Skip to main content

कधीतरी

कधीतरी

Published on शनीवार, 14/11/2020 प्रकाशित मुखपृष्ठ

कधीतरी

कधीतरी असेही करू या तिरावर हातात हात घेऊन नदीच्या पाण्यावर वाहत्या नावेवर स्वार झालेले आपण दोघे कसे दिसतो ते पाहू या ..... कधी तू एका तिरावर अन् मी दुसऱ्या तिरावर असे बसून नजरेचा पूल बांधून बघू या कधीतरी असेही करू या ...... कड्यावर घट्ट बसून खालच्या दरीतील धुक्यावर शेवरीसारखे हलके हलके होत तरंगत जाऊन बघू या कधीतरी असेही करू या ..... एकदा मी तुझ्या डोळ्यात उतरतो एकदा तू माझ्या डोळ्यात उतर एकमेकांच्या डोळ्यांना एकमेक कसे भावतो कधीतरी असेही बघू या ....... कसेही करून बघितले तरी . . कधी तिरावर कधी पुलावर कधी कड्यावर कधी नजरेवर तुझी माझी घट्ट गाठ राहणार ती राहणारच सखे .... चल, कधीतरी असेही करून बघू या
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|



याद्या 10354
प्रतिक्रिया 10

कविता नेहेमी प्रमाणे तरल झाली आहे, आवडली हे ओघानं आलंच !


@मिसळलेला काव्यप्रेमी

'कधीतरी'

ही कविता आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर


नावाला जागलास, सुरेख लिहिली आहेस. पैजारबुवा,

एकदा मी तुझ्या डोळ्यात उतरतो एकदा तू माझ्या डोळ्यात उतर एकमेकांच्या डोळ्यांना एकमेक कसे भावतो कधीतरी असेही बघू या
आवडली