दुबई : मरूभूमितले नंदनवन भाग-२

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
23 Dec 2020 - 5:51 pm

आधीचा भाग:

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग २

दिवस दुसरा :-
सकाळी साडेसातला उठून आवरल्यावर साडे आठला नाश्ता करण्यासाठी आम्ही खाली उतरलो. बुफे ब्रेकफास्टची व्यवस्था तळमजल्यावरच्या मलबारी व्यवस्थापन असलेल्या कॉफीशॉप मध्ये होती. तिथे ब्रेड, बटर, चीज, उकडलेली अंडी, ताजी फळे, सलाड, ज्यूस, चहा-कॉफी, दुध, कॉर्न फ्लेक्स, डोनट्स, पेस्ट्रीज अशा रोजच्या ठराविक पदार्थां व्यतिरिक्त उपमा, इडली फ्राय, इडली/मेदुवडा-सांबार, उत्तपा, मसाला डोसा, छोले भटुरे असे चविष्ट भारतीय पदार्थही आलटून पालटून खायला मिळत होते. एकदिवस तर आपल्या सर्वांची आवडती मिसळही होती. पण उसळ मात्र सुरवा सारखी आणि अत्यंत अळणी असल्याने मिसळीची चव आम्हाला अजिबात आवडली नसली तरी भारतभरात टाटा ग्रुपच्या 'जिंजर' ह्या हॉटेल शृंखलेत बुफे ब्रेकफास्टच्या मेनूत फार पूर्वीच हक्काचे स्थान मिळवलेला हा मराठमोळा पदार्थ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचल्याचे पाहून आनंद झाला होता.
एकदा फिरायला बाहेर पडल्यावर दुपारचे जेवण किती वाजता होईल ह्याचा काहीच भरवसा नसल्याने सकाळचा नाश्ता भरपेट होणे गरजेचे होते, आणि ती गरज पूर्ण करणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेला नाश्ता आम्हाला रोज मिळत होता ही फार समाधानकारक गोष्ट होती.

▲ कॉफीशॉप ▼

नाश्ता चालू असतानाच हॉटेलचा कर्मचारी पिक-अप साठी गाडी आल्याची वर्दी देऊन गेला होता. नऊ वाजताची वेळ पाळायला आम्हाला फार नाही पण दहा मिनिटे उशीरच झाला होता. बाहेर आल्यावर पाहिले तर काल सकाळी एअरपोर्ट ट्रान्सफर साठी आलेला हबीब तीच 'होंडा सीआर-व्ही घेउन आजच्या सिटी टूर साठी आलेला बघून थोडे आश्चर्य वाटले. कारण संध्याकाळच्या 'धाऊ क्रुझ' साठी पिक-अप करायला तूच येणार आहेस का? असे काल सकाळी त्याला विचारले असता, "काही सांगू नाही शकत, आमच्या कंपनीच्या ताफ्यात तीनशे पेक्षा जास्त गाड्या असून, व्यवस्थापक कुठल्या ड्रायव्हरला कुठे पाठवतील ह्याचा नेम नसल्याने पुन्हा आपली भेट होण्याची शक्यता खूपच कमी आहे" असे त्याने सांगितले होते.
पुन्हा भेट झाल्याचा आनंद व्यक्त करून त्याने सुचवलेल्या लाहोरी पकवान मधील जेवण आम्हाला फारच आवडल्याचे एकमुखाने सांगितल्यावर साहेबांची कळी छान खुलली.

आजच्या दिवसाचा आमचा कार्यक्रम दोन सत्रात विभागलेला होता. सकाळच्या पहिल्या सत्रात दुपारचे ऊन सहन होईल तोपर्यंत शक्य होतील तेवढी पर्यटनस्थळे बघणे आणि दुसऱ्या सत्रात संध्याकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत क्षेत्रफळाच्या निकषावर जगातला सगळ्यात मोठा असलेल्या ' द दुबई मॉल ' मध्ये भटकंती, त्याच आवारात होणारा अतिशय प्रेक्षणीय असा ' द दुबई फाउंटन शो ' पहाणे आणि जगातली सर्वात उंच इमारत अशी ख्याती असलेल्या ' बुर्ज खलिफा ' च्या १२४ आणि १२५ व्या मजल्यावरील ' ॲट द टॉप ' (At the Top, Burj Khalifa) ह्या ऑब्झर्वेशन डेक वरून दुबईचे विहंगम दर्शन असा एकंदरीत कार्यक्रम होता.
सकाळच्या सत्रात आम्ही आधी पासून बघण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीत 'दुबई म्युझियम' आणि 'जुमेरा बीच' अशा दोनच स्थळांचा समावेश होता. काल रात्री जलसफरीतून बघितलेला दुबई मरीना परिसर दिवसा कसा दिसत असेल ह्याची उत्सुकता निर्माण झाल्याने त्या यादीत आणखीन एका ठिकाणाची भर पडली होती. बाकी वाटेत जे लागेल ते बघायचे असे ठरवले असल्याने ही भटकंती तशी अनियोजित स्वरुपाची होती. तशी कल्पना हबीबला दिली आणि स्थलदर्शनाची सुरुवात हॉटेलपासून सुमारे साडेसहा कि.मी. अंतरावर असलेल्या दुबई म्युझियम पासून करायचे ठरले.

बर दुबई भागातील अल सुक अल कबीर (मीना बझार) परिसरात १७८७ साली बांधलेल्या 'अल फाहीदी' किल्ल्याचे (Al Fahidi Fort) १९७१ साली दुबईचे तत्कालीन शासक दिवंगत 'शेख रशीद बिन सईद अल मकतूम' यांच्या कारकिर्दीत नूतनीकरण करून, दुबईचा इतिहास आणि मूळ वारसा दर्शविणार्‍या संग्रहालयात रुपांतर करण्यात आले. पुढे १९९५ मध्ये शेजारीच आणखीन एक भूमिगत संग्रहालय (Underground Museum) निर्माण करून ते जुन्या संग्रहालयाला (किल्ल्याला) जोडले गेले. प्रवाळाचे दगड आणि जिप्समचा वापर करून बांधलेल्या ह्या चौकोनी आकाराच्या किल्ल्याच्या चारपैकी तीन कोपऱ्यांत एक आयताकृती आणि दोन गोल बुरुज आहेत. दुबईत अस्तित्वात असलेली एकमेव सर्वात प्राचीन वास्तू अशी ओळख असलेल्या ह्या लहानशा किल्ल्याला खरंतर किल्ल्यापेक्षा गढी म्हणणे जास्ती योग्य ठरेल.

Drone View of Dubai Museum
▼ दुबई म्युझियम (ड्रोन इमेजेस)


अल फाहीदी किल्ला


जमिनीवरील संग्रहालय


इथे खाली भूमिगत संग्रहालय आहे

×

▲ क्लिक केल्यास फोटो एनलार्ज/मिनिमाइज़ होतील

पंधरा-वीस मिनिटांचा प्रवास करून साडेनऊच्या सुमारास ह्याठिकाणी पोचल्यावर किल्ल्यात प्रवेश करून प्रत्येकी तीन दिरहमची तिकिटे काढून आम्ही संग्रहालय पाहायला सुरुवात केली.
मधल्या मोकळ्या जागेत काही तोफा, पूर्वी मासेमारी आणि सागरतळातून मोती काढण्यासाठी आणि प्रवासासाठी वापरात असलेल्या लहान आकाराच्या लाकडी होड्या, एक लाकडी रहाट बसवलेली कोरडी विहीर, दोरखंडाच्या सहाय्याने समुद्रातून होड्या-नौका किनाऱ्यावर ओढून घेण्यासाठी वापरले जाणारे (चरका सारखे) लाकडी यंत्र, एक पाणी साठवण्याची लाकडी टाकी आणि १९५० च्या दशकातील अमिराती लोकांचे पाम वृक्षाच्या झावळ्या/फांद्या आणि लाकडा पासून तयार केलेले घर, त्यातले फर्निचर आणि स्वैपाकघर अशा गोष्टी पहायला मिळतात आणि तटाला लागून असलेल्या बंदिस्त व्हरांड्यात अनेक फोटो, हत्यारे, वाद्ये अशा वस्तू प्रदर्शित केल्या आहेत
किल्ल्याच्या प्रवेशद्वारा समोरील डाव्या बाजूच्या गोल बुरूजातून भूमिगत संग्रहालयात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. 'द सुक 1950 'ही १९५० च्या दशकातील बाजारपेठ, अमीराती लोकांची त्यावेळची जीवनशैली, पोषाख, अलंकार, दैनंदिन जीवन, कामकाज, मदरशातील शिक्षण आणि 'मरीन गॅलरी' मधील 'धाऊ' निर्मितीचा कारखाना, आपल्या डोक्यावर टांगलेल्या होडीतून पायाला दोरी बांधून पाण्यात बुडी मारून सागरतळातून मोती काढणारा पाणबुड्या असे स्त्री, पुरुष, लहान मुले, प्राण्यांचे पूर्णाकृती पुतळे आणि खरोखरच्या वस्तू वापरल्याने जिवंत भासणारे देखावे प्रेक्षणीय आहेत. तसेच १९३० पासून १९८० पर्यंतचा कालखंड दर्शवणारे फोटो माहितीदायक आहेत.
दुबईचा इतिहास हा जेमतेम अडीच-तीनशे वर्षे जुना असल्याने १९६९ साली जुमेरा येथे उत्खननात सापडलेल्या नवव्या शतकातील थोड्याफार पुरातन वस्तू सोडल्यास ह्या संग्रहालयात फार काही प्राचीन/अतिप्राचीन वस्तू बघायला मिळत नसल्या तरी अवघ्या पन्नास साठ वर्षात अमिराती लोकांचा मागास-आदिवासी जीवनशैली ते आजच्या अल्ट्रा मॉडर्न-सुखवस्तू जीवनशैली पर्यंत झालेला प्रवास बघून खरोखर थक्क व्हायला होते. अर्थात इथल्या भूमिगत संग्रहालयाची निर्मिती हेच स्थित्यंतर दर्शवण्याच्या उद्देशाने झाली असून त्यात यु.ए.इ. चे उपराष्ट्र्पती आणि पंतप्रधान व दुबईचे शासक अशी तिहेरी भूमिका निभावणारे 'शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम' साहेब नक्कीच यशस्वी झाले आहेत.

दुबई म्युझियम - स्लाइड शो


▲ म्युझियमचे प्रवेशद्वार

1 of 50


▲ म्युझियमचा नकाशा

2 of 50


▲ लहान होडी (धाऊ)

3 of 50


▲ लहान होडी (धाऊ)

4 of 50


▲ लहान होडी (धाऊ)

5 of 50


▲ लहान होडी (धाऊ)

6 of 50


▲ होड्या ओढण्याचे यंत्र

7 of 50


▲ ब्राँझची तोफ

8 of 50


▲ विहीर आणि रहाट

9 of 50


▲ लाकडी पाण्याची टाकी

10 of 50


▲ पारंपारिक घर

11 of 50


▲ पारंपारिक घर

12 of 50


▲ पारंपारिक घर

13 of 50


▲ पारंपारिक घर

14 of 50


▲ पारंपारिक घर

15 of 50


▲ पारंपारिक स्वैपाकघर

16 of 50


▲ पारंपारिक स्वैपाकघर

17 of 50


▲ पारंपारिक वाद्ये / शस्त्रे

18 of 50


▲ पारंपारिक पोषाख

19 of 50


▲पारंपारिक आभूषणे

20 of 50


▲लोकजीवन

21 of 50


▲लोकजीवन

22 of 50


▲लोकजीवन

23 of 50


▲लोकजीवन

24 of 50


▲लोकजीवन

25 of 50


▲लोकजीवन

26 of 50


▲लोकजीवन

27 of 50


▲लोकजीवन

28 of 50


▲माहितीदायक फोटो

29 of 50


▲माहितीदायक फोटो

30 of 50


▲१९५० च्या दशकातील बाजारपेठ

31 of 50


▲खजूर विक्रेता

32 of 50


▲जडीबुटी-मसाल्यांचे दुकान

33 of 50


▲मोत्यांचे व्यापारी

34 of 50


▲कपड्यांचे दुकान

35 of 50


▲चहा-कॉफी-हुक्का धाबा

36 of 50


▲सोनाराचे दुकान

37 of 50


▲भांड्यांचे दुकान

38 of 50


▲सुताराचे दुकान

39 of 50


▲लोहाराचे दुकान

40 of 50


▲शिंप्याचे दुकान

41 of 50


▲अन्न-धान्याचे दुकान

42 of 50


▲मासे विक्रेता

43 of 50


▲धाऊ निर्मिती

44 of 50


▲धाऊ निर्मिती

45 of 50


▲धाऊ निर्मिती

46 of 50


▲९व्या शतकातील वस्तू

47 of 50


▲९व्या शतकातील वस्तू

48 of 50


▲९व्या शतकातील वस्तू

49 of 50


स्लाईड शो समाप्त

50 of 50


प्रेक्षणीय असूनही अत्यंत माफक प्रवेश शुल्क आकारले जाणारे हे संग्रहालय पाहून सव्वा दहाला आम्ही बाहेर पडलो आणि दिवसा उजेडी पहायची उत्सुकता निर्माण झालेला दुबई मरीना परिसर पाहण्यासाठी इथून ३० कि.मी. वर असलेल्या 'मरीना वॉकवे' (Marina Walkway) साठीचा प्रवास सुरु झाला. वास्तविक 'मरीना वॉक वे' हे आमच्या प्रवासाच्या मार्गावरील सर्वात शेवटचे ठिकाण होते, परंतु त्याठिकाणी बराच वेळ पायी फिरायचे असल्याने नंतरच्या वाढत्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी आधी तिथे जाऊन मग परतीच्या प्रवासात उर्वरित ठिकाणे बघण्याची हबीबने केलेली सूचना रास्त वाटल्याने त्याप्रमाणेच करण्याचे ठरवले.

मरीना गेटच्या जवळ मुख्य रस्त्यावरून किनारी पदपथावर (Marina Promenade) उतरण्यासाठी पायऱ्या असलेल्या एका ठिकाणी हबीबने आम्हाला गाडीतून उतरवले. तिथून चालायला सुरुवात केल्यावर सुमारे पाउण-एक तास चालणारी आणि अडीच-तीन किलोमीटर अंतराची आमची ती पदयात्रा, कालव्याच्या दोन्ही किनाऱ्याना जोडणारे चार फ्लायओव्हर्स मागे टाकल्यावर लागणाऱ्या 'मरीना वॉकवे' पर्यंत पोचल्यावर संपणार होती. त्याठिकाणी हबीब आमची वाट पहात थांबणार होता.

Drone View of Dubai Marina
▼ दुबई मरीना (ड्रोन इमेजेस)

×

शनिवारचा सुट्टीचा दिवस (इथला विकेंड शुक्रवार - शनिवार असतो) त्यात सकाळी अकरा-सव्वा आकाराची वेळ असल्यामुळे रविवार ते गुरुवार दिवसा आणि रोज संध्याकाळी स्थानिकांच्या आणि पर्यटकांच्या लक्षणीय उपस्थितीने फुलून जाणाऱ्या ह्या परिसरात त्यावेळी अजिबात गर्दी नव्हती. अगदी तुरळक संख्येत पर्यटक त्यावेळी तिथे आले असल्याचे आमच्या पथ्यावरच पडले. मस्तपैकी रमत गमत, आजूबाजूच्या आधुनिक स्थापत्यशास्त्राचा अविष्कार असलेल्या वैविध्यपूर्ण आकाराच्या इमारती न्याहाळत, कालव्याच्या वळणा वळणांच्या किनारी पदपथावर भटकंती करायला खूप मजा आली.

▼ मरीना वॉकवे - स्लाईड शो.


.

1 of 20


.

2 of 20


.

3 of 20


.

4 of 20


.

5 of 20


.

6 of 20


.

7 of 20


.

8 of 20


.

9 of 20


.

10 of 20


.

11 of 20


.

12 of 20


.

13 of 20


.

14 of 20


.

15 of 20


.

16 of 20


.

17 of 20


.

18 of 20


.

19 of 20


.

20 of 20


बाराच्या सुमारास 'मरीना वॉकवे' येथे भेटण्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीत बसून परतीच्या प्रवासातले पहिले ठिकाण असलेल्या जुमेरा बीचला जायला आम्ही निघालो आणि वीसेक मिनिटांत त्याठिकाणी पोचलो. भर दुपारी साडेबाराची वेळ असूनही दोन दिवसांपूर्वी दुबईत भरपूर पाउस पडलेला असल्याने ऊन असले तरी गर्मी अशी विशेष जाणवत नव्हती. मुंबई सारखेच ३५ ते ३७ ℃ च्या दरम्यानचे तापमान त्यावेळी होते.
छान स्वच्छ निळसर पाणी आणि सफेद वाळूचा किनारा लाभलेला हा जुमेरा बीच पोह्ण्यासाठीही अतिशय सुरक्षित असल्याने स्थानिक लोक आणि पर्यटकांमध्ये फार लोकप्रिय आहे. ह्याठिकाणी पोशाखावर कुठलेही निर्बंध नसल्याने स्त्रिया अगदी मोकळेपणी बिकिनी व टँकिनी घालून पोहताना व सूर्यस्नान घेत वाळूवर पहुडलेल्या दिसतात. समुद्रस्नान झाल्यावर अंघोळीसाठी शॉवर आणि चेंजिंग रुमच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत.

Jumeirah Beach
▼ जुमेरा बीच

×

पंधरा वीस मिनिटे बीचवर घालवून मग आता पहिल्या सत्रातील शेवटचे ठिकाण 'एतिहाद म्युझियम' (Etihad Museum) बघण्यासाठी आम्ही निघालो. पंधरा-सोळा किलोमीटरचा हा प्रवास वीस मिनिटांत पार पडला. सकाळी मरीना वॉकवे साठी जाताना एक वेगळ्याच आकाराची नवी कोरी वास्तू रस्त्याच्या उजव्या बाजूला दिसली होती. ते काय आहे अशी विचारणा हबीब कडे केली असता "हे दोन-तीन महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेले एतिहाद म्युझियम आहे, मी अजून बघितले नाहीये पण तिथे भेट दिलेल्या तीन-चार पर्यटकांनी ते फार छान असल्याचे सांगितले आहे." अशी माहिती त्याने दिली होती. त्या म्युझियमच्या नाविन्यपूर्ण अशा कलात्मक आकारामुळे ते पाहण्याची इच्छा आम्हाला झाली असल्याने प्रत्येकी २५ दिरहमचे तिकीट काढून आम्ही त्या संग्रहालयात प्रवेश केला.

Etihad Museum
▼ एतिहाद म्युझियम


.हा फोटो जालावरून साभार

×

'एतिहाद' ह्या अरबी शब्दाचे मराठीत अर्थ 'ऐक्य', 'एकीकरण', 'संघटन' असे आहेत. २ डिसेंबर १९७१ रोजी मध्यपूर्वेतील अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन व फुजैरा ह्या सहा अमिरातींनी एकत्र येऊन 'युनायटेड अरब एमिरेट्स' (UAE) नावाच्या देशाची निर्मिती केली. रस अल-खैमा ही सातवी अमिरात त्यात नंतर १० फेब्रुवारी १९७२ रोजी सामील झाली. सातही अमिरातींच्या शासक असलेल्या शेख मंडळींनी ज्या युनियन हाऊस (Union House) नावाच्या ऐतिहासिक वास्तूत एकत्रीकरणाच्या कागदपत्रांवर सह्या करून युनायटेड अरब एमिरेट्स ह्या नव्या देशाची राज्यघटना अस्तित्वात आणली त्या जुन्या युनियन हाऊसच्या आवारातच ह्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांना देशाचा इतिहास आणि प्रगती दर्शवण्यासाठी बांधण्यात आलेल्या एतिहाद म्युझियमचे ६ जानेवारी २०१७ रोजी उद्घाटन झाले, आणि १ एप्रिल २०१७ रोजी उद्घाटन होऊन तीन महिनेही पूर्ण झाले नसताना आम्हाला ते बघण्याचा योग आला होता.
एकदम प्लश अँबियन्स आणि उच्च दर्जाच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा केलेला पुरेपूर वापर ह्या वैशिष्ठ्यांमुळे एकविसाव्या शतकातील संग्रहालय कसे असावे त्याचे हे एतिहाद म्युझियम एक उत्कृष्ठ उदाहरण आहे.
सात अमिरातींच्या एकत्रीकरणाच्या हस्तलिखित दस्तऐवजाची घडी घातल्या सारखा दिसेल अशा आकाराचा पहिला मजला आणि त्या दस्तऐवजावर सह्या करण्यासाठी वापरलेल्या सात फाउंटन पेनांसारखे दिसतील असे त्याला तोलून धरणारे तळमजल्याचे एका रांगेतील सात तिरके खांब अशा संकल्पनेवर आधारित बांधकाम केलेल्या ह्या म्युझियम मध्ये अनेक शाही वस्तू ज्यात सातही अमिरातींच्या शासकांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, त्यांचे पासपोर्ट्स, फोटो, हत्यारे, कपडे तसेच सोन्या-चांदीची नाणी अशा गोष्टी तर प्रदर्शित केल्या आहेतच, पण त्या जोडीला माहिती देण्यासाठी हॉलिवूडच्या Sci-Fi चित्रपटांमध्ये आपण पाहतो तशा डिजिटल स्क्रीन्स, डिजिटल टेबलटॉप्स, इंटरॲक्टीव्ह नकाशे आणि गाईड्स अशी अत्याधुनिक उपकरणे, डॉक्युमेंटरी फिल्म दाखवणारे छोटेखानी थेटर आणि भारतातील वर्तमानपत्रासाठी फोटो काढण्याच्या कामासाठी म्हणून १९६५ साली दुबईत पहिले पाउल टाकणारे व पुढच्या ५० वर्षांतील यु.ए.इ. तील सर्व महत्वाच्या घटना आणि व्यक्तींना आपल्या कॅमेरात बंदिस्त करून फोटो रूपाने अजरामर करणारे भारतीय फोटोग्राफर ते रॉयल फोटोग्राफर अशी ओळख कमावलेले श्री. रमेश शुक्ला ह्यांच्या कार्याचा सन्मान करणारी तिथली प्रशस्त फोटो गॅलरी हे सर्व खूप प्रेक्षणीय आहे. १९५७ साला पर्यंत दुबई आणि आजूबाजूच्या अनेक प्रांतात चलन म्हणून भारतीय रुपया वापरला जात होता ही माहिती आम्हाला तिथेच समजली.
Etihad Museum

▼ एतिहाद म्युझियम - स्लाईड शो.


.

1 of 34


.

2 of 34


.

3 of 34


.

4 of 34


▲ वरच्या रांगेत पूर्वी तिथे चलनात असलेल्या भारतीय नोटा आणि नाणी.

5 of 34


.

6 of 34


.

7 of 34


.

8 of 34


.

9 of 34


.

10 of 34


.

11 of 34


.

12 of 34


▲ एकत्रीकरणाचे हस्तलिखित.

13 of 34


.

14 of 34


.

15 of 34


.

16 of 34


.

17 of 34


.

18 of 34


.

19 of 34


.

20 of 34


.

21 of 34


.

22 of 34


.

23 of 34


▲ श्री. रमेश शुक्ला ह्यांना समर्पित फोटो गॅलरी

24 of 34


.

25 of 34


.

26 of 34


.

27 of 34


.

28 of 34


▲ युनियन हाऊस

29 of 34


▲ युनियन हाऊसचा अंतर्भाग

30 of 34


▲ दुबईच्या शेख साहेबांचे जुने कार्यालय.

31 of 34


▲ कॉन्फरन्स हॉल

32 of 34


▲ कॉन्फरन्स हॉल

33 of 34


▲ डाइनिंग हॉल

34 of 34


Etihad Museum at night
▼ एतिहाद म्युझियमचे रात्रीचे रूप


.हा फोटो जालावरून साभार

म्युझियम बघून बाहेर पडेपर्यंत दोन वाजले होते. तिथून नऊ कि.मी. वर असलेल्या आमच्या हॉटेलवर पोहोचेपर्यंत सव्वा दोन वाजले. सुट्टीच्या दिवस असल्याने पहिल्या सत्रातील प्रवासात तरी कुठेही ट्राफिक जाम लागला नव्हता. आता पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले असल्याने हबीबचा निरोप घेऊन आम्ही जेवायला लाहोरी पकवान मध्ये शिरलो. कोक स्टुडीओचा एपिसोड बघत-ऐकत जेवण झाल्यावर रूमवर पोहोचायला साडेतीन वाजले.

संध्याकाळच्या भटकंतीसाठी पिक-अप करायला पाच वाजता हबीब पुन्हा येणार होता त्यामुळे झोप काढण्या एवढा वेळ हाताशी नसला तरी तासभर टी.व्ही. वर म्युझिक चॅनल लाऊन, बेडवर लोळत पडून आराम करणे सहज शक्य असल्याने मग तसेच केले. रुममध्ये इलेक्ट्रिक केटल आणि हवे तेव्हा चहा कॉफी बनवून पिण्यासाठी आवश्यक साधन सामुग्री होती, पण टी बॅग्स वापरून बनवलेल्या चहा पेक्षा छान उकळवून बनवलेल्या चहाची चवच न्यारी वाटत असल्याने साडेचारला रूमसर्व्हिस ला फोन करून मस्तपैकी मसाला चहा मागवून प्यायला.
तयार होऊन पाचला पाच मिनिटे कमी असताना आम्ही खाली उतरलो तेव्हा पाच-दहा मिनिटे वेळेआधीच पोचण्याच्या परंपरेचे पालन करत हबीब हॉटेल बाहेर येऊन उभा होता. हॉटेलपासून दुबई मॉल पर्यंतचे चौदा कि.मी. अंतर त्यावेळीही ट्राफिक न लागल्याने वीसेक मिनिटांत पार करून साडेपाचच्या थोडे आधीच तिथे पोचलो. इथे येतानाच्या रस्त्यात लांबून एक मोठी, पिरॅमिड सदृश्य आकर्षक ईमारत दिसली होती आणि आमच्या ड्रायव्हर-कम-गाईड हबीब साहेबांना तिच्याबद्दल विचारले असता समजले की तो 'वाफी मॉल' चा परिसर असून, ती पिरॅमिडच्या आकाराची ईमारत 'रॅफल्स' ह्या पंचतारांकित हॉटेलची आहे.. त्याठिकाणी मिनी इजिप्त साकारला असून ते एक अत्यंत प्रेक्षणीय स्थळ असूनही इथल्या बाकीच्या आकर्षणांच्या मानाने बरेच अप्रसिद्ध आणि दुर्लक्षित राहिले आहे. आमचा आजचा बुर्ज खलिफा आणि परिसराचा कार्यक्रम रात्री नऊ पर्यंत आटपला तर थोडी वाट वाकडी करून आम्हाला तिथे धावती भेट देणे शक्य आहे.

'दुबई डाउनटाउन' ह्या तिथल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या व्यापारी + निवासी अशा मिश्र वापर संकुलात हा अतिभव्य मॉल आहे. 'दुबई फाउंटन' आणि 'बुर्ज खलीफा' आणि 'ॲड्रेस डाउनटाउन' (Address Downtown) हे पंचतारांकित हॉटेल देखील ह्याच २ वर्ग किलोमीटर आकाराच्या संकुलात आहेत.
चारशे पेक्षा जास्त 'शार्क' व 'रे' मासे आणि तेहतीस हजारांहून जास्ती संख्येने इतर जलचर ठेवलेले, जगातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे 'दुबई ॲक्वेरीयम' आणि 'अंडर वॉटर झु' ( Dubai Aquarium & Underwater Zoo) ह्या मॉल मध्ये आहे. नुसते ॲक्वेरीयम बघायला कोणतेही शुल्क लागत नाही पण 'अंडर वॉटर झु' बघण्यासाठी आणि त्या प्रचंड मोठ्या ॲक्वेरीयम मध्ये 'स्कुबा डायव्हिंग' किंवा 'स्नॉर्केलिंग' करण्यासाठी वेगळी तिकिटे काढावी लागतात.
ऑलिम्पिक साईझची 'आईस रिंक' ( Dubai Ice Rink), २२ स्क्रीन्स्चे मल्टीप्लेक्स, भितीदायक अनुभव देणारे 'हिस्टेरिया' (Hysteria) नावाचे हॉन्टेड हाऊस, आभासी वास्तवाची (virtual reality) अनुभूती देणारे VR Park, दुबई ऑपेरा (Dubai Opera), १५५ दशलक्ष वर्षे जुना महाकाय डायनोसॉरचा सांगाडा 'दुबई डायनो' (Dubai Dino) आणि इनडोअर इलेक्क्ट्रिक गो-कार्टिंग साठी 'इकार्ट झबील' (Ekart Zabeel) अशी सर्व वयोगटातील पर्यटकांना रिझवणारी अनेक आकर्षणे इथे आहेत.

Dubai mall
▼ द दुबई मॉल


▲ फोटो जालावरून साभार ▼

×

इथले प्रत्येक आकर्षण पाहायला आणि १२०० हून जास्त दुकाने आणि २०० पेक्षा जास्ती उपहारगृहे असलेला हा मॉल पूर्णपणे फिरायला दोन दिवसही कमीच पडतील. इथे खरेदी काहीच करायची नव्हती त्यामुळे आम्ही सव्वा तासात फिरता फिरता सहज बघता येणारी ठिकाणे जसे की, ॲक्वेरीयम, आईस रिंक, दुबई डायनो आणि बाहेरून दुबई ऑपेरा तेवढे पाहिले. 'ॲट द टॉप' साठी आम्हाला साडेसातची वेळ मिळाली होती आणि त्याआधी अर्धातास तिथल्या काउंटरवर रिपोर्टिंग करायचे असल्याने मग बुर्ज खलिफाच्या दिशेने आमचा मोर्चा वळवला.

Burj Khalifa
▼ बुर्ज खलिफा (ड्रोन इमेजेस)

×

काउंटरवर जाऊन साडेसातच्या बॅच साठी लिफ्ट मधली आमची जागा नक्की केल्यावर मग तिथेच लॉबीत, विक्रीपूर्व प्रसिद्धी आणि नोंदणीसाठी प्रदर्शित केलेल्या 'टेस्ला' च्या दोन नवीन इलेक्ट्रिक कार्सचे निरीक्षण करत, फोटो काढत टाईमपास केला आणि सव्वा सातला लिफ्टच्या रांगेत जाऊन उभे राहिलो. तिथल्या एका डेकवर एकावेळी १२-१५ जणांना सामावून घेणाऱ्या, मजला, मीटर्स मधे उंची व लागणारा वेळ दर्शवणारे डिजिटल डीस्प्ले असलेल्या दरवाजांच्या आणि अक्षरशः साठ सेकंदात १२४ व्या मजल्यावर पोचवणाऱ्या वेगवान डबल डेकर लिफ्टस अफलातून आहेत.
▼ खाली येत असलेली लिफ्ट

१२४ व्या मजल्यावरच्या ऑब्जर्वेशन डेकवर पोचल्यावर ज्या उंचीवर आम्ही उभे होतो त्यापेक्षा खालून उडत जाणारे कोस्ट गार्ड वाल्यांचे हेलिकॉप्टर पाहून मात्र आपण खरोखरच 'ॲट द टॉप' आहोत असे वाटले. खाली सुरु असलेला 'फाउंटन शो' पण एवढ्या उंचीवरून बघायला खूपच विलोभनीय वाटत होता. १२५ व्या मजल्यावरून ३६० अंशात दिसलेले रंगीबेरंगी प्रकाशानी उजळलेल्या संपूर्ण दुबईचे दृश्य तर शब्दातीत आहे. जगातल्या ह्या सर्वात उंच इमारतीत घर असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार 'मोहनलाल' आणि बॉलीवूड सिनेतारका शिल्पा शेट्टी अशा दोघा ज्ञात असलेल्या भारतीयांचा फार अभिमान वाटला.
सुमारे पंचवीस मिनिटे ऑब्जर्वेशन डेकवर व्यतीत करून लिफ्टने पुन्हा एका मिनिटात खाली आलो आणि पुढचा कार्यक्रम 'द दुबई फाउंटन शो' बघायला आम्ही बुर्ज खलिफा तळ्यावर (Burj Khalifa Lake) पोचलो.
तीस एकर क्षेत्रफळ व्यापणाऱ्या ह्या मानवनिर्मित कृत्रिम तळ्यात संगीताच्या तालावर रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात पाण्याचे फवारे नाचवणाऱ्या विशाल कारंज्याची यंत्रणा बसवलेली आहे. ह्या कारंज्याची लांबी ९०० फुटांहून अधिक असून ५०० फुट उंचीपर्यंत पाणी वरती उडवण्याची त्यातल्या फवाऱ्यांची क्षमता आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत दर अर्ध्या तासानी चार-पाच मिनिटांसाठी होणारा अरबी, इंग्लिश, हिंदी गाण्यांवर नृत्यदिग्दर्शित केलेला पाण्याचा हा नाच प्रेक्षकांना वेड लावतो!
आम्हाला त्यावेळी मायकल जॅक्सनच्या 'थ्रिलर' ह्या गाण्यावरील परफॉर्मन्स बघायला मिळाला होता. त्या दृश्याचे वर्णन करणे अशक्य आहे. खाली 'दुबई डाउनटाऊन' च्या स्लाईड शो मध्ये त्या दृश्याचे काही फोटो देत आहेच, पण ज्यांना अशा गोष्टींमध्ये रुची असेल त्यांच्यासाठी युट्यूब वरील दोन व्हिडिओ इथे एम्बेड करत आहे. पहिला व्हिडिओ तसा जुना म्हणजे २००९ सालचा आणि अरबी गाण्यावरचा असला तरी त्यात अगदी १००% नसला तरी फाउंटनचा बराचसा भाग फ्रेम मध्ये येत असल्याने त्याची निवड केली आहे. दुसरा व्हिडीओ काही विशिष्ठ/खास कारणांसाठी बुर्ज खलीफावर ज्यावेळी लाईट शो असतो त्यावेळचे दृश्य कसे दिसते ते दाखवणारा आहे.

पाच मिनिटे चाललेला हा पाण्याचा नृत्याविष्कार पाहून झाल्यावर मग पुन्हा दुबई मॉल मध्ये दहा वाजेपर्यंत फिरत वेळ घालवण्यापेक्षा येताना लांबून दर्शन झालेला 'वाफी मॉल' (Wafi Mall) बघण्यासाठी जायला पार्किंग लॉट मध्ये पोचलो. तिथे गाडी शोधण्यात पाच-सात मिनिटे गेली आणि मग साडे आठच्या सुमारास आम्ही तिथून निघालो.
दुबई मॉल, बुर्ज खलिफा आणि दुबई फाउंटन ह्या 'दुबई डाऊनटाऊन' परिसरातील निवडक फोटोंचा स्लाईड शो.

▼ दुबई डाऊनटाऊन - स्लाईड शो.


.

1 of 28


.

2 of 28


.

3 of 28


.

4 of 28


.

5 of 28


.

6 of 28


.

7 of 28


.

8 of 28


.

9 of 28


.

10 of 28


.

11 of 28


.

12 of 28


.

13 of 28


.

14 of 28


.

15 of 28


.

16 of 28


.

17 of 28


.

18 of 28


.

19 of 28


.

20 of 28


.

21 of 28


.

22 of 28


.

23 of 28


.

24 of 28


.

25 of 28


.

26 of 28


.

27 of 28


.

28 of 28


दुबई मॉल पासून आमच्या परतीच्या रस्त्यावर केवळ आठ कि.मी. वरच्या 'वाफी सिटी' येथे १९९१ साली सुरु झालेला हा 'वाफी मॉल' खरोखर खूप सुंदर आहे. आधी ह्या ठिकाणाबद्दल माहिती असती तर किमान तीन तासांचा वेळ नक्कीच राखून ठेवता आला असता अशी चुटपूट आम्हाला इथल्या तासाभराच्या धावत्या भेटीनंतर लागून राहिली!

▼ वाफी मॉल (फोटो जालावरून साभार)

ह्या मॉलचे बांधकाम इजिप्त मधील कर्नाक टेम्पल, पिरॅमिड्स आणि फॅरोंचे पुतळे अशा थीमवर आधारित आहे. त्या जोडीला १४ व्या शतकातील बगदाद शहरातील बाजाराचे स्वरूप दिलेला इथला 'खान मुरजान सुक' (Khan Murjan Souk) इजिप्शियन, सिरीयन, टर्कीश आणि मोरोक्कन स्थापत्याचा प्रभाव असलेले ह्याचे खरेदी आणि खान-पानाचे चार विभाग आपल्याला अरेबियन नाईट्स वाचून परिचित झालेल्या वातावरणात घेऊन जातात. अत्यंत सुंदर असूनही आश्चर्यकारकरित्या हा मॉल दिवसही तसा ओस पडलेलाच असतो. आत्ताही रात्रीची वेळ असल्याने इथे फारसे कोणीच नव्हते. हाताशी कमी असलेल्या वेळात शक्य तेवढा नजारा डोळ्यांत साठवून घेत आणि थोडेफार फोटो काढले.
दुबई भेटीनंतर अवघ्या दहा महिन्यांनी जेव्हा एकट्याने परदेशी पर्यटनाला जाण्याचा योग आला, तेव्हा क्षणार्धात इजिप्तला जाण्याचा विचार पक्का झाला त्यात ह्या मॉलनी महत्वाची भूमिका बजावली असावी. इजिप्शियन शैलीतील जी शिल्पे, ओबिलीस्कच्या प्रतिकृती ह्या ठिकाणी पाहिल्या होत्या, त्यांनी मनाच्या सुप्त कोपऱ्यात त्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहण्याची निर्माण केलेली ओढ तो निर्णय घेताना प्रभावी ठरली असावी असे आता हा लेख लिहिताना राहून राहून वाटतंय.

▼ वाफी मॉल - स्लाईड शो.


.

1 of 26


.

2 of 26


.

3 of 26


.

4 of 26


.

5 of 26


.

6 of 26


.

7 of 26


.

8 of 26


.

9 of 26


.

10 of 26


.

11 of 26


.

12 of 26


.

13 of 26


.

14 of 26


.

15 of 26


.

16 of 26


.

17 of 26


.

18 of 26


.

19 of 26


.

20 of 26


.

21 of 26


.

22 of 26


.

23 of 26


.

24 of 26


.

25 of 26


.

26 of 26


पावणे दहाला आम्ही गाडीपाशी परत आलो. आता भूकही लागली होती त्यामुळे जेवण करण्यासाठी आम्हाला थेट 'लाहोरी पकवान' ला सोडायला हबीबला सांगितले. पंधरा मिनिटांत तिथे पोचल्यावर त्याला बक्षीस देण्यासाठी दुपारीच २५ दिरहम भरून तयार करून ठेवलेले पाकीट देऊ केल्यावर त्याने ते घेण्यास विनम्रपणे नकार दिला. आमच्या देशातून फार कोणी इथे पर्यटनासाठी येत नाहीत, त्यात कोणी आलेच तरी ते आपल्या मित्र मंडळींकडे मुक्काम करतात आणि त्यांच्याच बरोबर फिरत असल्याने आमच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे तुमच्या सारखे भारतीय पर्यटक भेटतात तेव्हा त्यांच्याशी दुसऱ्या कुठल्या भाषेत न बोलता आपल्या सामाईक हिंदी+उर्दू अशा मिश्र भाषेत संवाद साधता येतो हेच आमच्यासाठी मोठे बक्षीस असते असे त्याने सांगितले.
त्याचे आभार मानून निरोप घेतला आणि मग लाहोरी पकवान मध्ये चविष्ट जेवण झाल्यावर अकरा वाजता रूमवर परतलो. उद्या सकाळी 'पाम आयलंड्स' (Palm Islands) वरच्या 'अटलांटीस' (Atlantis, The Palm) हॉटेल मधल्या 'द लॉस्ट चेंबर ॲक्वेरीयम' (The Lost Chambers Aquarium) आणि अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क (Aquaventure Waterpark) अशा पूर्ण दिवसाच्या सहलीसाठी सकाळी नऊ वाजता पिकअप होता. आज सकाळी नाश्ता व्हायला उशीर झाल्याच्या अनुभवावरून उद्या सकाळी साडे सात ऐवजी सव्वा सातचा अलार्म लावला आणि डोळे चांगलेच जड व्हायला लागले असल्याने सरळ झोपून गेलो.
क्रमश:

टीप: लेखातील सर्व ड्रोन इमेजेस जालावरून आणि कॉफीशॉपचे फोटो हॉटेल फोर्च्युन पर्लच्या वेबसाईट वरून साभार.

पुढचे भाग:

प्रतिक्रिया

एक_वात्रट's picture

23 Dec 2020 - 6:30 pm | एक_वात्रट

नेहमीप्रमाणेच उत्तम प्रवासवर्णन आणि छायाचित्रे.

दुबई सुंदर असली तरी ती स्थलांतरितांच्या शोषणावर उभी आहे हे एक कटू सत्य आहे. इतर देशांमधून इथे येणा-या कामगारांना अक्षरशः गुलामासारखे वागवले जाते. दुबईत जाणे म्हणजे या शोषणाला मान्यता/संमती देण्यासारखे आहे असा एक मतप्रवाह आहे आणि हे अवघे शहरच एक मोठा मॉल आहे, त्या शहराला स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, ते एक आत्मा नसलेले शहर आहे अशी टीकाही दुबईवर होते. यावर आपली व इतरांची मते वाचायला आवडतील.

अतिव सुंदर लेखन व छायाचित्रे. काय जबरदस्त विकास केलाय दुबईचा. वाफी मॉल प्रचंड आवडला. मस्त एकदम.

गोरगावलेकर's picture

24 Dec 2020 - 9:59 am | गोरगावलेकर

खूप छान लेखन आणि फोटोही मस्तच. फोटोंचा स्लाईड शो, एनलार्ज/मिनिमाइज़ करण्याची सुविधा यामुळे जास्तच आकर्षक झाला आहे लेख.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Dec 2020 - 10:25 am | ज्ञानोबाचे पैजार

एवढी देखणी तोफ कधीच पाहिली नव्हती
भरगच्च फोटो आणि माहितीने ठासून भरलेला दिमाखदार लेख आवडला
पुभालटा
पैजारबुवा,

कुमार१'s picture

24 Dec 2020 - 11:22 am | कुमार१

नेहमीप्रमाणेच उत्तम प्रवासवर्णन आणि प्र चि !

उत्तम प्रवासवर्णन आणि अप्रतिम फोटो! हा सर्वांगसुंदर माहितीपूर्ण भागही खूप आवडला!!
कारंज्याचे व्हिडिओ तर खासच!!!
.

तुषार काळभोर's picture

24 Dec 2020 - 12:35 pm | तुषार काळभोर

टर्मिनेटर बुवा!
यु आर बॅक..
वर्णन, फोटो मस्त आहेतच, लेखाचं डिझाईन आणि फोटोंची रचना सुद्धा एकदम नाविन्यपूर्ण आणि सुगम आहे.
खूप छान.

अक्षय देपोलकर's picture

24 Dec 2020 - 2:09 pm | अक्षय देपोलकर

जबरदस्त वर्णन..
खूप दिवसांपासून पुढच्या भागाची वाट बघत होतो

MipaPremiYogesh's picture

24 Dec 2020 - 3:24 pm | MipaPremiYogesh

खूपच सुंदर झालाय हा भाग पण टर्मिनटर जी. छान माहिती आणि फोटो . तुमच्या दोघांचा फोटो पण मस्त

बेकार तरुण's picture

24 Dec 2020 - 4:23 pm | बेकार तरुण

छान लेख....

जेम्स वांड's picture

26 Dec 2020 - 11:58 pm | जेम्स वांड

ते बुर्ज दुबई म्हणजे तर अत्युच्च प्रकरण वाटलं, अन ती बिल्डिंग पाहताच मिशन इमपोसिबल घोस्ट प्रोटोकॉल मधील टॉम क्रुजनं त्या इमारतीच्या बाहेर लटकून केलेले जबराट स्टंट्स आठवले एकदम.

बाकी प्रवासवर्णन अन ते ही तुम्ही लिहिलेलं म्हणजे काय ? तर तुम्ही लिहीत राहावे आम्ही आनंदी होऊन टाळ्या वाजवत तुमची स्तुती करावी हा मला वाटतं आता मिपाकरी पायंडा ठरवायला हरकत नाही :)

जेम्स वांड's picture

27 Dec 2020 - 12:02 am | जेम्स वांड

तुम्ही कुठेही फिरत असलात, तरी ड्रायव्हर, गाईड, स्थानिक वगैरे मंडळींच्या जीवनाचे परिपाक, त्यांचे आचारविचार, रितिभाती, पद्धती, अगदी जेवण वगैरेंचे तुम्ही प्रचंड तटस्थ तरी सुखद वर्णन करता, मुळात तटस्थ वक्तव्ये करताना ती सुखद करण्याची कला प्रचंड स्पेशल आहे/असते अन ती तुम्हाला जबरदस्त साधली आहे. माणूस फक्त माणूस म्हणून पाहत निरलसपणे त्याची धर्म, राजकारण, झुंड, समाज, विचार, संस्कृती पलीकडे जाऊन काढलेली तुमची निरीक्षणे वाचणे हे माझ्यासाठी तरी तुमच्या लेखनाचे एक मोठे आकर्षण आहे.

@ एक_वात्रट, प्रचेतस, गोरगावलेकर, ज्ञानोबाचे पैजार
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ एक_वात्रट आपण मांडलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य नक्कीच आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही! तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो, प्रतिसादात त्यावर मत व्यक्त करणे थोडे अवघड आहे. थोडक्यात सांगायचे तर तिथे कामासाठी जाणाऱ्यांना 'गल्फ कोऑपरेशन काउन्सिल' (GCC) च्या सदस्य देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या 'कफाला सिस्टीम' (Kafala system) बद्दलची अनभिज्ञता. विशेषतः चतुर्थ श्रेणीच्या (अशिक्षित) कामगारांच्या बाबतीत त्यांच्या पुरस्कर्त्यांकडून (कफील) शोषणाच्या घटना आखाती देशांमध्ये पूर्वी घडल्या आहेत, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. आणि जगातल्या जवळपास प्रत्येक विकसित देशाचा काही ना काही काळा इतिहास आहेच, सगळ्यांना एकच न्याय लावायचे ठरवले तर कुठेच कामासाठी किंवा पर्यटनासाठी जायला नको 😀

@ कुमार१, अथांग आकाश, तुषार काळभोर, अक्षय देपोलकर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@MipaPremiYogesh, बेकार तरुण आणि जेम्स वांड
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@जेम्स वांड
आपण जितके खोलात जाऊन लेखनाचे विश्लेषण करता, त्यातून लिहिण्याच्या ओघात मला स्वतःला देखील कधी न जाणवलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा होतो, त्यासाठी आपले विशेष आभार!

अनिंद्य's picture

27 Dec 2020 - 9:01 pm | अनिंद्य

खूप छान !

पु भा ल टा

टर्मीनेटर's picture

28 Dec 2020 - 6:34 pm | टर्मीनेटर

पु भा ल टा

येस सर! हे वर्ष संपायच्या आत पुढच्या भागात ही मालिकाही संपवायचा प्रयत्न करणार आहे 😊
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

रंगीला रतन's picture

16 Mar 2021 - 1:15 pm | रंगीला रतन

पुढचा भाग कधी येणार? वाट बघतोय.

टर्मीनेटर's picture

19 Mar 2021 - 10:37 pm | टर्मीनेटर

@रंगीला रतन
हि लेख मालिका सुरु होण्यास जसा खूप उशीर झाला तसाच काही ना काही कारणांमुळे पुढचे भाग लिहीण्यासही होत असललेल्या दिरंगाई साठी अत्यंत दिलगीर आहे 🙏

रंगीला रतन's picture

29 Dec 2020 - 11:55 am | रंगीला रतन

ज ब र द स्त
खूप आवडला हा पण भाग. पण खूप वाट बघायला लावलीत त्यासाठी.
पुलेशु.

टर्मीनेटर's picture

30 Dec 2020 - 10:57 am | टर्मीनेटर

@ रंगीला रतन
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
हा भाग लिहिण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.

गोंधळी's picture

30 Dec 2020 - 12:56 pm | गोंधळी

प्रचित्रे मस्त आहेतच पण सादरीकरण खुप आवडले.

टर्मीनेटर's picture

2 Jan 2021 - 10:41 am | टर्मीनेटर

@ गोंधळी
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

चौथा कोनाडा's picture

2 Jan 2021 - 1:34 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम फोटो आणि परिपुर्ण माहितीने संपन्न असा हा लेख खुप आवडला !

टर्मीनेटर's picture

8 Jan 2021 - 12:38 pm | टर्मीनेटर

@ चौथा कोनाडा
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏