गझल - नाही म्हणू नको तू

Primary tabs

व्यंकटेश कुलकर्णी's picture
व्यंकटेश कुलकर्णी in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amगझल - नाही म्हणू नको तू

अंदाज घे मनाचा... नाही म्हणू नको तू
घे कौल अंतराचा... नाही म्हणू नको तू

सांगून टाक सारे, सांगू नको बहाणे...
बघ नेम ना उद्याचा, नाही म्हणू नको तू!

नुसता सुगंध नाही, काळीज हे फुलाचे
हा गंध अत्तराचा... नाही म्हणू नको तू

रंध्रात पेरले मी, आसक्त ते निखारे
आवेग मीलनाचा... नाही म्हणू नको तू

जाऊ नकोस इतकी, हुरळून तू यशाने
घे ध्यास त्या नभाचा... नाही म्हणू नको तू

संदर्भ लागतो का, नशिबातल्या खुणांचा ?
हा खेळ प्राक्तनाचा... नाही म्हणू नको तू

होकार द्यायचा तो, देऊन टाक आता
दे शब्द काळजाचा... नाही म्हणू नको तू !

व्यंकटेश कुलकर्णी- हैैैदराबाद
मोबाईल क्रमांक - ९५००४८४४४२
ईमेल- kulkarnivenkatesh513@gmail.com

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2020 - 3:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है

''नुसता सुगंध नाही, काळीज हे फुलाचे
हा गंध अत्तराचा... नाही म्हणू नको तू

रंध्रात पेरले मी, आसक्त ते निखारे
आवेग मीलनाचा... नाही म्हणू नको तू''

आवडले.

-दिलीप बिरुटे

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद

नुसता सुगंध नाही, काळीज हे फुलाचे
हा गंध अत्तराचा... नाही म्हणू नको तू

वाह! अप्रतिम..

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद

जाऊ नकोस इतकी, हुरळून तू यशाने
घे ध्यास त्या नभाचा... नाही म्हणू नको तू
कातिल गझल!!

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 9:41 pm | टर्मीनेटर

@व्यंकटेश कुलकर्णी

'नाही म्हणू नको तू'

ही गझल आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद

प्राची अश्विनी's picture

19 Nov 2020 - 6:25 pm | प्राची अश्विनी

वाह! माझी आवडती गझल.

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद

पियुशा's picture

23 Nov 2020 - 9:44 pm | पियुशा

छान !

मित्रहो's picture

23 Nov 2020 - 10:17 pm | मित्रहो

वाह काय सुंदर गझल, एकेक शेर मस्त आहे.

सांगून टाक सारे, सांगू नको बहाणे...
बघ नेम ना उद्याचा, नाही म्हणू नको तू!

भयंकर आवडलेला शेर

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद

किरण कुमार's picture

24 Nov 2020 - 2:19 pm | किरण कुमार

सर्व शेर आवडले

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Nov 2020 - 3:04 pm | ज्ञानोबाचे पैजार

अतिशय आवडली गजल, पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते आहे यातच सारे काही आले.
लिहित रहा,
पैजारबुवा,

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 1:08 pm | चौथा कोनाडा

खुप सुंदर +१

रंध्रात पेरले मी, आसक्त ते निखारे
आवेग मीलनाचा... नाही म्हणू नको तू

क्या बात हैं !

नमस्कार, आपली प्रतिक्रिया खूप मोलाची. मनःपूर्वक धन्यवाद - व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Nov 2020 - 11:29 am | ज्ञानोबाचे पैजार

नमस्कार आपल्या वरच्या दहाही प्रतिक्रीया अत्यंत मोलाच्या आहेत. मनःपूर्वक धन्यवाद. पैजारबुवा, (जगातले सर्वोत्तम ठिकाण अर्थात पुणे);

आमचे गुरुजी सांगतात जेव्हा अनेक जणांना नमस्कार करायचा असतो तेव्हा तो सगळ्यांना समजेल असा एकदाच केला तरी चालतो. उगाच १०० वेळा वाकायची गरज नसते.

पैजारबुवा,