विडंबन - गोष्टी कॉलेजकडील मी वदता

Primary tabs

aschinch's picture
aschinch in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amविडंबन - गोष्टी कॉलेजकडील मी वदता

(मूळ काव्य : गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे - केशवसुत)

मनोगत - मूळ कविता वाचलेली असल्यास या विडंबनाची गोडी अधिक वाढेल. या कवितेतील जुन्या भाषेमुळे, शब्दांमुळे या कवितेची खुमारी अधिकच वाढली आहे. कवीने घराची आणि प्रिय व्यक्तींची आठवून येऊन ही नितांत सुंदर कविता लिहिलेली आहे.


गोष्टी कॉलेजकडील मी वदता गड्या रे
झाले पहा कितिक हे विपरीत सारे
आहे कॉलेजातच असे गमते मनास
ह्या येथल्या सकळ वस्तु ऊगीच भास !

ही देख मुले वर्गामध्ये “बोअर”लेली
च्युईंगम, पानपराग चावीत बैसलेली
मित्रा, गजांमधुनि पाहती बाहेर सारे
बागडती का बाहेर रम्य फुलपाखरे ?

आवाज “किर्र” प्राध्यापक बोलतोच आहे
“घुरर्र, घुरर्र” घोरण्याचा मागून नाद येत आहे
ऐकूनि इकडूनी विद्यार्थी तिकडूनी सोडताहेत
कुणी कागदाची विमाने सोडताहेत !

ही चारपाच चढुनी बिनधास्त पायठाणे
“मे आय कम इन?” बेपर्वाईने विचारणे !
हाय, परी तेवढ्यात वाजते बेल
हसण्याचा उडतो चहूकडे कल्लोळ !

हा खिदळण्याचा रव येतो त्रिकाळ
कट्ट्यावर बसून असती काही कुटाळ
विद्यार्थिनी कुणी वर्गात जाते
टॉन्टिंगने तिचे हृद्य विव्हळ होते !

प्राचार्यांच्या केबिनच्या बघ बाजूला
“बडे बाबू” असे तिथं बरे कॉलेजचा बैसलेला
अज्ञान तो चपलधी परि चालू आहे
त्याचे मनात पैशाचा अति लोभ राहे !

बाबू, गड्या माझे काम करशील काय?
टी.सी. माझी लवकर देशील काय?
कॅन्टीनमध्ये नंतर भेटू काय ?

हे बघ अवलोक प्राचार्य आता
त्यांचा असे फक्त ईश्वरचं त्राता
विद्यार्थ्यांचा नेहमीचा धुमाकूळ
दंगामस्तीने झाले आहेत व्याकुळ !

कॅन्टीनमध्ये बसून विड्या फुंकावयाते
टवाळक्या करण्या फक्त येती काही पुण्यात्मे
कॉलेजचे लाईफ मेंबर असती ते
होतील का कधी पास ते या जन्माते ?

गोष्टी कॉलेजकडील मी वदता गड्या रे
झाले पहा कितिक हे विपरीत सारे
आहे कॉलेजातच असे गमते मनास
ह्या येथल्या सकळ वस्तु ऊगीच भास !

- अविनाश चिंचवडकर
बंगलोर
avinashsc@yahoo.com


प्रतिक्रिया

आहे कॉलेजातच असे गमते मनास
ह्या येथल्या सकळ वस्तु ऊगीच भास !

विडंबन आवडले..

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 10:46 pm | टर्मीनेटर

@aschinch

'विडंबन - गोष्टी कॉलेजकडील मी वदता'

हे विडंबन आवडले  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

Bhakti's picture

18 Nov 2020 - 10:06 am | Bhakti

विद्यार्थ्यांचा नेहमीचा धुमाकूळ
दंगामस्तीने झाले आहेत व्याकुळ !
माझे टवाळ विद्यार्थी आठवले..नाकी नऊ यायचे ..
:)

बबन ताम्बे's picture

18 Nov 2020 - 2:34 pm | बबन ताम्बे

आवडले ☺️

प्राची अश्विनी's picture

23 Nov 2020 - 5:38 pm | प्राची अश्विनी

विडंबन भारी झालंय.:)