उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
20 Oct 2020 - 9:29 pm
गाभा: 

बर्‍याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही.

असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे?

तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत?
या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.

प्रतिक्रिया

मोहनराव's picture

21 Oct 2020 - 3:43 pm | मोहनराव

चांगल्या सवयी अंगभूत करून घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मोटिवेशन लागते. ते असेल तरच तुम्ही तग धरू शकता.
दुसरी एक गोष्ट म्हणजे मी कुठेतरी एका व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे तुम्ही एखादी गोष्ट २० वेळा सलग करून पहिली तर पुढे ती गोष्ट सवयीत रूपांतर होते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे.

संजय क्षीरसागर's picture

21 Oct 2020 - 6:59 pm | संजय क्षीरसागर

स्वतः काहीही विचार न करता, डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये !

एनी वे, सगळ्यांना उपयोगी होईल म्हणून उत्तर देतो :

१. कुठलीही गोष्ट लावून धरण्यामागे तुमच्या इंटरेस्टची तीव्रता कारणीभूत असते. लोकांचे इंटरेस्ट फारसे तीव्र नसतात त्यामुळे प्रोजेक्ट फाफलतो.
२. आपल्याला जमेल हा अत्मविश्वास असेल तरच त्या उपक्रमावर मेहेनत होते. संदिग्धावस्थेमुळे उपक्रम बारगळण्याची शक्यता प्रचंड.
३. उपक्रमासाठी आवश्यकती उत्तम गॅजेटरी विकत घेणं तुमचा इंटरेस्ट वाढवतं (म्हणजे धावायचं असेल तर ब्रँडेड शॉर्ट्स, आरामदायी टी शर्ट आणि उत्तम स्पोर्टस शूज)
४. लवकारात लवकर थोडं फार यश मिळणं अत्यंत अनिवार्य आहे. जर रिझल्ट येत नसेल तर तुम्ही चुकीची मेथड (उपक्रम नाही) निवडली आहे असा अर्थ होतो. त्यामुळे योग्य मेथड हा एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे.

उपयोजक's picture

21 Oct 2020 - 8:36 pm | उपयोजक

स्वतः काहीही विचार न करता, डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये!

स्वत:च काहीही तर्क करायचा ,स्वत:च निष्कर्ष काढायचा ,स्वत:च तो परिपूर्ण असल्याचे ठरवून स्वत:लाच सर्वज्ञ असल्याचे प्रमाणपत्र द्यायचे हा तुमचा फंडा त्याहून भारीये.

असो.

देण्याची सवय तुम्हालाही जडलेली दिसते !

त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.

कसा मांडला जावा,केव्हा काय लिहावे हे त्या लेखकाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ना? की तुम्ही सांगाल तसंच लिहायचंय?

वीणा३'s picture

21 Oct 2020 - 9:30 pm | वीणा३

सगळेच मुद्दे फारच बरोबर आहेत.

३. उपक्रमासाठी आवश्यकती उत्तम गॅजेटरी विकत घेणं तुमचा इंटरेस्ट वाढवतं (म्हणजे धावायचं असेल तर ब्रँडेड शॉर्ट्स, आरामदायी टी शर्ट आणि उत्तम स्पोर्टस शूज) - हे माझ्याबरोबर नेहमी होतं. मी जर चांगल्या वस्तू विकत घेतल्या कुठल्यातरी व्यायाम प्रकारासाठी तर मला सकाळी उठायचा उत्साह पण येतो. आणि वस्तू विकत घेतली असेल तर तो उत्साह जवळपास ८-१० महिने टिकतो आणि वजन बऱ्यापैकी कमी होऊन जातं तेवढ्या वेळात. मग २-४ महिने (खासकरून थंडीचे) असेच जातात, मार्च-एप्रिल नंतर परत उत्साह येतो व्यायाम करायला .

माझे थोडे पैसे :
१. थंडीच्या महिन्यात कुठल्याही सकाळी लवकर उठायच्या उपक्रमाची सुरवात करू नका (खासकरून तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय नसेल तर) .
२. एखादा मित्र - मैत्रीण शोध जे नियमित व्यायाम करतायत, आणि त्यांच्या बरोबर व्यायाम करायचा प्रयत्न करा. कोणी बरोबर असेल तर उत्साह नक्कीच वाढतो.
३. उपक्रम सुरु केल्या केल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवा. कारण खूप व्यायाम करून वजन कमी होतंच नाहीये असं झालं कि व्यायामाचा उत्साह निघून जातो. व्यायाम केलाय आता दुप्पट खाल्लं तरी चालेल असं करू नका.
४. वेळ अशी निवड कि जी सहज शक्य असेल (ती बरेचदा सकाळचीच येते :( ) , संध्याकाळी ऑफिस वरून आल्यावर करेन असा प्लॅन असेल तर तो बारगळण्याची शक्यता जास्त असते.

१. कोणत्याही दीर्घकालीन उपक्रमाची सुरुवात रोज सकाळी लवकरात लवकर केली तरंच सातत्य टिकतं. संध्याकाळी ठरवलेल्या वेळेत हमखास विक्षेप येतात आणि तो लवकरच बंद पडतो.

२. ग्रुप अ‍ॅक्टीविटी अनंत काळ चालते आणि नक्की मजेची होते.

आमच्या टेबलटेनीसची टाईम स्लॉट सकाळी ८ ते ९ आहे. आम्हाला फार हौस म्हणून आम्ही ७.३० लाच हजर ! एकजण तर सकाळी ६ वाजता निघून फुल सायकल मारुन खेळायला येतो. दिवसाची सुरुवात फार प्रसन्न होते.

महासंग्राम's picture

22 Oct 2020 - 10:53 am | महासंग्राम

स्वतः काहीही विचार न करता, डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये !

+१

कदाचित म्हणूनच लोक इथे लिहिते होत नसतील

Rajesh188's picture

23 Oct 2020 - 6:09 pm | Rajesh188

तुमच्या 1 आणि 2 पॉइंट शी पूर्णतः सहमत.
आणि 3 शी पूर्णतः असहमत.
पॉइंट 4 शी अंशतः सहमत

रानरेडा's picture

23 Oct 2020 - 11:04 pm | रानरेडा

तुमची फार मोठ्या बाता मारून ठरवलेली पेड साईट ३ वर्षात आली नाही त्यामागे यातली कोठली कारणे नव्हती ?
आत्मविश्वास तर जास्तच दिसत होता कि

कुमार१'s picture

21 Oct 2020 - 7:12 pm | कुमार१
उपयोजक's picture

21 Oct 2020 - 8:43 pm | उपयोजक

छान अनुभव आहे. आभार्स!

सुबोध खरे's picture

21 Oct 2020 - 8:03 pm | सुबोध खरे

@ उपयोजक : मनात विचार आला की त्यावर

स्वतः काहीही विचार न करता,

डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये !

त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले?

त्यांना त्यांचा विचार सध्या लोकांना जाहीर करायचा नसू शकतो. काही वेळेस आपला विचार व्यक्त केला कि दुसऱ्या बाजूचा पूर्वग्रह (BIAS) होऊ शकतो.

जिकडे तिकडे मीच शहाणा

म्हणू दर्पोक्ती का करता?

लॉजिक वाढत जाईल. फक्त घाईघाईनी उपप्रतिसाद न देता शांतपणे वाचत जा !

सदर लेखक सतत फुटकळ विषय घेऊन पोस्ट टाकतात. त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.

तरीही उपक्रम चालू रहावा यासाठी काय करावं हे वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे; ते सोडून तुम्ही पुन्हा विषय भरकटवत सुटलात !

उपयोजक's picture

21 Oct 2020 - 8:40 pm | उपयोजक

सतत फुटकळ विषय घेऊन पोस्ट टाकतात

दुसर्‍यांचे धागे हायजॅक करुन त्या धाग्याची वाट लावणे हे तुमचे कौशल्य सर्वांकडे असणे शक्य नाही.

असो. जहाँ नहीं चैना उस धागे को मत वाचना।

बघा जमेल का इतकं ते!

एनी वे, सगळ्यांना उपयोगी होईल म्हणून उत्तर देतो

सुबोध खरे's picture

22 Oct 2020 - 9:49 am | सुबोध खरे

@ संजय क्षीरसागर

त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले?

याचं उत्तर द्या

मग तुमच्या बाकी सगळ्या भंपक गोष्टींबद्दल विचार करू

त्यांच्या मेंदूत चालणारे विचारही तुम्हाला ऐकू येतात कि काय?

हे स्किझोफ्रेनिया चे लक्षण आहे. काळजी घ्या

न वाचता वैयक्तिक शेरेबाजी करुन दरवेळी स्वतःचं हसू करुन घेणं बरं नाही > आता तरी नीट वाचा :

त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.

सुबोध खरे's picture

22 Oct 2020 - 11:07 am | सुबोध खरे

ते सगळं ठीक आहे

पण

त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले?

हे सांगा

मग बाकी चर्चा करू

पुन्हा वाचा :

त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.

महासंग्राम's picture

22 Oct 2020 - 11:32 am | महासंग्राम

बऱ्याच वेळा मी संक्षी यांच्याशी सहमत नसतो पण इथे मात्र आहे !

सुबोध खरे's picture

22 Oct 2020 - 11:40 am | सुबोध खरे

ते सगळं ठीक आहे

पण

त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले?

हे सांगा

मग बाकी चर्चा करू

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2020 - 11:52 am | संजय क्षीरसागर

महासंग्रामांना कळलंय, त्यांना व्यनि करुन विचारा म्हणजे आता आणखी शोभा होणार नाही.

महासंग्राम's picture

22 Oct 2020 - 12:22 pm | महासंग्राम

मी त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही

या बाबतीत सहमत आहे. विचार करायचा कि नाही हे ज्याची त्याची वैयक्तीक गोष्ट आहे

आनन्दा's picture

22 Oct 2020 - 12:05 pm | आनन्दा

असा प्रश्न तुम्ही सर्वज्ञानींना कसा विचारू शकता?
धागा काथ्याकूटात असला तरी देखील लेखकाने स्वतः संपूर्ण विचार करून आधी एक लेख पाडावा आणि मगच काथ्या कुटावा.

अवांतर, लेखकाने उपक्रम अयशस्वी का होतात असे विचारले आचा, सबब त्याला अनेक उपक्रम अयशस्वीपणे सुरू करायचा अनुभव असावा असे गृहीत धरू शकतो. त्यामुळे विचार केला नाही ही टिपण्णी अनाठायी आहे, असे मत व्यक्त करून खाली बसतो.

डॅनी ओशन's picture

22 Oct 2020 - 12:24 pm | डॅनी ओशन

***संक्षि मोड ऑन***

निरर्थक प्रतिसाद देण्याची इतकी घाई करू नका ! आधी प्रतिसाद नीट वाचत चला, म्हणजे पुन्हा पुन्हा अशी वेळ येणार नाही !
मिसळपावचे काथ्याकूट धोरण वाचले असते तर अशी वेळ आली नसती !
वाचा-

येथे तुम्ही एखाद्या विषयावर थोडे लिहावे म्हणजे लोकांना त्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात येईल. त्यानंतर आपले मत मांडावे आणि शेवटी अन्य लोकांचे मत मागावे. अश्याने अन्य लोकसुध्दा त्या चर्चेत सहभागी होतील. केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल.

इथे धागालेखकाने स्वतःचा एकतरी विचार लिहिलाय का ? त्यामुळे उगाच विरोध करण्याऐवजी जरा वाचत चला !

***संक्षि मोड ऑफ***

इथे धागालेखकाने स्वतःचा एकतरी विचार लिहिलाय का ?

ते सगळं ठीक आहे

पण संक्षी यांनी लेखकाने विचारच केलेला नाही असे सांगितलंय.

काय म्हणताय?

डॅनी ओशन's picture

22 Oct 2020 - 12:49 pm | डॅनी ओशन

संक्षि मोड ऑन

धागालेखक म्हणजे उपयोजक या आयडीने यावर विचार केला नाही असे मी म्हणालो आहे आणि ते योग्य, परफेक्शन, तंतोतंतच आहे !
धागा मोकळा असेल तर मूळ व्यक्तीने विचार केला अथवा न केला याला काडीचेही महत्व नाही ! उपयोजक या आभासी व्यक्तीने कोणताही विचार केला नाहीच !

संक्षि मोड ऑफ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2020 - 12:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सदर लेखक सतत फुटकळ विषय घेऊन पोस्ट टाकतात.

लेखकाचे फुटकळ विषय आणि सततचे पाट्या टाकणारे दळणाविषयी आपल्या मुद्द्याशी सहमत असलो तरी लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे व्यक्त होण्याची संधी या विचारपिठाची असल्यामुळे लेखकांनी प्रॅक्टीकली काही केल्याशिवाय लेखन करावे असे काही आढळत नाही, असे दिसते. त्यामुळे आपण म्हणता की लेखक फुटकळ विषय घेऊन पोश्ट टाकतात असे असले तरी आपल्याला प्रत्येकाच्या लिहिण्या-बोलण्याचा आदर व्यक्त केला पाहिजे असे वाटते. इग्नोर करण्याचा मार्ग आपल्याकडेही आहेच असे वाटते.

-दिलीप बिरुटे

उपयोजक's picture

24 Oct 2020 - 12:09 am | उपयोजक

काहीजणांना माझे धागाविषय चांगले वाटतात.सर्व प्रतिसाद वाचलेत तर कळेल.
इथल्या प्रत्येक धाग्यात 'दर्जा' शोधण्याआधी बहुतांश वेळेला १० पेक्षा जास्त सदस्य उपस्थित नसतात; किंवा कधी कधी तर आत्ता उपस्थित सदस्य १ असेही वाचले आहे.याकडे लक्ष द्या जरा. आधीच लोकांचा वाचनाकडे कल कमालीचा कमी झालाय त्यात तुम्ही आणि इथलीच दोन-चार मंडळी प्रत्येक धाग्यात 'साहित्यिक दर्जा' वगैरे शोधू लागलात तर जे लोक लिहितायत ते सुद्धा लिहायचं बंद करतील.किंवा तुम्हाला हवं तसं दर्जेदार लेखन हवं असेल तर इथे तुम्ही आणि 'तुमच्याइतके' 'दर्जेदार' लेखन करणारे लोकच का सगळे धागे काढत नाही? तुमच्या तराजूत न बसणार्‍यांना मनाईच करावी लेखनाला. म्हणजे मग मनासारखे दर्जेदार लेख मिळत नसल्याने होणारी चिडचिड तरी थांबेल तुमची. आधी लोकांना हवं तसं लिहा म्हणायचं आणि नंतर त्यांच्या लेखनाची मापं काढायची हा विकृत आनंद झाला ना? त्या 'भेजा फ्राय' सिनेमातल्यासारखा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2020 - 8:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं मिपाचं वय आणि वावर पाहता, एकच सल्ला देतो आपण मिपाची फार काळजी करु नका. तान घेऊ नका. दळत राहा सॉरी लिहिते राहा शुभेच्छा....!

-दिलीप बिरुटे

उपयोजक's picture

24 Oct 2020 - 9:15 am | उपयोजक

चालतंय की! :)

पण मग तुम्हीही इतरांच्या धाग्याच्या विषयांचा दर्जा आणि वारंवारिता यांची काळजी करत जाऊ नका.ही विनंती!

बाकी मिपावरचं वय आणि वावर जास्त असणे हे निकष कैच्या कै आहेत. ;)

कंजूस's picture

21 Oct 2020 - 8:36 pm | कंजूस

माझा असा समज आहे की चांगल्या सवयी आहेत असं वाटतं त्या गोष्टी
१) वेळ उलटून गेल्यावर लक्षात येतात. त्याचा पाठपुरावा करण्यास वय आणि शरीर साथ देत नाही. थोडे दिवस करून मग विचार येतो की याची सुरुवात अगोदरच करायला हवी होती.
२) निरीक्षण कमी पडणे किंवा त्या सवयींचं महत्त्व उशिरा कळणे हेसुद्धा आहे. अर्थात उत्साह गेलेला असतो. अगदी झोपसुद्धा येऊ लागते.

आणखीही कारणं आहेत. नंतर.

उपयोजक's picture

21 Oct 2020 - 8:46 pm | उपयोजक

सवयींचं महत्त्व उशिरा कळणे हेसुद्धा आहे.

दुर्दैवाने खरं आहे! :(

असा काहि उपाय बिपाय नाहि आमच्याकडे ;) पण स्वानुभवाने एक गोष्त लक्षात आलि आहे.
जर एखादा उपक्रम / सवय अंगी बाळगायची इच्छा होत असेल तर त्याची काहि ना काहि गरज नक्की वाटली असते. उदा. व्यायाम करायची सवय लागावी अशी इच्छा असेल तर आरशात दिसणारं स्थुल शरीर, एखादा वाईट मेडीकल रिपोर्ट, किंवा अगदी पोरगा/पोरगी पटवणे वगैरे काहिही कारण असु शकेल.
असं म्हणतात कि कुठलिही सवय २१ दिवसांच्या नियमीत सरावाने लावुन घेता येते. आता असा काटेकोर २१ दिवसांचा विदा नाहि नाहि माझ्याकडे, पण माझी एक पद्धत आहे.
सवय लावुन घ्यायला जे कारण असेल, जसं इथे व्यायामाच्या गरजेबद्दल म्हटलय, ते कारण दृष्य स्वरुपात आपल्याला नेहेमी दिसेल अशा ठिकाणी ठेवावे. एखादा फोटो, तक्ता, मेडीकल रिपोर्ट वगैरे. त्या सवयीला अनुकुल अशी १५ मिनीटाची अ‍ॅक्टीव्हिटी बनवावी. म्हणजे कसं, कि व्यायाम करायचा असेल तर ५ मिनिटे वॉर्म अप, ५ मिनीट मुख्य व्यायाम, ५ मिनीटे कुल डाऊन. बस्स.. आणि हि अ‍ॅक्टीव्हिटी दिवसाची सुरुवात होताच सर्वप्रथम उरकावी. ८ - १० दिवस जर असं करु शकलो तर नवीन सवय आत्मसात करायचे चान्सेस खुप वाढतात.

उपयोजक's picture

21 Oct 2020 - 11:24 pm | उपयोजक

हा उपाय भारीये!
अमुक व्हायला नको असेल तर ही चांगली सवय लावलीच पाहिजे.भारी!

सुबोध खरे's picture

22 Oct 2020 - 11:18 am | सुबोध खरे

कुठलिही सवय २१ दिवसांच्या नियमीत सरावाने लावुन घेता येते.

८ - १० दिवस जर असं करु शकलो तर

इथेच तर घोडं पेंड खातंय.

व्यायाम करायचा तर आळस फार येतो.

बाकी वजन कमी करणे किंवा असा कोणताही हेतू नाहीये.(ते प्रमाणातच आहे)

कानडाऊ योगेशु's picture

22 Oct 2020 - 1:01 am | कानडाऊ योगेशु

व्यायामाला मी एक ठराविक वेळ ठरविली नाही आहे आणि जिम वगैरेही लावली नाही. जिन्याच्या पायर्यांवर स्टेप अप स्टेप डाऊन करत बसायचे.
ठराविक वेळ नसल्याने ती उलटुन जायचा प्रश्नच नाही. (म्हणजे सकाळी ८ लाच व्यायाम करायचा असे ठरवले कि एकदा का साडेआठ झाले तर मग आपणच स्वत:ला कन्विन्स करतो कि आता तर वेळ गेली उद्या करु.)
आणि जिनाही कुठे जात नसल्याने जबरदस्तीने व्यायाम करावा लागतो नाहीतर मन खात राहते.
तरीही टाळाटाळ होते पण तरीदेखील हा प्रकार सुरु राहतो.

सोत्रि's picture

22 Oct 2020 - 8:02 am | सोत्रि

उत्तम विषय!

शरीर - मन (विचारप्रवाह) ह्यांच्या परस्पर संबंधांवर कुठल्याही बदलाला आपण कसे सामोरे जातो हे ठरते. डोपामाइन नावाचे हार्मोन ह्यासाठी महत्वाचे असते.
कुठलीही गोष्ट केल्यावर मिळणारा मोबदला काय आणि तो कसा आणि कितीआनंदायी आहे ह्याची चिकित्सा झाल्यावर डोपामाइन हार्मोन तयार होते. त्याची मात्रा मोबदला मिळणाची शक्यता किती जास्त आहे त्यावर ठरते. तर, डोपामाइन शरीरात किती प्रमाणात तयार होते ह्यावर उपक्रम दीर्घकाळ चालणार की नाही हे ठरते. ह्या डोपामाइनच्या योग्य पातळीसाठी खालील सोप्पे उपाय उपयोगी ठरावेत.

१. समतोल आहार
२. आहाराची ठरलेली वेळ
३. पुरेसा व्यायाम
४. भरपूर वाचन किंवा एखादा छंद जो नविन अनुभव देऊ शकेल
५. ध्यान (मेडीटेशन)

ह्या डोपामाइनचा एक लेख रेकमेंड करतोय वाचण्यासाठी.

तसेच सखोल अभ्यासाठी हे एक पुस्तक रेकमेंड करेन.

Click to download the book

- (उपक्रम दीर्घकाळ टिकवण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

उपयोजक's picture

22 Oct 2020 - 8:59 pm | उपयोजक

लेख आणि पुस्तक दोन्ही उत्तम!

उपयोजक's picture

22 Oct 2020 - 11:33 pm | उपयोजक

धन्यवाद सोत्रि.तुम्ही थोडं तांत्रिक/वैज्ञानिक अंगानं लिहिलंय त्यामुळेच थोडं अधिक लिहितो.
माझा प्रॉब्लेम हा मेडीटेशनसंबंधीच आहे.बर्‍याच वर्षांपूर्वी एका किचकट प्रॉब्लेममधून जाताना मानसिक ताणामुळे येणारे मनातले अनावश्यक किंवा नकारात्मक विचार कमी व्हावेत यासाठी एका स्नेह्यांनी जपमाळेचा उपाय सुचवला होता.दुसरा काही पर्याय त्यावेळी नसल्याने त्यावेळी 'शरणागती पत्करुन' मी तो उपाय केला आणि त्यामुळे कमालीचा फायदा झाला देखील.
आता हे मला परत सुरु करायचं आहे.त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.पूर्वी हे कार्य बिनबोभाट घडून गेलं कारण पर्याय नव्हता,फारच अडचणीत होतो,शरणच गेलो म्हणा!
आता का जमत नाहीये तर 'समस्येची तीव्रता किंवा आवाका पूर्वीइतका मोठा नाहीये.सध्याचा उपक्रम हा आहे त्यापेक्षा अधिक फायदा मिळवण्यासाठी करत आहे.
यात अजून एक लोचा म्हणजे मी जरा चिकित्सक आहे.जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्‍याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते.पुढे पुढे १-२ दिवस खंड पडतो.मग बळजोरीने परत काही दिवस रेटले जाते.हा खंड पडण्याचा कालावधी वाढला तर उत्साह जवळपास संपल्यात जमा होऊन उपक्रम थंडावतो.मी आचरत असलेल्या उपायामुळे मला फायदा होणार आहे हे मला १००% माहित आहे.तसूभरही शंका नाही.
सारांशाने सांगायचे तर उपक्रम बारगळ्याचे कारण हे त्या उपक्रमाच्या प्रक्रियेतला 'एकसुरीपणा' हे आहे.
यावर काय उपाय करता येईल?

सोत्रि's picture

23 Oct 2020 - 4:04 am | सोत्रि

उपक्रमाविषयी सविस्तर पार्श्वभूमी सांगिल्यावर प्रॅाब्लेम स्टेटमेंट स्वच्छ झालं.

व्यनि करतो, चर्चा करूयात, मीही ह्यातून गेलोय / जातोय.

- (मुमुक्षू) सोकाजी

उपयोजक's picture

23 Oct 2020 - 8:39 am | उपयोजक

धन्स!

तर इतका गोंधळ झाला नसता ! लपवाछपवीमुळे गुंता वाढत जातो हा फंडा आहे.

१. जप ही मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवायची सर्वात बोगस पद्धत आहे. ते लहान मुलाचं लक्ष त्याच्या हट्टापासून काही काळ दुसरीकडे वेधण्यासारखं आहे. जप थांबला की पुन्हा मनातला गोंधळ दुप्पट वेगानं उसळी मारुन सुरु होतो. थोडक्यात जप हा निर्बुद्ध टाईमपास आहे. एकतर तो करत असतांना तुम्हाला दुसरं काही करता येत नाही आणि तो थांबवला की मनाच्या आवेगाची दहशत कायम रहाते. तस्मात, हा प्रोजेक्ट ड्रॉप करणं उत्तम !

२. मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवण्याचा एकमेव उपाय आणि पहिली स्टेप म्हणजे त्याची व्यर्थता लक्षात येणं. मनानी कोणतंही काम होत नाही. काम शरीर आणि मन यांच्या संगतीनंच होऊ शकतं. त्यामुळे मनानं काम करण्याचा खटाटोप सोडून देणं श्रेयस. उदा. घरात असतांना मनानी ऑफिसला जाण्याचा प्रयत्न हा असंभव प्रयास आहे. मन आणि शरीर कायम एकसंगत असतील तरच काम होईल इतकी साधी गोष्ट लक्षात आली की तुमची ७० ते ८० टक्के मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबलीच म्हणून समजा.

३. कायम समोर पहाणं आणि आजूबाजूला चाललेलं ऐकत रहाणं हे जगातल्या सर्व ध्यानप्रणालींचा अभ्यास करुन मी शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे. एकदा तुम्हाला ते जमलं की मनाची दहशत संपलीच म्हणून समजा.

सुबोध खरे's picture

23 Oct 2020 - 11:55 am | सुबोध खरे

जप ही सर्वात बोगस पद्धत आहे

जप हा निर्बुद्ध टाईमपास आहे.

मनानी कोणतंही काम होत नाही.

जगातल्या सर्व ध्यानप्रणालींचा अभ्यास करुन

मी

शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे.

एकदा तुम्हाला ते जमलं की मनाची दहशत संपलीच म्हणून समजा.

संजय क्षीरसागर's picture

23 Oct 2020 - 12:08 pm | संजय क्षीरसागर

मी जेवलो याचं दुसरं वर्शन करुन दाखवा.

आणि अर्थात ती मी शोधलेली पद्धत आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननी लावला असंच वाक्य होणार.

तुम्ही उगीच गोंधळ घालून विषय भरकटवण्यापेक्षा, जमल्यास ते मेडीटेशन करुन पाहा, प्रचिती येईल.

सुबोध खरे's picture

23 Oct 2020 - 12:12 pm | सुबोध खरे

मी कुठे काय म्हणालोय?

मी फक्त तुमचेच शब्द लिहिलेले आहेत.

त्यात माझे अक्षरशः एकही अक्षर नाही

जाता जाता -- खाई त्याला खवखवे अशी एक म्हण ऐकली आहे.

तद्दन प्रतिसाद देऊन आणखी शोभा होते.

खवखवतंय तुम्हाला की लेखकानं सरते शेवटी नक्की प्रॉब्लम उघड केला. तुम्ही उगीच फालतू मुद्दा लावून धरला होता तो आता फेल गेलायं.

उपयोजक's picture

23 Oct 2020 - 12:52 pm | उपयोजक

स्वतः काहीही विचार न करता

हा स्वत:ला हवा तसा केलेला तर्क आतातरी उघडा पडलाय का? फेल गेला का आतातरी? की अजून काही मल्लिनाथी येणारेय यावरदेखील?

धागा विषयाबद्दल बोलाल तर बरे होईल. किंवा दुसरे झाड धरावे!

संजय क्षीरसागर's picture

23 Oct 2020 - 1:17 pm | संजय क्षीरसागर

इतका वेळ तुम्ही ताकाला जाऊन भांडं लपवत होता आणि म्हणून ते निरिक्षण पर्फेक्टच होतं !

आता झकत नेमका प्रश्न लिहिल्यामुळे धागा योग्य वळणावर आला आहे.

उपयोजक's picture

23 Oct 2020 - 2:43 pm | उपयोजक

डॉन आहात तुम्ही मिपाचे. आम्ही काय सामान्य माणसं! ;)

संजय क्षीरसागर's picture

23 Oct 2020 - 3:09 pm | संजय क्षीरसागर

सगळ्यांनी मुद्दा सोडून आधी मला घेरायचा प्रयत्न करायचा आणि काही जमलं नाही की ही मखलाशी !

व्यक्तिगत होण्यापेक्षा सगळे मुद्दा धरुन लिहायला लागले तर संकेतस्थळावर सर्वांना उपयोगी असं काही तरी विधायक होत राहील.

उपयोजक's picture

23 Oct 2020 - 7:14 pm | उपयोजक

आधी मला घेरायचा

तसे का होते याचा विचार केलात का कधी?

१. तुमचे प्रतिसाद हे अनावश्यकपणे धार लावलेले असतात. सौम्य शब्दांत आपला मुद्दा समोरच्यापर्यंत पोहचवता येतो यावर तुमचा विश्वास नाही.जगात कोणीही परिपूर्ण नसतो हे मुख्य तत्वच तुम्ही विसरता. ही अनावश्यक धार न लावता संवाद साधायचा प्रयत्न करा.शाब्दिक तलवारींचा खणखणाट नसावा.

२. तुम्ही अध्यात्म,विज्ञाननिष्ठता या विषयात इथल्या लोकांपेक्षा थोडे अधिक ज्ञानी असालदेखील.पण त्यामुळे अध्यात्म,विज्ञाननिष्ठता या विषयातलं जगातलं सगळं ज्ञान तुम्हाला आहे असा तुमचा गैरसमज होतो. आणि त्यातून तुम्ही तुमचे विचार लादायला बघता.विचार मांडावेत आणि लोकांना तुमच्या विचारांवर विचार करायला वेळ द्यावा हे तुमच्या लक्षातच येत नाही.तुमचे विचार लोकांनी बिनबोभाटपणे मान्य करावेत असा तुमचा दुराग्रह असतो. तुमचे विचार पटले तर लोक तसं सांगतील ना! पटलेच पाहिजेत असा दुराग्रह नसावा.

वामन देशमुख's picture

23 Oct 2020 - 7:59 pm | वामन देशमुख

२. तुम्ही अध्यात्म,विज्ञाननिष्ठता या विषयात इथल्या लोकांपेक्षा थोडे अधिक ज्ञानी असालदेखील.

अहो उपयोजक, हा गैरसमज दूर करा हो आधी.

अर्थात, हाच धागा पाहा :

१. तुम्ही पोकळ धागा काढला म्हणून मला स्पष्ट प्रतिसाद देणं भाग पडलं.

२. इतर सदस्यांना मधे पडायची गरज नव्हती तरी ते मुद्दा लक्षात न घेता नाहक मधे पडले (आणि तुमचं स्पष्टीकरण आल्यावर तोंडावर आपटले). त्यांचे प्रतिसाद किती व्यक्तिगत आहेत ते पाहा. अशा लोकांना सांगायची इथे कुणाची हिंमत नाही; त्यामुळे जशास तसे उत्तर देणे क्रमप्राप्त झाले.

३. जालावर कुणी कुणाचं ऐकून घेत नाही त्यामुळे मी मतं लादतो हा तर फारच तकलादू युक्तीवाद आहे. थोडक्यात, तुम्हाला माझं पटलं तरच तुम्ही जपाचा नाद सोडाल हे सरळ आहे.

४. शिवाय राजेंद्र बर्व्यांचे सगळे मुद्दे बाद झाले आहेत त्याचा तुम्हाला आणि इतरांनाही (नीट विचार केला तर) हमखास उपयोग होईल.

५. नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता. जप हा तोच प्रकार आहे. माझ्याबाजूनी सर्व मुद्देसूद आणि सकारण लिहिलेलं आहे. या उप्पर जशास तसे हा व्यावहारिक दृष्टीकोन आहे हे समजायला काहीच अडचण नाही.

शाम भागवत's picture

24 Oct 2020 - 10:28 am | शाम भागवत

५. नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता. जप हा तोच प्रकार आहे. माझ्याबाजूनी सर्व मुद्देसूद आणि सकारण लिहिलेलं आहे. या उप्पर जशास तसे हा व्यावहारिक दृष्टीकोन आहे हे समजायला काहीच अडचण नाही.

हाहाहा.

तसं काहीही झालेलं नाहीये. तुम्ही तर्काच्या जोरावर विचार करता व मुद्दे मांडता. नामस्मरण हे तर्काच्या कक्षेच्या बाहेर असल्याने ते तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. प्रत्यक्ष कृती करून व अनुभव घेऊनच जाणता येणारी गोष्ट आहे ती.

नामस्मरण करत असताना एक क्षण असा येतो की देहभान हरवते. आजूबाजूचा कोलाहल गोंगाट सगळंच एकदम विरून जाते. परत जेव्हा भान येते, तेव्हां अंग हलकं झालेले असते. प्रसन्नतेचा अनुभव येत असतो. कितीही शारिरीक कष्ट झालेले असले तरी ते सगळे निघून गेलेले असतात. तुम्ही कितीही तर्काच्या जोरावर विचार केला तरी तुम्हाला ते कळू शकणार नाही. तिथे प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता असते. मात्र या अनुभवानंतर आपण कोणितरी विशेष आहोत हा अभिमान धरायचा नसतो, तर ह्या बोधात जगायचे असते. त्यातून शहाणपण व अखंड प्रसन्नता प्राप्त होत असते. त्याची परिणिती अजातशत्रूत्वात होत असते. नामस्मरणाच्या माध्यमातून शांतता अनुभवणाऱ्याला हे सहज जमू शकते. कारण ही स्थिती मी मिळवलेली नसून, ती मला भगवंताच्या कृपेने लाभलीय अशी भावना असते. त्यामुळे या शांततेचा वारंवार अनुभव घेताना त्याच्यातील कृतज्ञता वाढत जात असते, नम्रता अंगी बाणली जात असते.

मात्र इतर मार्गांनी शांतता अनुभवणाऱ्यांना मात्र मी ही स्थिती मिळवली आहे असे वाटत असल्याने, “आपण कोणी विशेष आहोत” हा अभिमान नडतो. इतकेच नव्हे तर मला सगळे कळते असे वाटू लागल्याने नवीन ज्ञान ते मिळवू शकत नाहीत. त्यामुळे नामस्मरण कसं काम करते हे तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. तर्काच्या सहाय्याने तर्काच्या पलिकडे असलेले भगवंताचे नाम जाणण्याचा प्रयत्न करणे हे मुलाने आपल्या वडिलांच्या बारशाला हजर राहण्याचा अट्टाहास करण्यासारखे आहे.

यासाठी मी माऊलींची ओवी उद्धृत केली होती.
नारायण हरी उच्चार नामाचा
तेथे कळीकाळाचा रीघ नाही ॥२५.२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी
तें जीवजंतूंसी काय कळे ॥२५.३॥

पण तुमची सर्व संतांबद्दलची मते माहीत असल्याने थांबायचे ठरवले. पण शेवटचा प्रतिसाद आपला असला की आपण जिंकलो असा तुमचा ग्रह झालेला असल्याने काय करावे हे कळत नव्हते.
साधारणत: वाद थांबवायचा असेल तर मी नमस्कार करून बाजूला होतो. पण त्याचा वेगळाच अर्थ घेतला जाऊ लागल्याचे लक्षात आल्याने
ॐ शांती ॐ
ने समारोप करायचा असा करायचा प्रघात मी सुरू केला.

खरे तर मी उत्तर देणार नव्हतो. त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही. मात्र

नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता.

या तुमच्या वाक्याने धागाकर्ता आणखीन गोंधळात पडू नये यासाठी हे सगळे लिहायला लागले.

परत एकदा
ॐ शांती ॐ

इतरांच्या धारणांना तो शह देतो तेंव्हा “आपण कोणी विशेष आहोत” असा तकलादू युक्तीवाद करुन त्याची बोळवण करण्याचा प्रयत्न केला जातो.

१. कोणत्याही नामजपापेक्षा सजगता सरस आहे. इतकी वर्ष नामसाधना करुन सुद्धा साधक कल्पना आणि वास्तव यात फरक करु शकत नाही याचा अर्थच साधकाला फक्त गुंगी आलेली आहे. तो साध्या कल्पनेनी इतका बेभान होतो की त्याची सर्व साधना आणि शांती एका क्षणात हरवून जाते.

२.

मात्र या अनुभवानंतर आपण कोणितरी विशेष आहोत हा अभिमान धरायचा नसतो, तर ह्या बोधात जगायचे असते. त्यातून शहाणपण व अखंड प्रसन्नता प्राप्त होत असते. त्याची परिणिती अजातशत्रूत्वात होत असते.

ही भावना किती फोल आहे याची कल्पना तुम्हाला स्वतःच्या त्या पोस्टवर लिहिलेल्या अनुभवातून आलेली आहे. सजग व्यक्ती विषय तिथल्या तिथे मिटवते, मग भूतकाळाचं ओझंच रहात नाही. थोडक्यात, अप्रिय आठवणींपासून सुटकेसाठी कल्पनेतल्या व्यक्तीला काल्पनिक क्षमा करणं, असा भोळसट प्रकार करावा लागत नाही.

३.

तर्काच्या सहाय्याने तर्काच्या पलिकडे असलेले भगवंताचे नाम जाणण्याचा प्रयत्न करणे हे मुलाने आपल्या वडिलांच्या बारशाला हजर राहण्याचा अट्टाहास करण्यासारखे आहे

उलट आहे, नामस्मरणाची गुंगी चढलेल्याला आपण वडिलांच्या बारशाला हजर होतो असा सुद्धा भास होऊ शकतो ! पण सजग व्यक्ती सर्व आभासी दुनियेतून मुक्त झालेली असते.

(तुम्हाला इतरांना क्वोट करुन रुपकात्मकतेनं विधानला जोर आणावा लागतोयं)

४.

शेवटचा प्रतिसाद आपला असला की आपण जिंकलो असा तुमचा ग्रह झालेला असल्याने काय करावे हे कळत नव्हते.

प्रतिसादात मटेरियल असेल तरच तो टिकतो, नाही तर ॐ शांती ॐ करत पुन्हा नामाची गुंगी चढवून घेण्यापरता उपाय रहात नाही.

शाम भागवत's picture

24 Oct 2020 - 11:18 am | शाम भागवत

ॐ शांती ॐ

उपयोजक's picture

23 Oct 2020 - 12:22 pm | उपयोजक

जप ही मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवायची सर्वात बोगस पद्धत आहे.

तुमच्याकडून हा असाच काहीतरी प्रतिसाद येणार याची १००% खात्री होती.म्हणून धाग्याच्या निवेदनात स्पष्टपणे सांगत नव्हतो.
---------------------------------------------
प्रफुल्ल डॉ . राजेंद्र बर्वे स्मरण - विस्मरण

स्मरणाचं महत्त्व प्रत्येक धर्मगुरूंनी , संतांनी , महंतांनी आणि सद्गुरूंनी आपल्या सर्वांना पटवलं आहे . वैखरीवाटे प्रकट होणारे ' नाम ' अगदी अंतरात्म्यापासून आलं पाहिजे , याचा आग्रह धरला आहे . आपल्या आराध्यदैवताचं गोड नाव असो की आपापल्या गुरूंनी कानात सांगितलेले मंत्रात्मक नाम असो . ज्यानं त्यानं मुखात परमेश्वराचं नाव धारण केलं पाहिजे , असा उपदेश केला जातो . सर्व पिढ्यांतल्या काही आबालवृद्धांना नामस्मरणाची महती पटते असं नाही , तर त्यांना ते आचरणातही आणता येते . आपापली अत्यंत जिकिरीची आणि जटिल कामं पार पाडताना मनातल्या मनात नामस्मरण करीत राहण्याची तारेवरची कसरत ' त्यांना जमते . खरंच , अशा मंडळीचं कौतुक वाटतं . परंतु सर्वसामान्य माणसांना ते जमतंच असं नाही . पटतं ; पण वर्तनात वठत नाही . कळतं ; पण वळत नाही . तर काही विलक्षण चिकित्सक शास्त्रीय विश्लेषण करू इच्छिणाऱ्या शिक्षित लोकांना ते आवडलं तरी पटतंच असं नाही . त्यांना असं नामस्मरण अनाठायी आणि अवडंबर आहे असं वाटतं . अशा लोकांसाठी काही विश्लेषण ! मानसशास्त्रानुसार मनाची एकाग्रता म्हणजे एखाद्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करणं . असं अवधान खरोखरंच एकाग्र असतं . स्मरण करताना त्या एकाच संवेदनेवर अथवा मनांतर्गत विचारावर लक्ष केंद्रित होतं . त्या एकाग्रतेनं मानसिक शक्ती एकवटण्याची क्षमता मनात निर्माण होते . मनाला लक्ष एकाग्र करण्याचं प्रशिक्षण मिळतं . अशा प्रशिक्षणाचा आपल्याला खूप फायदा होतो . पण नामस्मरणाच्या उपयुक्ततेचं रहस्य पुढे आहे . आपण स्मरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआप विस्मरणाची प्रक्रिया सुरू होते . चक्रावलात ना ? मनामध्ये असंख्य विचार असतात . काही होकारात्मक , काही नकारात्मक . ( काहींच्या बाबतीत नकारात्मक अधिक ) नामस्मरण होकारात्मक असतं , अशा होकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते जमू लागलं की आपोआप ' नकारात्मक ' विचारमालिकाचं विस्मरण होतं . होकारात्मक विचारांची मनात स्थापना होते . नकारात्मक विचारांना गच्छन्ती मिळते . ते विचार मनातून मावळतात . होकारात्मक विचारातून सद्गुणांवर विश्वास निर्माण होतो . त्या विश्वासातून ' आशा ' जन्म घेते . आशा म्हणजे उत्साहित मन , प्रसन्न मन प्रफुल्ल मन ! आहे की नाही गंमत !! तुमची माझी!!!
drrajendrabarve@yahoo.com
-----------------------------------------------
आता हे डॉक्टर राजेंद्र बर्वे कोण ते इथे वाचा.
https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%...

मुंबई विद्यापीठातून डॉक्टरकीची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

पण तुमच्या ज्ञानाच्या तुलनेत यांचं ज्ञान आणि अनुभव तसं किरकोळच असणार नाही का? ;)

तुमची सतावणारी मेंटल अ‍ॅक्टिवीटी ?

एनी वे, काय म्हणतात बर्वे पाहा :

१.

मानसशास्त्रानुसार मनाची एकाग्रता म्हणजे एखाद्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करणं . असं अवधान खरोखरंच एकाग्र असतं . स्मरण करताना त्या एकाच संवेदनेवर अथवा मनांतर्गत विचारावर लक्ष केंद्रित होतं . त्या एकाग्रतेनं मानसिक शक्ती एकवटण्याची क्षमता मनात निर्माण होते . मनाला लक्ष एकाग्र करण्याचं प्रशिक्षण मिळतं . अशा प्रशिक्षणाचा आपल्याला खूप फायदा होतो .

मन एकाग्र करण्याचा प्रयत्नच विक्षेप निर्माण करतो ! तुम्ही प्रेयसी समवेत असतांना मनाची एकाग्रता साधता का ? तीचा सहवासच मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवतो. ही निर्विचार अवस्था हेच रिलॅक्सेशन आहे. त्यामुळेच तर तीचा सहवास हवाहवासा वाटतो. तस्मात, जपानी मन एकाग्र करणं व्यर्थ आहे (हे तुम्हाला ही लक्षात आलं आहे आणि म्हणूनच तुमचा प्रोजेक्ट बारगळला आहे !)

२.

पण नामस्मरणाच्या उपयुक्ततेचं रहस्य पुढे आहे . आपण स्मरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआप विस्मरणाची प्रक्रिया सुरू होते . चक्रावलात ना ? मनामध्ये असंख्य विचार असतात . काही होकारात्मक , काही नकारात्मक . ( काहींच्या बाबतीत नकारात्मक अधिक ) नामस्मरण होकारात्मक असतं , अशा होकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते जमू लागलं की आपोआप ' नकारात्मक ' विचारमालिकाचं विस्मरण होतं . होकारात्मक विचारांची मनात स्थापना होते . नकारात्मक विचारांना गच्छन्ती मिळते . ते विचार मनातून मावळतात . होकारात्मक विचारातून सद्गुणांवर विश्वास निर्माण होतो . त्या विश्वासातून ' आशा ' जन्म घेते . आशा म्हणजे उत्साहित मन , प्रसन्न मन प्रफुल्ल मन ! आहे की नाही गंमत !! तुमची माझी!!!

नेगटिव विचार हद्दपार करायला सजगता लागते. सजगतेमुळे नेगटिव विचार येता क्षणी तुम्ही सावध होता आणि लगोलग तो विचार निघून जातो. बर्व्यांचा सजगतेचा अभ्यास शून्य आहे. एकदा विचारचक्र सुरु झालं की सकारात्मक विचारांमागे नकारात्मक विचार आपसूक येणारच. बर्व्यांना निर्मन अवस्थेची कल्पनाच नाही त्यामुळे त्यांचा मनाचा अभ्यास एकांगी आणि निरुपयोगी आहे .

आनन्दा's picture

23 Oct 2020 - 7:08 pm | आनन्दा

नामस्मरण मन एकाग्र करूनच करावे असे काही बंधन आहे का?

खरे तर हे बोलायचा मला अधिकार नाही, पण तरी सांगतो..

नामस्मरण एक विशिष्ट मर्यादेपलीकडे गेले की ते एक छंद होऊन जाते, आणि ज्याला त्याची गोडी लागेल त्याला ती गोडी खूपच चांगली वाटते असे म्हणतात.

शाम भागवत's picture

23 Oct 2020 - 10:31 pm | शाम भागवत

🎯

यथार्थ आणि मार्मिकपणे मांडला आहे ते वाचलेलंच दिसत नाही !

वाचा :

यात अजून एक लोचा म्हणजे मी जरा चिकित्सक आहे.जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्‍याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते

शाम भागवत's picture

23 Oct 2020 - 11:19 pm | शाम भागवत

ॐ शांती ॐ

अर्धवटराव's picture

24 Oct 2020 - 7:12 am | अर्धवटराव

म्हटलं शांती मंत्र विसरलात कि काय =)) =))

शाम भागवत's picture

24 Oct 2020 - 12:58 pm | शाम भागवत

😀

सोत्रि's picture

23 Oct 2020 - 1:36 pm | सोत्रि

मुंबईवरून दिल्लीला पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणी कोणता मार्ग पकडून दिल्लीला पोहोचतो हे महत्वाच नसून पोहोचणं महत्वाचं असतं. एक २५ वर्षांचा सधन तरूण विमानाने दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करतो म्हणून दिल्ली गाठण्याचा तोच एक मार्ग असं असू शकत नाही. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या मार्गाने दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करणार.

ध्यानाचेही तसेच आहे. विविध मार्ग आहेत. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार (कर्मसंस्कारांच्या ओझ्यानुसार किंवा अविद्येच्या पडद्यानुसार) जो तो आपापल्या अनुभूतीने मार्ग अवलंबतो. कारण मुक्ती मिळणं महत्वाचं कशी आणि कधी हे गौण असतं!

- (मुमुक्षू) सोकाजी

तस्मात, तो मुक्तीचा मार्गच नाही.

उगीच गोलगोल फिरण्यापेक्षा जपानं मुक्ती कशी मिळते हे लिहा. तो तुमचा मार्ग नसेल किंवा त्याविषयी तुमचा अभ्यास नसेल तर प्रतिसाद न देणं योग्य.

बर्व्यांच्या मेथडॉलॉजीचा वरच्या प्रतिसादात यथोचित उहापोह झाला आहे त्याला अनुसरुन काही जमत असेल तर पाहा.

उपयोजक's picture

24 Oct 2020 - 8:25 am | उपयोजक

कायम समोर पहाणं आणि आजूबाजूला चाललेलं ऐकत रहाणं हे जगातल्या सर्व ध्यानप्रणालींचा अभ्यास करुन मी शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे.

१००% अंध व्यक्ती 'पाहणार' कशी? आणि १००% बहिरी व्यक्ती 'ऐकणार' कशी? की हे दोन तुम्ही शोधलेल्या पद्धतीला अपवाद असणारेत? या दोघांना मनात येणार्‍या नकारात्मक विचारांचा त्रास होत नाही का? जरा उलगडून सांगा!

अरेच्चा, हे राहूनच गेलंय की!

उत्तराच्या प्रतिक्षेत...

- (विद्यार्थी) सोकाजी

१००% अंध व्यक्ती 'पाहणार' कशी? आणि १००% बहिरी व्यक्ती 'ऐकणार' कशी? की हे दोन तुम्ही शोधलेल्या पद्धतीला अपवाद असणारेत? या दोघांना मनात येणार्‍या नकारात्मक विचारांचा त्रास होत नाही का? जरा उलगडून सांगा!

पूर्ण अंध आणि मूक-बधीर असलेल्या व्यक्तीच्या मेंदूला केवळ स्पर्श आणि गंध या दोनच संवेदनांमधून इनपुट जाईल त्यामुळे अशा व्यक्तीची मेंटल अ‍ॅक्टीविटी न्यूनतम असेल. तस्मात, तिला नैसर्गिक भयाव्यतिरिक्त इतर काही नेगटिवीटी असण्याची शक्यता न्यूनतम आहे.

या विधानाला काही शास्त्रीय आधार? माझ्यामते हे विधान फारच धाडसी आहे.

तिला नैसर्गिक भयाव्यतिरिक्त इतर काही नेगटिवीटी असण्याची शक्यता न्यूनतम आहे

म्हणजे अंध किंवा बहिऱ्या व्यक्तीला मेडीटेशनची गरज नसते? कि तुम्ही शोधलेल्या मेडीटेशनसाठी त्या व्यक्ती फीट नाहीत??

- (चिकित्सक) सोकाजी

जी व्यक्ती अंध आणि बहिरी आहे तिला काय दिसणार आणि ती काय ऐकणार ?

उगीच फालतूचा टाईमपास करण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा स्वतः ते ध्यान करुन पहाणं श्रेयस आहे.

विचार केला आणि जे काय शिकायचे ते शिकलो! 😇

- (कोणताही प्रश्न फालतू न समजणारा) सोकाजी

महासंग्राम's picture

28 Oct 2020 - 10:50 am | महासंग्राम

अति अवांतर : नाना तो कॉकटेल लाऊंज च्या रेसिप्यांचा उपक्रम पुन्हा सुरु करावा हि विनंती विशेष. जुने लेख वाचून भारी वाटलं होतं

विश्वनिर्माता's picture

22 Oct 2020 - 10:05 am | विश्वनिर्माता

कॉम्प्लेक्स काम कसे करावे यासाठी अतुल गावांदे यांचे "द चेकलिस्ट मॅनिफेस्टो" नावाचे उत्तम पुस्तक आहे, ज्यात अनेक क्षेत्रांमध्ये जिथे अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात, तिथे चेकलिस्टचा वापर करून कसे क्वालिटी मेंटेन केली जाते , हे पुस्तकात दिले आहे.

चेकलिस्ट सामान्य जीवनात पण खूप उपयोगी आहे, आणि खूप सोप्पी.
चेकलिस्टचे अनेक ऍप्स उपलब्ध आहेत.

मराठी_माणूस's picture

22 Oct 2020 - 10:25 am | मराठी_माणूस

जे मिळवयचे आहे ते दुय्यम ठेउन, ते मिळवण्यासाठीची जी प्रक्रिया असेल (activity), ती करण्यात आनंद वाटत असेल तर ते मग सहज आणि सातत्याने होण्याची शक्यता वाढते.

सुबोध खरे's picture

22 Oct 2020 - 10:39 am | सुबोध खरे

ज्यात अनेक क्षेत्रांमध्ये जिथे अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात, तिथे चेकलिस्टचा वापर करून कसे क्वालिटी मेंटेन केली जाते

हवाई दलाचे/ नौदलाचे विमान जेंव्हा हवेत उडते. मग ते अगदी १५ मिनिटांसाठी का असेना त्याच्या एकंदर १०,००० गोष्टींचा कसून तपास होतो

या तपास पालिकेत प्रत्येक तपासलेल्या गोष्टीवर त्याला जबाबदार असणाऱ्या वायुसैनिकाची सही असते.

यानंतर प्रत्यक्ष उड्डाणाच्या अगोदर त्याची देखरेख करणारा अधिकारी हि तपस तालिका स्वतः सर्वेक्षण करून पाहतो.

त्यामुळे एखादी गोष्ट चुकून राहून गेली असे होतच नाही.( अशीच स्थिती नागरी विमानात सुद्धा असते असे ऐकले आहे)

यामुळेच हवाई प्रवास हा अतिशय सुरक्षित झालेला आहे.

दुर्दैवाने आपल्याकडे आपले वाहन अशा तर्हेच्या तपासतालीकेचा वापर करून उत्तम स्थितीत ठेवले जात नाही.

ब्रेक नीट लागत नसताना सुद्धा अनेक लोक आपली वाहने तशीच चालवत असतात.

चौकटराजा's picture

22 Oct 2020 - 6:35 pm | चौकटराजा

आधुनिक काळात .. चेकलिस्ट ,रिमांईंडर ,प्लान बी ची सवय दोन घ्या दोन फ्री ची गेम समजावून घेणे ,शक्यतो एजंट टाळणे पण अपरिहार्य असेल तर त्याचाच वापर करणे ई सवयी लावून घेणे फायद्याचे होईल.

तुम्ही ठरवून उद्या पासून व्यायाम सुरू करू शकता पण ती सवय 7 दिवसाच्या वर टिकवू शकत नाही
कोणाच्या सांगण्या वरून व्यायाम ची सवय टिकत नाही.
त्या साठी तुम्हाला मनापासून व्यायामाची आवड असावी लागते.
व्यायाम करताना तुम्हाला त्यात आनंद वाटला पाहिजे जबरदस्ती नी काम केल्या सारखा तो करून चालत नाही.
माझे निरीक्षण.
रोज पहाटे गिरगाव चौपाटी वरून हँगिंग गार्डन मार्गे मी चालत ऑफिस ला जायचो
अनंत वॉकिंग करणारे रमतगमत वॉकिंग च्या सोहळ्यात सहभागी असतं.
आणि काही थोडके च नियमित रोज मनापासून वॉकिंग करणारे दिसायचे.
जरा पावूस पडला की सर्व हौसे,नवसे,गवसे गायब असायचे त्या दिवशी.
फक्त मनापासून नियमित वॉकिंग करणारे सदा सर्वकाळ उन्ह असू नाही तर पावूस वॉकिंग करत असत.
ते खरे वॉकर.
बाकी असेच ठरवून वॉकिंग चे नाटक करणारे.

बाजीगर's picture

23 Oct 2020 - 7:10 pm | बाजीगर

मला वाटतं 'पॅशन' चा अभाव हे उपक्रम न चालण्याचे ऐकमेव कारण असावे.
मी काही उपक्रम केले आणि यशस्वीपणे दिर्घकाळ चालू ठेवले,
(1) 50 th Bithday ( 20-Oct) पासून हा उद्योग सूरु केलाय,
B'day...No cake....मग? धावायचं!

50 th B'day--- 5 km jog
51 th B'day--- 6 km jog
52nd B'day -- 8 km jog
53rd B'day -- 10 km jog
54th B'day -- 12 km jog
(all on tread mill)
55 th B'day--- 20 km walk
56nd B'day -- 10 km jog on tread mill
57rd B'day -- 20 km walk
58 th B'day -- 10 km jog on tread mill
59 th B'day -- 13 km cycling-done
कुणीही तपासत नसतांना मी अपनेआप शी वादा केल्यासारखा एक दशकभर हे करतो आहे.

(2) starmaker वर गाणे म्हणून publish करणे.
मागच्यावर्षी सुरवात केली, काहितरी 92 गाणी झालीत,पुढे ही होत रहातील.

(3) चालणे, दिड दोन वर्षापूर्वी NRC app वर चालणे नोंदवायला सुरवात केली, 15 दिवसापूर्वी 1000 किमी पार केले असे दिसले, आधी नोंदवत नव्हतो,आता एक हिशोब कळतोय, मजा वाटतेय.

(4) यू ट्यूब व्हीडीओज- मागच्या वर्षी Nov 2019 ला सहज म्हणून अकाऊंट सूरु केले, आता पर्यंत 52 videos, प्रवास,recepi,tutorial वगैरे upload केलेत.

(5) blog writing - 8 वर्षापासून अधूनमधून ब्लाॅक लिहीतोय,90 plus post झाल्यात,13,500 plus visits दिसतात, ( जरुरी नाही की त्यांनी पूर्ण लेख वाचला असेल)

(6) गाण्यांना एक extra अंतरा लिहीणे,छंद म्हणून हा उद्योगही चालू असतो,लिहून स्वत:जवळचठेवणे.

तर हे सर्व स्वत:च्या समाधानासाठी करत असतो,
आणि चांगली consistency आहे.

सतिश गावडे's picture

23 Oct 2020 - 8:05 pm | सतिश गावडे

वयाच्या साठीतही तुमचा उत्साह आणि दिनचर्येतील सातत्य वाखाणण्याजोगे आहे. (तुम्ही दिलेल्या माहीतीवरुन तुम्ही साठीत असाल असं मी गृहीत धरत आहे)
तुमच्या ब्लॉगवरील लेखन तसेच युट्युब चॅनलवरील व्हिडीओज वाचायला/पाहायला आवडेल. हे दुवे इथे देणे तुम्हाला उचित वाटत नसेल तर तुम्ही मला व्यनि करु शकता. :)

बाजीगर's picture

24 Oct 2020 - 10:57 pm | बाजीगर

धन्यवाद सतिश गावडे साहेब.

उपयोजक's picture

23 Oct 2020 - 8:39 pm | उपयोजक

मस्त! आवडलं. मनमुराद 'जगत' आहात!!!

बाजीगर's picture

24 Oct 2020 - 10:58 pm | बाजीगर

धन्यवाद @ उपयोजक सर

संजय क्षीरसागर's picture

23 Oct 2020 - 10:31 pm | संजय क्षीरसागर

१. स्टार मेकर ऐवजी स्म्यूलवर गाणी म्हणून पाहा, जास्त मजा येईल. मला रोज १०/१२ मुलींचे ड्युएट गायला इनवाइटस येतात. जवळजवळ २०० गाण्यांची लिरिक्स पाठेत. चांगल्या गायिकां बरोबर गायला सॉलीड मजा येते.

२. चालणं किंवा धावणं यापेक्षा खेळणं हे जास्त मजेचं आहे. गेली कित्येक वर्ष दिवसाची सुरुवातच > योगासनं, प्राणायाम आणि टेबलटेनीस (करोनाचा कालावधी सोडता) अशी होते.

३. पोहणं हे एक कमालीचं आवडीचं कौशल्य आत्मसात केलं आहे. पाण्याच्या बायोंसीचा एक्झॅक्ट अंदाज आल्यामुळे देह होडीसारखा पाण्यावर तरंगत ठेवून तासंतास जलविहार करण्याचा छंद आहे. आपण, पाणि आणि अथांग आकाश हा ट्रायो जबरदस्त महौल जमवतो.

४. लेखनाची मौज काही औरच आहे. कविता, गजल, ललित कथा, चित्रपट परिक्षणं, कवितांचं रसग्रहण आणि जीवनाला स्पर्श करणर्‍या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर अनेक पोस्टस इथे प्रकाशित आहेत. " ती सध्या काय करते " वरचं परिक्षण ज्योती आळवणींनी सतीश राजवाड्यांना दाखवलं तेंव्हा ते ज्याम खूष झाले. त्यावेळच्या मिपा दिवाळी अंकात राजवाड्यांची मुलाखत आहे.

५. अध्यात्म हा जबरदस्त आवडीचा विषय आहे. मनोगतवर ऐंशीच्या जवळपास लेख वेगवेगळी उपनिषदं, झेन, अष्टावक्र महागिता आणि अध्यात्मातल्या अनेक गुंतागुंतीच्या विषयांचा उलगडा करतात.

६. माझं काम (सीए) हा एक सर्वोत्तम छंद आहे. सीझनला रोज सलग दहा ते बारा तास काम करणं आणि त्यातून व्यावसायिक कौशल्य वाढवत नेणं हे शेवटापर्यंत चालू राहिल.

स्मूल वर पण गाणं सूरु आहे.
आपले छंद आवडले, लगे रहो.
धन्यवाद संजय जी

संजय क्षीरसागर's picture

24 Oct 2020 - 11:21 pm | संजय क्षीरसागर

१. सिंथेसायजर वाजवणे > ५०/६० लोकांसमोर जुन्या हिंदी गाण्यांची इंस्ट्रुमेंटल मैफिल सहजपणे जमवू शकतो.
२. चेस.कॉमवर कंप्युटरशी चेस खेळणं > सध्या १२ व्या लेवलला मशीनला हरवू शकतो. यानं लॉजिकल माइंड डिवेलप होतं > कमालीचं फोकसिंग तयार होतं.
३. पत्नी समवेत जवळच्या रिसॉर्टसना (शक्यतो स्प्लेंडर कंट्रीच), हनीमून ट्रीप्स करणं ! . द मोस्ट रिफ्रेशिंग थींग ऑफ लाईफ .

Rajesh188's picture

24 Oct 2020 - 11:49 pm | Rajesh188

ग्रेट
तुम्ही स्वतल विविध छंद मध्ये गुंतवून घेत आहात ते नक्कीच प्रशंसनीय आहे.
आणि जे उपक्रम हाती घेत आहात ते आवडीने करत असल्या मुळे पूर्णत्वास जात आहेत.

संजय क्षीरसागर's picture

25 Oct 2020 - 12:07 pm | संजय क्षीरसागर

नाज़नी बडा रंगी है वादा तेरा !

धर्मराजमुटके's picture

25 Oct 2020 - 1:03 pm | धर्मराजमुटके

तुमच्या गायन कलेचे कौतुक वाटले. हे गाणे मी पहिल्यांदाच ऐकले त्यामुळे युट्यबर जाऊन मुळ गाणे ऐकले. मुळ रचनेपेक्षा तुमचे गायन थोड्या धिम्या चालीत वाटले पण आवडले.

तुमच्या प्रतिसादांबद्द्ल
१. कुठलीही गोष्ट लावून धरण्यामागे तुमच्या इंटरेस्टची तीव्रता कारणीभूत असते. लोकांचे इंटरेस्ट फारसे तीव्र नसतात त्यामुळे प्रोजेक्ट फाफलतो.
सहमत यापुढे असे म्हणेन की फक्त इंटरेस्ट (आवड) नव्हे तर त्या गोष्टीची गरज त्या उपक्रमाच्या यशाची शक्यता वाढवितो. अर्थात गरजेमुळे बर्‍याचदा आनंदावर पाणी सोडावे लागते हा भाग अलहिदा !
२. आपल्याला जमेल हा अत्मविश्वास असेल तरच त्या उपक्रमावर मेहेनत होते. संदिग्धावस्थेमुळे उपक्रम बारगळण्याची शक्यता प्रचंड.
सहमत
३. उपक्रमासाठी आवश्यकती उत्तम गॅजेटरी विकत घेणं तुमचा इंटरेस्ट वाढवतं (म्हणजे धावायचं असेल तर ब्रँडेड शॉर्ट्स, आरामदायी टी शर्ट आणि उत्तम स्पोर्टस शूज)
असहमत ! उलट प्रतिकुल परिस्थितीतून येऊन झगडणार्‍यांनी जास्त यश मिळविल्याची उदाहरणे आहेत.

४. लवकारात लवकर थोडं फार यश मिळणं अत्यंत अनिवार्य आहे. जर रिझल्ट येत नसेल तर तुम्ही चुकीची मेथड (उपक्रम नाही) निवडली आहे असा अर्थ होतो. त्यामुळे योग्य मेथड हा एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे.
असहमत. बर्‍याचदा बर्‍याच जणांना पहिल्या फटक्यात / लवकर यश मिळतं. त्याने त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. मात्र पहिल्याच मिळालेल्या यशाने बरेच जण गाफील होतात त्यामुळे प्रयत्नांत सातत्य आणि प्रयोगशील राहणं हे यश मिळण्यासाठी आणि ते जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. अर्थात जग हे नाशिवंत आहे आणि जगातील सगळ्याच गोष्टी नाशिवंत आहेत त्यामुळे 'यश' देखील त्याला अपवाद नाही. तेव्हा अपयश पचविण्यासाठी मनाची तयारी ठेवणे कधीही आवश्यकच.

संजय क्षीरसागर's picture

25 Oct 2020 - 7:36 pm | संजय क्षीरसागर

धागा विषयातले उपक्रम छांदाचे आहेत, तिथे करु किंवा न करु असा पर्याय असतो. तुमचे विचार उपजिवीकेसाठी राबाववल्या जाणार्‍या उपक्रमांबद्दल आहेत आणि त्या दृष्टीकोनातून ते योग्य आहेत.

Rajesh188's picture

24 Oct 2020 - 1:08 pm | Rajesh188

चालण्याचे आणि पळण्याचे तुम्ही जे आकडे दिले आहेत ते रोजचे असतील तर तुम्ही 99.99 ,%
लोकांपेक्षा उत्तम कामगिरी करत आहात.
तुमची आकडेवारी ही सहज साध्य होणारी नाही.

बाजीगर's picture

23 Oct 2020 - 7:29 pm | बाजीगर

(7) कंत्राटी शेती -शेवगा लागवड

पुण्याहून 27 किमी वर मित्राच्या फार्मवरील 10 गुंठे जागेवर 300 शेवगा रोपं लावलीत. 92 जगलीत,
जून-2019 ला सुरवात केलीय.
गेले 14 महीने महीना रु.6000/-- मजूरी खर्च देतोय,
इतर खर्च मिळून आता पर्यंत रु.1,75,000 खर्च केलेत.
बघूया.अजून वर्ष दोनवर्ष सहज करु शकेन,
हा pilot project म्हणूनबघतोय.

एरंडाचं गुऱ्हाळ जे म्हणतात ते काय असतं?
त्यातुन कोणत्या प्रतीचं उत्पादन घेता येतं?
साधारण एका गुऱ्हाळाला किती खर्च येतो?
कुटिलउद्योगाची सबसिडी याला लागु होते का?

आपले काही अनुभव असतील तर कृपया व्यक्त करावेत.

नीलस्वप्निल's picture

24 Oct 2020 - 12:05 am | नीलस्वप्निल

मी मि.पा. वाचायची सवय लाऊन घेतली आहे... गेली ५-७ वर्स... नुकताच सभासद झालोय... आणी प्रतीसाद द्यायला सुरवात केलिये... रोजच्या कामातुन विरुनगला आणि मनस्वास्थ्यासाथी उत्तम असे माझे मत आहे..

चौकटराजा's picture

25 Oct 2020 - 9:02 pm | चौकटराजा

कोणताही उपक्रम नियमित असावा याचा दुराग्रह असता कामा नये. मला चालण्याची आवड आहे व अपरिहर्यता देखील. तरीही माझ्याकडे बर्‍याच दिवसानी पाहुणा आला तर माझा चालण्याचा " नेम" आहे सबब तुम्ही काहीतरी करीत घरी बसा असा मी आग्रह करीत नाही .तर त्यदिवशी माझा व्यायाम रद्द करतो. मी अनेक जप वाले पाहिले आहेत जे आपली सगळी माणुसकी विसरून काही झाले तरी माझा जप चुकता कामा नये यासाठी विवाह मंडपात देखील कोपर्यात जप करीत बसतील., आलेल्या अतिथीला पुरेसा वेळ देणार नाहीत ! एवढे करून आयुष्यात त्यानी समाधान, शान्ती सहजीवन हे अनुभवलेले असतेच असा काही तर्क आपण काढू शकत नाही. जपाचा माझ्या मते एक फायदा असा असावा की त्याने उलट सुलट विचारान्ची आन्दोलने कमी होऊन निदान तेवढ्या पुरते तरी बी पी कमी होत असावे. यात अमुक अमुक शब्दात सामर्थ्य असते हा मात्र भम्पक पणा आहे. मुळात भाषा ही आवश्यक असली तरी ती वैश्विक कधीच नसते याचा पक्का विचार मनात असला की विशिष्ट जपात काही ताकद आहे यातील फोलपणा कळून येतो. जसे कहरवा या तालात याच्या ग्रीड ला महत्व आहे धागे नति नक धिन या बोलाना नाही. ह्र्दय लब डब करते काय वा टप टप करते काय त्यात अनियमित पणा आहे किन्वा कसे याला महत्व आहे !

आपल्याला जे आवडते ते काही दिवस टाळणे हे मानसिक सामर्थ्य मिळविण्याचे एक साधन नक्कीच आहे. यातून मानसिक गुलामी ( क्रेविंग ) कमी होते. मग ती चांगली सवयअसो वा वाईट !

उपयोजक's picture

26 Oct 2020 - 10:25 am | उपयोजक

छान प्रतिसाद.
पण खंड पडायची संधी आपण होऊन शोधू नये किंवा पटकन बळी पडू नये असे वाटते. शिस्तीने राष्ट्र मोठे होते असे म्हणतात ना?

कानडाऊ योगेशु's picture

26 Oct 2020 - 10:32 am | कानडाऊ योगेशु

आपल्याला जे आवडते ते काही दिवस टाळणे हे मानसिक सामर्थ्य मिळविण्याचे एक साधन नक्कीच आहे. यातून मानसिक गुलामी ( क्रेविंग ) कमी होते. मग ती चांगली सवयअसो वा वाईट !

एक नंबर प्रतिसाद.
माझेही मत असे आहे कि व्यायामाचीही शरीराला सवय होता कामा नये. कारण नियमित व्यायाम होत असेल तर कालांतराने ते ही रूटीन होते व एखादा दिवस व्यायाम करु शकलो नाही तर शरीर आळसावते. पूर्ण दिवस अक्षरशः दुर्मुखलेल्या अवस्थेत जातो.

शाम भागवत's picture

26 Oct 2020 - 10:44 am | शाम भागवत

मी अनेक जप वाले पाहिले आहेत जे आपली सगळी माणुसकी विसरून काही झाले तरी माझा जप चुकता कामा नये यासाठी विवाह मंडपात देखील कोपर्यात जप करीत बसतील., आलेल्या अतिथीला पुरेसा वेळ देणार नाहीत !

😀

असेही जपवाले मी पाहिले आहेत की, जे माणूसकीला अतोनात जपतात. विवाह मंडपात अतिथीला व्यवस्थित वेळ देतात. कोणाचीही उपेक्षा करत नाहीत. मात्र जेव्हां त्यांना फावला वेळ मिळतो तेव्हां त्यांचा जप आपोआप सुरू होतो. त्याचबरोबर ते सावधपणे सगळीकडे लक्ष ठेऊन असतात. हा (आपोआप होणारा) जप मनातल्या मनात असल्याने कोणालाच कळू शकत नाही. निदान त्यांनी स्वतःहून सांगितल्याशिवाय ते कोणालाही कळू शकत नाही.

😀

उपयोजक's picture

26 Oct 2020 - 8:26 pm | उपयोजक

बरोबर आहे! असे संतुलन साधणारे लोकही असतात. किंबहूना त्यांचा जप अधिक फलदायी होत असावा.कारण त्यात अनावश्यक हेकटपणा नसतो.

मराठी_माणूस's picture

26 Oct 2020 - 10:24 am | मराठी_माणूस

माझा चालण्याचा " नेम" आहे सबब तुम्ही काहीतरी करीत घरी बसा असा मी आग्रह करीत नाही

फारच चांगली गोष्ट. दुसर्‍यांची दखल न घेता आपला परीपाठ चालु ठेवणे हे आलेल्या पाहुण्यासाठी अपमानास्पद आहे.

(अवांतरः आपण काही बोलत असताना, समोरचा स्वतःच्या मोबाइल मधे व्यस्त असतो, नुसतेच हुं हुं चालु असते , मग मोबाइल मधे बघणे संपल्यावर मग विचारायचे "काय म्हणत होतास ?" हे अतिशय चीड आणणारे. )

शाम भागवत's picture

26 Oct 2020 - 10:49 am | शाम भागवत

असंही असतं का?
मला वाटले फक्त जपवालेच इतरांशी अपमानास्पद वागतात!!!!
😃
@मराठी_माणूस
कृहघ्या.

महासंग्राम's picture

26 Oct 2020 - 2:43 pm | महासंग्राम

या धाग्यावर मिपाचे सर्व पैलवान तेल लावून उतरले आहेत हिच धाग्याची उपयुक्तता !

आता आपण फक्त पॉपकॉर्न खायचे आणि त्रिशतका साठी शुभेच्छा.

शाम भागवत's picture

26 Oct 2020 - 4:39 pm | शाम भागवत

💯

उपयोजक's picture

23 Nov 2020 - 7:51 pm | उपयोजक

बर्‍याच दिवसांनी या धाग्यावर पुन्हा लिहितोय याचं कारण आधी केले मग लिहिले असे करायचे होते.शिवाय एक सुटलेला गुंताही कसा सुटला ते लिहायचे होते.
इथे संजय क्षीरसागर यांनी जपापेक्षाही समोर पाहणे आणि आजुबाजूला जे काही आवाज ऐकू येतील ते ऐकणे हे सर्वात सोपे मेडीटेशन असल्याचे लिहिले होते.ते काही दिवस करुन पाहिले.पण त्याची उपयोगिता ही जपापेक्षा कमी असल्याचे माझे निरीक्षण आहे.सदर प्रकार म्हणजे एखाद्या अपार्टमेंटमधला सजग वॉचमन याच्यापलीकडे काहीही नाही.भटके कुत्रे शिरताना दिसले की काठी उगार, अनोळखी माणूस शिरताना दिसला तर आयडी प्रुफ मागणे , संशय आल्यास हाकलून देणे अशी कामे एखादा वॉचमन करतो त्यापेक्षा या पद्धतीत अधिक काही नाही.
आता माळ घेऊन जप करणे हे अधिक फलदायी कसे ते सांगतो.
माळ घेऊन काही मंत्र मनात पुटपुटून मणी पुढे सरकवणे या प्रकारात मंत्र १०८ वेळा म्हणणे,मणी मागे सरकवणे अशा कृती केल्या जातात ज्यामुळे अवधान जपावर 'केंद्रीत' होते.परिणामत: एकाग्रता वाढते.अवधान परत परत खेचून आणले जाते.अंतिमत: याचा सराव होतो.एकाग्रतेत वाढ होते.संक्षी यांनी सुचवलेला प्रकार हा अतिसंवेदनशील आहे.म्हणजे विशेष अशी कृती नसल्याने समोर पाहण्यातून किंवा भोवतालचे आवाज ऐकण्यातून मनात त्या ऐकू आलेल्या माहितीकडे किंवा समोरच्या दृश्याकडे अोढले जाऊन विचारांच्या प्रवाहात अडकण्याचीच शक्यता जास्त आहे.कारण काम काहीच नाही.शिवाय एखादा विचार आलाच मनात तर त्याला एंटरटेन करायचे नाही.मनात शिरु द्यायचे नाही.हे काम तसे सोपे नाही.म्हणूनच सर्वसामान्य लोकांना हा मार्ग तितकासा सोपा नाही.तस्मात जप जिंदाबाद!

आता कोणता गुंता कसा सुटला ते सांगतो.जप करताना मधेच मन भरकटण्याचे कारण होते 'श्रद्धा नसणे'.अशा प्रकारे जप करणे हे काहीतरी दैवी/धार्मिक काम आहे आणि देव वगैरे वास्तवात काही नसल्याने या जपाला काही अर्थ नाही;आपण वेळ वाया घालवतोय वगैरे अतिचिकीत्सक तत्वज्ञानामुळे जप मधेच सुटायचा.श्रद्धा हा प्रकार केवळ भगवंतासमोर हात जोडणे,पुजा करणे अशा धार्मिक कार्यापुरताच मर्यादित आहे असा माझा गैरसमज होता.
दरम्यान श्रद्धा या विषयावर मिपावरचेच धागे चाळताना हा धागा https://www.misalpav.com/node/41837 हाती लागला.

श्रद्धेबद्दलचा गैरसमज या धाग्यातल्या या प्रतिसादामुळे दूर झाला.

https://www.misalpav.com/comment/978992#comment-978992

श्रद्धेचा व्यापक अर्थ या प्रतिसादामुळे उमजला.थॉर माणूस यांनी ती श्रद्धा नव्हे असे म्हटले असले तरी पुढच्या प्रतिसादात श्री अरुण जोशी यांनी नेमका प्रश्न विचारला आहे.

https://www.misalpav.com/comment/979062#comment-979062

त्याला काहीच उत्तर मिळाले नाही.ते तसे 'न मिळणे' साहजिकच होते.

श्रद्धेबद्दलचा साधारण असाच पण मोघम स्वरुपातला विचार बर्‍याच वर्षांपूर्वी मी डॉ.राजेंद्र बर्वे यांच्या या

https://youtu.be/7g8um6PWEXk (6.26 पासून ऐका)

व्हिडिओत ऐकला होता पण त्याचा अदैवी/अधार्मिक असा व्यापक अर्थ मात्र गॅरी ट्रुमन यांच्या प्रतिसादामुळे समजला.

ट्रुमन आणि arunjoshi123 यांचे तसेच हा उपयुक्त धागा काढल्याबद्दल आनन्दा यांचेही मनापासून आभार! _/\_

संजय क्षीरसागर's picture

23 Nov 2020 - 11:26 pm | संजय क्षीरसागर

ओशोंनी म्हटलंय की साधक शेवटी स्वतःच्या अक्कल हुशारीनंच गुरु निवडतो ! त्याची आठवण झाली.

१. बरोब्बर एक महिन्यापूर्वी आपले विचार बरेच सूज्ञ होते असे वाटते :

जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्‍याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते.पुढे पुढे १-२ दिवस खंड पडतो.मग बळजोरीने परत काही दिवस रेटले जाते.हा खंड पडण्याचा कालावधी वाढला तर उत्साह जवळपास संपल्यात जमा होऊन उपक्रम थंडावतो.मी आचरत असलेल्या उपायामुळे मला फायदा होणार आहे हे मला १००% माहित आहे.तसूभरही शंका नाही. सारांशाने सांगायचे तर उपक्रम बारगळ्याचे कारण हे त्या उपक्रमाच्या प्रक्रियेतला 'एकसुरीपणा' हे आहे. यावर काय उपाय करता येईल?

२. आजच्या प्रतिसादावरुन असे दिसते की आपल्याला जपाचा उपक्रमच पुढे रेटायचा होता फक्त त्यासाठी आवश्यक मानसिक सामुग्री जमा करण्यासाठी हा विसविशित धागा काढला होता. त्या वेळीआम्ही जोखिम पत्करुन आपल्यास आणखी रेटले, त्यामुळे आपला नेमका मनसुबा समोर आला. ते एक असो, आता मुद्दा असा की आपण श्रद्धेचा आश्रय घेऊन तो रेटा पुन्हा मारण्याचे ठरवल्यामुळे सद्य परिस्थितीत आपला गुंता सुटला आहे असे आपणास वाटते आहे.

३. आपण श्रद्धेवर वाचन करण्याऐवजी इथले जपचंडी श्री शामराव भागवत यांच्या गेली तीस /पस्तीस वर्ष राबवलेल्या याच उपक्रमावरचे फलित दर्शवणारा हा धागा अप्रिय आठवणींपासून सुटका वाचला असता तर कालापव्यय टळला असता असे वाटते. कारण तिथे आम्ही यावर विस्ताराने लिहिले आहे व श्री शाभा आता आम्ही दिसलो की फक्त ॐ शांती: शांती: शांती: हा एकच जप करतात.

उपयोजक's picture

23 Nov 2020 - 11:54 pm | उपयोजक

बहुधा तुम्हाला माझा http://www.misalpav.com/comment/1087107#comment-1087107 हा प्रतिसाद आवडला नाही.कारण त्यात मी तुम्ही सुचवलेल्या उपायाची जपाच्या तुलनेत मर्यादा दाखवली आहे. वास्तविक मी आधी केले मग सांगितले आहे. मला समस्या सोडवणारा उपाय मिळणे माझ्यासाठी महत्वाचे होते.तो उपाय काय आहे नि कोणी सांगितला हे नव्हे.यात जपाचा उपाय श्रेष्ठ ठरला कारण त्याचे तंत्र अधिक फलदायी आहे इतकेच!
शाम भागवतांच्या जपसाधनेचा त्यांना छळणार्‍या अप्रिय आठवणींपासून सुटका न होण्याशी संबंध कसा काय म्हणे? जप केला की अप्रिय आठवणी येणे थांबते असे कुठे लिहिले आहे का?
असो! माझ्यापुरता माझ्या समस्येचा गुंता सुटला हेच माझ्यासाठी पुरेसे आहे.

असे वाटते.

१. जप केला की अप्रिय आठवणी येणे थांबते असे कुठे लिहिले आहे का ?

हाच तर त्यांनी शोधलेला उपाय आहे आणि त्याला कल्पनेतल्या घोडेस्वाराला क्षमा करण्याचा मार्ग सांगितला आहे. शिवाय तीस वर्ष जप करुनही वास्तव आणि कल्पना यातला फरक उमगू शकत नाही असा निष्कर्ष आम्ही आमच्या मतीनं काढला आहे.

आमच्या ध्यानपद्धतीत कमालीची सजगता येते असा अनुभव आहे. जास्त काय लिहावे ? याउप्पर आपली इच्छा.