तुलाच आज पाहतो

Primary tabs

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 am



तुलाच आज पाहतो

वृत्त : कलिंदनंदिनी
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा (मात्रा :२४)


फुलांत श्वास गुंफता लयीत साज पाहतो
कवेत घेत कल्पनी तुलाच आज पाहतो

अधीर वारियास मी कसेतरी दटावतो
चुकार त्या बटांमध्ये खुशाल माज पाहतो

हसून बोलसी जशी नभात वीज तोलसी
अनाहतात नाद तो जपून गाज पाहतो

अबोध पापणी तुझी कुठूनही खुणावते
मिटून लोचनांस घे, खळीत लाज पाहतो

असे कसे गं चांदणे, चुरा करून सांडले
लवून वेच साजणी, दुरून बाज पाहतो

कधी फुलेल अंगणी वसंत मी विचारतो
तुझाच छंद बावळा, दुजे न काज पाहतो


दिपाली


प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2020 - 3:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! आवडली रचना.

''हसून बोलसी जशी नभात वीज तोलसी
अनाहतात नाद तो जपून गाज पाहतो''

ख़ासच.

-दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Nov 2020 - 6:56 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

असे कसे गं चांदणे, चुरा करून सांडले
लवून वेच साजणी, दुरून बाज पाहतो

सुं-द-र

गोंधळी's picture

14 Nov 2020 - 7:36 pm | गोंधळी

👍

हसून बोलसी जशी नभात वीज तोलसी
अनाहतात नाद तो जपून गाज पाहतो

अबोध पापणी तुझी कुठूनही खुणावते
मिटून लोचनांस घे, खळीत लाज पाहतो

असे कसे गं चांदणे, चुरा करून सांडले
लवून वेच साजणी, दुरून बाज पाहतो

निव्वळ अप्रतिम..
पुन्हा पुन्हा वाचावी अशी...

आत्ताच तीनदा वाचली कविता..

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 10:25 pm | टर्मीनेटर

@मी-दिपाली

'तुलाच आज पाहतो'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 3:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुरेख, गणेशा म्हणाला तशी, पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते,
पैजारबुवा,

किरण कुमार's picture

24 Nov 2020 - 2:26 pm | किरण कुमार

असे कसे गं चांदणे, चुरा करून सांडले
लवून वेच साजणी, दुरून बाज पाहतो.... क्या बात

प्राची अश्विनी's picture

24 Nov 2020 - 6:32 pm | प्राची अश्विनी

किती सुंदर!!!!

एकदा वाचून मन भरत नाही.सुंदर,अतिसुंदर!