मोबाईल प्रीपेडचे कोणते पर्याय तुम्ही वापरता ? कोणते पर्याय चांगले आहेत ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
20 Dec 2020 - 9:39 pm
गाभा: 

आमच्या कुटूंबांत चार मोबाईलात मिळून पाच सिम कार्यरत आहेत. आधी अधिक होते काही महिन्यांपुर्वी चार्जेस वाढले, तसे एक सीम नंबर बाद करुन घेतला. पुर्वी प्रत्येक सिमवर ८४ दिवसांचे प्लान भरत असे ते सहसा दिड किंवा दोन जिबी आणि अन लिमीटेड कॉल असत. हे बजेट महिन्याचे डिव्हाईड होऊन ४०० रुपयेच्या घरात बसत असे. हे चार्जेस वाढल्या पासून काही ताळमेळ राहीलेला नाही.

मध्ये एकदा तुलना केली तेव्हा बिएसएनएलचा प्लान कमीत पडत होता म्हणून पाच अपिकी तीन नंबर बिएसएनएल वर नेले. बाकी दोन आयडीया/व्होडात आहेत. बिएसएनएलच्या पोर्टलवरुन कोणत्या अमाऊंटला काय मिळते हे मला नीटसे उमगतच नाही. दोन सिम कॉलेजात जाणार्‍या पाल्यांचे ऑनलाईन क्लास अवलंबून असल्याने जोखीम नको म्हणून वर्षभराचे प्लान दिसेल त्या अमाऊंटने भरुन टाकले. एका सिमवरील व्यवहार कमी करून ऑफीसच्या नंबरवर धकवला जाऊ शकतो. आयडीया व्होडाचे अधून मधून पैसे भरतोय पण चटकन जाणवत नाही पण पुर्वीच्या मानाने ते अव्वाच्या सव्वा वाटत आहे. खिसा न कळत गळतोय. सगळ्याच कंपन्यांचे चार्जेस वाढले असल्याने कोणत्या कंपनीची सर्विस आणि कोणते प्लान अधिक किफायतशीर आहे ह्या बद्दल मिपाकरांकडून जाणून घ्यावे म्हणून धागा काढत आहे.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळणे, शुद्धलेखन आणि व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी अनेक आभार.

प्रतिक्रिया

१)बिएसएनेल, २)वोडा-आइडिया, ३)जियो, ४)एरटेल.

---------------
* सर्वांचे ५६ दिवसांचे ३९९ आहेत.( ते रु५०० होणार आहेत. )
८४ दिवसांचे ६००.(७५०)
पैसे कधी वाढवायचे यावर बिएसएनेल सोडून तिघांची बोलणी ओक्टोबरपासून चालू आहेत.

* बिएसएनेल अधुनमधून चार्जेस कमी करत असते. पण कोकणात रेंज गेली की तीनचार दिवस येत नाही.
---------;;---------------
VALIDITY.
जियो - कार्डात सहा महिनेपर्यंत किंवा अधिक काळ रिचार्ज मारला नाही तरी कार्डाचे इनकमिंग चालू राहाते. तसे इतरांना नाही. ४९/- महिना भरून कार्ड चालू (validity ) ठेवावे लागते. तीन महिने रिचार्ज न केल्यास बाद होते. जिओ कार्ड दोन सीमवाल्या फोनमध्ये active ठेवणे शक्य नसते. Dual _sim _dual_4gLTE active असणारे थोडेच हँडसेट्स आहेत त्यात ते चालू ठेवता येते.
-----------------------------------
पूर्ण अनलिमिटेड कॉल्स वोडाआइडिया आणि एरटेल देतात. कोणत्याही दुसऱ्या लँडलाइन किंवा सर्वीसला पूर्णपणे अनलिमिटेड.
जियो फक्त जियो नंबरलाच फ्री अनलिमिटेड देते. इतर नंबर्सना फक्त महिन्याला १००० मिनिटे फ्री ( म्हणजे साधारण रोज तीस मिनिटे फ्री)

-----------------------------^^

(काश्मिर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम वगैरे राज्यात प्रिपेड कार्डं चालत नाहीत.)

ग्राहकांना सहज लक्षात येऊ नये आणि मोजता येऊ नये म्हणून राऊंड फिगर एवजी ऑड आकडे वापरणे केवळ रक्कम बाबत नाही तर दिवसांच्या बाबतीतही केले जात आहे असे दिसते. त्यामुळे वाढीव दर सहज लक्षात येऊ नयेत असा उद्देश्य असावा.

म्हणजे पुर्वी महिन्याचा खर्च प्रती सिम प्रिपेड १०० रूपये येत होता आणि घरातले पाच सिम मिळून पाचशे रूपये होता तो आता दुप्पट २०० रुपयेच्या रेटने येऊन म्हणजे घरातले पाच सिम मिळून किमान हजार रुपायांच्या घरात जाणार असे दिसते. आपण म्हणता तसे अजून रेट वाढले तर महिन्याचा खर्च साडेबाराशे पर्यंत जाईल. शिवाय घरातले एक कॉमन इंटरनेट कनेक्शन (माझ्याकडे बिएसएनएल लँडलाईन सोबत आहे महिना साडेसातशेच्या घरात बील आहे) मिळून महिन्याचा खर्च दोन हजार होईल असे दिसते. अर्थात हे आपण दोन तीन महिन्यांचे पैसे एकदम प्रिपेडने भरतो म्हणून जी मंडळी कमी दिवसांचे पॅक घेऊन काम चालवतात त्यांच्याकडून बराच पैसा ओढला जात असणार.

ग्राहकांना आधी सवय लावली गेली आणि आता सावकाशपणे वाढीव दर चक्क दिन दोगुना रात चौगुनाच्या वेगाने वाढण्याची लक्षणे दिसताहेत. महानगरीय मध्यमवर्गींयांना हे वाढीव खर्च झेलताही येतील, महानगर बाह्य निम्न आर्थिक गटातील कुटूंबांना हे वाढीव खर्च कितपत सहजतेने झेलता येतील कल्पना नाही. मागची काही वर्षे प्रत्येकाच्या आवाक्यात पोहोचलेले साधन पुन्हा एकदा आहेरेंचे साधन होईल की काय हे येणारा काळच सांगू शकेल.

महासंग्राम's picture

21 Dec 2020 - 11:33 am | महासंग्राम

घरी वायफाय असेल तर सगळ्या सिम वर रोज १ जीबी डेटा मिळणारं रिचार्ज मारायचं
सध्या तेच करतोय. बाकी सर्व्हिसच्या बाबतीत सगळ्या कंपन्यांची माती खाण्यात स्पर्धा सुरु असते.

माहितगार's picture

21 Dec 2020 - 1:42 pm | माहितगार

माझा एक बि एस एन एल सिम आणि एक आयडीया सिम कमी लोडवाले (स्पेअर टाईप) आहेत केवळ सिम चालू रहावेत आणि अधून मधून एखादा कॉल करता यावा म्हणून कोणते पॅक चांगले पडेल.

महासंग्राम's picture

21 Dec 2020 - 1:49 pm | महासंग्राम

आयड्या आताचे V! साठी ३५ रुपड्यांचे असं काहीतरी रिचार्ज आहे त्यात १० रुपये टॉकटाइम आणि महिन्याभराची वैधता मिळते. बीएसएनएल साठी नाही माहिती

माहितगार's picture

21 Dec 2020 - 3:22 pm | माहितगार

तुमच्या प्रतिसादानंतर वेबसाईट उघडून पाहिले तर

₹95 चा एक पॅक दिसतोय त्यात ₹ 74 Talktime 200 MB Data 56 Days Validity पर्याय केवळ सिम चालू ठेवण्यासाठी बरा वाटतोय प्रति दिवस किमंत ₹ १.७० बरी वाटते दिड दोन जिबी च्या पॅक्स ना सर्वसाधारणपणे प्रति दिवशी ७ रु आहे स्पेअर नंबर साठी प्रति दिवस किमंत ₹ १.७० ठिक आता हे चार्ज करुन बघतो.

पोर्टेबल मोबाइल नेट खर्च महिना तीनशे होणार हे नक्की. त्यात एरटेल उपयुक्त. डेटास्पीड आणि कनेक्टिविटी आणि अनलिमिटेड कॅाल्सही.
लँडलाइन न काढता फक्त इनकमिंग ठेवले आहे.

माहितगार's picture

21 Dec 2020 - 1:45 pm | माहितगार

लँडलाइन न काढता फक्त इनकमिंग ठेवले आहे.

बिएस एन एल लँडलाईनला केवळ इनकमिंग ठेऊन रोज दोन जिबीचे डेटा पॅक असे करता येते का? किती रुपये वाला प्लान ऊपयूक्त पडतो ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Dec 2020 - 4:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बीएसएनलच्या फोरजीला सरकार परवानगी देत नाही पण त्यावर अवलंबून असलेल्या कंपन्यांना ५ जीची परवानगी देतं. खासगी कंपन्यांनी आपल्याला तंत्रज्ञान आणि स्पीडच्या नावाखाली फूकट सीम दिले आणि आपली लूट सुरु केली. आता सर्वच कंपन्यांनी आपले रेट्स सेम केले आहेत. खासगी कंपनीला सपोर्ट करु नका. उद्योगपतींच्या नादी लागू नका असे म्हणत असतो पण तुम्ही लोक ऐकत नाही. आता भोगा फळं.

कंपनी दर ( प्रिपेड) दिवस डाटा जीबी- प्रत्येक दिवशी नेटवर्क कसं आहे ?

आयडिया उर्फ़ व्ही-आय
६९९
८४
 ४ जीबी
 देवभरोसे.

ऐअरटेल
६९८
८४
 २ जीबी
देवभरोसे.

जीओ
५९९
८४
 २ जीबी
जरा बरं...!

बीएसएनएल
४८५
  ९०
  १.५ जीबी
 धर-सोड वृत्ती. पण देशभर.

माझ्या कुटुंबात ऑनलाइन शिक्षण आणि अनुषांगिक कामासाठी सर्व कंपन्यांचे सीम कार्डस आहेत, नौकरीच्या गावी एअरटेल २ जी चालते. वर्कफ्रॉम होम (गावी असतो तेव्हा तालूक्याचे ठिकाण) एअरटेल रपारप स्पीड देते. नौकरीच्या ठिकाणी जीओ नेटस्पीड मरगळलेल्या अवस्थेत चालते (चीड येते). बीएसएनएल माझं पोश्टपेड चांगले चालते. पण एकदा नेट वापरले, पाच हजार रुपये बील आले त्यामुळे त्याचं नेट वापरत नाही. आयडीया, गावी चांगले चालते.नौकरीच्या ठिकाणी मान टाकते. सारांश, एकही कंपनी नीट सेवा देत नाही. रेट्स मात्र जवळ जवळ सारखेच आहे. सारांश, आपल्या गावी जे कोणते नेटवर्क चांगले चालते ते सीम वापरावे असे वाटते. एवढे बोलून दोन शब्द संपवतो.

-दिलीप बिरुटे

महासंग्राम's picture

21 Dec 2020 - 4:53 pm | महासंग्राम

धर-सोड वृत्ती. पण देशभर.

या बाबतीत सहमत, सह्याद्रीतल्या दुर्गम कडेकपारींमध्ये पण BSNL चं नेटवर्क मिळतं.

खासगी कंपनीला सपोर्ट करु नका. उद्योगपतींच्या नादी लागू नका असे म्हणत असतो पण तुम्ही लोक ऐकत नाही. आता भोगा फळं.

प्रॉब्लेम आहेच, पहिला प्रॉब्लेम डिएमकेच्या राजूवर केंद्रात मंत्री असताना चुकीचे आरोप करून झाला. त्याची किमती कमी ठेवण्यासाठी प्रथम येईल त्यां कंपन्यांना परवानगी देण्याची कल्पना बरोबरच होती. आता सरकारनेच या कंपन्यांना अधिकतम बोली लावण्यास सांगितल्यावर कंपन्या त्या हिशेबाने रिटर्न अपेक्षित धरणारच. तोटा अधिकच होतोय पहाता स्पर्धा बाजूस ठेऊन त्यांनी आपापसात साटेलोटे करुन एकसारखे दर ठेवले आहेत. कदाचित अतिरीक्त नफाच कमवत असतील, आता त्यांना देण्यास कारण मिळाले आहे.

लोक अजून खर्च करत आहेत दर आणखी वाढले तर मात्र जनरोषाला सामोरे जावे लागू शकते हे मंडळींच्या लक्षात येत नसावे.

मागच्या वर्षाभरात नवे कोणतेही इक्विपमेंट न जोडता माझे वीजेचे बील दुप्पट झाले आहे.

मीच माझा राजकीय पक्ष व्यवसाय काढू का म्हणून विचार करतोय कोणि आहे कारे माझ्या पक्षात जॉईन होण्यासाठी :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Dec 2020 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोक अजून खर्च करत आहेत दर आणखी वाढले तर मात्र जनरोषाला सामोरे जावे लागू शकते हे मंडळींच्या लक्षात येत नसावे.

लोकांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल यात काही वाद नाही. नेटवर्क कंपन्यांनी सुरुवातीला कायम इनकमींग फॅसीलिटीसाठी मिनिमम व्हावचर्स आणली. दुसरे दर वाढविले आणि वापराचे दिवस कमी केले. पॅकेजेसचे दर हळुच वाढविले. आपल्याला ट्रायकडे तक्रारी कराव्या लागतील. लोकांनी प्रसारमंत्र्यांना किंवा ज्यांच्याकडे हा विभाग आहे, त्यांच्याकडे तक्रारी केल्या पाहिजेत त्याशिवाय हे लोक कंट्रोलमधे येणार नाहीत. आता ५ जीमधेही जर आपणास सुविधा हव्या असतील तर अधिक दर द्यावे लागतील. लोक समर्थन करतील की तुम्हाला चांगल्या फॅसीलिटी हव्या तर पैसे मोजले पाहिजेत, अशा वेळी भूर्दंड बसत राहणारच आहे. आपण तक्रारी करत राहू. ट्रायची अधिकृत लिंक द्या.

मीच माझा राजकीय पक्ष व्यवसाय काढू का ...

नको. तो कोणत्या वळणावर जाईल याची शक्यता माहिती असल्यामुळे तुम्ही या भानगडीत पडू नका. आपण लोकांच्या नेटवर्क आणि स्वस्त लढ्यासाठी नेतृत्व करा. मी आपला कार्यकर्ता राहीन.

बाकी, नेटवर्कचे दर आणि इतर निसटलेल्या बाजूवर लिहावे ही नम्र विनंती.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

21 Dec 2020 - 5:27 pm | चौथा कोनाडा

आमच्याकडे
मी: व्होडायडिया : ५९९ (८४ दिवस)
बायको: व्होडायडिया : ३७९ (८४ दिवस)
पोरगं-अ: व्होडायडिया : ४९ (सर्व्हिस व्हॅलीडीटी रिचार्ज, प्रति २८ दिवस)
पोरगं-ब: जियो : ५५५ (८४ दिवस)
बीनतारी: ४७० ( प्रति महिना) १ एमबी/ एमबीपीएस

असे एकूण रू १०७३ प्रति महिना (दिवस) असे मोजतो.

पन्नास हजार कोटी सरकारला द्यायचे आहेत आणि भांडवल संपले आहे. त्यामुळे सर्वीस देण्याबाबत अपेक्षा ठेवू शकत नाही.

एरटेललाही अठ्ठावीस हको लागू आहेत पण ते भरू शकतात.
सर्वीस अपडेट करतात .
जियो चोविस हको. तेही भरू शकतात. सर्वीस अपडेट करतात पण ३८ कोटी ग्राहक आणि दाट वस्तीतील मागणीमुळे ( इंटरनेट आणि कॉल्स दोन्ही डेटाबेस्ट आहेत) नेट स्पीड आणि रेंज पार आडवी होते.

BSNL is Holy Cow. दूध दिले नाही तरी तक्रार करायची नाही.

एरटेल बेस्ट.

गोंधळी's picture

22 Dec 2020 - 2:23 pm | गोंधळी

एरटेल ने उरलेली शिल्लक(talk time balance) पुढे चालु ठेवणे(carry forward balance) बंद केले वाट्ते. मी ४९ ची पुरवणी (refill) केल्यानंतर आधिची शिल्लक दाखवत नाही आहे.

कंजूस's picture

22 Dec 2020 - 2:43 pm | कंजूस

माझेही एरटेलचे add नाही झाले. वोडाफोनचे मात्र add होत आहेत.

चौकटराजा's picture

22 Dec 2020 - 6:11 pm | चौकटराजा

कितीही दर वाढले तरी तुम्ही रगड फोनवर बोलणे कमी कराल पण तुम्हाला न कळता तुमची मुले बायको रिचार्ज मारत राहतीलच हे लिहून घ्या ! मुले नेटची व्यसनी विद्येसाठी झाली तर एकवेळ ठीक पण कुणाचा साखरपुडा झाला ,कुणाचा घटस्फोट झाला,,कुणी नवे घर घेतले अशा फालतू जी के साठी नवी पिढी नादावलीय ! त्यात बायका तर इतक्या भंपकपणे फोनवर बोलत असतात की विचारू नका ,मैत्रीणी मैत्रिणी,,जावा जावा ,,,नणंदा भावजया यांना चरवित चर्वणाचे विषय काय असतात ? हे सारे त्या कंपन्यांनी हेरले आहे ! बोलणे वाढले ,कृत्रिमता वाढली ओढ मात्र कमी झाली !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Dec 2020 - 6:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

पुरुषांनाही त्या नेटचा किडा असा खोलवर आत गेलाय आता तो एवढ्यात वर येणे अशक्य आहे. बाकी ते महिलांचं फोनवर बोलणं माय गॉड. (कप्पाळ बडवणारी स्मायली) महिलांना आपल्या नेटवर्कसीमशी बोलायचे पर मिनिट पाच रुपये पडायला पाहिजेत. पाच मिनिटाच्या पुढे बोलल्यास प्रत्येक सेकंदाला पन्नास पैसे, असे काही तरी केले तरच त्यावर कंट्रोल येईल नाहीतर ते बोलणे या जगाच्या असेपर्यंत कमी होणे शक्य नाही. (लेखाचा विषय आहे महिलांचे फोनवर बोलणे)

-दिलीप बिरुटे

आत जाताना रेडिओ, स्पीकर, मोबाइल सगळं काढून घ्यायचे.
( दिवेकर नावाच्या कुणा नगरसेवकाने काढलेले)

सॅगी's picture

28 Dec 2020 - 4:49 pm | सॅगी

वोडाफोन आयडियाने मुंबईत ३जी सेवा बंद करुन ते स्पेक्ट्रम ४जी साठी वापरले आहे. यामुळे मुंबईत त्यांची सेवा चांगली होण्यास मदत होईल.

लिंक

कोणी वापरत आहे का व्हीआय चे सिम मुंबई सर्कल मध्ये?

कंजूस's picture

28 Dec 2020 - 7:03 pm | कंजूस

माझं आहे एक व्हीआय सिम. चार होती, ४ जी सर्वीस डब्बा झाली त्यामुळे तीन एरटेलमध्ये शिफ्ट केली. ( ५० केबीच्या वर डाऊनलोड स्पीड जात नव्हता. ओडिओ कॉलमध्ये पाण्याचा नळ सोडल्यासारखा आवाज येत असे. ) एरटेलचा २ एमबीपीएस सहज येतो दिवसा.

सॅगी's picture

28 Dec 2020 - 7:29 pm | सॅगी

एअरटेलने ३जी सेवा बंद करुन तेच स्पेक्ट्रम ४जी साठी वापरल्यावर त्यांची सेवा बरीच सुधारली आहे हे खरेच...

पण कोकणात, विशेषतः तळकोकणातील बर्याच गावांत त्यांचे नेटवर्क आजही पोहोचलेले नाही. त्यामुळे प्रायमरी नंबर त्यांच्या नेटवर्कवर असणे ही डोकेदुखी आहे.
(टीप - त्याच गावांत बि एस एन एल, व्हीआय आणि जिओ मात्र टकाटक चालते. फक्त एअरटेलचेच वांधे)

सॅगी's picture

31 Dec 2020 - 5:31 pm | सॅगी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला जिओ बद्दल नवीन बातमी आली आहे.

यानुसार, आता एअरटेल आणि व्हीआय प्रमाणेच जिओवरुनही सर्व नेटवर्कवर कॉल करणे मोफत होणार आहे. हा बदल १ जानेवारीपासून लागू होईल.

कंजूस's picture

31 Dec 2020 - 5:53 pm | कंजूस

फक्त एकाच फोनमध्ये जिओ आणि वोडा/एरटेल चालू ठेवता येत नाही बहुतांश फोन्समध्ये.

सॅगी's picture

31 Dec 2020 - 6:23 pm | सॅगी

हो, तुमचा फोन ४ ते ५ वर्षे जुना असेल तर हा प्रॉब्लेम आहे, पण आता लाँच होणारे (किंबहुना गेल्या १-२ वर्षांत लाँच झालेले) बहुतेक सर्व Dual SIM फोन हे Dual VoLTE देखील सपोर्ट करतात.

कंजूस's picture

31 Dec 2020 - 8:05 pm | कंजूस

तंत्रज्ञान पोहोचतंय.

सॅगी's picture

20 Nov 2021 - 5:40 pm | सॅगी

बीएसएनएल ४जीची परत एकदा लटकंती झाली आहे.

बातमी

नुसते प्लॅन चांगले असून उपयोग नाही, ते प्लॅन वापरता येण्यासाठी नेटवर्कही तसे चांगले असावे लागते...ही लटकंती कधी थांबेल कोणास ठाऊक.

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2021 - 10:22 pm | चौथा कोनाडा

बीएसएनएल आणि एसटीची अवस्था सारखीच आहे !

सॅगी's picture

22 Nov 2021 - 10:45 pm | सॅगी

तुमचे म्हणणे खरे आहे.

बीएसएनएल (आणि एमटीएनएल सुध्दा) म्हणजे कड्याकपारीत सेवा आणि भर शहरात कोणत्याही बिल्डींगमध्ये गेले की नेटवर्क गायब असा प्रकार आहे.

सॅगी's picture

22 Nov 2021 - 10:42 pm | सॅगी

येत्या २६ नोव्हेंबरपासून एअरटेलच्या प्रीपेड रिचार्ज दरात २०% ते २५% ची वाढ होणार आहे.

बातमीची लिंक

संपूर्ण वर्षासाठीचा २५०० रुपयांचा प्लॅन आता थेट ३००० रुपये होईल.

विआय सुध्दा एअरटेलचीच री ओढत भाववाढ करेल यात शंका नाही..