शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती

जानु's picture
जानु in राजकारण
9 Dec 2020 - 10:43 pm

सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्‍यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्‍याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्‍याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्‍यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्‍यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्‍या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.

प्रतिक्रिया

Bhakti's picture

27 Jan 2021 - 10:24 pm | Bhakti

थंडीत , रस्त्यावर असा आपलाच शेतकरी लढतो म्हणून वाईट वाटायचे..पण
देशाच्या​ तिरंग्यासमोर भलताच झेंडा..एवढा अपमान
मतदारांनी ३००+ खासदारांना हे पाहण्यासाठी निवडून दिले नव्हते.
निषेध.. निषेध.. निषेध

एक माणुस नाही तो दिप सिद्धु आहे, पोलिसांनी त्याच्यावर कारवाही करावी..
जर तसे झाले नाही तर त्यावर कोणाचा वरद हस्त आहे ते कळतेच आहे.

दुसरी गोष्ट,
इतक्या मोठ्या लोकसंख्ये च्या देशात, डिग्री नसलेल्या श्री श्री मोदी यांना पर्याय नाही असे लोकांना वाटते, ह्याचेच मला आश्चर्य वाटते..

अवांतर -
असो.. बाकी फक्त शेवटी येऊन शेवटचे वाचले.. मधले काही वाचनाची हिम्मत नाही..आणि टाइम कमी आहे.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 4:42 pm | मुक्त विहारि

दुसरा पर्याय मिळाला तर आनंद आहे.

आताच्या घडीला मोदी पेक्षा मला इतर कोणताही नेता चांगला काम करेल असे वाटते...

जो माणुस बस हुई महंगाई कि मार अब कि बार मोदी सरकार असे म्हणत सत्तेत येतो, तो त्याचा हा नाराच विसरतो..
ज्याला परदेशात जाऊन ट्रम्प सरकार म्हणायचा अहम असतो त्याला भारताचा विचार करता येऊ शकतो असे वाटत नाही..

पेट्रोल दर कुठे चाललेत..३५ ला आणणार होते ना?

अर्णब च्या whats app मेसेजचे काय? असो असे बरेच मुद्दे आहे..

दूसरा पर्याय नाही ही भंकस गिरी आहे...
बाकी निवडून जनतेतून आलेत ते, सो त्यांना खाली बसा मी म्हणत नाही..
पण दूसरा पर्याय नाही हे म्हणजे अततायी आहे..
अटल बिहारी बद्दल असे लिहिले असते तरी एकावेळ मान्य केले असते राजशिष्टाचार पाळणारा माणुस होता बरोबर आहे.. पण मोदी म्हणजे अवघड आहे..

मनमोहन सिंग म्हणलेले पटते आहे.. History will be more kinder about him.
आणि ते सत्य वाटत आहे हे नक्की..

मनमोहन सिंग was also फार better पंतप्रधान than mr. मोदी

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 5:00 pm | मुक्त विहारि

मोदी यांचा ऐवजी, राहुल गांधी उत्तम, असेच ना?

पेट्रोल दर कुठे चाललेत..३५ ला आणणार होते ना?

सौदि अरेबियात जिथे फुकट वाटायला पहिजे तिथे ३१ रुपये लिटर आहे. (१.६ रियाल प्रति लिटर. १.६ * १९.४८ (रियाल ते रुपी) = ३१.१७).

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 9:37 am | मुक्त विहारि

सहमत आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2021 - 9:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत...!

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2021 - 9:42 am | श्रीगुरुजी

आताच्या घडीला मोदी पेक्षा मला इतर कोणताही नेता चांगला काम करेल असे वाटते...

पण असे बहुसंख्य मतदारांना वाटते का?

जो माणुस बस हुई महंगाई कि मार अब कि बार मोदी सरकार असे म्हणत सत्तेत येतो, तो त्याचा हा नाराच विसरतो..

हा नारा ते विसरले?

ज्याला परदेशात जाऊन ट्रम्प सरकार म्हणायचा अहम असतो त्याला भारताचा विचार करता येऊ शकतो असे वाटत नाही..

आपल्या सव्वा तासांंच्या भाषणात मोदींनी अनेक मुद्दे मांडले होते. त्यात ट्रंपचा उल्लेख फक्त एकदाच होता. ट्रंपचा फक्त एकदा उल्लेख करणे म्हणजे अहम्? ट्रंपचा फक्त एकदा उल्लेख करणे म्हणजे भारताचा विचार न करणे?

पेट्रोल दर कुठे चाललेत..३५ ला आणणार होते ना?

असे आश्वासन कोणी दिले होते? २०१३ मध्ये पुण्यात पेट्रोल प्रति लिटर ८४ रूपये झाले होते. २०१४-१९ या काळात हा दर ६४ पर्यंत कमी झाला होता. सध्या ९१ आहे.

अर्णब च्या whats app मेसेजचे काय? असो असे बरेच मुद्दे आहे..

आक्षेप घेण्यासारखे काय आहे त्या मेसेजेसमध्ये?

दूसरा पर्याय नाही ही भंकस गिरी आहे...

सध्या पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 10:08 am | मुक्त विहारि

दुसरा पर्याय असेल तर, नांव सांगायला काय हरकत आहे?

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 4:47 pm | मुक्त विहारि

https://www.google.com/search?sxsrf=ALeKk01LYfUlHgeoRwSfiD-NOtnxQxVfdg%3...

शिकली सवरलेली माणसे, गुगलून बघत नाहीत, यांचे आश्चर्य वाटत नाही.

अडाणी माणसेच, जास्त करून, तारतम्य बाळगतात, असे माझे वैयक्तिक मत आहे.

गणेशा's picture

27 Jan 2021 - 4:58 pm | गणेशा

आता तुम्हाला मोदी स्वतः त्यांच्या शिक्षणाबद्दल बोललेली link देऊ का?
तुम्हाला पण माहिती आहे, अश्या दिग्र्या दाखवू शकतात ते.. मग स्वतः कमी शिकलेलो आहे, १० वि कि आठवी म्हणलेले? पण स्वतःच्या तोंडून बोललेले आहेत..

हा माणूस ३० वर्ष भीक मांगतो, चहा पण त्या आधी स्टेशन वर विकतो, adavaninchya रथ यात्रेत असतो, मग हा नक्की किती varsha पासून काय काय करतो..

नाहीतर इतर पक्षांकडे असे उमेदवार आहेतच कुठे?

गणेशा's picture

27 Jan 2021 - 5:14 pm | गणेशा

Link घ्या.. म्हणालेत साहेब external केले आहे नंतर.
आमच्या मते ३० वर्ष भीक मागण्या अगोदरच सोडलेली शाळा.. आता नंतर दाखवायला लागले असेल राजकारणात.

https://youtu.be/S2mjnHaWLyo

आणि पर्याय नसायला असे एव्हडे मोठे कर्तृत्व तर मुळीच नाही. स्वतःच असे पसरवायचे.. आणि लोकं आहेतच मोदी ला पर्याय नाही..

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 5:18 pm | मुक्त विहारि

आम्हाला काय, राहुल गांधी पण चालतील...

शेतात बटाटे लावीन, राहुल गांधी, त्या बटाट्या पासून, सोने काढून देतील.

हे सुद्धा It cell ने पसरवलेले आहे, ज्यांना हा बटाट्याचा vedio खरा वाटतो तेच खरे पप्पू का म्हणू नयेत?

माझ्या वयक्तिक मते, राहुल गांधी हे राजकारणी म्हणुन अपरिपक्व आहेत, पण माणुस म्हणुन ते मोदी यांच्या पेक्षा नक्कीच चांगले आहेत..

तरी ही मोदींना पर्याय नाही हे ह्या देशात मानणे हेच हास्यास्पद वाटते..
उलट हा किंवा असा माणुस पुन्हा पंतप्रधान होऊ नये असेच वाटते मला..

ज्या माणसाला धड, विश्र्वेश्र्वरैय्या, हे पण म्हणता येत नाही, तो पंतप्रधान होणार असेल तर, त्याच्या मागे धावणारी प्रजा, नक्कीच बुद्धीवान माणसेच असणार.

गणेशा's picture

27 Jan 2021 - 5:51 pm | गणेशा

तुम्ही तो बटाट्याचा vedio द्या ना पुर्ण.
बघू या कोण खरे..
उगाच असे फेक vedio पसरवून बदनामी करण्याचा भाजपाचा जुना डाव आहे..
राहुल गांधी पंतप्रधान पदाचा उमेदवार नक्कीच नाही..

पण याने मोदींना पर्याय नाही, ते हि देशात हे म्हणणे आततायी आहे..

बरं तुम्हाला पर्याय हवा ना..
मोदी पेक्षा केंव्हाही मनमोहन सिंग हजार पटीने भारी आहेत..
आणि bjp chaनेता घेतला तर नितीन गडकरी..

बाकी व्यक्तिपूजा करण्यात रस नाहि..

प्रसाद_१९८२'s picture

27 Jan 2021 - 5:57 pm | प्रसाद_१९८२

१५ लाखाच्या व्हिडीओ बद्दल तुमचे काय मत आहे. कॉंग्रेसी उठसुट आमचे १५ लाख आम्हाला द्या म्हणून बोंबलत असतात.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 6:10 pm | मुक्त विहारि

बघा

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 6:13 pm | मुक्त विहारि

आत्ता राजकारणात सक्रिय आहेत का?

कारण, सर्वात उत्तम पंतप्रधान एकच होऊ शकले असते आणि ते म्हणजे, सरदार पटेल

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2021 - 5:27 pm | श्रीगुरुजी

सर्व विद्यापीठात बहिस्थ शिक्षणाची व्यवस्था आहे व बहिस्थ पदवी मान्यताप्राप्त पदवी आहे. पंतप्रधान मोदी कला शाखेत बहिस्थ द्विपदवीधर आहेत.

सध्या मोदींना एकही पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 5:42 pm | मुक्त विहारि

सहमत आहे.

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2021 - 5:46 pm | श्रीगुरुजी

मोदींच्या कला शाखा पदवीचे विद्यापीठ प्राणपत्र

https://www.google.com/search?sxsrf=ALeKk00qWMVTy3M9_xZ8VOYvFjQu9Kc5bw%3...

मोदींना कला शाखेतील पदव्युत्तर पदवीचे विद्यापीठाचे प्रमाणपत्र

https://www.google.com/search?sxsrf=ALeKk00qWMVTy3M9_xZ8VOYvFjQu9Kc5bw%3...

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 6:14 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

आपली कोणती डिग्री आहे राव, आणि कै. वसंतदादा पाटिल फक्त ७ वी पास होते, ते कोन्ग्रेसचे होते म्हणून पावन होते काय ???

रात्रीचे चांदणे's picture

27 Jan 2021 - 5:59 pm | रात्रीचे चांदणे

हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही हे काल च्या हिंसाचाराने सिद्ध झालेच आहे. पण दिल्ली पोलीस हे सुद्धा अकार्यक्षम आहेत परत एकदा सिद्ध झाले आहे. हे एका अर्थाने केंद्र सरकार चे अपयश आहे. किंवा हिंसाचार जास्त वाढेल म्हणून पोलिसांनी कारवाई केली नाही हे कळायला मार्ग नाही. परंतु काल जे झाले त्यात शेतकरी संघटणाचा दोष तर आहेच पण हे थांबवू न शकल्यामुळे एक प्रकारे केंद्र सरकार ही दोषी आहे. देशाच्या राजधानीत काही लोकांना धुसगुस घालायला खुलेआम सूट मिळतेय असंच कालच चित्र होतं. अत्ता सरकार ने योगी फॉर्म्युला वापरून अतिशय कडक करवाही करायला पाहिजे.

केजरीवाल सरकार पण तितकेच दोषी आहे

गणेशा's picture

27 Jan 2021 - 6:24 pm | गणेशा

Deep sidhu हे नाव पण सांगितले आहे..

चौकीदाराला त्याला अटक करता आली तर ठीक नाहीतर चौकीदारच अशी माणसे पेरतो अशी शक्यता नक्कीच नाकरता येणार नाही..

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2021 - 6:34 pm | श्रीगुरुजी

एकटा माणूस संपूर्ण शहरात दिवसभर दंगल माजवू शकतो का? याय शेकडो लोक असणार. पोलिसांनी सुमारे ३०० लोकांची चौकशी सुरू केली असून अनेक शेतकरी नेते बेपत्ता आहेत असे वाचण्यात आले आहे.

आंदोलन शेतकऱ्यांचे नसून दलाल आणि शीख लोकांचे आपापले वयक्तिक फ्रस्ट्रेशन आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोंबलतोय. आणि काल ते पुन्हा सिद्ध झाले.
पहिल्यापासूनच मला ह्या शीख लोकांची लक्षणीय संख्या , धार्मिक नारेबाजी, ध्वज, खलिस्तान समर्थक डोळ्यात खुपतायेत पण बोलून दाखवले की प्राध्यापक साहेब आणि 188 आहेतच इथे वकिली करायला.

असो. काल शिखांनी जो काही धुडगूस लाल किल्ला आणि दिल्ली परिसरात घातला त्यावरून 1984 साली अमृतसर मंदिरात काय झालं असेल त्याचा अंदाज आला.
प्रश्न राहिला केंद्र सरकारने का काही केलं नाही?? धुडगूस घालणाऱ्यांना का आवरले नाही.. ??
मला वाटतं केंद्र सरकार सेफ गेम खेळत आहे. "हाथ जोडतो पण चर्चेला या " या मोदीच्या विनंतीपासून ते अगदी कालपर्यंतच्या बैठकी पर्यंत चा घटनाक्रम पाहिल्यास सरकार वाटाघाटी करून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण ज्यांचे हेतूच दुष्ट आणि देशविघातक आहेत त्यांना चर्चेने कसे समजवणार?
या शीख लोकांना आंदोलनास परवानगी दिली नसती तर एक प्रकारे हुकूमशाही चालवत आहेत असं संदेश गेला असता.. त्यामुळे परवानगी दिली गेली.

दंगा आणि तोडफोड करताना कोणालाही का अडवले नाही??

कारण त्यांना अडवण्यासाठी तीव्र लाठीमार, अश्रूधूर आणि गोळीबार इत्यादी करावे लागले असते. आणि त्यात काही शीख जखमी झाले असते किंवा मेले असते तर त्याचा दोष पुन्हा सरकारवर ढकलून लिब्रान्दु , जाणते राजे, खांग्रेस आणि NDTV वाले घसा फोडून रडले असते. इथेदेखील बिरुटे सर, 188 नंबर वाले, आणि तत्सम आयडींनी मेगाबाईटी प्रतिसाद किंवा नवीन लेख रुपी जिलेब्या पडल्या असत्या.
तसा एक प्रयत्न देखील केला गेला. एक ट्रॅक्टर पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्स ला धडकून पलटी झाला. त्यामध्ये आंदोलनकर्ता शीख मेला.. तर इतर शीख नेत्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी, त्या व्यक्तीला पोलिसांनी गोळीबार करून मारले अशी बोंब उठवली पण दिल्ली पोलिसांनी लगेचच या घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध करून त्यांचे मनसुबे उधळून लावले.

एकप्रकारे कोणतीही स्ट्रॉंग ऍक्शन ( जोरदार लाठीमार, फायरिंग इ ) न घेऊन या शिखांना जनतेची सहानुभूती मिळवून देण्याचे सगळे मार्ग बंद केले. अन्यथा दुसऱ्या दिवशी सगळे लिब्रान्दू, शीख, NDTV, 188 नंबर , प्राध्यापक सर घसा फोडून रडायची तयारी करूनच बसले होते.

पण याउलट आंदोलकर्ते हे आंदोलन न करता फक्त आडमुठे पणाने वागून जनतेची दिशाभूल आणि नुकसान करतायेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतेय. आंदोलनकर्ते हे शेतकरी नसून शीख एक्सट्रिमिस्ट आणि इतर देशविरोधी तत्वे आहेत हे देखील त्यांनी स्वतः च दाखवून दिले.

नोट - माझ्या प्रतिसादात प्रत्येक ठिकाणी आंदोलन ( धुडगूस ) करणाऱ्यांचा उल्लेख मी शेतकरी असा न करता शीख असा केलेला आहे. आणि तो जाणीवपूर्वक केलेला आहे.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 6:41 pm | मुक्त विहारि

मुद्दे पटले

नगरीनिरंजन's picture

27 Jan 2021 - 8:16 pm | नगरीनिरंजन

हिंदू-मुस्म्लिम करुन झालं आता हिंदू-शीख का?
भारतीय सैन्यात भारतासाठी किती शीखांनी आत्मबलिदान केले आहे ह्याची कल्पना सर्वांनाच असेल.
असे सरसकटीकरण करून फाटाफूट होण्याशिवाय काहीही होणार नाही.
राजकारण आणि धर्माची मिसळण करायची चूक काँग्रेसने केली म्हणून त्यांना जावे लागले. तेच परत होणार असेल तर काय उपयोग? ह्या सगळ्यात भारत किंवा इंडिया नामक आधुनिक लोकशाही राष्ट्राचे अपरिमित नुकसान होणार आणि होतंय.

बाप्पू's picture

27 Jan 2021 - 8:31 pm | बाप्पू

आता नवीन वकील आलेत.. तसे जुनेच आहेत पण कदाचित हायबरनेशन मधून आज बाहेर पडलेत.
असो..

हिंदू शीख आम्ही करत नाही..
शीख लोकांना शेती कायद्याविरुद्ध आंदोलन करण्याचा हक्क आहे.
पण आंदोलनात शीख धर्मीय घोषणा, शस्त्रे, खलिस्तानी घोषणा, फक्त पंजाबी भाषेत असलेले बोर्ड, पोशाख, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे परदेशीं लॉबी ला जागे करून अगदी कॅनडा आणि uk मधून पण समर्थन करणारे खलिस्तान वादी शीख.. या सर्वांनी मिळून हे आंदोलन शीख vs मोदी आणि शीख vs हिंदू असे केलेय.
पण खरा हिंदू शीख हा वेगळा धर्म मानतच नाही, आणि तो नाही देखील.
त्यांचे योगदान कुठेही कोणीही अमान्य करत नाही.
त्यामुळे तुमची ही भंपक बडबड बंद करून पुन्हा हायबरनेशन मध्ये गेलात तरी चालेल.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 8:45 pm | मुक्त विहारि

माझे दोन शीख मित्र होते.

1990 मध्ये एक जण होता तर दुसरा, 2000 ते 2005 पर्यंत होता.

ते दोघेही, खालिस्तान विरोधी होते.

त्यांच्या मते, पाकिस्तानला, भारतात फूट पाडायची आहे, त्यामुळे काही शीख लोकं, खलिस्तान वादी आहेत.

राजा जयचंद आणि सुर्याजी पिसाळ, यांचे आत्मे नेहमीच आनंदी असतील...

चौकस२१२'s picture

28 Jan 2021 - 6:53 am | चौकस२१२

१००० टक्के सहमत बाप्पू
"डेथ बाय थौसंड कट" ते हेच आहे पण अति प्रेमळ लोकांना आपल्या गुलाबी चष्म्यातून ते दिसत नाही

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 7:01 am | मुक्त विहारि

सहमत आहे .

प्रसाद_१९८२'s picture

27 Jan 2021 - 8:47 pm | प्रसाद_१९८२

भारतीय सैन्यात भारतासाठी किती शीखांनी आत्मबलिदान केले आहे ह्याची कल्पना सर्वांनाच असेल.

--

ती कल्पना सर्वांनाच आहे.
म्हणून काय दंगे करण्याची स्पेशल परमिशन त्यांना मिळायला हवी की काय !

मुक्त विहारि's picture

28 Jan 2021 - 7:01 am | मुक्त विहारि

सहमत आहे

शा वि कु's picture

27 Jan 2021 - 10:05 pm | शा वि कु

+१

चौकस२१२'s picture

28 Jan 2021 - 6:47 am | चौकस२१२

पहिल्यापासूनच मला ह्या शीख लोकांची लक्षणीय संख्या , धार्मिक नारेबाजी, ध्वज, खलिस्तान समर्थक डोळ्यात खुपतायेत पण बोलून दाखवले की प्राध्यापक साहेब आणि 188 आहेतच इथे वकिली करायला.
अगदी बरोबर
आणि हे शीख धर्म यात आणण हे भारताबाहेर तर जास्तच जाणवत.. एक अर्थी बरेच झाले कि अमेरिकेत खलिस्तानवादी मोर्चे आणि शेतकरी आंदोलन एका ठिकाणी आले.. खार काय ते समोर येतंय

त्यात चवीला, साम्यवाद, खलिस्तान वादी, पाकिस्तान आहेत.

Rajesh188's picture

27 Jan 2021 - 6:41 pm | Rajesh188

सर्वच बाबतीत पूर्ण अपयशी ठरले आहेत मोदी .देशाच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान म्हणून त्यांना दुसरा पर्याय नाही .
हे खरे आहे.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 6:43 pm | मुक्त विहारि

नेहरूंनी जसे चीन समोर लोटांगण घातले होते, तसेच मोदी यांनी घालायला हवे होते .... बरोबर ना?

Rajesh188's picture

27 Jan 2021 - 7:13 pm | Rajesh188

नेहरूंनी चीन पुढे लोटांगण घातले हे कशा वरून म्हणता .
एकतर्फी विचार केल्यामुळे नेहरूंनी चीन पुढे लोटांगण घातले होते अशी स्वप्न तुम्हाला पडतात.
चीन ल दबावात ठेवण्यात मोदी ना कुठेच यश आले नाही.
त्याला जे वाटते ते चीन मोदी च्या राज्यात बिन्धास्त करत आहे.
देशाचा इतिहास एकदा मन लावून वाचा म्हणजे संतुलित विचार करू शकाल तुम्ही.
नागपूर मधून प्रसारित झालेले साहित्य कमी वाचत जा.

बाप्पू's picture

27 Jan 2021 - 7:36 pm | बाप्पू

188
तुम्ही एकतर पक्के खांग्रेसी आहात किंवा तुमची विवेकबुद्धी गहाण टाकून फक्त मोदी या नावाचा शिमगा करण्यात धन्यता मानताय.

62 साली जी महाचूक झाली ती कोणत्याही बुद्धिजीवी माणसाला माहिती आहे.
62 च नव्हे तर त्या आधी 1947 पासून राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत ज्या ज्या चुका एका बिनडोक आणि स्त्री लंपट पंतप्रधानाने केल्या त्याचे दूरगामी परिणाम झाले.. आजही आपण भोगतोय.

अर्थात त्यावेळी नव्या भारतासमोर असंख्य अडचणी होत्या हे मान्य केले तरीही चीनबाबत आणि पाकिस्तान बाबत इतके बिनडोक आणि मूर्खपणाचे निर्णय घेणे हे भारताला चांगलेच महागात पडलेय.

तुम्हाला हे माहिती नसेल तर अभ्यास वाढवा. आणि एकंदर तुम्ही माहिती असून पण आपली बूट लिकिंग इमाने इतबारे करत आहात हे आम्हीही जाणून आहोत.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 8:07 pm | मुक्त विहारि

नेहरूंनी केलेल्या चुकीची फळे, अद्याप भारत भोगत आहे.

ही घाण निस्तरता निस्तरता, अजून 700 वर्षे लागतील.

रात्रीचे चांदणे's picture

27 Jan 2021 - 7:54 pm | रात्रीचे चांदणे

मोदींनी IMF ला पण मॅनेज केलेले दिसतेय. https://www.indiatoday.in/business/story/india-s-agriculture-laws-have-p...