीजप्रश्नाबाबत बोलायची गोची होणार हे नक्की. त्यामुळे शांत बसा ( नेहमीप्रमाणे )

आपले घरबसे मुख्यमंत्री कोरोना काळात प्रत्येक 10-12 दिवसांनी जे लेक्चर रुपी ज्ञान पाजत होते त्यात त्यांनी कुठेही मध्यमवर्गीय माणसाला आर्थिक दिलासा दिला नाही. पण व्यावसाईक, उद्योगपती यांना त्यांच्या कामगारांना पगार चालू ठेवायला आणि कामावरून न काढायला धमकीवजा आदेश मात्र दिला.
घरमालकांनी भाडेकरुंकडून भाडे घेऊ नका असाही फतवा काढला. पण स्वतः काय केले?? घंटा.. उलट जनतेच्या माथ्यावर वाढीव वीजबिले पाठवून त्यांना लुटायचे काम केले. लोकां सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण. हिपोक्रसी.

आजही कोरोना काळातील वीजबिल माफी बद्दल सरकार आणि नितीन राऊत एकमेकांकडे बोट दाखवतायेत.

माझी इलेक्ट्रिसिटी मलाच शॉक.

स्वतःच्या मुलांना मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचे

अहो विंग्रजी शाळेचे काय घेऊन बसलात ? बोंबे स्कॉटिश मध्ये बरे का ... इथे ह्यांचे गुंड नेते बिचारे कराची स्वीट्स वाल्याला धमकी देतात नाव बदलायला आणि ह्यांची पोरे जातात बोंबे स्कॉटिश मध्ये. मुंबईत कराची चालत नाही (जो अखंड भारताचा भाग आहे) पण बोंबे आणि स्कॉटिश मात्र कसे एकदम सोवळे आहे.

हर शाख पे पेंग्विन बैठा है अंजाम ये गुलिस्ता क्या होगा ?

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 12:25 pm | मुक्त विहारि

ते पचवायची ताकद हवी.

आपण, ज्याला मत देत आहोत, तो कसा आहे? हे ओळखून मगच मत देणे उत्तम.

भंकस बाबा's picture

6 Feb 2021 - 7:27 pm | भंकस बाबा

पेंग्विन हा शब्द असांसदीय आहे. तुम्ही इथे वापरलाच कसा?
उद्या मिपा संपादकावर पोलीस कारवाई झाली तर कोण जबाबदार?
त्यापेक्षा बर्फाळ प्रदेशातील एक कुरूप काळ्या पाठीचा ढेरपोट्या पक्षी असा उल्लेख करा

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2021 - 1:12 pm | श्रीगुरुजी

शिवसेना मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढते, शिवसेना हिंदुत्ववादी आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली, शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला असे अनेक गैरसमज माध्यमे अनेक दशके पसरवित आहेत. या प्रचारात कणभरही तथ्य नाही.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 4:18 pm | मुक्त विहारि

खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी पण, ठाम पणे कधीच सांगीतले नाही की, बाबरी मस्जिद, शिवसैनिकांनी पाडली.

ह्या बाबतीत, गुळमुळीत धोरण अवलंबले होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2021 - 4:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला...!
शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा प्रवास सुरु झाला, त्या युतीवर लोकांचा विश्वास होता, लोक युतीचे फॅन होते. अच्छे दिन आल्या नंतर भाजपाच्या डोक्यात मस्ती आली. शिवसेनेचा सारखा अपमान केला आणि शिवसेनेने हिशेब पूर्ण केला, हे सत्य आहे.

>>>>शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली....!

बाबरी मशिदीचा ढाच्या पडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी एकही हिंदुत्वादी संघटना पुढे आली नव्हती. अशा वेळी प्रखर हिंदुत्ववादी नेते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असे ठणकावून सांगितले. या कारसेवेत औरंगाबाद येथील शिवसेनेचे खासदार मोरेश्‍वर सावे व ठाण्याचे खासदार सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक कारसेवेला गेले होते. त्यांनी कारसेवेत सहभाग घेत हा ढाचा पाडला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, मोरेश्‍वर सावे,सतीश प्रधान यांना आरोपी करण्यात आले होते.

पुढे थेट पुरावे न मिळाल्यामुळे ते निर्दोष सुटले तो भाग वेगळा.

-दिलीप बिरुटे

हे जरा सांगीतले तर उत्तम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2021 - 5:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ज्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एक म्हणजे संतोष दुबे, यांच्याशी संपर्क करून आपण माहिती घेतली तर आपण सर्वांना माहिती होईल.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2021 - 5:55 pm | श्रीगुरुजी

संतोष दुबे हे विश्व हिंदू परीषदेशी संबंधित "हिंदू धर्म सेना" या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही.

https://www.google.com/amp/s/www.deccanherald.com/amp/national/invite-al...

हे संतोष दुबेचे मनोगत.

Santosh Dubey, the youngest karsevak named in the Central Bureau of Investigation’s (CBI) chargesheet said, “We had gathered there on the instructions of L.K. Advani, M.M. Joshi, Uma Bharti and other Vishwa Hindu Parishad (VHP) and Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) leaders who told us that we have to erase the “sign of slavery” of 500 years. They told us that we have to demolish the Babri Masjid and we successfully did that”.

Dubey, while talking to The Wire, gave details of how the plan was chalked out by senior BJP and VHP leaders.

Dubey said that on December 3, 1992, the then revenue minister of Uttar Pradesh’s Kalyan Singh government, Brahm Dutt Dwivedi, came to his Faizabad residence and told him that Advani wants to meet him. “He took me to Hanuman Bagh temple in Ayodhya where a meeting of senior BJP and VHP leaders was in progress,” Dubey said.

“I reached there along with karsevaks Pravin Sharma and Vijay Tiwari. We were introduced to Advani who addressed us in a challenging tone: ‘The Babri mosque is the greatest hurdle in the way of the construction of Ram temple. I need about 300 youths who are ready to sacrifice their lives for Ram and I don’t want this Babri structure to remain after December 6. You will get whatever you want to raze the mosque; we have our government in the state’,” Dubey narrated.

“On Advani’s instruction, tools like hammers, gainti (pickaxe), belcha (shovel), pointed iron rods, ropes, drilling machines and some light explosives were arranged and handed over to us,” he added.

यात कोठेही शिवसेनेचा उल्लेख नाही.

https://www.google.com/amp/s/m.thewire.in/article/communalism/advani-tol...

कानडाऊ योगेशु's picture

21 Jan 2021 - 5:36 pm | कानडाऊ योगेशु

शिवसेनेचा सारखा अपमान केला

त्याआधी माननीय बाळासाहेबही जाहीरपणे भाजपला आमची कमळाबाई असे म्हणुन हिणवत असत.!

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2021 - 5:40 pm | श्रीगुरुजी

शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा प्रवास सुरु झाला,

१९६६ मध्ये स्थापना झाल्यापासून १९९० मध्ये भाजपने युती करेपर्यंत सेनेचा फक्त १ आमदार निवडून आला होता (१९८५ मध्ये छगन भुजबळ). १९७२ मध्ये ०, १९७८ मध्ये ३५ जागा लढवून ०, १९८० मध्ये राज्यात व देशात प्रचंड लाट असलेल्या इंदिरा कॉंग्रेसबरोबर युती करूनही ०, १९८५ मध्ये १ अशी सेनेची स्थिती होती. मुंबईतील मराठीबहुल काही प्रभागांच्या बाहेर सेनेला ओळख नव्हती. १९८९ पर्यंत शिवसेना हा मुंबई महापालिका पातळीचा गट होता. १९८४ व १९८९ मध्ये सेनेचे काही नेते लोकसभा निवडणुक लढले ते सुद्धा भाजपच्या कमळ चिन्हावर कारण सेनेचे चिन्ह बहुसंख्य जनतेला माहितीच नव्हते.

याउलट पूर्वाश्रमीचा जनसंघ व १९८० मध्ये स्थापन झालेला भाजप यांना पूर्वीपासूनच बऱ्यापैकी जनाधार होता. जनसंघाचे १९६७ मध्ये ४ व १९७२ मध्ये ५ आमदार होते. १९७९ मध्ये एकत्रित जनता पक्षाचे १०० आमदार होते. १९८० मध्ये १४ व १९८५ मध्ये १६ आमदार होते. मुख्य म्हणजे सुरूवातीपासूनच हे आमदार कोकण, मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व भागातून निवडून येत होते.

मुंंबईबाहेर कोणीही ओळखत नसलेल्या व २४ वर्षात केवळ १ आमदार निवडून आलेल्या पक्षाचे बोट धरून सेनेपेक्षा बराच मोठा असलेल्या व प्रत्येक निवडणुकीत आपले थोडेफार आमदार निवडून आणणाऱ्या भाजपचा महाराष्ट्रात प्रवास सुरू झाला, हा दावा अत्यंत हास्यास्पद आहे.

बाबरी मशिदीचा ढाच्या पडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी एकही हिंदुत्वादी संघटना पुढे आली नव्हती. अशा वेळी प्रखर हिंदुत्ववादी नेते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असे ठणकावून सांगितले. या कारसेवेत औरंगाबाद येथील शिवसेनेचे खासदार मोरेश्‍वर सावे व ठाण्याचे खासदार सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक कारसेवेला गेले होते. त्यांनी कारसेवेत सहभाग घेत हा ढाचा पाडला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, मोरेश्‍वर सावे,सतीश प्रधान यांना आरोपी करण्यात आले होते.

मी भ्रष्टाचार केला असेल तर मला तुरुंगात टाका, असे सांगणारा आपण भ्रष्टाचार केल्याचे नाकारत असतो. मी व्यवस्थित अभ्यास केला असता तर मी उत्तीर्ण झालो असतो, असे सांगणारा विद्यार्थी आपण अभ्यास केला नव्हता हेच मान्य करीत असतो. जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान वाटेल, या वाक्याचा अर्थ या पाडापाडीत शिवसैनिक नव्हते याची मान्यता आहे. कारसेवेत उपस्थित असणाऱ्यांंमध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, उमा भारती, अशोक सिंघल, साध्वी ऋतांबरा इ. नेते होते. तेथे सेनेचा एकही नेता नव्हता. त्या काळात सेनेचे सर्व नेते व कार्यकर्ते महाराष्ट्राबाहेर गेलेच नव्हते. मुळात १९८९ मधील अडवाणींंची रथयात्रा, १९९० मधील कारसेवा, १९९२ मधील पाडापाडी व त्या ३-४ वर्षात चाललेले आंदोलन यात फक्त विश्व हिंदू परीषद, भाजप, संघ व बजरंग दलाचाच समावेश होता. या काळात अडवाणी, सिंघल, वाजपेयी अशा काही जणांना काही काळ अटक झाली होती. त्या संपूर्ण आंदोलनात सेनेचा सहभाग अत्यल्प किंवा शून्य होता. सेनेचा एकही नेता अटकेत नव्हता. नंतर ठाकरेंवर केस झाली ती बाबरी पाडल्यानंतर सामनातून लिहिलेल्या भडक अग्रलेखांंमुळे व नंतर झालेल्या दंगलीसंदर्भात.

तेव्हा bjp चे सर्व कार्यकर्ते शेपूट घालून लपून बसले होते हे जनते नी बघितले आहे
रस्त्यावर प्रतिकार करण्यासाठी फक्त शिवसैनिक च होते.
Bjp चे नेते ,कार्यकर्ते सर्व गायब होते.
कोणत्याही सामान्य लोकांस विचारलं तर तो
हेच सांगेल.

कानडाऊ योगेशु's picture

21 Jan 2021 - 9:56 pm | कानडाऊ योगेशु

रस्त्यावर प्रतिकार करण्यासाठी फक्त शिवसैनिक च होते.

ह्यात तथ्य असावे.

बाप्पू's picture

21 Jan 2021 - 10:03 pm | बाप्पू

हो यात तथ्य आहे.

पण त्याच बरोबर VHP आणि बजरंग दल चे कार्यकर्ते देखील होते. पण हो.. शिवसैनिक होते म्हणून मुंबईत हिंदूंचे शिरकाण झाले नाही.. ही हे खरे आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2021 - 10:07 pm | श्रीगुरुजी

१९८९ पासून ६ डिसेंबर १९९२ पर्यंत चाललेल्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनेचा सहभाग अत्यल्प किंवा शून्य होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2021 - 12:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिवसेनेचे खासदार मोरेश्वर आणि सतीश प्रधान हे प्रत्यक्ष सहभागी असल्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर त्या प्रकरणात ते सहआरोपी होते आणि त्या प्रकरणातच निर्दोष सुटले. आता शिवसेनेचं कर्तुत्वच या महाराष्ट्रात मान्य करायचं नसेल तर विषय संपला.

बाकी चालू द्या.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2021 - 12:24 am | श्रीगुरुजी

शिवसेनेचे त्या काळातील प्रमुख नेते होते बाळ ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, नवलकर, राणे, वामनराव महाडिक, भुजबळ (डिसेंबर १९९१ पर्यंत), रावते इ.

त्या काळात यापैकी कोणीही मुंबईबाहेर पाऊल ठेवले नव्हते. ६ डिसेंबर या दिवशी यापैकी कोणी अयोध्येत असते तर माध्यमांनी त्यांना टिपले असते कारण संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सुरू होते. परंतु तिथे एकाही माध्यमसंस्थेला सेनेचा एकही माणूस दिसला नव्हता.

बाळ ठाकरे व इतरांवर नंतर तक्रार दाखल झाली ती सामनातील प्रक्षोभक अग्रलेख, नंतर झालेल्या दंगली (ज्यात सेनेच्या मधुकर सरपोतदारांचेही नाव होते), सावेंच्या घरी सापडलेले श्रीरामजन्मभूमी मंदिराचे चित्र असलेली दिनदर्शिका व काही प्रक्षोभक छापील साहित्य अशा काही गोष्टींमुळे. १९८९ पासून ६ डिसेंबर १९९२ पर्यंत झालेल्या या आंदोलनात सेनेचा सहभाग अत्यल्प किंवा शून्य होता. त्यामुळेच जर-तर शब्द वापरून बाळ ठाकरेंनी आंदोलनात शिवसेनेचा नसलेला सहभाग अप्रत्यक्षपणे मान्य केला होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2021 - 12:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोण आरोपी होते आणि कोण निर्दोष सुटले. शिवसेनेचे खा.मोरेश्वर सावे आणि सतीश प्रधान यांची नावे आहेत.

बातमी दुवा.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2021 - 8:19 am | श्रीगुरुजी

हे नेते त्या काळात अयोध्येत नव्हतेच. अयोध्येत पाऊल ठेवणारे पहिले ठाकरे वंशज म्हणजे उद्धव ठाकरे, जे ऑक्टोबर २०१९ मध्ये अयोध्येत गेले होते. प्रक्षोभक भाषणे व लेखन, दुसऱ्या धर्माचा अवमान होईल अशी वक्तव्ये, दंगलीला चिथावणी असे त्यांच्यावरील आरोप होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2021 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

-दिलीप बिरुटे

Rajesh188's picture

21 Jan 2021 - 12:18 pm | Rajesh188

मी 7/12 उत्तर प्रदेश हे ॲप डाऊनलोड केले.
आणि की आश्चर्य त्या ऍप वर फक्त हिंदी ही एकमेव भाषा होती .दुसऱ्या भाषेचा पर्याय च नाही.
ह्या वर कहर म्हणजे की बोर्ड हा फक्त आणि देवनागरी मध्ये इंग्लिश हिंदी हा पण पर्याय नाही.
महाराष्ट्र 7/12 ऍप साठी इंग्लिश मराठी अशा दोन भाषा उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र काहीच मातृभाषेचा आग्रह धरत नाही बाकी राज्यांची ग्राउंड रिॲलिटी बघितली भाषे विषयी तर दिवसा चांदणे दिसतील.
त्या संधी साधू bjp ल सत्ता नाही मिळाली इथे म्हणून एवढे पण सैरभैर होवू नका की आपल्याच लोकांवर अत्यंत नीच शब्दांचा वापर करून टीका करायची इच्छा होईल.

सेने नी डावपेच खेळून BJP ल सत्तेबाहेर केल्यामुळे bjp समर्थक depression मध्ये गेले आहेत .
सेनेची झुंडशाही ह्यांना आताच दिसायला लागली अगोदर दिसत नव्हती.
राजकारणात असे सत्तेचे खेळ सर्रास होतात BJP ni असे खेळ खेळून मित्र पक्षांना दगा दिलेला आहे.
म्हणून कोणी depression गेले नाही.
देव ह्यांना लवकर नैराश्यातून बाहेर काढेल हीच आशा आहे.

चिवसेनेने चोरलेल्या सत्तेच्या जीवावर जेवढ्या उड्या मारुन घ्यायच्या आहेत तेवढ्या मारुन घ्याव्यात. नंतर त्यांचे मतदारच त्यांच्या हातात केळी देतील.

बाकी युतीत असतानाही आपल्याच सरकारविरोधात मुखपत्रातुन बोंबा मारायच्या आणि तरीही सत्तेला मुंगळ्यासारखे चिकटून बसायचे असे दुतोंडी कार्यक्रम केवळ चिवसेनाच राबवु शकते.

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 12:39 pm | मुक्त विहारि

नंतर माफ केले.

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना, त्या दिवसापासूनच, मनांतून उतरली.

प्रसाद_१९८२'s picture

21 Jan 2021 - 7:08 pm | प्रसाद_१९८२

सत्तेसाठी किती हा लाचारपणा. आयुष्यभर भगवे वस्त्र धारण करणार्‍या बाळासाहेंबाना देखील यांनी हिरवे केले.

---
Lachar

मुक्त विहारि's picture

21 Jan 2021 - 7:41 pm | मुक्त विहारि

अजान स्पर्धा पण भरवणार होते.

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2021 - 8:22 pm | श्रीगुरुजी

यात कसला लाचारपणा? शिवसेना हिंदुत्ववादी कधीच नव्हती. भगवी फफनी परीधान करून हिंदुत्ववादी होता येत असते तर कायम भगव्या कफनीत वावरणारे स्वामी अग्निवेश सुद्धा हिंदुत्ववादी असते.

शिवसेना हा सप्तरंगी पक्ष आहे. मुस्लिम लीग, प्रजा समाजवादी, भाजप, शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन अशा सर्व पक्षांशी सेनेने भूतकाळात युती केली होती.

प्रसाद_१९८२'s picture

21 Jan 2021 - 9:01 pm | प्रसाद_१९८२

मात्र मला कळायला लागल्यापासून "ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक" अशी सामनाची टॅग लाईन वाचून माझी समजूत झाली होती की शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष होता\आहे म्हणून.

बाप्पू's picture

21 Jan 2021 - 10:00 pm | बाप्पू

आत्ताची शिवसेना आणि ठाकरे म्हणजे बाटलेले हिंदुत्व.. वरून भजन आतून लावणी.

टिपू सुलतान चे फॅड जास्तच वाढवले जातेय. इतिहास n वाचता माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बरेच जण व्हाट्सअँप ला टिपू चे स्टेटस सेकुलर आणि सच्चा भारतीय म्हणून ठेवू लागलेत.

एकदा जन्मदाता बाप बदलला आणि धोतर सोडून सलवार चढवली. पण आजही बाप बदलण्यात ही लोकं पटाईत आहेत. कधी औरंगजेब, कधी खिलजी, कधी मोहम्मद बिन कासीम आणि आता टिपू..
कधी अरबी होतात, कधी मंगोल आणि कधी तुर्की.. आणि फार कमी वेळेला भारतीय असतात.

सेने ल त्यांच्या कर्माची फळ मिळतील त्यांचं चूक वाटलं तर पुढल्या वेळी निवडणुकीत सडकून मार खातील.
Bjp वाले स्वतःला का त्रास करून घेत आहेत ते समजत नाही.
युती होणे युती तुटणे हा नेहमी चालणारा खेळ आहे भारतीय राजकारणात.
सेने नी युती तोडली (की तोडण्यास त्यांना मजबूर केले) म्हणजे काही तरी वेगळे केले जे देशात कधी घडलच नव्हत अशा प्रतिक्रिया येत आहेत.
वाजपेयी नी किती तरी पक्षांना घेवून सरकार चालवले पण त्यांच्या नेतृत्वाची उंची आताच्या bjp च्या नेत्या मध्ये नाही.

अनन्त अवधुत's picture

21 Jan 2021 - 11:32 pm | अनन्त अवधुत

यात नविन काही नाही, आधी विरोधकांना वाजपेयी नव्हते आवडत, पण मग अडवाणींचे नाव पुढे आल्यावर वाजपेयी गोड झाले.
मोदींचे नाव पुढे आल्यावर अडवाणी बरे वाटायला लागले.
उद्या मोदींनंतर योगी, शहा, नड्डा अथवा ईतर कोणी भाजप नेते पंतप्रधान झाले की तुम्हाला वाजपेयी ऐवजी मोदी उंच वाटायला लागतील.

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2021 - 11:37 pm | श्रीगुरुजी

+ १

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Jan 2021 - 11:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य बोललास रे राजेशा. मजा वाटतेय ती स्वयंघोषित पुरोगामी पत्रकारांची. गेले अनेक वर्षे सेनेचा उल्लेख 'कम्युनल पार्टी' असा व्हायचा. आता तो उल्लेख होत नाही. आमचा माहिमचा निखिल वागळे तर शिवसेनेवर तुटुन पडायचा. "माझी विचार्सरणी फुले-शाहू-आंबेडकरांची तर शिवसेना जातियवादी आहे" असे नेहमी म्हणायचा. 'उद्धव बावळट व कोत्या मनाचे आहेत' म्हणणार्या निखिलला आता उद्धव ठाकरेंमधील 'समंजस नेतृत्व' दिसू लागले.

वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि देशाचे पंतप्रधान होते पण त्यांच्या विषयी लोकांची मत कडवट कधीच नव्हती.
ना विरोधी पक्षांनी पातळी ओलांडून त्यांच्या वर टीका केली.
मोदी विषयी लोकांची मत कडवट आहेत आणि विरोधी पक्ष पण त्यांच्यावर कठोर टीका करत आहे.
हा फरक दिसत नसेल तर देव च भले करो

श्रीगुरुजी's picture

22 Jan 2021 - 12:05 am | श्रीगुरुजी

मोदींविषयी फक्त पप्पू, राऊत, मणिशंकर अशाच नगण्य लोकांची मते कडवी आहेत व तेच अहोरात्र टीका करीत असतात. मोदी अशांना कणभरही महत्त्व देत नाहीत व जनताही अशांना थारा देत नाही. आजच्या इंडिया टुडेच्या सर्वेक्षणातून है पुन्हा एकदा दिसून आलंय.

Rajesh188's picture

22 Jan 2021 - 12:15 pm | Rajesh188

TRP वाले का

प्रसाद_१९८२'s picture

22 Jan 2021 - 11:51 am | प्रसाद_१९८२
यश राज's picture

22 Jan 2021 - 12:31 pm | यश राज

मला तर अख्खे मंत्रिमंडळ तर्र वाटते.. कोण काय बोलतो याचा काही पायपोसच नसतो...

मदनबाण's picture

22 Jan 2021 - 1:56 pm | मदनबाण

1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही.
मात्र स्वतःच्या बंगल्यांवर करोडो रुपये खर्च केले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exercise

शशिकांत ओक's picture

22 Jan 2021 - 7:03 pm | शशिकांत ओक

शिवसेना विषयच असा आहे की अनेक मतवादी मुक्त होऊन विहार करत तुटून पडतात...
ढिंग टांग वर हाय बॅब्ज वाले दादू , विक्रमादित्य, बंधू सदु, नाना यांनी एकमेकांना दाखवलेले आरसे वाचून, भाऊ तोरसेकरांचे शाब्दिक शरसंधान ऐकून दिवस बरे जातात आजकाल...
सर्वात जास्त दिवस कोण मोजत होते की २० जानेवारी कधी येणार तर ती होती मेलि ना...!
कमल हॅरिस ला कमलादेवी म्हणून नामकरण करण्यात आलेले वाचून मजा वाटली.

ह्या बातमीत तसेच विकिवर पण त्यांचे नाव कमला देवी हॅरीस म्हटले आहे.

बारामती Agro लिमिटेड, ही कंपनी, कंत्राटी शेतीचे फायदे सांगत आहे...

https://www.baramatiagro.com/leadership

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2021 - 2:03 pm | श्रीगुरुजी

भाजपने आपल्याबरोबर युती करावी यासाठी शिवसेनेने भाजपला चांदीच्या वाटीत अक्षता घेऊन आमंत्रण दिले होते का? युतीसाठी कोण कासावीस झाले होते? आज शिवसेना जितकी घाणेरडी आहे तितकीच घाणेरडी जन्मापासून आहे. मग आताच शिवसेनेची घाण का नकोशी झाली?

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 5:07 pm | मुक्त विहारि

खासदारकीच्या वेळी तरी नक्कीच ....

आमच्या डोंबोलीत तरी, शिवसेनेचा उमेदवार, खासदारकीला उभा होता.. तेंव्हा, मोदींच्या नावावर मते मागीतली...

आग्या१९९०'s picture

6 Feb 2021 - 8:14 pm | आग्या१९९०

महाराष्ट्रात भाजपाचा सखाराम बाईंडर झाला आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी चंपाला आसरा द्यायचा परंतू सन्मानाची वागणूक द्यायची नाही , परंतू तीने व्यभिचार केला तर आकाशपाताळ एक करायचे. ढोंगी कुठले.

युती होती म्हणजे संगनमताने कोणता चेहरा पुढे करायचा हे ठरले असणार.
दोन्ही पक्षांचा वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रचार करण्या पेक्षा समान मुद्द्यावर प्रचार केला जाणार .
आणि मोदी चे नाव वापरण्यास तेव्हा BJP ची हरकत नव्हती .
जिथे आवश्यकता वाटली असेल तिथे बाळासाहेब चे नाव bjp ni पण वापरले असेल.

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 6:39 pm | मुक्त विहारि

शिवसेना फक्त वेळ काढू धोरण अवलंबीत होते ..

लोकसभा निवडणूकीत, मोदींच्या नावे मते मागीतली ... खरं तर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ ह्या भागात, भाजपचा उमेदवार येण्याची शक्यता असते... पण, लोकसभेच्या वेळी, ही जागा, शिवसेनेला दिली...

आमदारकीच्या वेळी देखील, असेच झाले ... कल्याण-डोंबिवली भागात, भाजपला सीट मिळाली. ऐनवेळी, शिवसेनेची मते फुटली आणि ती मते मनसेला मिळाली... इतके असूनही, भाजपचा उमेदवार निवडून आला...

शिवसेनेने फक्त भाजपचाच घात केला नाही तर, हिंदूत्वाच्या तत्वाला देखील तिलांजली दिली ...

आता डोंबिवली आणि कल्याण येथील, हिंदू हितवादी, शिवसेने बरोबर नाहीत... मनसेचे उमेदवार, भाजप बरोबर आले आहेत...

शिवसेनेने, हिंदू हितवादी समाजाच्या तोंडाला पाने पुसली...

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2021 - 8:25 pm | श्रीगुरुजी

अजिबात गरज नसताना शिवसेनेच्या गळ्यात पडून शिवसेनेच्या अटी मान्य करून युती करून भाजपने काय मिळविले? विनाकारण स्वतः कमी जागा लढवून शिवसेनेला ताकदीपेक्षा खूप जास्त जागा देऊन शिवसेनेच्या जास्त जागा निवडून आणायला मदत करण्याची गरज होती का? मग आता तक्रार का?

मुक्त विहारि's picture

6 Feb 2021 - 11:02 pm | मुक्त विहारि

हा प्रश्र्न एक किंवा दोन व्यक्तींपुरता नाही ....

शिवसेनेने माझ्या सारख्य काही हिंदू हितवादी लोकांना पण धोका दिला आहे ...

सत्ता काय, आज आहे तर उद्या नाही, पण विश्र्वास, एकदा गेला की गेलाच...

संजय दत्तला माफी देऊन, बाळासाहेब यांच्या वरचा, माझा विश्र्वास उडाला होताच की ....

पण आज सत्तेसाठी, शिवसेनेने संपूर्ण हिंदू समाजाचा वेठीस धरले आहे...

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2021 - 11:42 pm | श्रीगुरुजी

शिवसेना हा पक्ष कधीच हिंदुत्ववादी नव्हता/नाही/नसेल. तस्मात् या पक्षाने हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांना कधीही धोका दिलेला नाही किंवा हिदू समाजास वेठीसही धरलेले नाही.

पण, शिवसेना अद्यापही, स्वतःला हिंदूत्ववादीच समजते...

आजच्या लोकसत्तेत पण, अशीच भलामण केली आहे...

म्हणायला हिंदूत्ववादी आणि भरवायची अजान स्पर्धा...

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2021 - 8:32 am | श्रीगुरुजी

अयोध्येतील बाबरी मशीद आम्हीच हातोडे मारून उद्धस्त केली (ते सुद्धा मुंबईच्या बाहेर पाऊल न ठेवता), शिवसेना फक्त मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी लढते (ते सुद्धा मुंबई महापालिकेची कंत्राटे, विधानपरीषद व राज्यसभेतील आमदारकी खासदारकी उत्तर भारतीयांना देऊन), आमच्यामुळेच महाराष्ट्रात भाजप वाढला (ते सुद्धा यांना मुंबई महापालिकेच्या काही प्रभागांच्या बाहेर कोठेही अस्तित्व नसताना आणि भाजपचे महाराष्ट्राच्या सर्व भागात थोडेफार आमदार निवडून येत असताना आणि स्वत:चे लोकसभा उमेदवार भाजपच्या निवडणुक चिन्हावर निवडणुक लढत असताना) . . . असे सुद्धा हास्यास्पद दावे अजूनही शिवसेना करीत आहे.

मग आम्ही हिंदुत्ववादी आहोत (ते सुद्धा मुस्लिम लीग, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अशा मुस्लिमधार्जिण्या पक्षांशी युती करून) या शिवसेनेच्या समजुतीवर कसा विश्वास बसतो?

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 11:46 am | मुक्त विहारि

माझा पण बसला होता ...

दादा कोंडके, असतांना...

पण, नंतर, संजय दत्तला माफी दिली आणि विश्र्वास उडाला...

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2021 - 2:20 pm | श्रीगुरुजी

बघा, हिंदूंच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या तुमच्या हिंदुत्ववादी पक्षानेच पुन्हा एकदा एका हिंदुलाच मरेस्तोवर बदडले.

https://m.lokmat.com/crime/elderly-citizen-beaten-shiv-sainiks-front-pol...

चूक झाली ...

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 8:06 am | मुक्त विहारि

https://www.loksatta.com/maharashtra-news/pm-narendra-modi-shivsena-sanj...

कायदा हातात घेऊन, निवृत्त नौसैनिकाला मारहाण करणार्या कार्यकर्त्यांचे नेते, कायद्या बाबतीत बोलत आहेत ....

जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंका करते.

मुक्त विहारि's picture

28 Feb 2021 - 9:10 am | मुक्त विहारि

https://www.loksatta.com/mumbai-news/chief-minister-uddhav-thackeray-giv...

"जिलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा" आणि "केम छो वरली", हे बोर्ड, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच, मुंबईत लावले होते.

मुक्त विहारि's picture

1 Mar 2021 - 8:35 am | मुक्त विहारि

नंतर म्हणाले, तुमच्या कुटुंबाची काळजी ही तुमचीच जबाबदारी

आता म्हणतात ..... तुम्हीच जबाबदार ....

आलं अंगावर तर ढकलपंची करा ....

https://www.loksatta.com/pune-news/in-pune-774-new-corona-patients-were-...

आता हे पण, सामान्य माणसावर ढकला....बियर बार, हाॅटेल, मंदिरे, बागा, सिनेमा आणि नाट्य गृहे, उघडली की हे होणारच होते...

महाराष्ट्र सरकार अतिशय उत्तम काम करत आहे.
किती ही त्रास होत असला तरी bjp ला परत महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही.

मुक्त विहारि's picture

1 Mar 2021 - 1:20 pm | मुक्त विहारि

कुठली?

माहिती दिलीत तर उत्तम....

मुक्त विहारि's picture

4 Mar 2021 - 9:13 pm | मुक्त विहारि
मुक्त विहारि's picture

4 Mar 2021 - 9:34 pm | मुक्त विहारि
Rajesh188's picture

4 Mar 2021 - 10:32 pm | Rajesh188

मतदार च्या नालायक पना मुळे सर्वच पक्षात बलात्कारी,गुंड,लबाड लोक जन प्रतिनिधी आहेत.
भारता मध्ये सर्वच पक्षात नालायक लोक खूप आहेत.
त्या मध्ये bjp pan आहे.